Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

क्षुल्लक कारणावरून फळविक्रेत्याची हत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रस्त्यात पाय पसरुन बसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन तिघांनी दोघांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघा भावांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नरफाटा येथील देवल गल्लीत शनिवारी (दि.२२) रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली. यामुळे सिन्नर फाटा भागात तणाव निर्माण झाल्याने पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नाशिकरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर आदींनी तत्काळ घटनास्थळी हजर होऊन हल्लेखोरांना ताब्यात घेत जमावाला पांगवले.

रविवारी दिवसभर सिन्नर फाटा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात होता. या घटनेत जखमी झालेल्या जावेद जहीर खान (वय २२, रा. विष्णूनगर, देवल गल्ली, सिन्नर फाटा) याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री दोन वाजता दिलेल्या फिर्यादीनुसार जखमी आझिम जहीर खान हा त्याच्या राहत्या घरासमोर बसलेला होता. त्यावेळी आरोपी सचिन अमरनाथ महाजन (वय ३६), नाना अमरनाथ महाजन (वय ४०) आणि राहुल ज्ञानेश्वर महाजन (वय २०, तिघेही रा. विष्णूनगर, देवल गल्ली, सिन्नर फाटा) घराकडे जात असताना त्यांनी आझिम जहीर खान यास रस्त्यात पाय पसरून का बसला, अशी विचारणा केली. या क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रुपांतर काही क्षणातच जीवघेण्या हल्ल्यात झाले. आरोपी नाना व राहुल महाजन या दोघांनी घरी जाऊन एकाने लोखंडी रॉड व एकाने खेळण्याची बॅट आणली. नानाने लोखंडी रॉड सचिनच्या हातात दिला. सचिनने लोखंडी रॉडने आझिमच्या डोक्यावर व पायावर वार केला, तर राहुलने लाकडी बॅटने आझिमच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात आझिम गंभीर जखमी झाला. यावेळी हल्लेखोरांनी दगड-विटांचाही वापर केला. हल्लेखोरांच्या तावडीतून भावाला वाचविण्यासाठी आलेला जावेद हादेखील जखमी झाला. या हल्ल्याची माहिती समजताच सिन्नर फाटा येथे मोठा जमाव जमा झाल्याने परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण बनली होती. हल्ल्यानंतर तिघेही हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह नाशिकरोड पोलिसांचा मोठा ताफा सिन्नर फाटा येथे दाखल झाला. पोलिसांनी प्रथम जमाव पांगवला. जखमी आझिम व जावेद खान यांस प्रथम पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. परंतु, आझिमची प्रकृती गंभीर असल्याने त्यास खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना आझिम खान यास डॉक्टरांनी रविवारी पाच वाजता मृत घोषित केले. या हल्ल्यातील तिघाही हल्लेखोरांना पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या. रविवारी त्यांना नाशिकरोड न्यायालयात हजर केले असता दि. २६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सिन्नर फाटा परिसरात रविवारीही तणावपूर्ण स्थिती होती.

हल्ल्याला व्यावसायिक वादाची पार्श्वभूमी?

या घटनेतील फिर्यादी व हल्लेखोर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर डाळींब व इतर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातील वर्चस्ववादातूनच शनिवारी रात्री हल्ल्याची घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेतील जखमी मूळचा बऱ्हाणपूर येथील आहे. याशिवाय एका हल्लेखोरावर यापूर्वी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरट्यांकडून मोटारसायकली जप्त

0
0

जेलरोड : मोटारसायकल व मोबाइल चोरून विकणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना उपनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच मोटारसायकल व दोन मोबाइल जप्त करण्यात आले. उपनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी विशाल पाटील व प्रदीप ठाकूर हे शनिवारी रात्री जय भवानीरोडवर गस्तीवर होते. त्यावेळी दोन अट्टल चोरटे चोरीच्या मोटारसायकल व मोबाइल विकणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांनी खबर दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदाळे, जाधव, शिंदे, गोडसे, कोकाटे, निकम, टोपले, चंद्रमोरे, खांडबहाले आदींनी सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता रोशन रामदास पवार (१९ रा. चिंचोली, अंबड) व चाफा उर्फ प्रवीण निंबाजी काळे (२०, रा. आम्रपाली झोपडपट्टी, जेलरोड) अशी त्यांची नाव असल्याचे समजले. त्यांच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकल व दोन मोबाइल हस्तगत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पंचवटी’वरून ‘ब्रॅण्ड वॉर’

0
0

मटा विशेष लोगो

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: ट्रेडमार्क नोंदणी न करता व्यवसायास नाव देणाऱ्या तिघा व्यावसायिकांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला. या तिन्ही हॉटेलांसाठी वापरण्यात येणारे 'पंचवटी' हे नाव काढून टाकण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, यातील दोन हॉटेल नाशिक शहरातील, तर एक हॉटेल मुंबई-आग्रा हायवेवरील शहापूर येथील आहे.

