Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रिक्षाचालकांची अचानक तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक शाखेने गुरुवारी विविध भागांत अचानक बेशिस्त रिक्षा चालकांची तपासणी मोहीम हाती घेतली. यामुळे रिक्षाचालकांची चांगलीच धावपळी उडाली. वाहतूक पोलिसांनी १२८ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली, तर २१ रिक्षाचालकांना थेट वाहनकोर्टात धाडले. याशिवाय मोबाइलवर बोलणाऱ्या २८ वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

शहर वाहतूक शाखेच्या चारही युनिट्सच्या हद्दीत आणि प्रमुख रस्त्यांवर दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. फ्रंट सीट, तसेच कागदपत्रे नसलेल्या रिक्षांना पोलिसांनी लक्ष्य केले. कारवाईदरम्यान रिक्षा सोडून जाणाऱ्यांच्या रिक्षांना जॅमर बसविण्यात आले. याचवेळी पोलिसांनी मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांनासुद्धा रडारवर घेतले. त्यांच्याकडून पाच हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिव्यांग सागरचा गिर्यारोहणात झेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीव्र इच्छाशक्ती, मेहनत घेण्याची तयारी कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकते, याचे उदाहरण म्हणजे सागर वसंत बोडके. जन्मत: ७५ टक्के अंधत्व असूनही गिर्यारोहणाच्या आवडीमुळे गड, शिखर पादाक्रांत करत अंगी असलेली जिद्द यशापर्यंत पोहोचवतेच हे त्याने सिद्ध केले आहे. राष्ट्रीय पातळीवर अंधाच्या स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारातही त्याने विशेष प्राविण्य मिळविले आहे.

इगतपुरीतील मोडाळे येथील सागरला जन्मत:च अंधाराचा सामना करावा लागला. या आव्हानावर मात करणेही तो शिकला. त्यामुळे शिक्षण, नोकरी, छंद या सर्वांमध्येच तो त्याचे कर्तृत्व सिद्ध करतो आहे. दहावीत ८२.६० टक्के गुण प्राप्त करत सागर विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या आर्थिक पाठबळाचा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा होता. हातमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनाही त्यामुळे सागरच्या शिक्षणाची चिंता सतावत होती. मात्र, समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाचा आधार त्याला मिळाल्याने त्याची निवास व भोजनाची चिंता मिटली. त्यामुळे अभ्यास, गिर्यारोहण यात तो यश मिळवू शकला. गिर्यारोहणात असा कोणता गड कोट नाही की, सागरने तो पादाक्रांत केलेला नाही. कळसूबाई शिखर ४ वेळा सर करणारा पहिला अंध तरुण म्हणून त्याने विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने याच प्रावीण्याच्या बळावर वर्षभरापूर्वी मुंबई महापालिकेत नोकरीही मिळविली. त्यामुळे सागरला नवा सन्मानही प्राप्त झाला. त्याच्या कर्तृत्वाची दखल घेत अनेक संस्थांनी त्याचा पुरस्कारांनी सन्मान केला आहे.

\Bहे गड, किल्ले केले पादाक्रांत\B

हरिहर गड, सुधागड, रायगड, विश्रामगड, रामशेज, गाळणा, अडकिल्ले, दुर्गाभांडार, पाबरगड किल्ला, किल्ले हतगड, बळवंतगड, चोल्हेरे, मालेगावचा भूईकोट, अंकाई-टंकाई, दुन्धागड, पिसोळगड, किल्ला मुल्लेर, अजमिरा, दातेगड, खांदेरी, उंदेरी, जलदुर्ग, पद्मदुर्ग, कोलाराई, सायन पोर्ट, मुंबई, खैराई, शहगड, पेमगिरी, माणिकपुंज, खोजाभुइकोट, तोरणगड (पुणे), कंकराळा (मालेगाव) आदी किल्ले सागरने लिलाया सर केले आहेत.

आई-वडिल, शिक्षक, प्रशिक्षक तसेच काही सेवाभावी संस्था यांचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. माझ्यातील कलागुणांना खरी उभारी देण्याचे काम समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहाने केले आहे. वसतिगृहाचे गृहप्रमुख सुभाष फड यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. धीर व आधार दिला यामुळेच मी यश मिळवू शकलो.

