Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भोसलामध्ये कारगील विजय दिवस

$
0
0
कारगील विजय दिन म्हणून २६ जुलै हा दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त भोसला मिलीटरी स्कूलतर्फे शंकराचार्य संकुल येथे शहिदांना मानवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी रूट मार्चचेही आयोजन करण्यात आले आहे.

ये पब्लिक है...

$
0
0
सरकार, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडून 'गृहित' धरल्या जाणाऱ्या 'कॉमन मॅन'ची ताकद बुधवारी झालेल्या एका प्रसंगाद्वारे दिसून आली. शरणपूर रोडवर वाहतूक पोलिस विभागकडून गाडी उचलण्याच्या वादातून नागरिकांनी उठवलेल्या आवाजापुढे एरवी भल्याभल्यांना न जुमानणाऱ्या पोलिसांनी अक्षरशः नांगी टाकली.

कलेक्टर ऑफिसबाहेरील अतिक्रमण हटवा

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर होणारे पार्किंग आणि अतिक्रमण यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याने अतिक्रमण काढण्यात यावे, असे पत्र जिल्हा प्रशासनाने महापालिका आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची कोंडी दूर होण्याची शक्यता आहे.

शहरातही ब्रॉडबँड सेवा देण्यात हतबलता

$
0
0
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सध्याच्या युगात ब्राडबँडची मागणी वाढत असतानाही शहरातील १४ ठिकाणांना सेवा देवू शकत नसल्याची स्पष्टोक्ती बीएसएनएलने दिली आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेक ग्राहकांना बीएसएनएलचे ब्रॉडबँड मिळण्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे.

वायनरीला कनेक्शन नाहीच

$
0
0
विंचूर वाइन पार्क येथील वायनरीला ब्रॉडबँड कनेक्शन देणे अशक्य असल्याची माहिती बीएसएनएलचे जनरल मॅनेजर सुरेश बाबू प्रजापती यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. आमच्या डेप्युटी जनरल मॅनेजरने तेथे जाऊन पाहणी केली आहे. त्याठिकाणी सात किलोमीटर अंतराची केबल टाकावी लागणार आहे.

कांद्यासाठी आत्मदहनाची तयारी

$
0
0
दोन वर्षांनंतर कांद्याने पुन्हा बाजार भावात प्रतिक्विंटल २,५०० रुपयांचा टप्पा पार करून २,७००पर्यंत मजल मारली आहे. तर गेल्या मंगळवारपासून कांद्यांचे भाव सरासरीत २,२०० रुपयांपर्यंत स्थिर असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे विविध शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी दिल्लीत संसद भवनासमोर आत्मदहनाचा इशाराही स्वाभिमानी संघटनेने दिला आहे.

बाहेरच्या वाहनांना शहरात ‘नो एण्ट्री’!

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणी काळामध्ये बाहेरील वाहनांना शहरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिका हद्दीजवळच सात ठिकाणी पार्किंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आम्ही तर महापालिकेच्या उत्पन्नाचे सोर्स

$
0
0
नाशिक स्वच्छ, कचरामुक्त करणे हे आमचे ध्येय आहे, नाशिककरांना शिस्त लागावी हा आमचा प्रयत्न आहे. आमच्याकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाद्वारे महापालिकेला उत्पन्न मिळते. ही वाक्ये कुठल्या स्वयंसेवी संस्थेची किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची नाही तर दंडात्मक कारवाईवरून गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या अमुल्या क्लीनअपच्या संचालकांची आहे. आपल्या संस्थेबाबत होणाऱ्या चर्चांसंदर्भात बाजू मांडण्यासाठी अमुल्याचे संचालक राहुल गुजराथी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली.

शुल्क वसुली केल्यास कारवाई

$
0
0
मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे शिक्षण शुल्क वसूल करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पुणे विद्यापीठाने दिला आहे. सरकारने अशा विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचे आदेश देऊनही काही कॉलेजेस जबरदस्तीने ही फी वसूल करत असल्याने विद्यापीठाने हा पवित्रा घेतला आहे.