शहरातील हॉटेल पंचवटी हे १९८३ पासून अस्तित्वात असून, हॉटेलचा ट्रेडमार्क नोंदविलेला आहे. मात्र, नाशिक शहरात दोन ठिकाणी, तर शहापूर येथे एका हॉटेलच्या नावामध्ये पंचवटी या शब्दाचा वापर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर हॉटेल पंचवटीचे गौरव चांडक यांच्यातर्फे अॅड. हिरेन कमोद यांनी एस. जी. काथावाला यांच्या कोर्टात दावा दाखल केला. शहरात नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळच सुरू असलेल्या हॉटेलला 'हॉटेल पंचवटी' असे नाव देण्यात आले होते. के. के. वाघ कॉलेजवळच एका व्यावसायिकाने 'पंचवटी भेळभत्ता' नावाने रजिस्ट्रेशनससाठी अर्ज केला असून, त्यामुळेच हा प्रकार उघड झाला. शहापूर येथील हॉटेल व्यावसायिकाने 'श्री पंचवटी' नावाचा वापर केला. या वादाबाबत शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस कामकाज चालले. 'पंचवटी भेळभत्ता' या दुकान मालकाच्यावतीने सुनावणीसाठी कोणीही हजर नव्हते. हॉटेल पंचवटीचे संचालक युनिस खान यांनी मात्र झालेली चूक मान्य करीत नाव हटविण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे कोर्टाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावत हे प्रकरण बंद केले. दंडाची रक्कम चॅरिटीसाठी देण्यास चांडक यांनी सहमती दर्शविल्याने कोर्टाने तसे आदेश दिले. शहापूर येथील हॉटेल मालकाने मात्र कोर्टाकडे युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार शनिवारी या खटल्याची सुनावणी झाली. २०१६ पासून पंचवटी या शब्दाचा वापर करतो, त्यामुळे हे नाव कायम ठेवण्याची विनंती करण्यात आली. यास अॅड. कमोद यांनी अक्षेप घेतला. नाशिकमध्ये हॉटेल पंचवटी हे १९८३ पासून सुरू असून, हॉटेल पंचवटी गौरव या नावाने फ्रँचायजीचे काम होते. फक्त पंचवटी या शब्दामुळे ग्राहकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, म्हणून या नावाचा वापर तत्काळ थांबवावा, असे कमोद यांनी स्पष्ट केले. या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती काथावाला यांनी हॉटेलच्या बिलावरील, कम्प्युटरमधील, मेनू कार्डवरील तसेच इतर ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या नावात बदल करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे. दरम्यान, रेस्टॉरंटबाबत पंचवटी हे नाव नोंदणीकृत असून, व्यावसायिकांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक असल्याचे अॅड. कमोद यांनी स्पष्ट केले.

पंचवटी या नावाची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून, याच नावासाठी आमच्या तीन पिढ्यांनी काम केले. पंचवटी या शब्दाच्या वापरामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. ग्राहकांची कोणत्याही स्वरुपाची फसवणूक होऊ नये, म्हणून दावा दाखल करण्यात आला होता.

- गौरव चांडक, भागीदार, हॉटेल पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिकतेने गाणं हरवत चाललंय

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गाणं रेकॉर्ड करताना पूर्वी वादक रिहर्सल करायचे, आता तांत्रिकतेने गाण्यात, ओळ नाही तर शब्दच बदलता येत असल्याने गाण्याचा आत्मा हरवत चालल्याची खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते संस्कृती वैभव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

तीन दिवसांपासून संस्कृती वैभवच्यावतीने गोविंदनगर येथे त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. यावेळी नाशिकमधील संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे व ज्येष्ठ गीतकार व संगीतकार अशोक पत्की यांना 'संस्कृती वैभव' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. शाल, तुळस, मानपत्र, पुरस्काराची मूर्ती, व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी पत्की म्हणाले की, पाच मिनिटाचे गाणे, एक मिनीटाचे शीर्षक गीत व १० सेकंदांची जिंगल करताना ते खणखणीतच असावे, असा माझा प्रयत्न असतो. मला जितेंद्र अभिषेकींनी सांगितले होते की, मुखडा असा खणखणीत बनवायचा की, त्यानंतर येणारे शब्द आपोआप सुरावटीत येतील. तेच आजतागायत पाळतो आहे. रफी, मन्ना डे, मुकेश यांच्याबरोबर काम करताना मजा असायची. तीन-तीन दिवस रिहर्सल व्हायच्या. आता त्या होत नाहीत. त्यामुळे गाण्याचा आत्मा हरवत चाललाय, असे वाटते. यावेळी त्यांनी शंकर महादेवन, लता मंगेशकर यांच्या आठवणी सांगीतल्या. दुसरे सत्कारार्थी श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनीदेखील त्यांच्या संगीत कारकीर्दीविषयी रसिकांना सांगितले. यावेळी देशाविदेशात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. भरत केळकर, सामाजिक क्षेत्रात आपले योगदान देणारे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, कृषीक्षेत्रात क्रांती घडविणारे विलास शिंदे, तसेच शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करणारे सचिन जोशी यांचा 'संस्कृती सन्मान' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संस्कृती वैभव पुरस्कारार्थींना ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी बोलते केले. सर्व सत्कारार्थींचा परिचय ध्वनिचित्रफितीतून करून देण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी सुधीर गाडगीळ यांनी सांगीतिक गप्पा मारल्या. सूत्रसंचालन विघ्नेश जोशी यांनी केले.

प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

यावेळी राधाकृष्ण वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्राणी रुग्णवाहिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही रुग्णवाहिका नाशिककरांसाठी मोफत उपलब्ध असेल. एखादा प्राणी पक्षी, जखमी किंवा मृत आढळल्यास ९६७३३३२१०९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेही दिवस पालटतील!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम क्षेत्राला सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, बांधकाम व्यावसायिक त्रस्त झाल्याचे दिसते. अनेकदा प्रशासनाच्या मार्फत 'सर्व काही ठिक आहे, पण...', असे म्हणत बांधकाम व्यावसायिकांना अडचणींत ठेवण्यात येते. यातील 'पण' लवकरच दूर होऊन, बांधकाम व्यवसायाला भरारी प्राप्त होईल,' असा आशावाद माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो'च्या समारोप सोहळ्यात भुजबळ बोलत होते. क्रेडाईतर्फे गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानात आयोजित 'क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो' या तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा रविवारी संध्याकाळी ७ वाजता संपन्न झाला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल यांसह क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, उपाध्यक्ष रवी महाजन, प्रदर्शनाचे समन्वयक अनील आहेर आणि ऋषिकेश कोचे व्यासपीठावर होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, 'मन की बात' वर चर्चा करत सर्वजण अडचणींच्या फेऱ्यात अडकले असून, आता 'घर की बात' वर चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे. देशात कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक महत्त्वाचे बांधकाम क्षेत्र असून, अनेक नियम आणि कायद्याच्या बंधनात हे व्यावसायिक अडकले आहेत. नाशिकच्या पर्यटनाचा विकास लक्षात घेता, बांधकाम व्यवसायाला नवी झळाळी प्राप्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकाम व्यवसायाच्या बाबतीत कोणत्याही पध्दतीचे राजकारण होऊ नये. तसेच प्रशासकीय कामकाजात बांधकाम व्यावसायिक अडकणार नाहीत, यासाठी महापालिका प्रशासनानेही सहकार्याचे धोरण राबवावे.' असे झाल्यास नाशिकच्या झपाट्याने विकास होण्याच वेळ लागणार नाही.' असेही ते म्हणाले.

