Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

लॉग-इन होईना अन् कि बोर्ड चालेना!

0
0

व्ही. एन. नाईक केंद्रात टायपिंग परीक्षेत अडचणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनिवारपासून सुरू झालेल्या शासकीय कॉम्युटर टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शहरातील एका केंद्राच्या ढिसाळ कारभाराचा फटका परीक्षार्थींना बसला. विशेषे म्हणज कि-बोर्डविषयी अडचणी सांगणाऱ्या उमेदवारांना परीक्षकांनी 'तुम्ही की बोर्ड घरून आणायचा होता' अशा शब्दात उत्तरे दिल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी शहरातील व्ही. एन. नाईक कॉलेज परीक्षा केंद्रांवर २५ इन्स्टिट्यूटमधील परीक्षार्थी उपस्थित होते. मात्र लॉग-इन होण्यासाठी बराच वेळ जाणे, कि-बोर्ड ऑपरेट न होणे असे अनुभव उमेदवारांना आल्याने काहींना या गैरनियोजनाचा फटका बसला. अनेकांनी याबाबत तक्रारही केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

राज्यात सध्या असणाऱ्या मेगा भरतीच्या बातम्यांमुळे शासकीय कॉम्प्युटर टायपिंगसारख्या परीक्षांकडे उमेदवारांचा कल वाढला आहे. या परीक्षेमध्ये वेळ आणि टायपिंगच्या वेगाचा समन्वय साधावा लागतो. हा समन्वय साधू न शकणारा विद्यार्थी स्पर्धेबाहेर फेकला जातो. यासाठी वर्षभर विद्यार्थी सातत्याने कॉम्प्युटर टायपिंगचा सराव करतात. दीर्घकाळ असा सराव करूनही ऐनवेळी परीक्षा केंद्रावर १५ ते २० मिनीट उशिरा लॉग-इन होणे, की बोर्ड व्यवस्थित ऑपरेट न होणे अशा अनुभवांमुळे काही विद्यार्थ्यांना तयारी असूनही तांत्रिक कारणांमुळे माघार घ्यावी लागली, असा दावा काही उमेदवारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'मटा'शी बोलताना केला. या तांत्रिक अडचणींबाबत उमेदवारांनी परीक्षकांना तक्रारी केल्यानंतर, 'तुम्ही की बोर्ड घरून आणायचा होता' अशी तऱ्हेवाईक उत्तरे दिल्याने उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

असे आहे नियोजन

राज्यातील ३१२ केंद्रांवर परीक्षा होणार

राज्यभरातून १ लाख ९३ हजार विद्यार्थी प्रविष्ट

प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र

नाशिक विभागात ३६ केंद्रांवर परीक्षा

शनिवारपासून ११ जानेवारी पर्यंत इंग्रजी विषयाच्या टायपिंग परीक्षा

१८ ते २३ जानेवारी दरम्यान मराठी व हिंदी विषयाच्या टायपिंग परीक्षा

प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी दीड तासाचा कालावधी

विद्यार्थ्यांच्या बॅचनिहाय परीक्षा होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपी सीईओंचे कारवाईचे सत्र

0
0

सरपंच, ग्रामसेवक व मुख्याध्यापक रडारवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २०१८ मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करून गैरहजर शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीस मान्यता देण्याऱ्या इगतपुरी तालुकयातील तत्कालिन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत.

इगतपुरी तालुक्याप्रमाणेच बागलाण तालुक्यातील बिजारसे येथील एका प्रकरणात ग्रामसेवक व सरंपच यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले गिते यांनी दिले आहेत. शिस्तविषयक कारवाईचे अधिकार प्रदान करुनही गटविकास अधिकारी नोटिसा देण्याव्यतिरिक्त कार्यवाही करीत नसल्याने गिते यांनी गंभीर दखल घेतली आहे.

गिते यांनी त्यांच्याकडील अधिकारांचे हस्तांतरण करुन शिस्तविषयक कारवाईचे सर्व अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. मात्र तरीदेखील गटविकास अधिकारी या अधिकारांचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बागलाण तालुक्यातील बिजोरसे ग्रामपंचायतीमध्ये १४ व्या वित्त आयोगांतर्गत भूमिगत गटारीच्या कामाबाबत उपसरपंच व सदस्यांनी तक्रार केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. चौकशी अहवालात या कामात अनियमितता झाल्याचे व यास ग्रामसेवक व सरपंच जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र याबाबत ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रशासकीय कारवाई करणे आवश्यक असताना गटविकास अधिकाऱ्यांनी केवळ नोटीस देण्याचेच काम केले त्यामुळे त्यांनी गंभीर दखल घेतली.

परिचरांना पदोन्नती व नियमित वेतनवाढ

जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आल्यानंतर १२ वर्षे सलग सेवा झालेल्या तब्बल १०४ परिचरांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. ६ परिचरांना परिक्षाधीन कालावधी संपुष्टात आणून त्यांना नियमित वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल टॉवर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिओ कंपनीचा मोबाइल टॉवर देण्याचे आमीष दाखवून दोघांनी एकास ४९ हजार ५०० रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसात माणिक बबलू दंडापातसह आणखी एका संशयिताविरोधात फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशीलकुमार सिंह (३५, रा. गांधीनगर) यांना २३ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता मोबाइलवर फोन आला. संशयित आरोपीने बँक खाते क्रमांक व आयएफएसी क्रमांक देत पैसे टाकण्यास सांगितले. तसेच या मोबदल्यात तुमच्या प्लॉटवर जिओचा मोबाइल टॉवर मंजूर होईल, त्यामुळे आर्थिक फायदा होईल, असे आमिषही संशयितांनी दाखवले. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार यांनी दोनदा ४९ हजार ५०० रुपये बँकेत जमा केले. त्यानंतर संशयितांनी सिंह यांच्याकडे १५ लाख रुपये मागितले. त्यांनी ते देण्यास नकार दिला. तसेच टॉवरबाबत विचारणा केली. त्यावेळी संशयितांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी उपनगरला फसवणुकीची फिर्याद दाखल केली.

घरातून दोन लॅपटॉपची चोरी

चेतनानगर येथील घरात शिरून चोरट्याने दोन लॅपटॉप लंपास केले. ही घटना ३० डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी ललित गुलाबराव पाटील (२६, रा. डोंगरगाव, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांनी इंदिरानगर पोलिसात फिर्याद दिली. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरात घुसलेल्या चोरट्याने दोन लॅपटॉप चोरून नेले. घटनेचा अधिक पोलिस हवालदार व्ही. एस. पाठक करीत आहेत.

..

