Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

थंडीपासून अंशत: दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डिसेंबर महिन्यापासून शहर थंडीच्या लाटेमुळे गारठले आहे. किमान तापमानातील घसरणाबरोबरच हवेतील गारवा शहरवासीयांना त्रस्त करणारा ठरत होता. हवेतील गारवा कमी झाल्यामुळे बुधवारी मात्र, थंडीपासून काहीसा दिलासा नाशिककरांना मिळाला. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात चढ-उतार कायम राहणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

राज्यात बहुतांश भागात काही दिवसांपासून थंडीचा कहर सुरू आहे. सकाळी हुडहुडी भरवणारी थंडी आणि दिवसभर थंडीचे बोचरे वारे असा अनुभव नाशिककरही घेत आहेत. वाहत्या वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत होते. शहरात २९ डिसेंबर रोजी ५.१ अंश सेल्सियस असलेले किमान तापमान ३० डिसेंबर रोजी ७ अंश सेल्सियसवर स्थिरावले होते. ३१ डिसेंबर रोजी ७.२ अंश सेल्सियस, १ जानेवारी रोजी ६.२ अंश सेल्सियस तर २ जानेवारी रोजी पुन्हा किमान तापमान ७.१ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. साधारणत: चार दिवसांच्या कालावधीत २ अंश सेल्सियसने तापमान वाढले. किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही चार दिवसात ६ अंश सेल्सियसनी वाढ झाली आहे. २९ डिसेंबर रोजी २५.३ अंश सेल्सियस असलेले कमाल तापमान २ जानेवारी रोजी ३१.८ अंश सेल्सियसवर स्थिरावले. तापमानाच्या या चढ उतारामुळे व वाहणारे गारे वारे नसल्याने थंडी कमी झाल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेतक महोत्सवात सिनेकलाकारांची मांदियाळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे सुरू असलेल्या चेतक महोत्सवात ४ जानेवारी रोजी सिनेकलाकारांची उपस्थिती असणार आहे. देशभर प्रसिध्द होत असलेल्या या घोडेबाजाराचे आकर्षण चित्रपत्रसृष्टीला अगोदरपासूनच आहे. त्यामुळे या फेस्टिव्हलमध्ये सिनेकलाकार शेखर सुमन, रणदीप हुडा, अर्चना पुरणसिंग, परमीत सेठे, अली फजल येणार आहे.

सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत ते येथे असणार असून, त्यात ते संपूर्ण महोत्सवाचा आनंद घेणार आहेत. या महोत्सवात हे कलाकार अश्व महोत्सव पाहणी, टेंट सिटी भेट व छोटेखानी करमणुकीच्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहेत. १२ जानेवारीला या महोत्सवाचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर विविध कार्यक्रम या महोत्सवात सुरू असून, या महोत्सवाचा समारोप ८ जानेवारीला होणार आहे. या महोत्सवाला नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. या महोत्सवाचा आनंद सर्वांनी घ्यावा असे आवाहन पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन मुंडावरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित धुळवड अखेर ‘कनेक्ट’!

$
0
0

दूरसंचार विभागाकडून 'हाय स्पीड इंटरनेट'

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ट्राय आणी दूरसंचार विभागाच्या गाव तेथे दूरध्वनी सेवा या धोरणातून डोंगरांनी वेढलेल्या सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात दूरसंचार सेवा सुरू झाली. त्यानंतर गावात हाय स्पीड इंटरनेट सेवा मिळू लागली. सिन्नर पासून अवघ्या २७ किलोमीटरवर असलेल्या १५०० लोकवस्तीच्या हे गाव आतापर्यंत दूरसंचार सेवेपासून वंचित होते. पण, दूरसंचार विभागाने येथे मनोरा लावला त्यानंतर हे गाव जगाच्या संपर्कात आले.

धुळवड या छोट्याशा गावात कोणत्याही कंपनीनीची दूरसंचार सेवा नसल्याने तेथील लोकांना छोटछोट्या कामांसाठी सिन्नरला यावे लागत होते. पण, आता गावात इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्याने त्यांना फायदा होणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी दूरसंचार कंपनीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत या विषयावर लक्ष वेधले. त्यानंतर दूरसंचार कंपनीचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांनी या विषयाचा पाठपुरावा करीत ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मनोरा उभारला. त्यानंतर खासदार गोडसे, महाजन व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत या सेवेचा उद्घाटन सोहळा नुकताच झाला.

यावेळी महाप्रबंधक नितीन महाजन यांनी दूरसंचार सुविधा आणी इंटरनेट उपलब्धतेचे महत्त्व गावकऱ्यांना तसेच विशेषत: तरुण पिढीला समजावून सांगितले. ग्रामसेवक, तलाठी, टेलिमेडिसीन व इतर ऑनलाइन उपक्रमासाठी योग्य तो इंटरनेट स्पीड उपलब्ध झाल्याचे घोषित केले. निव्वळ नफा किंवा फायदा न बघता ट्राय आणी दूरसंचार विभागाच्या गाव तेथे दूरध्वनी सेवा या धोरणात बसवून दूरसंचार सेवा सुरू केल्याचे सांगितले. या सेवेनंतर बीएसएनएलचे सिमकार्ड घेणेसाठी ग्राहकांची गर्दी झाली.

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेकेदारांचा ठेंगा!

$
0
0

'संदर्भ'च्या लिफ्ट कामासाठी वीज विभागाकडून फेर ई-निविदा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय संदर्भ रुग्णालयातील लिफ्टच्या नुतनीकरणासाठी ठेकेदार मिळत नसल्याने ६१ लाख रुपयांचे अनुदानही वापराविना पडून आहे. या कामासाठी फेरनिविदा काढण्याची वेळ वीज विभागावर आली आहे. आता फेरनिविदांमध्ये ठेकेदारांनी टेंडर भरल्यानंतर या लिफ्टचे काम सुरू होणार आहे. चारपैकी एका लिफ्टचे काम दोन महिन्यांपूर्वी झाले; मात्र तीन लिफ्टचे काम अद्याप बाकी आहे. त्यासाठी मोठ्या ठेकेदारांना गळ घातली जात असून त्यांनी टेंडर भरल्यानंतर तीन महिन्यात हे काम पूर्ण होऊ शकणार आहे.

विभागीय संदर्भ रुग्णालयातील असुविधांबाबत तक्रारी वाढल्यानंतर आरोग्य विभागाच्या आयुक्त संजीवकुमार यांनी एप्रिल महिन्यात रुग्णालयात बैठक घेत तीन कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर यातील काही कामे सुरू झाली असली तरी तीन लिफ्टचे काम अद्याप बाकी आहे. १९ वर्षांपूर्वीच्या या लिफ्टचे पूर्ण नुतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी मोठ्या कंपनीचे ठेकदार शोधले जात आहे. एका लिफ्टचे काम झाल्याने आता तीन लिफ्टसाठी ३४ लाख ८५६ रुपये खर्च करून हे काम केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वीज विभागाकडे हे काम आहे. त्यांनी त्यासाठी ई-निविदा काढल्या आहे. या निविदा ठेकेदारांनी भरल्यानंतर १५ जानेवारी रोजी हे टेंडर उघडले जाणार आहे. त्यानंतर या लिफ्टचे काम सुरू होणार आहे.

अशा आहेत लिफ्ट

संदर्भ रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी चार लिफ्ट आहे. त्यातील २० प्रवासी क्षमता व स्ट्रेचर घेऊन जाणारी एक लिफ्ट दोन महिन्यापूर्वी सुरू झाली आहे. आता २० प्रवासी क्षमता व स्ट्रेचर, १५ प्रवासी व स्ट्रेचर असणाऱ्या दोन लिफ्टचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. तसेच औषधे घेऊन जाण्यासाठी एक हजार किलो क्षमता असलेली लिफ्टही दुरुस्त केली जाणार आहे.

३८८ पैकी ९ उपकरणे नादुरुस्त

संदर्भ रुग्णालयातील ३८८ पैकी जवळपास सर्व उपकरणे आता दुरुस्त करण्यात आली आहे. त्यातील ९ उपकरणे नादुरुस्त आहेत. मात्र, येत्या काही दिवसात ती उपकरणे दुरुस्त केली जाणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात 'संदर्भ'चा कारभार सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोठ्या कंपन्या निरुत्साही

शासकीय व नुतनीकरणाचे काम असल्याने मोठ्या नावाजलेल्या कंपन्या टेंडर भरण्यास उत्सुक नाहीत. त्यांच्या दृष्टिने 'संदर्भ'चे काम छोटे आहे. त्यात शासकीय कामात अनेक अडथळे येत असल्याने त्यांनी हे टेंडर अगोदर भरले नसल्याचे समजते.

..

फोटो : संदर्भ हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणिततज्ज्ञांना चक्रावणारा ‘खोपडी’ निकाल

$
0
0

सर्वोच्च न्यायालयात मिळाला सरपंचाला न्याय

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खोपडी (ता. सिन्नर) येथील सरपंचाच्या अविश्वास ठरावाला थेट सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेले आव्हान आणि त्याचा मिळालेला निकाल सध्या गणिततज्ज्ञांना चक्रावून टाकत आहे. आठ सदस्य असलेल्या या ग्रामंपचायतीत अविश्वासासाठी लागणारे दोन तृतीयांश मते ५.३३ होतात. त्यामुळे हा आकडा ५ पकडायचा की सहा यावर हा निकाल आहे. पण, न्यायालयाने हा आकडा ६ पकडल्यामुळे गणिततज्ज्ञ चक्रावले आहेत.

