Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गोठले

$
0
0

काश्मीर गोठलेलेच

काश्मीरमधील शीतलहर अधिक तीव्र झाली असून, राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान उणे अंश सेल्सिअस होते. पाण्याचे साठे गोठण्याबरोबरच निवासी भागांत पाणीपुरवठ्यावरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. लेह शहरात उणे १७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंगापूररोडवर अतिक्रमण हटाव

$
0
0

गंगापूररोडवर अतिक्रमण हटाव

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

'ना फेरीवाला क्षेत्र' असताना त्याठिकाणी टपरीधारक व फळे विक्रेत्यांनी दुकाने थाटलेल्या हॉकर्सविरोधात महापालिकेच्या सातपूर विभागाच्या वतीने गंगापूर रोडवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.

आनंदवली गावापासून ते जेहान सर्कलपर्यंत 'ना फेरीवाला झोन' जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, तरीही या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच फळ विक्रेत्यांचे वजनकाटे जप्त करण्यात आले. यावेळी रस्त्यालगत असलेल्या मटण, चिकन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. महापालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या फेरीवाला क्षेत्रातच आपला व्यवसाय करावा, अशा सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्या. विक्रेत्यांचे जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले. मोहिमेत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्तही होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा २० पैसे किलो; बळीराजाची थट्टा!

$
0
0

वैजापूर : एकीकडे अस्मानी संकटाने शेतकरी देशोधडीस लागला असताना बाजार समितीतल्या सुल्तानी संकटाने त्याच्या गळ्याचा फास पुन्हा करकचून आवळा आहे. त्याचा प्रत्यय बुधवारी बाजार समितीत आला. येथे चक्क २० पैसे किलोने कांदा खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी लिलाव बंद पाडले. सध्या बाजार समितीच्या नागपूर - मुंबई महामार्गावरील कांदा मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक होत आहे. लाल कांद्याला उन्हाळी कांद्याच्या तुलनेत चांगले म्हणजे क्विंटलमागे साधारणत: ५०० रुपये ते १००० रुपये भाव मिळत आहे. उन्हाळी कांद्याला हाच दर क्विंटलमागे २०० रुपये ते ५०० रुपये आहे. साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने सध्या बाजारात उन्हाळ या कांद्याची मोठी आवक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईला मारणाऱ्या मुलास जन्मठेप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईचा हत्या करणाऱ्या नराधमास जिल्हा कोर्टाने बुधवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा खटला जिल्हा न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या कोर्टात सुरू होता.

अशोक लक्ष्मण वटाणे (२७, रा. टिटवे, ता. दिंडोरी) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वणी पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथील बेघर वस्तीत नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती. या ठिकाणी शांताबाई लक्ष्मण वाटाणे या आरोपी मुलगा अशोक आणि सुनासह राहत होत्या. अशोकला दारू पिण्याचे व्यसन होते. कामधंदा न करता सतत आईकडून पैसे मागणाऱ्या अशोकला याचमुळे पत्नीही सोडून गेली होती. अशोकने १५ एप्रिल २०१५ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आईकडे दारुसाठी पैसे मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या अशोकने घरातील चूल फुंकण्यासाठी वापरली जाणारी फुंकणी व लाकडी ठोकळ्याने शांताबाईच्या डोक्यावर प्रहार करून केला. यात वर्मी घाव बसलेल्या शांताबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. या प्रकरणी काशिनाथ नथू पवार (रा. टिटवे, ता. दिंडोरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली. या खुनाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक एम़. डी. खोडवे यांनी केला. सरकारपक्षातर्फे अॅड. विद्या जाधव यांनी सात साक्षीदार तपासून पोलिसांनी जमा केलेले परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. या आधारे कोर्टाने अशोकला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुलवाडे-जामफळ’साठी ४४ कोटी निधी

$
0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यात माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना ही शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि. २६) धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्यावेळी बोलत होते. दुष्काळाचे मोठे संकटदेखील जिल्ह्यावर असून, प्रशासकीय स्तरावर पाण्याच्या उपाययोजनांसाठी निरनिराळे उपक्रम राबविण्यासाठी सर्वोपतरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धुळे जिल्ह्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती असल्याने शासनाने गंभीर दुष्काळग्रस्त भागात विविध सवलती लागू केल्या आहेत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये ४४ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा वापर सर्व नागरिकांनी जपून करावा. जिल्ह्यात दुष्काळावर मात करण्यासाठी ४.२९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, यामध्ये दहा गावांसाठी टँकरने पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच ५२ गावांसाठी ६० विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शहाराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी अक्कलपाडा धरणातून नवीन १४२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेला लवकरच मान्यता देवून ते काम लवकरच पूर्ण करण्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दोंडाईचात नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचा शुभारंभदेखील बुधवारी (दि. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोंडाईचा नगरपरिषदची सुसज्ज नवीन इमारतमुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यासाठी नागरिकांचे कोणतेही काम अपूर्ण राहणार याची काळजी घेवून चांगली सेवा कशी देता येईल हा प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाने निधी उपलब्ध करुण दिला आहे. मात्र नागरिकांनी स्वच्छ शहर सुंदर शहरासाठी प्रयत्न करावेत. तसेच दुष्काळ भागातील सर्व नागरिकांसाठी गहू आणि तांदूळ देण्यात येणार आहेत. शासनाने ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील गंभीर दुष्काळी तालुके घोषित केले आहेत. दुष्काळावर मात करून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या वेळी नगराध्यक्षा लोकनियुक्त नयनकुंवर रावल, उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, बबन चौधरी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण, पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि दोंडाईचा शहरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

