Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गाळपेराची कार्यवाही करण्याच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात जूनपर्यंत पुरू शकेल एवढा चारा उपलब्ध असला तरी दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर चाराटंचाईची समस्या निर्माण होऊ नये यासाठी गाळपेराबाबतची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. या बैठकीला राज्यभरातील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कृषी, पशुधन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपलब्ध चाऱ्याची माहिती सुरुवातीला घेण्यात आली. जिल्ह्यात १५ लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध असून जून २०१९ पर्यंत तो पुरू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्या लावण्याची गरज भासणार नाही असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. धरणांच्या गाळपेरा क्षेत्रात चाऱ्याची लागवड करण्याच्या सूचना राज्य सरकारने १५ नोव्हेंबर रोजी केल्या आहेत. त्यानुसार झालेल्या कार्यवाहीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यात १५०० हेक्टर क्षेत्र निश्चित केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. एकूण ४१ प्रकल्पांमध्ये चारा लागवड करण्यात येणार असून त्यामध्ये ११ मोठ्या, पाच मध्यम तर २५ लहान प्रकल्पांचा समावेश आहे.

दुष्काळ निवारणासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये कामे केली जातात. सिन्नर आणि चांदवड तालुक्यातील गावे निवडून फाऊंडेशनने यापूर्वी कामे केली आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आचारसंहितेपूर्वी गावांची निवड करावी अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

२० पासून लागवड

चारा लागवडीसाठी किती बियाण्यांची गरज आहे, याचा अंदाज घेऊन २० डिसेंबरपासून प्रत्यक्ष लागवडीला सुरुवात व्हायला हवी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. चाऱ्याचे उत्पादन करू इच्छिणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समित्यांबाबत भाजप नमले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण समितीत नऊऐवजी १६, तर वृक्षप्राधिकरण समिती सदस्य निवडीचे नियम धुडकावणाऱ्या भाजपने अखेर प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर सदस्य संख्येचा आणि नियमांबाबतचा बालहट्ट अखेर सोडला आहे. महासभेने कायद्यातील तरतुदींशी विसंगत ठराव केल्यास तो सरकारकडे विखंडनासाठी पाठविण्यात येईल, या भूमिकेवर प्रशासन ठाम राहिल्यानंतर भाजपने अखेर शिक्षण समितीवर नऊ तर वृक्षप्राधिकरण समितीवर दोन सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षानंतर पालिकेत शिक्षण समिती अस्तित्वात आली असून, वृक्षप्राधिकरण समितीलाही मुहूर्त लागला आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून शिक्षण समिती की, शिक्षण मंडळ याचा वर्षभर गोंधळ सुरू राहिला. त्यानंतर पुन्हा समितीचे सदस्य ९ की १६ यावरून सहा महिने वाद सुरू होता. पालिकेत पूर्वी १६ सदस्यीय शिक्षण मंडळ अस्तित्वात होते; परंतु, शिक्षण मंडळ बरखास्तीनंतर २०१४ मध्ये महापालिकेत शिक्षण समिती गठीत करण्यात आली; परंतु शिक्षण मंडळाप्रमाणेच ती १६ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. यासंदर्भातील वाद सध्या न्यायप्रविष्ट असून, कोर्टाने त्यावर अंतिम निर्णय दिलेला नाही. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पूर्ववत शिक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती; परंतु, या संदर्भातील महासभेचा ठराव सरकारने अमान्य करीत शिक्षण समिती गठीत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सरकारच्या निर्देशांनंतर नऊ सदस्यीय शिक्षण समिती तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेच्या पटलावर आणला होता; परंतु, यापूर्वीची शिक्षण समिती १६ सदस्यीय होती, आता नऊ सदस्यीय समिती कशी, असा आक्षेप घेत महासभेत हा ठराव फेटाळला गेला. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा महासभेवर ९ सदस्य नियुक्तीचाच प्रस्ताव सादर केला; परंतु, या प्रस्तावालाही विरोध झाला. नियमांनुसार नऊ सदस्यीय समिती गठणच वैध असल्याचा दावा प्रशासनाकडून महासभेत केला गेला; परंतु, महासभेने तो फेटाळून लावत १६ सदस्यीय समिती घोषित करण्याचा निर्णय घेतला होता. वृक्षप्राधिकरण समितीवर पूर्वी ७ सदस्य महासभेकडून नियुक्त केले जात होते. मात्र, उच्च न्यायालयाने शैक्षणिक अर्हतेची अट घातल्याने महासभेच्या संख्येवर मर्यादा आली. शैक्षणिक अर्हता पालिकेने फेटाळून लावली होती. परंतु, महासभेचे दोन्ही ठराव नियमांच्या विरुद्ध आले तर शासनाकडे विखंडनासाठी पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे भाजपने अखेर दोन्ही समित्यांबाबत नमते घेतले असून, शिक्षण समितीसाठी नऊ सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव दिला आहे. सोबतच वृक्षप्राधिकरण समितीवर दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती प्रशासनाने केली असल्याने या समितीवर नगरसेवकांमधून दोन सदस्यांची नियुक्ती करून पाच सदस्यीय वृक्षप्राधिकरण समिती गठणाचा ठराव महापौरांनी अंतिम केला आहे.

