Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘दिनदर्शिका नव्याने प्रकाशित करा’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने छापलेल्या दिनदर्शिकेत महात्मा फुले पुण्यतिथी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख न केल्याने मनुवादी दिनदर्शिका सरकारने सुधारित करून नव्याने प्रकाशित करावी, असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्राची ओळख ही फुले शाहू आंबेडकर यांच्या कार्याच्या महतीने सांगितले जाते. मात्र युती सरकारकडून काढण्यात आलेल्या शासकीय दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नाही, ही अत्यंत गंभीर बाब असून, मनुवादी सरकारकडून महामानवांचा अवमान केला जात आहे. राज्य सरकारने माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या संबंधितांवर कारवाई करावी तसेच सदर चूक दुरुस्त करून पुन्हा नव्याने दिनदर्शिका प्रकाशित करावी. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे.

निवेदन देताना जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ, शहर सरचिटणीस प्रफुल्ल पाटील, किरण मानके, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सुनील घुगे, भूषण गायकवाड, आकाश कोकाटे, रोहित जाधव, प्रकाश भोर, संतोष पुंड, दिलीप कांबळे, समर सोनार, दीपक बने यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमेरिकेला गोडी हलव्याच्या दागिन्यांची

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हलव्याच्या दागिन्यांनी सजून मकर संक्रांत साजरी करण्याची हौस अनिवासी भारतीयांतही कायम असून, शहरातल्या हलव्याचे दागिने बनविणाऱ्या व्यावसायिकांकडे परदेशी पाहुण्यांची मागणी वाढू लागली आहे. यंदा अमेरिकेतील कॅलिफोर्निया, न्यूयॉर्कसह इतर शहरांत १२ ग्राहकांना हे दागिने पाठवण्यात आले आहेत.

दहा दिवसांवर आलेल्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांना संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभाचे वेध लागले आहेत. त्या पाठोपाठ नववधू, जावई आणि लहानग्यांसाठी हलव्याच्या दागिन्यांच्या खरेदीची लगबग शहरात दिसून येत आहे. त्यामुळे आकर्षक व वैविध्यपूर्ण आकाराच्या हलव्याच्या दागिन्यांचा साज बाजारपेठेला चढला आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून अमेरिकेत ७ ते ८ ग्राहकांना हे दागिने पाठवले जातात. यंदा ही संख्या १२ पर्यंत पोहोचली आहे. दहीपूल परिसरातील हलव्याचे दागिने बनविणाऱ्या व्यावसायिकांकडे अमेरिका आणि कतारमधून दागिन्यांची मागणी होत आहे.

परदेशातील भारतीयांच्या स्थानिक नातेवाईकांकडून या दागिन्यांची खरेदी केली जात आहे. या दागिन्यांमध्ये लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांसाठीही सेट तयार करण्यात आले आहेत. लहान मुलांच्या सेटमध्ये किरीट, बाजूबंद, हार असून, महिलांसाठीच्या सेटमध्ये हार, मंगळसूत्र, तन्मणी, नेकलेस, बांगड्या, चिंचपेटी असे दागिने आहेत. पुरुषांसाठी रुद्राक्षकंठी, ब्रेसलेट आणि बाळी यांसह हार, गुच्छ, पेन, मोबाइल केस, घड्याळ या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. या दागिन्यांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे.

असे आहेत दर

महिलांच्या दागिन्यांचा सेट - ३०० ते एक हजार रुपये

पुरुषांच्या दागिन्यांचा सेट - १५० ते ८०० रुपये

मुलांच्या दागिन्यांचा सेट - ८० ते ३०० रुपये

मुलींसाठीचा ताज - १५० रुपयांपासून पुढे

हलव्याचा हत्ती, फुलदाणी - १०० ते ६०० रुपये

हलव्याच्या दागिन्यांना परदेशातूनही मोठी मागणी आहे. दरवर्षी परदेशातून सुमारे २० हून अधिक ग्राहक दागिन्यांची मागणी करतात. जशी ग्राहकांची मागणी असेल, त्या आकाराचे दागिने तयार करुन दिले जातात. विशेषकरुन दागिन्यांचा सेट खरेदी करण्याकडे शहरातील नागरिकांसह परदेशी ग्राहकांचाही कल वाढत आहे.

