Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रोजगार हमीतून दुष्काळ निवारणावर भर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत विहीर पूर्नभरण, पाणी स्त्रोतांचे खोलीकरण यांसारखी गाव पातळीवर करावयाची श्रमदानाची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याबाबत शुक्रवारी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पाणी फाऊंडेशनची बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पाणी फाऊंडेशनचे मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते. यंदाही चांदवड आणि सिन्नर या दोन तालुक्यांमधील निवडलेल्या गावांतच पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून कामे करण्यात येणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर विहीर पूर्नभरण करणे, पाण्याचे स्त्रोत खोल करणे यासारखी श्रमदानाची कामे करण्यात येणार आहेत. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणे शक्य होणार आहे. जलयुक्तशिवार योजनेत असलेल्या गावांनाही वॉटर कप जिंकण्यासाठी प्रोत्साहीत करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षणाची डिजिटल झेप

0
0

माध्यमिक विभागाच्या वेबसाइटचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन\B

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाची डिजिटल इंडियाकडे सुरू असणारी वाटचाल नागरिकांसाठी अनेक बाबतीत सोपी ठरली आहे. एक क्लिकवर हवी ती माहिती आपल्याला तंत्रज्ञानामुळे मिळू लागली आहे. जिल्ह्यातील शिक्षकही या डिजिटल युगात अपडेट राहावेत व एका क्लिकवर त्यांना विभागाची सर्व माहिती मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून वेबसाइट तयार करण्यात आली आहे.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शनिवारी इगतपुरी येथे झालेल्या कार्यक्रमात वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले. http://www.eoseczpnashik.in/ या वेबसाइटवर आता जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाची सर्व माहिती मिळू शकणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षकांकडून वेबसाइट तयार करण्याचे काम सुरू होते. या वेबसाइटचे शनिवारी उद्घाटन करुन ती प्रत्यक्षात आणण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक करताना विनोद तावडे म्हणाले, की नाशिक माध्यमिक शिक्षण विभागाने स्वतःची वेबसाइट सुरू करून राज्यातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन दप्तर दिरंगाईवर मात करणे अधिक सुखकर होणार आहे.

वेबसाइटच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, वेबसाईट तयार करणारे शिक्षक शेखर ठाकूर, संदीप ठोके, उपशिक्षणाधिकारी के डी मोर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. के. अहिरे, आदी उपस्थित होते.

\Bनाविन्यपूर्ण माहितीचा समावेश\B

नाविन्यपूर्ण शाळा, नाविन्यपूर्ण शिक्षक, नाविन्यपूर्ण विद्यार्थी, यांबरोबरच महत्त्वाच्या लिंक्स, शिक्षक प्रशिक्षण, कार्यक्रम, विविध उपक्रम अशा अनेक स्वरुपाची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. याचा विद्यार्थ्यांसह पालकांनाही लाभ होऊ शकणार आाहे.

वेबसाइटमुळे पत्रव्यवहार, पीएफ स्लिप आदी माहितीच्या आदान-प्रदानात सुलभता निर्माण होण्यास मदत होणार आहे. ही वेबसाइट सरकारी खर्चातून नव्हे तर आम्ही स्वत:च्या खर्चातून शिक्षकांच्या सोयीसाठी केली आहे. यापूर्वी मुंबई येथे कार्यरत असताना तेथेही अशाप्रकारची वेबसाइट तयार केली होती.

\B- नितीन बच्छाव, माध्यमिक शिक्षणाधिकारी \B

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट

0
0

\B

कम्युनिस्ट नेत्यांना आदरांजली\B

नाशिक : कम्युनिस्ट नेते रमेश ठाकुर आणि शांता रानडे यांना शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कम्युनिस्ट नेते अॅड. दत्ता निकम, राजू देसले, ज्योती नटराजन, प्रा. वी. टी. जाधव, अॅड. राजपाल राणा, अॅड. अरुण दोंदे, विजय दराडे, शिवनाथ जाधव, कैलास मोरे, विराज देवांग उपस्थित होते.