शिक्षण समिती सदस्य

वर्षा भालेराव, दिनकर आढाव, सरिता सोनवणे, स्वाती भामरे, प्रतिभा पवार(सर्व भाजप), चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड, सुदाम डेमसे(सर्व शिवसेना), राहुल दिवे(काँग्रेस)

वृक्षप्राधिकरण समिती सदस्य

सभागृहनियुक्त - वर्षा भालेराव(भाजप), चंद्रकांत खाडे (शिवसेना). अशासकीय सदस्य- पुंडलिक गिते (विकास गंगा सामाजिक संस्था), बबन वाघ (आनंद बहुउद्देशिय सामाजिक संस्था, नाशिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यसनाधीन तरुणाईमुळे अंतर्गत सुरक्षेवर ताण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पोलिस, सैन्यदल, पॅरामिलिटरी फोर्ससहित इतर संरक्षण दलांचे जवान कार्यरत असून, डिफेन्स क्षेत्रात भारत अग्रेसर ठरू लागला आहे. सध्या भारताची ताकद अधिक असली, तरीही देशाच्या सुरक्षा दलात सहभागी होण्यासाठी सध्याची तरुणाई फारशी इच्छुक दिसत नाही. तरुणांतील व्यसनांचे वाढते प्रमाण आणि सोशल मीडियाचा प्रभाव, यामुळे डिफेन्स क्षेत्रात तरुणांची संख्या खालावली आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी पुढील काळात तरुण भरती झाले नाही, तर सुरक्षा यंत्रणा खिळखिळी होऊ शकते. व्यसनांच्या आहारी तरुण अधिक जात असून, सुरक्षा यंत्रणेत सामील होण्याचे प्रमाण अल्प होत असल्याने सुरक्षा यंत्रणांवर ताण येऊ लागला आहे, असे प्रतिपादन माजी पोलिस महासंचालक डॉ. प्रवीण दीक्षित यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी नाशिकतर्फे स्वर्गीय धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे जयंतीनिमित्त गंगापूर रोडवरील कुर्तकोटी शंकराचार्य संकुलात व्याख्यानमाला झाली. व्याख्यानामालेचे पहिले पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. या वेळी माजी पोलिस महासंचालक डॉ. दीक्षित, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी आणि सोसायटीचे कार्यवाह हेमंत देशपांडे व्यासपीठावर होते. माजी पोलिस महासंचालक डॉ. दीक्षित यांनी या वेळी 'अंतर्गत सुरक्षा : आव्हाने उपाययोजना आणि नागरिक म्हणून माझी भूमिका' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.

डॉ. दीक्षित म्हणाले, की अंतर्गत सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी असून, कायद्याच्या बंधनात राहून केलेले वर्तन अंतर्गत सुरक्षेसाठी अतिशय योग्य आहे. सध्याची तरुणाई भरकटत असून, तरुणाईत गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. तरुणाईसह बालगुन्हेगारांची संख्याही मोठ्या शहरांत वाढू लागल्याने, अंतर्गत सुरक्षा धोक्यात आल्यासारखे वाटते. अंतर्गत सुरक्षा म्हणजे, केवळ अतिरेकी हल्ल्यांपासून देशाचे रक्षण करणे नव्हे, तर देशातील गुन्हेगारी नियंत्रित करून, देशाला विकसित करणे आहे. त्यामुळे व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणे, हादेखील अंतर्गत सुरक्षेचा एक भाग आहे. तरुणाईतली व्यसनाधीनता अशीच वाढत राहिल्यास, तरुणांचे सुरक्षा दलात भरती होण्याचे प्रमाणही घटू लागेल. त्याचा परिणाम अंतर्गत सुरक्षेवर होईल, हे सर्वांनी लक्षात ठेवावे, असे डॉ. दीक्षित म्हणाले.

\B

आजचे व्याख्यान

\Bवक्ते : ब्रिगेडीअर हेमंत महाजन

विषय : सागरी सुरक्षा : आव्हाने आणि उपाययोजना

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकनृत्ये, प्रहसनांनी गाजवला चौथा दिवस

$
0
0

इंद्रधनुष्य महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आवारात सुरू असलेल्या १६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य'च्या चौथ्या दिवशी विविध एकपात्री नकला, प्रहसने, समूह व एकल गीते, रांगोळी रेखाटने व स्पर्धास्थळ छायाचित्रण या वैविध्यपूर्ण स्पर्धांनी या महोत्सवाचा बाज टिकवून ठेवला. दुपारनंतर सादर झालेल्या विविध प्रकारच्या लोकनृत्यांनी तर या महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गुणवत्तेचा कळस गाठला.

अंतिम टप्प्यात पोचलेल्या या १६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव 'इंद्रधनुष्य'च्या चौथ्या दिवसाची सुरुवात झाली ती कधी नर्मविनोदी, तर कधी खळखळून हसविणाऱ्या नकलांच्या कार्यक्रमाने. विद्यापीठ आवारातील दादासाहेब फाळके सभागृहात एकूण १२ विद्यापीठांनी आपला सहभाग नोंदविला. विविध प्राणी, पक्षी, चित्रपट अभिनेते यांच्या नकलांनी या कार्यक्रमात रंगत आणली. याच सभागृहात प्रहसनांचे सादरीकरण झाले. पर्यावरण, पाणीप्रश्न, देशाची सद्य:स्थिती, शिक्षण व स्त्रियांचे समस्या यावर आधारित या प्रहसनांनी विशेष दाद मिळविली. साधारण दहा मिनिटांची येथे १६ प्रहसने सादर झाली. त्यानंतर याच सभागृहात सादर झालेल्या लोकनृत्याच्या कार्यक्रमाने तर या महोत्सावातील मनोरंजनाचा कळस गाठला. विविध प्रादेशिक व लोकसंस्कृतीची ओळख या नृत्याच्या माध्यमातून झाली. अनेक जण सहकुटुंब हे कार्यक्रम बघण्यासाठी आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत दादासाहेब फाळके सभागृहात लोकनृत्याची ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात सुरू होती.

