Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पारा ६.९ अंशांवर

$
0
0

पारा ६.९ अंशांवर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन दिवसांपासून बोचऱ्या थंडीने नाशिककरांना कवटाळले असून शहरासह जिल्हावासीय गारठले आहेत. वाऱ्याचा वेग ताशी नऊ किलोमीटर असल्याने नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिकांनी गारठ्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. निफाडमध्ये गुरुवारी चालू हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. १.७ अंश सेल्सियस ऐवढे निचांकी तापमान नोंदविले गेले. तर नाशिकमध्येही पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी हेच तापमान अनुक्रमे चार आणि ६.९ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले आहे. कमाल तपमानही लक्षणीयरित्या घटले आहे. शुक्रवारी २३.९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तपमानाची नोंद झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत किमान तापमानात वाढ झाली असली तरी थंड हवा मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने शुक्रवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला.

थंडीपासून बचावासाठी स्वेटर, कानटोपी, मफलर यासारखे उबदार कपडे परिधान करण्यास अबालवृद्धांनी पसंती दिली. वातावरणातील गारठा आरोग्यास हानीकारक ठरण्याची शक्यता अधिक असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फळभाज्यांच्या क्रेटमधून मद्याची वाहतूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फळभाज्यांच्या आड अवैध मद्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात उघडकीस आणला. अंबोली परिसरात दोघांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून चार लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

संजयभाई सोहनभाई गांधी व नोरतमल ओनाडजी साहू (दोघे रा. गुजरात) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. नववर्ष सेलिब्रेशनच्या निमित्ताने परराज्यातून अवैध मद्यवाहतूक आणि विक्री होत असून त्यावर कारवाईचे आदेश विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रवेशद्वारांजवळ नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. शुक्रवारी (दि. २८) अंबोली शिवारात भरारी पथकाने सापळा रचून क्रमांक नसलेली बोलेरो कार अडविली. या वाहनात मागील बाजूस क्रेटमध्ये फळभाज्या भरलेल्या आढळल्या. मात्र, क्रेटच्या मागील बाजूस देशी-विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पथकाने मद्यसाठ्यासह सहा लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त केले. निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, देवदत्त पोटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंड्सतर्फे ब्लँकेट वाटप

$
0
0

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील आळंदीवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना बंड्स संस्थेतर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लिंगप्पा शेटी, उपाध्यक्ष शशिकांत शेट्टी, अध्यक्ष भास्कर शेट्टी, अमोल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक नारायण शिंदे यांसह बंड्स संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅप्पी स्ट्रीट’ची आज धम्माल!