यावेळी महापालिका आयुक्त गमे यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या सर्व अडचणींवर योग्य तोडगा काढणार असल्याचे आश्वासन बांधकाम व्यावसायिकांना दिला. कार्यक्रमाला नाशिककर आणि बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी नाशिक संलग्न हवा होता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'खान्देशातील अनेक नागरिक शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने नाशिकमध्ये स्थायिक झाले असून, नाशिक आणि खान्देशची नाळ कित्येक वर्षांपासून आहे. खान्देशातील व्यक्तिंना नावलौकीक मिळवून देण्यातही नाशिकचा हातभार अधिक असून, नाशिक आणि खान्देश हे समीकरण अधिक दृढ झाले आहे. त्यामुळे जेव्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून कार्यरत होतो, तेव्हा नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असावा असे कायम वाटायचे.' असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. कृष्णा पाटील यांनी मांडले.

आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पनेतून ठक्कर डोम येथे आयोजिक नाशिककरांच्या खान्देश महोत्सवात शनिवारी संध्याकाळी ७ वाजता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खान्देशच्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, आमदार सीमा हिरे, महेश हिरे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करणे म्हणजे, आपल्या व्यक्तिंच्या कार्याचा सन्मान करणे होय. प्रत्येकातील गुण हेरून त्यांना सन्मानित करणे अतियश अवघड असून, खान्देश रत्न हा सन्मान विशेष आहे. गेल्या दोन वर्षांपासून खान्देश महोत्सवाच्या माध्यमातून माणसे एकत्र येऊ लागली असून, संस्कृती आणि भाषेचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अहिराणी भाषा आणि संस्कृती आहे. त्यामुळे नाशिककरांच्या खान्देश महोत्सवातून खान्देशच्या संस्कृतीचा जागर असाच कायम सुरू ठेवणे गरजेचे आहे.'

यावेळी रश्मी हिरे यांनी आभार व्यक्त केले.

\Bहे आहेत खान्देश रत्न!

\Bराजेंद्र कलाल, विलास पाटील, सतीश सोनवणे, रेखा महाजन, प्रशांत पाटील, बाळासाहेब पाटील, प्रशांत कुलकर्णी, डी. एल. देवरे, अनिल जाधव, नागराज देवरे, शामदत्त विभांडीक, नितीन ठाकरे, गंगाराम सावळे, कौतिक जाधव, विवेक पाटे यांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खवय्यांनी अनुभवली खान्देशी पर्वणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवारी खान्देश महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी नाशिककर खवय्यांनी गर्दी करत, खान्देशी पदार्थांचा आस्वाद घेतला. सकाळापासून महोत्सवात सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह, खान्देशातील ठसकेदार पदार्थांची चव घेण्यात नाशिककर दंग झाले होते. सुटी असल्याने रात्री उशिरापर्यंत नाशिककर खवय्यांची गर्दी महोत्सवात कायम होती.

आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पेतून ठक्कर डोम येथे आयोजित खान्देश महोत्सवाचा चौथा दिवस उत्साहवर्धक ठरला. सकाळी ११ वाजेपासून शहरातील सर्व भागातून आलेल्या खवय्यांनी महोत्सवात गर्दी केल्याचे दिसले. चुलीवरील गरमा गरम मांडे, ठसकेदार भरीत भाकरी अन् ठेचा, भरलेली वांगी, भरलेले कारले, भाजणीचे थालीपीठ, मेथीचे पराठे, पिठलं, साजूक तुपातील उकडीचे मोदक, आप्पे यांसह काळ्या मसाल्याची आमटी, मटण, चिकन या पदार्थांवर खवय्यांनी भरपूर ताव मारला. पदार्थांची चव चाखण्यात व्यस्त खवय्यांच्या उत्साहात महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांनी अधिक भर आणली. सकाळपासूनचा हा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम होता.

\Bमहोत्सवात भक्तीमय वातावरण\B

कानडा राजा पंढरीचा, वारियाने कुंडल हाले, ओलविला वेणू नाद, अबीर गुलाल उधळीत रंग, नको देव राया अशा अनेक एक भजनांनी व गवळणींच्या सादरीकरणाने महोत्सवाचे वातावरण भक्तीमय झाले. महोत्सवात आयोजित भजन स्पर्धेत शहरातील अनेक महिला भजनी मंडळांनी सहभागी होत, भजन आणि गवळण सादर करत भक्तीमय वातावरण निर्माण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहील, अरबाजमुळे नाशिकचा नंदुरबारवर विजय

0
0

१४ वर्षांखालील आमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आमंत्रितांच्या १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा साहील पारेख याचे शतक व डावखुरा फिरकी गोलंदाज अरबाज साहाच्या सात बळींमुळे नाशिकने नंदुरबार संघावर निर्विवाद विजय मिळविला. सुयोजित क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा झाली.

