Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शहरात सर्रास वृक्षांची कत्तल

0
0
महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील अनेक झाडांवर दिवसाढवळ्या कु-हाड चालवली जात आहे. सातपूर, त्र्यंबकरोड, पांडवलेणी, तपोवनरोड आदी भागांतील वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.

हिरे यांनी आत्मपरीक्षण करावे

0
0
आर्थिक बळावर जिल्हा बँक ताब्यात ठेवणा-यांनी पालकमंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे, असे थेट प्रत्युत्तर आमदार जयंत जाधव यांनी शनिवारी दिले. वडिलोपार्जित शिक्षणसंस्थांच्या नावाखाली स्वविकास साधणा-यांनी तोंडाची वाफ वाया घालवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

पायाभूत सुविधांसाठी आंदोलन

0
0
शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील असुविधा व पायाभूत सुविधांची पूर्तता करावी, या मागणीसाठी 'जनहक्क संघटन'ने मुंबईतील परिवहन आयुक्तालयासमोर १३ फेब्रुवारीला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

भांडवलदारांकडून कामगारांचे शोषण

0
0
स्वातंत्र्यपूर्वकाळात ज्यांनी दलितांवर अन्याय केला तीच मंडळी पुन्हा पुढे येऊ लागली आहे. कामगारांचे शोषण भांडवलदारांनी केले आहे. जातीयवादी संघटनांपासून दूर राहण्याची वेळ आली असून अशा संघटनांना वेळीच जागा दाखविली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी केले.

रिमोल्ड टायरवर बंदीची मागणी

0
0
अतिवेगामुळे रस्ते व टायरमध्ये निर्माण होणा-या उष्णतेमुळे टायर फुटून अपघात होतात व त्यात रिमोल्ड टायर्स फुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने रिमोल्ड टायर वापरण्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना तातडीने बंदी घालावी, अशी मागणी जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

१६८ वाहनांवर पोलिसांची कारवाई

0
0
शहरात झालेल्या चेन स्नॅचिंग, लुटमार तसेच चोरीला जाणा-या वाहनांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी हाती घेतलेल्या वाहन कागदपत्रांच्या तपासणी मोहिमेत पहिल्याच दिवशी १६८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी दुपारी सुरू झालेली कारवाई शनिवारी देखील सुरू ठेवण्यात आली.

पाणीकपातीवरून मनसेचे राजकारण

0
0
'भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेत सिडकोतील पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना पाणीकपात करण्याचा निर्णय आम्ही घेतला. केवळ श्रेय मिळावे म्हणून मनसेतर्फे या मुद्द्यावरून राजकारण केले जात आहे,' असा आरोप करून सिडको प्रभाग समिती अध्यक्ष कल्पना पांडे यांनी मनसेवर जोरदार हल्ला चढवला.

महिंद्राच्या कामगारांचा संपाचा इशारा

0
0
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास संपावर जाण्याचा इशारा महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉइज युनियनने घेतला आहे. युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा पंचवटीतील लक्ष्मी लॉन्समध्ये झाली.

फिरत्या प्रयोगशाळेने दिले विज्ञानाचे धडे

0
0
गोखले एज्युकेशन सोसायटीचे एचपीटी आर्टस्, आरवायके सायन्स कॉलेजचा ज्युनिअर विभाग आणि सर डॉ. एम. एस. जी फाऊंडेशन यांच्यामार्फत राबविल्या गेलेल्या फिरत्या प्रयोगशाळेने आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे दिले.

सावरकर संमेलन यंदा नाशिकला

0
0
रौप्यमहोत्सवी सावरकर साहित्य संमेलन यंदा नाशिकला होणार असून त्याचे यजमानपद ऊर्जा युवा प्रतिष्ठानकडे देण्यात आले आहे. अडीच दिवस चालणारे हे संमेलन पुढील महिन्यात होणार आहे.

सूर्यपुत्र शनिदेव

0
0
रविवार पेठेतील शनिगल्लीतील शनि मंदिराचा आता कायापालट झाला आहे. मंदिरात पूर्वी फक्त शनीची मूर्ती होती, आता नवग्रहांचीदेखील स्थापना करण्यात आली आहे.

चुकलेला 'रि-प्ले'

0
0
कुणी कोणत्या मागणीसाठी केव्हा आणि कुठल्या विभागात आंदोलन करेल हे सांगणं अवघडच! आंदोलनातही व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. कुणी खरोखरच तळमळीने, तर कुणी स्टंट म्हणूनही रस्त्यावर उतरलेला असतो.

पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार

0
0
कळवण तालुक्यातील प्रलंबित लघुपाटबंधारे योजनांबरोबर सटाणा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तसेच राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार ए. टी. पवार यांनी दिली.

आयएसपी सीएनपीचे कामगार देशात अव्वल

0
0
नाशिक येथील आयएसपी सीएनपीच्या कामगारांनी आपल्या उत्पादकतेच्या जोरावर देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. नाशिक व देवास येथील बँक नोट प्रोसेसिंग लाइनचा ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री नमो नारायण मीना यांनी रविवारी केले.

वसाकमधील भ्रष्टाचाराची चौकशी करा

0
0
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी केली आहे. याबाबत पगार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदनही दिले आहे.

लॅपरॉस्कॉपीमुळे ऑपरेशन्स सुलभ

0
0
'लॅपरॉस्कोपीचे आधुनिक तंत्रज्ञान हे डॉक्टरांबरोबरच पेशंट्सना मिळालेले वरदान आहे. यामुळे ऑपरेशन्सची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे', असा सूर 'मॅसिकॉन २०१३'मध्ये उमटला.

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनीदिली 'गेट'

0
0
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि देशातील सात आयआयटी यांच्यामार्फत पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी गेट (ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) परीक्षा नाशिकमधून सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी दिली. या परीक्षेच्या नियोजनासाठी शहरातील आठही केंद्रांवर आयआयटीची टीम पोहचली होती.

अन्यायग्रस्त ग्रामस्थांना सुखद धक्का

0
0
मुक्त विद्यापीठाच्या निर्मितीसोबतच गंगापूर गावातील १५ ग्रामस्थांची सुमारे दीडशे एकर जमीन सरकारने अधिग्रहीत केली होती. या बदल्यात प्रत्येक कुटुंबातील एकाला अशा सुमारे १५ ग्रामस्थांना विद्यापीठात नोकरी देण्याचे आश्वासन त्यावेळी सरकारने अन् विद्यापीठाने दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते.

'डीपीसी'ची आज निवडणूक

0
0
नाशिक जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निवडणुकीच्या १४ जागांसाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात २८ उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने, रविवारी उशिरापर्यंत माघारीसाठी प्रयत्न सुरू होते. डीपीसीच्या ४० पैकी २६ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी स्वतःला कोंडले

0
0
मुलभूत सुविधांची वानवा आणि वारंवार तक्रार करूनही समाज कल्याण विभागाकडून होणा-या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील २०० विद्यार्थ्यांनी रविवारी स्वतःला कोंडून घेतले होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images