$
0
0

कॉलेज रोडवर सायंकाळी अनुभवा उत्साहाची पर्वणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेहमी सायंकाळच्या वेळी वाहनांची गर्दी असलेल्या कॉलेज रोडवर आज कोणत्याही वाहनाचा हॉर्न नसेल अन् नसेल गोंगाट. असेल तो फक्त नाशिककरांचा कल्ला. 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'हॅप्पी स्ट्रीट'निमित्त आज, शनिवारी (२९ डिसेंबर) सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत धम्माल मस्ती करण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅप्पी स्ट्रीट' हा उपक्रम नाशिककरांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. ज्या रस्त्यावर निरंतर वाहने धावत असतात, त्या रस्त्यावर मनसोक्त बागडण्याची मजा काही वेगळीच असेल. त्यामुळेच हॅप्पी स्ट्रीट या उपक्रमाला नाशिककरांनी नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नाशिकमधील कलाकारांना आपल्या कलेल्या सादरीकरणासाठी हॅप्पी स्ट्रीटने हक्काचे व्यासपीठ दिले आहे. हा आनंद पुन्हा एकदा आज सायंकाळी होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीटमधून नाशिककरांना लुटता येणार आहे. २०१८ या सरत्या वर्षाला निरोप देत, २०१९ च्या स्वागताचा जल्लोष हॅप्पी स्ट्रीटवर नाशिककरांना करता येणार आहे. तुम्हाला हॅप्पी स्ट्रीटवर हिंदी मराठी गाण्यांवर झुम्बा डान्स करता येणार आहे. यासह रस्त्यावर रांगोळी काढण्याची, स्पोर्ट्स गेम खेळण्याची, गाणे ऐकण्याची, जादूचे प्रयोग पाहण्याची अन् तुमचा छंद जोपासण्याची संधी या निमित्ताने तुम्हाला मिळणार आहे. नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, आकाशनिरीक्षण, क्विलिंग आर्ट, कॅलिग्राफी, पोर्ट्रेट, दोरीच्या उड्या, आर्ट अँड क्राफ्ट, व्हॉलिबॉल अन् सायकल राइडची गंमत अनुभवण्याची संधी मिळणार आहे. पर्यावरणविषयक खेळ आणि प्लास्टिक मॉन्स्टरही हॅप्पी स्ट्रीटवर असतील. अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, विविध स्पोर्टस गेम्स, म्युझिकल आणि इन्स्ट्रुमेंटल सादरीकरण, डान्स परफॉर्मन्स, पोलिस बँडचा ताल आदी उपक्रमांचाही आनंद लुटता येणार आहे. सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे हॅप्पी स्ट्रीटवर मोफत रक्तदाब आणि शुगर चेकअप करून घेता येणार आहे. विविध कला आणि कार्यक्रमांनी भरगच्च असा हॅप्पी स्ट्रीट उपक्रम यंदा प्रथमच सायंकाळी होणार असून, वीकेंड व इअर एंडमुळे यंदाचा हॅप्पी स्ट्रीट स्पेशल ठरणार आहे. चला तर मग, हॅप्पी स्ट्रीटची ही धम्माल पर्वणी अनुभवण्यासाठी नक्की या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजनिधीद्वारे करा सैनिक कुटुंबांना मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशासाठी अहोरात्र लढणाऱ्या सैनिकांविषयी प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करायला हवी. सामाजिक जाणिवेतून ध्वजदिन निधी संकलनासाठी सर्वांनी पुढे येऊन सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी केले.

सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा मुद्रांक अधिकारी अनिल पारखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) कॅप्टन विद्या रत्नपारखी आदी उपस्थित होते. यावेळी राधाकृष्णन म्हणाले, की कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता कुटुंबापासुन दूर रहाणारे सैनिक देशाच्या सीमांचे संरक्षण करतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवित नागरिकांनी बांधिलकी जपायला हवी. त्यासाठी ध्वजनिधी संकलनात प्रत्येकाने सहकार्य करावे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याकरीता संवेदनशिलतेने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

भारत-पाक युद्ध, भारत-चीन युद्ध किंवा अन्य खास मोहिमेत वीर मरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे २५ लाख रुपये किंवा पाच एकर जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याबाबतची माहिती घेऊन सैनिक कुटुंबांनी या मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गणवंत पाल्यांचा सत्कार

ध्वजनिधी संकलन उद्देशपूर्तीसाठी न करता सामाजिक जाणिवेतून करावे, असे आवाहन दराडे यांनी केले. गतवर्षी ध्वजनिधी संकलनाचे ९४ टक्के काम झाल्याची माहिती प्रास्ताविकात रत्नपारखी यांनी दिली. माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ध्वजदिन निधी संकलनात चांगली कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचादेखील सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावची महसूल यंत्रणा भ्रष्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव तालुक्यातील शर्तभंग झालेल्या जमिनी सरकारने जमा कराव्यात, जमिनीचा ५० टक्के नजराणा न भरता सरकारची १८ कोटींची फसवणूक करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरूड यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही गरूड यांनी केला असून, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. महसूलमधील भ्रष्टाचारी यंत्रणेला लवकरच उघडे पाडू, असा इशाराही गरूड यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मालेगाव तालुक्यातील भायगाव येथील पाच हेक्टरहून अधिक जमिनींचा ५० टक्के नजराणा भरून न घेताच उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी- विक्रीची परवानगी दिली. या प्रकरणाकडे विभागीय आयुक्तांचे लक्ष वेधले असता त्यांनीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे सरकारचे १८ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप गरुड यांनी केला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती गरूड यांनी केली. २०१२ ते २०१५ या आर्थिक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. तलाठ्यापासून महसूलमधील काही अधिकाऱ्यांनी ही रक्कम लाटल्याची तक्रार लोकायुक्तांकडे केल्याची माहिती गरूड यांनी दिली. तालुक्यातील तळवाडे येथे आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून त्यावरील विहिरीवर बिगरआदिवासींनी नावे लावल्याचा दावा गरूड यांनी केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दीड वर्षापासून याबाबतची केस सुरू असून, निकाल देण्यास विलंब का केला जातो आहे, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून चौघांची महिलेस मारहाण