दोनदिवसीय या सामन्यामध्ये साहीलने शनिवारी केलेल्या १०६ धावांच्या जोरावर नाशिक संघाने सर्व बाद २८५ धावा केल्या. कर्णधार आयुष ठक्करने ५७ धावा करीत त्याला चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नंदुरबारने ४ बाद ४९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा अरबाज साहाच्या भेदक माऱ्यापुढे नंदुरबारचा पहिला डाव ७२ धावांवर आटोपला. हर्ष सिंगने ही उत्कृष्ट गोलंदाजी करीत ३ बळी मिळविले. फॉलोऑन मिळाल्यानंतर नंदुरबार संघ दुसऱ्या डावात सर्व बाद ८२ धावा करू शकला. अरबाजने दुसऱ्या डावात ही उत्कृष्ट गोलंदाजी करत ३ बळी मिळविले. या विजयासह नाशिकला ६ गुण मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षेच्या मुक्कामाची होणार व्यवस्था

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवकांना नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. अशावेळी शहरात आल्यानंतर मुक्कामाचा प्रश्न निर्माण होतो. राहण्याची कुठेच व्यवस्था नसल्याने काही वेळा रस्त्यावर रात्र काढून परीक्षेला सामोरे जावे लागते. अशावेळी त्याचा परिणाम परीक्षेवर होऊन पात्रता असूनही अपयश पदरी पडते. यासाठी खेड्यातून शहराकडे येणाऱ्या युवकांना एक-दोन दिवस मुक्काम करता यावा यासाठी महाराष्ट्र सरकाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात युवा वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात मुला-मुलींना नाममात्र दरात एक ते दोन दिवस राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. चार मजली वसतिगृहात एकावेळी १०० युवक-युवती राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर जास्तीत जास्त तीन दिवस वास्तव्य करता येणार आहे. परीक्षेचा कालावधी जास्त असेल तर विद्यार्थ्यांकडे असलेली कागदपत्रे पाहून त्याचा मुक्काम वाढविण्यात येणार आहे. मुलांना चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी येथे एक सुसज्ज लायब्ररीही उभारण्यात येणार असून, स्पर्धा परीक्षांबरोबरच विविध प्रकारची पुस्तके अभ्यासण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभागीय पातळीवर दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अशावेळी ग्रामीण भागातून खेळासाठी आलेल्या संघांना मुक्कामाची व्यवस्था नसल्याने या स्पर्धा एक दिवसात उरकाव्या लागतात. या वसतिगृहामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मुक्काम करता येऊन इतर खेळाडूंचा खेळ पहाण्याची संधी मिळणार आहे. या वसतिगृहात झोपण्यासाठी बेड, टेबल असे फर्निचर ठेवण्यात येणार असून, संपूर्ण खर्च ४ कोटी इतका असणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात या वसतिगृहाच्या कामाला सुरुवात होणार आहे. एक वर्षाच्या कालावधीत हे वसतिगृह विद्यार्थ्यांना खुले होणार आहे. देखभालीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली असून, त्याद्वारे काम चालणार आहे. या समितीचे उपाध्यक्ष क्रीडा उपसंचालक राहणार असून, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त हे या समितीचे सभासद असणार आहेत.

केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रात प्रथमच या उपक्रमाची सुरुवात नाशिकपासून होत आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची व खेळाडूंची व्यवस्था होणार आहे. हा प्रकल्प जास्तीत जास्त चांगला कसा होईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत.

- जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भररस्त्यात दुचाकी सोडून आकांडतांडव

0
0

म. टा. खास, प्रतिनिधी, नाशिक

'नो एंट्री'मध्ये घुसून मोबाइलवर बोलत जाणाऱ्या युवकास वळून जाण्याबाबत वाहतूक पोलिसांनी निर्देश दिल्यानंतर त्या युवकाने चक्क आपली दुचाकीच रस्त्यावर सोडून देत वाहतुकीला अडथळा निर्माण केला. वाहतूक पोलिसाने विनंती करूनही युवकाने दुचाकी बाजूला न केल्याने नेहरू गार्डन ते एमजीरोड अशी वाहनांची मोठी रांग लागली होती. शेवटी भद्रकाली पोलिस स्टेशनच्या गस्ती पथकाने ही दुचाकी उचलून वाहतूक शाखेत जमा केली, तर युवकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

फैजलअली असीफअली पिरजादे (रा. पिंजरघाट, जुने नाशिक) असे या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. नाशिक मर्चंट बँकेसाठी मतदान पार पडले. एक मतदान केंद्र सागरमल मोदी शाळेत होते. त्यामुळे पोलिसांनी आंबेडकर वसतिगृहासमोरच बॅरकेडिंग करून वाहतूक वळविली होती. संशयित आरोपी पिरजादे हा मर्चंट बँकेकडून विरूद्ध दिशेने सावनाकडे घुसत असताना तिथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्याने त्यास वळून जाण्यास सांगितले. याच परिसरात एका मोबाइल शॉपीमध्ये मोबाइल रिपेअरिंगचे काम करणाऱ्या पिरजादेने लागलीच आपली दुचाकी भररस्त्यात सोडून दुचाकीला लाथा मारल्या. वाहतूक पोलिसाने दुचाकी बाजूला घेण्याबाबत विनंती करूनही पिरजादेने त्याकडे दुर्लक्ष केले.

वाहनधारकांना मनस्ताप

भररस्त्यात दुचाकी पडलेली असल्याने एमजीरोडसह रविवारकारंजाकडून येणाऱ्या वाहनांची मोठी रांगच या रस्त्यावर लागली. वाहतूक पोलिसाने लागलीच ही माहिती भद्रकाली पोलिस स्टेशनला कळविली. गस्ती पथक थोड्याच वेळात तिथे पोहचले. त्यांनी पिरजादेची दुचाकी उचलून वाहतूक शाखेत जमा केली तर पिरजादेला घेऊन हे पथक भद्रकाली पोलिस स्टेशनला हजर झाले. तिथे पोलिस कॉन्स्टेबल रमेश गोसावी (वाहतूक शाखा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पिरजादे काम करतो ते मोबाइल शॉप याच भागात असून, दुचाकी चालवत असताना तो मोबाइलवर बोलत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारंगखेड्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत

0
0

विविध स्पर्धांना पर्यटकांचा प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व चेतक फेस्टिव्हल यांच्या वतीने सारंगखेड्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सलग महिनाभर चालणार असून यात सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी विशेष कार्यक्रम तसेच अश्व स्पर्धांमध्ये नृत्य, चाल, अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. त्याचबरोबर नौका विहाराचीदेखील सोय तापीनदीवरील धरणात केली आहे. यात्रेत मुलांना मोफत घोडे सवारी करता येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

सारंगखेड्यातील यात्रेत गेल्या दोन दिवसांपासून भाविक, पर्यटकांसाठी मोफत घोडस्वारीचे आयोजन चेतक ग्राऊंडवर करण्यात आले होते. याचा अनेक पर्यटकांनी लाभ घेतला. प्रथमच घोड्यावर बसण्याचा आनंद अश्व सफारी करणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. यात लहान मुला-मुलीनींही अश्व सफारीचा आनंद घेतला. या वेळी मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येत असून, विजेत्या स्पर्धकांना भेट वस्तूही देण्यात येत आहेत.

यंदा सारंगखेड्यात यात्रेकरूंसाठी पर्यटन विभाग, चेतक फेस्टिव्हल, एल. जे. एस. ने पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्याने याचा जास्त फायदा पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केले आहे.

सहा जानेवारीपर्यंत कार्यक्रम
सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यात महिलांसाठी पारंपरिक वेशभूषेचा कार्यक्रम महिला दालनात घेण्यात येणार असून, या स्पर्धेला महिलांना जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दररोज याठिकाणी कार्यक्रमांची धम्माल केली जात असून, मुलांसाठी जादुगार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी खेळाच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पुण्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने २८ ते ३० डिसेंबरदरम्यान मातीवरील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा फ्री स्टाइल प्रकारात ५७, ६५, ७४, ८६, ९७ व १२५ किलो वजनी गटात होणार आहे. नुकताच 'महाराष्ट्र केसरी' झालेला बालारफी शेख आणि उपविजेता अभिजित कटकेही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

सोमाटणे फाटा येथे या स्पर्धेसाठी ५० फूट रुंद आणि १०० फूट लांब असे दोन मातीचे आखाडे तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेत ३२ राज्यातील मल्ल सहभागी होणार आहेत. सेनादल, रेल्वे, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांचे प्रत्येकी दोन संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्याचा सहा मल्लांचा संघ असेल. सत्यव्रत कोटियन, परवीन राणा, राहुल आवारे, उत्कर्ष काळे असे नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे भारतीय कुस्ती महासंघाचे सहयोगी उपाध्यक्ष विजय बराटे यांनी सांगितले. विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा मॅटवर होत असताना मातीवरील कुस्ती स्पर्धा घेण्याचे प्रयोजन काय, याबाबत विजय बराटे म्हणाले, 'भारतीय कुस्तीतील गुणवत्ता शोधण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय स्पर्धा मातीवर होत आहे. त्याचबरोबर पारंपरिक कुस्ती प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने हा निर्णय घेतला आहे. यातून विजयी मल्लांना राष्ट्रीय शिबिरात सहभागी करून घेतले जाणार आहे. हे शिबिर मॅटवर होईल. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या आशियाई आणि जागतिक स्पर्धेसाठी मल्लांना तयार करता येईल.' या वेळी काका पवार, हिंद केसरी अमोल बराटे, अमोल बुचडे उपस्थित होते.

'हिंद केसरी' हे नाव काढून टाकणार

संयोजकांनी या स्पर्धेच्या नावात 'हिंद केसरी' शब्द जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण कोर्टात असून, कोर्टाने 'हिंद केसरी' नाव न वापरता स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे. तरीही संयोजकांनी या स्पर्धेला 'हिंद केसरी' हे नाव जोडण्याचा आग्रह धरला होता. त्यावर अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, की न्यायालयाचा अवमान होईल, असे आम्ही काहीही करणार नाहीत. या स्पर्धेच्या नावातून 'हिंद केसरी' हा शब्द काढला जाईल. कोर्टाच्या निकालानंतर भविष्यात आता वर्षभरात अधिकृत एकच 'हिंद केसरी' स्पर्धा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणी अचूक करा

0
0

अश्विनी कुमार यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

दिव्यांग, चिन्हांकित मतदार त्याचप्रमाणे शंभर व त्यापेक्षा जास्त वयाच्या मतदारांची कटाक्षाने तपासणी करून अचूक मतदार नोंदणी करावी, अशी सूचना प्रधान सचिव व मुख्‍य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी आज नाशिकरोड येथे दिली. मतदार यादी जास्तीत जास्त अचूक व्हावी यासाठी त्यांनी विभागातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या मतदार यादी तसेच इव्हीएम व व्हिव्हिपॅटबाबत जनजागृती आढावा बैठक नाशिकरोड विभागीय कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., राहुल द्विवेदी, राहुल रेखावार, किशोरराजे निंबाळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त तथा विभागीय समन्वयक रघुनाथ गावडे आणि पाचही जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते. विभागातील पाच जिल्ह्यांच्या मतदारयादी बाबतचे कामकाज अतिशय चांगले असल्याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी समाधान व्यक्त केले.

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे वेळोवेळी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेवून त्यांना मार्गदर्शन केले.

विभागातील सर्व जिल्ह्यात मतदान यंत्र (इव्हीएम) व मतदान दर्शक नोंदणी यंत्र (व्हिव्हिपॅट) यांची प्रात्याक्षिके दाखविण्याबाबत सुरू असलेल्या कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. सर्व मतदारांमध्ये या यंत्राविषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून मतदारांना ही यंत्रे

हाताळण्याची संधी दिली जात असून, त्याचा लाभ सर्व जागरुक मतदारांनी घ्यावा, असे आवाहन अश्विनी कुमार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ लाखांची फसवणूक

0
0

तिघा बहीण-भावंडांना गंडविले

नोकरीचे आमिष दाखवत ८ लाखांची फसवणूक

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पंचवटीतील तीन जणांना महापालिका कर्मचाऱ्याने ८ लाख रुपयांना गंडविले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, संशयित सचिन जिभाऊ सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे.