स्वतंत्र महिला हॉस्पिटल हवे

$
0
0
नाशिकमध्ये महिलांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्याची मागणी करूनही आरोग्य खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आमदार वसंत गिते यांनी १०० बेडचे हॉस्पिटल उभारण्याच्या मागणीवर जोर दिला. विधानसभा अधिवेशनात मंगळवारी कपात सूचनेंतर्गत गिते यांनी ही मागणी केली.

पावसाने दिलासा

$
0
0
बागलाण तालुक्यात मंगळवारी झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकरीवर्गाला या पावसाने दिलासा दिला असला तरी पाणीटंचाई दूर होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

$
0
0
बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील रत्ना ईश्वर शेवाळे (३२) या महिलेचा बुधवारी स्वाइन फ्लूमुळे नाशिक येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्या गेल्या सहा दिवसांपासून मणक्यांचा त्रास होऊ लागल्याने सटाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या.

घर कोसळून चिमुरडीचा मृत्यू

$
0
0
यंदाच्या पावसाळ्यात दीड महिना दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून मनमाड शहरात हजेरी लावली. या पावसामुळे एका दोन वर्षांच्या बालिकेला आपला प्राण गमवावा लागला.

कांदा पुन्हा कडाडला

$
0
0
दोन वर्षांनंतर कांद्याने पुन्हा बाजार भावात प्रतिक्विंटल २,५०० रुपयांचा टप्पा पार करून २,७००पर्यंत मजल मारली आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून कांद्याच्या आवकेत दररोज मोठ्या प्रमाणात घट होत गेल्यामुळे प्रतिक्विंटल सरासरी १,३०० ते १,४०० रुपये भावाने विकला जाणारा कांदा २,७०० रुपयांपर्यंत गेला.

ब्रॉडबँड केबलचा देशभरात तुटवडा

$
0
0
टेलिकॉम क्षेत्रात गतिमान स्पर्धा असतानाही भारत संचार निगम लिम‌िटेडकडे (बीएसएनएल) ब्रॉडबँडसाठी आवश्यक केबलचा देशभरात तुटवडा असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळेच तोट्याच्या गर्तेत असलेल्या बीएसएनएलकडे देशभरातील लाखो ब्रॉडबँडचे अर्ज पडून आहेत.

पवार खून खटल्यातील आरोपी निर्दोष

$
0
0
बागलाण तालुक्यातील दसवेल येथील प्रशांत पवार खून खटल्यात संशयित आरोपी नितीन भामरे यांच्यासह अन्य चार जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती के. जी. राठी यांनी हा निकाल दिला.

मनसेतर्फे बेरोजगारांना मदत

$
0
0
महाराष्ट्र व केंद्र शासनातर्फे अनेक जागांच्या नोकर भरतीसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सिन्नर तालुक्यातील बेरोजगारांना माहिती हवी असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालय राजगड, सिन्नर येथे संपर्क साधण्याचे मनसे तालुका प्रमुख जयंत आव्हाड यांनी कळवले आहे.

बलात्कार करणाऱ्यास अटक

$
0
0
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस सिन्नर पोलिसांनी सापूतारा येथून अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ४८ तासांत पोलिसांनी त्याचा शोध लावला.

अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

$
0
0
सिन्नर तालुक्यातील दोडी ग्रामीण हॉस्पिटलमध्ये एका सोळा वर्षीय मुलीने मुलाला जन्म दिल्याचे उघडकीस आले. मुलीच्या पोटात दुखत असल्याच्या कारणावरून पालकांनी तिला दोडी येथील ग्रामीण हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

प्रिमियम टूलमधील उत्पादन सुरु होणार

$
0
0
प्रिमियम टूल्स कंपनी व्यवस्थापनाने ऑर्डर्स संदर्भात केलेल्या प्रयत्नांना तत्त्वतः यश मिळाल्याने कंपनीतील उत्पादन प्रक्रिया सुरु होणार आहे. येत्या रविवारपासून दोन शिफ्टमध्ये उत्पादन घेण्यात येईल, असे कंपनीने जाहिर केले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images