तरुणाची आत्महत्या; मायलेकींविरूद्ध गुन्हा

आडगाव शिवारातील राहणाऱ्या तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी आडगावमधीलच मायलेकींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रिहाना आत्तार आणि जास्मीन आत्तार (दोघी रा. श्रीरामनगर, आडगाव शिवार) असे दोघा संशयितांचे नावे आहेत. राहुल संजय पाटील (२३, रा. गजानन पार्क, आडगाव शिवार) या तरुणाने शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या घरात गळफास घेत शुक्रवारी (दि. ४) आत्महत्या केली. या प्रकरणी राहुलचा भाऊ सागर याने रिहाना आणि त्यांची मुलगी जास्मीन या दोघींमुळे राहुलने आत्महत्या केल्याचा आरोप केला. त्याच्या फिर्यादीनुसार, दोघी मायलेकी राहुलकडे चार लाख रुपयांची मागणी करीत त्यास मानसिक त्रास देत होते. दोघींच्या छळाला कंटाळून राहुलने आत्महत्या केली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बिडगर हे तपास करीत आहेत.

..

तरुणांवर हल्लाप्रकरणी जमावाविरुद्ध गुन्हा

सिडको, उत्तमनगर परिसरात दोन तरुणांना बेदम मारहाण करणाऱ्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलिसात १७ ते १८ जणांविरोधात गुन्हा दाखल. जमावाच्या मारहाणीत अविनाश नानाजी उशिरे (१९, रा. उत्तमनगर) हा तरुण जखमी झाला. उत्तमनगर परिसरात संशयित विशाल माणिक चौघुले (२३), अशपाक रफिक पठाण (३३), विशाल साहेबराव धनवटे (२७), तौफीक रशिद शेख (२२), राहुल राधाकृष्ण गव्हाणे (२२) यांच्यासह इतर १५ ते १६ जणांच्या जमावाने शनिवारी (दि. ५) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तलवार, लाठ्या, काठ्यांनी अविनाश व त्याचा मित्र मोहित पाटील यांना बेदम मारहाण केली. घटनेनंतर संशयित पसार झाले होते.

वाहतूक पोलिसास धक्काबुक्की

अपघातानंतर वाहतूक पोलिसास धक्काबुक्की करून दोघे संशयित फरार झाल्याची घटना पाथर्डी फाटा येथील पोलिस चौकीजवळ घडली. या प्रकरणी पोलिस नाईक सचिन गोपाल जाधव (३९) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसात राजेंद्र बळीराम सोनवणे (३३) आणि सुनील धनू जाधव (२२) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन जाधव यांच्या फिर्यादीनुसार राजेंद्र आणि सुनील यांनी अपघात केला. त्यामुळे जाधव यांनी दोघांना अपघातग्रस्त वाहन पोलीस चौकीस आणण्यास सांगितले. मात्र, दोघांनी जाधव यांच्या आदेशास विरोध करून त्यांना धक्काबुक्की करून पळ काढला.

बसचालकास मारहाण

वाहनास धक्का लागल्याची कुरापत काढून बसचालकास मारहाण करणाऱ्या एकास सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. सेफन सिंकदर सैयद (२४, रा. बडदे नगर, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे. अरुण दगडू उगले (३८, रा. दोडी बुद्रुक, ता. सिन्नर) यांनी प्रकरणी फिर्याद दिली. उगले हे शनिवारी (दि. ५) सायंकाळी बस (एमएच १५ एके ८०७९) चालवत होते. मेहेर सिग्नलजवळ कारचालक सेफन सैय्यद याने गाडीला खरचटल्याची कुरापत काढून अरुण उगले यांना मारहाण केली. या प्रकरणी उगले यांनी सरकारवाडा पोलिसात सैय्यद विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून सेफन सैयदला अटक केली.

..

जाधव मळ्यात आत्महत्या

गंगापूर रोडवरील जाधव मळा परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षाच्या व्यक्तीने विषप्राशन करून आत्महत्या केली. संजय दगा मोरे असे या व्यक्तीचे नाव आहे. संजय मोरे यांनी ३१ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास विषप्राशन केले होते. त्यामुळे त्यांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी (दि. ५) सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

..

विवाहितेचा मृत्यू

स्टोव्हचा भडका होऊन गंभीररित्या भाजलेल्या विवाहितेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. भारती अशोक पुजारी (२१, रा. स्वामीनगर, अंबड) असे या विवाहितेचे नाव आहे. स्टोव्हचा गुरुवारी (दि. ३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भडका होऊन यात भारती ९० टक्के भाजल्या होत्या. त्यामुळे त्यांना त्यांची नणंद सवितादेवी यांनी सिव्हिलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी (दि. ५) भारती यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या १७ व्या वर्षी चिन्मयचे ‘संगीत चंद्रप्रिया’

0
0

कालिदास कलामंदिरात ३० जानेवारीला प्रयोग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संगीत नाटकाला 'देवबाभळी'च्या रुपाने चांगले दिवस आलेले असताना चिन्मय मोघे नावाच्या आणखी १७ वर्षाच्या तरुणाने नाट्यक्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी 'संगीत चंद्रप्रिया' या संगीत नाटकाची निर्मिती केली आहे. हे संगीत नाटक ३० जानेवारी महाकवी कालिदास कलामंदिरात याचा प्रयोग होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षांनी स्वतःची नांदी व शास्त्रीय नाट्यसंगीताचा आधार असलेली नवी १२ नाट्यपदे घेऊन हे संगीत नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे.

नाटकाचा वैचारिक आशय स्त्रीवाद अधोरेखित करणारा असून चंद्रगुप्त यांची विधवाविवाह तसेच सतीप्रथा याबाबत नाटकात मतप्रदर्शन आहे. या सर्व वाईट रुढी बंद करण्यासाठी चंद्रगुप्ताने केलेला आटापिटा आणि या सर्व प्रकाराला कारणीभूत ठरणारी त्याची प्रेयसी यावर संगीत चंद्रप्रिया हे नाटक बेतलेले आहे. या नाटकाची निर्मिती, लेखन व दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेत चिन्मय आहे.

मूळ नाशिकचा असलेला चिन्मय पुण्यातील एस. पी. कॉलेजात बी. ए. च्या प्रथम वर्षाला आहे. नाशिकमधील आदर्श विद्यालयात दहावी तर केटीएचएममध्ये बारावी शिकलेल्या चिन्मयने वृत्तात सर्व लेखन केले आहे. ७० वृत्तांत लेखन, स्वत:ची १२ वृत्ते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील साडेतीन हजार श्लोकांचे महाकाव्य, प्रेमगंध, उर्मिला या दोन कादंबरी इतके लिखाण सध्या त्याच्या नावावर आहे. सहावीपासून वृत्तबद्ध काव्यलेखन करणाऱ्या चिन्मयने गझल आणि इतर काव्य प्रकारातून तीन काव्यसंग्रह प्रकाशनासाठी सज्ज केले आहे. चिन्मय हा जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांचा मुलगा आहे. नाटकात अस्मिता चिंचाळकर, चिन्मय जोगळेकर प्रमुख भूमिकेत आहेत. तर आकाश भडसावळे, विश्वास पांगारकर, नीला इनामदार यांच्या भूमिका आहेत. नाटकाला नाशिकचेच संगीतकार जगदेव वैरागकर यांनी संगीत दिले आहे.

