Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पावणे दोन कोटींचा विकासबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेत अनेक दिवसांपासून नगरसेवकांची कामे होत नसल्याची तक्रार केली जात होती. त्या तक्रारींना पूर्ण विराम मिळाला असून रखडलेल्या कामांना चालना मिळाली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पदभार घेतल्यानंतर बांधकाम विभागाच्या पावणे दोन कोटीच्या कामांचा विकासबार उडवून दिला आहे.

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ कामे होत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून केल्या जात होत्या. समाज मंदीरांची दुरुस्ती, गटारीवरचे ढापे, तुटलेल्या भिती याची दुरुस्ती निधी अभावी होत नव्हती, आता या कामांना गती मिळाली आहे. बाधकाम विभागाची १ कोटी ७८ लाख रुपयाची ३१ कामांना मंजुरी मिळाली असून यातील १६ कामे ही २ लाखा पेक्षा जास्त आहेत. यामध्ये व्यायामशाळेच्या साहित्याची दुरुस्ती, पावसाळी गटारीची दुरुस्ती, कंपाऊंड करणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे. यातील बहुतांश कामांचे टेंडर निघाले असून या व्यतिरिक्त २५ प्रस्ताव मुंजुरीसाठी पेडिंग आहेत, त्यांना लवकरच मंजुरी मिळेल आणि नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लागतील, असे महापालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अ‍ॅटो डीसीआर यंत्रणा कुचकामी

$
0
0

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते घेणार आयुक्तांची भेट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने सुरू केलेली अ‍ॅटो डीसीआर यंत्रणा ही कुचकामी असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन ऑनलाइन प्रक्रियेबरोबरच हार्डकॉपी स्वीकारण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अॅटो डीसीआर यंत्रणेमुळे विकासक तसेच वास्तुविशारद वैतागले आहेत. नगररचनातील कामकाज पारदर्शी आणि सुलभ करण्याच्या नावाखाली अ‍ॅटो डीसीआरची यंत्रणा राबविण्यात येत आहे. सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेल्या प्रणालीच्या माध्यमातून बांधकाम आराखडे सादर करताना अनेक अडचणी येत असल्याने विकासकांना ऑनलाइन दाखले सादर करताना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे अ‍ॅटो डीसीआर निर्धोक करण्यासाठी पुणे आणि चिंचवड महापालिकेप्रमाणे ऑनलाइन आणि ऑफलाइन यंत्रणा राबवावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.

या संदर्भात क्रेडाई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनीअर्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअरने महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली होती; मात्र ती दूर झालेली नाही. औरंगाबाद महापालिकेत ही यंत्रणा बंद स्थितीत आहे.

वास्तुविशारदांना सॉफ्टवेअर द्या!

अॅटो डीसीआरच्या कार्यवाहीबाबत वास्तु विशारद वैतागले असून बिल्डिंगचा आराखडा नियमात बसवायचा असेल तर हे सॉफ्टवेअर वास्तुविशारदांना द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरवेळी आराखड्यात चुका काढल्या जातात. त्यामुळे पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी वास्तुविशारदांना अर्थिक भूर्दंड सासावा लागतो, असे होऊ नये यासाठी सॉफ्टवेअर द्यावे, असे बोरस्ते यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापाडळी गावामध्ये पाच जणांना विषबाधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औषध फवारणी झालेल्या काकड्या खाल्ल्याने उसतोड करणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली. ही घटना नाशिक तालुक्यातील गंगापाडळी येथे घडली. यात चार बालकांचा समावेश असून, सर्वांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली.

संजू नाना ठाकरे (३५), मनीषा संजू ठाकरे (७), दुर्गा संजू ठाकरे (४), शिवानी संजू ठाकरे (३) आणि दीपक संजू ठाकरे (२, रा. सर्व गंगापाडळी) अशी विषबाधा झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. गंगापाडळी येथील एका शेतावर ठाकरे कुटुंबीय गुरुवारी सकाळी ऊसतोडणीसाठी गेले होते. संजू ठाकरे यांनी नजिकच असलेल्या काकडीच्या शेतातून काही काकड्या तोडून आणून स्वत: खाल्ल्या आणि मुलांनाही दिल्या. पाण्याने न धुता संजू ठाकरे आणि बालकांनी काकड्यांचे सेवन केले. यानंतर थोड्याच वेळात ठाकरे यांच्यासह मुलांना मळमळ होऊ लागली. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृर्ती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

शिंगवे बहुल्यात

वृद्धाची आत्महत्या

शिंगवे बहुला येथील ६५ वर्षाच्या वृद्धाने आपल्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. वृद्धाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

भाऊसाहेब सुकदेव आहेर (६५, रा. अंबडवाडी, शिंगवे बहुला) असे या व्यक्तीचे नाव आहे. आहेर यांनी बुधवारी (दि. १२) सायंकाळी घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले. ही बाब लक्षात येताच मुलगा संदीप आहेर यांनी त्यांना तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे आणि नंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

पादचाऱ्याचा मृत्यू

रस्त्याने पायी जात असतांना चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना महात्मा गांधी रोडवर घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मंगेश मधुकर महाले (४९, रा. राधा सोसा. मखमलाबाद नाका) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. महाले हे गुरुवारी (दि.१३) दुपारी एम. जी. रोडने पायी जात असतांना सारडा संकुल परिसरातील साईछत्र पान स्टॉल समोर त्यांना अचानक चक्कर आली. यात त्यांच्या हनवटी आणि हातास गंभीर मार लागला. यानंतर महाले यांचा भाऊ शेखर महाले यांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याला हवी अनुदानाची मात्रा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभावासाठी सरकारने कांदा उत्पादकांना हजार रुपये प्रती क्विंटल अनुदान द्यावे अथवा बाजार हस्तक्षेप योजना राबवावी या मागणीसह नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याशी निफाडचे आमदार अनिल कदम व देवळा-चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव व चांदवड बाजार समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या रब्बी (उन्हाळ) कांद्याबरोबर खरीप (लाल) कांद्याची विक्री होत असून उन्हाळी कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. जुलै, २०१८ मध्ये येथील बाजार समितीत उन्हाळ कांदा किमान ४०० रुपये कमाल १,५५२ रुपये तर सर्वसाधारण १,१५१ रुपये प्रति क्विंटलने विकला गेला. सध्या सदरचा उन्हाळी कांदा किमान २०१ रुपये, कमाल ६९० रुपये तर सर्वसाधारण ३७० रुपये प्रति क्विंटलने विकला जात आहे. कांद्यास मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केंद्र सरकारने यावर त्वरित उपाययोजना, असे साकडे यावेळी घालण्यात आले.