\B

रक्तदान आज शिबिर

\Bनाशिक : सतगुरू अनिरुध्द उपासना केंद्र गंगापूर रोड यांच्या वतीने रविवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोड परिसरातील शंकरनगर येथील आराधन केंद्रात हे शिबिर होणार असून, नाशिककरांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

\Bआयुक्तांचा सत्कार\B

नाशिक : हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी विनंती त्यांच्याकडे पक्षातर्फे करण्यात आली असून, कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पक्षाने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा तासांत गुन्हा उघडकीस

0
0

सहा तासांत गुन्हा उघडकीस; मुद्देमालासह संशयित ताब्यात

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अरिंगळे मळ्यातून चोरीस गेलेल्या रिक्षाच्या टायरसह इतर मुद्देमाल हस्तगत करीत संशयितांना अवघ्या सहा तासांत जेरबंद करण्यात नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी हर्षल काशिनाथ देवरे (वय २०, रा. देवळालीगाव राजवाडा) आणि साजीद हसन खान (२०, रा. विहितगाव वीटभट्टीजवळ) या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

अरिंगळे मळ्यातील विलास अशोक अरिंगळे यांनी त्यांच्या रिक्षाची तीन टायर व इतर साहित्य चोरीस गेल्याची फिर्याद नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुरुवारी दिली होती. याशिवाय त्यांच्या रिक्षाशेजारी उभ्या असलेल्या चंद्रकांत देवकर यांच्याही रिक्षाचे टायर व इतर साहित्य चोरीस गेले होते. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असताना गुन्हे शाखेचे हवालदार मिलिंद पवार, विशाल पाटील, कय्यूम सय्यद, महेश सावळे, किशोर खिल्लारे, मुदस्सर पठाण, निखिल वाघचौरे हे पथक तपास करीत होते. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयित चोरीचे विक्री करण्यासाठी नाशिकरोड बसस्थानकाजवळ येणार होते. पथकाने सापळा रचून हर्षल देवरे व साजीद खान या दोघांना पकडले. त्यांच्या घरात रिक्षाचे १६ टायर, २ टेप, ३ बॅटरी असे साहित्य आढळले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

दारूसाठी चोरी

हर्षल देवरे व साजीद खान हे दोघेही रिक्षाचालक असून, त्यांना दारू पिण्याचे व्यसन जडलेले आहे. दारूच्या व्यसनाची गरज भागविण्यासाठी हे दोघे रिक्षाच्या साहित्याची चोरी करीत होते. त्याची विक्री करून मिळालेल्या पैशांतून मद्यसेवन करीत असत. मात्र, या दोघांचा गोरखधंदा नागरिकांना माहीत झाल्यावर त्यांच्याकडून चोरीचे साहित्य विकत घेण्यास नागरिकांनी मनाई केली. त्यामुळे ते बसस्थानक परिसरात ग्राहक शोधत असतानाच पकडले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार एकवटला शहरात

0
0

शेवटच्या टप्प्यासाठी उमेदवारांची धावपळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंन्ट बँकेच्या (नामको) २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या २१ संचालकांच्या पंचवार्षिक निवडणुकीला अवघे आठ दिवस बाकी उरले आहेत. त्यामुळे सर्वच पॅनलने आता शहरात लक्ष केंद्रीत आहे. त्यामुळे आठ दिवस नाशिकमध्ये प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र दिसणार आहे.

१ लाख ७६ हजार २६२ सभासद असलेल्या या बँकेचे नाशिकच्या चार विधानसभा कार्यक्षेत्रात ८७ हजार ८९१ मतदार आहे. त्यामुळे या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार शेवटच्या टप्प्यात शहरातच असणार आहे. राज्यभर मतदान असलेल्या या निवडणुकीसाठी अगोदर जिल्ह्याबाहेर प्रचार करण्यात आला. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेले काही दिवस प्रचार सुरू होता. त्यात रॅली, कार्यालयाचे उद्घाटन, वैयक्तिक भेटी यावर भर देण्यात आला. आता या ठिकाणी जवळपास प्रचार संपल्यानंतर शेवटच्या टप्प्यात शहरात प्रचार केला जाणार आहे. सोहनलाल भंडारी, वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल रविवारपासून (दि. १६) शहरात प्रचाराला सुरुवात करण्यात येणार आहे. गजानन शेलार, अजय ब्रह्मेचा, भास्करराव कोठावदे, ललित मोदी यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने शनिवारपासून चार टीम करत शहरातील सिडको, पंचवटी, गंगापूररोड, नाशिकरोड सह वेगवेगळ्या भागात प्रचार केला. अजित बागमार यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलनेही शनिवारी शहरातील बहुतांश भागात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.