- सागर बोडके

लोगो : लुई ब्रेल जयंती विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरणात नांदगावचा टक्का घसरला

$
0
0

दुष्काळ, स्थलांतरामुळे मोहिमेवर परिणाम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेत नांदगाव तालुक्याचा टक्का जिल्ह्यात सर्वांत कमी आहे. या तालुक्यातील ६१ हजार १६५ बालकांपैकी ४२ हजार ५४१ बालकांना म्हणजेच ७० टक्के बालकांनाच लस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या भागात ऊसतोड कामगारांचे स्थलांतराचे प्रमाण मोठे असल्याने लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्ततेस अडचणी निर्माण होत असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने २०१६ मध्ये जगातील गोवर आजाराने मृत्यूचा अभ्यास केल्यानंतर त्यात जगातील १ लाख ३४ हजार बालमृत्यू गोवरने झाल्याचे आढळले. यामध्ये ४९ हजार बालके भारतातील होती. त्यामुळे या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ९ महिने ते १५ वर्षे या वयोगटातील बालकांना गोवर, रुबेला लसीकरण देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण ११ लाख ३९ हजार ५४९ ग्रामीण भागातील मुले-मुली लाभार्थी असून, त्यापैकी १० लाख २६ हजार ९९९ मुला-मुलींना या मोहिमेंतर्गत लस देण्यात आली आहे. म्हणजेच ग्रामीण भागात एकूण ९० टक्के लसीकरणाचे काम झाले आहे. मोहिमेत मालेगावमध्ये कमी प्रतिसाद मिळत असल्याच्या कारणामुळे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मौलवींची भेटही घेतली होती. मात्र, जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवाडीनुसार जिल्ह्यात सर्वांत कमी प्रतिसाद नांदगाव तालुक्यात आहे. त्यानंतर दिंडोरी तालुक्यात १०० टक्के लसीकरण झाले असून, खालोखाल त्र्यंबक तालुक्यात ९७ टक्के, तर देवळा व निफाड तालुक्यात ९४ टक्के लसीकरण झाले आहे.

नांदगाव तालुक्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांची कामे झाल्यावर ते तेथून निघून जातात. परिणामी, लसीकरणासाठी नोंदी असलेल्या सर्व बालकांचे लसीकरण करण्यास अडचणी येत आहेत. तरीदेखील १५ तारखेपर्यंत १०० लसीकरण पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

\B- डॉ. विजय डेकाटे, जिल्हा आरोग्याधिकारी\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले स्मारक कृती समितीच्या सभेत गोंधळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

संगमेश्वरातील मोसम पुलावरील महापालिका शाळा ७४ च्या जागेवर महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी वाल्मीकनगर शाळेत सुरू असलेल्या कृती समितीच्या बैठकीत उपमहापौर सखाराम घोडके यांच्या मुलाने गोंधळ घातला आणि सभा उधळून लावली, असा आरोप माजी नगरसेवक गुलाब पगारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

येथील शासकीय विश्रामगृहावर पगारे यांनी पत्रकार परिषद घेऊन घोडके यांच्यावर तोफ डागली. शहरात महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारक व्हावे यासाठी कृती समितीच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. स्मारकाविषयी चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. २) तालुक्यातील विविध गावात सभा घेण्यात आल्या. वाल्मीकनगर शाळेत रात्री उशिरा बैठक सुरू असतांना घोडके यांचा मुलगा ललित तसेच विनोद वाघ यांनी गोंधळ घातला. बैठकीत भाषण करणाऱ्या कैलास तिसगे यांना शिवीगाळ करीत दमबाजी केल्याचा आरोप पगारे यांनी केला आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. यावेळी उत्तम कचवे, प्रकाश वाघ, संजय वाघ, नितीन शेवाळे, नथु सूर्यवंशी, नरेंद्र वसईकर आदी उपस्थित होते.

व्यापारी गाळे बांधण्याचा अट्टहास

फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी सर्वपक्षीय विचार मंच संचालित कृती समितीच्या वतीने मागणी केली आहे. परंतु, संबंधित जागेवर व्यापारी गाळे बांधण्याचा उपमहापौर सखाराम घोडके, ललित घोडके यांचा अट्टहास आहे. म्हणून त्यांनी सभेत गोंधळ घातला, असा आरोप पगारे यांनी केला.

याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा फुलेंचे स्मारकास विरोध नाही. मात्र, या मुद्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे. स्मारकाच्या नावाखाली गावोगावी बैठका घेऊन गुलाब पगारे आमची बदनामी करीत आहेत. तसे करण्याचे काय कारण? संबंधित जागेवर व्यापारी गाळे उभारण्याचा ठराव सरकारने विखंडित केला आहे. स्मारकाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करायला हवा.

