Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अंतरंगातील उभारी देणारी मर्मबंधातली ठेव म्हणजे नाटक

$
0
0

नाट्यसंमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाटक म्हणजे कलाकाराचा आत्मा असते. महाराष्ट्र व बंगालमध्ये जितकी नाट्यभूमी सशक्त आहे, तितकी कोठेच नाही; परंतु प्रसारमाध्यमांच्या स्फोटात तिची गती मंद झाली आहे, असे वाटते खरे तर नाटक म्हणजे अंतरंगातील उभारी देणारी मर्मबंधातली ठेव असते, असे प्रतिपादन मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी केले.

प. सा. नाट्यगृह येथे शुक्रवारपासून कामगार कल्याण नाट्य स्पर्धांना प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन करताना शिलेदार बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की नवे रंगकर्मी रंगमंचावर वावरण्यास उत्सुक असतात. परंतु जितके कलाकार आहेत त्याच्या शंभर पट रसिक निर्माण व्हावेत. कारण रसिकांशिवाय हा डोलारा उभा राहणार नाही. मंचावर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सार्वजनिक वाचनालय नाशिकचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती. मिलिंद पाटील यांनी आभार मानले.

अध्यात्माचा परिसस्पर्श असलेले 'आनंद ओवरी'

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत शुक्रवारी सुरभी थिएटर्सचे 'आनंद ओवरी' हे नाटक सादर करण्यात आले. 'तुका वैकुंठासी गेला' म्हणजे नक्की काय झाले याचा शोध घेणारे हे नाटक होते. प. सा. नाट्यगृहात या स्पर्धा सुरू आहेत. तुकाराम महाराजांचा भाऊ कान्होबा हा त्यांच्यासोबत सावलीसारखा रहात होता. तुकाराम भंडारा डोंगरावर गेले म्हणजे त्यांना शोधून आणणारा, तुकाराम चार आठ दिवस कोठे गायब झाले तर त्यांचा ठाव घेऊन त्यांना पुन्हा घरी घेऊन येणाऱ्या या कान्होबाची कैफियत सादर करणारे नाटक सादर झाले. संत तुकाराम महाराज हे संत म्हणून सर्वांना परिचित होते; परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे कुणीही तितक्या बारीकपणाने कुणी पाहिले नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती, समस्या, तुकाराम महाराजांच्या विरक्त स्वभावामुळे त्यांच्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट यावर आनंद ओवरी हे नाटक गोष्ट करते. तुकोबारायांचे बंधू कान्होबा यांच्या दृष्टीकोनातून तुकोबारांयांचे जीवन चरित्र उलगडत जाते. तुकोबा एका अर्थाने बंडखोर कवी होते. वेदांत तुकोबारायांच्या अभंगवाणीतून सामान्य जणांपर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला, की तो फक्त तुकोबारायांचा इतकी लोकप्रियता त्यांना मिळाली होती. तुकाराम हे देखील हाडामांसाचा माणूस होते. त्यांनी भयंकर दुष्काळ पाहिला, घरातल्यांचे मृत्यु डोळ्यादेखत पाहिले. अशा अनुभवांवर त्यांचे तत्त्वज्ञान निर्माण झाले होते. ही विरक्तीपेक्षा जीवनानुभूती होती. त्यामुळे तुकारामांकडे त्याच दृष्टीकोनातून बघितले गेले पाहिजे असे या नाटकातून दाखविले आहे. आनंद ओवरीचे लेखक दि. बा. मोकाशी असून त्याचे नाट्यरुपांतर व दिग्दर्शन सुरेखा लहामगे यांनी केले. नेपथ्य शैलेन्द्र गौतम, प्रकाशयोजना रवी रहाणे, संगीत शुभम शर्मा, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा सुलभा लहामग यांची होती. या नाटकात संदीक कोते, राजेश शर्मा यांनी भूमिका केल्या.

लोगो : कामगार कल्याण नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धारकऱ्यांचा वेढा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी कोर्टात हजर होण्यासाठी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी धारकऱ्यांनी एकच गर्दी केली. त्यांची धारकऱ्यांशी झालेली चर्चा गुलदस्त्यात असली तरी या घटनेची चर्चा शहरात दिवसभर रंगली.