सरपंच गणेश सुकदेव गुरुळे यांच्यावर १४ सप्टेंबर रोजी अविश्वास ठराव आला. त्यानंतर त्यांनी या अविश्वासाला आव्हान देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण, त्यांची याचिका दोन्ही ठिकाणी फेटाळण्यात आली. अखेर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. येथे त्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर त्यांना पुन्हा सरपंचपदही बहाल करण्यात आले आहे. या निकालाला १५ दिवसांहून अधिक दिवस उलटले तरी न्यायालयाने दिलेल्या निकालाची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.

नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये गुरुळे यांच्यावर सहा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला. त्यात एक सदस्य गैरहजर होते. त्यामुळे हा अविश्वास ठराव तहसीलदारांनी मंजूर केला. पण, या निकालाला गुरुळे यांनी आव्हान दिले. अविश्वास ठराव आणणाऱ्यांमध्ये एका सदस्याचे जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्यामुळे अपात्र ठरले होते. त्यामुळे त्यांचे मत ग्राह्य धरू नये, अशी गुरुळे यांची मागणी होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यामुळे आठ सदस्यांच्या दोन तृतीयांश निकषावर हा निकाल दिला.

..

असे होते अविश्वासाचे गणित

अविश्वास ठराव संमत होण्यासाठी ५.३३ मते हवी होती. अविश्वासाच्या बाजूने सहा सदस्य असले तरी त्यातील एक जण अपात्र ठरला. त्यामुळे ५ सदस्यच अविश्वास ठरावाच्या बाजूने होते. त्यामुळे न्यायालयाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अॅक्ट सेक्शन ३५ चा आधार घेतला. त्यात अविश्वासाच्या दोन तृतीयांशपेक्षा कमी सदस्य नको. त्यामुळे या निकालात सहा आकडा ग्राह्य धरण्यात आला. हा निकाल तीन सदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश ए. के. सिक्री, अशोक भूषण, एस. अब्दुल नाझीर यांनी दिला आहे.

...

गणिततज्ज्ञांमध्ये चर्चा

प्रचलित नियमानुसार साडेपाचच्या पुढील गुण असतील, तर सहा अंक निश्चित केला जातो. मात्र, साडेपाचच्या आतील संख्या असताना सहा हे गुण या निकालामुळे निश्चित होत असल्याने गणिततज्ज्ञांमध्ये त्याची विशेष चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेचेही पाणी दूषित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराला नव्याने पाणीपुरवठा होणार असलेल्या मुकणे थेट पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहराला मिळणारे पाणीही दूषित असल्याचे समोर आले आहे. गोंदे एमआयडीसीतील कंपन्यांचे रसायनेमिश्रित पाणी थेट मुकणे धरणात जात असल्याने पालिकेने महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाकडे तक्रार केली आहे.

सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील कंपन्यांकडून प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात असल्याने गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे प्रदूषण वाढले आहे. त्यासंदर्भात थेट हायकोर्टानेच कानउघडणी केली असून, पालिकेने या कंपन्यांवर कारवाईसाठी एमआयडीसीला नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता मुकणे धरणतून मिळणारे पाणीही दूषित असल्याचे समोर आले आहे. मुकणे धरणातून दररोज चारशे एमएलडी पाणी नाशिक शहरासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यासाठी अठरा किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मार्चपासून महापालिकेकडून पाण्याची उचल केली जाणार आहे. विल्होळी येथील जलशुद्धिकरण केंद्रदेखील पूर्ण झाले आहे. आता येथील पाणीसुद्धा दूषित असल्याची तक्रार महापालिकेने केली आहे. पाण्याचा एक थेंबदेखील शहरात जिरला नसताना पाणी दूषित असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

एमआयडीसी, उद्योगांवर कारवाई?

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये मलनिस्सारण केंद्र बांधण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे, तर नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडू नये याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण महामंडळाची आहे. त्यामुळे आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सहीनेच थेट सदस्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. एमआयडीसीसह या कंपन्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. महामंडळाकडून कंपन्यांसह एमआयडीसीवरही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खानापुरे, गर्गे पहिल्या महिला मलखांब पंच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र हौशी मलखांब संघटनेतर्फे अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय पंच परीक्षेत नाशिकच्या यशवंत व्यायाम शाळेच्या प्रशिक्षिका उत्तरा खानापुरे व साक्षी गर्गे यांनी ऐतिहासिक यश मिळवले असून, दोघींनी नाशिकच्या पहिल्या महिला मलखांब व दोरीचा मलखांब या खेळाच्या राज्य पंच होण्याचा मान मिळवला आहे.

ही राज्यस्तरीय पंच परीक्षा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे घेण्यात आली होती. यशवंत व्यायामशाळेतर्फे अध्यक्ष दिपक पाटील, प्रशिक्षक यशवंत जाधव व यशवंत व्यायाम शाळेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी सत्कार केला व अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोची व्यवहार्यता पुन्हा तपासणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी दिल्लीस्थित अर्बन मास ट्रांझिट कंपनीने (यूएमटीसी) शहरात मेट्रोची व्यवहार्यता फेटाळून लावली असली तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात 'मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम'चा (एमआरटी) वापर करण्यासाठी व्यवहार्यता अहवाल सादर करण्याचे आदेश महामेट्रोला दिले आहेत.

शहराचा विस्तार झपाट्याने होत असतानाही, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून शहरात बससेवा सुरू असली तरी ती तोट्यात असल्याचे सांगत महामंडळाने ती चालविण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांनी वर्षभरापूर्वीच नाशिक महापालिकेला बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्याबाबतची एकीकडे तयारी सुरू असतानाच, मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरमध्ये नाशिकमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. सिडकोमार्फत मेट्रो सुरू करण्याचे सूतोवाच करीत महामेट्रोमार्फत त्याची व्यवहार्यता तपासली जाईल, असे आश्वासन दिले होते. शहरात मेट्रोसाठीची चाचपणी यापूर्वीच पालिकेकडून करण्यात आली आहे. सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करताना दिल्लीस्थित यूमएमटीसी या कंपनीने शहरात बीआरटीएस आणि मेट्रो व्यवहार्य नसल्याचा अहवाला दिला होता. या संदर्भातील वस्तुस्थिती तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरविकास विभागाच्या लक्षात आणून दिली होती. त्यामुळे मेट्रो होईल की नाही, याबाबत शंका होती. परंतु, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तब्बल तीन महिन्यांनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरात मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमबाबत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळात झालेल्या या निर्णयानुसार महामेट्रोला हा आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सिडको, महापालिका आणि महामेट्रो एकत्रितपणे हा आराखडा तयार करणार असल्याची माहिती दिली. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी वेगळा आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार वाहतूक कोंडी टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा, यासाठी मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमचा वापर नाशिकमध्ये होणार असून, त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा येत्या दोन महिन्यांत तयार केला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल नगरविकास विभागाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत तीनही एजन्सी एकत्रितपणे काम करून व्यवहार्यता अहवाल तयार करणार असल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील तोडगा दृष्टिपथात येण्याची शक्यता आहे.

मिनी मेट्रो धावणार?

शहरात सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट नाही. त्यातच बीआरटीएसचाही पर्याय तपाण्यात आला आहे. त्यामुळे महामेट्रोकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी बसेसेवेचे जाळे विस्तारण्याबाबत चाचपणी केली जाणार आहे. एखाद्या रस्त्यावर एका तासाला २० हजार पेक्षा लोकांचा वावर असेल तर, त्या ठिकाणी मोठ्या मेट्रोला प्राधान्य दिले जाते. परंतु, हीच संख्या प्रतितास १० ते १५ तास असेल तर तेथे मिनी मेट्रोची चाचपणी केली जाते. नाशिकमध्ये दुसऱ्या प्रकारातील वाहतुकीचे तीन ते चार रस्ते आहेत. त्या ठिकाणी मिनीमेट्रोची चाचपणी होईल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली. त्यामुळे शहरात मिनी मेट्रो धावण्याची शक्यता बळावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणखी एक विकासमार्ग!

$
0
0

मराठी मुलखात

उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. मुंबई-आग्रा, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर आता चेन्नई-सुरत या महामार्गासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याशिवाय अन्य राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचे जाळे नाशिकला आहेच. त्यामुळे नशिक हे दक्षिण भारतासह गुजरातशी जोडले जाणार आहे.