पंचवटीतील पेठरोड येथील प्रमिला नामदेव बागूल, तिची बहीण सारिका नामदेव बागूल आणि त्यांचा चुलत भाऊ अमित गंगाधर बागूल या तिघांना सचिन जिभाऊ सूर्यवंशी (रा. अमोल भवन, प्लॉट नं. ४८, ठक्कर हाऊसजवळ, दत्तनगर, पंचवटी) याने महापालिकेत नोकरभरती सुरू आहे. माझ्या ओळखीने तुम्हा बहीण-भावाला नोकरीला लावून देतो. या नोकरीसाठी ८ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. सारिका हिने आयडीबीआय बँकेचा ५० हजार रुपयांचा चेक दिला. त्यानंतर तिघा-बहीण भावांनी मिळून सूर्यवंशी यास ७ लाख रुपये रोख त्याच्या राहत्या घरी दिले. ५० हजार रुपये ऑनलाइनव्दारे देण्यात आले. त्यानंतर त्याला नोकरीविषयी विचारले असता त्याने बागूल यांच्या घरी येऊन महापालिकेच्या इलेक्ट्रिशियन पदाचे, बहीण सारिका हिस कनिष्ठ लिपीक पदाचे आणि चुलत भाऊ अमित शिपाई पदाचे नियुक्ती पत्र दिले. सूर्यवंशी याने दिलेले नियुक्तपत्रही बनावट असल्याचे त्यांची खात्री झाली.वारंवार पैशाची मागणी करून ते दिले नाही, या प्रकरणी प्रमिला बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सूर्यवंशी यास अटक करण्यात आली आहे.

आधी चोरी, मग शिरजोरी!

नियुक्त पत्र मिळाल्यावर तिघेही भांवडे महापालिकेत गेली असता, सचिन सूर्यवंशी हा त्यांना महापालिकेच्या गेटवर भेटला. अजून दुसऱ्या पदासाठी नोकरभरती चालू आहे. मी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही, तोपर्यंत तुम्ही सदर कार्यालयात येऊ नका. महापालिकेत तांत्रिक अडचणी असल्यामुळे आणखी दोन महिने थांबावे लागेल, असे तो सांगत होता. त्यामुळे बागूल यांना शंका आल्याने त्यांनी पैसे परत देण्याची विनंती केली. त्यावर सूर्यवंशी याने शिवीगाळ केली. तसेच, "मी तुम्हाला दिलेले नियुक्तपत्र बनावट असून, तुम्ही दिलेले पैसे तुम्हाला मिळ णार नाही. तसेच तुम्हाला काय करायचे ते करून घ्या," असे सांगून त्याने तिघांना घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर बागूल यांनी राजीव गांधी भवन येथे कार्यालयात जाऊन चौकशी केली असता कोणतीही नोकरभरती झाली नसल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणी अचूक करा

0
0

अश्विनी कुमार यांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

दिव्यांग, चिन्हांकित मतदार त्याचप्रमाणे शंभर व त्यापेक्षा जास्त वयाच्या मतदारांची कटाक्षाने तपासणी करून अचूक मतदार नोंदणी करावी, अशी सूचना प्रधान सचिव व मुख्‍य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी आज नाशिकरोड येथे दिली. मतदार यादी जास्तीत जास्त अचूक व्हावी यासाठी त्यांनी विभागातील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या मतदार यादी तसेच इव्हीएम व व्हिव्हिपॅटबाबत जनजागृती आढावा बैठक नाशिकरोड विभागीय कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., राहुल द्विवेदी, राहुल रेखावार, किशोरराजे निंबाळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त तथा विभागीय समन्वयक रघुनाथ गावडे आणि पाचही जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते. विभागातील पाच जिल्ह्यांच्या मतदारयादी बाबतचे कामकाज अतिशय चांगले असल्याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी समाधान व्यक्त केले.

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे वेळोवेळी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेवून त्यांना मार्गदर्शन केले.

विभागातील सर्व जिल्ह्यात मतदान यंत्र (इव्हीएम) व मतदान दर्शक नोंदणी यंत्र (व्हिव्हिपॅट) यांची प्रात्याक्षिके दाखविण्याबाबत सुरू असलेल्या कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घेतला. सर्व मतदारांमध्ये या यंत्राविषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून मतदारांना ही यंत्रे

हाताळण्याची संधी दिली जात असून, त्याचा लाभ सर्व जागरुक मतदारांनी घ्यावा, असे आवाहन अश्विनी कुमार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावानात शुक्रवारपासूनरंगणार नाशिक ग्रंथोत्सव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नाशिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्यातर्फे सावानात नाशिक ग्रंथोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे.

२७ व २८ डिसेंबर रोजी मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय, नाशिक, टिळकपथ येथे हे ग्रंथप्रदर्शन होणार आहे. गुरूवार २७ रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडीचा शुभारंभ होणार असून, १० वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

२७ रोजी दुपारी ३ वाजता 'कुटुंब रंगलंय काव्यात' हा कार्यक्रम होणार आहे. सादरकर्ते विसूभाऊ बापट तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उगले करणार आहेत. शुक्रवार, २८ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ११.३० वाजता महात्मा गांधी यांचे जीवन व कार्य या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. तर ३ वाजता व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर व अपर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड हे व्याख्यान देणार आहेत.

सायंकाळी ४.३० वाजता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी व मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या उपस्थितीत ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांना हक्काची जाणीव करून द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या हिताचा असला तरी आपल्या या हक्कांची नागरिकांना जाणीव नाही. यामुळेच ग्राहक संरक्षण कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा,' अशी अपेक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी सोमवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, सुरगाणा तहसीलदार दादा गिते, ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य सचिन शिंपी, विलास देवळे आदी उपस्थित होते.