अशी आहे इमारत!
या नवीन इमारतीचे एकूण चार प्रशस्त मजले असून, ३१ हजार ६३२ चौरस फूट बांधकाम झाले आहे. या नूतन प्रशासकीय इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्ष दालन, उपाध्यक्ष दालन, भव्य सभागृह, समिती सभागृह, सभापती दालन वातानुकूलित व प्रशस्त स्वरूपाची आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व प्रशस्त दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीत नागरी सुविधा केंद्र असून जन्म नोंद, विवाह नोंद, ना-हरकत तसेच इतर दाखले याठिकाणी मिळणार आहेत. सभागृहामध्ये सभेच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र व आधुनिक साऊंड सिस्टिमची व्यवस्था असून, संपूर्ण इमारतीत आधुनिक फर्निचर करण्यात आले आहे. स्वच्छता गृह, स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा व सुरक्षेसाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेरा व सभागृहमध्ये प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चेतक’चे उत्तम ब्रॅडिंग

$
0
0

सारंगखेडा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि सर्वात मोठे आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक महोत्सवांतर्गत बुधवारी (दि. २६) आयोजित अश्वस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री तथा नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, दोंडाईचा नगराध्यक्षा नयनकुवर रावल, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चेतक महोत्सव घोड्यांचा ऐतिहासिक सोहळा आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत. चांगल्या प्रसिद्धीमुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने जागतिक झाला आहे. एक कोटी किंमतीपेक्षा अधिक किंमतीचे घोडे महोत्सवात येत आहेत. येथील एकमुखी दत्ताच्या आशीर्वादाने महोत्सवाचा अधिक विस्तार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य असून, शुभेच्छा देण्यासाठी ते सारंगखेडा येथे आले असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच अकोला येथून महोत्सवासाठी घोडेस्वारी करीत आलेल्या अकरावर्षीय राजवीरसिंह नागरा या बालकाचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अश्वस्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी अश्व खेळ आणि अश्वनृत्याची पाहणी केली. यातील साहसी खेळ प्रकाराबाबत कौतुकोद्गार काढले. तसेच बचतगट प्रदर्शनाची पाहणी देखील केली.

टेन्ट सिटीची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तापी नदीच्या तिरावर पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या टेन्ट सिटीची पाहणी केली. या राहुट्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेले रेस्टॉरंट, स्पा, एसी आणि नॉन एसी टेंट, दोन दरबारी टेंट, कॅरम, चेस आणि बिलीअर्डस यांसारख्या खेळांचीदेखील सुविधा करण्यात आली आहे. दरबारी टेन्टमधील सुविधा लक्षात घेता यामुळे याठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटक चेतक महोत्सवाकडे आकर्षित होतील, असेही मुख्यंमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून धर्मा पाटलांची पत्नी, मुलगा ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा । धुळे

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राषण करून आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचे हाल अजूनही सुरूच आहेत. धर्मा पाटील यांची पत्नी सखुबाई व मुलगा नरेंद्र पाटील यांना दोंडाईचा पोलिसांनी बुधवारी कोणत्याही कारणाशिवाय ताब्यात घेऊन डांबून अर्धा दिवस डांबून ठेवलं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करू नये म्हणून या मायलेकांना ताब्यात घेण्यात आल्याचं समोर आल्यानं संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी व सरकारनं याचा खुलासा करावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

'चेतक फेस्टिव्हल'च्या निमित्तानं मुख्यमंत्री बुधवारी धुळे-नंदुरबारच्या दौऱ्यावर होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बुधवारी सखुबाई व नरेंद्र पाटील यांना सकाळी सात वाजता विखरण येथून पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोरे आणि त्याचे सहकारी यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारपर्यंत त्यांना पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले. त्यामुळं या दोघांनाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी राहावे लागले.

खरंतर आपण कुठल्याही प्रकारचं अनुचित कृत्य करणार नाही, अशी लेखी हमी नरेंद्र पाटील यांनी पोलिसांना दिली होती. तरीदेखील त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळं त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्याला कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतले याचा खुलासा पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला आहे. सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती यातून दिसून येते, अशी टीका त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनीही पोलिसांच्या या कृतीचा निषेध करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ‘मंत्रालयात आत्महत्या केलेला शेतकरी धर्मा पाटील याची पत्नी आणि मुलाला डांबून ठेवण्याचा प्रकार संतापजनक आहे. धर्मा पाटीलला हे सरकार न्याय देऊ शकले नाही. तो शेतकरी होता म्हणून त्याच्या कुटुंबीयांनाच गुन्हेगार ठरवून धोकादायक गृहीत धरणे घातक आहे. करून करून काय केलं असतं त्यांनी? सत्तेत बसलेली माणसे भयभीत आहेत. ते स्वत:च्या सावल्यांनाही घाबरत असल्याचं दिसतं,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड तालुका गारठला;१.८ अंश तापमानाची नोंद

$
0
0

नाशिकः

बुधवारी ११ अंश सेल्सिअस इतकी तापमान नोंद झालेल्या निफाड येथील गहू संशोधन केंद्रात तापमानाचा पारा अवघ्या १२ तासात १० अंशांनी उतरल्याने निफाड तालुक्यात हुडहुडी भरली आहे. या हंगामात ६ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली आले होते. त्यानंतर ८,९, १०,११ अंशापर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले थंडी स्थिर झाली. असे वाटत असतानाच गुरुवारी सकाळी ७ वा राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली. थंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत.