भावेश ब्राह्मणकर

केवळ मुंबई शहराच्या नजीक एवढेच काय ते नाशिकचे महत्त्व असे काही काळ बोलले जात होते; पण नाशिकचे भौगोलिक स्थान हेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळेच नाशिकच्या विकासाचे अनेक मार्ग प्रशस्त होतात. मुंबई-आग्रा या तिसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे नुकतेच रुंदीकरण पूर्ण झाले आहे. चौपदरी झालेल्या या महामार्गाने राजधानी मुंबईला नाशिकच्या आणखी जवळ आणले आहेच, शिवाय उत्तर भारतात जाण्याचे मार्गही खुले केले आहेत. हाच मार्ग आता सहापदरी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे त्याचेही काम नजीकच्या काळात होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी भाजप सरकार आणि त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्गही नाशिकमधूनच जातो. मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा हा महामार्ग आहे. या महामार्गासाठीचे भूसंपादन जवळपास अंतिम टप्प्यात आल्याने आता त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या दोन महामार्गांमुळे राज्याची उपराजधानी नागपूर ही समीप येणार आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून 'भारतमाला' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. तब्बल सात लाख हजार कोटी रुपयांची ही भव्य योजना आहे. देशातील विविध टोके महामार्गाद्वारे जवळ आणून ठेवणे आणि विकासाच्या चक्राला गती देण्याचे त्यात प्रस्तावित आहे. या योजनेत राज्याला एकूण ११ महामार्ग लाभणार आहेत. देशातील एकूण ४४ आर्थिक कॉरिडॉरमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी तीन कॉरिडॉर आहेत. मुंबई-कोलकाता, मुंबई-आग्रा आणि सुरत-नागपूर या तीन कॉरिडॉरमुळे उत्तर महाराष्ट्रात प्रगतिशील महामार्ग होणार आहेत, तसेच सुरत-चेन्नई हा महामार्गही 'भारतमाला'अंतर्गत प्रस्तावित आहे. याच महामार्गाचे सध्या सर्वेक्षण केले जात आहे. हैदराबादस्थित कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, निफाड, नाशिक आणि सिन्नर या तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. या कंपनीच्या वतीने जे सर्वेक्षण केले जाणार आहे, त्यात प्रामुख्याने भूसंपादन आणि मार्गाची दिशा हे प्रमुख असणार आहे. हा अहवाल आल्यानंतर तो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला सादर होईल. त्यात या मार्गाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊन महामार्गाचे काम करण्याचे प्रस्तावित आहे.

उत्तर भारत, विदर्भ आणि आता गुजरात व दक्षिण भारताला जोडणारा महामार्ग नाशिकच्या व्यापार, दळणवळण आणि उद्योगाला नवे बळ देणार आहे. मध्य रेल्वेद्वारे नाशिक हे मुंबई आणि उत्तर भारताशी कनेक्ट आहेच, आता रस्तेमार्गाद्वारे नाशिकच्या विकासाला नवी चालना लाभणार आहे. मात्र, हे होत असताना वास्तव आणि नजीकच्या भविष्याचाही वेध घेणे आवश्यक आहे. चेन्नई-सुरतचा अहवाल मंत्रालयाला सादर होण्यास साधारण सहा महिने लागतील, असे गृहीत धरायला हवे. म्हणजे तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका त्या वेळी झालेल्या असतील आणि नवे सरकार स्थापन झालेले असेल. ते सरकार कोणते असेल त्यावरही या महामार्गाचे भवितव्य आहे. मोदी सरकारच पुन्हा आले तर गडकरी हे त्यांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य देतील. जर अन्य सरकार आले तर या अहवालाचे काय होणार? नाशिकचे लोकप्रतिनिधी केंद्रीय दरबारात दबाव टाकणार का, की पाठपुरावा करणार, हे सारे महत्त्वाचे आहे. या सर्व प्रक्रियेत राज्य सरकारची भूमिका अतिशय मोलाची असेल. कारण भूसंपादनाचे महत्कार्य हे राज्य सरकारकडे आहे. या वर्षाच्या अखेरीस राज्याची विधानसभा निवडणूक आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोध उभा करणारा भूसंपादनाचा प्रस्ताव साहजिकच सरकार हाती घेणार नाही. त्यामुळे नवे सरकार याकडे कशा पद्धतीने पाहणार, त्यास हिरवा कंदील देणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हिरवा कंदील दिला तरी प्रत्यक्ष भूसंपादन धीम्या गतीने होणार की समृद्धी महामार्गासारखे वेगाने हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. ज्या ज्या जिल्ह्यांमधून हा मार्ग जातो आहे, तेथील जनता आणि लोकप्रतिनिधी यांची इच्छाशक्ती या महामार्गासााठी अतिशय महत्त्वाची आहे, तसेच सरकारची भूमिकाही. त्यामुळे तूर्त या सर्वेक्षणाने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी हे सारे अडथळे लक्षात घेणे गरजेचे आहे. संभाव्य अडथळे दूर करण्यासाठी आताच काही प्रयत्न करता आले तर ते अतिशय प्रभावी ठरतील; पण ते कोण करणार हाही प्रश्नच आहे. नाशिकच्या संस्था-संघटनांनी ते हाती घेतले तर ते शक्य आहे. अन्य विकासवाटांसाठी ज्या पद्धतीने नाशिककर एकत्र आले तसे या प्रकल्पासाठीही आले तर ते शक्य आहे; अन्यथा निधी, भूसंपादन किंवा कारणांच्या जंजाळात हा महामार्ग अडकेल आणि आणखी एक संधी नष्ट होईल. संधी साधायची की दवडायचे हे मात्र ठरवायचे आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभीची ही एक चुणूकच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुयोजित व्हॅलीजवळ उद्या ‘हॅप्पी स्ट्रीट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीची कोंडी, प्रदूषणासह धकाधकीच्या जीवनातील टेन्शनपासूनही सुटका करून घेण्याची संधी शनिवारी नाशिककरांना मिळणार आहे. नाशिककरांच्या प्रचंड प्रतिसादामुळे उद्या, शनिवारी सुयोजित व्हिरिडीयन व्हॅली ते बापू पूल या रस्त्यावर सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान 'हॅप्पी स्ट्रीट' रंगणार आहे. नाशिककरांना पुन्हा धमाल, मस्ती अन् कल्ला करता येणार आहे.

नेहमीच्या रस्त्यांवर असणारा वाहनांचा गोंगाट अन् कर्कश हॉर्न यांपासून मुक्ती मिळवत, रस्त्यावर हवे तसे बागडता येणे, या विचारानेच आनंद मिळतो. त्यातच या रस्त्यांवर डान्स, गाणी, गेम अन् अफलातून कार्यक्रमांची रेलचेल असेल तर उत्साह अधिक वाढतो. हीच उत्साहवर्धक पर्वणी हॅप्पी स्ट्रीटमधून नाशिककरांना अनुभवता येणार आहे. या उपक्रमाला नाशिककरांचा नेहमी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात अबालवृध्दांना धम्माल, मस्ती करण्याची संधी मिळते. शनिवारी होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीटवर झुम्बावर थिकरण्यासह व्हिंटेज गाड्या बघण्याची, सेल्फी अन् फोटोसेशन करण्याची, हटके गेम्स खेळण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. हा उपक्रम संध्याकाळी होत असल्याने नाशिककरांच्या उत्साहाला उधाण येणार आहे.

--

\Bनाव नोंदविण्याची कलाकारांना संधी\B

तुमची कला हॅप्पी स्ट्रीटवर सादर करण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कलेसह वेगवेगळे उपक्रम सादर करण्यासाठीही तुम्हाला नावनोंदणी करता येईल. त्यासाठी कलाकारांनी महाराष्ट्र टाइम्सच्या ०२५३-६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकावर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयी वृत्तीने घेरलेले ‘अपूर्णांक’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणाच्याही आयुष्यात घडू शकेल अशी घटना घडते आणि तिच्या अनुषंगाने पुढे घडणाऱ्या घटनांमध्ये येणारी नाट्यमयता याने भरलेले नाटक म्हणजे अपूर्णांक. सरोगसी मदरची कथा नाटकातून मांडण्यात आली.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ६६ व्या नाट्यमहोत्सवातील प्राथमिक स्पर्धेत गुरुवारी कामगार कल्याण केंद्र, एकलहरेच्या वतीने अविनाश चिटणीस लिखित 'अपूर्णांक' हे नाटक सादर करण्यात आले. प. सा. नाट्यगृहात या स्पर्धा सुरू होत्या. स्पर्धेचा शुक्रवारी (दि. ४) समारोप होत आहे.

'अपूर्णांक'ची कथा आहे, शीला व तिचा पती सतीश यांची. सतीशला असाध्य आजार झालेला असल्याने त्याच्या शस्त्रक्रियेसाठी पैसा उभा करावा लागणार असतो. त्यामुळे शीला कर्नलच्या नातवासाठी गर्भ स्वत:च्या गर्भाशयात वाढविण्यासाठी तयार होते. मिळालेले पैसे सतीशच्या शस्त्रक्रियेसाठी वापरून ती त्याचा जीव वाचवते. कर्नलच्या सुनेला, रेश्माला अपत्यप्राप्तीचा आनंद देते; मात्र सतीश व तिच्या मुलांपासून हे लपवते आणि एकदा हे खोटे पकडले जाते. शीलाने कोणत्या मार्गाने पैसे मिळवले असा संशय सतीशच्या मनात घोंघावतो. संशयाचे तुफान उठते आणि तो शीलावर व्याभिचाराचा आरोप करून तिला घटस्फोटाची नोटीस देतो. शीला हादरते; मात्र नंतर खंबिरपणे स्वत:ला सावरून घराबाहेर पडते. इकडे रेश्माचा पती शहीद होतो. त्यामुळे ती त्या बाळाला सांभाळायला असमर्थ ठरते. कर्नल त्या बाळाला घेऊन शीलाकडे येतात; मात्र तेथे त्यांना कहाणी समजते. ते सतीशला खूप सुनावतात. आपली चूक उमगून सतीश तिला आणायला निघतो. परंतु, आता तो अधिकार गमावला आहे, असे सांगून कर्नलच शीलास आणण्यासाठी निघतात. अशा आशयाची ही कथा होती.