$
0
0

घरात घुसून चौघांची

महिलेस मारहाण

नाशिक : मुलास नादी लावते, या कारणातून घरात घुसून चौघांनी महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर भागात घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी असून, तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अर्शद हजीज शेख, जमील वकील शेख, जुबेर जमील शेख व अजीम अजिज शेख अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हाजरा जहीर शेख व सायरून निसा जमील शेख (रा. सर्व खोडेनगर, वडाळा रोड) अद्याप फरारी आहेत. गोरक्षनगर भागातील रेखा मते यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुलगी दीपाली मते (वय २८) हिला चौघांनी मारहाण केली. सहाय्यक निरीक्षक भडीकर तपास करीत आहेत.

बसमधून दागिने लंपास

नाशिक : खासगी बसच्या डिक्कीत ठेवलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. बॅगमध्ये रोकड, दागिन्यांसह ८३ हजारांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषाली सचिन कापसे (रा. कोंढवा, पुणे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. त्या पुण्याहून पटेल ट्रॅव्हल्सच्या खासगी बसने (एमएच १५ एके २७८६) मंगळवारी नाशिकमध्ये उतरल्या. त्या वेळी क्लिनरने डिक्कीत ठेवलेली बॅग लंपास झाल्याचे निदर्शनास आले. हवालदार निकम तपास करीत आहेत.

कोयता बाळगणाऱ्यास अटक

नाशिक : आडगाव नाका भागात दहशत माजविण्यासाठी धारदार कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश महादेव कदम (रा. मनकामेश्वर अपार्टमेंट, विजयनगर कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. एका बारसमोर संशयित बुधवारी (दि. २६) रात्री धारदार कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हवालदार झाडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोमट पाणी पिण्याचा डॉक्टरांकडून सल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जाणवत असलेल्या थंडीत महिनाखेरीस भर पडली आहे. गारठलेल्या अशा वातावरणात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सकाळी उशिराने प्रकटणारी सूर्यकिरणे, प्रचंड गारठा यामुळे जिल्ह्यात कडाका पसरला आहे. शहरातील तीन दिवसांपासून किमान तापमान ५ ते ६ अंशाच्या दरम्यान असून, आणखी दोन ते तीन दिवस तापमानात घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दिवसरात्र वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिककरांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढीस लागल्या आहेत. सर्दी, खोकला व ताप हे आजार बळावण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. थंडीच्या कडाक्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सातत्याने उबदार कपडे वापरावे, कोमट पाणी प्यावे, ताजे अन्न खावे, पहाटे व्यायाम करावा, असे डॉ. नितीन चिताळकर यांनी सांगितले.

वातावरण बदलाने आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. त्यावर मात करण्यासाठी व्यायाम करणे, योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. बदलत्या हवामानात संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. कोमट पाणी प्यावे तसेच सर्दी किंवा खोकला झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. आवेश पलोड,

अध्यक्ष, आयएमए नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नदी विकासाचा अवलोकनात्मक विचार व्हावा

$
0
0

ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नदीला माता म्हणून त्यातच निर्माल्य टाकायचे त्यापेक्षा युरोपातील देशांमध्ये नदीला जशी वागणूक देतात तशी द्यायला हवी. तिचे अवलोकन करून तिच्या विकासाचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे चित्रकार, संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत यांनी केले.