सोनवणे म्हणाले, 'ब्रिटीशांच्या कायद्यात ग्राहकांना तक्रार करण्याचा अधिकार नव्हता. परंतु १९८६ च्या कायद्याने ग्राहकांना तो हक्क मिळवुन दिला. सर्व ग्राहकांनी या कायद्याबाबत जागृक होऊन तक्रारींसाठी पुढे यायला हवे. ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना किंवा सेवा घेताना त्याबाबतची माहिती करून घ्यावी.'

ग्राहक तक्रार मंच, ग्राहक संघटनामुळे समाजात जागृती निर्माण होत असून, दुर्गम भागातही यांचा प्रचार व्हायला हवा. तरच ग्राहक तक्रार केंद्र संवेदनक्षम होतील, असे मत देवळे यांनी यावेळी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्वाकांक्षेची परिसिमा असलेले ‘अश्वेमध’

0
0

महत्त्वाकांक्षेची परिसीमा असलेले 'अश्वेमध'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महत्त्वाकांक्षा ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु, अतिमहत्त्वाकांक्षा मात्र वाईटच हे निषाद राज्याची महाराणी नीलाक्षी हिच्या वर्तनातून सिध्द करणारी कथा नाटकातून मांडण्यात आली.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत सोमवारी ललित कलाभवन सिडको वसाहतच्या वतीने, डॉ. सोनाली कुलकर्णी लिखित 'अश्वमेध' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या स्पर्धा सुरू आहेत.

अश्वमेध हे एक काल्पनिक ऐतिहासिक नाटक असून, निषाद राज्याची महाराणी नीलाक्षी अत्यंत महत्त्वाकांक्षी असते. निपुत्रिक असल्यामुळे राजा तिच्यावर नाराज असतो आणि दुसरा विवाह करण्याचा विचार करीत असतो. नीलाक्षी आपल्या बालपणीची मैत्रीण, अवस्थीपूर साम्राज्याची महाराणी रत्नप्रभाला भेटायला जाते. तेथील वैद्य तिला तपासून तिचा गर्भ अपत्य प्राप्तीसाठी योग्य असल्याचे सांगतात. त्यानंतर ती अधिकच महत्त्वाकांक्षी बनते. अश्वसहाय्यक अश्विनचा वापर करून ती मातृत्व प्राप्त करून घेते आणि त्याच्याचकडून महाराज कृतसेन यांचा विष देऊन खून करते. खुनाच्या आरोपाखाली अश्विनचाही बळी देते आणि निषाद साम्राज्याची महापराक्रमी साम्राज्ञी बनण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करते. अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे निर्मितीप्रमुख अजय निकम होते. दिग्दर्शन अरुण भावसार यांचे होते. प्रकाशयोजना विनोद राठोड, नेपथ्य अविनाश देशपांडे, संगीत अमोल काबरा, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. रंगमंच व्यवस्था पुनम पाटील, रामेश्वर धापसे, कार्तिकेय पाटील, रूपेश अहिरराव, प्रतिक गुंजाळ, सई कुलकर्णी, श्रुती कापसे यांची होती. नाटकात डॉ. सोनाली कुलकर्णी, आदित्य भोंबे, श्रुती कापसे, हरिकृष्ण डिडवाणी, राहुल काकड, मधुरा सोनवणे, सचिन दलाल, हरिश परदेशी, राजेश टाकेकर यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

भेगाळलेली नाती

कामगार कल्याण केंद्र, सिन्नर

स्थळ: प.सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचनात फायलींचे ढीग

0
0

अकराशे प्रकरणे प्रलंबित; विभागात लवकरच फेरबदल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कामकाजाला अजूनही शिस्त लागत नसल्याचे चित्र असून, विभागात तब्बल १,१२६ फायली प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे मनपाच्या एनएमसी ई कनेक्ट अॅपवरील तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या विभागात मोठे फेरबदल करण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगररचना विभागाच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी या विभागात मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. नगररचनामधील १५ हून अधिक अभियंते, उपअभियंत्यांना बांधकाम, पाणी पुरवठा व अन्य विभागाकडे वर्ग करण्यात आले, तर अन्य विभागांतील अभियंत्यांना नगररचना विभागात आणले होते. कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांना हटवून त्यांच्या जागी उदय धर्माधिकारी यांना बसवण्यात आले होते. तसेच, पूर्वीच्या शिवारानुसार बांधकामांचे प्रस्ताव मंजूर करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी नगररचना नियोजनकार एक व दोन अशी पदनिर्मितीही करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना साईट व्हिजिट करून प्रकरणे मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे नगररचना विभागात शासनाकडून नियुक्ती होणारे नगररचना सहसंचालक, कार्यकारी अभियंता व नगररचना एक व दोन साठी प्रत्येकी एक उपअभियंता अशा चार अभियंत्यांमार्फत कामकाज सुरू झाले होते. नगररचना विभागात जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त तक्रारी आणि फायली प्रलंबित राहिल्याने त्यांना गती देण्याचे आदेश देण्यात आले होते. सोबत एनएमसी ई-कनेक्‍टवर प्राप्त तक्रारींचा प्रथम निपटारा करणे बंधनकारक होते. परंतु, विभागातील अधिकाऱ्यांना या फायलींसह तक्रारी सोडविण्यात अद्यापही अपयश आले आहे. या विभागात आजमितीस जवळपास १,१२६ फायली आणि तक्रारी प्रलंबित आहेत. त्यातच गेले अनेक दिवसांपासून सहसंचालक आणि कार्यकारी अभियंता सुटीवर गेल्याने विभागाचा कारभार रामभरोसे सुरू आहे.