नाटकाच्या कथानकाविषयी!

संगीत चंद्रप्रिया हे नाटक गुप्त साम्राज्यातील सम्राट चंद्रगुप्त या सम्राटाबाबत आहे. इतिहासकारांच्या मते, भारतात खरोखर जेव्हा सुवर्णयुग होते, तेव्हा सम्राट चंद्रगुप्त हे राज्य करत होते. हे नाटक म्हणजे त्यांची प्रेमकथा व शौर्यकथा यांचे नाट्यमय रुपांतर आहे.

नाटकाचे लेखन मी केले असे म्हणण्यापेक्षा ते माझ्याकडून झाले असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. 'समर' हे टोपणनाव धारण करून हे नाट्य लिहिले आहे. त्याचसोबत मराठी भाषेतील पहिले वृत्तबद्ध महाकाव्यही मी लिहिले आहे. ते ३,५०० श्लोकांचे आहे. तसेच 'प्रेमगंध'ही कादंबरी व गजलसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. नाशिककरांना हे नाटक नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो.

- चिन्मय मोघे,

नाट्यलेखक-दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशी दारू विक्रीप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बेकायदेशिरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर नाशिकरोड गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल होण्याची ही शहरातील पहिलीच वेळ आहे.

सिन्नर फाटा परिसरात शनिवारी (दि. ५) सायंकाळी पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक उत्तम दळवी, प्रकाश भालेराव, रेणुका भोर, जाधव, जुंद्रे आदींच्या पथकाला एकलहरे रोडवरील अरिंगळे मळ्यात एका पत्र्याच्या शेडमध्ये एक महिला देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता लताबाई चांगदेव काळे (वय ६०) ही महिला या ठिकाणी देशी दारुची विक्री करीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्या ताब्यातून देशी दारुच्या नऊ बाटल्या हस्तगत केल्या. पोलिसांनी तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदयानुसार, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अपघातातील जखमी

विवाहितेचा मृत्यू

नाशिकरोड : रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीचालकाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचार सुरू मृत्यू झाला. ही घटना राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ घडली. दीप्ती हेमंत भामरे (वय ३०, रा. साजन सोसायटी, ज्ञानेश्वरनगर, जेलरोड) असे या महिलेचे नाव आहे.

दीप्ती या पती हेमंत भामरे यांच्या सोबत दुचाकीवरून (एमएच १५ सीएक्स ९८४४) गुरुवारी (दि. ३) रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान शिवाजीनगर येथे त्यांच्या आईकडे जात होत्या. राजराजेश्वरीजवळील व्यंकटेश बंगल्याजवळ त्यांच्या गाडीला दुचाकीचालकाने (एमएच १५ डीझेड ४८६३) या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेल्या दीप्ती यांना प्रथम नाशिकरोडमधील जयराम हॉस्पिटल व त्यानंतर आडगाव येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी (दि. ४) दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. हेमंत भामरे यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या आक्षेपांना मिळेना ‘न्याय’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस आयुक्तालयाजवळच उभ्या राहणाऱ्या सहा मजली इमारतीच्या बांधकाम शहर पोलिसांनी हरकत घेतली. याबाबत महापालिकेपासून मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार देखील केला. मात्र, पोलिसांनाच न्याय मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या इमारतीतील पार्किंग व पोलिस आयुक्तालयाच्या सुरक्षेचा मुद्दा पोलिसांच्या केंद्रस्थानी आहे.

गंगापूररोडवरील पोलिस मुख्यालयाशेजारीच पोलिस आयुक्तालयाची प्रशस्त इमारत आहे. या शेजारी सध्या सहा मजली इमारतीचे काम सुरू असून, त्याबाबतच पोलिसांनी पत्र व्यवहाराद्वारे आपले आक्षेप महापालिका आणि नगररचना विभागास कळविले आहेत. मात्र, मागील वर्षभरापासून पत्रव्यवहार करुनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत बोलताना पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शहरात सर्वत्र पार्किंगची ओरड केली जाते. प्रत्यक्षात पुरेशा पार्किंगचा विचार न करता इमारतीच्या कामांना मंजुरी दिली जात आहे. परिणाम वाहने रस्त्यावर पार्क होतात. अशोकस्तंभाकडून येणारा रस्ताच मुळात अरूंद असून, तिथे बस स्टॉप देखील आहे. सार्वजनिक परिवहनाचा कोणताही विचार न करता सहा मजली इमारतीत शेकडो कार्यालये स्थिरस्थावर होणार आहेत. याबाबत महापालिका, अग्निशमन तसेच मंत्रालयात देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. स्मरण पत्रेही पाठविण्यात आली आहेत. मात्र, पोलिसांनाच न्याय मिळत नसल्याची स्थिती आहे. याप्रकरणात पोलिस आयुक्तालयाच्या सुरक्षेचाही मुद्दा महत्त्वाचा असून, बांधकाम परवानगी देताना याचाही विचार झाला नसल्याची खंत व्यक्त करण्यात येते आहे.

सध्याची वाहनांची संख्या आणि २५ वर्षांनी वाढणाऱ्या वाहनांची संख्या यात मोठी तफावत असून, याचा विचार सध्या बांधकाम करताना होत नाही. त्यामुळे शहरातील पार्किंगची स्थिती भविष्यात बिकट बनेल. पोलिस आयुक्तालयाशेजारील इमारतीच्या बांधकामास हरकत घेतली असून, त्याबाबत महापालिका आणि शासनस्तरावर पत्रव्यवहार करण्यात येतो आहे.