- वर्षा शौचे, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभार्थींच्या धान्यावर डल्ला

0
0

डाटा व्हेरिफिकेशनच्या नावाखाली रेशनदुकानदारांची चालाखी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिधापत्रिकांवरील काही लाभार्थींचे डेटा व्हेरिफिकेशन झाले नाही म्हणून त्यांना धान्य देऊ नये, असे कुठलेही निर्देश सरकारने दिलेले नाहीत. त्यामुळे व्हेरिफिकेशन न झाल्याने संबंधित लाभार्थींचा धान्याचा हक्क रेशन दुकानदारांना नाकारता येणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. डाटा व्हेरिफिकेशन नसल्याने धान्याचा हक्क डावलल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिला आहे.

सुरगाणा आणि वाडीवऱ्हे येथे उघडकीस आलेल्या रेशन धान्य घोटाळ्यानंतर स्वस्त धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. लाभार्थींचे आधारकार्ड सिडिंग आणि बायोमेट्रिक हा या पारदर्शक प्रणालीचाच भाग आहे. असे असले तरी चलाखीने धान्य घोटाळा सुरू असल्याचे अलिकडेच दिसून आले आहे. संशयास्पद नोंदी असलेल्या रेशन दुकानांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. एकीकडे हा घोटाळा चर्चेत असताना डेटा व्हेरिफिकेशनच्या आडून रेशन दुकानदारांनी लाभार्थींच्या हक्काचे गहू, तांदूळ, डाळी यासारख्या शिध्याच्या परस्परविक्रीचा उद्योग रेशनदुकानदारांनी सुरू केल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाला प्राप्त होऊ लागल्या आहेत.

शिधापत्रिकांवरील लाभार्थींची संख्या आणि प्रत्यक्ष लाभार्थी यांची अचूक पडताळणी व्हावी, यासाठी डाटा व्हेरिफिकेशनचे काम हाती घेण्यात आले असून या कामात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल आहे. शिधापत्रिकेवर नाव असलेल्या लाभार्थीने संबंधित रेशन दुकानदाराकडे जाऊन आपले आधारकार्ड सादर करणे या डाटा व्हेरिफिकेशनमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर तेथे बायोमेट्रिकवर थंब देऊन व्हेरिफिकेशनची प्रक्रिया त्याने पूर्ण करावयाची आहे. परंतु, विविध कारणांमुळे कुटुंबातील काही व्यक्तींना डाटा व्हेरिफिकेशनसाठी रेशन दुकानदारापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे अशा व्यक्तींच्या हक्काच्या धान्यापासूनच रेशन दुकानदार त्यांना वंचित ठेवत असल्याचे प्रकार गेल्या महिन्यात शहरात घडले. ही बाब निदर्शनास आल्यामुळे पुरवठा विभाग अशा प्रकारांची गंभीर दखल घेणार आहे.

व्हेरिफिकेशनला मुदतवाढ

शिधापत्रिकांवरील लाभार्थींच्या पडताळणीचे काम जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केले असून या पडताळणीला २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. या विभागाचे अवर सचिव कि. गो. ठोसर यांनी याबाबतचे आदेश काढले असून ते जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे रेशन दुकानदाराकडे आधारकार्ड सादर करून लाभार्थी बायोमेट्रिकद्वारे आपले डेटा व्हेरिफिकेशन देऊ शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या

0
0

समीर भुजबळ यांनी दिला सर्व्हेचा दाखला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशात बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली असून, सेंटर फॉर मोनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील तब्बल १ कोटी ९ लाख लोकांना नोकरी गमवावी लागली आहे. वर्षभरात ग्रामीण भागातील ६५ लाख महिलांना रोजगार गमवावा लागला. देशातील दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे स्वप्न भाजप युती सरकारने सत्तेवर येण्याआधी दाखवले होते. मात्र आज बेरोजगारांची संख्या वाढली असल्याचे सांगत माजी खासदार समीर भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून तयार करण्यात आलेल्या एनसीपी कनेक्ट या अॅपची माहिती देण्यासाठी तसेच बूथ कमिट्या अधिक बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी गणनिहाय दौरा करत आहेत. रविवारी त्यांनी इगतपुरी तालुक्याचा दौरा केला. यावेळी वाडीवऱ्हे गण, नांदगाव बु. गण, मुंढेगाव गण, घोटी बु. गण, खंबाळे गण, शिरसाटे गण- कावनाई, काळूस्ते गण व नांदगाव सदो गण या गणांमध्ये दौरा करून आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, अॅड. संदीप गुळवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, जिल्हा परिषद गटनेते उदय जाधव यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात बालक ठार, आई जखमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव या रस्त्यावर अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात साडेतीन वर्षांचा मुलगा गौरेश नवनाथ सानप हा ठार झाला तर आई गंभीर जखमी झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी साडेदहा वाजता माधुरी नवनाथ सानप (२५) या व मुलगा गौरेश याला घेऊन अॅक्टिवा दुचाकीवरून (क्रमांक एमएच, १५ ई डब्ल्यू ०७३३) पाथर्डी फाट्याकडून गावाकडे जात होत्या. एव्हरेस्ट अपार्टमेंटसमोरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना कट मारला. यामुळे सानप यांची दुचाकी अनियंत्रित होऊन ती समोर उभ्या असलेल्या ट्रकवर (क्रमांक केए ३२, डी ३६८७) जाऊन आदळली. अपघातात गौरेशच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता दुपारी साडेबारा वाजता त्याचा मृत्यू झाला. माधुरी यांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केरोसीनमुक्ती अशक्यच!