पाणी उतरलेले द्राक्षमणी तडकण्याची भीती आहे. तर ज्या द्राक्षमण्यात पाणी उतरले नाही त्याची फुगवन क्षमता थांबेल असे सोनेवाडी येथील द्राक्ष निर्यातदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले. थंडीपासून द्राक्षबागाना ऊब मिळावी यासाठी द्राक्षबागांमध्ये शेकोटी केल्याचे चित्र काही भागात होते तर काही ठिकाणी जुन्या साड्या आणि शेडनेट लावून थंडीपासून बचावाचा प्रयत्न करताना द्राक्ष उत्पादक दिसत होते . विशेष म्हणजे म्हणजे गोदाकाठ भागातील उसाच्या शेतात उसाच्या पाचाटावर थंडीमुळे दवबिंदू गोठून बर्फ तयार झालेलही पाहायला मिळालं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकः रेल्वेत चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

$
0
0

मनमाड

धावत्या 'पवन एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांना मनमाड रेल्वे व सुरक्षा बलाच्या पोलिसांनी बुधवारी रात्री मनमाड स्थानकात शिताफीने अटक करून चाकू व मुद्देमाल जप्त केला आहे. प्रवाशांच्या प्रसंगावधानतेमुळे चोरांना गजाआड करणे पोलिसांना शक्य झाले. बुधवारी रात्री दरभंगा कुर्ला पवन एक्सप्रेस जळगाव स्थानकातून सुटल्यानंतर रेल्वेच्या जनरल डब्यात चार चोरट्यानी प्रवाशांना मारहाण करत, चाकूचा धाक दाखवत लुटण्यास सुरुवात केली, या मुळे प्रवासी वर्गात घबराट पसरली, प्रवाशांनी रेल्वे मनमाड नजीक पानेवाडी येथे आल्यावर साखळी ओढून रेल्वे थांबवली आणि चाकूचा धाक दाखविणाऱ्या चोराला प्रवाशांनी धाडसाने पकडले, व मनमाड रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली.

'पवन एक्सप्रेस' मनमाड स्थानकात येताच मनमाड रेल्वे पोलिसांनी संपूर्ण रेल्वेत कसून तपासणी करून वेगवेगळ्या डब्यात लपलेल्या तिघांना शिताफीने अटक केली. तसेच प्रवाशांनी पकडलेल्या म्होरक्याला ताब्यात घेऊन चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. नाला सोपारा व मुंबई येथील तिघांच्या फिर्यादी वरून जळगाव जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर कुटुंबिय रंगले काव्यात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'अडगुळं मडगुळं'पासून गीत रामायणापर्यंतच्या विविध काव्यप्रकाराच्या वर्षावात नाशिककर रसिक रंगले आणि चिंब झाले. विसूभाऊ बापट यांच्या 'कुटुंब रंगलंय काव्यात' या एकपात्री नाट्यानुभाद्वारे श्रोत्यांनी काव्यानंद लुटला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण अविष्कार अशी काव्याची सुंदर व्याख्या मांडत विसूभाऊंनी मराठी कवितेतील भावना, उत्कटता आणि सौंदर्य विविध कवितांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवले. प्रा. मो. द. देशमुख यांच्या 'उन उन खिचडी' सारख्या कवितेद्वारे कवितेचे नाजूक पैलू मांडले.

बाबा आमटे, ग. दि. माडगूळकर, बहिणाबाई चौधरी, यशवंत देव, गोविंदस्वामी आफळे, प्र. के. अत्रे, मंगेश पाडगावकर, जगदीश खेबूडकर यांच्यासारख्या कवी-गीतकारांपासून अलीकडच्या काळातील नवकवींच्या कविता त्यांनी सादर केल्या.

'आज मरूनिया जीव झाला मोकळा' अशा कवितेतून शेतकऱ्यांच्या वेदना प्रकट झाल्या, तर 'जा बाई आई सांगू नको बाई, मला पावसाच्या धारांशी खेळायची घाई' या गीतातून बालसुलभ भावना अलगतपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या. 'सखी स्वस्त झाल्या खारका'सारख्या विडंबन गितांनी श्रोत्यांना खळखळून हसविले, तर 'विसरून गेला का सत्तावन' अशा ओळींनी देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले.

मराठी श्रेष्ठतम भाषा असून, हे वैभव टिकविण्याचे आणि आपली संस्कृती जपण्याचे आवाहन विसूभाऊंनी कार्यक्रमातून केले. मातृभाषा समृद्ध असून, या भाषेत बोलण्याचा अभिमान बाळगा, असे आवाहन त्यांनी केले.