खटल्याच्या सुनावणीसाठी शुक्रवारी भिडे गुरुजी कोर्टात हजर झाले. तत्पूर्वी ते शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मखमलाबाद नाका परिसरातील राजपालनगर येथील अश्विनी पार्क येथे एका धारकऱ्याच्या घरी पोहोचले. भिडे गुरुजी या ठिकाणी असल्याची माहिती शहरातील धारकऱ्यांना समजल्यावर त्यांच्या भेटीसाठी एकच गर्दी केली. या वेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी पोलिस करीत होते. पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त परिसरात तैनात केला. साध्या वेशातील पोलिसांच्या तुकडीसह महिला पोलिस आणि वाहतूक पोलिस परिसरात आल्याने या परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसले. सकाळी ८ ते ११ या वेळेत भिडे गुरुजींनी धारकऱ्यांशी चर्चा केली. धारकऱ्यांच्या वेढ्यातच ते ११ वाजता जिल्हा न्यायालयात हजर होण्यासाठी रवाना झाले. भिडे गुरुजी यांच्या वाहनासह पोलिसांच्या वाहनांचा मोठा ताफा निघाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी इमारतीजवळ गर्दी केली. वाहनांचा ताफा मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅँड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, शालिमार चौक, सीबीएस या परिसरातून जाताना भिडे गुरुजींना पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारी पालिकेत बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील ५७५ धार्मिक स्थळांवरील पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्याबरोबरच या धार्मिक स्थळांबाबत फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

महापालिकेने शहरातील २००९ पूर्वीच्या ५०४ आणि सन २००९ नंतरच्या ७१ अशा ५७५ धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली होती. परंतु, कारवाईपूर्वी पालिकेने धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांना बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी न दिल्यामुळे, तसेच कारवाई करण्यापूर्वी योग्य ती प्रसिद्धी न दिल्यामुळे उच्च न्यायालयाने पालिकेच्या कारवाईला स्थगिती देत फेरसर्वेक्षण करून योग्य ती प्रसिद्धी देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबाजवणी सुरू केली आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासनाबाबत राज्य सरकारने ५ मे २०११ रोजी एक आदेश काढला असून, त्यानुसार मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार या ५७५ धार्मिक स्थळांवरील कारवाईचा विषय आता या समितीसमोर सादर केला जाणार आहे. ११ रोजी या समितीची बैठक बोलाविण्यात आली असून, त्यात पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, म्हाडा, सिडको आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची माहिती सादर केली जाणार असून, पुढील प्रक्रियेची दिशा ठरवली जाणार आहे. शिवाय, प्रत्येक धार्मिक स्थळाची छाननीही या समितीकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे या समितीवरील जबाबदारी अधिकच वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

मुंबई-आग्रा महामार्गावरील रेणुका देवी चौफुलीजवळ गतिरोधकावर वेग कमी केलेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने चालकाचा मुत्यू झाल्याची घटना घडली. अपघात शुक्रवारी (दि. ७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास झाला.

ओझर (मिग) समतानगर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी राजू उर्फ विश्वराज काशिनाथ खरे

आपल्या दुचाकीवरून (एमएच १५ डीएक्स ११२८) चांदवडकडून मालेगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी रेणुका देवी चौफुलीवरील गतिरोधकावर गाडीचा वेग कमी केलेला असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिली. यात विश्वराज यांना जबर मार लागला. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गांगुर्डे यांनी तपासणी करून विश्वराज यांचा मुत्यू झाल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरावे सादर करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

भाविकांची श्रद्धा असलेली धार्मिक स्थळे हटविण्याचा निर्णय न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने घेतला होता. यानंतर महापालिकेचे सभागृहनेता दिनकर पाटील यांनी न्यायालयात धाव घेत ५७५ धार्मिक स्थळे हटिवण्यावर स्थगिती आणली होती. परंतु, पुन्हा न्यायालयाकडून कारवाई केली गेल्यास काय उपाययोजना करावी, यावर चर्चा करण्यासाठी पाटील यांनी त्र्यंबकरोडवरील सौभाग्य लॉन्स येथे बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी विश्वस्तांनी किंवा संबंधितांनी धार्मिक स्थळांचे पुरावे सादर करावेत, असा ठराव करण्यात आला. याप्रसंगी शहरातील धार्मिक स्थळांचे अध्यक्ष, प्रतिनिधी व भाविक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

न्यायालयाने शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यावर स्थगिती दिली असली तरी सबळ पुरावे जमा करणे गरजेचे आहे. यावेळी पाटील म्हणाले की, न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी भविष्यात महापालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. महापालिकेने धार्मिक स्थळे का हटवू नयेत, अशी जाहिरात वर्तमानपत्रात दिल्यास त्यासाठी सबळ पुरावे असणे गरजेचे असल्याचे सांगितले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करताना चुकीची माहिती प्रशासनाकडे सादर केली गेली असल्याचा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे ऐतिहासिक, धार्मिक स्थळ असलेल्या देशभरातील भाविकांचे देवस्थान काळाराम मंदिरालाही नोटीस बजावण्यात आल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली होती. भविष्यात पुन्हा न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्यास सबळ पुरावे असणे गरजेचे आहे. धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ हे पुरावे जमा करावेत, जेणेकरून महापालिकेकडे ते सादर केले जातील, असेही पाटील म्हणाले. याप्रसंगी माजी आमदार निशिगंधा मोगल, नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे, रवींद्र धिवरे, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, भगवान दोंदे, विश्व हिंदू परिषदेचे गणेश सपकाळ यांसह साधू, संत व धार्मिक स्थळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