0
0

पुरवठा विभागाची प्रामाणिक कबुली; दोन लाख लिटरचे वितरण

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : केरोसीनची मागणी शुन्यावर आणत जळगाव जिल्ह्याने केरोसीनमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केले असताना नाशिक जिल्हा मात्र केरोसीनमुक्त होऊ शकत नसल्याची 'प्रामाणिक' कबुलीच जिल्हा पुरवठा विभागाने देऊन टाकली आहे. जिल्ह्यात डिसेंबरमध्ये २ लाख २८ हजार लिटर (२२८ केएल) केरोसीनचे वितरण करण्यात आले.

जिल्हाभरात एकट्या मालेगाव धान्य वितरण अधिकाऱ्यांनी (धाविअ) त्यांच्या कार्यक्षेत्रात ६० हजार लिटर केरोसिनचे वाटप केले आहे. केरोसीन ही आजही ग्रामीण भागात आवश्यक बाब ठरत असल्याने जिल्हा केरोसीनमुक्त होण्याची शक्यता तूर्तास धूसर असल्याचे नववर्षाच्या प्रारंभीच पुरवठा विभागाने स्पष्ट करून टाकले आहे.

देशाला केरोसीनमुक्तच नव्हे तर धूरमुक्तही करता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेसारख्या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातही या योजनेची अंमलबजावणी सुरू असून स्वयंपाकासाठी रॉकेल किंवा सरपणाचा वापर करणाऱ्या घटकांना अवघ्या १०० रुपयांमध्ये गॅसचे कनेक्शन देण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक शहर आणि तालुका, मालेगाव ग्रामीण, निफाड आणि सिन्नर तालुक्यांमध्ये केरोसीनची मागणी शुन्यावर आणण्यात यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे येथे काही महिन्यांपासून केरोसीनचे वितरण पुरवठा विभागाने बंद केले आहे. चांदवड आणि त्र्यंबकेश्वर तालुकेही केरोसीनमुक्तच्या मार्गावर असले तरी अजूनही या तालुक्यांना दर तीन महिन्यांसाठी प्रत्येकी १२ केएल (१२ हजार लिटर) केरोसीनचा पुरवठा करावा लागतो आहे. विशेष म्हणजे केरोसीनमुक्तीचे हे सुखावह चित्र असले तरी उर्वरित तालुक्यांमध्ये केरोसीनची मागणी लक्षणीय आहे. डिसेंबर २०१८ मध्ये तब्बल २२८ केएल केरोसीनचे वितरण जिल्हाभरात करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.

दिंडोरीत मागणी अधिक

जिल्ह्यात मालेगाव ग्रामीण केरोसीनमुक्त झाले असताना सर्वाधिक ६० केएल (६० हजार लिटर) केरोसीनचे वाटप एकट्या मालेगाव धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात करावे लागते आहे. त्यापाठोपाठ दिंडोरी तालुक्यात ३६ केएल केरोसीनचे वाटप केले जात असून कळवण आणि सुरगाणा या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये प्रत्येकी २४ केएल केरोसीनची अजूनही गरज भासत असल्याची माहिती पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली आहे. अत्यंत दुर्गम आणि आदिवासी ग्रामीण भागात केरोसीनशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट होते आहे.

..कोट..

काही तालुके केरोसीनमुक्त झाले असून नवीन वर्षात चांदवड, त्र्यंबकेश्वर, देवळा यासारखे काही तालुके केरोसीनमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मालेगावात मोलमजुरी करणाऱ्या, स्थलांतरित घटकांचे प्रमाण अधिक आहे. अशा घटकांसह ग्रामीण भागात अजूनही रॉकेलद्वारेच चूल पेटविली जात असल्याने जिल्हा केरोसीनमुक्त होणे तुर्तास कठीण आहे.