विसूभाऊंनी वात्रटीका, लोचटीका, मुक्तछंद, बालगीते, विडंबन, लावणी, देशभक्तीपर गीते, अभंग, भक्तीगीते, भावगीते असे विविध प्रकार सादर केले. बालगीतांचे बारा प्रकार आणि लावणीच्या विविध प्रकारांची माहिती त्यांनी दिली. त्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. ओंकार वैरागकर यांनी त्यांना तबल्याची साथ केली. कार्यक्रमाची सांगता साने गुरुजींच्या 'बल सागर भारत होवो' या गीताने झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पवन’मध्ये प्रवाशांना मारहाण; चौघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दरभंगा येथून कुर्ला येथे जाणाऱ्या धावत्या पवन एक्स्प्रेसमध्ये बुधवारी रात्री जळगाव स्थानकानजीक चोरट्यानी प्रवाशांना मारहाण करून लुटमार केली. प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे चौघांना मनमाड रेल्वे स्थानकात मुद्देमालासह अटक करण्यात आली. मनमाड रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेतील नालासोपारा येथील प्रवाशांनी फिर्याद दिली.

बुधवारी रात्री पावणे दहा वाजता एक्स्प्रेस जळगाव स्थानकातून सुटल्यानंतर जनरल डब्यातील सहा चोरट्यांनी प्रवाशांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत, तसेच चाकूचा धाक दाखवत लुटण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी धाडस दाखवून चोरट्यांना प्रतिकार करीत चौघांना पकडून ठेवले. त्यातील दोघे इतरत्र पळून गेले. मनमाड नजीक पानेवाडी येथे साखळी ओढून रेल्वे थांबविली. त्यानंतर मनमाड रेल्वे पोलिसांनी पवन एक्स्प्रेस रात्री १२च्या सुमारास मनमाड स्थानकात येताच पोलिस निरीक्षक के. डी. मोरे आणि त्यांच्या पथकाने चौघांना अटक केली. गोपाळ शेवडे (वडाळी), अंकुश पवार (वरणगाव), संजय बोरसे (कजगाव), आकाश शेवरे (वडाळी) यांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामकोत ‘प्रगती’च

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोहनलाल भंडारी व वसंत गिते यांच्या नेतृत्वाखालील बागमार समर्थकांच्या प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. सहकार आणि नम्रता पॅनलचा धुव्वा उडाला. साडेचार वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात प्रगती पॅनलने एकहाती यश मिळवत सत्ता हस्तगत केली आहे.

शेड्युल बँकेचा दर्जा असलेल्या या बँकेत १ लाख ७६ हजार २६२ मतदार आहेत. त्यापैकी ६३ हजार ८३९ सभासदांनीच मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी अवघी ३६.२१ झाली. त्यामुळे या निवडणुकीचे अंदाज बांधणे सर्वांसाठी अवघड होते. पण, दोन दिवसांच्या मतमोजणीत मतदारांनी प्रगती पॅनलला पसंती देत त्यांच्या पारड्यात मते टाकली. या निवडणुकीत प्रगती पॅनलविरोधात गजानन शेलार, भास्करराव कोठावदे, ललित मोदी व अजय ब्रह्मेचा यांनी सहकार पॅनल रिंगणात उतरवले होते. तर अजित बागमार यांनी नम्रता पॅनल उभे केले होते. पण, या निवडणुकीत मतदारांनी दोन्ही पॅनलला नाकारत प्रगतीच्या एकहाती सत्ता दिली.

२३ डिसेंबर रोजी या बँकेसाठी ३०१ मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यानंतर बुधवारी दोन फेऱ्यांची मतमोजणी करण्यात आली. त्यासाठी १०४ टेबल ५०० कर्मचारी मतमोजणीसाठी ठेवण्यात आले होते. पहिल्या फेरीत १६ हजार ५०० मतांची मोजणी करण्यात आली. त्यात प्रगती पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार आघाडीवर होते. सहकार पॅनलचे एकमेव गजानन शेलार आघाडीवर होते. दुपारी दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाली. त्यात प्रगतीचे १९, तर सहकारचे २ उमेदवार आघाडीवर होते. त्यात शेलार यांच्यासह भास्करराव कोठावदे यांनी आघाडी घेतली. त्यानंतर गुरुवारी तिसऱ्या व अखेरच्या फेरीची मोजणी करण्यात आली. त्यात २६ हजार ५०० मतदान होते. या मतमोजणीत प्रगतीने सर्वच जागांवर आघाडी घेऊन विजय निश्चित केला.

छाजेड, गीतेंना सर्वाधिक मते

प्रगतीचे सर्व उमेदवार निवडून आले असले तरी या निवडणुकीत सर्वाधिक ३४ हजार १०८ मते ही महिला गटातील शोभा जयप्रकाश छाजेड यांना मिळाली, तर सर्वसाधारण गटात सर्वाधिक ३२ हजार ४६८ मते वसंत गिते यांना मिळाली. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती गटात प्रशांत अशोक दिवे यांनी ३१ हजार १७२ मते घेतली. सहकारचे गजानन शेलार यांनी या निवडणुकीत एकतर्फी लढत देत २३ हजार ५५ मते मिळवली. त्यांना विजयासाठी १३९७ मते आवश्यक होती. त्यांच्या खालोखाल भास्करराव कोठावदे यांनी २१ हजार ८२६ मते, ललित मोदी यांना २० हजार ५७८ तर अजय ब्रह्मेचा यांना २०३९८ मते मिळाली. या निवडणुकीत नम्रताच्या अजित बागमार यांना अवघी ९ हजार मते मिळाली.