विद्यापीठ प्रांगणातील ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्रात रांगोळी व स्पर्धास्थळ छायाचित्रण स्पर्धा झाली. त्यात अनुक्रमे १५ व १७ विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धा ही विषयमुक्त होती, तर स्पर्धास्थळ छायाचित्रणासाठी पडछाया व व्यक्तिचित्रण हा विषय देण्यात आला होता. रांगोळी स्पर्धेत वृक्षतोड, संस्कृती, स्त्रीमुक्ती, अंधश्रद्धा, स्वच्छ भारत अभियान हे विषय हाताळण्यात आले होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात आज दिवसभर भारतीय शास्त्रीय व बिगरचित्रपट एकल व समूहगीत गायनाचा कार्यक्रम झाला. त्यात १७ विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यापैकी भारूड, गोंधळ, जोगवा, कव्वालीला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर विविध प्रकारच्या भारतीय वाद्यसंगीतांचा कार्यक्रम झाला. त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

इंद्रधनुष्य २०१८ साठी ज्ञानगंगोत्रीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो विद्यार्थी दाखल झाले होते. पाच दिवसांच्या या सांस्कृतिक महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांना आरोग्यसेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी बीव्हीजीच्या १०८ अत्यावश्यक सेवेंतर्गत एक अम्ब्युलन्स पुरविण्यात आली आहे. साधारण तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला. ही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बीव्हीजीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंक्राळे आणि सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक गौरी साबळे यांनी विशेष सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडी होणार गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भल्या सकाळी वातावरणात गारठा जाणवत असला तरी थंडीचा जोर ओसरत चालल्याचा अनुभव शहरवासी घेत आहेत. सोमवारी नोंदविण्यात आलेले २८.२ हे कमाल तापमान येत्या दोन तीन दिवसांत ३२ अंश सेल्सियसवर पोहोचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी किमान तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने नाशिककर बोचऱ्या थंडीचा अनुभव घेत होते. परंतु, गेल्या आठवडाभरापासून या किमान तापमानात वाढ होत गेली. कमाल तापमानात चढ उतार होत असले तरी पुढील आठवडाभरात हे तापमान वाढतच जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी किमान तापमान १२.८ अंश सेल्सियस तर कमाल तापमान २८.२ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. विशेषत: सकाळी थंडीचा जोर जाणवत असला तरी वातावरणातून गारवा गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना दिवसभर येतो आहे. ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत मात्र कमाल तापमान टप्प्याटप्प्याने १२.८ अंश सेल्सियवरून १४ अंशांवर तर कमाल तापमान २८.२ अंशांवरून ३२ अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने नोंदविला आहे.

निफाडला पारा नीचांकी

निफाड येथे सोमवारी या हंगामातील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथील गहू संशोधन केंद्रात ही नोंद करण्यात आली. निफाड, उगाव, कोठुरे आणि गोदाकाठ भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने थंडीचे प्रमाण वाढले आहे.

दिनांक-कमाल तापमान-किमान तापमान

४ डिसेंबर २८.९ १४.६

५ डिसेंबर ३०.५ १४.६

६ डिसेंबर ३१.४ १२.६

७ डिसेंबर ३१.५ १३.४

९ डिसेंबर ३१.० ११.३

१० डिसेंबर २८.२ १२.८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...जेव्हा पंतप्रधान मनीऑर्डर नाकारतात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नैताळे येथील शेतकऱ्याने पंतप्रधानांना पाठविलेली १०६४ रुपयांची मनिऑर्डर दिल्लीतील पीएमओ कार्यालयाने परत पाठविली आहे. सोमवारी नैताळे पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित शेतकऱ्याला बोलावून ही रक्कत परत देण्यात आली. कांद्याच्या लिलावातून आलेली तुटपंजी रक्कम संबंधित शेतकऱ्यांने मोदींना पाठविली होती. मात्र याबाबत दिल्ली सरकारने कोणतीही शेतकऱ्याची व्यथा समजून न घेता ही रक्कम परत पाठवून कांदा उत्पादकांची खिल्ली उडविली आहे, अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

निफाड बाजार समितीत नैताळे येथील संजय साठे यांच्या कांद्याला १५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे हताश झालेल्या साठे यांनी कांद्याचे १०६४ रुपये हाती पडल्यावर निफाड पोस्ट कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनिऑर्डर पाठविली होती. त्यांच्या या मनिऑर्डरची खूप चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून साठे यांची सखोल चौकशी करण्यात आली. सोमवार (दि.१०) नैताळे पोस्ट कार्यालयात साठे यांना बोलावण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाकडून परत आलेली मनिऑर्डर त्यांना परत करण्यात आली. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून ही मनिऑर्डर न स्वीकारल्याची कोणतीही पवती दिली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्होकेशनल कर्मचाऱ्यांचे सोमवारी आंदोलन

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाच्या सहसंचालकांकडून होणाऱ्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य एसएससी व्होकेशनल व अशासकीय तांत्रिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १७) आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात आमदार बच्चू कडू आणि आमदार किशोर दराडे यांचा सह भाग राहणार आहे.

अशासकीय आस्थापनांमधील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना सलग १२ वर्षांच्या सेवेनंतर कालबद्ध पदोन्नती योजनेत २४०० रुपये ग्रेड पे दिला जातो. राज्यात मुंबई, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या सहा प्रशासकीय विभागांमध्ये नाशिक वगळता इतर विभागांना सलग बारा वर्षांच्या सेवेनंतर २४०० रुपये ग्रेड पे संबंधित विभागातील सहसंचालकांनी लागू केला आहे. नाशिक विभागाचे सहसंचालक जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांची अडवणूक करीत असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

याप्रश्नी संघटनेचे पदाधिकारी संवाद साधण्यास गेल्यास त्यांना हेतूपुरस्सर भेट दिली जात नाही. दिवस-दिवसभर केबिनबाहेर प्रतीक्षेत ठेवून पर्यायी अधिकऱ्यांशी औपचारिक भेट घालून दुर्लक्षित केले जाते. ग्रेड पे बाबत कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या अन्यायाची कोंडी फोडण्यासाठी सोमवारी (दि. १७) नियोजित आंदोलनास एचएससी व्होकेशनल विभागातील सर्व लिपिक कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे राज्य सचिव अरुण कांगणे, उपाध्यक्ष रमेश सावकारे, सदस्य संजय सानप, नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, धुळे जिल्हाध्यक्ष प्रदीप माणके, जळगाव व नगर जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाहेरच्यांनी पक्षशिस्त शिकवू नये