शिष्टमंडळात आमदार कदम व डॉ. आहेर यांच्यासह दिंडोरीचे खासदार हरीश्चंद्र चव्हाण, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती ललित दरेकर, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, चांदवड पंचायत समितीचे सभापती नितीन गांगुर्डे, चांदवड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदी सहभागी झाले.

उत्पादन खर्चाचा व्हावा विचार

मागील व यावर्षी झालेले कांदा उत्पादन, शेतकऱ्यांकडील शिल्लक कांदा, राज्यात कांदा दर घसरणीमुळे उद्भवलेली परिस्थिती याबाबत कृषिमंत्र्यांना माहिती देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून येथील शेतकऱ्यांना मातिमोल भावात कांदाविक्री करावी लागत असल्याने नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळणे आवश्यक आहे, असे मत शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांपुढे मांडले.

या पर्यायांवर चर्चा

सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करावे, बाजार हस्तक्षेप योजना राबवावी अथवा मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर भावांतर योजना राबवावी, कांदा भावात सुधारणा होण्यासाठी कांदा निर्यातदारांच्या प्रोत्साहन रकमेत वाढ करावी, कांदा वाहतुकीवर अनुदान द्यावे आदी पर्यायांवर शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्हाडा’ची घरे स्वस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या (म्हाडा) घरांसाठी इच्छुक असलेल्यांसाठी मोठी खूशखबर आहे. गेल्या चार वर्षांपासून ग्राहकांचा प्रतिसाद नसल्याने 'म्हाडा'ने घरांच्या किमती तब्बल २० ते ४७ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. तशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ११९३ घरांची विक्री महिनाभरात सोडत पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांचे गृहस्वप्न पूर्ण होणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून विक्री अभावी रिक्त असलेल्या 'म्हाडा'च्या नाशिक विभागात असलेल्या ११९३ सदनिकांची विक्री आता सोडत काढून महिनाभरात केली जाणार आहे. त्यासाठी या सदनिकांची किंमत २० ते ४७ टक्के कमी करण्यात आल्याची माहिती 'म्हाडा'चे अध्यक्ष उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे 'म्हाडा'ला ६० कोटी रुपये कमी मिळणार असल्याचेही ते म्हणाले. या घरांची वेगवेगळ्या कारणाने विक्री झाली नाही. या घरांचे दर जास्त असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

म्हाडाच्या नाशिक विभागाअंतर्गत नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागात नाशिक येथे आडगाव, मखमलाबाद, म्हसरुळ, पाथर्डी, पंचक, हिरावाडी त्याचप्रमाणे श्रीरामपूर व धुळे येथे १३२२ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी १२९ सदनिका पोलिस विभागास व ४३ रिक्त सदनिकांची वारंवार जाहिरात देऊनही विक्री झाली नाही. यामागे तीन ते चार वर्षांपासून राष्ट्रीय हरित लवादाने बांधकाम पूर्णत्वास दिलेली स्थगिती, बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी अशी प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता ही विक्री मुंबईसारखी सोडत पद्धतीने केली जाणार आहे. त्याला नाशिक विभागात चांगला प्रतिसाद मिळेल, असेही ते म्हणाले.पंधरा दिवसांत याबाबत प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतर महिनाभरात सोडत पद्धतीने त्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नाशिकला सर्वाधिक घरे

नाशिक विभागात म्हाडाने ११९३ सदनिकांच्या किंमती कमी केल्या असल्या तरी नाशिक शहरात यापैकी ९८६ सदनिका आहेत. धुळे येथे ३५ व श्रीरामपूर येथे १७२ सदनिका आहेत. या सर्व सदनिकांची किंमत २० ते ४७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

आडगाव

गट- घरे- आधीची किंमत- सुधारित किंमत- घट

अत्यल्प-१९२- १०,२४,३८८-८,१९,५१०- २,०४,८७८

अल्प- ११२-१७,३३,३२९-१३,८६,६६३-३,४६,६५९

मध्यम- ११२-२४,५२,०७४ -१९,६१,६५९-४,९०,४१५

मखमलाबाद

गट- घरे- आधीची किंमत- सुधारित किंमत- घट

मध्यम- ११२-२६,२७,५०० -२१,०२,०००-५,२५,५००

पंचक

गट- घरे- आधीची किंमत- सुधारित किंमत- घट

अल्प- १४०-२४,९८,०००-१३,००,०००-११,९८,०००

म्हसरुळ

गट- घरे- आधीची किंमत- सुधारित किंमत- घट

अल्प- ४२-२६,९५,०००-२१,५६,०००-५,३९,०००

अल्प(छोटी घरे)- १४- १९,६०,०००-१३,८६,५२७- ५,७३,४१३

पाथर्डी

गट- घरे- आधीची किंमत- सुधारित किंमत- घट

अत्यल्प- २०६-२८,८३,०००-२३,०६,४००-५,७६,६००

अत्यल्प- १७-१९,९५,००० -१५,९६,०००-३,९९,०००

अत्यल्प- ३९-२९,०८,०००-२३,२६,४००-५,८१,६००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खचून न जाता जोमाने कामाला लागा’

$
0
0

आमदार गोटे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

निवडणुका येतात आणि जातात. विजय आणि पराभव होतच राहतो यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता यापुढेही जोमाने कामाला लागावे. गोरगरीबांच्या सेवेचे व्रत सोडू नये, असे आवाहन भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी केले.

निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्रावर जनतेचा विश्वास राहिलेला नसून, याबाबत सर्व स्तरातून तक्रारी होत आहेत. मी सातत्याने याविरोधात आवाज उठवित आहेत. भविष्यातही ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे, असेही आमदार गोटे यांनी सांगितले. येथील कल्याण भवनात लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांची तसेच पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी आमदार गोटे बोलत होते.

