Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘डोंगरार्त’चे विविध प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रुदाली विषयावर प्रकाश टाकणारे आणि शोषित महिलांच्या आयुष्यावर बेतलेले नाटक डोंगरार्त नाटकाचे नुकतेच काही प्रयोग शहरात झाले. राजस्थानी भाषेचा लेहजा मराठीतून सांभाळत पुढे सरकणारे नाटक म्हणजे मराठी नाट्य रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरत आहे.

स्त्री जीवनाच्या अंधाऱ्या वाटा अतिशय वास्तववादी पद्धतीने या नाटकातून मांडल्या आहे. त्यामुळेच रसिकांची चांगलीच दाद या नाटकाला मिळत आहे. या नाटकाचे काही प्रयोग झाले पलुस्कर सभागृह, लोकहितवादी मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संगमनेर शाखा आयोजित 'नाट्यमहोत्सव २०१८' निमित्त रविवारीदेखील स्त्री जीवनाचे एक भेदक वास्तव दर्शविणारी दोन अंकी कलाकृती 'डोंगरार्त'चे साईबाबा सभागृह, संगमनेर महाविद्यालय येथे यशस्वी प्रयोग झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्र संघात यश जोशीची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय शालेय खेळ महासंघ व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, दिल्ली यांच्यातर्फे ३ ते ९ जानेवारी दरम्यान १९ वर्षांआतील राष्ट्रीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नाशिकच्या यश जोशी याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

परभणी येथे २२ ते २५ नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेतून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे १२ खेळाडू सहभागी झाले होते. राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी मुंबई, पुणे, अमरावती, लातूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांतील खेळाडूंमधून यशची महाराष्ट्र संघात निवड झाली. थ्रो बॉल स्पर्धेचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर हे जिल्हा क्रीडा संकुल अलिबाग (रायगड) या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्राचा संघ २ जानेवारी रोजी दिल्लीकडे रवाना होणार आहे. यश आरवायके कॉलेजमध्ये शिकत आहे.

..

महाराष्ट्राचा मुलाचा संघ

सय्यद अली, अभिषेक अडोडे, मानव माने, गौरव पाटील, तुषार घुगे, शुभम जाधव, राज जगदाळे, प्रतिक पुनटकर, यश जोशी, संदीप जाधव, प्रथमेश राजपुत, हर्षल धामडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्य पदार्थांच्या गाड्यांवरील वादांवर नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाच्या पूर्वसंध्येला खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर वादविवादाचे प्रसंग उद्भवू नयेत, यासाठी पोलिसांचे कडक लक्ष राहणार आहे. या गाड्या रात्री १० वाजेच्या आत बंद करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली.

बार, परमीट रूम या ठिकाणी मिळणारे मद्य, दुकानाच्या तुलनेत महाग असल्याने अनेकजण ३१ डिसेंबर रोजी दुकानातून मद्य विकत घेत खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर 'बसतात'. अशावेळी गाड्यांवर अनेकदा ग्राहक आणि विक्रेते यांच्यात हमरीतुमरी होऊन वादाचे प्रसंग येतात. अनेकदा ग्राहक मद्यधुंद अवस्थेत असल्याने विक्रेत्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे वादावादी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील मुख्य भागात असलेल्या गाड्या रात्री १० वाजेच्या आत बंद करण्यात येणार आहेत. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली असून, संध्याकाळी ५ वाजेनंतर अशा ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. द्वारका, नेहरू गार्डन, तिबेटियन मार्केट, पंचवटी, नाशिकरोड, सिडको चौपाटी, सातपूर या ठिकाणी विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे.

विक्रेत्यांनी घेतला बंदचा निर्णय

वर्षभर खाद्यपदार्थांच्या गाड्या व्यवस्थित सुरू असतात. मात्र गटारी आमावस्या आणि ३१ डिसेंबरच्या रात्री तुरळक प्रकार जरी घडला तरी हे विक्रेते पोलिसांच्या रडारवर येतात. त्यामुळे काही विक्रेते दरवर्षी दुकाने बंद ठेवतात. यंदा नेहरू गार्डन येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ३१ डिसेंबर रोजी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आमच्याकडे कुटूंबासह ग्राहक येत असतात. ३१ डिसेंबर रोजी टवाळखोर मुलांमुळे व्यवसाय बदनाम होतो. ग्राहकांना त्रास नको म्हणून आम्ही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- ताराचंद पाथरे, विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिस्तबध्द नेतृत्व विकसित करा

$
0
0

स्काऊट गाईड उपाध्यक्षा अॅन शुई यांचा सल्ला

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्काऊट गाईड हे माध्यम उद्याचे सक्षम नागरिक घडविण्यासाठी महत्त्वाचे अजून, या व्यासपीठाचा वापर विद्यार्थ्यांनी शिस्तबध्द नेतृत्व विकसित करण्यासाठी करायला हवा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय स्काऊट अँड गाईडच्या उपाध्यक्षा अॅन शुई यांनी दिला. 'बॉस्कोरी २०१८' या महासंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