नाटकाचे निर्मितीप्रमुख भरत बोरसे होते. दिग्दर्शन अर्चना नाटकर यांचे होते. प्रकाशयोजना कृतार्थ कन्सारा, नेपथ्य आनंद ढाकिफळे, संगीत भूषण भावसार, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. रंगमंच राहुल शिरवाडकर यांचे तर रंगमंच सहाय्य विजय धुमाळ, अमोल हिवराळे, रिया भेले, प्रवीण ठाकरे, महेंद्र चौधरी यांचे होते. वेशभूषा सानिका मेहेत्रे तर सहाय्य सुहासिनी ठाकूर, प्रवीण ठाकरे यांचे होते. नाटकात धनश्री महाजन, साक्षी गांपुर्डे, दीपक ठाकूर, स्मृती शेगोकार, सागर कोरडे, ऋषिकेश रोटे, विनोद सावे, प्रवीण ठाकरे, चंद्रशेखर कवर, दीपक पारखे यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

देहासक्त

ललित कलाभवन, सिडको

स्थळ : प. सा. नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६

लोगो : कामगार कल्याण नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Bhai: ‘भाई’ चित्रपटाला थिएटरच मिळेना!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावरील 'भाई, व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाला मोक्याची थिएटर्स मिळत नसल्याने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत चांगलीच आगपाखड केली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या चित्रपटासाठी थिएटर मिळत नाही, मग मराठी माणसाने जायचे कोठे असा सवालही त्यांनी विचारला.

महाराष्ट्रात ४००० थिएटर्समध्ये सिम्बा हा हिंदी चित्रपट सुरू आहे. त्यापैकी मोक्याची काही थिएटर्स मांजरेकर मागत असून, त्यांना वितरकाने याबाबत नकार दिला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सिम्बा हा चांगला चित्रपट असून, त्यात अनेक मराठी कलाकार आहेत. त्याबाबत आपल्याला काही म्हणायचे नाही. मात्र, 'भाई' चित्रपटासाठी थिएटर मोकळे करून दिले पाहिजे. कारण हा मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. पु. ल. देशपांडे हे मराठी माणसाचे दैवत होते. त्यांचा जीवनपट दाखवण्यासाठी मुंबई, पुणे येथे थिएटर मिळू नये यासारखी शोकांतिका दुसरी नाही, असेही मांजरेकर म्हणाले. भाईंना जीवनात अनेक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला होता. आता त्यांच्या चित्रपटालाही संघर्ष करावा लागत आहे, हे दुर्दैव आहे, असे सांगतानाच हा केवळ इगो प्रॉब्लेम असल्याचे मांजरेकर म्हणाले. 'पुलं'चा चित्रपट म्हणजे दिव्य होते. या चित्रपटाची लांबी मोजली तर ती नऊ तासांची भरणार असल्याने बरीच काटछाट करून पूर्वार्ध व उत्तरार्ध अशी रचना केली आहे. उत्तरार्ध फेब्रुवारी महिन्यात लगेचच रीलिज करणार आहे. यात त्या काळातील सत्तर कलाकारांच्या भूमिका असल्याचे मांजरेकर म्हणाले. यात बाळासाहेब ठाकरे, हिराबाई बडोदेकर, पंडित नेहरू यांच्या भूमिका आहेत. मात्र, एका प्रश्नाचे उत्तर देताना यात कुसुमाग्रजांची भूमिका नसल्याचे त्यांनी सांगितले. पु. लं. ची भूमिका साकारणारे सागर देशमुख यांनी भूमिकेविषयी त्यांचे अनुभव सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांचे आंदोलन स्थगित

$
0
0

वीजदरवाढीबाबत लवकरच निर्णय होणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वीज दरवाढीसंदर्भात उद्योजकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन महावितरण कंपनीचे विभागीय संचालक श्रीकांत जलतारे यांनी दिल्याने उद्योजकांनी त्यांचे प्रस्तावित आंदोलन स्थगित केले आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व औद्योगिक, व्यापारी व ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता बी. के. जानवीर यांची गुरुवारी भेट घेतली. महावितरणने केलेल्या अवास्तव दरवाढीच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय उद्योजकांनी सांगितला. तसेच ५० हून अधिक उद्योजक महावितरणच्या कार्यालयात आले होते.

वीज नियामक आयोगाने प्रत्यक्षात दिलेली ३ ते ६ टक्के दरवाढ, पॉवर फॅक्टर इन्सेटिंव कमी केल्याने ती २० ते २५ टक्के झाली आहे. त्यामुळे उद्योजकांना भरमसाठ बिले प्राप्त झाली असून उद्योजक अडचणीत आले आहेत. नाशिकमधील स्टील उद्योग दुसऱ्या राज्यात स्तलांतरित होत आहेत. वीज नियामक आयोगाने जी दरवाढ जाहीर केली होती. तीचा कालावधी २०२० पर्यंत असताना महावितरणने आयोगाला चुकीची माहिती देऊन मुदतीपूर्वीच दरवाढ केली आहे. यामुळे उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता बी. के. जानवीर यांनी उद्योजकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महावितरणचे विभागीय संचालक श्रीकांत जलतरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जलतरे यांनी मंडलेचा यांच्याशी संवाद केला. राज्यातील उद्योजकांच्या अडचणींची व भावनांची आम्ही दखल घेतली असून त्यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर धरणे आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला. याप्रसंगी निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र आहिरे, योगिता आहेर, मिलिंद राजपूत, प्रशांत जोशी, सुधाकर देशमुख, आयमा सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, उदय रकिबे, विजय जोशी, विराल ठक्कर आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटविताना पोलिसांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेला विरोध करून पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना वडाळा नाका भागात घडली असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरूजीतसिंग तेजपालसिंग हुजंन व कमलजितसिंग तेजपालसिंग हुजंन (रा. मधुबन शोरूम जवळ, काठेगल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. वडाळा नाका भागात महापालिकेने बुधवारी (दि. ३) दुपारी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. सर्व्हे नं. ४९४ -३ व सर्व्हे नं. ४९५ मधील अतिक्रमणे जमीनदोस्त करीत असतांना संशयितांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत विरोध केला. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या हवालदार बहरवाल, पोलिस नाईक रवींद्र खांडेकर आणि शिपाई विष्णू पोले यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयितांनी पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. यावेळी शिपाई पोले यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लक्ष्मण गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे.

भाडे तत्त्वावरील कॅमेऱ्याचा अपहार

भाडेतत्वावर घेतलेला कॅमेरा परत न करता अपहार केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील एका फोटोग्राफरला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धैर्यशील इंद्रभान सूर्यवंशी (रा. बोराळे, ता. चांदवड) असे अटक केलेल्या फोटोग्राफरचे नाव आहे. या प्रकरणी आतिश राजपूत (रा. विसेमळा, कॉलेजरोड) यांनी तक्रार दिली. राजपूत यांचा कॉलेजरोडवरील युनिटी पार्क येथे कॅमेरे भाडेतत्वाने देण्याचा व्यवसाय आहे. लग्नसराईच्या काळात गरजेनुसार फोटोग्राफर व्हिडीओ कॅमेरे अथवा फोटोग्राफी कॅमेरे भाडे तत्वावर घेतात. एक हजार रुपयांची अनामत रक्कम घेऊन एका दिवसासाठी ते पाचशे रुपये दर आकारले जातात. संशयित फोटोग्राफर सूर्यवंशी याने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी सुमारे ३५ हजारांचा कॅमेरा भाडे तत्वावर नेला. मात्र, सत्तर दिवस उलटूनही कॅमेरा किंवा त्याचे भाडे न दिल्याने राजपूत यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संशयितास अटक केली.

ध्यानमग्न साधकाचे मोबाइल लंपास

ध्यानधारणेसाठी गोदाकाठी बसलेल्या एका व्यक्तीचे दोन मोबाइल चोरट्यांनी पळवून नेले. ही घटना केटीएचएम परिसरातील बोटक्लब परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकमंडई येथील अब्दुल कादीर रज्जाक बेग यांनी या प्रकरणी तक्रार दिली. बेग हे २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ध्यानधारणा करण्यासाठी केटीएचएम परिसरातील गोदाकाठावरील बोटक्लब भागात गेले. निवांत ठिकाणी त्यांची ध्यानधारणा सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी चटईजवळ ठेवलेले सुमारे १८ हजार रुपयांचे दोन मोबाइल चोरून नेले.