ठिकठिकाणी फ्लेक्सबाजी

प्रचाराची रंगत वाढल्यानंतर आता सर्वच पॅनलने प्रचारासाठी फ्लेक्स बोर्ड लावले असून त्यामुळे तेही लक्ष वेधत आहे. या फ्लेक्स बोर्डावर सर्वच उमेदवारांचे फोटो असून त्यातील चिन्ह मात्र मोठे करण्यात आले आहे. प्रचारासाठी काही पॅनलने आपल्या कार्यालयाजवळ मोठी कमान लावली आहे. या कमानीवर वरील भागात पॅनलचे नाव तर साईडला उमेदवारांचे फोटो लावले आहे. त्यातही चिन्ह ठळक दिसतील यावर लक्ष दिले आहे.

सिडकोवर भर

सिडकोत सर्वाधिक मतदार असल्याने सर्वच पॅनलने या विभागावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. येथे पॅनलचे कार्यालयाबरोबर पोस्टर वॉरही सुरू आहे. सहकार पॅनलने या ठिकाणी शनिवारी प्रचार केला. आता प्रगती पॅनल येथे रविवारी कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. नम्रता पॅनलही या भागात जोर लावला आहे.

आरबीआयकडे चौकशीची मागणी

'नामको'च्या निवडणुकीत एकमेकांवर प्रचारात आरोप-प्रत्यारोप सुरू असतांना नम्रता पॅनलचे उमेदवार श्रीधर व्यवहारे यांनी बँकेच्या प्रशासकीय कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासक जे. बी. भोरिया यांच्या प्रशासकीय राजवटीत नामको बँकेच्या हिताला बाधा आणणाऱ्या निर्णयाची सखोल चौकशी करावी अशी मागणी अॅड. व्यवहारे यांनी रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तीकांता दास, उप गव्हर्नर बी. पी. कानुगो तसेच कार्यकारी संचालक ए. के. मिश्रा यांना निवेदन पाठवून केली आहे.

निवडणूक रंग : नामको बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तारवालानगर चौफुलीवर पुन्हा अपघात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी रोडवरील तारवालानगरच्या चौफुलीवर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, वाहनचालकांसाठी हा अतिशय चिंतेचा विषय ठरत आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजून ४८ मिनिटांनी हा अपघात झाला असून, त्याचे फूटेज सीसीटीव्हीत कैद झाले आहे. म्हसरूळकडून येणारी जीप व पेठरोडकडून येणारा आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. सिग्नल, वाहतूक पोलिस दिवसा कार्यरत असले तरी मध्यरात्री होणारे अपघात रोखण्यासाठी कोणाचाही वचक या भागात नसल्याने तारवालानगर ही अपघातांची चौफुली ठरत आहे.

म्हसरूळ, पेठरोड, आडगाव रोड व पंचवटी या चारही भागांतून येणारे रस्ते तारवालानगरच्या चौफुलीला मिळतात. दिवसा येथे सिग्नल कार्यरत असला तरी रात्री नऊनंतर सिग्नल बंद होतो. त्यानंतर मध्यरात्री भरधाव अवजड वाहनांमुळे झालेल्या अपघातांत कित्येक जण जखमी होत असून, अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. अपघातप्रवण क्षेत्र असा संदेश दर्शविणारा फलकदेखील या ठिकाणी लावण्यात आला असला तरी वाहनांचा वेग अपघातांना कारण ठरत आहे. या चौफुलीवर होणाऱ्या अपघातांमधील गांभीर्य पाहता पंचवटी पोलिसांनी स्पीडब्रेकरदेखील येथे बसवला होता. मात्र, त्याला परवानगी नसल्याने काही तासांतच तो पुन्हा जेसीबी फिरवून सपाट करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या समस्येचा सामना करावा लागत असला तरी त्यावर कोणताही उपाय शोधला जात नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरूचरित्र सप्ताह