महापालिका निवडणूक नुकतीच झाली. यासंदर्भात लोकसंग्राम पक्षाच्या व पुरस्कृत उमेदवारांच्या पराभूत उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार गोटे यांनी उमेदवारांचे निवडणुकीतील अनुभव जाणून घेतले. कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारी, निवडणुक अधिकारी आणि पोलिस, प्रशासनाकडून आलेले अनूभव, पथकाकडून मिळालेली वागणूक आदी मुद्दयांवर चर्चा झाली. या वेळी नगरसेविका हेमा गोटे, तेजस गोटे, निंबा मराठे, छोटू गवळी, संजय बगदे, योगेश मुकूंदे, प्रशांत भदाणे, अमोल सूर्यवंशी, राजन वाघ, वंदना सूर्यवंशी, उषा पाटील, नीलम व्होरा, तनेजा, सचिन कोतेकर, दीपक जाधव, मेघना वाल्हे, संतोष शेंडगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्ता गोळीच्या मालेगावच्या तस्करास सुरतमधून अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

झोपेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा कुत्ता गोळी या नावाने नशेसाठी वापर झाल्याच्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने सूरत येथून एका तस्कारास अटक केली. हा तस्कर मूळचा मालेगावचा असून, सुरत येथून आणलेल्या औषधांची चढ्या भावाने तो मालेगावमध्ये विक्री करीत असल्याचा दावा या पथकाने केला आहे.

इब्राहीम अहमद अब्दुलल गणी उर्फ धुरी असे या संशयित आरोपीचे नाव आहे. सध्या एफडीए संशयित गणीकडे चौकशी करीत आहे. संशयित गणी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात मालेगावसह मनमाड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडी आणि इतर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. ६ नोव्हेंबर रोजी एफडीए आणि पोलिसांच्या पथकाने मालेगावमध्ये एका ठिकणी छापा मारून एका संशयिताकडून तब्बल १८०० झोपेच्या गोळ्या जप्त केल्या होत्या. पुढे चौकशी करता संशयित आरोपीने या टॅब्लेट्स संशयित गणीकडून घेतल्याचे समोर आले होते. मात्र, या घटनेनंतर गणी फरार झाला होता. अनेक दिवस माग काढूनही त्याचा थांगपत्ता पोलिसांना मिळाला नाही.

बायकोमुळेच गणी पोलिसांच्या हाती

संशयित गणी याचे दोन विवाह झाले असून, त्याची एक पत्नी मालेगावमध्ये तर एक पत्नी सूरतमध्ये राहते. गणी फरार झाला त्यापूर्वी त्याचे मालेगाव येथे त्याच्या पत्नीशी भांडण झाले. यावेळी त्याने पत्नीला मारहाण करून तिच्याकडील मोबाइल घेऊन धूम ठोकली. यानंतर पत्नीने पोलिसांशी संपर्क साधला. दुसरी पत्नी सूरत येथे असून, तो तिच्याकडे गेल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली. पोलिसांनी लागलीच सूरत गाठून गणीला अटक केली. सध्या तो एफडीएच्या ताब्यात असून, तस्करीची एक लिंक यामुळे समोर येऊ शकते, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कफ सिरीपही जप्त

मागील काही दिवसात एफडीएने दोन ठिकाणी छापे मारून खोकल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा साठा जप्त केला. ५० ते ७५ रुपयांना मिळणाऱ्या या औषधांची १०० ते १५० रुपयांना ब्लॅक मार्केटमध्ये विक्री केली जात असल्याची बाब यानिमित्ताने स्पष्ट झाली. या औषधात मॉर्फिन हा घटक असल्याने त्याचा वापर नशेसाठी होत असावा, अशी शक्यता एफडीए सूत्रांनी व्यक्त केली. सध्या हे प्रमाण फारच कमी असून, कुत्ता गोळीप्रमाणे ते वाढणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेंटकॉन परिषद आजपासून

$
0
0

कान, नाक, घसा तज्ज्ञांची उपस्थिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कान, नाक आणि घसा तज्ज्ञांच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पन्नासाव्या वार्षिक राज्यस्तरीय परिषदेचे यजमानपद नाशिक शाखेला मिळाले असून, ही सुवर्ण महोत्सवी परिषद शुक्रवारपासून (दि. १४) हॉटेल ताज गेटवे येथे होणार आहे. परिषदेचे उद्घाटन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते होईल.

परिषदेत मुख्यत: संशोधन आणि कान नाक व घसा विकारांतील नवीन आव्हाने याबाबत चर्चा होणार आहे. श्रृती, गंध आणि चव या तीन महत्त्वाच्या संवेदनांबाबत जाणून घेण्याची संधी यामुळे तरुण डॉक्टरांना उपलब्ध होणार आहे. याचमुळे शोधू जाता संवेदनाची पाळंमुळं हे या ज्ञानकुंभाचे घोषवाक्य असल्याचे परिषदेचे सचिव डॉ. पुष्कर लेले यांनी सांगितले. शासकीय तसेच खासगी सेवेतील तब्बल आठशे तज्ज्ञ या परिषदेसाठी हजर राहणार आहे. बार्सिलोना येथील डॉ. प्रा. मॅन्युअल स्पेर्केलसन, इंग्लड येथील डॉ. ख्रिस्तोफर अल्ड्रेन आणि डॉ. विनिध पालेरी यांच्या व्याख्यानांची सर्वांना उत्सुकता असणार आहे. जयपूरचे डॉ. सतीश जैन व त्रिची येथील डॉ. जानकीराम यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. 'जस्ट अ मिनिट' (जाम) हे नाविन्यपूर्ण सादरीकरण या परिषदेचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे अभ्यास समितीचे प्रमुख डॉ. उमेश तोरणे यांनी सांगितले.