'सहकार'ने केला विजयी सत्कार

निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजयी प्रगती पॅनलच्या उमेदवारांचा हार घालून सत्कार करीत सहकाराचे दर्शन घडवले. यावेळी गजानन शेलार यांनी बँकेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन महिनाभरापासून निवडणुकीत आलेली कटूताही कमी केली. प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी संभाजी स्टेडियमच्या मतमोजणी केंद्रासमोर फटाके फोडत जल्लोष केला. त्यानंतर चांदीच्या गणपतीचे दर्शन घेऊन प्रचार कार्यालयात सर्व उमेदवार व कार्यकर्ते गोळा झाले. त्यानंतर येथे सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला.

बँकेत सात नवे चेहरे

बँकेत २१ पैकी १४ संचालक हे पुन्हा निवडून आले आहेत, तर ७ संचालक नवीन आहेत. त्यात रंजन ठाकरे, प्रशांत दिवे, सुनील धाडीवाल, महेंद्र बुरड, गणेश गिते, अशोक सोनजे, हरीश लोढा यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कारभारतीतर्फे आजपासून ‘गोदास्पंदन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संस्कारभारती व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शुक्रवार २८ ते रविवार ३० डिसेंबर या कालावधीत 'गोदास्पंदन' कार्यक्रम होणार आहे.

२८ रोजी सकाळी १० ते १२ त्र्यंबकेश्वर येथे गोदा पूजन आणि स्वच्छता, दुपारी ४ वाजता महात्मा फुले कलादालन, शालीमार येथे चित्र, शिल्प, छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन. २९ रोजी कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल येथे सकाळी १० ते ४ चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्रात डी. एम. मोरे, सेवानिवृत्त संचालक, मेरी नाशिक हे 'महाराष्ट्राच्या विकासात गोदावरीचे स्थान' या विषयावर बोलणार आहेत. डॉ. प्रा. प्राजक्ता बस्ते : गोदावरी नदी पूर्नजीवन, राजेश पंडीत : गोदावरी पूर्वी, आता आणि पुढे, विजय निपाणेकर : गोदावरीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व, देवांग जानी : गोदावरी उपनद्या व कुंडांचे पुरातत्वदृष्ट्या महत्त्व आणि यावेळी गोदावरी पूर्नवैभवासाठी अपेक्षित उपाय योजना या विषयावर व्याख्यान होणार आहे.

कार्यक्रमात गोदा स्पंदन या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. तर सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत कवी संमेलन होईल. ३० रोजी सकाळी ६ ते १० बालाजी मंदिर, सोमेश्वर, नवश्या गणपती, आसाराम बापू आश्रम जवळील पूल, संपूर्ण पंचवटी घाट परिसर, टाकळी व दसक परिसर येथे निर्मल गोदा स्वच्छता अभियान, दुपारी २.३० ते ४.३० गोदापूजन, दुपारी ३.५० ते ५ या वेळेत श्री गुरुजी रुग्णालय, सेवासंकल्प समितीतर्फे लोककलेच्या माध्यमातून रामकुंड परिसरात ३० पाड्यांवरील कलाकारांचे लोकनृत्य तसेच गोदा स्पंदन या विषयाला अनुसरुन महारांगोळी. सायंकाळी ६ ते ९.३० नृत्याविष्कार व संगीत कार्यक्रम होईल. गोदावरी मातेची महाआरती होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वफ्त बोर्डात २५ शिपाईअन् फक्त १० अधिकारी!

$
0
0

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

अल्पसंख्यांकासाठी कार्यरत असणाऱ्या वफ्फ बोर्डातील अधिकारीच कामात कुचराई करतात अन् त्यामुळे बदनाम मात्र सरकारला व्हावे लागते, अशी खंत व्यक्त करताना अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी वफ्फ बोर्डाच्या कामकाजातील वास्तवावर प्रकाशझोत टाकला. या मंडळावर ३५ कर्मचारी काम करतात. यातील जेमतेम दहा अधिकारी सोडले तर तब्बल २५ कर्मचारी हे शिपाई पदावर आहेत. शिपाई पदावरील कर्मचारी शासनाची धोरणे तळागाळापर्यंत राबविणार तरी कशी, त्यांच्या हाती अधिकार आहेत का? हे नेमके कायच चालले आहे, असा सवाल उपस्थित करत शेख यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.