नागपूर प्रकरणाचा दाखला

सभागृहनेते पाटील यांनी धार्मिक स्थळांचे पुरावे कसे सादर करावेत याबाबतचे पत्र उपस्थितांना दिले. यात धार्मिक स्थळांच्या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयाने निकाल देताना सार्वजनिक जागेतील स्थळांच्या १० टक्क्यांपर्यंतचे बांधकाम नियमित होऊ शकते व एफएसआय धरून १५ टक्क्यांपर्यंत बांधकाम नियमित करता येते, असे नमूद केले आहे. वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर संबंधित धार्मिक स्थळांची नावे आहेत, तेथील भाविकांनी त्यावर हरकत नोंदवावी, लोकमान्यता असलेल्या धार्मिक स्थळांची माहिती द्यावी, परिसरातील भाविकांच्या सह्यांचे पत्र सादर करावे, धार्मिक स्थळ असलेल्या ठिकाणी कुठलीही तेढ निर्माण होणार नाही याची माहिती सादर करावी, ज्या जागेवर धार्मिक स्थळे आहेत त्या जागेचा प्रॉपर्टी सर्व्हे करावा तसेच धार्मिक स्थळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणेही गरजेचे असल्याचे पाटील यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

नाशिक महापालिकेचा विस्तार होत असतांना वाढलेल्या लोकवस्तीत रहिवाशांच्या सुविधांसाठी मोकळे भूखंड देण्यात आले होते. या भूखंडांवर संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी भाविकांनी धार्मिक स्थळे स्वखर्चातून उभारली आहेत. याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत.

- सर्वनाथ घुमरे, अध्यक्ष, गणपती मंदिर ट्रस्ट, जाधव संकुल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी वडिलांच्या आत्महत्येने लेक झाली पोरकी

$
0
0

सारदे (ता. बागलाण) येथील घटना

...

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्यावर्षी शेततळ्यात अपघाती मृत्यू झाल्याने आई आणि भावाच्या मायेला पोरक्या झालेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीचे पितृछत्रही हरपले आहे. शेतकरी असलेल्या वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याने ती एकटीच पडली आहे. या कमी वयात तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असून, शेतकरी आत्महत्यांनी शंभरी ओलांडली आहे. बागलाण तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. या तालुक्यात आतापर्यंत २० शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शुक्रवारी (दि. ७) सारदे येथील युवा शेतकरी मनोज रामराव धोंडगे (वय ३५) यांनी विषारी औषध सेवन केले होते. घरातील मंडळींचा लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी मनोज यांना तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शनिवारी (दि. ८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मनोज धोंडगे यांच्या सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र बँकेचे सुमारे २१ लाख रुपयांचे कर्ज आहे.

मनोज धोंडगे यांच्या नावावर साडेचार एकर शेती आहे. शेतीसाठी मनोज यांनी महाराष्ट्र बँकेकडून सुमारे २१ लाख रुपये कर्ज घेतल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद आहे. वडिलोपार्जित सुमारे १४ एकर शेती असलेल्या मनोज यास दोन बंधू असून, मोठ्या बंधूचे नामपूर येथे ऑप्टीकल दुकान आहे. लहान भाऊ बीएस्सी डीएड असून, तोदेखील शेती करतो.

...

साहूवर कोसळला दु:खाचा डोंगर

मनोज धोंडगे यांच्या पश्चात सहा वर्षांची साऊ ही मुलगी आहे. मनोज यांच्या पत्नी व मुलाचा गतवर्षीच शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. अवघ्या सहा वर्षांची साहू आई व भावाच्या मायेला दुरावल्यानंतर आता वडिलांच्या निधनाने पोरकी झाली आहे. कमी वयात साहूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साहूचा सांभाळ आजोळकडे होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारित्र्यावरील आरोपातून हत्या झाल्याचे उघड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंबड परिसरातील शांतीनगर झोपडपट्टी येथे झालेली निर्घुण हत्येचे कारण अनैतिक संबंधांबाबत झालेले आरोप असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली असून, त्याने निर्घुण हत्येची कबुली दिली.