- माधुरी कांगणे, पोलिस उपायुक्त, मुख्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कर्मचाऱ्यांचा संप

0
0

नाशिकरोड : सन २००३ च्या वीज कायद्यात सुधारणा करून विद्युत (संशोधन) कायदा २०१८ या नवीन कायद्याचे प्रारूप तयार केले असून, हा कायदा मंजुरीसाठी संसदेत मांडण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. हा कायदा सार्वजनिक वीज उद्योगांसह सर्व वीज कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधी असल्याने या कायद्याला विरोध करण्यासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंते संयुक्त कृती समिती आज (दि.७) एकदिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळा कोट्यवधींचा; जप्त मालमत्ता लाखोंची

0
0

हर्षल नाईकच्या बेपत्ता होण्याचे रहस्य कायम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हर्षल नाईक हा मुख्य संशयित बेपत्ता होण्याचे रहस्य कायम आहे. गुन्हा उघडकीस येऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला असून, मागील वर्षाच्या सुरुवातीलाच परभणी जिल्ह्यात त्याच्या शेवटच्या खाणाखुणा मिळाल्या होत्या. दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्यात अगदीच लाखोंचा मुद्देमाल आत्तापर्यंत जप्त झाल्याने गुंतवणुकरदारांमध्ये सुद्धा चिंतेचे वातावरण आहे.

मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलिसात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल आहे. २५ हजार ४३९ ग्रॅम सोने आणि २५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची या प्रकरणात फसवणूक झाली. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संचालक महेश मिरजकर, प्राजक्ता कुलकर्णी व भारत सोनवणे यांना १५ कोटी रुपये कोर्टात भरण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी ३० ऑक्टोबर रोजी दिले. जामिनासाठी कोर्टात अर्ज करणाऱ्या या संशयित अर्जदारांना कोर्टाने ही महत्त्वपूर्ण अट टाकली. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी संशयितांनी कोर्टात पैसे जमा केलेले नाही. या प्रकरणातील महत्त्वाचे दोन दुवे असून, त्यातील एक म्हणजे सीए परिक्षीतत औरंगाबादकर असून, त्याचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळाला आहे. मात्र, तो पोलिसांनाच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे, या घोटाळ्याचा सूत्रधार हर्षल नाईक हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच फरार असून, त्याचाही कोणताही ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त भागवत सोनवणे यांनी सांगितले, की घोटाळ्यात जप्त झालेली मालमत्ता काही लाखांची असून, गुलबर्गा जिल्ह्यातील हर्षल नाईकची मालमत्ताही सुद्धा एका खेड्यागावात असल्याचे तपासात समोर आले आहे. गुतंवणूकदारांच्या पैशांचे काय झाले हे फक्त सीए औरंगाबादकर आणि हर्षल नाईक हे सांगू शकतात. दोघांचाही शोध सुरू आहे. मात्र, हर्षलचा थांगपत्ता मिळणे दुरापास्त ठरले आहे. गतवर्षी हा गुन्हा उघडकीस आला, त्याच वेळी तो फरार झाला. त्याचे शेवटचे लोकेशन परभणी जिल्ह्यात मिळाले होते. त्यानंतर त्याचा कोणताही सुगावा मिळालेला नाही. यामुळे विविध शंका उपस्थित होतात. त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.

लोगो : मिरजकर फसवणूक प्रकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नायलॉन मांजा; तिघा विक्रेत्यांना अटक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आणखी तिघा विक्रेत्यांना क्राइम ब्रँचच्या युनिट एकने रविवारी दिवसभरात अटक केली. यातील दोन विक्रेते पंचवटी हद्दीत तर एक अंबड हद्दीतील आहे. संशयितांकडून ३१ हजार ८०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ५३ गट्टू हस्तगत करण्यात आले.

सुमित अशोक महाले (रा. साखरे भवन, मालेगाव स्टॅण्ड), गोरख मुरलीधर शिंदे (रा. जाधव संकुल, चुंचाळे शिवार) आणि अतुल प्रभाकर आहेर (रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित विक्रेत्यांची नावे आहेत. जीवघेणा आणि पर्यावरणास धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर आणि साठवणुकीवर पोलिसांनी बंदी घातली आहे. मात्र, असे असताना काही विक्रेते चोरीछुपे या धोकादायक मांजाची विक्री करतात. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, युनिट एकच्या पथकाने शुक्रवारपासून कारवाईस गती दिली आहे. रविवारी याच पथकाने मालेगाव स्टॅण्ड येथे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या महाले यास पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून १५ हजार ५०० रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे २६ गट्टू हस्तगत केले. गोरख शिंदे हा जाधव संकुल परिसरात मांजा विक्री करताना सापडला. त्याच्याकडून चार हजार २०० रुपयांचे १२ गट्टू सापडले. मधुबन कॉलनीत १२ हजार रुपये किमतीचे १५ गट्टू विक्रीसाठी बाळगणाऱ्या अतुल आहेरला पोलिसांनी अटक केली. या सर्वांविरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस नाईक मोहन देशमुख, संतोष कोरडे, शांताराम महाले, पोलिस उपनिरीक्षक बलराम पालकर, हवालदार यावाजी महाले, संजय मुळक, कॉन्स्टेबल विशाल देवरे, दिलीप मोंढे, प्रवीण चव्हाण, दिलीप मोंढे आदींनी केली.

शनिवारीही एकास अटक

अंबडमधील गजानन नगर परिसरातील घरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. राहुल भागवत जाधव (२६, रा. गजानन नगर) असे या मांजा विक्रेत्याचे नाव आहे. राहुल जाधव हा त्याच्या घरात नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शहानिशा करून शनिवारी (दि. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास कारवाई केली. त्यात राहुलकडून नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच त्यास अटकही केली आहे.

गुन्हे दाखल करण्याची मागणी.

नाशिक : पोलिस खात्याकडून हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती केली जात असून, त्याचप्रमाणे नायलॉन मांजाचा वापर करू नये याबाबत जनजागृती करावी व या मांजाची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकार दिनानिमित्त पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनानुसार, नाशिक शहरातील विविध भागांमध्ये नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री चालू आहे. नायलॉन मांजामुळे अनेकजण जखमी झाले असून पशूपक्ष्यांनादेखील त्याचा त्रास होतो. त्यामुळे या मांज्याविरोधात जनजागृती करण्याची मागणी नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघाकडून करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष रमेश कडलग, सुरेश बागूल, चंद्रकांत वाघुलीकर, विकास कवडे, भरत जैन, मनीष गोडबोले, संगीता बागूल आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथनाट्यातून कायद्याची जनजागृती

0
0

\Bपथनाट्यातून जनजागृती

\B

नाशिक : हुंडाबळी, नशाबंदी, महिला सक्षमीकरण, शिक्षण, समानता यासह मोबाइलचा अतिवापर या विषयांवर आधारित पथनाट्यांचे प्रयोग एनबीटी कॉलेजमध्ये रंगले. कायदेविषयक जनजागृती आणि समाजिकता यावर विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय पथनाट्य स्पर्धेत पथनाट्याच्या माध्यमातून भाष्य केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एनबीटी लॉ कॉलेजमध्ये शनिवारी जिल्हास्तरीय पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला. यावेळी सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी आणि प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य उपस्थित होते. प्रथम पुरस्काराने व्ही. एन. नाईक कॉलेज, द्वितीय पुरस्काराने मविप्रचे एम. एस. डब्ल्यू कॉलेज आणि तृतीय पुरस्काराने नाशिकरोड बिटको कॉलेजला सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालक लावणार काळ्याफिती