यांचा होणार सन्मान

परिषदेच्या निमित्ताने नाशिक शाखेच्या वतीने डॉ. प्रदीप गोंधळे आणि डॉ. एस. बी. ओगले यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. परिषद यशस्वीतेसाठी डॉ. शब्बीर इंदौरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शाखेचे यावर्षीचे अध्यक्ष डॉ. शिरीष घन, नाशिक शाखेचे खजिनदार डॉ. राजेंद्र पगारे, अभ्यास समिती प्रमुख डॉ. उमेश तोरणे व सहसचिव श्रीया कुलकर्णी, डॉ. मुकेश मोरे, डॉ. सुदर्शन अहिरे, डॉ. राजेंद्र अकुल, डॉ. हिमांशू आदी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघात रोखण्यासाठी साडेसहा कोटी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात विविध मार्गांवर सातत्याने होणाऱ्या रस्ते अपघातांना रोखण्यासाठी राज्य सरकारने साडेसहा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या पैशांच्या माध्यमातून रस्त्यांवर साइन बोर्ड लावणे, रस्त्याचे तीव्र वळण कमी करणे, स्पीड ब्रेकर्स, रिफ्लेक्टर बसविणे, रोड फर्निचर करणे अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील.

जिल्ह्याचे भौगौलिक क्षेत्र मोठे असून, दळणवळणाची क्षमता मोठी आहे. वाहनांची संख्याही लाखांच्या घरात असून, रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी किमान ७०० नागरिक जिल्हाभरात मृत्यूमुखी पडतात. पोलिसांच्या नोंदीनुसार वाहनांचा वेग या अपघातांसाठी कारणीभूत ठरतो. जिल्ह्यात राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्गांचे विस्तृत जाळे पसरले आहे. रस्ते अपघातांचे आणि बळी जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी एक सर्व्हे हाती घेतला होता. एकाच ठिकाणी सातत्याने होणाऱ्या अपघातांची नोंद वेगळी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात तब्बल ६१ ठिकाणे सापडली. या ठिकाणी ठराविक दिवसांच्या अंतराने सातत्याने जीवघेणे अपघातात होतात. तीव्र उतार, चौफुली, तीव्र वळण अशा अनेक कारणांमुळे ही ठिकाणे धोकादायक वर्गात मोडली जातात. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. सरकारने या प्रस्तावास हिरवा कंदील दर्शविला असून, तातडीने हे काम करण्यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरूवात होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत ही कामे पूर्णत्वास पोहचतील, अशी अपेक्षा संबंधितांनी व्यक्त केली. ६१ पैकी सहा ठिकाणे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तर सात ठिकाणे हायब्रीड अॅन्युइटी कार्यक्रमांतंर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात. आलेला हा निधी ही १३ ठिकाणे वगळून ४८ ठिकाणांसाठी वापरण्यात येणार आहे.

राज्य सरकारने या कामांसाठी साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, निधी आमच्या विभागाला प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत सर्व्हे करून प्रस्ताव सरकारला सादर केला होता. नवीन उपाययोजनांमुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

- रणजीत हांडे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांची नव्याने प्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेला फटकारल्यानंतर धार्मिक स्थळांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची प्रक्रिया पुन्हा राबविण्यासाठी गुरुवारी नाशिक महापालिकेत खातेप्रमुख विभागीय अधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी यांची बैठक झाली. यात धार्मिक स्थळांची प्रक्रिया नव्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हायकोर्टाच्या निर्णयानुसार शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा कार्यवाही सुरू केल्यानंतर मात्र काही तक्रारदारांनी नाशिक महापालिकेच्या या कारवाईबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होऊन कोर्टाने तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेत, ही प्रक्रिया पुन्हा राबवावी, असे आदेश महापालिकेला दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात राज्य सरकारने दिलेल्या ५ मे २०११ च्या निर्णयानुसार २००९ अगोदरच्या धार्मिक स्थळांची यादी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी, त्या स्थळांचा संपूर्ण तपशील यादीत समाविष्ट करण्यात यावा. ज्या धार्मिक स्थळांची नावे यात समाविष्ट होतील, त्यांनी संबंधित धार्मिक स्थळ १९६० च्या आधीचे असल्याचे पुरावे सादर करणे गरजेचे आहे. त्यात धर्मादाय आयुक्तांचे प्रमाणपत्र, वीज बिल, सात-बाराचा उतारा असे सरकारी पुरावे असणे गरजेचे आहे. हे पुरावे दाखल झाल्यानंतर नागरिकांच्या हरकती मागविण्यात येणार आहेत. याबाबतची सुनावणी झाल्यानंतर जे धार्मिक स्थळांचे पदाधिकारी पुरावे दाखल करतील अशा स्थळांची यादी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. त्यावर राज्य सरकार निर्णय घेणार आहे. यामुळे तूर्तास तरी शहरातील ५०३ अनधिकृत धार्मिक स्थळांना दिलासा मिळाला आहे. या बैठकीला आयुक्त राधाकृष्ण गमे, सर्व खातेप्रमुख, तहसीलदार शरद घोरपडे, पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे, म्हाडा, सिडको आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.

चार भाषेत जाहिरात

महापालिकेने शहरातील ५०३ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार करून त्यांना हटविण्याची मोहीम सुरू केली होती. यासंदर्भात प्रवीण जाधव, कैलास देशमुख, विनोद थोरात आणि नंदकुमार कहार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी झाली. महापालिकेने या स्थळांची यादी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली नाही, तसेच हरकती मागवून सुनावणीही घेतली नाही, अशी बाजू याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मांडली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एक आदेश दिला असून त्याद्वारे या स्थळांसाठी एक समिती स्थापन करावी, त्यांनी यादी तयार करावी, त्या यादीला इंग्रजी व मराठी, हिंदी व उर्दू वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही यादी येत्या काही दिवसांत चारही भाषेत नागरिकांना पहायला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सोशल वॉर’चे नाट्य!

$
0
0

'राज्य नाट्य'वरून परस्परविरोधी पोस्ट व्हायरल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य नाट्य स्पर्धेच्या सोमवारी लागलेल्या निकालाने हौशी रंगकर्मींमध्ये उठलेला धुराळा अद्यापही खाली बसण्याचे नाव घेत नसून त्यावरून घमासान सोशल वॉर पेटले आहे. राज्य नाट्यच्या परीक्षक मानसी राणे यांनी एक पोस्ट व्हायरल करून आपले म्हणणे मांडले असून हौशी रंगकर्मींपेकी अनेकांनी वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करीत सोशल वॉरला खतपाणी घातले आहे.