दहशत पसरविणाऱ्या

तरुणास पंचवटीत अटक

दहशत माजविण्यासाठी लोखंडी फायटर घेऊन फिरणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली. फायटर हस्तगत करून त्याच्याविरोधात पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराज धनराज रामचंदानी (२५, रा. भोरे सदन, सरदार चौक) असे संशयितांचे नाव आहे. रामकुंडावरील रामसेतू पुलाजवळ त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस शिपाई विष्णू जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी शिवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाची आत्महत्या

देवळालीगावातील आण्णाभाऊ साठेनगर भागातील २८ वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राजू संजय हरणे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने बुधवारी (दि. ३) दुपारी चार वाजेच्या सुमारास घरात साडी बांधून गळफास लावून घेतला होता. शेजाऱ्यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी धाव घेऊन त्यास बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पसंख्याक आयोग उपाध्यक्ष शनिवारी मालेगावी

$
0
0

मालेगाव : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर ४ व ५ जानेवारी रोजी धुळे व नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ५ जानेवारी रोजी धुळे येथील दौरा आटोपून अभ्यंकर हे दुपारी ३ वाजता मालेगावी शासकीय विश्रामगृहावर येतील. यावेळी अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक यांच्यासमवेत त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी, मनपा आयुक्त, मनपा शिक्षण मंडळ अधिकारी यांच्यासमवेत ते चर्चा करणार आहेत. दुपारी ४ वाजता मनमाडकडे प्रस्थान करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावित्राबाई फुले यांना

$
0
0

फुले सांस्कृतिक मंडळ

क्रांतीसूर्य महात्मा फुले ज्योतिबा फुले कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने सावित्रीबाई फुले यांना नाशिकरोड येथे अभिवादन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष संतोष गाडेकर, गायत्री गाडेकर, डॉ. सीमा ताजणे, शोभा मंडलिक, उषा वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेकडून कारवाईचा बार!

$
0
0

१२ सहकारी संस्थांना नोटिसा; निसाका, नासाकाचाही समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अध्यक्षांसह प्रशासनाने आता वसुलीवर जोर दिला आहे. जिल्ह्यातील १२ बड्या सहकारी संस्थांवर कर्जवसुलीसाठी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बँकेच्या ३८ आजी-माजी संचालकांना एकीकडे नियमबाह्य कर्जवाटप आणि थकबाकी वसुलीसाठी सहकार विभागाने नोटिसा बजाल्या असतानाच, आता ३४७ कोटींची थकबाकी थकविल्याप्रकरणी १२ सहकारी संस्थांसह या संचालकांना बँकेने कायदेशीर कारवाईच्या नोटिसा बजाविल्या आहेत. नासाका, निसाकासह आर्मस्ट्राँग कारखाना, श्रीराम सहकारी बँकेचा त्यात समावेश आहे.

जिल्हा बँक सध्या आर्थिक संकटातून जात असून, बँकेची थकबाकी वाढल्याने नवीन कर्जवाटपासाठीही निधी उपलब्ध नाही. त्यामुळे नूतन अध्यक्ष केदा आहेर यांनी थकबाकी वसुलीवर जोर दिला आहे. विशेषत: बड्या थकबाकीदार संस्थाकडे त्यांनी मोर्चा वळवला आहे. बॅँकेने सन २००२ ते २०१३ दरम्यान केलेल्या कर्जवाटपापैकी तब्बल ३४७ कोटींची थकबाकी आहे. या कर्जवाटपात मोठी अनियमीतता असून, हे कर्ज वसूल न झाल्याने बँकेचा एनपीए वाढला. या पार्श्वभूमीवर बॅँकेच्याच माजी संचालकांनी या वाटप झालेल्या कर्जप्रकरणाची चौकशीची मागणी केली असता, या कर्जाचे वाटप नियमबाह्य पद्धतीने केल्याचे समोर आले आहे. या १२ संस्थांना अनियमीत कर्जवाटप झाल्याचा निष्कर्ष नोंदवत बँकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे जिल्हा उपनिबंधक यांनी ३८ आजी-माजी संचालकांसोबतच १२ संस्थांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांना मालमत्तांवर थेट टाच आणली जाणार आहे. सोबतच त्यांच्यावर फौजदारी कारवाईही केली जाणार आहे. सोबतच बँकेचे ८० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संचालकांनी नियमबाह्य कर्जवाटप केले असतानाही अधिकाऱ्यांनी त्याला होकार दर्शवल्याने आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार आहे. संचालक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ तारखेला आपले म्हणणे मांडण्याची संधी जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे.

... या संस्थांचा समावेश

निफाड व नाशिक सहकारी साखर कारखाना, आर्मस्ट्रॉंग, रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्या, मालेगाव, श्रीराम सहकारी बॅंक, दिंडोरी तालुक्यातील ५ आदिवासी विकास कार्यकारी सोसायटी, सिन्नर तालुका बहुउद्देशीय सहकारी संस्था, मालेगाव मधील १ वि. का. सोसायटी या संस्थांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. खुलासा समानधाकरक न आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तांवर टाच आणण्याची कारवाई केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे सर्व सदस्य स्थायीतून होणार निवृत्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेत आपल्याच सदस्यांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे भाजपने आता स्थायी समितीवरील सर्व नऊ सदस्यांना निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमानुसार भाजपचे पाच सदस्य निवृत्त होणार असले तरी उर्वरित चार सदस्यही राजीनामा देतील, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. वाद टाळण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

महापालिकेची तिजोरी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर सभापतींसह नऊ सदस्य भाजपचे आहेत. स्थायीच्या सदस्याचा कार्यकाळ हा नियमाप्रमाणे दोन वर्षाचा असून १६ पैकी ९ सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. सध्या स्थायीवर हिमगौरी आहेर-आडके, दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड, शांता हिरे, भिकूबाई बागूल, मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया हे नऊ सदस्य आहेत. यापैकी पाच सदस्य नियमाप्रमाणे निवृत्त होणार आहेत. उर्वरित चार सदस्यांना दोन वर्षांची संधी मिळणार आहे. मात्र, भाजपने वाद टाळण्याठी तसेच सर्वांना पदे मिळण्यासाठी सर्व नऊ सदस्यांना निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षाप्रमाणेच स्थायीवर नवीन टीम पाठवली जाणार आहे. त्यामुळे दिनकर पाटील आणि उद्धव निमसेंनाही राजीनामा द्यावा लागणार आहे. या दोघांना भाजपने स्थायीच्या सभापतीपदाचे आश्वासन दिले होते. निदान दुसऱ्या वर्षी तरी संधी मिळेल या अपेक्षेवर दोन्ही सदस्य होते. मात्र, आता त्यांनाही राजीनामा द्यावा लागणार असल्याने उर्वरित सदस्य राजीनाम्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बातम्या १

$
0
0

प्रतीक, ताहेर यांची विजयी सलामी

राज्यस्तरीय

बॉक्सिंग स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रतीक गोडगे, ताहेर इनामदार यांनी १९ वर्षांखालील गटाच्या सृजन करंडक राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विजयी सलामी दिली.

भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. ६४ किलो गटात पिंपरी चिंचवडच्या प्रतीक गोडगेने मुंबई उपनगरच्या ओजस्वी यादवला पराभूत केले, तर पुणे शहरच्या ताहेर इनामदारने औरंगाबादच्या कौस्तुभ केदारला हरविले. अन्य लढतीत पुणे जिल्ह्याच्या केशव हंसने जळगावच्या सिद्धार्थ सपकाळेवर विजय नोंदविला. ५२ किलो गटात पुणे शहरच्या मोहसीन सय्यदने आक्रमक खेळ करत औरंगाबादच्या अक्षित मोहतुरेवर बाजी मारली. ५६ किलो गटात पिंपरी चिंचवडच्या शशांक पगारेने आक्रमक खेळ करत नगरच्या गणेश बागरेवर बाजी मारली.

स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश बागवे आणि नगरसेवक अविनाश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी ऑलिंपियन मनोज पिंगळे, शि‌वछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, शशिकांत तापकीर, भरत व्हावळ, स्पर्धा व्यवस्थापक मदन वाणी आदी उपस्थित होते.

निकाल : ४९ किलो : आदित्य दंडी (अकोला) वि.वि. साहिल शेख (पुणे); अक्षय माळी (नंदुरबार) वि.वि. तन्मय दाभाडे (पुणे); पवन साळवे (जळगाव) वि.वि. शुभम नवघरे (नाशिक); संदेश काटकर (कोल्हापूर) वि. वि. महंमद रिझवान अन्सारी (मुंबई), श्रेयस कांबळे (सांगली) वि. वि. गौरव जाधव (कोल्हापूर शहर), मुकुल शिंदे (सातारा) वि. वि. मीर पगार (नगर), विशाल देवीराम (पालघर) वि. वि. सिद्धार्थ उपाध्यय (मुंबई उपनगर), शिवाजी गेदाम (क्रीडापीठ) वि. वि. सुभान नझीरहुसेन (सांगली शहर).