0
0

अॅटोरिक्षा परवाने खुले केल्यामुळे रिक्षा चालकांचे उत्पन्न घटले आहे. यासह विविध अडचणींचा सामना रिक्षा आणि टॅक्सी चालकांना करावा लागत आहे. तसेच रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, नवीन रस्ते वाहतूक सुरक्षा बिल मागे घ्यावे, इंधनाचे दर कमी करावे, शहरात रिक्षा, टॅक्सीचे थांबे वाढवावेत, विमा प्रिमियमची रक्कम कमी करावी, ओला, उबर यांसारख्या कार्पोरेट कंपन्यांवर बंदी घालावी आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेने ८ आणि ९ जानेवारीच्या संपात काळ्याफिती लावून काम करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. डी. एल कराड, सिताराम ठोंबरे, देविदास आडोळे, संजय पवार आदींनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा आराखडा ७८४ कोटींचाच!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखेर मुहूर्त लागलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत बुधवारी (दि. ९) होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलच्या नुतनीकरणामुळे नाशिकरोडच्या विभागीय आयुक्तालयात बैठक होईल. यात पुढील वर्षासाठी ७८४ कोटींचा संभाव्य आराखडा सादर केला जाणार आहे. आदिवासी विभागातील शिक्षकांचे वेतन आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती राज्य सरकार परस्पर वर्ग करणार असल्याने हा निधी घटल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाने दिली आहे.

पुढील आर्थिक वर्षाच्या आराखड्यास जानेवारीतच मंजुरी देणे आवश्यक असते. जिल्हा नियोजन विभागाने हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या २०१८-१९ चा आराखडा बनविण्याच्या कामास नियोजन विभागाने गती दिली आहे. विविध विभागांकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. गतवर्षी हा आराखडा ९१७ कोटींचा होता. यंदा तो ७८४ कोटींचा असल्याची माहिती नियोजन विभागाने दिली आहे. सर्वसाधारण योजनांसाठी गतवर्षी ३३८ कोटींची तरतूद करण्यात आली. यंदाही ती तशीच ठेवली आहे. अनुसूचित जाती उपयोजनांवरही गतवर्षीप्रमाणे यंदाही ९८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गतवर्षी आदिवासी उपयोजनांसाठी ४८१ कोटींची तरतूद करण्यात आली. यंदा ३४८ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाने दिली आहे. गतवर्षीपर्यंत आदिवासी विकास विभाग शिक्षकांचे वेतन तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे जिल्हा नियोजन समितीकडे जमा करीत असे. या समितीच्या माध्यमातून हे पैसे संबंधितांना वितरित केले जात. परंतु, यंदा हे पैसे राज्य सरकार परस्पर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या निधीमधून तो वजा झाला आहे.

सर्वसाधारण योजनेंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक, ग्रामपंचायतींना सहायक अनुदाने, सूक्ष्म सिंचन, ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण, नाविन्यपूर्ण योजनांकरीता निधी प्रस्तावित आहे. आदिवासी योजनेमध्ये ग्रामीण स्वच्छता अभियान, लघु पाटबंधारे योजना, ठक्कर बाप्पा योजना तर अनुसूचित जाती योजनेंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान, दलित वसति सुधार आदी योजनांसाठी निधी प्रस्तावित केला जातो. यंदा निवडणुकांचे वर्ष असल्याने मंजूर निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे असेल. त्यामुळे यंदा नाविन्यपूर्ण योजनांना फारसे प्राधान्य दिले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

तर विकासावर परिणाम

जिल्हा नियोजनचा आराखडा गतवर्षी ९१७ कोटींचा होता. यंदा त्यामध्ये काही प्रमाणात वाढ व्हायला हवी होती. परंतु, त्याऐवजी तो जैस थे ठेवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास धिम्या गतीने होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याउलट आराखड्यात आदिवासी उपयोजनांच्या काही कोटींच्या विकासकामांना कात्री लावल्याचे समजते. यंदाचे वर्ष निवडणुकांचे असून फेब्रुवारीनंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. निधी माघारी जाऊ नये, यासाठी जानेवारीमध्ये कामांचे प्रस्ताव विभागाकडे पाठवून मंजुरी घेण्याचे निर्देश सर्व विभागांना यापूर्वीच देण्यात आले आहेत.

योजना................आराखड्यातील निधी

सर्वसाधारण........................३३८ कोटी

अनुसूचित जाती उपयोजना.....९८ कोटी

आदिवासी उपयोजना............३४८ कोटी

एकूण...............................७८४ कोटी

जिल्हा नियोजन समितीने सुमारे ९०० कोटींचा आराखडा तयार केला असून, विविध विभागांकडून कामांचे प्रस्ताव मागविले आहेत. ९ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असून, त्यामध्ये आराखडा सादर केला जाईल.

- योगेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथपालांच्या माहिती संकलनासाठी शिबिर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ करण्याचा शासननिर्णय राज्य सरकारने १ सप्टेंबर २०१८ रोजी पारित केला असून, राज्यातील ५९६ अर्धवेळ ग्रंथपालांना याचा लाभ होणार आहे. या प्रक्रियेसाठी पुणे शिक्षण संचालक कार्यालयातर्फे गुगल लिंक विकसित करण्यात आली होती. ज्या शाळांनी अद्यापही लिंकवर माहिती भरलेली नाही किंवा चुकीची माहिती भरली आहे, अशा शाळांसाठी मंगळवारी (८ जानेवारी) रोजी सकाळी १०.३० ते ३ या वेळेत स्काऊट गाईड कार्यालय नाशिक येथे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागातर्फे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील कार्यरत अर्धवेळ, पूर्णवेळ ग्रंथपाल व रिक्तपदांची माहिती संकलनासाठी व राज्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार करण्यासाठी पुणे शिक्षण संचालक कार्यालयातर्फे ए व बी फॉर्मची गुगल लिंक विकसित करण्यात आली होती. या लिंकवर माहितीची नोंद करण्यासाठी संचालक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालयाने शाळांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही शाळांनी लिंकवर माहिती नोंदविली असून, काही शाळांनी चुकीची माहिती नोंदविल्याचे, दोन वेळा माहिती नोंदविल्याचे तर काही शाळांनी अद्यापही माहिती नोंदविली नसल्याचे निदर्शनास आले आहे. कार्यरत अर्धवेळ व पूर्णवेळ ग्रंथापालांची परिपूर्ण माहिती प्राप्त झाल्याशिवाय जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार करणे अवघड असल्याने ही माहिती तातडीने भरण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागातर्फे माहिती नोंदविण्यासाठी ग्रंथपाल संघटनेचे विलास सोनार, दत्तात्रय गद्रे, विजय धुमाळ, अनिल कोठावदे, नितीन मोगरे, देवेंद्र पंड्या सोमनाथ मत्सागर आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