0
0

नाशिक : उंटवाडी येथील श्री दत्त मंदीर मित्र मंडळातर्फे गुरूचरित्र सप्ताहाला शनिवारी सुरूवात झाली. दत्त मंदिर आवारात बापू स्वर्गे यांच्या गुरूचरित्र या विषयावरील प्रवचनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. २१ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ही प्रवचनमाला सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉगिंग ट्रॅकचे खासगीकरण

0
0

देखभाल-दुरुस्तीसाठी २० ठिकाणी प्रशासनाचा प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील उद्यानांपाठोपाठ महापालिकेने आता जॉगिंग ट्रॅकच्या देखभाल आणि दुरुस्तीचा सपाटा लावला आहे. शहरातील निम्मे उद्यानांची देखभाल दुरुस्ती खासगी ठेकेदारामार्फत केल्यानंतर सहाही विभागांमध्ये असलेल्या २० जॉगिंग ट्रॅकची देखभाल व दुरुस्ती खासगीकरणातून करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या जॉगिंग ट्रॅकच्या देखभाल व दुरुस्तीचे काम तीन वर्षांसाठी मक्तेदाराकडे दिले जाणार आहे. उद्यान विभागाकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने खासगीकरणातून देखभाल करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. त्यामुळे या प्रस्तावाबाबत नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

महापालिकेत सध्या खासगीकरणाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. महापालिकेच्या प्रमुख प्रकल्पांपाठोपाठ प्रशासनाने नागरिकांच्या सेवांचेही खासगीकरण सुरू केले आहे. चारशेपैकी पावणे दोनशे उद्याने महापालिकेने अगोदरच खासगीकरणातून देखभाल दुरुस्तीसाठी दिली आहेत. या देखभाल व दुरुस्तीचे १२ वाजल्यानंतर आता महापालिकेने जॉगिंग ट्रॅकचेही खासगीकरण सुरू केले आहे. शहराच्या सहा विभागात महापालिकेचे २० जॉगिंग ट्रॅक आहेत. जॉगिंग ट्रॅकवर पाणी मारणे, साफसफाई करणे, वृक्षांची गरजेनुसार छाटणी करणे, सुरक्षा व्यवस्था पुरविणे, स्वच्छता गृहांची साफसफाई करणे आदी नियमित कामे करावी लागतात. परंतु, उद्यान विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने या जॉगिंग ट्रॅकची देखभाल व दुरुस्ती होत नाही. उद्यान विभागाकडून नियमित कामकाज होत नसल्याने दुरवस्था झाल्याचे कारण उद्यान विभागाकडून देण्यात आले आहे.

ठेकेदारांचे पुन्हा चांगभलं

शहरातील २० जॉगिंग ट्रॅकचे एकूण ८० हजार ४३२ चौरस मीटर क्षेत्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात देखभाल करता येत नसल्याने तीन रुपये २४ पैसे प्रति चौरस मीटर दराने तीन वर्षांसाठी देखभाल करण्याकरीता दिले जावे असा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी एक कोटी पाच लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारांचे पुन्हा चांगभलं होणार आहे. महासभेवर हा प्रस्ताव ठेवला असून आता नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

असे आहेत प्रस्तावित जॉगिंग ट्रॅक

इंदिरानगर, कृषिनगर, वि. वा. शिरवाडकर उद्यान, समर्थनगर, अश्‍विननगर, लवाटेनगर, गोदापार्क, गोविंदनगर, राजे संभाजी स्टेडिअम, मुरलीधर वझरे नगर, काळेनगर, पंचक स्कूल, विहितगाव, दत्त मंदिर, जेतवननगर, गाडेकर मळा, लोखंडेनगर.