तेराव्या अखिल भारतीय स्काऊट गाईड महासंमेलनाचा (बॉस्कोरी २०१८) रविवारी उद्घाटन सोहळा झाला. नाशिकमध्ये प्रथमच होणाऱ्या या महासंमेलनाचे कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को संस्थेच्या आवारात दुपारी ३ वाजता उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी २२ राज्यांतून आलेल्या स्काऊड अँड गाईडच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादरी केले. महासंमेलनात सहभागी शाळांच्या संघांनी परेड करीत मान्यवरांना मानवंदना दिला. यावेळी आंतरराष्ट्रीय स्काऊट अँड गाईडच्या उपाध्यक्षा अॅन शुई, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महासंमेलनाचे प्रमुख फादर इअन डोल्टन यांसह सिस्टर डोरा थॉमस, फादर ऑल्बर्ट जॉनसन, फादर सॅव्हिओ सिल्वेरा, बिशप लुईस डॅनियल, फादर के. एम. जॉस व्यासपीठावर होते.

पोलिस आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले, की बॉस्कोरीसारख्या महासंमेलनातून शिस्तीचा संदेश जगभरात पोहोचवला जात आहे. जगात शांतता राखली जावी. त्याचबरोबरीने धार्मिक एकता असावी, यासाठी स्काऊड गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रतिनिधीत्व करायचे आहे. या उद्घाटन सोहळ्यात स्काऊट अँड गाईडच्या शिबिरांवर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. सोहळ्यातून एकता, बंधुता आणि शांततेचा संदेश देण्यात आला.

...

\Bचार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग\B

या महासंमेलनात महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, झारखंड यासह २२ राज्य, दोन संघराज्य आणि आशियायी देशांतून ४ हजार ५५५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २०० तंबू उभारण्यात आले असून, डॉन बॉस्को शाळेच्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवली आहे. ३ जानेवारी २०१९ पर्यंत हे महासंमेलन सुरू राहणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टॅम्प घोटाळा: तेलगी प्रकरणाचा आज निकाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोट्यवधी रुपयांच्या स्टॅम्प घोटाळ्यातील तेलगी प्रकरणाचा निकाल सोमवारी जिल्हा न्यायालय देणार आहे. जिल्हा न्यायधीश पी. आर. देशमुख, वर्ग १ यांच्याकडे या प्रकरणाची गेले काही महिने नियमित सुनावणी सुरू होती. देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू झाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी या प्रकरणात आरोपी आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २५ ऑगस्ट २००४ मध्ये या प्रकरणात तेलगीसह सहा आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१५ मध्ये या संशयितांवर आरोपपत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रकरणात नाशिकरोड येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून स्टॅम्प छापल्यानंतर ते देशभर रेल्वेने पाठवले जात होते. तेलगीने रेल्वे सुरक्षा बलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हे स्टॅम्प चोरीचा प्रकार सुरू केला. स्टॅम्प घोटाळ्याची सुरुवात येथूनच झाली. या चोरीतून नंतर तेलगीने पुढे ३२ हजार कोटींचा घोटाळा केला.

तेलगीने मुद्रांकाचे महत्त्व ओळखून त्याने नाशिकरोड येथील छापखान्यापासून देशभरातील मुद्रांक वितरण प्रणालीचा अभ्यास केला. त्यानंतर त्याने रेल्वे पोलिसांशी संधान बांधून हे स्टॅम्पपेपर चोरी केले. पोलिसांशी संगनमत झाल्यामुळे सुरुवातील त्याने खरे स्टॅम्पपेपर विकले. यावेळी ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्याला मदत केली त्यांच्याविरुध्द नंतर गुन्हे दाखल झाले. त्यात साक्षीदारांची तपासणी होऊन साक्ष घेण्यात आली.

...

अशी माहिती मिळू लागली

चोरलेल्या मुद्रांकांच्या पैश्यातून नंतर तेलगीने रेल्वे कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्याबरोबर संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे नंतर त्याला या स्टॅम्पपेपरची घरबसल्या माहिती मिळू लागली. त्यानंतर त्याने बंदोबस्त व सुरक्षा यंत्रणेतल्या उणिवाही शोधून काढल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुंगटामध्ये वार्षिक क्रीडामहोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जु. स. रुंगटा हायस्कूलचा वार्षिक क्रीडामहोत्सव २७ ते २८ डिसेंबर दरमान्य संस्थेच्या आवारात पार पडला. यावेळी विविध मैदानी व बैठ्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

२७ डिसेंबर रोजी सांघीक क्रीडा स्पर्धा तर २८ डिसेंबर रोजी वैयक्तिक स्पर्धा झाल्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेत १६८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