$
0
0

हिमगौरी आहेर-आडके यांचा दिनकर पाटील यांना टोला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील सर्वे नं. ७०५ च्या २१ कोटींच्या रोखीच्या मोबदल्यावरून स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्यावर आरोप करणाऱ्या सभागृहनेते दिनकर पाटील यांना आहेर-आडके यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. पक्षातच जन्मलेल्यांना बाहेरून आलेल्यांनी पक्ष शिस्त शिकवू नये, असा टोला लगावत आपल्यावरील वैयक्तिक टिकेला कायदेशीर सल्ल्यानुसार उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सभागृहनेते दिनकर पाटील यांनी सर्वे. नं. ७०५ च्या २१ कोटींच्या मोबदल्यावरून आहेर-आडके यांच्यावर आरोप केले. तसेच आहेर-आडके यांनी पक्षशिस्त मोडल्याचा आरोप करत, त्यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली. त्यामुळे पाटील यांच्या आरोपांना आहेर-आडके यांनी सोमवारी उत्तर दिले. आहेर कुटुंबीय हे पक्षाच्या स्थापनेपासूनच भाजपमध्ये आहे. त्यामुळे पक्षशिस्त काय आहे, याचे बाळकडू घरातच मिळाल्याने बाहेरून आलेल्यांनी आम्हाला पक्षशिस्त शिकवू नये, असा उपरोधिक सल्ला सभापती आहेर यांनी दिला. मुंढे यांच्यावरील अविश्‍वास ठरावावेळी पक्षशिस्त कोणी पाळली? कोणाच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या? हे सुज्ञ नाशिककरांना माहित आहे. आहेर कुटुंबीयांचे नाशिकच्या विकासात कायम योगदान राहिले आहे. आम्ही वैयक्तिक फायद्यासाठी कधीही पदाचा वापर केला नाही. मात्र, पदावर असूनही कुणाच्या दुकानदारी बंद झाली, दम देण्याची भाषा कोण करते, हे नाशिककरांना माहित आहे. त्यामुळे आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आहेर कुटुंबाचे नाव आणि पक्षशिस्तीमुळे मी आतापर्यंत सहन केले. परंतु, आता सहन करणार नसल्याचा इशारा सभापती आहेर यांनी दिला. आपल्यावर वैयक्तिक टीका केल्याबद्दल कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देणार असल्याचा दमही त्यांनी भरला आहे. त्यामुळे पालिकेत आता सभागृहनेते विरुद्ध स्थायी समिती सभापती असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

न्यायालयीन आदेशाने मोबदला

न्यायालयाने २०१६ मध्ये ५६ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यापूर्वी संबंधित जागामालकाला काही प्रमाणात टीडीआर दिला गेला. उर्वरित मोबदला रोख घ्यायचा की टीडीआर स्वरुपात हा ऐच्छिक विषय आहे. त्यानुसार जागामालकाने रोखीची मागणी केली. पालिकेच्या नगरररचना विभागाने देखील पाच वेळा टीडीआर स्वरुपात मोबदल्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जागामालक रोखीवरच अडून बसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार रोख रक्कम अदा करण्यात आली. परंतु, या तांत्रिक बाबींचा विचार न करता बेछूट आरोप करण्यात आले. मोबदला देण्याची बाब ही पूर्णता प्रशासकीय आहे. त्याच्याशी आपला कोणताही संबध नाही, असा दावाही आहेर-आडके यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संदर्भ’ला मिळणार लिफ्ट

$
0
0

शुभवार्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये लवकरच दोन नव्या लिफ्ट सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे टेंडर सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले असून, हे काम आगामी तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकते. आजमितीस हॉस्पिटलमधील एक लिफ्ट बंद पडली असून, दुसरी लिफ्ट चार महिन्यांपूर्वीच दुरुस्त करण्यात आली.

शालिमार येथे असलेल्या संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये हार्ट, किडनी अशा महागड्या आजारांवर मोफत उपचार केले जातात. हॉस्पिटलमध्ये नाशिकसह विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबारसह औरंगाबाद विभागातील अनेक जिल्ह्यातील पेशंट मोठ्या संख्येने दाखल होत असतात. हॉस्पिटलमध्ये दोन लिफ्ट असून, पेशंटसाठी त्या उपयोगी ठरतात. हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभाग हे वरच्या मजल्यावर आहे. त्यामुळे लिफ्ट बंद पडली की पेशंटला आल्या पावली माघारी फिरण्याची वेळ येते. दुसरा कोणताही पर्याय यासाठी उपलब्ध नाही. सध्या कार्यरत असलेल्या लिफ्ट १० वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाल्या असून, सातत्याने बंद पडतात. जानेवारी २०१८ मध्ये या दोन्ही लिफ्ट बंद पडल्या होत्या. जवळपास तीन ते चार महिने हीच परिस्थिती होती. यानंतर दोनपैकी एक लिफ्ट सुरू करण्यात आली. याच दरम्यान, संदर्भ सेवा हॉस्पिटल प्रशासनाने याबाबतच प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. सरकारने त्यास मंजुरी देत ४० ते ४५ लाखांचा निधी या कामासाठी उपलब्ध करून दिला. निधी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आता टेंडर नोटीस प्रसिद्ध केली असून, आगामी तीन महिन्यांत हे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. हॉस्पिटलमध्ये लिफ्ट सुरू राहणे हे पेशंटसाठी अत्यावश्यक आहे. लिफ्ट बंद असताना गंभीर अवस्थेत येणाऱ्या पेशंटला दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर घेऊन जाणे अशक्य होते. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची योग्य ती काळजी वेळेवर होणे आवश्यक असल्याचा मुद्दा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादी’तर्फे आज रास्तो रोको