प्रमोद साळवी (४२, रा. शांतीनगर, मूळ रा. रायगड) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. कोर्टाने संशयिताला १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यातील ऋषीकेश राजगिरे आणि अनिल सुरकणे हे दोन संशयित आरोपी फरार आहेत. संशयित अनिल हा लहानपणापासून गोट्याभाऊ नावाच्या व्यक्तीकडे राहत होता. याचे निधन झाल्यानंतर तो याच ठिकाणी वास्तव्यास होता. मयत देवीदास कसबे आणि इतर आरोपींमध्ये परिचय असल्याने त्यांचे एकमेकांकडे जाणे होते. देवीदासच्या हत्येपूर्वी शांतीनगर येथे आलेल्या देवीदासने अनिल आणि गोट्यभाऊची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. यावरून बराच वाद झाला. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचून मिटले. यानंतर मंगळवारी रात्री (दि.४) मद्य आणि गांजेच्या नशेत तर्रर असलेल्या देवीदास आणि इतर आरोपींमध्ये वाद झाला. 'तु इकडे येण्याचे कारणच नाही,' असे म्हणत या तिघांनी देवीदासच्या डोक्यात दगड घातला. यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केले. याच ठिकाणी पडलेल्या प्लॉस्टिक गोण्यांचे तीन गाठोडे देवीदासच्या मृतदेहावर टाकून पेटवून दिले.

फरार दोन आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांना अटक होईल, अशी माहिती तपासाधिकारी आणि अंबड पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली. यातील अटक संशयित यापूर्वी १० वर्षांची शिक्षा भोगून आला असून, हे सर्वच सतत अंमली पदार्थांच्या आहारी राहतात, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईभक्तांवर काळाचा घाला

$
0
0

लक्झरी बसच्या अपघातात चार ठार, ३५ प्रवाशी जखमी

...

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नाशिक-मुंबई महामार्गावर पाडळी (ता. इगतपुरी) शिवारात शिर्डीहून मुंबईकडे जाणारी खासगी लक्झरी बस दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात ४ ठार, तर ३० ते ३५ प्रवाशी जखमी झाले. जखमी आणि मृतांमध्ये दिल्ली, मुंबई येथील प्रवाशी असल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील नाशिककडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. दरम्यान, मृत व्यक्ती व जखमी हे बाहेरील राज्यातील असल्याने उशिरापर्यंत त्यांची ओळख पटली नव्हती.

शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन करून ५० प्रवाशी क्षमतेची लक्झरी बस (एमएच ०१, सीव्ही ९६७५) नाशिकडून मुंबईकडे जात होती. मुंबई आग्रा महामार्गावर शनिवारी संध्याकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख शिवारात वेगावर नियंत्रण मिळण्यास बसचालकाला अपयश आल्याने ही बस दुभाजकावर जाऊन धडकली. यानंतर सुमारे २०० फूट बस फरफटत गेली. या भीषण अपघातात बसमधील ४ प्रवाशी जागीच ठार झाले, तर जवळपास ३५ जण जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच नरेंद्र महाराज संस्थानचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड, टोलनाका रुग्णवाहिका सेवेने जखमींना मदत करून रुग्णालयात दाखल केले.

...

नवसाचा मुलगाही हिरावला

अपघातातील एका प्रवासी महिलेला सहा अपत्यांनंतर साईबाबा यांच्या नवसाने मुलगा झाला. त्या मुलाला नवस पूर्ण करण्यासाठी ही महिला बसने प्रवास करीत होती. मात्र या अपघातात नवसाने झालेल्या आठ वर्षीय मुलाचा हृदयद्रावक मृत्यू झाला. यामुळे मातेने एकच आक्रोश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बचतगटांना सक्षम करूनसंघटन वाढविण्याची गरज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक दौऱ्यावर आलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी शनिवारी शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी बचतगटाच्या महिलांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. बचतगटातून महिलांना सक्षम करून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.

या बैठकीला बचतगटांसंदर्भात शासनाच्या असलेल्या योजना व उद्योगासाठी कर्जपुरवठा याबाबत सविस्तर माहिती ठाकरे यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील महिला नगरसेविका, महिला आघाडी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आपल्या भागातील महिला बचतगटातील सदस्यांपर्यंत माहिती पोहचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीला शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सत्यभामा गाडेकर, जिल्ह्य समन्वयक श्यामला दीक्षित, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख स्नेहल भांडे, नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख रंजना नेवाळकर, श्रध्दा जोशी यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा संघटनांसाठीच सीएम चषक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवापिढीने खेळाकडे वळावे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश आहे. सीएम चषक स्पर्धेत आतापर्यंत ३० लाख युवकांनी सहभाग नोंदविला आहे. या महिना अखेरपर्यंत ५० लाख लोक या स्पर्धांशी जोडले जातील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

गंगापूर रोड लगतच्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात देशातील सर्वात मोठ्या क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन टिळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, मराठा विद्या प्रसारक समाजच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., आयर्नमॅन स्पर्धा विजेती रविजा सिंगल उपस्थित होते.