शिवाजी उद्यान टाकणार कात

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी उद्यानाच्या नुतनीकरणासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेसह राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या उद्यानाच्या नुतनीकरणासाठी चार कोटी ७ लाखांच्या खर्चाला सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या अमृत अभियान योजनेअंतर्गत हरीत क्षेत्र विकास प्रकल्प योजनेंतर्गत विशेष निधीतून सदर कामासाठी २ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या स्तरावरील समितीने या कामाला मान्यता दिल्याची माहिती आ. फरांदेनी दिली आहे. सदर कामाचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला असून उद्यानात, इलेक्ट्रिकल, ड्रीप एरिगेशन व बांधकाम विषयक व आर्किटेक्‍ट कन्सल्टन्सी कामांसाठी चार कोटी सात लाख रुपयांचे प्रकलन तयार करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक १ कोटी ७१ लाख रुपयाने महापालिका स्वनिधीमधून टाकणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या उद्यानाचा कायापालट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात पुन्हा दोन शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, मालेगाव आणि नांदगावात पुन्हा दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १०८ झाली आहे.

मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथील तरुण शेतकरी नीलेश धर्मराज ह्याळीज (वय २९) याने शनिवारी पहाटे विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे मालेगाव तालुक्यात चालू वर्षात आतापर्यंत १८ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. नीलेशच्या नावे ३ हेक्टर ३७ आर शेतजमीन असून, स्टेट बँक ऑफ इंडिया मालेगाव शाखेचे सुमारे चार लाखांचे कर्ज आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. नीलेशच्या वडिलांचे एक वर्षापूर्वी निधन झाले. कुटुंबातील कर्ता असलेला नीलेश अविवाहित होता. त्याच्या मागे आई आणि चार बहिणी आहेत. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे प्रभाकर वाल्मीक हगवणे (वय ४०) यांनी १२ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येच्या कारणांची माहिती घेऊन सविस्तर अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने स्थानिक यंत्रणेला दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट १

0
0

अंबड रस्त्याचे

रुंदीकरण रखडले

नाशिक : अंबड येथील माऊली लॉन्स ते महिंद्रा कंपनी दरम्यानच्या रस्त्याचे भूमिपूजन होऊन वर्ष उलटले तरीही रुंदीकरणाचे काम सुरू न झाल्याने परिसरातील नागरिकांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण होत नसल्याने रस्ता दुभाजक होवू शकणार नसल्याने वाढत्या वाहतुकीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. माऊली लॉन्स चौकात दररोज होणारी वाहतूक कोंडी व धोकादायक वाहतुकीचा त्रास सोसावा लागत असल्याने अंबड रस्त्याचे तातडीने रुंदीकरण महापालिकेने करावे, अशी मागणी होत आहे.

मोकाट कुत्र्यांचा त्रास

नाशिक : अंबड येथील महालक्ष्मीनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेने या परिसरात कुत्र्यांवर कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, या परिसराच्या विकासाकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरातील उद्यानांची कामे रखडली असून, यामुळे ज्येष्ठांसाठी विरंगळाच नसल्याचे तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली. त्यातच परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये कुस्ती स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सीएम चषकअंतर्गत भाजयुमो आयोजित स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. त्र्यंबकेश्वरचे कल्पेश भडांगे, संतोष भडांगे, अक्षय भांगरे, करण कदम, सतीश यादव, इगतपुरीचे बाळू जुंद्रे, मुलींच्या गटात मानसी बागूल, सुप्रिया तुपे, हरसूलची प्रज्ञा बिर्ले, इगतपुरीची दीपाली भावले या मल्लांनी विविध वजनगटांत यश मिळविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. भाजपचे युवा नेतृत्व भाऊराव डगळे यांनी या स्पर्धेचे नियोजन केले होते. प्रभारी नगराध्यक्ष स्वप्नील शेलार, भाजपच्या तालुकाध्यक्षा कौशल्या लहारे, भाऊराव डगळे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्यामराव गंगापुत्र आदी उपस्थित होते. शांताराम बागूल, पिंटू काळे, डॉ. सत्यप्रिय शुक्ल पंच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिका तिसऱ्यांदामहाराष्ट्राच्या संघात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे जानेवारीत होणाऱ्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी रसिका शिंदे हिची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून तिची निवड करण्यात आली. या निवड चाचणीसाठी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट शिबिर झाले. आतापर्यंत जम्मू-काश्मीर आणि मध्य प्रदेश या दोन राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेऊन रसिकाने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. लातूर येथे सराव शिबिरात ती आता सहभागी होणार आहे. रसिका केटीएचएम महाविद्यालयात ११ वीमध्ये शिक्षण घेत आहे. भावना गवळी, सुनील मालुसरे, क्रीडाशिक्षक आहेर, हेमंत पाटील, उत्तम भुसारे यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांवर नोटिसांची मात्रा