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप-शिवसेना युती सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा या मागणीसाठी मंगळवारी (दि. ११) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सकाळी १० वाजता मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी माजी खासदार समीर भुजबळ व जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या उपस्थितीत मंगळवारी चांदवड चौफुली येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती 'राष्ट्रवादी'चे चांदवड तालुकाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड यांनी दिली. या आंदोलनात नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएम क्रीडा स्पर्धेचा उत्साहात समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मध्य मतदार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सीएम चषक क्रीडा स्पर्धेचा रविवारी रात्री समारोप झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कब्बडी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती आणि कॅरम या खेळांच्या विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जितेंद्र ठक्कर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे चिटणीस संतोष मंडलेचा, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते, प्रा. सुहास फरांदे, क्रेडाईचे तुषार चव्हाण यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेत २३ हजार ७५० खेळाडूंनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिल्याबद्द्ल त्यांनी खेळाडूंची आभार मानले. या महोत्सवामध्ये अंतर्भाव असलेल्या क्रिकेट स्पर्धेलाही नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला असून, यामध्ये १३७ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे १६ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत.

स्पर्धेचे निकाल

कबड्डी

पुरुष

क्रीडा प्रबोधीनी - प्रथम क्रमांक

महाराष्ट्र पोलीस संघ - दुसरा क्रमांक

द्रोणाचार्य क्लब - तिसरा क्रमांक

महिला

नाशिक क्लब - प्रथम

रमाबाई आंबेडकर - दुसरा क्रमांक

रचना क्लब - तिसरा क्रमांक

कबड्डी शालेय गट

मुले

गुलालवाडी संघ - प्रथम

नवरचना क्लब - दुसरा क्रमांक

वाघ गुरुजी संघ - तिसरा क्रमांक

मुली

सारडा कन्या शाळा - प्रथम

वाघ गुरुजी संघ - दुसरा क्रमांक

खो-खो

पुरुष

समर्पण क्लब - प्रथम

एकलव्य रेसिडेन्सी दुसरा क्रमांक

केटीएचएम - तिसरा क्रमांक

महिला

केटीएचएम- प्रथम

रमाबाई आंबेडकर - दुसरा क्रमांक

व्ही. एन. नाईक- तृती क्रमांक

हॉलीबॉल - पुरुष

मित्र विहार - प्रथम

यशवंत व्यायाम शाळा - दुसरा क्रमांक

वीरेंद्र क्रीडा मंडळ - तिसरा क्रमांक

महिला

वीरेंद्र क्रीडा मंडळ 'अ'- प्रथम

वीरेंद्र क्रीडा मंडळ 'ब ' - दुसरा क्रमांक

महाराष्ट्र पोलिस संघ - तिसरा क्रमांक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगाव ढग्यातील खुनाचेधागेदोरे पोलिसांच्या हाती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

बेळगाव ढगा शिवारात १७ वर्षीय मुलाच्या खूनप्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून, लवकरच मुख्य संशयितास ताब्यात घेतले जाणार असल्याचे सातपूर पोलिसांनी सांगितले. हा खून मांडूळ सापाच्या तस्करीतून झाला असावा, अशी चर्चा परिसरात आहे.

संतोष श्यामराव आगम घरी न परतल्याने त्याच्या भावाने रविवारी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, त्याचवेळी बेळगाव ढगा शिवारातील खदानीच्या रस्त्यावर संतोषचा मृतदेह आढळला. संतोषवर धारधार शस्त्राने १२ ते १३ वार केल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. संतोषसोबत राहणाऱ्या १५ ते २० जणांची चौकशी रविवारी रात्रीपासूनच पोलिसांनी सुरू केली होती. अखेर संतोष आगम खुनाचा गुन्हा सातपूर पोलिसांना उलगडला आहे. पोलिस मुख्य संशयिताच्या मागावर रात्री उशिरापर्यंत होते. लवकरच त्याच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात येईल, असे सातपूर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संतोषच्या खुनामागे नेमके कारण काय, याचा उलगडा संशयित ताब्यात आल्यावरच होणार आहे. सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलींची शोधाशोध!

$
0
0

लोगो - मटा इम्पॅक्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये शेअरिंग सायकलचा पूर्णतः गोंधळ उडाला असून, शहरातील सायकल पॉइंटवर सायकल दिसत नसल्याचे वृत्त 'मटा'ने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्तानंतर स्मार्ट सिटीअंतर्गत शेअरिंग सायकलचे मेन्टेनन्स करणारी यंत्रणा खडबडून जागी झाली. सोमवारी दिवसभर शहरातील गायब झालेल्या सायकलींचा शोध घेण्यात आला. दिवसभर शहरातील सर्व अपार्टमेंटमध्ये बेवारस सायकली ताब्यात घेण्यासाठी यंत्रणेची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.