राज्यभरातील २८८ मतदार संघांमध्ये या स्पर्धा भरविण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये नाशिकमधील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून राज्य स्तरावरील बक्षिस मिळवावे, असे आवाहन टिळेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., रविजा सिंगल यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. २३ हजार ७०० खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याची माहिती आमदार फरांदे यांनी दिली.

अडीच तासांनी आमदार महोदयांचे आगमन

सीएम चषकाच्या संकल्पना मांडणीपासून त्यामध्ये सक्रीय सहभागी असलेले आमदार योगेश टिळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मात्र ते तब्बल अडीच ते पावणे तीन तास उशिराने कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्वय हिरेंचे ‘वेट अॅण्ड वॉच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी ज्येष्ठ चिरंजीव माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला; पण त्यांचे दुसरे चिरंजीव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांची अनुपस्थिती व मालेगावमधील कार्यकर्त्यांनी राखलेले अंतर यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अद्वय हिरे धुळे लोकसभेसाठी इच्छुक असून, हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत 'तूर्तास वेट अॅण्ड वॉच'चे धोरण स्वीकारल्याचे सांगितले जाते.

हिरे कुटुंबीय भाजपला रामराम ठोकून स्वगृही परतणार हे खरे तर सहा महिन्यांपूर्वीच जाहीर झाले होते. शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याप्रसंगी हा सोहळा होणार असेही ठरले होते, तथापि, छगन भुजबळ यांच्या काही आक्षेपांमुळे हा प्रवेश लांबला होता. त्यावरून पुन्हा एकदा हिरे व भुजबळ यांच्यात मतभेदाची दरी रुंदावली होती. परिणामी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनीही हिरेंची भेट घेत चाचपणी केली होती. परंतु, गेल्या महिन्यात दस्तुरखुद्द भुजबळांनी मालेगावमध्ये हिरेंच्या घरी भोजन घेत या संदर्भातील सगळ्या शंका कुशंकाना विराम दिला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मध्यस्थाची भूमिका निभावली, असे सांगितले जाते. भुजबळ यांचे चिरंजीव पंकज हे नांदगावचे आमदार असून, या मतदारसंघात हिरेंच्या प्रभावक्षेत्रातील मोठा भाग येत असल्याने त्यांना दुखावल्यास पंकज यांना त्रास होऊ शकतो. तसेच, अपूर्व यांना भुजबळांच्या मदतीविना नाशिक पश्चिममध्ये पुढे जाता येणार नाही, याची जाणीव उभयतांना झाल्याने आपापले ग्रह बाजूला ठेऊन ते एकत्र आले. अपूर्व हिरे यांना नाशिक पश्चिम, तर अद्वय यांना धुळे लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द हवा होता. त्यामुळेच हा प्रवेश थांबला होता. पण, आता तो झाल्याने अपूर्व यांची उमेदवारी निश्चित मानली जाऊ लागली आहे.

धुळे मतदारसंघ हा जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे तूर्तास थांबा व वाट पहा, असा सल्ला दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच दिल्याचे अद्वय यांचे म्हणणे आहे. याचाच अर्थ धुळे काँग्रेसकडेच राहिले, तर अद्वय हे तिकडे जाणार आणि कुटुंबाचीही दोन पक्षांत विभागणी होणार असे दिसते. काँग्रेसच्या सलग दोन पराभवांमुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला असून, जागा वाटप ठरल्यानंतर अद्वय हे प्रवेश करतील, असेही सांगितले जाते.

..

अनुपस्थितीचा बाऊ करण्यात अर्थ नाही

राष्ट्रवादीत अद्वय हिरे यांना उमेदवारीची स्पर्धा नसली तरी काँग्रेसमध्ये मात्र अमरिशभाई पटेल, रोहिदास दाजी पाटील या माजी मंत्र्यांसह नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे अशा दिग्गजांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. पण त्यासाठीही शरद पवार यांनी मदत करण्याचा शब्द दिल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळेच त्या अनुपस्थितीचा बाऊ करण्यात अर्थ नाही, असे अद्वय हिरे यांनी सांगितले. अद्वय यांचा स्वभाव पाहाता ते यापेक्षा वेगळाही निर्णय घेऊ शकतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रांत, तहसीलदारांना निवडणूक प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, पुढील आठवड्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना सोमवारी प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर कर्मचाऱ्यांनाही १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील गावागावांत इव्हीएमसह व्हीव्हीपॅटबाबत मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

नववर्षात लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने आतापासूनच कंबर कसली आहे. मतदार पुनरीक्षण कार्यक्रमानंतर ११ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. लोकसभेसाठी प्राप्त झालेले ९४२२ बॅलेट युनिट, ५४७९ कंट्रोल युनिट आणि तेवढ्याच व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता जनतेपर्यंत पोहोचावी याकरिता यंदा जनजागृतीवर अधिक भर देण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट मशिनबाबत गावागावात जनजागृती करण्यात येणार असून, १५ डिसेंबरपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी १० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक निश्चित करण्यात आले असून, त्यांना १२ व १३ डिसेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तत्पूर्वी, सोमवारी (दि.१०) सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

...