0
0

देवळाली कॅम्प : ऊसतोडणी सुरू असताना दीपक भास्कर म्हरसाळे या कामगारावर बिबट्याने अचानक हल्ला केला. दीपकने बिबट्याशी दोन हात केले, तर हाकेच्या अंतरावरील नातेवाईकांनी वेळीच धाव घेतल्याने बिबट्याने पळ काढला. नाशिक तालुक्याच्या राहुरी येथील वसंत काशिनाथ सांगळे यांच्या शेतात संगमनेर सहकारी साखर कारखान्यासाठी ऊसतोडणी सुरू होती. दीपक हा आई वडील, बहिणीसह शेतात काम करीत होता. दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यात दीपक जखमी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दप्तर न देणारा ग्रामसेवक निलंबित

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीत दप्तर सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकास निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. या ग्रामसेवकांकडून नोव्हेंबर महिन्यात तपासणीसाठी दप्तराची मागणी केल्यानंतर दोन दिवसात दप्तर सादर करतो, अशी विनंती करुन नंतर दप्तर न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत ग्रामसेवक संदीपान नेटके यांना कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न करणे या कारणांमुळे जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. डॉ. गिते यांनी नोव्हेंबर महिन्यात दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीस भेट दिली होती. यावेळी त्यांनी तपासणीसाठी ग्रामपंचायत दप्तराची मागणी केली; मात्र तब्बेत ठीक नसल्याचे कारण देत दोन दिवसात दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून देतो, अशी विनंती केली होती. मात्र मुदत देवूनही तपासणीसाठी दप्तर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांची सायंकाळ बहरली!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील व्हिरिडियन व्हॅलीनजीकचा गोदाकाठ शनिवारी शेकडो नाशिककरांच्या गर्दीने फुलून गेला होता. वेस्टर्न म्युझिकवर तरुणाईची थिरकणारी पावले, विविध कला-छंदांपासून तर स्पोर्ट्सचे धडे देणारे विविध स्टॉल्स आणि अबालवृद्धांचा इथल्या उपक्रमांना मिळालेला भरभरून प्रतिसाद, अशा आनंदी वातावरणात शनिवारी 'हॅप्पी स्ट्रीट' उपक्रम पार पडला.

शनिवारी सायंकाळी गोदाकाठी पडलेल्या गुलाबी थंडीतही या हंगामातील दुसरा 'हॅप्पी स्ट्रीट' एन्जॉय करीत नागरिकांनी नववर्षाची उत्साहात सुरुवात केली. गंगापूर रोडवरील बापू पूल ते सुयोजित व्हिरिडियन व्हॅली या परिसरात पहिल्यांदाच हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके, तेजस्वी ज्वेलर्सच्या कीर्ती शहा, सुयोजितच्या राजश्री राजेगावकर, शुभम राजेगावकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. सिंगल यांनी नाशिककरांशी संवाद साधताना शहराच्या एकोप्यासाठी आणि आनंदी-उत्साहपूर्ण वातावरण निर्मितीसाठी 'हॅप्पी स्ट्रीट'सारखे उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले. शहराला स्मार्ट बनविण्यासाठी नागरिकांनी कायद्यास सहकार्य करणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

हिमगौरी आहेर-आडके यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, नाशिक शहराला 'स्मार्ट' बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. वाहतुकीसह शहराच्या विकासासाठी गरजेचे सर्व नियमही पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. घरातून बाहेर पडताना स्वसुरक्षेचा विचार नक्की करावा. यादृष्टीने हेल्मेट परिधान केल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. 'हॅप्पी स्ट्रीट'साठी 'फ्रीडम ऑफ हॅप्पीनेस' ही संकल्पना होती.

मान्यवरांनी उपक्रमास शुभेच्छा संदेश दिल्यानंतर झुम्बा वॉर्म अपने वातावरण निर्मिती केली. बॉलिवूड आणि वेस्टर्न गाण्यांनी आबालवृद्धांची पावले थिरकायला लावली. यातील उत्कृष्ट डान्स परफॉर्मन्ससाठी सुयोजिततर्फे नाशिककरांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. हेल्दी हेअर स्पर्धेसाठी सोनल गोयल हिला बक्षीस देण्यात आले. हॅप्पी स्ट्रीटमध्ये जास्त वेळ स्कॉट व्यायाम प्रकारात उभे राहण्याच्या स्पर्धेने कार्यक्रमाची रंगत आणली. नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे लोकप्रिय अभिनेत्यांची मिमिक्री सादर केली. यंदाच्या हंगामात प्रथमच संध्याकाळी 'हॅप्पी स्ट्रीट' आयोजित करूनही नागरिकांचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

पुढचे 'हॅप्पी स्ट्रीट' नाशिकरोडला

आतापर्यंत या हंगामात दोन 'हॅप्पी स्ट्रीट' पार पडले आहेत. कॉलेजरोडपाठोपाठ व्हिरिडियन व्हॅलीतील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिसरे 'हॅप्पी स्ट्रीट' येत्या रविवारी (दि. १३ जानेवारी) सकाळी ७ ते ९ या वेळेत नाशिकरोड येथे होणार आहे. नाशिकरोड परिसरातील बिटको चौक ते कोठारी कन्या शाळा या रस्त्यावर हा उपक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या १५ दिवसांत ‘नेट’चा निकाल जाहीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय स्तरावरील अधिव्याख्याता पदासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या वतीने डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या 'नेट' ऑनलाइन परीक्षेचा निकाल अवघ्या १५ दिवसातच जाहीर करण्यात आला आहे. या अगोदर २७ दिवसांमध्ये हा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती मिळाला होता. शनिवारी रात्री उशिरा हाती आलेल्या या निकालाने झटपट निकाल लावण्याचा नवा विक्रम 'एनटीए'ने प्रस्थापित केला आहे. जलद प्रक्रियेने आता पुढील टप्प्यातील परीक्षांचे आयोजन लवकर होण्याची आशा नेट परीक्षार्थींमध्ये आहे.