- श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुरवठा अधिकारी

डिसेंबरमध्ये वितरित झालेले केरोसीन

तालुका वितरण (केएल)

मालेगाव (धाविअ) ६०

दिंडोरी ३६

कळवण २४

सुरगाणा २४

येवला १२

चांदवड १२

बागलाण १२

इगतपुरी १२

नांदगाव १२

देवळा १२

पेठ १२

एकूण २२८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार गोटेंवर कारवाई नाही

0
0

प्रदेशाध्यक्ष दानवेंचे धुळ्यात स्पष्टीकरण

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहराचे आमदार अनिल गोटे यांच्यावर पक्षातर्फे कोणतीही कारवाई केली जाणार नाही तसेच त्यांना पक्षातून बाहेर काढले नसल्याचे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. ते शनिवारी (दि. ५) सायंकाळी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महानगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाले मात्र निवडणुकीतील वाद यानंतर संपून जातात. त्यामुळे निवडणुकीवेळी आमदार अनिल गोटे व भाजपमध्ये झालेला वाद हा तात्पुरता होता, असेही प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महानगराध्यक्ष अनूप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर आदी उपस्थित होते.

महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही
यावेळी बोलताना खा. दानवे म्हणाले की लोकसभेची आम्ही तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मी राज्यभर दौरा करीत असून, आतापर्यंत ३६ मतदारसंघांचा आढावा पूर्ण झाला आहे. धुळे मनपा निवडणुकीमुळे लोकसभा क्षेत्राचा आढावा घेता आला नव्हता. यासाठी ही पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मते जाणून घेतली असल्याची माहिती खासदार दानवे यांनी दिली. निवडणुकीचे वाद निवडणुकीपुरते असतात. काही गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात. त्यामुळे आमदार गोटेंवर पक्ष मुळीच कारवाई करणार नाही. मात्र, आमच्या पक्षात उमेदवार निवडीची प्रक्रिया ठरलेली आहे. केंद्रीय समितीने सूचविलेल्या नावांवर विचार होत असतो. जिल्हाध्यक्षांनी आमदारकीची निवडणूक लढविण्याची महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही. राजकारणात प्रत्येकाला संधी असते, असेही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले.

युतीबाबत अद्याप प्रस्ताव नाही
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार नसल्याचेही ते म्हणाले. यासोबतच शिवसेनेसोबत युती होईल का? या प्रश्नांवर दानवे यांनी, मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, ही आमची भूमिका आहे. शिवसेनेकडून जागांबाबत कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नसल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दैव बलवत्तर म्हणून बचावल्या मायलेकी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गतिरोधकावर वेग कमी केलेल्या अॅक्टिवास मागून येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने मायलेकी जखमी झाल्याची घटना जेलरोडच्या दसक पुलाजवळ सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात जखमी झालेल्या निवेदिता काकडे (२८) आणि संगीता काकडे (४८ रा. अमृतधाम, नाशिकरोड) या मायलेकी केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावल्या.

निवेदिता काकडे आणि संगिता काकडे या ॲक्टिवा गाडीवरुन सायंकाळी नांदूर नाक्याच्या दिशेने जात असताना दसक पुलाजवळील स्पीड ब्रेकरवर त्यांनी वेग कमी केला. याचवेळी मागून येणाऱ्या टेंपोने (एमएच १२, एक्यू ५०५७) त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात दुचाकी टेम्पोच्या पुढील चाकात अडकल्याने या मायलेकी पुढील स्मशानभूमीच्या गेटपर्यंत फरफटत गेली. हा प्रकार सचिन मोरे, बबलू बेलदार, अमोल भोसले या स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत या टेम्पोचालकाला थांबवून चाकात अडकलेल्या मायलेकींना बाहेर काढले. फरफटल्याने दोघी जखमी झाल्या. परंतु, केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचल्या. सचिन मोरे यांनी १०८ नंबरवर माहिती दिली. रुग्ण्वाहिका यायच्या आधीच दोघींना रिक्षातून पालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. तोपर्यंत नाशिकरोड पोलिसही हजर झाले. पोलिसांनी टेम्पोचालकासह अपघातातील वाहने ताब्यात घेऊन नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद नाशिकरोड पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. बिटको रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर जखमी निवेदिता काकडे आणि संगीता काकडे या मायलेकींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती बिटको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. याच ठिकाणी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातात एका मुलीला जीव गमवावा लागला होता. गेल्या आठवड्यातही येथे एक अपघात झाला होता. या ठिकाणचे गतिरोधक दुरुन दिसत नसल्यानेच येथे अपघात होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बजेटसाठी अल्टिमेटम