निवडणूक कामकाजाचा आझावा

शुक्रवारी दुपारी भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अश्विनीकुमार यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाकडून निर्गमित केल्या जाणाऱ्या सूचना अभ्यासता का नाही, असा थेट सवाल त्यांनी राज्यातील काही विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारला. आयुक्तांकडून होणाऱ्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अधिकाऱ्यांसह यंत्रणेची भंबेरी उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य

$
0
0

मंत्री दादा भुसे यांची ग्वाही

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या कन्सरा माऊली आणि उन्हादेव यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

कळवण तालुक्यातील मौजे जामले (दळवट) गोधनपानी डोंगर येथे सभामंडप उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार जीवा पांडू गावित, काशिनाथ बहिरम, नगराध्यक्ष मयूर बहिरम, पंचायत समिती सभापती काशिनाथ गायकवाड, सरपंच एकनाथ बागूल आदी उपस्थित होते. यावेळी भायांचे आणि पावरी नृत्य सादर करण्यात आले.

भुसे पुढे म्हणाले की, उत्सवाच्या निमित्ताने संस्कृती जोपासली जाते आणि विचारांची देवाणघेवाण होत असते. चांगल्या परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्यासोबत मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढीचा विकास होईल. आदिवासी भागात काही ठिकाणी टंचाईसदृश परिस्थिती असल्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असेही भुसे म्हणाले. संस्कृतीची जोपासना करताना विद्यार्थ्यांनी शासनाच्या सुविधा आणि योजनांचा लाभ घेऊन शैक्षणिक प्रगती करावी, असे आवाहन आमदार गावित यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणे येथील खंडणीच्या गुन्ह्यात एकास अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुलीस ठार मारण्याची धमकी देत पित्याचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या टोळीतील एका सदस्यास क्राईम ब्रँचच्या पथकाने शनिवारी नाशिकरोड भागात अटक केली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.

फैसल अब्दूल रज्जाक (रा. घासमंडई, सिटी चौक, औरंगाबाद) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी देवून ठाणे येथील भावेशभाई करमसीभाई सवानी (रा. मिरारोड पूर्व) यांचे गेल्या रविवारी (दि.२) अपहरण करण्यात आले होते. मीरारोड येथील सेंट झेवीयर्स हायस्कूल येथून सवानी आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. पाच अपहरणकर्त्यांनी १३ लाख रुपयांची खंडणी मागून पैसे मिळाले नाही तर मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यावेळी सवानी यांना मारहाण करीत त्यांची क्रिएटा कार पळवून नेली होती. या प्रकरणी ठाणे ग्रामीणच्या नयानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीतील एक संशयित नाशिकरोड येथे येत असल्याची माहिती शनिवारी, (दि. ८) सकाळी युनिट एकचे कर्मचारी विशाल काठे यांना मिळाली. यानंतर युनिटीचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नाशिकरोड येथे धाव घेवून संशयितास अटक केली. त्यास लागलीच ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार यवाजी महाले, पोपट कारवाळ, आसीफ तांबोळी, शिपाई विशाल काठे, विशाल देवरे, प्रविण चव्हाण आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असुरक्षिततेचा ‘बाजार’

$
0
0

निफाडच्या आठवडे बाजाराला अतिक्रमणाची समस्या

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शिर्डी-सुरत अर्थात निफाड पिंपळगाव या मुख्य मार्गावर दर शुक्रवारी निफाडचा आठवडा बाजार भरतो. मात्र बाजारात भाजीपाला, फळे व इतर वस्तूंचे विक्रेते एकमेकांशी स्पर्धा करताना थेट रस्त्यावर दुकान मांडतात. त्यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांचाही जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे आठवडे बाजाराच्या दिवशी निफाड नगरपंचायतीने पांढऱ्या रंगाची पट्टी आखून देत होते. त्यापुढे कोणीही दुकान लावू नये, असा नियम आहे. मात्र चार ते पाच आठवड्यांपासून ही 'सीमारेषा' आखून देण्याबाबत पालिका उदासीन दिसत आहे. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