राज्यातील २० जिल्ह्यांपाठोपाठ नाशिकमधील दौऱ्याचा वृत्तांत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान मांडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर उपस्थित होते. शेख म्हणाले, अल्पसंख्यांक समुदाय म्हटला की, प्राधान्याने मुस्लीम समाज डोळ्यांसमोर येतो. अल्पसंख्यांक समुदायांमध्ये मुस्लीम समाज हा बहुसंख्य असला तरीही यासोबतच जैन, पारशी, शीख, ख्रिश्चन, बौद्ध यासारखे समुदायही आहेत. ज्या-त्या अल्पसंख्यांक समुदायाच्या मोठ्या समस्या आहेत. या समस्या नेमक्या कुठल्या स्वरूपाच्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी आयोगातर्फे राज्यभरात दौरा सुरू केला असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आयोग पाहणी करत असून, या पाहणीचा अंतिम अहवाल आणि डॉक्युमेंट्री मुख्यमंत्र्यांकडे सादर केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

\Bजैन साधूंना संरक्षण पुरवा \B

जैन या अल्पसंख्यांक समुदायातील साधूंवरही काही ठिकाणी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकदा रस्ते अपघातांमध्ये हे साधू सापडले जातात. या साधूंना पोलिसांनी पुरेसे संरक्षण पुरवावे, अशा सूचनाही आयोगाने पोलिस यंत्रणेस केल्या आहेत.

\Bमुलींचे वसतिगृह कधी उभारणार ? \B

प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्याची तरतूद आहे. नाशिकमध्ये याबाबत काहीच हालचाल दिसत नसल्याचे नोंदवत या वसतिगृहासाठी त्वरीत प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना शेख यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या. या वसतिगृहासाठीचे प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू असल्याचे निवासी जिल्हाधिकारी खेडकर यांनी यावेळी सांगितले.

\B...मग तुम्ही इथे काय करता

\Bजिल्हाधिकारी कार्यालयात शेख यांनी अल्पसंख्यांक समुदायातील प्रतिनिधींशी खुला संवाद साधताना विविध समस्या जाणून घेतल्या. या समुदायासाठी आरोग्यासारख्या प्राथमिक गरजेच्या सुविधांमध्ये रुग्णालय आहे पण, डॉक्टर नाहीत, कर्मचारी नाहीत, मशिनरी नाहीत इतके सगळे दाहक वास्तव अनुभवूनही या समुदायातील प्रतिनिधी हातावर हात धरून का बसतात, असा सवालही शेख यांनी समुदायांच्या प्रतिनिधींपुढे उपस्थित केला. संबंधित यंत्रणांकडे याचा पाठपुरावा करा. दाद मिळत नसेल तर आयोगाशी संपर्क साधा, असे आवाहन त्यांनी केले.

अधिकाऱ्यांना बजाविणार नोटीस

राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या आढावा बैठकीस नाशिकच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यात अनास्था दाखविल्याच्या कारणाने आयोगाचे अध्यक्ष शेख यांनी या अधिकाऱ्यांना नोटिस बजाविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. जागोजागी आयोगाला अधिकाऱ्यांकडून अहवालाचे मोठे सादरीकरण उपलब्ध होत असताना नाशिकच्या अधिकाऱ्यांनी अवघा चार पानी अहवाल कसाबसा रेखाटला यामागे प्रत्यक्ष योजनांची अंमलबजावणीच नाही तर अहवालात काय मांडणार असा संतापही शेख यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…जेव्हा माणसाला पडतो ‘षडरूपी’ सापाचा विळखा...!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणसाचे जीवन हे नेहमीच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपुंनी लिप्त असते. त्याचाच परिणाम म्हणजे त्याच्या आयुष्यात दु:ख, वैफल्य आणि निराशा येते. त्यातून बाहेर पडण्यासाठी तो कधी सुखाची स्वप्ने पाहतो; परंतु या स्वप्नांचा अर्थ न लागल्याने त्याच्या पदरी निराशाच येते. अशा आशयाचे हे नाटक होते.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत गुरुवारी कामगार कल्याण केंद्र दीपनगर भुसावळच्या वतीने भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र प्रस्तुत, नितीन गगे लिखित 'षडरूपी' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या स्पर्धा सुरू आहेत.

माणूस आपल्याला पडणाऱ्या स्वप्नाचा आपल्या कुवतीनुसार अर्थ लावतो. त्याचा अर्थ लागत नाही तोपर्यंत तो धडपडत राहतो. त्यातून सुटण्यासाठी परिस्थितीशी तडजोड करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही तो उत्तरोत्तर फसतच जातो. वासू या तरुणाचे तेच झाले आहे. स्वप्ने, योगायोग, नशीब यातून नियतीशी जुळवून घेणारा वासू आईवरच्या प्रेमापोटी तडजोडीचा मार्ग स्वीकारतो. पण ती तडजोड करताना त्या तडजोडीचा फायदा घेणारा ज्योतिषी, दैवाघाताने अगतिक झालेली वासूची पत्नी यांच्या आयुष्याभोवती हे नाटक फिरते. वासूला पडलेल्या स्वप्नांपासून नाटकाला सुरुवात होते व अनेक घटनांमधून प्रवास करीत अखेरीस त्या स्वप्नांचा अर्थ लागतो. असा आशय या नाटकातून व्यक्त झाला.