नाशिकला प. सा. नाट्यगृहात झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सरस नाटके सादर झाली. यापैकी अनेकांना आपलेच नाटक नंबरातले अशी अपेक्षा असताना परिक्षकांनी झटका देऊन निकाल दिला. संचलनालयाने तो जाहीर केल्यानंतर नंबर एक आलेल्या 'विसर्जन' नाटकाला फारसा विरोध झाला नाही; परंतु नंबर दोन आलेल्या 'तीरथ में सब पानी है' नाटकावर कडाडून टीका झाली. हे नाटक नंबरात आलेच कसे याविरोधात हौशी रंगकर्मींनी एकत्र मोट बांधली. नंबर तीनचे नाटक 'नागमंडल' अंतिमला पाठवावे अथवा कोणतेच नाटक अंतिमला जाऊ देणार नाही, नाट्य परिषदेची निकालामधील लुडबूड थांबवावी, अशा मागण्या काही रंगकर्मींनी केल्या. मात्र, यावर नाट्य परिषदेने लगेचच पत्रकार परिषद घेत नाट्यपरिषदेवर आरोप केले त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वसाधारण सभेत तशी कारवाई करणार असल्याचेही जाहीर करून टाकले.

परिक्षकांचा समाचार

काही हौशी रंगकर्मींनी वेगळ्याच नावाने परीक्षक असलेल्या मानसी राणे यांना फोन केल्याने त्या कमालीच्या संतापल्या. त्यांनी आपल्याला फोन आल्याच्या शब्दानशब्दाची पोस्ट व्हायरल केली. त्यातून अनेक गोष्टी उघडकीस आल्या. ते होते न होत तोच नाट्यमंडळींच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हौशी रंगकर्मींच्या वतीने एक पोस्ट व्हायरल करण्यात आली. यात परिक्षकांचा यथेच्छ समाचार घेण्यात आला असून त्यामुळे एक सोशल वॉर सध्या सांस्कृतिक क्षेत्रात पेटलेले आहे.

जनहित याचिकेपर्यंत चर्चा

'डोंगरार्त' नाटक कसे डाउन होते, हे परीक्षकांच्या पोस्टमधून स्पष्ट होते; तर आमच्यावर कसा अन्याय झाला आहे, हे हौशी रंगकर्मींच्या पोस्टवरून कळते. सध्या या पोस्टसह फेसबुकवर फिरणाऱ्या राज्य नाट्यविषयीच्या अनेक पोस्ट हा चर्चेचा विषय बनला असून नाशिक केंद्र सरळ बंद करावे, येथपर्यंतच चर्चा झडत आहेत. तर काहींनी याविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचीही पिंक टाकलेली आहे.

हौशींचा संताप

आम्हाला ट्रॅप करायची गरजच नाही. आम्हाला फक्त नाटक करायचंय इतकंच.... आम्हाला परिक्षकांशी बोलायचंच नव्हतं. जे काही घडलयं. त्याचं वेगळं वळण देऊन चर्चा होतीये. आम्ही न विचारताच आमच्या नाटकाबद्दल त्या बोलल्या. पण त्या प्रत्येकांबद्दल बोलल्या आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया हौशी रंगकर्मींनी व्यक्त केली आहे.

बाकी दोन्ही परिक्षकांऐवजी मला नाहक त्रास देण्याचे कारस्थान कोणाचे आहे, हे ही मी समजून आहे. पण मी प्रामाणिक नि:पक्षपातीपणे निकाल दिलाय हे नटेश्वर जाणतो. माझं नाशिक केंद्र, समन्वयक आणि संचनालयाला विनंती आहे, की नाट्यपरिषदेच्या संस्थेला नाटक करायला परवानगी देऊच नये ना कारण तुमच्या आपसातल्या आकसापोटी आम्हा परिक्षकांची नाहक बदनामी होतेय.

- मानसी राणे, परीक्षक, राज्य नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांमुळे नागरिक हैराण

$
0
0

नाशिक : कृषी नगर येथील दत्त मंदिरातील उद्यान हे टवाळखोरांचा, प्रेमी युगुलांचा अड्डा बनले आहे. उद्यानाजवळच कॉलेज असल्याने दुपारी कॉलेज सुटल्यावर आणि संध्याकाळच्या वेळी तरुण मुले, प्रेमी युगुल उद्यानात येऊन बसतात. कृषी नगर परिसरात ठिकठिकाणी तरुणांचे घोळक्याने उभे राहत असल्याने गोंगाट, भरधाव वेगाने वाहने चालवणे, स्टंटबाजी करणे यामुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. त्यांच्या अशा स्टंटबाजीमुळे संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना रस्तावरून चालणेही अवघड होते. उद्यानातील आवारात दत्त मंदिर आणि श्री संत ज्ञानेश्वर वाचनालय आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची सतत ये-जा चालू असते. परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा या मुलांना समजविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ते ऐकत नसून, यातून गैरकृत्य होण्याचा धोका निर्माण झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीजींच्या मदतीने क्रांतिवीर नाईक ठरले निर्दोष

$
0
0

साडेपाच लाखांचा सरकारी खजिना लुटल्याच्या आरोपातून मुक्ती

\B

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

नाशिक : 'स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाच्या कारणाने तुरुंगवास भोगलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांना पुन्हा १९४२ च्या सुमाराला साडेपाच लाखांचा सरकारी खजिना लुटल्याच्या आरोपात ब्रिटीश सरकारने गोवण्याचा कट केला होता. ब्रिटीशांनी ताब्यात घेतल्यानंतर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याने याप्रश्नी आता आपणच लक्ष घालावे, अशी विनंती क्रांतिवीरांनी थेट महात्मा गांधी यांना पत्राव्दारे केली. यावर गांधींनी क्रांतिवीरांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देत खटल्यातून निर्दोष सोडविले होते', असे मोलाचे ऐतिहासिक संदर्भ ज्येष्ठ कामगार नेते बळवंत आव्हाड यांनी क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या ५० व्या पुण्यस्मरणानिमित्त 'मटा' सोबत बोलताना मांडले.