५२ किलो : गणेश पडवळ (कोल्हापूर) वि. वि. ऋत्वीक लोखंडे (चंद्रपूर), नाना पिसाळ (क्रीडापीठ) वि. वि. महंमद अमीर शेख (मुंबई जिल्हा), यश पाटील (ठाणे) वि. वि. प्रथमेश मराठे (नंदुरबार), देवेंद्रसिंह दामडे (जळगाव) वि. वि. प्रतीक नाबगे (नगर जिल्हा).

५६ किलो मुले : विक्रांत सुपेकर (औरंगाबाद) वि. वि. रणवीर महाडिक (सोलापूर), अब्दुल अन्सारी (मुंबई उपनगर) वि. वि. रोहित अटोळे (सातारा), निशांतसिंग (रायगड जिल्हा) वि. वि. राहुल अलाने (बीड).

६० किलो मुले : शुभम भालेराव (ठाणे) वि. वि. प्रथमेश वाघमारे (नगर जिल्हा).

६४ किलो मुले : सुजित माळी (सांगली) वि. वि. उत्कर्ष कडू (नाशिक), संकेत मुटकुरे (नागपूर) वि. वि. अल्पेश यादव (धुळे), तेजस कर्णेकर (मुंबई) वि. वि. गणराज कुवर (नंदुरबार), स्वप्नील साळवी (सातारा) वि. वि. फरदिन खान (नगर), सोहेल पप्पूवाले (क्रीडापीठ) वि. वि. सूरज शिंदे (लातूर), शुभम कुसुरकर (सोलापूर) वि. वि. प्रज्वल पाटील (सांगली), बुद्धभूषण निकम (जळगाव) वि. वि. प्रसाद जाधव (नगर), दीपक जाधव (क्रीडापीठ) वि. वि. अथर्व लाड (नाशिक).

९१ किलोवरील मुले : नूर महंमद शेख (नाशिक शहर) वि. वि. अक्षित सकदसारिया (मुंबई उपनगर).

बोपण्णा-शरण उपांत्य फेरीत

चुरशीच्या लढतीत पेस- रेयस व्हॅरेला जोडीवर मात

महाराष्ट्र ओपन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारताच्या रोहन बोपण्णा-दिवीज शरण जोडीने महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत गुरुवारी भारताचा लिअँडर पेस आणि त्याचा मेक्सिकोचा जोडीदार मिगुल अँजल रेयस-व्हॅरेला जोडीचे आव्हान परतवून लावत दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ३८ वर्षीय बोपण्णाची आक्रमक सर्व्हिस, ३२ वर्षीय शरणचा नेटजवळचा सुरेख खेळ आणि दोन्ही खेळाडूंनी दाखवलेला संयम विजयासाठी महत्त्वाचा ठरला.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील कोर्टवर एकवर ही लढत रंगली. दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अग्रमानांकित बोपण्णा-शरण जोडीने सहा मॅच पॉइंट वाचवीत पेस-व्हॅरेला जोडीवर ६-७ (४), ६-४, १७-१५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. ही लढत १ तास ४५ मिनिटे चालली. गेल्या वर्षी या स्पर्धेत बोपण्णा हा जीवन नेदुन्चेळीयनसह सहभागी झाला होता, तर पेस हा पुरव राजासह खेळला होता. त्या वेळी बोपण्णा-नेदुन्चेळीयन जोडीने पेस-पुरव जोडीला पहिल्याच फेरीत पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड काही पेसला करता आली नाही. पहिला सेट जिंकूनही पेस-व्हॅरेला जोडीला बोपण्णा-शरण जोडीचे आव्हान परतवून लावण्यात यश आले नाही. आता उपांत्य फेरीत बोपण्णा-शरण जोडीची सिमोन बोलेल्ली-इव्हान डॉडिग जोडीशी लढत होईल. सिमोन-इव्हान जोडीने दुसऱ्या फेरीत केविन क्रवित्झ-आंद्रेस मिल्स जोडीवर ६-२, ६-४ असा सहज विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये पेस-व्हॅरेला जोडीने टायब्रेकमध्ये सरस खेळ करून बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा-शरणने आपला संयम गमावला नाही. तिसऱ्या गेममध्ये ४५ वर्षीय पेसची सर्व्हिस ब्रेक झाली. मात्र, पुढच्याच गेममध्ये शरणलाही आपली सर्व्हिस राखता आली नाही. यानंतर सातव्या गेममध्ये पेसची, तर आठव्या गेममध्ये शरणची सर्व्हिस ब्रेक झाली. या नंतर व्हॅरेलालाही आपली सर्व्हिस राखता आली नाही. बोपण्णाने ही संधी साधली आणि आक्रमक सर्व्हिस हे आपले 'अस्त्र' वापरून हा सेट ६-४ असा जिंकून बरोबरी साधली. यामुळे सुपरटायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात दोन्ही जोड्यांकडून ड्रॉप, ओव्हर हेड, व्हॉली, बॉडी शॉट याचा अप्रतिम वापर करण्यात आला.

यात बोपण्णा-शरणने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र, पुढे पेस-व्हॅरेलाने 'कमबॅक' करून ८-८ अशी बरोबरी साधली. पेसने जबरदस्त सर्व्हिस करून मॅच पॉइंट मिळवला. यानंतर बोपण्णाने बिनतोड सर्व्हिस करून ९-९ अशी बरोबरी साधली. यानंतर बोपण्णा-शरण जोडीने सहा मॅच पॉइंट वाचविले, तर एक मॅच पॉइंट मिळवला होता. यानंतर १५-१५ अशा बरोबरीनंतर व्हॅरेलाचा रिटर्न चुकला आणि बोपण्णा-शरण जोडीने १६-१५ अशी आघाडी घेतली. यानंतर बोपण्णा-शरण जोडीने पुढील गुण घेत विजयी जल्लोष केला.

एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात

भारताच्या रामकुमार रामनाथनला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. याच बरोबर भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. रामला चौथ्या मानांकित मलेक जझिरीवर सनसनाटी विजय मिळवण्याची संधी होती. मात्र, विजयाच्या समीप असताना रामकडून चुका झाल्या आणि त्याला त्याचा फटका बसला. जझिरीने ही लढत ६-७ (६), ७-६(५), ६-३ अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ही लढत रात्री १ वाजून २० मिनिटांनी संपली. जागतिक क्रमवारीत १३२ व्या स्थानावर असणाऱ्या रामने लढतीत दुसऱ्या सेटच्या टायब्रेकपर्यंत वर्चस्व राखले होते. यानंतर त्याला सर्व्हिसमध्ये सातत्य राखता आले नाही. खरे तर या लढतीत रामची सर्व्हिस जझिरीपेक्षा सरस झाली होती. २४ वर्षीय रामने २० बिनतोड सर्व्हिस केल्या, तर जझिरीने केवळ ६. मात्र रामने ८ दुहेरी चुका केल्या. यातील, ४ त्याने निर्णायक सेटमध्ये केल्या. त्यामुळेच हातातोंडाशी आलेला विजय रामला मिळवता आला नाही.

अँडरसन, कार्लोविचची आगेकूच

एकेरीतील इतर लढतींत अग्रमानांकित केविन अँडरसनने स्पेनच्या २१ वर्षीय जाउम मुनारला ६-३, ६-३ असे सहज नमविले, तर बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसने ट्युनिशियाच्या मलेक जझिरीचे आव्हान ७-५, ६-२ असे परतवून लावले. यानंतर क्रोएशियाच्या इव्हो कार्लोविचने लॅटव्हियाच्या एर्नेस्ट्स गुलबिसवर ७-६ (५), ७-६ (५) असा विजय मिळवला.

---------

पेसचे अपयश कायम....

बोपण्णा-शरण जोडी या स्पर्धेला टोकियो ऑलिंपिकची तयारी म्हणून बघत आहेत. दुसरीकडे, पेसला प्रतिस्पर्धी जोडीमध्ये एक तरी भारतीय असताना मागील अडीच वर्षात एकही लढत जिंकता आलेली नाही. प्रतिस्पर्धी शरण असताना त्याने चार लढती गमावल्या आहेत. जीवन नेदुन्चेळीयनविरुद्धही तो चार वेळा पराभूत झाला आहे. बोपण्णाविरुद्ध तो फेब्रुवारी २०१७मध्ये दुबईत पराभूत झाला होता. भारताच्या अव्वल टेनिसपटूविरुद्ध पेसने शेवटचा विजय सप्टेंबर २०१६मध्ये मिळवला आहे. त्याने सेंट पीटरर्सबर्ग ओपन स्पर्धेत आंद्रे बेगमनसह खेळताना पूरव राजा-शरण जोडीला नमविले होते.

...

धावफलक :

भारत : पहिला डाव - मयंक अगरवाल झे. स्टार्क गो. लायन ७७, लोकेश राहुल झे. शॉन मार्श गो. हॅझलवूड ९, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १३०, विराट कोहली झे. पेन गो. हॅझलवूड २३, अजिंक्य रहाणे झे. पेन गो. स्टार्क १८, हनुमा विहारी खेळत आहे ३९; अवांतर - ७; एकूण - ९० षटकांत ४ बाद ३०३

बाद क्रम : १-१०, २-१२६, ३-१८०, ४-२२८.