रखडल्या २३८ ऑनलाइन तक्रारी

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या एनएमसी ई-कनेक्‍ट या अॅप्लिकेशनवर प्राप्त तक्रारींचा निपटारा सात दिवसांत करणे बंधनकारक आहे. परंतु,मुंढे यांच्या काळातील २३८ तक्रारी अद्यापही या विभागाने प्रलंबित ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे यातील निम्म्या तक्रारींकडे तर विभागाने अद्याप बघितलेही नाही. त्यामुळे या विभागातील कामकाज गतिमान करण्यासाठी मोठे फेरबदल करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

मटा भूमिका

शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नगररचना विभागात महिनोंमहिने फायलींचा निपटारा होत नाही, ही शोकांतिका आहे. बांधकाम क्षेत्रावरील मंदीची मरगळ अद्याप झटकली गेलेली नाही. त्यातच दाखल प्रकरणांचाही जलद निपटारा होत नसल्याने बांधकाम व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्यांनाही फटका बसतो आहे. लाल फितीकडून ऑटो डीसीआर प्रणालीतील त्रुटींसारखी कारणे पुढे केली जात असली तरी खोलात जाऊन इतरही कारणांचा शोध घेण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. या विभागातील अधिकारी-कर्मचारी सामान्यांना दादच देत नसल्याने 'दाल में कुछ काला हैं' असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा गाईड : असा मिळवा मराठा जात दाखला

0
0

लोगो : मटा गाईड

असा मिळवा मराठा जात दाखला

मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता मराठा जातीचे दाखले वितरीत करण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज प्राप्त होत असले तरी हे प्रमाण खूपच कमी आहे. सेतू तसेच आपले सरकार या वेबसाइटवरून हे दाखले कसे मिळवावेत याबाबतची ही माहिती...

आपले सरकार केंद्रांना सूचना

मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्याने या समाज बांधवांना जातीचे दाखले वितरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारकडून सूचना प्राप्त होताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासन विभागाने सेतू कार्यालये, आपले सरकार केंद्रांपर्यंत सूचना निर्गमित केल्या आहेत. मराठा जातीचा दाखला मिळावा यासाठी विहीत अर्ज स्वीकारावेत व त्यावर तातडीने कार्यवाही सुरू करावी, असे आदेश उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

दाखला कोणाला मिळू शकतो

मराठा समाजाची कोणतीही व्यक्ती हा दाखला काढू शकते. परंतु त्यासाठी एक निकष पाळणे आवश्यक आहे. १९६७ पूर्वीच्या कुटुंबातील कोणाच्याही शाळा सोडल्याच्या दाखल्यावर, जन्म दाखल्यावर किंवा महसूलच्या दाखल्यांवर मराठा असा जातीचा उल्लेख असायला हवा. असा उल्लेख असलेले कागदपत्र अर्जदार सादर करू शकला नाही तर त्याला जातीचा दाखला मिळू शकत नाही.

दाखला कसा मिळवावा

अन्य दाखल्यांप्रमाणेच हा दाखलाही नागरिक सेतू कार्यालयातून मिळवू शकतात. मात्र आमले सरकार या सरकारी पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या दाखला मिळवू शकतात. त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून आपले सरकार पोर्टलवर स्वत:चे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पोर्टलमध्ये सेवा हक्क कायदा हा पर्याय देण्यात आला असून, त्यावर क्लीक केल्यानंतर महसूल विभागाचा पर्याय उपलब्ध होतो. त्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र हा पर्याय देण्यात आला आहे. तेथे आवश्यक कागदपत्रांची यादी पहावयास मिळते. आपलाकडे आधार क्रमांक असेल तर ही प्रक्रिया अधिक सोपी होते. अर्ज भरताना आपले वय १८ च्या पुढे असेल तर आपण स्वत: अर्जदार अहात अशा पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर कागदपत्रे जोडावीत. हा अर्ज ऑनलाइन सादर करताना आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी सोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाइन पेमेंटची सुविधाही पोर्टलवर आहे. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करून प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयीन २१ दिवसांच्या आत हे प्रमाणपत्र अर्जदारास मिळू शकते. याशिवाय जवळील आपले सरकार केंद्र, सेतू कार्यालयातूनही याच पध्दतीने दाखला मिळू शकतो. त्यासाठी ३३ रुपये शुल्क आकारण्यात येते. त्यानंतर

डिजीटल स्वाक्षरी आणि बारकोड असलेला हा दाखला ऑनलाइन मिळू शकतो. त्याची प्रिंट कोठेही उपलब्ध होऊ शकते.

कोठूनही अर्ज करू शकता

अर्जदाराचे गाव राज्यात कोठही असले तरी तो ऑनलाइन पध्दतीने कोठूनही अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याला आपले सरकार पोर्टलवर संबंधित जिल्ह्यातील तहसील कार्यालय निवडणे आवश्यक आहे. परंतू सेतू कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज करावयाचा असेल तर त्या ठिकाणी जाऊनच त्यास अर्ज करावा लागेल.

अर्जांचा फ्लो कसा आहे

२०१४ मध्ये तत्कालिन सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले तेव्हाच जिल्ह्यातील अनेक मराठा बांधवांनी मराठा जातीची प्रमाणपत्रे काढून घेतली आहेत. ती ग्राह्य धरण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. परंतु नंतर त्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजाला जातीचे दाखले वाटप बंद करण्यात आले. परंतु आता पुन्हा हे वाटप सुरू करण्यात आले असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त होत आहेत. परंतू त्याचे प्रमाण सध्या खूपच कमी आहे.

८३ ठिकाणी केंद्र

शहरात ८३ ठिकाणी आपले सरकार केंद्र असून तेथे दाखला काढता येऊ शकतो. नाशिक वगळता अन्य १४ तालुक्यांमध्ये सेतू कार्यालये सुरू आहेत. तेथे किंवा जिल्ह्यातील ७८२ ग्रामपंचायतींमध्ये देखील दाखले काढण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images