संस्कारभारती व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, दिल्ली यांच्यातर्फे पर्यावरण प्रदूषणाबाबत कलांच्या माध्यमाद्वारे जनजागृती व्हावी या उद्देशाने ३० डिसेंबरपर्यंत आयोजित गोदास्पंदन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शालिमार येथील महात्मा फुले कलादालनात हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर राष्ट्रीय कला संग्रहालय दिल्लीचे संचालक अद्वैत गरनायक, माजी लेप्टनंट कर्नल रांगणेकर, संस्कार भारतीचे संस्थापक अध्यक्ष योगेन्द्र, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, स्वाती राजवाडे, सी. एल. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कामत म्हणाले, की फेसबूकवर दोन फोटो पाहण्यात आले. एका फोटोत युरोपातील नदी होती व दुसऱ्या फोटोत भारतातील नदी. भारतातील नदी अत्यंत अस्वच्छ होती. त्याखाली लिहिले होते, 'आम्ही नदीला माता मानतो' तर युरोपातील नदीच्या फोटोखाली 'आम्ही नदीला माता मानत नाही' असे लिहिलेले होते. त्याने मन विदीर्ण झाले. आपण नदीची किती मानहानी करतो, नदी किती अस्वच्छ करतो याला मर्यादा नाही. भारतातील प्रत्येकाने विचार केला की नदी स्वच्छ करायची आहे आणि कामाला लागले तर काही क्षणातच नदी स्वच्छ होऊ शकते. आपल्याकडे मनुष्यबळ आहे; परंतु संघटन नाही, असेही त्यांनी सांगितले.

नदीचा उगम, महात्म्य, पावित्र्य, पौराणिक संदर्भ, आध्यात्मिक महत्त्व, ऐतिहासिक घटना, तिरावरील मंदिरे, घाट, स्थानिक लोककला, लोककथा, येथील सभ्यता आदींचे संकलन व जतन तसेच सद्य स्थितीत नदीची झालेली अवस्था-प्रदूषण आणि तिच्या स्वच्छता-शुद्धतेच्या उपाययोजनांसाठी 'मी काय करू शकतो' हे भाव जागरण-प्रबोधन पथनाट्य, नृत्य, संगीत, चित्र, शिल्प, रांगोळी, सामाजिक समरसता आदी माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात महात्मा फुले कलादालन येथे शुक्रवारी झाली. नदीचे महत्त्व व नदीचे प्रदूषण या विषयावर देशभर सुमारे ९०० ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. यात नाशिकला अग्रक्रम मिळालेला आहे. त्यानुसार तीन दिवसीय कार्यक्रम होणार आहेत.

गोदास्पंदन कार्यक्रमाचा प्रारंभ त्र्यंबकेश्वर येथे सकाळी गोदा पूजन आणि स्वच्छता करून झाला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, नगराध्यक्ष स्वप्नील शेलार, पुरुषोत्तम लोहगावकर, ललित लोहगावकर, अभय मिश्रा, स्वाती राजवाडे सत्यप्रिय शुक्ल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सी. एल. कुलकर्णी, अभय मिश्रा यांची भाषणे झाली. रवींद्र बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