0
0

४६ कोटींच्या पाणीपट्टी वसुलीसाठी कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ४६ कोटी ३२ लाखांपर्यंत पोहचलेल्या पाणीपट्टीची थकबाकी वसुलीसाठी अवघे तीन महिने शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या कर संकलन विभागाने पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. पाणीपट्टीची पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या तब्बल ३६ हजार २०९ नळ जोडणीधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून ३३ कोटी ८० लाखांच्या थकबाकीसह तब्बल ४६.३२ कोटी रुपयांची वसुली केली जाणार आहे.

महापालिकेच्या कर संकलन विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याने घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली रोडावली आहे. महापालिकेने एकीकडे घरपट्टी वसुलीवर जोर दिल्याने पाणीपट्टीची देयके वाटपाला उशिर झाला आहे. त्यातच थकबाकीदारांची संख्याही मोठी असल्याने घरपट्टीची वसुली यंदा चांगली झाली असली तरी पाणीपट्टीची वसुली मात्र थंडावली आहे. देयके मिळत नसल्याने नळजोडणीकडून केल्या जाणाऱ्या चालढकलमुळे पाणीपट्टी थकबाकीच्या आकड्याने ४५ कोटींचा पल्ला पार केला आहे. पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवर कारवाईसाठी महापालिकेने टप्पे निश्चित केले असून पहिल्या टप्प्यात पाच हजारांपेक्षा अधिक पाणीपट्टी असणाऱ्या नळजोडणीधारकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. पाच हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नळजोडणीधारकांची संख्या ३६ हजार २०९ एवढी आहे.

..

अशी आहे नळपट्टी जोडणीधारकांची संख्या

विभाग............. थकबकीदार संख्या

पंचवटी .......... ८,८११

नाशिक पूर्व ....... ७,३१५

सातपूर .............. ६,५७५

नाशिकरोड ....... ५,९३०

सिडको ....... ५,९१२

नाशिक पश्चिम ....... १,६६६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमातून गाठावे ऐच्छिक यश

0
0

अभिनेता भरत जाधव यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रेम, आपुलकी आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती प्रत्येकात असायला हवी. कोणतीही लढाई द्वेशातून जिंकण्यापेक्षा, प्रेमाभावनेने जिंकणे सोयीस्कर असते. तसेच यशप्राप्तीसाठी शर्यत करण्यापेक्षा इतरांशी प्रेमाने वर्तन ठेवत, ऐच्छिक यश निश्चित पटकावता येते, असे प्रतिपादन अभिनेता भरत जाधव यांनी केले.

शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये अॅड. धर्मेंद्र चव्हाण लिखित 'हलकं फुलकं' या प्रेम काव्यसंग्रहाचे प्रकाशन अभिनेता जाधव यांच्या हस्ते झाले. नाशिकच्या नाट्य संस्कृतीबाबत जाधव म्हणाले, की नाशिकच्या नाट्यकलेचा अनोखा वारसा आहे. या नाट्यसंस्कृतीतून साहित्यिक आणि तरुण लेखकांचा जन्म होत असून, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या सोहळ्यास नाशिक बार असोशिएनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, सुलेखनकार नंदू गंवादे, अभिनेते जयराज नायर, किशोर यशोद, ज्ञानेश बेलदार, पुजांजी मालुंजरकर आदी मान्यवरांसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात घोटीचा तरुण ठार