गोलंदाजी : मिचेल स्टार्क १८-०-७५-१, जोश हॅझलवूड २०-७-५१-२, पॅट कमिन्स १९-३-६२-०, नॅथन लायन २९-५-८८-१, मार्नस लबूस्काखनी ४-०-२५-०.

--------------

खेळ आकड्यांचा...

१८ - चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीतील १८ वे शतक झळकावले.

८ - पुजाराने परदेशात आठवे शतक झळकावले. यापूर्वी, पुजाराने जोहान्सबर्गला (२०१३) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, कोलंबोला (२०१५ व २०१७) आणि गॉलला (२०१७) श्रीलंकेविरुद्ध, साउदम्प्टनला (२०१८) इंग्लंडविरुद्ध शतके झळकावली; तसेच या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अॅडलेड आणि मेलबर्न कसोटीत पुजाराने शतक झळकावले होते. त्यापाठोपाठ आता सिडनी कसोटीतही पुजाराने शतक साजरे केले.

५ - कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवे शतक झळकावले. पुजाराने इंग्लंडविरुद्धही पाच शतके झळकावली आहेत.

४५८ - या दौऱ्यात आतापर्यंत पुजाराने ७६.३३च्या सरासरीने सर्वाधिक ४५८ धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकांचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

३ - ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत पुजाराने तीन शतके झळकावली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अशी कामगिरी करणारा तो तिसराच भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, १९७७च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुनील गावसकर यांनी तीन शतके, तर २०१४-१५ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने ४ शतके झ‌ळकावली होती.

११३५* - या दौऱ्यात चौथी कसोटी खेळणाऱ्या पुजाराने आतापर्यंत ११३५ चेंडू खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्यांच्या यादीत पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. १९२८-२९च्या दौऱ्यात इंग्लंडच्या हर्बर्ट सुटक्लाइफ यांनी १२३७ चेंडूंचा सामना करताना ३५५ धावा केल्या होत्या, तर भारताच्या राहुल द्रविडने २००३-०४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १२०३ चेंडूंचा सामना करत ६१९ धावा केल्या होत्या.

...

झीशन अली यांचे

आयटाकडून पुन्हा स्वागत

पुणे : खेळाडूंशी असलेला उत्तम संपर्क लक्षात घेऊन अखिल भारतीय टेनिस असोसिएशनला (आयटा) डेव्हिस कप प्रशिक्षक झीशन अली यांचे वरिष्ठ निवड समितीत पुन्हा 'स्वागत' करावे लागले.

मागे गुरूग्राम येथे 'आयटा'ची कार्यकारी समितीची बैठक झाली होती. त्यात 'आयटा'ने झीशन अली यांना डच्चू दिला होता. त्याचबरोबर समितीचे प्रमुख एस. पी. मिश्रा यांनाही वगळण्यात आले होते. त्यांच्या जागी माजी खेळाडू विशाल उप्पल आणि अंकिता भांबरी यांचा समावेश करण्यात आला होता. यापूर्वीच समितीत असलेले रोहित राजपाल यांना अध्यक्ष करण्यात आले होते, तर नंदन बाळ आणि बलरामसिंग यांचे स्थान कायम राखण्यात आले होते. मात्र, गुरुवारी 'आयटा'ने अचानक 'यू टर्न' घेतला. राजपाल म्हणाले, 'खेळाडूंच्या नेहमी संपर्कात असलेल्यांपैकी झीशन एक आहेत. म्हणूनच आम्ही समितीत पुन्हा त्यांचा समावेश केला आहे. झीशन हेच आता खेळाडूंना मार्गदर्शन करतील.' झीशन हे पाच सदस्यीय समितीत उप्पल यांची जागा घेतील. उप्पल यांना समितीतून वगळताना त्यांना विश्वासात घेतले होते का, असे विचारले असता राजपाल म्हणाले, 'त्यांना या निर्णयाची आधीच कल्पना देण्यात आली होती. त्यांची याबाबत काहीही तक्रार नाही. नवीन सदस्यांची पहिली बैठक झाली तेव्हाही उप्पल उपस्थित नव्हते.' उप्पल म्हणाले, 'आयटाकडून आपल्याला नियुक्तीचे कुठलेही लिखित स्वरुपात पत्र मिळाले नव्हते. त्यामुळे नाराज व्हायचे कारण नाही.' आश्चर्याची गोष्टी म्हणजे उप्पल यांची नुकतीच फेड कपचे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, तर अंकिता भांबरीची प्रशिक्षकपदी. उप्पल म्हणाले, 'मला फेड कपचा कर्णधार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मी त्याचीच तयारी करीत होतो. अस्तानाला रवाना होण्यापूर्वी आम्ही शिबिरही घेणार होतो. तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आम्ही काही दिवस आधीच अस्तानाला जाणार होतो.' आधीच्या फेड कप लढतीत भांबरी हिच कॅप्टन आणि प्रशिक्षक होती.

...

असोसिएशनला माझे योगदान योग्य वाटत असेल, तर संघाच्या हितासाठी मी नेहमीच तयार असतो. मला समितीतून वगळण्याचा निर्णयही असोसिएशनचाच होता आणि तो मी मान्यही केला होता. आता त्यांना माझी गरज वाटत असेल, तर मी पुन्हा ती भूमिका निभावण्यास तयार आहे. खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेसची ताजी माहिती माझ्याकडे आहे. खेळाडूंच्या मी नेहमीच संपर्कात असतो.

- झीशन अली.

...

..अशी चूक पुन्हा होणार नाही!

सिडनी : एकीकडे पहिल्या दोन कसोटीत सलामीवीरांना अपयश आल्यानंतर मयंक अगरवालने मिळालेल्या संधीचे सोने केले खरे; पण आपल्या अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्यात त्याला पुन्हा अपयश आले. अगरवालने ७७ धावांची खेळी केली.

आपल्या या अपयशाबद्दल अगरवाल म्हणाला की, शतकी खेळी करण्यात मला अपयश आले, यामुळे मी निराश झालो आहे. पण, यातून मला धडा मिळाला आहे. मी अशी चूक पुन्हा करणार नाही. मी नॅथन लायनवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला; पण त्यात मला यश आले नाही. मी स्वतःची विकेट फेकली याचे मला वाईट वाटते.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून अगरवाल आणि पुजारावर आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा करण्यात आला. त्याबद्दल अगरवाल म्हणाला, 'न्यूझीलंडच्या 'अ' संघाकडून अशा गोलंदाजीचा अनुभव मी घेतलेला आहे. पण, त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाची अशी गोलंदाजी नक्कीच आव्हानात्मक होती. त्यांचे वेगवान उसळते चेंडू खेळणे कठीण होते. त्यात त्यांनी सातत्यही राखले आणि जराही निसटण्याची संधी आम्हाला मिळू दिली नाही.'

...

पुजाराचा दरारा!

मालिकेत तिसरे शतक; मयंकचे अर्धशतक; भारत ४ बाद ३०३

वृत्तसंस्था, सिडनी

ऑस्ट्रेलियातील कसोटी क्रिकेट मालिकेत सर्वाधिक यशस्वी फलंदाज म्हणून मोहोर उमटविणाऱ्या चेतेश्वर पुजाराने येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात १३० धावांची नाबाद खेळी करत आपला दरारा कायम असल्याचे दाखवून दिले. पहिल्याच दिवशी भारताने पुजाराच्या या शतकामुळे ४ बाद ३०३ अशी दमदार मजल मारली आहे. भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल अजूनही लयीत असल्याचे दिसून आले. त्याने ७७ धावांची खेळी केली; पण शतकापासून तो पुन्हा एकदा वंचित राहिला.

दिवसअखेर पुजारा आणि हनुमा विहारी (३९) नाबाद होते. भारताने पहिल्या दिवशी केलेल्या या कामगिरीमुळे ही मालिका ३-१ अशी जिंकण्याच्या आशा उंचावल्या आहेत.

पुजाराने २५० चेंडूंचा सामना करत १६ चौकारांसह ही शतकी खेळी केली; तसेच विहारीसह ७५ धावांची अभेद्य भागीदारीही रचली. भारताचा सलामीवीर के.एल. राहुल पुन्हा अपयशी ठरला. त्याने अवघ्या ९ धावा केल्या. पण, दुसऱ्या टोकाकडून मयंकने किल्ला लढवला. नंतर त्याला पुजाराची साथ लाभली. दोघांनी उपाहारानंतर दोघांनी आपली भागीदारी ११६ धावापर्यंत नेली. उपाहारानंतर त्यांनी आक्रमक खेळ केला. अगरवालने आपले दुसरे अर्धशतक यादरम्यान झळकाविले. त्याच्या या खेळीत २ षटकारांचा समावेश होता, जे षटकार त्याने नॅथन लायनच्या गोलंदाजीवर लगावले. पण, नंतर लायननेच त्याचा अडसर दूर केला. ३४व्या षटकात अनावश्यक फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. मात्र पुजाराच्या संयमी खेळीला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडे उत्तर नव्हते. अगरवाल परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीचे मैदानात आगमन झाले; पण यावेळीही त्याची प्रेक्षकांनी हुर्यो उडविली. मात्र कव्हर ड्राइव्ह चौकार लगावून कोहलीने आपल्या आगमनाची वर्दी दिली. त्यानंतर पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानानंतर ऑस्ट्रेलियाला विराटच्या (२३) रूपात यश मिळाले. विराटला सातत्याने लेगला चेंडू टाकून बेजार करण्याचा डाव ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आखला आणि त्यात विराट अडकला. जोशच्या गोलंदाजीवर तो यष्टीपाठी झेलचीत झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेलाही मोठी खेळी खेळता आली नाही. फटका मारण्यापासून परावृत्त करण्याचे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे तंत्र यावेळीही यशस्वी ठरले आणि अजिंक्य उसळत्या चेंडूवर झेलचीत झाला.