१४ वर्षाखालील मुले

प्रथम- यश अहिरे

द्वितीय - लोकेश पवार

तृतीय-कृष्णा देशमुख

१७ वर्षाखालील मुले

प्रथम-अनिकेत तुरे

द्वितीय-चेतन क्षीरसागर

तृतीय-वैभव सिरसाट

५० मीटर धावणे

११ वर्षखालील मुले

प्रथम--वेदांत चांदवडकर

द्वितीय- शुभम बुरकुल

१२ वर्षाखालील मुले

प्रथम-योगेश चव्हाण

द्वितीय-ओम व्यवहारे

१३ वर्षाखालील

प्रथम --रोहन सोपे

द्वितीय -दिपक भोई

१४ वर्षाखालील मुले

प्रथम--भरत जाधव

द्वितीय -ओम देशमुख

१५ वर्षाखालील

प्रथम--जुएल राजा मन्सूरअली

द्वितीय -सत्यम आखाडे

१६ वर्षाखालील मुले

प्रथम--गौतम विश्वकर्मा

द्वितीय- अभिषेक धाडगे

गोळफेक

१४ वर्षाखालील मुले

प्रथम-रोहित भोये (७.०२ मीटर)

द्वितीय- अक्षय पांचाळ (५.४८ मीटर)

तृतीय -रुद्र जावरे (५.१४ मीटर)

१७ वर्षाखालील मुले

प्रथम-- आकाश भोई (८.६३ मीटर)

द्वितीय-रोशन भांगरे (८ ३२ मीटर)

तृतीय- जुएल राजा मन्सूरअली (७.८०मीटर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाराजांचा भाजपमध्ये बंड!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर काँग्रेस राष्ट्रवादीतून उमेदवारांची आयात करत, पालिकेत त्यांच्या बळावर सत्ता स्थापन केली आहे. परंतु, आता भाजपच्या काही नेत्यांकडून या नगरसेवकांवर पक्षशिस्तीच्या नावाखाली काँग्रेसचा शिक्का लावला जात असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीमधून आलेले नगरसेवक त्रासाने अस्वस्थ झाले आहेत. भाजप नेत्यांकडून वारंवार 'काँग्रेसी'चा शिक्का मारून त्यांचा उद्धार केला जात असल्याने भाजपलाच धडा शिकवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. भाजप नेत्यांच्या उद्धाराने नाराजांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बंड पुकारत भाजपला झटका देण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिका निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने तडजोड करत, पक्षातील निष्ठांवताना डावलून इतर पक्षातून उमेदवार आयात केले. त्यात विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेतील नगरसेवकांचा समावेश होता. इतर पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांच्या बळावरच महापालिकेत भाजपचे कमळ फुलले. प्रथमच ६६ नगरसेवक निवडून आल्याने भाजपची महापालिकेवर एकहाती सत्ता आली. भाजपकडून निवडून आलेल्या ६६ पैकी ४८ नगरसेवक हे अन्य पक्षातून आयात झालेले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांचाच आता पक्षावर दबदबा निर्माण झाला आहे. भाजपकडून एकाच वेळी निष्ठावतांना सांभाळण्यासह नव्याने पक्षात आलेल्यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे. अन्य पक्षातून आलेल्या नगरसेवकांची कामाची स्टाईल वेगळी असल्याने ती आता भाजपच्या संस्कृतीत बसेनासी झाली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांशी आता बाहेरून आलेल्या नेत्यांबरोबर खटके उडायला लागले आहेत. नेत्यांना जाब विचारला तर, थेट त्यांच्यावर काँग्रेस संस्कृतीचा आरोप लावला जात आहे. त्यामुळे या नेत्यांची गोची झाली आहे. तर अन्य पक्षातून आलेल्या काही नगरसेवकांना आता भाजपच्या कारभाराशी जुळवून घेणे अवघड झाले आहे. त्यातच महापालिकेत भाजपचा कारभार भरकटल्याने या नेत्यांचीच कोंडी झाली आहे. त्यातच पदे वाटप करताना विशिष्ट नेत्यांच्या मर्जीतील नगरसेवकांनाच झुकते माप दिले जात आहे. पालिकेत सत्ता स्थापन होवून पावणे दोन वर्ष झाले तरी, विकासकामांच्या नावाने बोंबा आहेत. नगरसेवकांना दमडीचाही निधी मिळत नसल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागली असतानाच, त्यांना आता बाहेरून आल्यावरून हिनवले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये असलेला एक मोठा गट पक्षाच्या नेत्यांवर नाराज झाले असून, त्यांनी भाजपमध्ये राहूनच वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून हिनवले जात असेल तर, स्वतंत्र गटच करा, अशी मोर्चेबांधणी काही वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे.

निवडणूक जिंकण्यासाठीच भाजपला आपण हवे होतो का, असा सवाल हे नेते करत असून, भाजपकडून सतत होणारा अपमान आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमची मते भाजपला चालतील काय असा सवालच हे नगरसेवक भाजप नेत्यांना करत आहेत. त्यामुळे भाजपची कोंडी अधिकच वाढली असून, या नेत्यांची मनधरणीही सुरू करण्यात आली आहे.