यंदा प्रथमच 'एनटीए'ने नेट (नॅशनल इलिजिबिलीटी टेस्ट) चे नियोजन करण्यात आले होते. यंदा प्रथमच ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. देशभरातून १८ ते २२ डिसेंबर या काळात पार पडलेल्या या परीक्षेस ६.८१ लाख उमेदवार प्रविष्ट झाले. नाशिकमधील परीक्षा केंद्रावरही ८ ते १० हजार जणांनी ही परीक्षा दिली होती. यंदा प्रथमच ऑनलाइन पार पडलेल्या या परीक्षेचा काठीण्यस्तरही मध्यम होता. या परीक्षेचा निकाल उमेदवारांना ntanet.nic.in या वेबसाइटवर बघण्यास मिळेल. 'नेट'चा निकाल शनिवारी रात्रीच लागल्याची वार्ता सोशल मीडियावरून व्हायरल होताच अनेकांनी निकालाच्या वेबसाईटला भेट देत निकालाची खात्री करून घेतली.

पाच दिवस अगोदरच निकाल

यूजीसी नेट परीक्षेच्या निकालाची नियोजित तारीख १० जानेवारी होती. पण शनिवारी अनपेक्षितपणे हा निकाल जाहीर करून एनटीएने परीक्षार्थींना सुखद धक्का दिला. नियोजित तारखेच्या पाच दिवस अगोदरच हा निकाल जाहीर करण्यात आला. देशभरातून प्रविष्ट ६.८१ लाख पैकी ४४ हजार उमेदवारांनी यात यश मिळविले. तर ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी ३८८३ जण पात्र ठरले.

'जेईई'ला शहरात सुरुवात

राष्ट्रीय स्तरावरील आयआयटी संस्था आणि इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई (जॉईंट एन्टरन्स मेन) परीक्षेला रविवारी शहरातील केंद्रांवर सुरुवात झाली आहे. ही परीक्षा २० जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यंदा पहिल्यांदाच या परीक्षेचे आयोजन एनटीएच्या माध्यमातून करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथील परीक्षा केंद्रांवर यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाचा जिल्हा आराखडा ९०० कोटींचा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त लागला असून, बुधवारी (दि.९) जानेवारी रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत ही बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलचे नुतनीकरण सुरू असल्याने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील वर्षाकरीता साधारणपणे ९०० कोटींचा संभाव्य आराखडा असून, या आराखड्यात आदिवासी उपयोजनांच्या ४७ कोटींच्या विकासकामांना यंदा कात्री लावण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या २०१८-२०१९ चा आराखडा बनविण्याच्या कामास नियोजन विभागाने गती दिली आहे. विविध विभागांकडून नियोजन विभागाने प्रस्ताव मागवित पुढील वर्षाकरीता साधारणपणे ९०० कोटींचा संभाव्य आराखडा बनविला आहे. या आराखडयात आदिवासी उपयोजनांच्या ४७ कोटींच्या विकासकामांना यंदा कात्री लावण्यात आली आहे. यंदाचे वर्ष निवडणुकांचे असून फेब्रुवारीनंतर कधीही आचारसंहीता लागू होण्याची शक्यता आहे. निधी माघारी जाऊ नये, याकरीता जानेवारीमध्ये कामांचे प्रस्ताव विभागाकडे पाठवून मंजुरी घेण्याचे निर्देश सर्व विभागांना यापूर्वीच देण्यात आले आहेत.

पुढील आर्थिक वर्षाच्या आराखडयास जानेवारीतच मंजुरी देणे आवश्यक असून, जिल्हा नियोजन विभागाने हे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. सर्वसाधारण योजनांसाठी सुमारे ३२१ कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी ४३४ कोटी, तर अनुसूचित जाती उपयोजनांवर ९७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामपंयातींना सहायक अनुदाने, सुक्ष्म सिंचन योजना, ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण, नाविन्यपूर्ण योजनांकरीता निधी प्रस्तावित आहे. आदिवासी योजनेमध्ये ग्रामीण स्वच्छता अभियान, लघु पाटबंधारे योजना, ठक्कर बाप्पा योजना तर अनुसुचित जाती योजनेंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा फी, ग्राम स्वच्छता अभियान, दलित वस्ती सुधार योजना आदी योजनांसाठी निधी प्रस्तावित केला जातो. गतवर्षी ८७३.२७ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. २७.२५ कोटींचा नियतव्यय मंजूर करीत तो ९०० कोटींपर्यंत नेण्यात आला आहे. निवडणुकांचे वर्ष असल्याने मंजूर निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर असणार आहे. त्यामुळे यंदा नाविन्यपूर्ण योजनांना फारसे प्राधान्य दिले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिल्हा नियोजन समितीने सुमारे ९०० कोटींचा आराखडा तयार केला असून, विविध विभागांकडून कामांचे प्रस्ताव मागविले आहेत. ९ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असून, त्यामध्ये आराखडा सादर केला जाईल.

- योगेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक चळवळीकडे तरुण तुर्कांची पाठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्राहकांचे हित जोपासणाऱ्या ग्राहक चळवळीकडे तरुण कायकर्ते फिरकत नसल्याने अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या ज्येष्ठांवरच ग्राहक हक्कांची मदार असल्याचे चित्र आहे.

ग्राहकांच्या हक्कांसाठी ४४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ग्राहक पंचायतीला तरुण कार्यकर्ते मिळेनासे झाले आहेत. १९७४ मध्ये बिंदुमाधव जोशी यांनी पुण्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना केल्यानंतर, ग्राहक चळवळ राज्यभरात बुलंद झाली. ग्राहकांच्या हक्कांसाठी लढा देत, पंचायत ग्राहकांना हवीहवीशी वाटू लागली. राज्यातील प्रत्येक शहरात पंचायतीची कार्यकारिणी मोठ्या उमेदीने काम करीत होती. पण २०१५ मध्ये बिंदुमाधव जोशी यांचे निधन झाल्यानंतर, पंचायतीच्या सदस्यांची गळती सुरू झाली. याचा परिणाम पंचायतीच्या कामकाजावरही झाल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्यात फक्त २० ते २५ जण ग्राहक पंचायतीचे काम पाहतात. हे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ असल्याने, त्यांना कामाच्या मर्यादा येतात. ग्राहक चळवळीतील इतर संघटनांकडेही थोड्या फार फरकाने हीच स्थिती आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीत शेकडो सदस्य असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्यांचे कामही मर्यादित स्वरुपाचे आहे. ग्राहक पंचायतीच्या ३४ वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच 'ना नफा ना तोटा' तत्वावरील तांदूळ महोत्सवाच्या आयोजनातही खंड पडला आहे. ग्राहक चळवळीला तरुणांची आवश्यकता असून, इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ आणि सक्रीय कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.