- सखाराम घोडके, उपमहापौर, मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वयाचे बंधन झुगारून जिद्दीने ध्येय गाठा

$
0
0

उद्योजिका नेहा म्हैसपूरकर यांचे महिलांना आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांनी घर आणि कुटुंबाच्या चौकटीपलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. कोणतेही काम करतांना वयाने बंधन बाळगून काम करण्यापेक्षा वेगळे करायचे आहे, अशी जिद्द ठेऊन काम केल्यास ध्येयापर्यंत नक्की पोहचता येते. पण हे काम करतांना त्यात आपल्याला समाधान मिळते की नाही, हे जाणून घेणेही गरजेचे आहे, असे मत उद्योजिका नेहा म्हैसपूरकर यांनी केले.

माळी समाज सेवा समितीच्या महिला मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्तीदिन कार्यक्रम शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये गुरुवारी झाला. गौरवशाली कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार, व्याख्यान, नाटिका असा सर्वसमावेशक हा कार्यक्रम होता. यावेळी उद्योजिका म्हैसपूरकर बोलत होत्या. यावेळी मेट शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शेफाली भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हैसपूरकर म्हणाल्या, की सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केल्याने महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असून देशातील विविध महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. महिलांनी सावित्रीबाईंचे विचार आपल्या कृतीत आणण्याची गरज आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका सुनिता निमसे म्हणाल्या, की महिलांना सावित्रीबाईंमुळे स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार केल्यास चांगला समाज निर्माण मदत होईल.

माळी समाज सेवा समितीचे महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला माळी यांनी प्रास्ताविक केले. तर सरचिटणीस चारुशीला माळी यांनी आभार मानले. यावेळी नीलिमा सोनवणे, लता राऊत, प्रीती महाजन, नगरसेविका माधुरी बोलकर, सुप्रिया खोडे, कुसुम शिंदे, माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा संगीता अहिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनुष्का माळी व श्रावणी बागूल यांनी 'मी सावित्रीबाई बोलतेय' हा एकपात्री प्रयोग सादर करुन सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. तसेच 'बेटी बचाओ बेटी पढाओ'चा संदेश दिला.

\Bया महिलांचा सन्मान

\Bकार्यक्रमात गौरवशाली कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये भिमा जोंधळे, मंगला रोकडे, मंजुळा महाजन, संजीवनी म्हैसफुके, सुधा पगार, रेवती माळी, रागिणी सूर्यवंशी, दिपाली चौधरी या महिलांना सन्मानित करण्यात आले.

..

लोगो : तिचं विश्व

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीजन अॅकॅडमी

$
0
0

व्हिजन अॅकॅडमी

जेलरोड : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने जेलरोडच्या शिवराम नगर येथील व्हिजन अकेडमी शाळेत त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका सुनीथा थॉमस यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्या म्हणाल्या की, ज्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल या बंधनात अडकून ठेवले जात होते, त्या काळात जात, धर्म, लिंग यावर आधारित समाज व्यवस्थेला नजुमानता सावित्रीबाई फुले यांनी स्त्री मुक्तीचा व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. दिपाली भट्टड म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी बालविवाह, सती जाणे, केशवपन आदी अत्याचारांना प्रखर विरोध केला. हें सर्व करतांना त्यांना क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले यांनी साथ दिली. त्यामुळे स्त्री शिक्षणात त्यांचेही भरीव योगदान आहे. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर नाटीका सादर केली. प्रवीण अहिरे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटनाविरोधी सरकारला खाली खेचा!

$
0
0

संविधान सन्मान सभेत डॉ. राजू वाघमारे यांचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संविधान निर्मात्यांनी या देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक समान दर्जा दिला आहे. सध्याचे भाजप-शिवसेना सरकार नागरिकांचे अस्तित्वच नाकारत आहे की काय, अशी शंका येते. भारतीय संविधानामुळे केवळ मागासवर्गीयच नाही तर देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहणार आहे. म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत हा विषय नेऊन, अशा जातीयवादी सरकारला खाली खेचले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केले.

नाशिक जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या वतीने गुरुवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित संविधान सन्मान सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव होत्या. यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हा अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, राजेंद्र बागूल, सुरेश मारू, नगरसेवक राहुल दिवे, भाई आंबोरे उपस्थित होते.