आज गोदास्पंदनमध्ये

गोदास्पंदनमध्ये शनिवारी, २९ डिसेंबर रोजी गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ जलतज्ज्ञ, नदीविषयक अभ्यासक, आध्यात्मिक गुरू यांच्या माध्यमातून चर्चासत्र होणार आहे. डी. एम. मोरे, सेवानिवृत्त संचालक, मेरी नाशिक हे महाराष्ट्राच्या विकासात गोदावरीचे स्थान या विषयावर बोलतील. डॉ. प्रा. प्राजक्ता बस्ते (गोदावरी नदी पूनर्जीवन), राजेश पंडित (गोदावरी पूर्वी, आता आणि पुढे), विजय निपाणेकर (गोदावरीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व), देवांग जानी (गोदावरी उपनद्या व कुंडांचे पुरातत्वदृष्ट्या महत्त्व आणि गोदावरी पुर्नवैभवासाठी अपेक्षित उपाय योजना) यांची व्याख्याने होतील. सायंकाळी साडेसहा वाजता गोदा स्पंदन स्मरणिकेचे प्रकाशन होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत कवी संमेलन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी डॉ. धोंडगे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी धोरण आखण्याच्या टप्प्यावर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. या आधी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या पदावर अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे हे चार दशकांपेक्षा अधिक काळापासून साहित्य व सांस्कृतिक वर्तुळात कार्यरत आहेत. 'संत वाड्:मय आणि शैली विज्ञानाचे अभ्यासक' म्हणून त्यांचा राज्यास परिचय आहे. 'राज्य मराठी विकास संस्था', 'साहित्य अकादमी', दिल्ली या संस्थांच्या माध्यमातूनही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ते कार्यरत राहिले आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी भाषा विभागास स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा मिळाल्याने या माध्यमातून भाषिक धोरणांना विशेष गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. दिलीप धोंडगे यांची नियुक्ती महत्त्वाची आहे.

शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शन करण्याच्या उद्देशातून भाषा सल्लागार समितीची स्थापना झालेली आहे. शासन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करणे, मराठीतील शास्त्रीय आणि तांत्रिक भाषा विकसित करणे याबाबत राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली होती.

..

मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे, राज्याचे भाषिक धोरण ठरविणे, मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी धोरण आखणे व राबविणे, त्यासाठी संशोधनाच्या प्रारूपाला गती देणे आदी उद्दिष्टे पहिल्या टप्प्यात हाती घेणार आहे.

- डॉ. दिलीप धोंडगे, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकलस्वार अपघातात जखमी

$
0
0

पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली. या घटनेत मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे. पिंपळगावहून नाशिककडे मोटारसायकलने जात असताना नासीर मोहम्मद युसूफ कुरेशी यास नाशिकहून पिंपळगावकडे येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यामध्ये कुरेशी (रा. मुंबई) हा जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. या अपघाताची पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात आज काँग्रेसची बैठक

$
0
0

सटाणा : बागलाण तालुका अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी २९ रोजी साय ५ वाजता सटाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, तालुका निरीक्षक भगवान खैरणार आदी उपस्थित असणार आहेत.

या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय गुन्हेगारांची कुंडली निर्मिती

$
0
0

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पोलिसांची सतर्कता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईस वेग देण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सराईत आणि संशयित गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात येते आहे.

आगामी निवडणुका तोंडावर असून, त्याची तयारी आतापासूनच सुरू करा. प्रतिबंधक कारवाई, समाजकंटकांवर कारवाईस गती देण्यासह राजकीय गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करा, असा आदेश राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलीगकर यांनी काही दिवसांपूर्वी दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पडसलगीकर यांनी हे आदेश दिले आहेत. जातीय तेढ, दंगली, राजकीय गुन्हेगारी अशा सर्वच बाबींवर यापुढे लक्ष केंद्रित करून कारवाई वाढविण्याबाबत त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांशी थेट संबंध असलेल्या सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली जात असून, अशा गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीवेळी नाशिकरोड भागात उमेदवारीसाठी इच्छूक सुरेंद्र शेजवळ या अनेक गुन्हे दाखल असलेल्या तरुणाची हत्या झाली होती. काही महिन्यापूर्वी भाजपशी संबंधित नगरसेवक हेमंत शेट्टी यास हत्या प्रकरणी अटक झाली. राजकीय गुन्हेगारीच्या दृष्टीकोनातून पंचवटी, नाशिकरोड तसेच अंबड पोलिस स्टेशन सर्वाधिक संवेदनशील मानले जातात. शहरातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशा गुन्हेगारांचा समावेश असून, त्यातील बऱ्याच व्यक्तीविरूद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल, खंडणी उकळणे, अपहरण, आर्म अॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजकीय पक्षांशी संबंधित गुन्हेगारांचा आढावा लवकरात लवकर घेऊन अशा व्यक्तींविरूध्द कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगारांना सुद्धा रडारवर घेतले जाणार आहे.