पदे वाटपातही अन्याय

महापालिकेत पदे वाटप करताना विशिष्ट नेत्यांच्या जवळच्यांनाच उमेदवाऱ्या दिल्या जात आहेत. विशेषता पंचवटीतील नगरसेवकांना झुकते माप दिले जात असल्याने नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. पालिकेतील विविध समित्यांमध्येही पंचवटीचेच वर्चस्व आहे. त्यामुळे एकाच विभागात पदे जात असल्याने अन्य विभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे या नाराज गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून, ठराविक नेत्यांना स्थायीवर पाठवणे आणि समित्यांमध्येच मर्जीतल्या नगरसेवकांनाच स्थान मिळत असल्याने पदे वाटपातील ही नाराजी भाजपला लोकसभा निवडणुकीत अडचणीची ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाभरात खाकीचा ‘वॉच’

$
0
0

चाळीस पोलिस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक\B

\Bवर्षअखेरच्या दिवशी नागरिकांच्या सेलिब्रेशन मूडचा फायदा घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तींनी डोके वर काढू नये, यासाठी जिल्हाभरातील ४० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खाकीचा कडक 'वॉच' राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील ४० पोलिस ठाणे, चेक पोस्ट आणि संवेदनशील ठिकाणांवर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात येणार आहे. याशिवाय 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'वर लगाम लावण्यासाठी 'ब्रेथ अॅनालायझर'चाही वापर केला जाणार आहे.

जिल्हाभरातील ४० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वर्षअखेरच्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी यंत्रणेस सूचना दिल्या आहेत. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगाव विभागासाठी प्रभारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

\B..

\Bहॉटेल्स, ढाबे रडारवर\B

\Bया बंदोबस्तादरम्यान गाव आणि शहरांमधील चेकनाक्यांसोबतच जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, रिसॉर्ट, हॉटेल्स, ढाबे, मॉल्स आदी परिसरावरही कडक वॉच ठेवला जाणार आहे. जिल्ह्यातील महामार्ग आणि वर्दळीच्या ठिकाणांवर करण्यात येणाऱ्या नाकाबंदीदरम्यान प्रत्येक वाहनचालकाची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या पथकांकडून ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई सुरू राहणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर परराज्यातून अवैधरित्या होणारी मद्यविक्री आणि वाहतुकीस प्रतिबंध होण्यासाठी चेकपोस्टवर नाकाबंदी लावून कारवाई करण्यात येणार आहे. मद्य प्राशन करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवरही दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

...

सज्जतेसाठी गोळीबाराची प्रात्यक्षिके \B

\Bजिल्हाभरात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहचू नये, याकरिता सज्जतेसाठी ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने ४० पोलिस ठाण्यांअंतर्गत मॉकड्रील सुरू आहे. यात दंगल नियंत्रक पथक, शीघ्र कृती दल व पोलिस अधिकाऱ्यांकडून गोळीबारांची प्रात्यक्षिके सुरू आहेत. सोबतच गोळीबार मैदानावर गोळीबाराचाही सराव सुरू आहे.

...

दामिनी पथकेही तैनात\B

\Bमहिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथकेही पोलिसांनी तैनात केली आहेत. साध्या वेशातील महिला पोलिस कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी वॉच ठेवून असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायालयातील मारुतीची सोमवारी पुर्नप्रतिष्ठापना

$
0
0

नाशिक : नाशिक जिल्हा न्यायालय आवारात असलेल्या प्राचीन मारुती मंदिरातील मूर्तीवर साचलेला शेंदूर काढल्यानंतर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मंदिरावरील कलशारोहण व ध्वजारोहण समारंभ प. पु. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य प. पु. संतोषगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सोमवार, ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. न्यायालय आवारातील श्री मारुतीचे मंदिर १९७१ पासून अस्तित्वात असून, त्याआधी १९३८ साली प. पु. शिवशिवबाबा यांनी न्यायालय आवारातील झाडाखाली या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे सांगितले जाते. त्यानंतर १९८५ साली जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यासाची नेमणूक करण्यात आली. या मंदिरात शनिवार २९ डिसेंबरपासून प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असून, आज मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मूर्तीचे दर्शन सर्व भाविकांसाठी खुले करण्यात येईल. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यासाचे अध्यक्ष व प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त ॲड. अमित जुन्नरे, प्रशांत जोशी, विक्रांत माने, मनिषा मेहता, राघवेंद्र अंकलगी, जगदीश देवरे, श्रीपाद देशपांडे गुरुजी आणि न्यासाचे सचिव आर. जी. सोनवणे प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड रेल्वे स्थानकात रुळाला तडा, मोठा अपघात टळला

$
0
0

नाशिकः

मनमाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर रुळाला तडा गेल्याचं लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे. काचीगुडा- शिर्डी - काकी नाडा एक्सप्रेस येण्यापूर्वी काही मिनिटे आधी रेल्वे रुळाला मोठा तडा गेल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं काकीनाडा एक्सप्रेस रोखण्यात आली.

