Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

काविळीने होणारा कॅन्सर बरा होतो

$
0
0
काविळीमुळे होणारा लिव्हर कॅन्सर हा दुर्धर आजार नसून तो योग्य उपाचाराने बरा होऊ शकत असल्याचे निदर्शनास येत आहे.

'शिवाजी अंडरग्राऊंड...' बंद करा

$
0
0
दोन धर्मांमध्ये दरी पाडण्याचे काम शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक करत असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस आयुक्तांकडे केली.

बालकाला मिळाला आधार

$
0
0
साईनगर एक्स्प्रेसमध्ये सोडून दिलेल्या एका पाच महिन्यांच्या बालकाला मनमाड रेल्वे पोलिसांच्या मदतीमुळे नाशिकच्या आधारश्रमाचे नवे घर मिळाले.

सिंहस्थासाठी ५३६ कोटींचे रस्ते

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यातील सुमारे ५३१ कोटी रुपयांची रस्त्याची कामे होणार आहेत.

नाशिक, मालेगावचा डंका हैदराबादेत

$
0
0
आयटीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन असलेले नाशिक आणि टेक्स्टाइल उद्योगाचे माहेरघर असलेल्या मालेगावचे प्रमोशन आता परराज्यात केले जाणार आहे.

बाजार समितीतून ग्रामपंचायत सदस्य हद्दपार

$
0
0
राज्यातील बाजार समितीच्या संचालक मंडळातून ग्रामपंचायत प्रतिनिधी हद्दपार होणार असून, त्याऐवजी विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधींना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळामध्ये सर्व प्रतिनिधी शेतकरी असावेत, यासाठी सरकार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे.

'चणकापूर कालव्यात पाणी सोडा!'

$
0
0
देवळा तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी देवळ्याचे माजी सरपंच जितेंद्र आहेर, विजय पगार यांनी केली आहे.

किकवारी खुर्द शाळा जिल्ह्यात प्रथम

$
0
0
राज्य सरकारच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द प्राथमिक शाळेने जिल्ह्यात व तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर याच कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुक्यातील नवे रातीर या शाळेने व्दितीय व श्रीपुरवडे शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.

चोरट्याकडून सात तोळे सोने जप्त

$
0
0
विंचूर येथे तीन महिन्यांपूर्वी पडलेल्या दरोड्यातील एका आरोपीला पकडण्यात लासलगाव पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

१० लाखांची रोकड लंपास

$
0
0
हॉटेल रसोईजवळ पार्क करण्यात आलेल्या चारचाकीमधील १० लाखांची रोकड चोरांनी लंपास केली​. ही घटना शनिवारी दुपारी सव्वाच्या सुमारास इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.

धुळ्यात दोन गटांमध्ये हाणामारी

$
0
0
शहरातील मुख्य पेठेतील सहाव्या गल्लीत वास्तव्यास असलेल्या दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून रविवारी दुपारी तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

स्पर्धा परीक्षांमध्ये उंचावणार राज्याचा आलेख

$
0
0
स्पर्धा परीक्षांमध्ये राज्याचा आलेख उंचावण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्य सरकारने दीड कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचाच भाग म्हणून ऑगस्ट महिना संपण्यापूर्वीच राज्यातील चार आयएएस ट्रेनिंग सेंटरचे लिंकिंग करण्यात येणार आहे. या लिंकिंगला पुढील वर्षी नाशिकचे प्री-आयएएस सेंटर जोडण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जातपडताळणीचा फटका शाळांच्या नियोजनाला

$
0
0
सरकारी तसेच निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना ३१ जुलैपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्राची पावती सादर करण्याची सक्ती केल्याने सर्वत्र धावपळ सुरू झाली आहे. यामुळे सरकारी कर्मचारी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुटी घेऊन या कामाला लागले आहेत. परिणामी शाळांमध्ये ऑफ‌पिरिएडचे प्रमाण वाढले आहे.

रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांच्या अपघातात वाढ

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करुनही अपघाताची संख्या वाढत आहे. रेल्वे रूळ ओलांडताना २०११ मध्ये ५७ जणांचा मृत्यू झाला होता तर २०१२ मध्ये मृत्यूची संख्या ८७ झाल्याने अधिक कडक उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

फित कापण्याचा असाही अनुभव

$
0
0
आपल्याच वाट्याला काय ते ज्ञान आले आहे, या आर्विभावात जगणारे लोक त्यांच्या वर्तुळात काही ना काहीतरी गोंधळ घालतच असतात. त्यांच्या ज्ञानाचा अन् ते मार्गदर्शन करीत असलेल्या विषयाचा काहीही संबंध नसताना तो ओढून ताणून जोडण्याचा प्रयत्न त्यांचे ज्ञान कसे उघड करतो याचा प्रत्यय मुक्त विद्यापीठात आला.

नाशिककरांनी नोंदविली दहा हजार रोपांची मागणी

$
0
0
सुभद्रा’ इस्टेटतर्फे मोफत आणि घरपोच रोप वाटप उपक्रमाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून एकाच आठवड्यात दहा हजार रोपांसाठी नोंदणी केली असून पाच हजार जणांना घरपोच मोफत रोपे वाटप केल्याचे सुभद्राच्या कार्यकर्त्या अक्षरी सोनटक्के यांनी सांगितले.

मास्तर होऊ पाहणाऱ्यांना गुगली !

$
0
0
मास्तर होऊ पाहणाऱ्या वीस विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहचायला उशीर झाल्याने परीक्षा केंद्र प्रमुखांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला. ही घटना रविवारी अश्व‌िन नगर येथील सिंम्बॉसिस शाळेत घडली.

ग्रामस्थांकडून पुलाचा हॅपी बर्थ डे

$
0
0
कुणी नेत्यांचे वाढ दिवस साजरे करतात, तर कुणी आप्तांचे. परंतु चेहडीच्या ग्रामस्थांनी पुलाचा वाढदिवस साजरा करत त्याच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. इंग्रजांनी उभारलेल्या पुलाला ८८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चेहडी व पळसे ग्रामस्थांतर्फे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी केक कापून व पुलाचे पुजन करून वाढदिवस साजरा केला.

आरटीओतील एजंटगिरीचा बळी

$
0
0
एजंटमुळे सर्वसामन्यांची पिळवणूक होत असल्याची ओरड होत असली तरी त्यांना पायबंद घालणे प्रादेशिक परिवहन विभागाला शक्य झालेले नाही. या एजंटची दहशत एवढी वाढली आहे की त्यांच्या धास्तीने सोमवार पेठेतील परदेशी वाडा येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय रिक्षाचालकास आत्महत्या करावी लागली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी एजंट प्रकाश दुधे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धुळ्यातील आगीत कंपनी खाक

$
0
0
धुळे-मालेगाव रस्त्यावर धुळे शहरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या अवधान एमआयडीसीमधील वर्षा इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीस लागलेली आग साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्णपणे आटोक्यात आली आहे. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा कयास आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images