प्रादेशक समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल नगरसेवक राहुल दिवे यांच्यासह सुरेश मारू व रमेश साळवे यांना डॉ. वाघमारे यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हा दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वाघमारे यांनी यावेळी भाजपच्या कारभारावर सडकून टीका केली. भाजप देशातील जनतेला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी असे संविधानविरोधी सरकार खाली खेचले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शोभा बच्छाव यांनी केंद्र आणि राज्यात काँग्रेसचे सरकार परत आणण्यासाठी झपाटून कामाला लागण्याचे आवाहन केले. रमेश कहांडोळे, वत्सला खैरे, आशा तडवी, वसंत ठाकूर, बबलू खैरे, गोपाळ बस्ते, हनीफ बशीर, ज्युली डिसुझा, राजकुमार जेफ, रामकिसन चव्हाण, अरुण दोंदे, प्रदेश नवनियुक्त पदाधिकारी राहुल दिवे, सुरेश मारू, रमेश साळवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित श्याम खनपटे, अशोक शेंडगे, विलासराज बागूल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मस्थळ फेरपडताळणी; पुढील आठवड्यात बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ५७५ अनधिकृत धार्मिक स्थळाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळांची फेरपडताळणी अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील आठवड्यात फेरपडताळणीचा अहवाल आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील धार्मिक स्थळ निष्कासन समितीच्या बैठकीत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या समितीच्या मान्यतेनंतर अनधिकृत धार्मिक स्थळांची वर्गवारीनिहाय यादी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासनाची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. सन २००९ पूर्वीची व नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या धार्मिक स्थळांच्या निष्कासनासाठी राज्य सरकारने निर्धारित केलेली प्रक्रिया अंमलात न आणता महापालिकेने सरसकट कारवाई सुरू केल्याने विनोद थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १ नोव्हेंबर २०१८ रोजी या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने महापालिकेला अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी ५ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने धार्मिक स्थळावर कारवाई करण्यापूर्वीची प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे.

विभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून धार्मिक स्थळांची फेरपडताळणी केली जात असून नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नवीन नाशिक, पंचवटी व सातपूर या पाचही विभागांमधील फेरपडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून नाशिकरोड विभागातील फेरपडताळणी अंतिम टप्प्यात आहे. सोमवारपर्यंत सहाही विभागातील धार्मिक स्थळांबाबतचा अंतिम अहवाल प्रशासनाला प्राप्त होईल. त्याच आठवड्यात धार्मिक स्थळ निष्कासन समितीच्या बैठकीत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या समितीच्या मान्यतेने अनधिकृत धार्मिक स्थळांची वर्गवारीनिहाय यादी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर हरकती सूचना मागवल्या जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अर्थशास्त्र, भूगोल विषयावर हिरे कॉलेजमध्ये चर्चासत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात अर्थशास्त्र, भूगोल या विषयांवर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

'इंडियन अॅग्रिकल्चर : प्रॉब्लेम्स अॅन्ड प्रॉस्पेक्टस' या विषयावर विचारमंथन केले जाणार आहे. कृषिप्रधान भारतातील बहुतांश लोक हे शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. भारतीय शेतीच्या समस्या आणि त्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येणे शक्य आहे, याचा विचार या चर्चासत्रात केला जाणार आहे. अर्थशास्त्र आणि भूगोल विषयातील राष्ट्रीय स्तरावरील अनेक ख्यातनाम संशोधक-अभ्यासक या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर, उपप्राचार्य डॉ. अरुण पाटील, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. नंदू पवार, कला व वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. विनीत रकिबे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉवर फॅक्टरसंदर्भात ‘निमा’त कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'निमा'तर्फे पॉवर फॅक्टर संदर्भात शुक्रवारी (दि. ४) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. निमा हाऊस, सातपूर येथे सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान ही कार्यशाळा होणार आहे.

१ सप्टेंबर २०१८ पासून वीजदरांत झालेल्या बदलास अनुसरून पॉवर फॅक्टर पेनल्टी, इन्सेन्टिव्ह या विषयावर विस्तृत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. टीडीके एप्कॉस कंपनी कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. कार्यक्रमास वक्ते प्रो. डॉ. डी. ई. कुशारे हे असून उपस्थितांना वरील विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. एमएसईडीसीएल चे मुख्य अभियंता जनवीर हे प्रमुख अतिथी असणार आहेत. वरील विषयावर उद्योजक व व्यावसायिकांमध्ये जनजागृती निर्माण होणे आवश्यक असून या कार्यशाळेद्वारे उद्योजकांचा संभ्रम, प्रश्न व शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न असून उद्योजक व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर व शशिकांत जाधव, मानद सचिव किरण पाटील व सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, निमा ऊर्जा समितीचे अध्यक्ष रावसाहेब रकिबे यांनी केले आहे.