सकाळी सातच्या सुमारास काकी नाडा एक्सप्रेस मनमाड स्थानकात येण्यापूर्वी रेल्वेरुळांची पाहणी करणाऱ्या गँगमनना रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधितांना माहिती दिली. काकी नाडा एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकात येण्यापूर्वीच रोखण्यात आली, रेल्वे रूळ जोडण्याचे काम तातडीने करण्यात आले व नंतर रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. थंडीमुळं रुळाला तडा गेल्याचं रेल्वे प्रशासनानं प्राथमिक पाहणीनंतर स्पष्ट केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याच्या महापौरपदी चंद्रकांत सोनार

$
0
0

धुळेः

धुळे शहराच्या महापौरपदी भाजपचे चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, उपमहापौरपदी नगरसेविका कल्याणी अंपळकर या निवडून आल्या आहेत. महापालिका निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाल्यामुळं महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट होते. ती औपचारिकता आज पूर्ण झाली.

धुळे महापालिकेच्या सातव्या निवडणुकीत भाजपनं ७४ पैकी ५० जागा जिंकल्या आहेत. विजयानंतर आज सकाळी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख हेही यावेळी उपस्थित होते. महापौर व उपमहापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनंही उमेदवार दिला होता. मात्र, शहर विकासासाठी जनतेनं भाजपला कौल दिला असल्याचं सांगत दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळं भाजप उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Telgi stamp papers scam: सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

$
0
0

नाशिक

देशभर गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्वच्या सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज हा निकाल दिला. तेलगी स्टॅप घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा आधीच मृत्यू झाला आहे.

३२ हजार कोटींहून अधिक असलेल्या या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी ४९ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. या घोटाळ्याची २००३ पासून सुनावणी सुरू होती. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास देण्यात आला होता. आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी हा निकाल सुनावला. भक्कम पुराव्याअभावी सर्वच्या सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवासी होता. अब्दुल करीम आणि त्याच्या भावांनी नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमधील जुनी मशिनरी आणून बनावट मुद्रांक व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाला पाकिस्तान आणि बांगलादेश या ठिकाणाहून छुपे पाठबळ होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट

$
0
0

\Bस्कूल बॅगचे वाटप\B

नाशिक : नाशिक हिंदी सभा या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालोयपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. श्रमिकनगर परिसरातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या वेळी शाळेतील सभेचे अध्यक्ष आर्किटेक्ट सुरेश गुप्ता यांच्यासह सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

\Bवधू-वर मेळावा\B

नाशिक : प्यारा परिवार नाशिक संस्थेतर्फे अखिल भारतीय सिंधी वधू-वर मेळावा होणार आहे. पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये सहा जानेवारी रोजी वधू-वर मेळावा होणार आहे.

\B

आज बैठक\B

नाशिक : नाशिक जिल्हा केबल ऑपरेटर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी, १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. मुंबई नाका येथील कालिकादेवी मंदिर सभागृहात ही बैठक होईल. बैठकीत ट्रायने ठरवलेले एमआरपी धोरण, एमएसओेकडून येणाऱ्या अडचणी या विषयांवर चर्चा होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डुबेरे, देवपूर येथेविकासकामांचा प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिन्नर

डुबेरे व देवपूर येथे विविध विकासकामांचा प्रारंभ सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. त्यांच्या हस्ते सटुआई मंदिर भक्तनिवास, गावातील रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण, एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि स्मशानभूमी शेड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. डॉ. सावंत यांनी सांगितले, की लोकांच्या गरजा ओळखून कामे करणारा आमदार म्हणून राजाभाऊ वाजे यांचा लौकिक झाला आहे. डुबेरेच्या सटूआईने त्यांच्या कपाळावर आमदारकीच्या पाच टर्म पूर्ण करतील, असे भविष्य लिहिलेले असल्याचा उल्लेख मंत्री डॉ. सावंत यांनी केला. याच विधानाचा त्यांनी देवपूर येथे पुनरुच्चार केला.

देवपूर येथे जिल्हा नियोजन मंडळ व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज व अद्ययावत इमारतीचे लोकार्पण डॉ. सावंत यांच्या हस्ते झाले. आमदार वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, आरोग्य संचालक संजीव कांबळे, उदय सांगळे, निमाचे संचालक राजेश गडाख, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन भाबड, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, बाजार समितीचे माजी सभापती नामदेव शिंदे, संजय सानप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन वसंत आव्हाड, व्हा. चेअरमन छबू थोरात आदी उपस्थित होते.