दिग्दर्शन व नेपथ्य चंद्रकांत जाडकर यांचे, संगीत संतोष वारूंगसे, रोशन भगत, प्रकाशयोजना अतुल बऱ्हाटे, वेशभूषा/रंगभूषा श्रद्धा कदम यांची होती. नृत्य शीतल जुमळे, स्वप्नाली महिंद्र, सविता शर्मा, प्रियंका बुरड, लक्ष्मी पाटील, नेपथ्य सहाय्य चंद्रकांत सपकाळे, प्रकाशयोजना सहाय्य तोहित शेख, रंगमंच व्यवस्था रोशन वाघ, लक्ष्मीकांत तेलंग, राकेश तवर, शंकर जाधव, ज्योती कवठे, विशेष सहकार्य अमोल काबरा, दिनेश बोरीकर, विकास चौधरी आदी. नाटकात समीक्षा गुरव, नितीन देवरे, पंकज सनेर, हर्षवर्धन बिलगये, पंकज गायकवाड, ऐश्वर्या खोसे, सचिन शिंदे, शामल जाधव यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

भय इथले संपत नाही

कामगार कल्याण केंद्र, ओझर

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनाच्या धडकेतदोन तरुण ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले. हा अपघात दिंडोरी रोडवरील आरोग्य विद्यान विद्यापीठासमोर गुरुवारी दुपारी झाला. दुचाकीस्वारांच्या खिशात निघालेल्या कागदपत्रांवरून ओळख पटविण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विजयकुमार परिडा (वय ३०) आणि कार्तिक परिडा (वय २५, दोघे रा. म्हसरूळ, मूळ ओडिशा) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. छोटी- मोठी कामे करणारे हे दोघे परप्रांतीय कारागीर दुचाकीने म्हसरूळकडून दिंडोरीकडे प्रवास करीत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नग्न फोटो काढून खंडणीची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील हुडको कॉलनीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेशी लग्न करून तिचे नग्न फोटो काढून २० लाखाची खंडी मागणाऱ्या परप्रांतीय नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पीडितेने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवरून येथील पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत म्हटल्यानुसार संशयित आरोपी मुमताज अहमद मोहम्मद हुसेन (वय ३७, रा. भटिंडा, जम्मू) याची सौदी अरेबिया येथे नोकरी करीत असताना पीडित महिलेच्या आईसोबत त्याची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडितेच्या आईस 'मी तुमच्या मुलीस मदिना येथे घेऊन जाईल' अशा भूलथाप देवून त्याने पीडित महिलेशी मालेगावी लग्न केले. त्यानंतर तो त्या महिलेस हिमाचल प्रदेश येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार करत तिचे नग्न फोटो त्याच्या मोबाइलवर काढले. तसेच पीडित महिलेच्या भावास फोन करून २० लाखाची खंडणी मागितले; पैसे द्या अन्यथा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संयम, अनुभव, नियोजन व संपर्काचा फायदा

$
0
0

गौतम संचेती, नाशिक

नामको बँकेच्या साडेचार वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर झालेल्या निवडणुकीत प्रगती पॅनलला संयम, अनुभव, नियोजन आणि संपर्काचा फायदा झाला. बँक बरखास्त करण्यापासून उमेदवारी अर्ज बाद करण्यापर्यंत झालेल्या आरोपांना संयमाने व कृतीतून उत्तर दिल्यामुळे विरोधी गटाचे मुद्देच हरवले. या निवडणुकीत २१ उमेदवारांपैकी १४ उमेदवार माजी संचालक असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा व संपर्काचा फायदाही पॅनलला झाला. बँकेच्या निवडणुकीपूर्वी दोन ते तीन महिने तयारीसाठी मिळाल्यामुळे या पॅनलने सुरुवातीपासून शिस्तबद्ध नियोजन करीत विजयश्री खेचून आणली.

बँकेवर एकहाती सत्ता असलेले स्व. हुकुमचंद बागमार यांच्या पश्चात ही निवडणूक असल्यामुळे नेतृत्वाचा प्रश्नही होता. पण सोहनलाल भंडारी व वसंत गिते यांनी सामूहिक नेतृत्व करून बागमारांचे काम पुढे नेण्याचा उद्देश ठेऊन प्रचार केल्यामुळे त्याचा फायदा झाला. बँक बरखास्त का केली, याचे उत्तर नाही. त्यासाठी एकही कारवाई नाही, असे सांगतच माजी सदस्य प्रचारात उतरले. विरोधकांना त्यांचे मुद्दे खोडता आले नाहीत. या निवडणुकीत प्रगतीच्या माजी संचालकांना रोखण्यासाठी अर्ज छाननीच्या वेळी घेतलेल्या आक्षेपातील हवाही निघाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कायद्याचा आधार घेऊन दिलेल्या उत्तरामुळे त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यातच उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे प्रगतीचे बळ वाढले. या निवडणुकीत सहकार व नम्रता हे दोन पॅनल रिंगणात उभे होते. त्यात सहकार पॅनलमध्ये चार नेते सोडले तर मातब्बर उमेदवार नव्हते. पण, ज्यांना प्रगतीकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी येथे उमेदवारी मिळवली. अजित बागमार यांनी नम्रता पॅनल उभे करुन प्रगतीची कोंडी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बागमारांचा फोटो वापरापासून, तर गुन्हा दाखल करण्यापर्यंत सर्वच गोष्टी झाल्या. पण, त्यातूनही फारसे काही साधले नाही. त्यामुळे प्रगतीचे अडथळे दूर होत गेले.