वस्त्रोद्योगासाठी ऑनलाईन नोंदणी

नाशिक : वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीजदर सवलतीस पात्र ठरणाऱ्या वस्त्रोद्योग घटकांना संचालनालयाच्या वेबासाइटवर ऑनलाइन नोंदणी व अर्ज करावयाचे आहे. सर्व संबंधित वस्त्रोद्योग घटकांनी https://www.dirtexmah.gov.in या वेबसाइटवर ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी व वीजदर सवलतीसाठी अर्ज पाठवावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार बसडेपोसाठी जागेची मागणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने सिटी बससेवेसाठी आवश्यक चार डेपोसाठी राज्यपरिवहन महामंडळाकडे प्रस्ताव सादर केला आहे. महामंडळाच्या ताब्यात असलेले नाशिकरोड, जुने सीबीएस, सातपूर व निमाणी हे बसडेपो भाडेतत्त्वावर मिळावेत, असा प्रस्ताव पालिकेने ठेवला आहे. आता महामंडळाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

सिटी बससेवा पालिकेमार्फत चालविण्याचा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्यासाठीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. 'ग्रॉस कॉस्ट कटिंग' तत्त्वावर सिटी बससेवा चालविण्याचा महासभेचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यासाठी कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मक्तेदार नियुक्तीसाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. महापालिकेच्या बससेवेअंतर्गत शहरात ४०० सीएनजी बसची खरेदी केली जाणार आहे. बस खरेदी आणि चालक नियुक्तीची जबाबदारी मक्तेदाराची असली तरी या बससेवेसाठी डेपो, टर्मिनल, शेल्टर्स उभारण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे. पालिकेला सर्वप्रथम डेपो हवे असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे असलेले चार डेपो भाडेतत्त्वावर मिळावेत, असा प्रस्ताव महामंडळाकडे देण्यात आला आहे. नाशिकरोड येथील मुक्तिधाममागील आनंदनगर परिसरात महामंडळाने सिंहस्थकाळात ५.७४ हेक्टरपैकी ३ हेक्टर जागेत डेपो क्रमांक तीनची उभारणी केली आहे. या ठिकाणी १२ फलाट आहेत. याशिवाय जुने सीबीएस येथील ०.६३ हेक्टर जागेतील १० फलाटांचे बसस्थानक, सातपूर येथील एमआयडीसीलगतच्या ०.९३ एकर जागेत उभारणी केली जात असलेला बसडेपो तसेच निमाणी येथील ०.६४ हेक्टर जागेतील बसस्थानकाची जागा पालिकेला बसडेपोसाठी भाडेतत्त्वावर द्या, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

चार ठिकाणी बस टर्मिनल

बसडेपोसह चार ठिकाणी आणखी बस टर्मिनल्स उभारण्यात येणार आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी हे बस टर्मिनल असतील. पहिल्या टप्प्यात आडगाव येथील ट्रक टर्मिनस, तपोवनातील साधूग्रामसमोरील आरक्षित जागा, नाशिकरोड येथील रेल्वस्थानकालगतची सिन्नरफाटा परिसरातील जागा, तसेच पाथर्डी फाटा येथील जकात नाक्याच्या जागेवर बस टर्मिनल उभारण्याची योजना आहे. शेल्टरसाठी पीपीपी तत्त्वावर निविदा काढण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्र तपासणी शिबिर रविवारी

$
0
0

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आणि श्रीधारीयम आयुर्वेदा यांच्यातर्फे रविवारी (दि. ६) नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई नाका येथील हॉटेल रामा हेरिटेज येथे हे शिबिर होणार आहे. यावेळी उपस्थित रुग्णांवर केरळच्या प्राचीन पद्धतीनुसार आयुर्वेदाच्या सहाय्याने उपचार केले जाणार आहेत.

आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि श्रीधारियाम आयुर्वेदा यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरातील उपचार आयुर्वेदाच्या शल्क्य तंत्रावर आधारीत आहे. तसेच या शिबिरात उपचार करणारे डॉक्टर्स अधुनिक तंत्राच्या सहायाने उपचार करणार आहे. त्यात मधुमेह झाल्यानंतर अनेकांना रेटिना व ग्लुकामाचे आजार संभवतात. असे आजार उद्भवू नये, यासाठी त्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजाराच्या मुळाशी जाऊन त्यावर उपचार केले जाणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ८७९२४७३७४६ या मोबाइल नंबरवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यू अळ्या सापडल्यास दंड

$
0
0

महापालिकेने काढली अधिसूचना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने डेंग्यूबाबत कठोर धोरण स्वीकारले असून, सातत्याने वाढणाऱ्या डेंग्यूच्या उपद्रवावर आता दंडाची मात्रा शोधून काढली आहे. गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूचा सततचा त्रास लक्षात घेत त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांच्या घरात डेंग्यू अळीची उत्पत्ती आढळल्यास दोनशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दंड प्रति उत्पत्तिस्थळ आकारण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिसूचनाही महापालिकेने काढली आहे. त्यामुळे पुढील वर्षी डेंग्यू नियंत्रणात राहील, असा दावा करण्यात आला आहे.