निवडणूक आयोगाला माहिती देणार

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाचे काम सुरू झाले आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येते आहे. ही सर्व माहिती निवडणूक आयोगास सादर केली जाते. त्यामुळे आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती उमेदवार लपवू शकणार नाहीत. दुसरीकडे, या माहितीच्या आधारावरून प्रतिबंधक कारवाईस गती देण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिष्ठेसाठी आयोग दक्ष

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

-

नाशिक : प्रतिष्ठीत व्यक्तींची नावे मतदार यादीत नसल्यास निवडणूक आयोगाची प्रतिमा खराब होते. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत असे प्रकार अनेकदा घडले असून, त्यामुळे निवडणूक विभाग तोंडघशी पडला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी निवडणूक विभाग सरसावला असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे मतदार यादीत राहतील याची विशेष दक्षता घ्या, असे फर्मान संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना सोडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अशा २५०९ व्यक्तींची महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून निवडणूक विभागाने वेगळी नोंद घेतली आहे.

मतदान हा लोकशाही व्यवस्थेने प्रत्येक भारतीयाला प्रदान केलेला मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक मतदाराने हा अधिकार बजवावा याबाबत निवडणूक आयोग यंदा कमालीचा आग्रही आहे. मतदार यादीत आपली अचूक माहिती राहील याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येक मतदाराची आहे. याखेरीज निर्दोष, अद्ययावत आणि परिपूर्ण मतदार यादी बनविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडे सोपवली आहे. मतदार यादीमधील त्रुटींनी जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही निवडणूक आयोगाची मान अनेकदा तुकली आहे. त्या त्या मतदार संघांमधील प्रतिष्ठीत व्यक्तींची नावेच मतदार यादीत नसल्याने निवडणूक यंत्रणा अनेकदा टीकेची धनी ठरली आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाने यंदा त्या त्या मतदारसंघातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींसह समाजाशी या ना त्या कारणाने जोडल्या गेलेल्या बहुपरिचित व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट राहील याची कटाक्षाने काळजी घेतली आहे. उपलब्ध मतदार यादीमधील अशा महत्त्वाच्या व्यक्तींना चिन्हांकित करण्याचे काम निवडणूक शाखेने हाती घेतले आहे. तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांची यादी बनविली असून, ती मतदार यादीतील नावांशी पडताळण्यात आली आहेत. यामुळे मतदारसंघामध्ये वास्तव्यास असूनही मतदार यादीमध्ये नावे नसलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचा शोध घेणे निवडणूक शाखेला शक्य होत असून, त्यांचे मतदार नोंदणी अर्जदेखील भरून घेण्यात आले आहेत. त्यामुळे अशा मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट झाली आहेत. मालेगाव आणि नाशिक महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक व अन्य पदाधिकारी, नगरपालिका, नगरपंचायतींचे आजी-माजी पदाधिकारी, जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, राजकीय पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, इतकेच नव्हे तर प्रशासनातील अधिकारी पदावरील महत्त्वाच्या व्यक्ती, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील सुपरिचित आणि महत्त्वाच्या अशा तब्बल २५०९ व्यक्तींच्या नावांची चिन्हांकित म्हणून वेगळी नोंद घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

..

मतदारसंघनिहाय महत्त्वाच्या व्यक्ती

मतदार संघ महत्त्वाच्या व्यक्तींची संख्या

नाशिक पूर्व ११९

नाशिक मध्य १९४

नाशिक पश्चिम २०३

मालेगाव मध्य २८५

मालेगाव बाह्य ११९

नांदगाव १११

बागलाण २१७

कळवण/सुरगाणा २९१

चांदवड/देवळा २०३

येवला १४७

सिन्नर १२७

निफाड १३०

दिंडोरी/पेठ १०४

देवळाली १३७

इगतपुरी/त्र्यंबकेश्वर १२२

एकूण २५०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. वैशाली मुळे यांना सौंदर्य स्पर्धत किताब