६३व्या षटकात भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. त्यावेळी भारताला मोठ्या भागीदारीची गरज होती. या दोघांनी ७२ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. अजिंक्यनंतर मैदानात उतरलेल्या हनुमा विहारीने पुजारावरील ओझे कमी केले. त्यामुळे पुजाराने १९९ चेंडूंत आपले १८वे कसोटी शतक पूर्ण केले. पुजाराने यावेळी चौथ्यांदा २००पेक्षा अधिक चेंडूंचा सामना केला आहे. १९७७-७८मध्ये सुनील गावसकर यांनी असा विक्रम केला होता. पुजाराचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सहावे शतक आहे.

तत्पूर्वी, भारताने सकाळी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात यावेळी दोन बदल झाले. अश्विन अद्याप तंदुरुस्त नसल्यामुळे त्याच्याजागी कुलदीप यादवला स्थान मिळाले तर के.एल. राहुलने रोहित शर्माची जागा घेतली. ऑस्ट्रेलियन संघातही दोन बदल केले गेले. त्यात पीटर हँड्सकॉम्ब आणि मार्नस यांचा समावेश होता. अॅरन फिंच आणि मिचेल मार्शऐवजी या दोघांचा विचार करण्यात आला.

...

दक्षिण आफ्रिकेने पाकला

१७७ धावांत रोखले

वृत्तसंस्था, केपटाउन

ड्युअॅन ऑलिव्हिएर, डेल स्टेन आणि कॅगिसो रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाहुण्या पाकिस्तानचा पहिला डाव १७७ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा २१ षटकांत १ बाद ८५ धावा केल्या होत्या. त्या वेळी सलामीवीर मार्कराम ५७, तर हशिम अमला ७ धावांवर खेळत होता.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. पाचव्या षटकात डेल स्टेनने फखर झमानला (१ धाव) बावुमाकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ फिलँडरने इमान उल हकला (८ धावा) पायचीत केले, तर ड्युअॅनने अझर अलीला (२) अमलाकरवी झेलबाद केले. त्यामुळे पाकिस्तानची ३ बाद १९ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर शान मसूद आणि असद शफिक यांनी पाकिस्तानला अर्धशतकी टप्पा पार करून दिला. रबाडाने असदला बाद करत ही जोडी फोडली. असदने २६ चेंडूंत ४ चौकारांसह २० धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ आलेला बाबर आझमही केवळ दोन धावांची भर घालून परतला. त्याला ड्युअॅनने बाद केले. त्यानंतर शान मसूद आणि सर्फराज अहमद यांनी पाकिस्तानला शतकी टप्पा पार करून दिला. ही जोडी जमणार असे वाटत असतानाच रबाडाने शानला बाद केले. शानने ७१ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार सर्फराजने महंमद आमीरच्या साथीने पाकिस्तानला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला. ४५व्या षटकात ड्युअॅनने सर्फराजला बाद केले. सर्फराजने ८१ चेंडूंत ९ चौकारांसह ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर झुंज देत आमीरने पाकिस्तानला १७७ धावांपर्यंत मजल मारून दिली.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान : पहिला डाव - ५१.१ षटकांत सर्वबाद १७७ (सर्फराज अहमद ५६, शान मसूद ४४, महंमद आमीर नाबाद २२, ड्युअॅन ऑलिव्हिएर ४-४८, डेल स्टेन ३-४८, कॅगिसो रबाडा २-३५) वि. दक्षिण आफ्रिका : पहिला डाव - २१ षटकांत १ बाद ८५ (मार्कराम खेळत आहे ५७, हशिम अमला खेळत आहे ७, डीन एल्गर २०).

..

यश नहारचे शतक;

पूना क्लबचा विजय

पुणे : यश नहारच्या नाबाद शतकाच्या जोरावर पूना क्लबने पुणे महापौर करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सनी इलेव्हनवर दहा विकेटनी मात केली.

सनी इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यात अद्वय सिधयेने सर्वाधिक ४२ धावांची, तर हर्ष संघवीने ३० धावांची खेळी केली. प्रत्युत्तर देताना यश नहार आणि अजिंक्य नाईक यांनी पूना क्लबला बाराव्या षटकातच विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक : सनी इलेव्हन - २० षटकांत ६ बाद १३१ (अद्वय सिधये ४२, हर्ष संघवी ३०, शुभम हरपळे नाबाद २१, दीपक शिळमकर २-१७) पराभूत वि. पूना क्लब - ११.४ षटकांत बिनबाद १३५ (यश नहार नाबाद १०४, अजिंक्य नाईक नाबाद २१); रांजणे अॅकॅडमी - सर्वबाद ४६ (अक्षय साळवे ११, पियूष साळवी ३-५, धीरज फटांगरे २-११) पराभूत वि. डेक्कन जिमखाना - ४ बाद ४९ (सौरभ नागवडे ३१, ऋषभ चव्हाण ३-९).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी खर्चाचाही कंटाळा!

$
0
0

मंजूर झालेल्यापैकी १५ टक्केच खर्च; आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना नोटिसा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या बजेटमध्ये विकासकामांसाठी पाणीपुरवठा, बांधकाम, मलनिस्सारण, समाजकल्याणसह १३ विभागांना सुमार एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, डिसेंबरपर्यंत अवघे १५ ते २० टक्केच निधी खर्च झाला आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जास्त निधी शिल्लक ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावत, खुलासा मागितला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे मार्चपर्यंत निधी खर्चाचे नियोजनही सादर करावे लागणार असल्याने अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विकासकामांसाठी त्रिसूत्री लावत, रस्ते कामांना ब्रेक लावला होता. शहराच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या सार्वजनिक बांधकाम, मलनिस्सारण, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुर‌वठा या विभागांवरचा निधी अर्थसंकल्पात वाढविला गेला. नागरिकांशी थेट संपर्कात येणाऱ्या या १३ विभागांना जास्तीचा निधी दिला होता. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, समाजकल्याण आणि नगरनियोजन विभाग या चार विभागांना सहाशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, या विभागांना निधी खर्चात अपयश आले आहे. मुंढे यांनी निधीखर्चाकडे दुर्लक्ष केले. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुंतल्याने निधीखर्चाकडे फारसे लक्ष दिलेले नसल्याचे समोर आले आहे. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढील वर्षाचे अर्थसंकल्पाचे नियोजन सुरू केले असतांनाच, त्यांच्यासमोर धक्कादायक बाबी समोर येत आहेत. डिसेंबरच्या बैठकीत प्रत्येक विभागाने सादर केलेली खर्चाची आकडेवारी धक्कादायक असून निधी उपलब्ध असतांनाही तो खर्च केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कामाची संथ गती राखल्याने धारेवर धरले असून निधी खर्च का झाला नाही, याबाबतचा खुलासा करण्यास सांगितले आहे. सोबत तीन महिन्यात निधी कसा खर्च करणार याचे नियोजन सादर करण्याचे आदेश दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मुंढे नेमके काय करत होते?

तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात विकासकामांपेक्षा बैठकांचाच सिलसिला जास्त चालत होता. दररोज बैठका घेऊन मुंढे विकासकामांचा आढावा घेत होते. मात्र, तरीही एवढा निधी अखर्चित राहिल्याबद्दल लोकप्रतिनिधींनीही तोंडावर हात ठेवला आहे. मुंढे दररोज बैठका घेत असतांनाही, एवढा निधी अखर्चित राहिल्यामुळे मुंढे नेमके बैठका कशाच्या घ्यायचे, असा प्रश्न आता लोकप्रतिनिधी करीत आहेत. विकासकामांसाठी पैसा द्यायचे नाहीत आणि दुसरीकडे निधीही खर्च करायचा नाही, असे त्यांचे धोरण होते, असा आरोप केला जात आहे.

विभाग.......................मंजूर निधी................खर्च निधी

बांधकाम.....................२७६ कोटी................५६ कोटी १२ लाख

आरोग्य व अभियांत्रिकी.....३०३ कोटी................४० कोटी

समाजकल्याण................१३५ कोटी................१६ कोटी

नगररचना.....................१११ कोटी................३३ लाख

विद्युत व यांत्रिक................५९ कोटी................१३ कोटी २२ लाख

शिक्षण............................६९ कोटी................३७ कोटी

घनकचरा........................६९ कोटी................३२ कोटी

सार्वजनिक आरोग्य............३० कोटी................९ कोटी ६१ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images