शहरात गेल्या तीन वर्षांत शहरात सातत्याने डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या आजाराने कहर केला आहे. स्वाइन फ्लू आणि डेंग्यूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दोन्ही आजार हे नागरिकांच्या दुर्लक्षामुळे होत आहेत. विशेषत: डेंग्यूच्या अळ्या नागरिकांच्याच घरात आढळून येत असल्याचे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. वैद्यकीय विभागाने दिलेल्या घरभेटीत ही बाब समोर आली आहे. नागरिकांच्या घरात, गच्ची, गॅलरी, फ्रीज आदी भागांत डेंग्यूच्या अळ्या सातत्याने आढळून येत असल्याने महापालिकेच्या वतीने वांरवार सूचना दिल्या जातात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या दोन वर्षांत डेंग्यूचा कहर इतका वाढला, की नाशिककर त्रस्त झाले आहेत. सलग तीन वर्षांत एक हजारावर रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिकेच्या वतीने एकीकडे जनजागरण मोहीम व तपासणी मोहीम राबविली जात आहे. मात्र, जबाबदारीचे भान आणण्यासाठी आता दोनशे रुपये प्रति उत्पत्तिस्थळ दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास थेट २०० रुपये दंड करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक रन’ १२ जानेवारीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शनिवारी, १२ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता महात्मानगर क्रीडांगणापासून नाशिक रन होणार आहे. यंदा रनचे १७ वे वर्ष असून, या रनमध्ये २० हजारांहून अधिक नाशिककर धावतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

नाशिक रनच्या आयोजनाबाबत ट्रस्टतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष एच. बी. थोंटेश, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार आदी उपस्थित होते. बॅनर्जी म्हणाले, की नाशिक रन २०१९ चे उद्घाटन सकाळी ८ वाजता होईल. या वेळी नाशिक रन ज्योत प्रज्वलित केली जाईल. सुरुवातीला सकाळी साडेआठ वाजता विशेष मुलांसाठी रन होईल. विद्यार्थ्यांसाठी सकाळी पावणेनऊला रनची सुरुवात होईल. अखेरीस सकाळी ९.१० वाजता प्रौढांसाठीच्या रनला सुरुवात करण्यात येईल. रनचे आयोजन बॉश आणि ते इप्कॉस कंपनीने केले असून, रनमधून संकलित होणारा निधी समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. महात्मानगर बस स्टॉपजवळ रनसाठी नावनोंदणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी रनच्या माध्यमातून ८० लाखांचा निधी संकलित करण्यात आला होता. यंदा १ कोटीपर्यंत निधी संकलन होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

\Bअसा असेल मार्ग

\Bमहात्मानगर ग्राउंडपासून पारिजातनगर, मधू इंडस्ट्रीज, समर्थनगर, पारिजातनगर, सिक्स सिग्मा हॉस्पिटल व महात्मानगर ग्राउंड असा मार्ग विद्यार्थ्यांसाठी असेल, तर प्रौढांसाठी महात्मानगर ग्राउंड, पारिजातनगर, जेहान सर्कल, स्वामी समर्थ चौक, आयसीआयसीआय एटीएम, समर्थनगर, पारिजातनगर, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, महात्मानगर, बंजारा हॉटेल व महात्मानगर ग्राउंड असा रनचा मार्ग असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटशेतीवर भर देत दुष्काळावर मात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाची दाहकता, कवडीमोल किंमतीने विक्री होणारा शेतमाल यामुळे यंदा शेतकरी संकटात सापडला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची ससेहोलपट कमी करण्यासाठी नववर्षात राज्य सरकारच्या गटशेती उपक्रमाबाबत अधिकाधिक शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने करणार आहे.

एकाच परिसरातील बहुतांश शेतकरी साधारणत: एकाच पद्धतीचे पीक घेतात. ते बाजारपेठेत येते तेव्हा मागणीपेक्षा पुरवठा अधिक होण्याची शक्यता बळावते. अशा परिस्थितीत पिकाला अपेक्षित भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचेही नुकसान होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकत्रितरित्या पिक नियोजन करता यावे यासाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये गटशेती उपक्रमाची घोषणा केली. अधिकाधिक शेतकऱ्यांनी गटशेती करावी, यासाठी त्यांना काही लाभही देऊ केले. गटशेतीमुळे पिक नियोजनाबरोबरच शेतकऱ्यांना उचलावी लागणारी जोखीमही विभागली जाणार आहे.