\B

जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील मनमाड येथे जन्मलेल्या आणि स्वातंत्र्यचळवळीत विशेष योगदान देणाऱ्या क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या नावे सामाजिक सहभागाच्या जोरावर शिक्षणसंस्था चालविली गेली किंवा मनमाडमध्ये पुतळाही उभारला गेला; तरीही त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची सरकारने अधिकृत नोंद त्यांच्या पश्चातच्या ५० वर्षांनंतरही अद्याप घेतलेली नाही, अशी खंतही मनमाड येथील ज्येष्ठ कामगार नेते आव्हाड यांनी व्यक्त केली. इतक्या वर्षांमध्ये सरकारे आली अन् गेली. पण स्वातंत्र्यलढ्यात जीवनभर स्वत:ला झोकून देणाऱ्या या क्रांतीकारकाचे कार्य शासनाच्या नोंदींच्या यादीत दुर्लक्षितच राहीले आहे. आगामी काळात तरी ही चूक शासनाने दुरुस्त करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शैक्षणिक जीवनातच स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणाऱ्या क्रांतिवीर वसंतराव नाईक यांचा जन्म १३ डिसेंबर १९१२ रोजी झाला होता. त्यांची १०६ वी जयंतीही गुरुवारी साजरी झाली. तर त्यांची ५० वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने कामगार नेते आव्हाड यांच्याकडील दस्ताऐवजांच्या संदर्भांनुसार सधन घरात जन्मल्यानंतर क्रांतिवीर नाईक यांनी शिक्षण सुरू असताना ब्रिटीशकालीन राजवटीतील सायमन कमिशनला त्यांनी विरोध दर्शविला. मीठाच्या सत्याग्रहातील सहभाग, ब्रिटीशांविरोधात तरुणांचे संघटीकरण, चलेजाव घोषणांमधील सहभाग अशा देशकार्यातील सहभागांमुळे ब्रिटिशांनी त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतरही ब्रिटीशांनी त्यांना सरकारी खजिना लुटल्याच्या आरोपावरून शोध सुरू केला होता. त्यावेळी क्रांतिवीरांनी महात्मा गांधींना पत्र लिहून या खटल्यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावर महात्मा गांधी यांनी बॅ. मुन्शी, बॅ. धीरूभाई देसाई यांच्यावर खटल्याची जबाबदारी सोपविली. नाशिकमध्येच चालविण्यात आलेल्या या खटल्यातून पुढे क्रांतिवीर नाईक निर्दोष सुटले. स्वातंत्र्योत्तर कालखंडात मनमाडच्या नगराध्यक्ष पदापासून तर कायदेमंडळावर आमदार पदापर्यंत जाऊनही राजकीय चढाओढीत त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली होती, असेही आव्हाड यांनी सांगितले.

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचे देशकार्यातील योगदान अतिशय मोठे आहे. सरकारने आजवर त्यांच्या कार्याची नोंद शासकीय दप्तरात करणे आवश्यक होते. आज त्यांचे ५० वे पुण्यस्मरण आहे. नागरीकांनी जशी त्यांची स्मृती जपली आहे तशीच शासनानेही त्यांच्या कार्याची नोंद करून स्मृती जपावी, अशी कळकळीची अपेक्षा आहे.

- \Bबळवंत आव्हाड, ज्येष्ठ कामगार नेते, मनमाड \B

..

लोगो : वसंतराव नाईक पुण्यतिथी विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिमा वादाने अधिकारी पेचात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'नामको'चे माजी चेअरमन कै. हुकूमचंद बागमार यांच्या प्रतिमेवरून राजकारण तापले असतांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणात हात झटकले आहे. प्रगती पॅनलने बागमार यांच्या प्रतिमेचा वापर प्रचारात केल्याने त्याबाबत त्यांचे पुत्र अजित बागमार यांनी आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. पण, या तक्रारीवरून काय कारवाई करावी, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

यापूर्वी अजित बागमार यांनी फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही. तर हे प्रकरण पोलिस स्थानकात जाणार असल्याचे बोलले जात आहे. प्रगती पॅनलचे सर्व माजी संचालकांनी यापूर्वी हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या असल्याने त्यांनी प्रचाराच्या पत्रक व पोस्टरवर प्रतिमेचा वापर केला आहे. तर दुसरीकडे नम्रता पॅनलनेही बागमार यांचीच प्रतिमा वापरली आहे. त्यामुळे हा वाद निवडणुकीत पेटण्याची शक्यता आहे.

'नामको'च्या निवडणुकीत प्रचाराने रंगत आलेली असतांना प्रतिमेचा वाद सुरू झाला आहे. याअगोदर अजित बागमार यांनी नम्रता पॅनलची निर्मिती करून माजी संचालकांची कोंडी केली. त्यानंतर या माजी संचालकांनी प्रगती पॅनल नाव पॅनलला दिले. आता प्रतिमेचा वादानेही त्यांच्या अडचणी वाढल्या आहे.

..

लोगो : नामको निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परगावची वाहने ‘टार्गेट’

$
0
0

परगावची वाहने 'टार्गेट' (फोटो)

-------

त्रस्त वाहनचालकांकडून नाराजी

---------

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

सातपूर परिसरातील पपया नर्सरी येथे इतर जिल्ह्यांतील तथा राज्यांतील वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून 'टार्गेट' केले जात आहे. त्यामुळे अशा त्रस्त वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे रविवारी सुटीच्या दिवशी पपया नर्सरी भागातील जाधव संकुल पोलिस चौकी अर्थात, अंबड टी पॉइंट येथे तब्बल एकाच वेळी सहा वाहतूक पोलिस कसे, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. खरोखरच अशा प्रकारे एकाच ठिकाणी सहा वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली असावी का, असा सवालही उपस्थित होत आहे.