आमदार वाजे यांनी आपल्या खास शैलीतून विरोधकांचा समाचार घेतला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सांगळे यांनी आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले, तसेच आमदार वाजे यांनी जिल्ह्यात अन्य आमदारांच्या तुलनेत सर्वाधिक चांगली विकासकामे उभी केली असल्याचेही त्या म्हणाल्या.

देवपूरला शवविच्छेदन सुविधा देणार

नाशिक : देवपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितपणे विचार करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. सिन्नर तालुक्यात देवपूर येथील आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, की प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सर्व सुविधांनी युक्त आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल. तत्पूर्वी डॉ. सावंत यांच्या हस्ते सामाजिक सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागत अन् जल्लोष!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉटेल्समध्ये केलेली आकर्षक रोषणाई, रेस्टॉरंटसह कॅफेबाहेर सेल्फी काढण्यात दंग असलेली तरुणाई, नववर्षाच्या स्वागतासाठी कापण्यात आलेले केक अन् रात्री ठिक १२ वाजता आकाशात सोडलेले स्काय लॅम्प, अशा उत्साहवर्धक वातावरणात 'हॅपी न्यू इयर' म्हणत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईमध्ये सायंकाळपासून उत्साह दिसला. कॉलेज रोड, गंगापूर रोडसह उपनगरांत नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची गर्दी झाली. अनेक हॉटेल आणि कॅफेमध्ये न्यू इयर पार्टी आणि इतर कार्यक्रम आयोजित केले होते. न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी रात्री १० नंतर कॉलेज रोडवर तरुणाईसह मोठ्यांनीही ग्रुपने हजेरी लावली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सकाळपासूनच पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात येत होते.

कॉलेज रोडवरील मॉडेल कॉलनी चौक, गंगापूर रोड परिसरातील बापू पूल, सिटी सेंटर मॉल, गंगापूर शिवारातील वायनरी, शहराबाहेरील रिसॉर्टसह खवय्यांच्या पसंतीस पुरेपूर उतरलेली हॉटेल्स, अशा स्पॉटवर न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी गर्दी झाली होती. शहरातील लहान-मोठ्या सोसायटींनी सोसायटीत राहणाऱ्यांसाठी न्यू इयर पार्ट्यांचे आयोजन केले होते. फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर नवीन वर्षाचे संकल्प तरुणाईकडून अपलोड करण्यात आले. या ट्रेंडमध्ये 'न्यू इयर अवॉर्ड्स'सारखे ट्रेंड यंदाही हिट असल्याचे दिसून आले.

- सविस्तर वृत्त...प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मौलाना घेणार पुढाकार!

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

सरकारने सुरू केलेल्या गोवर, रुबेला लसीकरणास शहरातील मुस्लिमबहुल भागात कमी प्रतिसाद मिळत असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याचे गांभीर्य लक्षात घेत सोमवारी स्वतः मालेगावचा दौरा केला. या वेळी मौलानांसह मुस्लिम बांधवांशी केलेल्या चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, स्थानिक उर्दू भाषेतून पत्रक, जाहिरात याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. मशिदीतदेखील नागरिकांना माहिती देणार असल्याची ग्वाही मौलानांनी दिल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांना माहिती दिली.

आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा शहरातील प्रमुख मौलाना, मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी मालेगाव शहर लसीकरणात मागे राहू नये, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असून, शहरातील मुस्लिम बांधवांनीही याबाबतचे गैरसमज बाजूला सारून बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. जिल्ह्यात ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण झालेले असताना शहरातील मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत सोशल मीडियाद्वारे गैरसमज पसरवले जात आहेत. यामुळे मालेगावात केवळ ४७ टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा टक्का वाढावा, यासाठी आरोग्यमंत्री सावंत यांनी सोमवारी सायंकाळी शहरातील सुलेमानी चौकातील जमिएत- ए- उल्मा संघटनेच्या कार्यालयात मौलानांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत संघटनेचे अध्यक्ष मौलाना हमीद जमाली, काझी एकलाख झामाली, मौलाना मुफ्ती इस्माईल, आरोग्याधिकारी डॉ. किशोर डांगे, डब्ल्यूएचओचे डॉ. अजहर आदी उपस्थित होते.

उर्दूतून जनजागृती करणार

या वेळी मौलानांशी झालेल्या चर्चेनंतर डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील मुस्लिमबहुल भागात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे मान्य करीत मालेगाव लसीकरणात मागे राहू नये, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. गोवर, रुबेला लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे. शहरातील मुस्लिम समुदायात याबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी येथील मौलानांना आवाहन केले आहे. स्थानिक उर्दू भाषेतून पत्रक, जाहिरात याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. मशिदीतदेखील नागरिकांना माहिती देणार असल्याची ग्वाही मौलानांनी दिल्याचे मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. अनेक मुस्लिम देशांत गोवर, रुबेलाचे लसीकरण पूर्ण झाले असून, यापासून बालकांना कोणताही धोका नाही. मुस्लिम बांधवांनी या लसीकरण मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी जमिएत- ए- उल्मा संघटनेच्या अध्यक्षांनी लसीकरण करण्यासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