0
0

कार अपघातात

घोटीचा तरुण ठार

घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावर मुंढेगाव शिवारात शनिवार (दि. १५) दुपारी एक वाजेच्या सुमारास झालेल्या कार अपघातात टाके-घोटी येथील तरुण जागीच ठार झाला. अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंढेगाव चौफुलीवर नाशिकमार्गे घोटीकडे जाणारी अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने कार दुभाजकावर चढून पलटी झाली. या अपघातात टाके-घोटी येथील पांडुरंग लहानु भगत (वय २६) हा जागीच ठार झाला तर शंकर भोगीलाल नाठे (वय २८) हा गंभीर जखमी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रविवार चित्रवृत्त - थंडी

0
0

रविवार चित्रवृत्त - थंडी

नाशिकची थंडी सिद्धिविनायकालाही जाणवते.. रविवार कांरजावरील सिद्धिविनायक गणेशाला घातलेले पांघरुण.

थंडीचा बचाव करण्यासाठी शेकोटीवर ऊब घेताना नागरिक.

थंडी व्यायामासाठी पोषक आहे. म्हणूनच सकाळी सायकलिंगचा आनंद घेणारी मुले आणि त्यांचे पालक.

थंडीत गरमागरम चहाचा आस्वादही उबदार ठरतो. सीबीएस चौकातील हे चित्र.

थंडी असली तरी शाळा चुकत नाही. हुडहुडीतही शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी.

थंडीत व्यायामालाही हुरूप येतो. इंदिरानगरमधील जॉगिंग ट्रॅकवर ग्रीन जिम करणारे नागरिक.

इंदिरानगरमध्ये वॉर्मअप करणारे नागरिक

शरीराला पोषक ठरणारा पाचक रस (ज्यूस) घेताना नागरिक.

हुडहुडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘असीमा’चे कार्य प्रेरक

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

'असीमा' संस्थेने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधा या ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्राला प्रेरक आहेत. या कौशल्य शिक्षण व आधुनिक सोयी-सुविधांमुळे ग्रामीण विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने गरुडझेप घेतील, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

आदिवासी बालकांच्या विकासासाठी ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्याची सीमारेषेवरील आवळखेड येथे असीमा बाल शैक्षणिक केंद्र असलेल्या नवीन अद्यावत इमारतीचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथि म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, महसूल आयुक्त राजाराम माने, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, डॉ. वैशाली झनकर, गटविकास अधिकारी किरण जाधव, गटशिक्षण अधिकारी नरेंद्र खंदारे ,असीमा ट्रस्टच्या चेअरमन श्रीमती दिलबर पारख आदी उपस्थित होते.

यावेळी तावडे म्हणाले, की शहरी भागात शिक्षण संस्था चालविणे हे कठीण काम आहे. यात ग्रामीण भागात संस्था चालविणे हे तर त्यापेक्षा जिकरीचे. पण हे आव्हानात्मक काम स्वीकारून ग्रामीण व दुर्गम क्षेत्रात आधुनिक सुविधा निर्माण करीत शिक्षण क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकल्याने असीमा शिक्षण ट्रस्ट कौतुकास पात्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील कौशल्य विकासच्या धर्तीवर सुविधा व शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य तपासून त्यांचे आयुष्य घडवा, असे आवाहनही तावडे यांनी केले.

यावेळी श्याम जाजू, संस्थेचे विश्वस्त पॉल, पारख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रांत अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे, शांतिलाल चांडक, सुनील बच्छाव, कासम, इमॅन्यूएल डीवूआर, केर्मान कात्रक, प्रदीप ढोबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वस्त नीला कपाडिया, प्रीति कुंडालिया, शर्वरी कुलकर्णी यांच्यासह पुनीत चांडक, ऋषिका आनारे, गीता सुभेदार, किरण फलटनकर, शांतिलाल चांडक, राजेश जैन, बबन कदम जे. के. मानवेढे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉडी लोशन, कोल्ड क्रीमला मागणी