निवडणुकीत प्रगतीला यश मिळाले असले तरी त्यांच्यासमोर आव्हानही आहे. बँकेचा वाढलेला एनपीए कमी करणे, त्यातून बँकेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ग्राहकांमध्ये विश्वास तयार करण्याची जबाबदारी आहे. पाच वर्षांपूर्वी या बँकेला खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांशी स्पर्धा नव्हती. पण, आता त्याबरोबरच तंत्रज्ञानाचाही कमाल वापर करावा लागणार आहे. सर्वांचे सहकार्य घेऊन बँकेची वाटचाल केल्यास बँकेच्या विकासाला खरी गती मिळू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा गुण

$
0
0

क्रीडा गुणांची योजना फसवी

नाशिकरोड : दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी खेळांत प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंसाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केलेली बोनस गुणांची योजना फसवी आणि खेळाडूंवर अन्याय करणारी असल्याची भावना क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. या सुधारित योजनेमुळे संधीसाधुंचे आयते फावणार असल्याने गुणांची पद्धत बंद करुन केवळ स्पोर्ट्स मेरीटनुसारच प्रवेश देण्याची मागणी क्रीडा शिक्षकांतुन पुढे आली आहे.

राज्य शासनाचा बोनस गुणांचा शासननिर्णय नुकताच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केला आहे. या शासननिर्णयानुसार पूर्वीच्या बोनस गुणांच्या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. पूर्वी जिल्हा आणि विभागीय स्तरावरील प्राविण्य अथवा सहभागासाठी बोनस गुण देण्याची पद्धत नव्हती. मात्र सुधारीत योजनेनुसार जिल्हा स्तरासाठी ३ आणि विभागीय स्तरासाठी ५ गुणांची सवलत देण्यात आली आहे. मात्र पूर्वी राज्यस्तरावरील प्राविण्यासाठी २० गुण दिले जात असत. आता केवळ ७ गुण मिळतील. पूर्वी राज्यस्तरावरील सहभागासाठीही १५ गुण मिळत आता सहभागासाठी सवलतीचे गुण मिळणार नाहीत. पूर्वी राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या २५ गुणांऐवजी आता १० तर सहभागासाठी २० ऐवजी अवघे ७ गुण मिळणार आहेत. पूर्वी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना मिळणारे सवलतीचे गुण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांत प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना मिळणार असून, त्यांना स्पोर्ट्स कोट्यातुन इयत्ता अकरावीलाही प्रवेश मिळणार आहे. या सुधारित योजनेमुळे खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होणार असल्याचे भीती क्रीडा शिक्षक आणि संघटकांतुन व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील अधिकाऱ्यांनाअतिरिक्त आयुक्तपदी संधी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) हे पद रमेश पवार यांच्या बदलीमुळे रिक्त असतांनाच, शासनाने अतिरिक्त आयुक्त (२) या पदावरील किशोर बोर्डे यांचीही अचानकपणे मालेगाव महापालिकेत बदली केल्याने पालिकेतील दोनही अतिरिक्त आयुक्तापदे रिक्त झाली आहे. तुर्तास या पदावरून शासनाकडून अधिकारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने पालिकेत कार्यरत असलेल्या उपायुक्तांमधूनच अतिरिक्त आयुक्तपद भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्यस्थितीत पालिकेत कार्यरत असलेल्या महेश बच्छाव, रोहीदास बहिरम, हरिभाऊ फडोळ आणि डॉ. महेश डोईफोडे यांच्यापैकी एकाची अतिरिक्त आयुक्तपदी बढती वर्णी लागण्याची शक्यता बढावली आहे.

महापालिकेत सध्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वानवा असतांनाच, शासनाने आता महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्याही बदलीचा धडाका लावला आहे. तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर आलेल्या नुतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालिकेच्या कामकाजाचा अभ्यास सुरू केला असतांनाच, शासनाने पालिकेत कार्यरत असलेले एकमेव अतिरिक्त आयुक्तपदही आता किशोर बोर्डेंच्या रुपाने रिक्त झाले आहे. एकीकडे पालिकेचा समावेश 'ब' वर्गात झाला असताना अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे. पालिकेत सध्या अतिरिक्त आयुक्तपदाची एक आणि दोन अशी दोन पदे आहेत. अतिरिक्त आयुक्त क्र.२ (सेवा) यांची चार महिन्यापूर्वीच बदली झाली आहे. तर क्र.१( शहर)चे किशोर बोर्डे यांची मालेगावात बदली झाली आहे. या दोन मोठ्या पदांसोबत उपायुक्त, विधी अधिकारी, मुख्य अग्नीशामक अधिकारी, आरोग्यधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, नगरसचिव अशी महत्त्वाची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नवीन आयुक्तांसमोर पालिकेचा गाडा चालवण्याचे मोठे आव्हान आहे. तुर्तास शासनाकडून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता कमी असल्याने प्रशासनाने आता सध्यस्थितीत कार्यरत असलेल्या उपायुक्तांमधूनच अतिरिक्त आयुक्तपदाचे पद भरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सेवाज्येष्ठतेतून दोन अधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. शासन सेवेतून आलेल्या महेश बच्छाव आणि डॉ. महेश डोईफोडे यांच्यापैकी एकाची तर, पालिका सेवेतील रोहिदास बहीरम आणि हरिभाऊ फडोळ यांच्यापैकी एकाची या पदावर निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडील खात्यांची माहिती घेण्यासह सेवाजेष्ठता तपासण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images