मालेगावला प्राधान्य देणार

शहरातील आरोग्य यंत्रणेविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता, शहरातील आरोग्यसेवा सुधाराव्यात यासाठी सामान्य रुग्णालयासह लवकरच महिला व बालकांसाठी रुग्णालय कार्यान्वित करण्यात येईल. आगामी काळात आरोग्य विभागातील भरतीत मालेगावातील पदे भरण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शहर व परिसरातील स्थानिक डॉक्टरांनी सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री सावंत यांनी केले. स्थानिक डॉक्टरांनी सेवा दिल्यास त्यांना मानधन देण्याचादेखील विचार आरोग्य विभागाकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले.

रिक्त पदे लवकरच भरणार

नाशिक : उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षकांसह स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञांची पदे लवकरच भरण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी दिली. उमराणे येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, की ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्टर तयार होत नाहीत. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. एनएचएमच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंत पगार देण्याची, तसेच कामगिरीवर आधारित मानधन देण्याचीदेखील तयारी आहे. त्यामुळे डॉक्टरांनी ग्रामीण भागात सेवा द्यावी. येत्या काही दिवसांत १०८ रुग्णवाहिकेचा मार्ग बदलण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी आमदार डॉ. राहुल आहेर, सरपंच लताबाई देवरे, जिल्हा परिषदेचे सदस्य यशवंतराव शिरसाठ, पंचायत समिती सदस्य धर्मा देवरे, प्रशांत देवरे आदी उपस्थित होते.

प्रत्येक मूल संरक्षित व्हावे

मालेगाव शहरातील प्रत्येक मूल गोवर, रुबेलापासून संरक्षित होणे गरजेचे असून, त्या दृष्टीने जनप्रबोधन करण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य कुटुंब व कल्याणमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.

मालेगाव येथे मौलवी यांच्यासोबत जतेतुर उल्माच्या कार्यालयात आयोजित गोवर, रुबेला लसीकरणाबाबत चर्चेदरम्यान ते बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, की पोलिओप्रमाणे गोवर, रुबेलाचे उच्चाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुस्लिम समाजातील नागरिकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करून मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृतीवर विशेष भर देण्यात येईल. गोवर, रुबेला लसीकरण मुस्लिम देशांसह जगातील १४९ देशात झाले असून ते पुर्णत: सुरक्षित आहे. लसीकरणाबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. शंका असल्यास आरोग्य विभागाकडून माहिती घेऊन आपल्या ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मालेगाव शहरातील वैद्यकीय सुविधांची गरज लक्षात घेता आणखी एक रुग्णालय देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही डॉ.सावंत म्हणाले. त्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींशी आणि मौलवी यांचेशी लसीसकरणाबाबत चर्चा केली. यावेळी आरोग्य संचालक डॉ.संजीव कांबळे, उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आरोग्य अधिकारी डॉ.किशोर डांगे, अब्दुल हमीद जमाली, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर पल की कहाणीं...

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

--\B

सूरमय मैफलीने रंगत

\Bनाशिक : मनातील भावनांचा ठाव घेणारे शब्द अन् त्या शब्दांतून जीवनाचे विविध पैलू उलगडणारी गाणी. ही गाणी सुरांचा मागोवा घेत होती अन् शब्दसुरांचा अनोखा मिलाफ घडत होता. शब्द आणि सुरांनी रसिकांना मोहून टाकणारी सोमवारची ही रात्र नाशिककरांसाठी सूरमय ठरली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला संकल्पांना अन् स्वागताला उत्साहात साथ मिळाली, ती साहीर लुधियानवी यांनी गायलेल्या सूरमधूर गीतांच्या मैफलीची. विश्वास को-ऑप बँकेच्या वतीने 'साहिर - हर पल का शायर....' या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले. गंगापूर रोड येथील विश्वास गार्डनमध्ये सोमवारी संध्याकाळी ६ वाजता ही मैफल रंगली. प्रसिद्ध गायक मिलिंद धटिंगण, विवेक केळकर आणि गायिका रागिणी कामतीकर यांनी विविध गीते सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाय्यक पोलिस आयुक्तांना धक्काबुक्की