पपया नर्सरी भागात वाहतूक पोलिसांबाबत अनेकांनी याआधी तक्रारी मांडल्या आहेत. मात्र, तरीही येथील समस्या सुटताना दिसत नाही. आता पुन्हा तेथेच वाहतूक पोलिसांचा जाच इतर जिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्या वाहनचालकांना सहन कराव लागत आहे. कारवाईवेळी दोन वाहतूक पोलिस अशी वाहने बाजूला घेण्यास सांगतात. त्यानंतर 'भीक नको, पण कुत्रे आवर' असे म्हणत वाहनचालक काही पैसे देत निघण्यास पसंती देतात. परंतु, अशा प्रकारामुळे नाशिकचेच नाव बदनाम होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. याप्रश्नी पोलिस आयुक्तांनी लक्ष घालत कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

---

नाशिकचे नाव धार्मिक स्थळांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु, त्याच नाशिक शहरात इतर जिल्ह्यांतून, राज्यांतून येणाऱ्या वाहनचालकांना पपया नर्सरी भागात टार्गेट केले जाते. येथे एकाच वेळी सहा वाहतूक पोलिस कसे, असाही प्रश्न पडतो.

-बंडू आहेर, वाहनचालक

००००००००००००००००००००थोडक्यात००००००००००००००००००००

'एचएएल'तर्फे स्वच्छतेबाबत रामकुंड भागात प्रबोधन (फोटो)

पंचवटी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत एचएएल, ओझर आणि घनकचरा विभाग पंचवटीतर्फे रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण परिसरात स्वच्छतेबाबत रॅली काढून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. या परिसरात स्वच्छताही करण्यात आली. या मोहिमेत 'एचएएल'चे अपर महाप्रबंधक एच. एल. सूर्यप्रकाश, उपमहाप्रबंधक एस चंदेल, जितेंद्र मोरे, प्रबंधक, विठ्ठल बनसोड, युनियन पदाधिकारी अशोक गावंडे, एस. पी. आहेर, नितीन पाटील, मन्सूर शेख, दीपक तावरे आदी सहभागी झाले होते. महापालिकेचे संजय दराडे, किरण मारू आदींसह कर्मचाऱ्यांनी मोहिमोप्रसंगी सहकार्य केले.

---

छायाचित्र प्रदर्शन

गंगापूररोड : ज्येष्ठ तत्त्वज्ञ, विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांचे निवडक साहित्य आणि छायाचित्रांचे प्रदर्शन आज, शुक्रवार (दि. १४)पासून १६ डिसेंबरपर्यंत कुसुमाग्रज स्मारकात आयोजित करण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत खुल्या राहणाऱ्या या प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णमूर्ती अभ्यास मंडळाने केले आहे.

--

बॅरिकेडिंग निरुपयोगी

नाशिक : शहरातील अत्यंत वर्दळीच्या कॉलेजरोडवरील बीवायके कॉलेजसमोर लावलेले बॅरिकेडिंग काही तरुण हाताने बाजूला सारून त्यातून दुचाकी नेत असल्याने निरुपयोगी ठरत आहेत. परिणामी वाहतूकही विस्कळीत होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याप्रश्नी त्वरित लक्ष घालून योग्य कार्यवाही करण्याची अपेक्षा त्रस्त वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

--

बोगद्याजवळ कोंडी

इंदिरानगर : गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाणारा बोगदा 'वन वे' आहे. पण, ज्यावेळी येथे वाहतूक पोलिस नसतात त्यावेळी असंख्य नागरिक नियम पाळत नाहीत. त्यामुळे या बोगद्याजवळ अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात दोन दरोडे; लाखोंची रोकड लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील देवपूरमधील आनंद नगर भागात बोरसे ब्रदर्स यांच्या कार्यालयात चोरट्यांनी धाडसी चोरी करून दहा लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिस त्याआधारे तपास करीत आहेत. या घटनेत चावीने कार्यालयातील तिजोरी उघडण्यात आल्याने ओळखीच्याच व्यक्तीने ही चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. सुमीत सुधाकर बोरसे यांचे देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरात आनंद नगर प्लॉट क्र. २३ ‘ब’ येथे बोरसे ब्रदर्स नावाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून सॉफ्टवेअर, कन्स्ट्रक्शनची कामे होतात. नेहमी प्रमाणे बुधवारी नेहमीप्रमाणे रात्री कर्मचाऱ्यांनी कार्यालय बंद केले. यानंतर मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास तीन चोरटे मोटरसायकलने तेथे आले. त्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कार्यालयातील तिजोरी चावीने उघडून त्यातील अंदाजे दहा लाख रुपयांची रोकड चोरली, अशी माहिती बोरसे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तसेच श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दुकानाजवळील व आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे आल्याचे आणि त्यांनी तिजोरी उघडल्याचे चित्रीकरण झाले आहे.

दुसऱ्या घटनेत शहरातील साक्रीरोडवरील जयभवानी ट्रेडर्स दुकान मालकाच्या घरी गुरुवारी पहाटे दरोडा पडला. चार दरोडेखोरांनी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवत घरातून लाखोंचा ऐवज लंपास केला असून पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी करीत वॉचमनकडून माहिती जाणून घेतली. मात्र घरमालक बाहेर गावाला गेले असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही. ओम अग्रवाल यांचे साक्रीरोडवरील सुरेंद्र दुध डेअरीजवळ जयभवानी ट्रेडर्स नावाने दुकान आहे. दुकानाला लागूनच अग्रवाल यांचे घरही आहे. अग्रवाल हे कुटुंबीयांसोबत जालना येथे गेलेले होते. यामुळे अग्रवाल यांनी वॉचमन हिंमतसिंग पावरा याला घरासह दुकानावर पहारा देण्यासाठी ठेवले होते. त्यात गुरुवारी पहाटे पावरा हा अग्रवाल यांच्या घराच्या आवारात झोपलेला असताना अचानक चार दरोडेखोरांनी येवून पावराला मारहाण केली. शिवाय, त्याला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. यानंतर दरोडेखोरांनी अग्रवाल यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत घरातील कपाट फोडून लाखोंचा ऐवज लुटून नेला. अग्रवाल हे बाहेरगावाला गेलेले असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला हे समजू शकलेले नाही. वॉचमन पावरा हा कमालीचा भेदरलेला होता. त्याने दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु, दरोडेखोरांनी त्यांच्यावरच हल्ला चढविल्याने तो हतबल झाला. या वेळी वॉचमनने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली असून, या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन निरीक्षकांसह एकाच
लाच स्वीकारताना अटक
धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथे प्रादेशिक परिवहन विभागाचा तपासणी नाका आहे. या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षकांसह खासगी पंटरमार्फत तपासणी नाक्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांकडून लाच मागितली जात असल्याची तक्रार एका ट्रक चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केला होता. या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षकासह खासगी पंटरला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या मधोमध सीमा तपासणी नाका असून या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक सचिन शिवाजी पाटील आणि गणेश सजन पिंगळे यांच्यासह एक खासगी पंटर हे बुधवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास ट्रक चालकांकडून पाचशे रुपयांची लाच मागत असल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी संबंधित ट्रक चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मोटार वाहन निरीक्षकासह खाजगी पंटराची तक्रार केल्याने पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून मोटार वाहन निरीक्षक अधिकारी सचिन पाटील, गणेश पिंगळे व खासगी पंटर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.