तालुक्याचा बाजार असल्याने निफाडमध्ये दर शुक्रवारी मोठी गर्दी असते. हा बाजार निफाड-पिंपळगाव मार्गावर भरतो. निफाड नगरपंचायतीला वार्षिक लिलावाच्या माध्यमातून मोठे आर्थिक उत्पन्नही मिळते. तरी देखील या बाजाराच्या सुरक्षेकडे नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. सुरत शिर्डी मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने यापूर्वीही अपघात झाले आहेत. त्यामुळे हा बाजार मध्यंतरी निफाड मार्केट कमिटीत स्थलांतर करण्यात आला होता. मात्र नंतर तांत्रिक कारणाने बाजार पुन्हा याच मार्गावर भरत आहे. बाजाराच्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने नगरपंचयातीकडून पांढरी सीमारेषा आखून दिली जात होती. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण कमी झाले होते. मात्र आता ही सीमारेषा आखून न दिल्याने दुपारी चारनंतर सायंकाळी सातपर्यंत दोन्ही बाजूने व्यावसायिक स्पर्धा करीत अतिक्रमण करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते आणि अपघात घडतात.

याच मार्गावर बस स्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, निफाड जिल्हा न्यायालय, वैनतेय विद्यालय, प्राथमिक विद्या मंदिर आहे. त्यामुळे सायंकाळी पाचच्या दरम्यान शाळा सुटलेली असल्यामुळे बाजारासाठी येणाऱ्यांची गर्दी आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेय शिवाय अपघाताचा धोका संभावतो.

ऊस वाहतुकीचा धोका

सध्या ऊसतोडणी सुरू आहे. याच मार्गावरून ट्रॅकटरला दोन ट्रॉल्या जोडून व मालट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक केली जाते. बाजारात ज्या ठिकाणी गर्दी जास्त असते तिथे तीव्र उतार आहे. अतिरिक्त लोडमुळे हे ट्रॅक्टर उलण्याचा धोका आहे. यापूर्वी याच ठिकाणी उसाच्या ट्रकचे ब्रेक फेल होऊन अपघात झाले आहे

निफाडच्या आठवडे बाजाराबाबत सुरक्षेच्या दृष्टीने योग्य कारवाई येत्या काळात केली जाईल. तशा सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील. तसेच अतिक्रमणाची मार्किंग यापूर्वी केली असून त्याचीही अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

--संगीता नांदूरकर, प्रभारी मुख्याधिकारी, नगरपंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फास्ट न्यूज - बागेश्री

$
0
0

अंनिसचे नोंदणी अभियान

नाशिक : १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सभासद नोंदणी अभियान राबविले जात आहे. ९ ऑगस्टला संघटनेला तीस वर्षे पूर्ण होत आहे त्यादृष्टीने हे अभियान जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये सुरू आहे. नोंदणीसाठी प्रा. सुशीलकुमार इंदवे (९४२३९२५१८८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--

मनशक्तीची रोगविषयक कार्यशाळा

नाशिक : मनशक्ती नाशिक शाखेच्या वतीने आज (९ डिसेंबर) रोगविषयक समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब सभागृह, गंजमाळ येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत आजारांच मूळ, आजार होऊ नये म्हणून वैज्ञानिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

----

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

नाशिक : गरुडझेप अॅकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज (९ डिसेंबर) संभाजी स्टेडियमजवळील बुरकुले लॉन्स येथील गरुडझेप अॅकॅडमीत सकाळी १० वाजता शिब्र होईल. संस्थेचे संचालक प्रा. एस. एस. सोनवणे हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----

पसामध्ये सृजनोत्सव

नाशिक : सृजन नृत्य विद्यालय आणि साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान यांच्यातर्फे सृजनोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. आज (९ डिसेंबर) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात नाशिकच्या शिल्पा देशमुख आणि त्यांच्या विद्यार्थिनी नृत्य सादर करणार आहेत. तसेच पुण्याच्या अंजली बागल, अरविंद घोष यांच्या कवितांवर आधारित भवानी भारती ही नृत्यप्रस्तुती करणार आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सृजन विद्यालयाच्या शिल्पा देशमुख यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादकरला दिलासा नाहीच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या संशयितांपैकी एक असलेल्या परिक्षीत औरंगाबादकर याचा सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळाला आहे. मिरजकरचा लेखापाल असलेल्या औरंगाबादकरच्या मागावर पोलिस असून, त्यास अटक झाल्यानंतर या गुन्ह्यावर नव्याने प्रकाश पडू शकतो. दरम्यान, अटकेतील संशियतांनी अद्याप कोर्टाच्या आदेशानुसार पैसे भरले नसल्याने त्यांचीही सुटका होऊ शकलेली नाही.

मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल आहे. २५ हजार ४३९ ग्रॅम सोने आणि २५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संचालक महेश मिरजकर, प्राजक्ता कुलकर्णी व भारत सोनवणे यांना १५ कोटी रुपये कोर्टात भरण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ आर. देशमुख यांनी ३० ऑक्टोबर रोजी दिले होते. जामीनासाठी कोर्टात अर्ज करणाऱ्या या संशयित अर्जदारांना कोर्टाने ही महत्त्वपूर्ण अट टाकली. जवळपास महिना उलटून गेला तरी संशयितांनी कोर्टात पैसे जमा केलेले नाही. त्यामुळे त्यांची सुटका झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कोर्टाचे आदेश पाळले गेले नसल्याने संशयितांना वरिष्ठ कोर्टात धाव घेता आलेली नाही.

दरम्यान, या गुन्ह्यात एक महत्त्वाची कडी असलेल्या सीए परिक्षीत औरंगाबादकर यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. औरंगाबादकर यांनी हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादकर यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हर्षल नाईक, माजी नगरसेवक अनिल चौघुले आणि आणखी काही आरोपी फरारच आहेत. संशयित आरोपी मोबाइलचा वापरच करीत नसल्याने त्यांचे लोकेशन काढणे अवघड होऊन बसले आहे. संशयित आरोपींच्या मालमत्तांचा शोध सुरू असला तरी हर्षल नाईकला अटक होणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस ९ डिसेंबर

$
0
0

वाढदिवस ९ डिसेंबर

कविता राऊत, धावपटू

राजा पाटेकर, कलाकार

दीपाली बैजू, डीजीएम, मेगाफाईन

शरद पाटील, डॉक्टर

झुंबरलाल भंडारी, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारीसह एकास अटक

$
0
0

नाशिकरोड : तलवार बाळगल्याप्रकरणी एका युवकास नाशिकरोड पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली. प्रशांत अरुण वाघ (वय २८, रा. कोटमगाव) असे तलवार बाळगणाऱ्या युवकाचे नाव आहे. सिन्नर फाटा तेथे हा युवक संशयास्पदरित्या हालचाल करताना गस्तीवर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर यांना दिसून आल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पाठलाग करून पकडल्यावर याच्या कमरेला एक म्यानात ठेवलेली तलवार पोलिसांना आढळून आली. प्रशांत वाघ याच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षणाची फिटेना हौस!

$
0
0

खासगी व्यक्तींच्या संरक्षणावरून पोलिसांमध्ये असंतोष

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पद, प्रतिष्ठा आणि पैसा मिरवण्यासाठी अलिशान वाहन, मोठा बंगला इतकेच अपेक्षित नसते. त्याला जोड दिली जाते ती पोलिस बॉडीगार्ड्सची! अर्थात यातील गरज आणि मिरवणे हे अंतर फारच सूक्ष्म असल्याने पोलिसांना अगदीच कामाला ठेवल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. सध्या शहर पोलिस दलात याच कारणांमुळे असंतोष असून, यात काय घडामोडी होतात याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

खासगी व्यक्तीच्या पोलिस संरक्षणाबाबत सरकारने कडक धोरण जाहीर केले आहे. संरक्षण देण्यात आलेल्या व्यक्तीकडून दोन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महिन्याकाठी दीड लाख रुपये घेतले जातात. नाशिकमध्येही असे काही 'रत्न' आहेत. मात्र, पद आणि प्रतिष्ठा वापरून चक्क पोलिसांनाच पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर येतो आहे. यावरून पोलिस दलात बरीच खडाखडी सुरू आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीसह इतरांची सुरक्षाही कमी केली आहे. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, गरज आणि मिरवणे यात फरक असून, पोलिसांचा वापर मिरवण्यासाठी होऊ देणे योग्य वाटत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. अगदी करोडपती व्यक्तीही संरक्षणासाठी आकारण्यात येणारे शुल्क अदा करीत नाही. बऱ्याचदा बळजबरीने पैसे काढावे लागतात. बॉडीगार्ड पुरविण्याचा निर्णय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कमिटी घेते. या कमिटीने नकार दिल्यानंतर काही 'उद्योगपतींनी' थेट गृहराज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून बंद केलेली सुविधा परत मिळवली. यामुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे. आपल्या हितसंबंधाचा वापर करून शहरासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणाऱ्या व्यक्तीच पोलिसांचा गैरवापर करू लागले, तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न खुद्द पोलिसांकडून उपस्थित होऊ लागला आहे. अनेकदा बॉडीगार्ड्स म्हणून दिलेल्या पोलिसांना परजिल्ह्यात नेण्यात येते. या संरक्षणाचा वापर करून काही काळे धंदे करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला. मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात येते आहे.

...

दोघांनाच कायेदशीर संरक्षण

शहर पोलिसांतर्फे सध्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे आणि जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांना पोलिस संरक्षण पुरविण्यात येते. मात्र, हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उर्वरित खासगी व्यक्तींबाबत पैशांची आणि पोलिसांच्या संरक्षणाच्या गैरवापराची ओरड जोरदार सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images