$
0
0

चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : धावण्याची स्पर्धा सुरू असताना स्पर्धकांमध्ये कार घेऊन जाण्याचा आग्रह धरत सहायक पोलिस आयुक्तांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणाऱ्या चौघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. संशयितांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या प्रकरणी अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. यामुळे संशयितांची सेंट्रल जेलला रवानगी करण्यात आली. विशाल वाणी (वय ३०), प्रांजल कोठावदे (२७), पंकज कोठावदे (३५, तिघे रा. जळगाव) आणि राजू लांडे (३० रा. नाशिक) अशी या संशयितांची नावे आहेत. 'जॉइन द चेंज' या तंबाखूमुक्त नाशिक उपक्रमातंर्गत शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या नाइट रनदरम्यान हा प्रकार घडला. रविवारी (दि. ३०) रात्री स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा कॅनडा कॉर्नर येथून जात असताना पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक थांबविली होती. यात वाणी आणि कोठावदे दाम्पत्य कारमध्ये होते. संशयित आरोपी आणि चालक असलेला वाणी सातत्याने हॉर्न वाजवत होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, वाणीने त्याकडे दुर्लक्ष केले. या वेळी तिथे फक्त दोन पोलिस कर्मचारी होते. सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते तिथे आले. त्या वेळी वाणीने हॉर्न वाजविण्याचा प्रकार आणखी वाढविला. त्यावर नखाते यांनी संशयितास बोलावून ही स्पर्धा पाच मिनिटांत संपेल आणि त्यानंतर तुम्ही जा, असे सांगितले. मात्र, चालक वाणी थेट धावून आला. त्याला बाजूला करीत असताना प्रांजल कोठावदे या महिलेने कारमधून खाली उतरत शिवीगाळ करून नखातेंसह इतर पोलिसांवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच अतिरिक्त कुमक मागविली. याच दरम्यान तिथे बघ्याची गर्दी जमली होती. त्यातील लांडे यानेदेखील पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सरकारवाडा पोलिस स्टेशनची अतिरिक्त कुमक आल्यानंतर या चौघांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले. कोठावदे यांच्या कारमध्ये आणखी एक महिला व दोन मुले होती. पोलिसांनी शहरातील काही नातेवाइकांचा शोध घेऊन मुलांना त्यांच्या ताब्यात दिले.

चोवीस तासांत आरोपपत्र

स्पर्धेबाबत, तसेच बदललेल्या मार्गाबाबत प्रसिद्धिमाध्यमांमधून जनजागृती करण्यात आली होती, तरीही संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या घटनेची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली. संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालाच, पण अवघ्या चोवीस तासांत त्यांच्याविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामुळे चौघाही संशयितांची नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरपूर्व तपासणीशिबिराला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शहरातील नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गिरणारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सरपूर्व आरोग्य तपासणी शिबिर झाले. नामको रुग्णालयाचे डॉ. पंकज दाभाडे यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरात कॅन्सरची लक्षणे, निदान व उपचार या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सेक्रेटरी शशिकांत पारख यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर झाले. गिरणारे गावासह परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य केंद्राचे डॉ. एस. डी. पाटील, स्वाती पवार व डॉ. मनोज रायते यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारली चित्रांनी सजली कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आयोजित 'चित्रांजली' उपक्रमात अनेक कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रांगोळी, कॅनव्हास, पॉट, हँडमेड पेपर, झाडांची पाने यासह चक्क कारवरही वारली चित्रे रंगविण्यात आली. मविप्र संचलित आर्किटेक्चर कॉलेजच्या प्रांगणात दोन दिवस चित्रमय वातावरण निर्माण झाले. आदिवासी वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी या आगळ्यावेगळ्या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले.

साहित्य, विषय, आकार, रंगसंगती याबाबत कोणतेही बंधन नसलेला मुक्ताविष्कार ही संकल्पना होती. सर्वांच्या सहभागाने ती यशस्वी झाली. प्रेमदा दांडेकर यांनी प्रवेशद्वाराजवळ भव्य वारली रांगोळी काढून सर्वांचे स्वागत केले. विलास देवळे या आदिवासी वारली युवकाने मोराचे सुंदर चित्र रेखाटले. व्यवसायाने अभियंता असणाऱ्या हर्षद थविल याने वारली संस्कृती चित्रबद्ध केली. महेंद्र भोये याने जिव्या मशे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले. श्वेता गरे हिने वारली चित्रशैलीत दशावतार चित्रित केले. स्वाती मोरे हिने कापडी पिशवीवर वारली चित्रे रंगवली. अॅड. अपूर्वा भांडारे हिने सर्वधर्मसमभाव चित्रातून व्यक्त केला. याशिवाय उत्कर्षा जोशी, मीनाक्षी राऊत, सोमनाथ चव्हाण, ऋतुजा कदम, कविता चिपळूणकर, नेहा बर्वे, जान्हवी पाठक, हर्षा रामोळे यांनीही विविध वारली चित्रे साकारली.

'चित्रांजली'चा गौरव!

आदिती पळसुले हिने चक्क चारचाकी कार आणून त्यावरच वारली चित्रे रंगवली. विद्यार्थी, कलारसिकांना निसर्ग, आदिवासी जीवनशैली यांचे सुरेख दर्शन घडविले. या उपक्रमात सहभागी होऊन 'चित्रांजली' अर्पण करणाऱ्या कलाकारांना प्राचार्या प्राजक्ता बस्ते यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दोन दिवस या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. नाशिककर चित्ररसिकांनी त्याचा आस्वाद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images