‘त्या’ फरार नगरसेवकास
पोलिस कोठडी

चाळीसगाव : शाळेतील विद्यार्थिनीला मोबाइलमधील अश्लील चित्रफीत दाखविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नगरसेवक, शिक्षक तथा पालिकेतील शिक्षण सभापती बंटी उर्फ सूर्यकांत ठाकूर अखेर पोलिसांना शरण आला आहे. उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वाच्च न्यायालयानेही त्याचा जामिन अर्ज नाकारल्याने बुधवारी (दि. १२) तो ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करीत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. येथील नगरपालिकेचे नगरसेवक व शिक्षण सभापती तथा वाघळी येथील हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले शिक्षक सूर्यकांत ऊर्फ बंटी ठाकुर याच्याविरोधात विनयभंग तसेच पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड तालुक्यात शेतकरी आत्महत्या

$
0
0

नाशिक : निफाड तालुक्यातील रसलपूर येथे शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणाच्या वडिलांच्या नावे शेती असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. अमित अहमदखा पठाण (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. १२ डिसेंबर रोजी त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. त्यामुळे जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १०६ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्मदा परिक्रमास गेलेल्या पोलिस मित्राचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

देवळालीगावचे रहिवासी, पोलिस मित्र व माजी प्रेस कामगार तानाजी पुंडलिक खेलुकर (वय ६८) यांचा नर्मदा परिक्रमासाठी जात असताना वाटेतच अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खेलुकर यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे.

तानाजी खेलूकर हे देवळालीगाव व विहितगाव परिसरातील ५० नागरिकांसह नर्मदा परिक्रमासाठी खासगी ट्रॅव्हल्सने गेले होते. गुजरातमधील भरूच येथे एका मंदिरात दर्शनासाठी खेलूकर जात असताना त्यांचा पाय घसरला व ते डोक्यावर पडले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तेथे असलेले त्याचे नातेवाईक व मित्रांना मोठा धक्का बसला. खेलुकर व त्यांच्या नातेवाईकांनी नर्मदा परिक्रमा यात्रा अर्ध्यावर सोडली. खेलुकर यांचा मृतदेह खासगी वाहनाने देवळालीगावी आणण्यात आला. त्यांच्यावर गुरुवारी (दि. १३) रात्री अंत्यसंस्कार करण्यात आला.

खेलुकर हे आठ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. नाशिकरोड परिसरात ते पोलिस मित्र म्हणून परिचित होते. उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक कामात ते मदत करत असे. त्यामुळे पोलिसांमध्येही त्यांची चांगली प्रतिमा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडे गुरुजींच्या विनंतीवर ४ जानेवारीला सुनावणी

$
0
0

बचाव पक्षाचा युक्तिवाद संपला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोर्ट सुनावणीला नियमित हजर राहण्याची आवश्यकता नसून, त्यातून सूट मिळावी यासाठी संभाजी भिडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली. कोर्टाने पुढील सुनावणी ४ जानेवारी रोजी ठेवली असून, त्यात याबाबत आदेश होण्याची शक्यता आहे.

'माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्याविरुद्ध महापालिकेने कोर्टात खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी जिल्हा कोर्टात झाली. मागील सुनावणीवेळी हजर राहिलेले भिडे आज सुनावणीला हजर नव्हते. भिडे यांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे यांनी युक्तिवाद केला. भिडे यांना हजर राहण्यापासून सवलत मिळावी, यासाठी अॅड. भिडे यांनी अर्ज केला असून, त्यावर आज युक्तिवाद पूर्ण झाला. अॅड. भिडे यांनी सांगितले, की सर्व पुरावे कोर्टासमोर असून, भिडे यांनी दर सुनावणीला हजर राहणे आवश्यक नाही. भिडे यांचे वय, त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, त्यांना पुरविण्यात येणारे पोलिस संरक्षण आणि त्यासाठी होणारा वारेमाप खर्च लक्षात घेता कोर्टाने त्यांना सवलत द्यावी, अशी विनंती अॅड. भिडे यांनी कोर्टाकडे केली. भिडे यांच्या वतीने दर तारखेला वकील बाजू मांडतील, तसेच आवश्यकता असेल त्या वेळी भिडे हजर राहतील, अशी हमीही बचाव पक्षाने दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने पुढील सुनावणी ४ जानेवारीला ठेवली आहे. या दिवशी कोर्ट आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई, पुणे, ठाणे विजयी

$
0
0

नाशिक : येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांच्या ६९ व्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत पुरुषांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर या संघांनी आपले सामने जिंकून बाद फेरीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली. महिलांमध्ये मुंबई, नागपूर, मुंबईनेही विजय मिळवत बाद फेरीतील स्थान भक्कम केले. पुरुषांच्या गटात अहमदनगरने यवतमाळचा ३७- २८ असा पराभव केला. बाद फेरीचे सामने शनिवारी होणार असून, १६ डिसेंबर रोजी अंतिम फेरी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images