गटशेतीमध्ये शेतकऱ्यांचा समूह वेगवेगळ्या प्रकारच्या पीक लागवडीचे नियोजन करू शकतो. बाजारात वेगवेगळ्यावेळी येणाऱ्या या पिकामुळे उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देण्याचा उद्देश असला तरी जिल्ह्यात अद्याप गटशेतीला जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. शेतकऱ्यांनी एकत्रित येण्यापासून अनेक अडचणींचा अडसर त्यासाठी येत असल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाने नोंदविले आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यापासून आणखी काय उपाययोजना करता येतील याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. गटशेती अंमलबजावणीवर नववर्षात भर देण्याचा मनोदय जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराफी दुकानासह एक घर फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील पवननगर आणि सिंहस्थनगर येथे दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला. यात, एका सराफी पेढीचाही समावेश आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सिडकोतील पवननगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकडीसह दागिने पळवून नेले. सुमारे एक लाख एक हजार ५०० रुपयांचा हा मुद्देमाल होता. या प्रकरणी दिनेश विलास साळुंखे (रा. सूर्यनारायण चौक, पवननगर) यांनी तक्रार दिली. २३ डिसेंबर रोजी साळुंखे कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी ही घरफोडी केली. अज्ञात चोरट्यांनी साळुंखे यांच्या घराचा मागचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कपाटातील २० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा एक लाख एक हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत. सराफी दुकान फोडून चोरट्यांनी पुतळ्याच्या अंगावर ठेवलेल्या दोन सोन्याच्या ठुश्या चोरून नेल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस चोरट्यांचा माग काढीत आहेत. या प्रकरणी निखील आबासाहेब दाभाडे (रा. बिनोरिया रेसिडेन्सी, पांडुरंग चौक, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दिली. दाभाडे यांचे सिंहस्थनगर भागातील राका चौकात गायत्री ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून ही चोरी केली. दाभाडे यांनी दुकान बंद करण्यापूर्वी सर्व दागिने आपल्या सोबत नेले होते. मात्र, शोभेसाठी ठेवलेल्या पुतळ्याच्या गळ्यातील सोन्याच्या ठुशी अनावधानाने राहून गेल्या. दुकान फोडून आत आलेल्या चोरट्यांसाठी हीच पर्वणी ठरली. पुतळ्याच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन ठुश्या चोरट्यांनी पळवल्या. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूकमार्गात बदल

$
0
0

नाशिक : मविप्र मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त ६ जानेवारी रोजी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक ते आयुक्तालयाच्या हद्दीपर्यंत एकेरी वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती नाशिक शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. या मार्गावर ६ जानेवारी रोजी सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या मार्गावरची धोंडेगावकडून अशोकस्तंभाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. हा मार्ग पहाटे ५ ते दुपारी १२ पर्यंत एका बाजूने बंद राहील. रस्त्याची दुसरी बाजू अशोकस्तंभाकडून धोंडेगावकडे जाणारी वाहतूक मात्र सुरू राहणार आहे, असे पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यावर छापा,वीस जण ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेल रोडवरील चरणदास मार्केटजवळील गाळ्यात सुरू असलेल्या कल्याण बाजार नावाच्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिस पथकाने छापा २० जुगारींसह ३० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त ईश्वर वसावे यांच्या आदेशाने नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान ही कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी धनराज गायकवाड (वय ५६ रा. श्रमिकनगर), शेख सलीम (५० रा. चरणदास मार्केट), विजय बेलेकर (४३, रा. सुवर्णनगर, दसक), सुरेश ताकतोडे (३४, रा. मते मळा, रासबिहारी रोड), बळीराम शेलार (३३, रा. पंचक), बाबूराव दांडेकर (४३, रा. नांदूरनाका), चंद्रभान पवार (५०, रा. नांदूरनाका), चिमाजी पवार (६५, रा. नांदूरनाका), रामानंद पुजारी (६२, रा. सुवर्ण सोसायटी, आर्टिलरी सेंटर रोड), नामदेव आठबैले (५०, रा. मोरे मळा, बालाजीनगर), भास्कर जाधव (४८, रा. मोरे मळा, बालाजीनगर), बाळू जगताप (५५, रा. चरणदास मार्केट), प्रदीप ढगे (५२, रा. आविष्कार सोसायटी, मॉडेल कॉलनी), सुखराम ठाकूर (३०, रा. श्रीकृष्णनगर, दसक), गोकुळ आहिरे (४०, रा. नांदूरनाका), भटू माळी (६५, काकरदा, जि. नंदुरबार), राजू गायकवाड (३८, अयोध्यानगर, जेलरोड), राजू घाटे (५०, पवारवाडी, सचिन बर्वे (४२, रा. शिवाजीनगर) आणि प्रशांत आंबेकर (४१, रा. मॉडेल कॉलनी) या २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवालांना महसूलमंत्र्यांचा शब्द!