$
0
0

वैशाली मुळे यांचे

सौंदर्य स्पर्धेत यश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी फाटा परिसरातील रहिवाशी डॉ. वैशाली मुळे यांना नुकतेच मिसेस महाराष्ट्र क्वीन ऑफ नाशिक अॅण्ड फिटनेस दिवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे विवाहित महिलांसाठी ही स्पर्धा आयोजित कारण्यात आली होती. त्यामध्ये राज्यातून ३८० महिला सहभागी झाल्या. डॉ. वैशाली यांची सुरुवातीला टॉप ४० मध्ये तर नंतर अंतिम पाच जणींमध्ये निवड झाली. चुरशीच्या स्पर्धेत त्यांनी मिसेस महाराष्ट्र क्वीन ऑफ नाशिक आणि फिटनेस दिवाचा मुकुट पटकावला. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेला मारणाऱ्या सहा जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळ, गोरक्षनगर परिसरातील महिलेच्या डोक्यात लोखंडी सळई मारून तिला गुरुवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास बेदम मारहाण झाली होती. आपल्या पतीला नादाला लावून वारंवार घरी बोलावते या कारणावरून भांडण काढीत मारहाण करणाऱ्या सहा संशयितांवर म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित महिलेच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महिला घरात असताना जहीर शेख तेथे आला. त्याच्याशी दीपाली बोलत असताना अर्शद शेख, हाजरा शेख, जमील शेख, सायरुन शेख, जुबेर शेख व आजीम शेख हे तेथे आले. त्यातील दोन महिलांनी दीपालीला तू जहीरला नादाला का लावते, असे विचारत शिवीगाळ केली. हातातील लोखंडी सळई डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तर उर्वरित जणांनी तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात महिला जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीत आज भाजप-सेनेत लढत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावणेदोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती व उपसभापती पदासाठी आज (दि. २९) निवडणूक होत आहे. सभापतिपदासाठी भाजपच्या प्रा. सरिता सोनवणे व शिवसेनेचे सुदाम डेमसे यांच्यात लढत होत असून, उपसभापतिपदासाठी भाजपच्या वतीने प्रतिभा पवार, तर शिवसेनेच्या वतीने संतोष गायकवाड रिंगणात आहेत. समितीत भाजपचे बहुमत असले तरी शिवसेनेकडून चमत्काराची भाषा केली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.

महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महिला व बालकल्याण समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची निवडणूक सभा होईल. शिक्षण समिती सभापतिपदासाठी भाजपतर्फे प्रा. सरिता सोनवणे यांनी, तर शिवसेनेकडून सुदाम डेमसे यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. सुरुवातीला सभापतिपदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर उपसभापतिपदासाठी निवडणूक घेण्यात येईल. उपसभापतिपदासाठी भाजपच्या वतीने प्रतिभा पवार, तर शिवसेनेकेडून संतोष गायकवाड यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. या समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. समितीच्या नऊ सदस्यांपैकी पाच भाजपचे, तर उर्वरित चारपैकी तीन शिवसेनेचे तर एक कॉँग्रेसचा सदस्य आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असतांनाही शिवसेनेने ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाचखोरी

$
0
0

सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत प्रथम ५० व नंतर १० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या मुंबईनाका पोलिस स्टेशनच्या सहायक निरीक्षकाविरोधात अखेर अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १६ नोव्हेंबर रोजी एसीबीने सापळापूर्व पडताळणी केली होती.

संतोष निवृत्ती शिंदे, असे संशयित लाचखोर सहायक निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारअर्जाचा तपास करीत असताना शिंदे यांनी तक्रारदारास चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलविले होते. यावेळी एपीआय शिंदे याने तक्रारदाराकडे ५० हजारांची मागणी केली. पैसे दिले नाही तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करील, अशी धमकी शिंदे यांनी तक्रारदारास दिली होती. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी एसीबीने पोलिस स्टेशन आवारात सापळापूर्व पडताळणी केली. यावेळी संशयित शिंदे याने पंच आणि साक्षीदारांसमक्ष दहा हजाराची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. या सापळ्याची चाहूल लागताच शिंदे यांनी लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे एसीबीचा हा सापळा फसला होता. महिनाभराच्या तपासानंतर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये एपीआय शिंदे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्येबाबत आज बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. आज (दि. २९) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे. बैठकीत २० प्रकरणे ठेवण्यात येणार असल्याची माहिती टंचाई शाखेने दिली.