'स्मार्ट सिटी'अंतर्गत शहरात ऑक्टोबर महिन्यात मोठ्या थाटामाटात सायकल शेअरिंग प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प दोन महिन्यांतच खिळखिळा झाला असून, शेअरिंग सायकली असूनही दिसत नसल्याची बाब 'मटा'ने उजेडात आणली. सोमवारी, १० डिसेंबरच्या अंकात 'सायकली गेल्या कुठे' हे वृत्त 'मटा'ने प्रकाशित केले. या वृत्तानंतर सोमवारी सकाळपासूनच शेअरिंग सायकलींचा शोध घेण्यासाठी स्मार्ट सिटीची यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे दिसून आले. शहरातील अपार्टमेंटमध्ये लावण्यात आलेल्या सायकलींसह बेवारस आणि तुटक्या सायकली ताब्यात घेण्यासाठी दिवसभर यंत्रणेची शोधाशोध सुरू होती. गंगापूर रोड, महात्मानगर, प्रमोद महाजन गार्डन, मॅरेथॉन चौक आणि शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणच्या सायकल पॉइंटवर एकही शेअरिंग सायकल नसल्याचे, 'मटा'च्या बातमीत नमूद केले होते. त्यानुसार सकाळपासून गंगापूर रोड, कॉलेज रोडसह इतर परिसरातील अपार्टमेंट व इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या सायकली ताब्यात घेण्यात आल्या. बेवारस सायकलींसह स्कॅन चिप आणि सीट तुटलेल्या सायकलीही गोळा करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच शहरात या सायकलींचा मेन्टेनन्स पाहणाऱ्या यंत्रणेने सायकल पॉइंटवरील सायकलींची तपासणी सुरू केली असून, सर्व सायकलींची दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

\Bयंत्रणा फिरली

\Bशेअरिंग सायकल प्रकल्पाचा उडालेला बोजवारा समोर आल्यानंतर यंत्रणा फिरली. या यंत्रणेकडून सोमवारी दिवसभर बेवारस सायकली ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे शोधून गोळा करण्यात आल्या असून, रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

मटा भूमिका

नाशिककर आणि शहराच्या तंदुरुस्तीसाठी सुरू करण्यात आलेल्या सायकल शेअरिंग प्रकल्पाची अवघ्या दोन महिन्यांत झालेली वाताहत 'मटा'ने उजेडात आणली आहे. वापरानंतर काही नागरिक या सायकली स्टॅण्डवर लावण्याऐवजी स्वत:च्या घरी घेऊन जातात. तसेच, सायकली योग्य पद्धतीने हाताळल्या जात नसल्याने त्यांची मोडतोड झाल्याची बाबही निदर्शनास आली आहे. खरे तर हा प्रकल्प आपल्यासाठीच आहे हे नागरिकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. सार्वजनिक प्रकल्प यशस्वी करायचे असतील तर

नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे किमान यापुढे तरी नाशिककर सायकली काळजीपूर्वक हाताळतील आणि संबंधित यंत्रणाही दक्ष राहील एवढीच अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॉलरशिप हडपणाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शासनाच्या वतीने विविध योजनांतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्कॉलरशिप हडपणाऱ्या काही शिक्षण संस्था आणि तेथे कार्यरत असणाऱ्या दोषींवर सरकारने त्वरित कारवाई करावी, असे साकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना घालण्यात आले.

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन स्कॉलरशिपच्या प्रक्रियेतील अनियमितता मांडली. शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात सातत्याने होणारी दिरंगाई, अनियमितता, वेबसाइट व विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्या वेळोवेळी मांडूनही सरकारने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आजवर शैक्षणिक वर्ष २०१७- १८ या शैक्षणिक वर्षात हजारो लाभार्थी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. अनेक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप संस्थांच्या हस्तक्षेपामुळे मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. समाजकल्याण व आदिवासी विभाग मिळून २१०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर यावर चौकशी आयोग नेमून ज्या शैक्षणिक संस्था व अधिकारी यांनी मिळून हा गैरव्यवहार केला त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी असे या अहवालात म्हटले होते. मात्र, अद्याप कोणत्याही शैक्षणिक संस्थेवर कारवाई केली गेली नाही व रक्कम वसूल केली गेली नाही. दरम्यान, स्कॉलरशिपचा गैरव्यवहार करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई करावी व विद्यार्थ्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती वेळेत मिळवून द्यावी, अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अभाविपचे नाशिक महानगरमंत्री प्रथमेश नाईक, जिल्हा संयोजक सागर शेलार, नाशिकरोड जिल्हा संयोजक दुर्गेश केंगे, नगरमंत्री अजय कनोजे, आदित्य आढाव, सुयश सोनी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस महासंचालक शहरात दाखल

$
0
0

नाशिक : महाराष्ट्र पोलिस अकादमीवर ड्रोन फिरल्याची गंभीर दखल राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी घेतली आहे. त्यामुळेच ते तातडीने सोमवारी (१० डिसेंबर) सायंकाळी शहरात दाखल झाले. पोलिस अकादमीच्या सुरक्षा व्यवस्थेबरोबरच शहर पोलिसांची कामगिरी, पोलिस अकादमीचे कामकाज, ग्रामीण पोलिसांची कामगिरी आदींचा मंगळवारी (दि.११) सकाळी ते आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर आणि ग्रामीण पोलिसांची तयारी सुरू होती.0

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३१० मतदान केंद्र निश्चित

$
0
0

नाशिकमध्ये १६२ तर जिल्ह्यात १२५ ठिकाणी व्यवस्था

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंन्ट बँकेच्या (नामको) २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३१० मतदान केंद्र निवडणक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी निश्चित केले आहे. नाशिक शहरात १६२, जिल्ह्यातील ग्रामीण भागात १२५ तर जिल्ह्याबाहेर २१ मतदान केंद्र असणार आहे. तसेच हैद्राबाद व सूरत येथेही प्रत्येकी १ मतदान केंद्र असेल.

निवडणुकीसाठी १ लाख ७६ हजार २६२ मतदार आहे. त्यातील ९३ टक्के मतदान हे नाशिकमध्ये आहे तर उर्वरित ७ टक्के मतदान हे जिल्ह्याबाहेर आहे. या मतदान केंद्रात सकाळी ८ ते ५ या वेळात हे मतदान करण्यासाठी वेळ निश्चित केली आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ओळखपत्रांपैकी फोटो असलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. मतदानासाठी २२०० कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात पुरुष पोलिस ३०० तर महिला पोलिस १०० याप्रमाणे ४०० पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्याबाहेर २६ जिल्ह्यात ११ हजार ६७२ मतदान असले तरी जास्त मतदान असलेल्या ठिकाणीच हे मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. श्रीरामपूर येथे ३ मतदान केंद्र असणार आहे. त्यानंतर पुणे, अहमदनगर, राहता, संगमनेर, येथे प्रत्येकी दोन तर धुळे, मुंबई, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, राहुरी, येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. उर्वरित जिल्ह्यातील मतदार मात्र त्यांना जवळ असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करू शकणार आहे.