\Bतरुणांची फळी उभारणार

\Bयंदाच्या वर्षी तरुण सदस्यांची फळी उभारत पुन्हा नव्याने कार्यास सुरुवात करू, अशी इच्छा पंचायतीचे सक्रीय पदाधिकारी दिलीप फडके यांनी व्यक्त केली. तरुण आणि नव्या कार्यकर्त्यांच्या आधारे ग्राहकांच्या विविध प्रकारच्या फसवणुकीला आळा घालतानाच जनजागृतीवर भर देणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील प्रत्येक कार्यकारिणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला तरुण सदस्यांची गरज आहे. नाशिकमध्येच नव्हे तर इतरही पंचायतीतही केवळ ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे अनेकदा चळवळीच्या कार्यात पूर्ण वेळ देणे त्यांना शक्य होत नाही.

- मेजर पी. एम. भगत, पदाधिकारी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत

आमच्या संघटनेत शहरात ४० तर जिल्ह्यात १५० हून अधिक सदस्य आहेत. सध्या तालुकास्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. या चळवळीत तरुणांची संख्या वाढण्याची गरज आहे. पण, सध्या कार्यरत सदस्यांनीदेखील उमेदीने काम करायला हवे.

- अरुण भार्गवे, मुख्य विभागीय संघटक, ग्राहक पंचायत महाराष्ट्र

जिल्ह्याभरात ८० पेक्षा अधिक सदस्य असून, शिक्षक आणि तरुण प्रतिनिधी संघटनेत आहेत. तरुणांना या चळवळीत आणण्यासाठी प्रबोधन करावे लागेल. त्यासाठी आम्ही उपक्रम घेत आहोत. ग्राहक चळवळ अधिक बुलंद करणे, हे ज्येष्ठ सदस्यांचेच काम आहे.

- विलास देवळे, सचिव, नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Bank Strike: बँक, पोस्ट सेवक उद्यापासून संपावर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

किमान वेतन व सामाजिक सुरक्षा या मुद्यांवरुन खासगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील कामगारांनी अखिल भारतीय संप ८ व ९ जानेवारी रोजी पुकारला असून, त्यात बँकाही यात सहभाग घेणार आहेत. त्यामुळे या दोन दिवशी देशभरातील बँका बंद राहणार असून, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे.

गेल्या काही दिवसापासून बँकाचे विलीनीकरण व इतर प्रश्नांमुळे बँकेचे कर्मचारी प्रचंड नाराज आहे. त्यांनी नुकताच संप केला. त्यावेळी देशभरातील १० लाखाहून अधिक कर्मचारी यात सहभागी झाले होते. आता पुन्हा या संपात बँका उतरणार आहे. या संपाबाबत ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने पत्रक प्रसिध्द करुन या संपामागची भूमिका स्पष्ट केली आहे.

बँकिंग उद्योगाचे खासगीकरण करण्याचे सरकारचे सुरू असलेले प्रयत्न, सहयोगी बँकांचे स्टेट बँकेतील विलीनीकरण आणी आता विजया-देना आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचे एकत्रिकरणाच्या माध्यमातून सरकार एकत्रिकरणाचे धोरण पुढे रेटत आहे. त्याचप्रमाणे सरकारचे आर्थिक निर्णय, जीएसटी, एफआरडीआय विधेयक यामुळे बँकिंग उद्योगात एक अनिश्चतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच नवीन खासगी बँका, पेमेंट बँका, स्मॉल फायनान्स बँका यांना दिलेल्या परवान्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंगला कमकुवत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बड्या उद्योगाकडील थकीत कर्ज याबाबत मात्र अक्षम्य दुर्लक्ष केला जात आहे. ही कर्जे राईट ऑफ किंवा हेअर कटच्या नावाखाली माफ केले जात आहेत. याचाच अर्थ बँकिंग उद्योगातील ज्या प्रश्नांशी कामगार वर्गाने पुकारलेला एल्गार म्हणून हा संप असून, त्यामध्ये आम्ही सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

पोस्टाची कामे आजच करा

पोस्टातील खासगीकरण, व्यापारीकरण आणि आऊटसोर्सिंग थांबवे, ५ दिवसीय कामकाजाचा आठवडा करावा यासह पोस्टातील विविध रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी पोस्ट सेवकांनी पुन्हा संप पुकारला आहे. ग्रामीण पोस्ट सेवकांच्या बेमुदत संपामुळे गेल्या महिन्यात पोस्टात अनेक महत्त्वाची कागदपत्रे धूळखात पडल्याचे दिसून आले होते. पुन्हा संप होत असल्याने पोस्टाची महत्त्वाची कामे ग्राहकांनी सोमवारीच करुन घ्यावी, असे आवाहन पोस्ट सेवकांनी केले आहे.

'आयटक' अंतर्गत ८ व ९ जानेवारी सर्व कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यामध्ये पोस्ट सेवकांनी देखील सहभाग घेतला असून, मंगळवारी व बुधवारी पोस्टाचे कामकाज त्यामुळे ठप्प होणार आहे. डिसेंबर महिन्यातच ग्रामीण पोस्ट सेवकांनी पोस्ट बँकेमुळे वाढलेल्या कामाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात ग्रामीण पोस्ट सेवकांच्या काही मागण्या पूर्ण झाल्या असून, शहरी व ग्रामीण सेवकांच्या मुख्य मागण्यांसाठी हा दोन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या नियोजनासाठी गेल्या आठवड्यात शहरातील सर्व पोस्ट ऑफिस बाहेर सेवकांनी बैठका घेतल्या. सेवकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ८ व ९ जानेवारी रोजी ग्रामीण, शहरी पोस्ट सेवकांसह पोस्टमन संप करतील. यामध्ये सुमारे ७०० सेवक संपावर जाणार असून, याचा बोजा पोस्टाच्या कामावर येणार आहे. त्यामुळे पोस्टातील महत्त्वाची कामे ग्राहकांनी सोमवारीच करुन घ्यावीत, असे आवाहन पोस्ट सेवकांनी केले आहे. या संपात देशातील सर्व पोस्ट सेवकांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती संयुक्त समिती वर्ग ३ चे अध्यक्ष म्हणून आशुतोष देशपांडे यांनी दिली. संपाच्या नियोजनात पोस्टमन व एमटीएम. कर्मचारी संघटनेचे सचिव सुभाष दराडे यांसह इतर इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

नियोजनासाठी आज पुन्हा बैठक

उद्यापासून असलेला दोन दिवसीय संप यशस्वी व्हावा, यासाठी पोस्ट सेवकांची सोमवारी (७ जानेवारी) रोजी पुन्हा बैठक होणार आहे. सायंकाळी ६ वाजता गंजमाळ सिग्नल येथील मुख्य पोस्ट ऑफिस शेजारील नाशिक प्रधान डाकघर येथे ही बैठक होईल. यासाठी सर्व पोस्ट सेवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त कृती समिती तर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images