जिल्ह्यात चालू वर्षात १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, बँकांचा तगादा यासारख्या कारणांनी आत्महत्या केल्यास संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य सरकार एक लाख रुपयांची मदत देते. नोव्हेंबरपासूनच्या शेतकरी आत्महत्येच्या २० प्रकरणांचा या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर स्वच्छ ठेवा, नदी स्वच्छ राहील!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'नदी ही आपली जबाबदारी आहे, या अर्थाने तिच्याकडे पहायला हवे. शहरातील घाण नदीत जाणार नाही याकडे कटाक्षाने पहायला हवे. शहरात, घरात जितकी स्वच्छता अधिक असेल तितकी नदी प्रदुषित होण्यापासून वाचेल,' असा सूर गोदावरी या विषयावरील चर्चासत्रात रंगला.

संस्कारभारती व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण प्रदुषणाबाबत कलांच्या माध्यमाद्वारे जनजागृती व्हावी, या उद्देशाने आयोजित गोदास्पंदन कार्यक्रमात जलतज्ज्ञ, नदीविषयक अभ्यासक, आध्यात्मिक गुरु यांच्या माध्यमातून हे चर्चासत्र झाले.

यावेळी डी. एम. मोरे म्हणाले, 'नदी म्हणजे स्वच्छ पाणी घेऊन जाणारा प्रवाह मात्र या व्याख्येला सगळीकडे छेद दिला जातो. नदी प्रदूषित होऊ नये म्हणून जग बदलण्यापेक्षा आपण स्वत:त बदल घडविण्याची अधिक गरज आहे. आपल्या ताटामध्ये अन्न उरू नये कारण ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नदीत जाते व ती प्रदूषित होते. झाडावरील फुले तोडू नये, कारण तीही नदीत जातात.'

एन. डी. शर्मा म्हणाले,'पुराणामध्ये नदीचे माहात्म्य मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तिचे पावित्र्य जपण्याची काळजी आपण घ्यायला हवी. स्वर्ग प्राप्त करून देणाऱ्या नदीमध्ये सर्वात श्रेष्ठ गोदावरी आहे. ब्रह्मा नारद संवाद रूपाने ब्रह्मपुराणात १०५ अध्याय आहेत. कार्तिक मासाच्या कृतिका नक्षत्रावर गोदावरी स्नानाचे महत्त्व आहे.'

डॉ. प्राजक्ता बस्ते म्हणाल्या,'नदी ही सगळ्या देशात शहरी आणि ग्रामीण भागातून वाहते; परंतु दोन्ही भागांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. नदी प्रदूषण करणारा पहिला स्त्रोत म्हणजे सांडपाणी आहे. त्यावर लोकसहभागातून नियंत्रण आणले पाहिजे. किनारा हा नदीच्या जीवनाचा भाग आहे, किनारा संवर्धन जतन करण्यासाठी चिन्हांकन आवश्यक आहे.'

राजेश पंडित यांनी गोदावरी पूर्वी व आता व पुढे या विषयावर आपले मत नोंदवले. यावेळी दावांग जानी म्हणाले,'गोदावरी व तिच्या उपनद्यांची अवस्था अशी का होत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गोदापात्रातील लक्ष्मणकुंड, धनुष्यकुंड, रामकुंड, सिताकुंड यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणाला वेळ नाही. प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे.'

कार्यक्रमात 'गोदास्पंदन' या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्मरणिकेत नाशिकमधील तज्ज्ञ अभ्यासकांनी गोदावरी या विषयावर लेख लिहिलेले असून, त्यात अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले आहे. गोदावरीचे प्राचिनत्व ते गोदावरीचे आजचे स्वरूप अशा विषयांचा स्मरणिकेत समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images