शहरात १६२ मतदान केंद्र

नाशिकमध्ये १६२ मतदान केंद्र आहेत. यात आडगाव येथे मनपा शाळा क्रमांक ६९, मनपा शाळा क्र. १०, उन्नती विद्यालय, (पंचवटी), मनपा शाळा क्र. २९ हिरे विद्यालय (मखमलाबाद), मनपा शाळा (म्हसरुळ), बालशिक्षण मंदिर, (गोरेराम लेन) मनपा शाळा (बुधवार पेठ) सागरमल मोदी, प्राथमिक शाळा (नेहरू गार्डन) वसंतराव नाईक संस्था, (शरणपूर रोड), बी. डी. भालेकर स्कूल, रवींद्र विद्यालय, (द्वारका), सावित्रीबाई फुले विद्यालय (पखाल रोड), मनपा शाळा क्र. १७ (गांधीनगर) मनपा शाळा क्र. ४६ (उपनगर) पुरुषोत्तम इंग्लिश मीडियम स्कूल, (जेलरोड), देवळाली कॅम्प, मराठी मुलींची शाळा, नूतन शिक्षण संस्था, (भगूर) मनपा क्र. शाळा (सिडको), पेठे हायस्कूल (सिडको), मनपा शाळा क्र. ८०, ८१ (कामटवाडे), स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, (इंदिरानगर), मनपा शाळा क्र. ७२ (अंबड), मनपा शाळा (मखमलाबाद), जिल्हा परिषद शाळा, (गिरणारे) येथे मतदान केंद्र आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्र

पेठ, सटाणा, ताहाराबाद, ब्राह्मणगाव, सुरगाणा, सिन्नर, कळवण, अभोणे, देवळा, उमराणे, संगमेश्वर (मालेगाव), मालेगाव कॅम्प, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, वडाळीभोई, वडनेर भैरव, दिंडोरी, वणी, त्र्यंबकेश्वर, हरसूल, घोटी, इगतपुरी येथे मतदान केंद्र असणार आहेत.

निफाडला २३ मतदान केंद्र

नाशिक पाठोपाठ निफाड तालुक्यात सर्वाधिक मतदार केंद्र आहे. या तालुक्यात २३ हजार ७०७ मतदार आहे. त्यासाठी २३ मतदान केंद्रे आहेत. यात चांदोरी, खेरवाडी, चितेगाव, सायखेडा, भेंडाळी, सोनगाव, चाटोरी, बेरवाडी, पिंपळगाव निपाणी, शिंगवे, करंजगाव, म्हाळसाकोरे, लासलगाव, खेडलेझुंगे, विंचूर, देवगाव, ओझर मिग, पिपंळगाव बसवंत, नांदुर्डी, निफाड, धारणगाव वीर, कसबे सुकेणे, दावचवाडी असणार आहे.

राज्याबाहेरील मतदारांची अडचण

राज्याबाहेर या निवडणुकीत ९३२ मतदार आहेत. त्यातील गुजरातमधील ७९२ व आंध्र प्रदेशातील १२५ मतदान आहे. त्यामुळे येथे मतदान केंद्र देण्यात आले आहे. पण, उर्वरित मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, तामीळनाडू, बिहार या राज्यातील मतदारांना निश्चित केलेल्या मतदान केंद्रात मतदान करता येणार आहे. पण, त्यासाठी त्यांना अगोदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र द्यावे लागणार आहे.

निवडणूक रंग : नामको बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सायकलिस्टच्या एनआरएमची दुसरी वर्षपूर्ती

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा उपक्रम असलेल्या एनआरएम सायकलिंग अर्थात नाशिक रँडोनर्स मायलर्स या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची उत्साहात सांगता झाली.

एक महिन्यात एक याप्रमाणे दोन वर्षांत २४ राईड्स पूर्ण झाल्या असून यामध्ये नाशिकला सलग १२ राईड्स पूर्ण करणारे रवींद्र चांदोरे, शिशिर आचार्य, पूर्वांश लखनानी, धर्मराज जगधाने असे ४ प्लॅटिनम रायडर्स मिळाले आहेत. तर सलग ३ राईड्स पूर्ण करणारे एकूण १८ सिल्वर रायडर्स, सलग ६ राईड पूर्ण करणारे ७ गोल्ड रायडर्स, ९ राईड्स पूर्ण करणारे ४ डायमंड रायडर्स नाशिक सायकलीस्टने मिळविली आहेत.