$
0
0

मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गतिमान प्रशासनात राज्यातील कोतवालांची भूमिका व योगदान मोलाचे आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय जाहीर करून कोतवालांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी राज्य कोतवाल संघटनेच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे मंत्रालयातील बैठकीत दिली. महसूलमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील कोतवालांच्या मागण्या मार्गी लागण्याची शक्यता आहे.

चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे या प्रमुख दोन मागण्यांसाठी गेल्या ४७ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश इंगोले, उपाध्यक्ष सुनीत गमरे, सरचिटणीस भारत पवार, बापू आहिरे, जयवंत जाधव, नितीन चंदन, बाळू झोरे, विवेक देशमुख आदींच्या नेतृत्वाखाली येथील विभागीय आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. कोतवालांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत महसूलमंत्र्यांची मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील कोतवालांच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी गतिमान प्रशासनासाठी राज्यातील कोतवालांची भुमिका कशी व किती महत्वाची आहे ही बाब कोतवालांच्या प्रतिनिधींनी महसुलमंत्र्यांपुढे मांडली. मुख्यमंत्र्यांपुढे कोतवालांच्या मागण्यांचा प्रश्न मांडुन येत्या दोन तीन दिवसांत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी कोतवालांच्या प्रतिनिधींना दिले. या बैठकीस वित्त, महसूल, सामान्य प्रशासन या विभागांचे अप्पर मुख्य सचिव यांच्यासह कोतवालांच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष गणेश इंगोले, उपाध्यक्ष सुनित गमरे, सरचिटणीस भारत पवार, संजय जाधव, राजेंद्र पुजारी, गोपाळ ठवरे आदी उपस्थित होते.

... तर आंदोलन संपुष्टात

महसूलमंत्र्यांसोबत कोतवालांच्या मागण्यांसदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याने कोतवालांच्या मागण्या मान्य होण्याची शक्यता असल्याने कोतवालांच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोतवालांच्या मागण्या मान्य केल्याचे शासनाने जाहीर केल्यास कोतवालांचे दीर्घ काळापासून सुरू असलेले आंदोलनही संपुष्टात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅप्पी स्ट्रीट’वर आज धमाल, मस्ती अन् कल्ला

$
0
0

सुयोजित व्हॅरेडियन व्हॅली ते बापू पूल या रस्त्यावर आयोजन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्या रस्त्यावर सायंकाळी हमखास बाइक्स वेगात चालविल्या जातात, त्या रस्त्यावर मनसोक्त बागडण्याची संधी आज नाशिककरांना मिळणार आहे. धम्माल, मस्ती अन् कल्ला करण्याची संधी व्हॅरेडियन व्हॅली ते बापू पूल या रस्त्यावर 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'हॅप्पी स्ट्रीट'च्या निमित्ताने आज (५ जानेवारी) ही संधी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत नाशिककरांना मिळणार आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅप्पी स्ट्रीट' हा उपक्रम नाशिककरांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या आनंदोत्सवाची पर्वणी आज सायंकाळी पुन्हा अनुभवता येणार आहे. हॅप्पी स्ट्रीटवर हिंदी, मराठी गाण्यांवर झुम्बा डान्स करता येणार आहे. रस्त्यावर रांगोळी काढण्याची, गेम खेळण्याची, गाणे ऐकण्याची, जादूचे प्रयोग पाहण्याची अन् तुमचा छंद जोपासण्याची संधी मिळणार आहे. तसेच नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, आकाश निरीक्षण, क्विलिंग आर्ट, कॅलिग्राफी, पोट्रेट, दोरीच्या उड्या, आर्ट अँड क्राफ्ट, व्हॉलिबॉल अन् सायकल राइडची गंमत अनुभण्याची संधी मिळणार आहे. पर्यावरणविषयक खेळ आणि भरतनाट्यमचा बहारदार कलाविष्कार असणार आहे. अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग, म्युझिकल आणि इन्स्ट्रूमेंटल सादरीकरण, डान्स परफॉर्मन्सेस यासह पोलिस बॅण्डचा ताल या उपक्रमांनी धम्माल वाढणार आहे.

हॅप्पी स्ट्रीटवर सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत रक्तदाब आणि शुगरचेकअप करून घेता येणार आहे. या उपक्रमात सरप्राइज गिफ्ट जिंकण्याची संधीदेखील असणार आहे. नववर्षाच्या पहिल्या विकेंडला यादगार बनवविण्यासाठी ही पर्वणी खास ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images