0
0

बागेश्री पारनेरकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

सध्या बाजारात उबदार कपड्यांप्रमाणेच त्वचेच्या संरक्षणासाठी बॉडी लोशन, कोल्ड क्रीम, लिप बाम, आयुर्वेदिक लेप यांची मागणी वाढली आहे. नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांप्रमाणे शहरातील पतंजली, दगडू तेली, आयुर्वेदिक दुकानांमध्ये लोकांची गर्दी दिसत आहे. हल्ली आयुर्वेदिक वस्तू वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

हिवाळ्यात थंडीने त्वचा, ओठ रुक्ष आणि कोरडे होतात. त्यांची निगा राखण्यासाठी बाजारात विविध कंपन्यांचे बॉडी लोशन, कोल्ड क्रीम, लिप बाम विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात व्हॅसेलिन, हिमालया, नेविया, पाँड्स, नोवा, जॉय या कंपन्यांच्या उत्पादनांना जास्त मागणी आहे. वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये हे उपलब्ध आहेत. हिवाळ्यासाठी काही कंपन्यांचे कोल्ड क्रीम बाजारात आल्या आहेत. विविध प्रकारच्या जाहिराती, उत्पादनांवर दिली जाणारी सूट याचा खरेदीवर विशेष परिणाम होतो.

हल्ली तरुण पिढीचा कल आयुर्वेदिक वस्तू वापरण्याकडे वाढलेला आहे. या उत्पादनांबरोबरच आयुर्वेदिक लेप, मसूरडाळ पावडर, उटणे या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या फेसपॅकलाही तरुणी आणि महिलांची विशेष मागणी आहे. काही आयुर्वेदिक दुकानांत हिवाळ्यासाठी खास साबणही उपलब्ध आहेत.

हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते. त्वचा मऊ राहण्यासाठी मी ब्रँडेड कंपन्यांच्या बॉडी लोशन, कोल्ड क्रीमबरोबरच आयुर्वेदिक लेप, पावडर, घरगुती डाळीचं पीठ यांचाही वापर करते. त्याचाही खूप फायदा होतो.

- श्रावणी पुराणिक, ग्राहक

बॉडी लोशन, कोल्ड क्रीम, लिप बाम या गोष्टी ग्राहक ब्रँड बघून खरेदी करतात. कंपनी जितकी जुनी तितका ग्राहकांचा विश्वास अधिक असतो. त्यामुळे आयुर्वेदिक गोष्टींबरोबर व्हॅसेलिन, नेविया या कंपन्या जुन्या असल्याने त्यांच्या उत्पादनांचा जास्त खप आहे.

- विजय पवार, विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सात घाटांचे होणार वाळू लिलाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरणाशी संबंधित परवानग्यांसह विविध अटी-शर्तींमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील सात वाळू घाटांवर लिलाव केले जाणार आहेत. अशा घाटांचे मायनिंग प्लॅन तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरणाशी संबंधित परवानगी मिळताच जाहीर लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

वाळू उत्खननावेळी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. सरकार याबाबत कठोर भूमिका घेत नसल्याने पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली. वाळू घाटाच्या लिलावापूर्वी पर्यावरण संवर्धनाचे निकष पाळले जायला हवेत, असे निर्देश देण्यात आले. हे निकष पाळण्याच्या अटीवर वाळू घाटांच्या लिलावाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सात घाटांच्या लिलावातून अंदाजे १३ हजार ३२४ ब्रास वाळू उपलब्ध होईल, असा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातून एक कोटी ४४ लाख २९ हजार ८९२ रुपयांचा महसूल मिळू शकणार आहे.

या घाटांचे होणार लिलाव

त्र्यंबकेश्वर - कास (दमणगंगा नदी)

कळवण - पळसदरे (गिरणा नदी)

मालेगाव - पाटणे, सवंदगांव, दाभाडी स्थळ क्र-१ व २ (चारही घाट गिरणा नदी)

दिंडोरी - अवनखेड -१ व २, जोपूळ (दोन्ही घाट कादवा नदी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारराजा तुझ्यासाठी!

0
0

००००००००००

मतदारराजा तुझ्यासाठी!

पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया राबविली जात असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोचावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती सुरू केली आहे. यासाठी खास चित्ररथ बनविले असून त्याद्वारे लोकांचे ठिकठिकाणी प्रबोधन केले जात आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images