एनआरएमच्या दुसऱ्या पर्वाची अखेरची राईड पूर्ण झाल्यानंतर रविवारी झालेल्या समारंभात पदक वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सर्वात तरुण आशियायी महिला आयर्नगर्ल ठरलेली रविजा सिंगल, नाशिकचा पहिला आयर्नमॅन अमर मियाजी, आयर्नमॅन चेतन अग्निहोत्री, डॉ. पिंपरीकर, अल्ट्रा सायकलीस्ट डॉ. हितेंद्र महाजन, लेफ्ट. कर्नल भारत पन्नू, आयर्नमॅन मशीन मुस्तफा, अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया आणि एनसीएफ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रविजा सिंगल हिने आपले स्पर्धेतील अनुभव सांगितले. डॉ. सिंगल म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनशी जोडला गेलो आहे. इथे खूप उत्साही लोक आहेत. जसपालसिंग विर्दी यांच्या संपर्कात आल्यावर सायकलिंगला खरी सुरुवात केली. लेफ्ट. कर्नल भारत पन्नू, आयर्नमॅन चेतन अग्निहोत्री, अमर मियाजी यांनीही आपापले अनुभव मांडले. डॉ. महाजन यांनी एनआरएमचा इतिहास सांगताना जसपालच्या आठवणींना उजाळा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलित पॅँथरतर्फे घरकुलासाठी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शासकीय जागांवर वसलेल्या झोपडपट्ट्यांमधील पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसेच घरकुलाच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दलित पॅँथरच्या नेतृत्वाखाली सोमवारी झोपडपट्टीवासीयांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली. शासनाच्या जागांवरील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना घरकुलांचे लाभ दिले जावेत. पंचवटीतील प्रभाग २ मधील सावित्रीबाई फुलेनगर वसाहत येथील घरकुलापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रायपोर्टसाठी लासलगावात चाचपणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर सरकारच्या महत्त्वाकांक्षी ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर घडामोडी सुरू आहेत. ई वाय एंटरप्रायजेसच्या प्रतिनिधींकडून सोमवारी कांद्याची जागतिक बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पदाधिकारी व व्यापाऱ्यांकडून माहिती घेतली. जिल्ह्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट विकसित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सोमवारी लासलगाव येथील बाजार समितीमध्ये ई वाय एंटरप्रायजेसच्या प्रज्ञा प्रियदर्शनी आणि ऐश्वर्या मुळे यांच्या शिष्टमंडळाने लासलगावमधून निर्यातीची माहिती घेऊन चाचपणी केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये नाशिक जिल्ह्यात ५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टला मान्यता दिली. जेएनपीटीच्या माध्यमातून ईवाय एंटरप्रायजेसने लासलगावमध्ये सोमवारी पाहणी केली. या प्रकल्पानंतर गुंतवणुकीनुसार जेएनपीटीला प्रतिसाद कसा असेल, तो चालेल का, अशा काही मुद्द्यासाठी ही भेट होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार याबाबत माहिती घेऊन अहवाल सादर करायचा आहे.

कांद्यासाठी आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची बाजारपेठ म्हणून लासलगाव ओळखले जाते. कांद्याबरोबरच डाळिंब, टोमॅटो, द्राक्ष, भाजीपाला, मका आणि भुसार मालासाठी लासलगाव अग्रेसर आहे. कांदा, आंबा, डाळी, मसाले यासह अनेक पिकांवर विकिरण प्रक्रिया लासलगाव येथील केंद्रामध्ये केली जाते. दरवर्षी लासलगावमधून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, गल्फ कंट्री आदी ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल निर्यात केला जातो. लासलगाव शहरामध्ये मध्य रेल्वेची सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा पाठविला जातो. त्यामुळे लासलगावमध्ये जर या ड्रायपोर्टची सुविधा सुरू करण्यात आली तर त्याचा पिंपळगाव बसवंत, निफाड, चांदवड, मनमाड, उमराणे, झोडगे, धुळे येथील बाजार समितीच्या घटकांना फायदा होईल, असेही मत व्यापारी वर्गाने मांडले.

या वेळी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती संदीप दरेकर, सचिव बी. वाय. होळकर, कांदा निर्यातदार नितीन जैन, ओमप्रकाश रांका, मनोज जैन, ऋृषभ रांका, सागर जैन, राजाराम सांगळे, संजय सांगळे, वेफकोचे अध्यक्ष संजय होळकर, दाणा व्यापारी रूपेश चोरिडया, मुख्य लेखापाल नरेंद्र वाढवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ हजार जणांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मिळकत सर्वेक्षणात कर जंजाळातून दूर असलेल्या ६२ हजार मिळकतींना नोटिसा पाठवण्याच्या कारवाईला सर्वपक्षीयांचा विरोध होत असतानाच, महापालिकेच्या करविभागाने नोटिसा पाठविण्याच्या कारवाईला गती दिली आहे. चालू आठवड्यात ४२ हजार नोटिसा पाठविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यातून ज‌वळपास सव्वाशे कोटींपर्यंत उत्पन्न पालिकेला अपेक्षित आहे. मिळकतींवर कर आकारणी करताना महासभेने मंजुरी दिलेल्या अठरा टक्के वाढीसह करयोग्य मूल्य दरातील वाढ समाविष्ट करून नोटिसा बजावल्या जात असल्याने मिळकतधारकांचा गोंधळ अधिकच वाढला आहे.

महापालिकेच्या विविध कर विभागाने यंदा अडीचशे कोटी रुपये मिळकत करातून महसुलाचे उद्दीष्ट निश्‍चित केले आहे. नियमित मिळकतीतून सव्वाशे कोटी आणि मिळकत सर्वेक्षणातून आढळलेल्या ६२ हजार मिळकतींतून सव्वाशे कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न आहे. मिळकत सर्वेक्षणात आढळलेल्या ६२ हजार मिळकतींना नोटिसा पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. यातील आतापर्यंत ३० हजार मिळकतींना लाखोंच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. चालू आठवड्यात आणखीन १२ हजार नोटिसा पाठविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नोटिसा पाठविण्यात येत असलेल्यांमध्ये बहुतांश मिळकती कपाटांच्या प्रकरणात अडकलेल्या आहेत. पंरतु, कंपाउंडिंग पॉलिसीमध्ये प्रस्ताव दाखल झाल्यानंतरही अशा इमारतींना नोटिसा पाठविल्या जात आहेत. नगररचना विभागाकडून माहिती मिळत नसल्याने नोटिसा पाठवून किमान पडताळणी करण्याचा कर विभागाचा प्रयत्न आहे. मनुष्यबळाची कमतरता व करयोग्य मूल्य दरवाढीतून निर्माण झालेल्या वादामुळे मिळकतधारकांना नोटिसा पोहोचल्या नाहीत. परंतु, आता नोटिसा पाठविण्याच्या कारवाईला गती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images