0
0

- आयुक्त गमे यांचे खातेप्रमुखांना आदेश

- दोन दिवसात नवीन कामांची माहिती मागवली

- जानेवारीत बजेट सादर करण्याची लगीनघाई

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वीच सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेट मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन नवीन कामांची माहिती सादर करण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सर्व विभागांनी आपल्या विभागातील कामांची यादी सादर केली नाही, तर थेट कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत माहिती सादर केली नाही तरी कुणाची वाट न बघताच नियोजन करा, असे आदेश त्यांनी लेखा विभागाला दिले आहे.

पालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे बजेटमधील निधी मोठ्या प्रमाणावर अखर्चित राहिला असताना प्रशासनाने सन २०१९-२० च्या बजेटची लगीनघाई सुरू केली आहे. गेल्या वर्षीच्या मंजूर बजेटच्या केवळ ३० टक्केच निधी खर्च झाल्यावरून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, तर नवीन बजेट सादरीकरणाचीही घाई सुरू केली आहे. स्थायी समितीत बजेट सादर करण्याची मुदत फेब्रुवारी असली तरी, सत्ताधारी भाजपने आगामी निवडणुकांच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर स्थायीचे बजेट जानेवारीतच मंजूर होण्यासाठी प्रशासनाला साकडे घातले आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या बजेटच्या कार्यक्रमानुसार प्रशासनाने त्यासाठीची तयारीही सुरू केली आहे.

सोमवारी आयुक्त गमे यांनी खातेप्रमुखांची बैठक घेऊन कोणी किती कामांची माहिती सादर केली, याचा आढावा घेतला. परंतु, दोन ते तीन विभाग वगळता अद्यापही नवीन कामांची यादी सादर झालेली नाही. त्यामुळे आयुक्तांनी खातेप्रमुखांची खरडपट्टी काढली. बजेट कोणत्याही परिस्थितीत स्थायी समितीत जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर करायचे आहे. २० जानेवारीपर्यंत बजेटची पत्रिका छपाईला द्यायची असल्याने बजेटसाठी १२ दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्व विभागांनी त्यांच्या कामांची दोन दिवसात सादर करण्याचे फर्मान आयुक्तांनी यावेळी काढले.

...

नगरसेवकांच्या मागणीचा पाऊस

गेल्या दोन वर्षापासून नगरसेवक निधी न मिळालेल्या नगरसेवकांनी पुढील बजेटमध्ये कामे धरण्यासाठी मात्र कामांच्या मागणीचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. नगरसेवकांनी आपल्या लेटरहेडवर आपल्या प्रभागातील कामे संबंधित विभागांसोबतच आयुक्त कार्यालयाकडेही सादर केला आहे. परंतु, ही कामे नगरसेवक निधीत धरायची की, बजेटमधील नियमित कामात धरायची याबाबतच पेच अधिकाऱ्यांमध्ये कायम आहे. नगरसेवक निधीची ७५ लाखांची मागणी असली तरी, नियमानुसार केवळ बजेटच्या दोन टक्केच निधी देता येतो. त्यामुळे नूतन आयुक्तांनाही याबाबत कायदेशीर बाबी तपासूनच काम करण्याचा निर्णय घेतल्याने नगरसेवकांकडून सुचविण्यात येत असलेल्या कामांबाबत मात्र पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांचा मुक्काम मुख्यालयीच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील शहरांची कामगिरी अधिक सुधारून राज्यातील शहरे पहिल्या शंभरात येण्यासाठी राज्य शासनानेही प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत ४ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, या पथकाकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणाची पूर्वतयारी व संनियंत्रण योग्य रितीने होण्यासाठी केंद्राच्या पथकामार्फत प्रत्यक्ष पाहणी आणि नागरिकांचे अभिप्राय याबाबतची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत महापालिका आयुक्तांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान स्वच्छता सर्वेक्षण सुरू झाले आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी मिशन मोड पध्दतीने सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नागरी स्थानिक संस्थांचे मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व नागरी स्थानिक संस्थांनी सर्वेक्षणाच्या संपूर्ण कालावधीत मूल्यमापनाच्या दृष्टीने प्रत्येक दिवशी परिपूर्ण तयारी करणे आवश्यक आहे. महापालिका आयुक्तांनी सर्वेक्षणाची पूर्व तयारी व संनियंत्रण योग्य रितीने होण्यासाठी या कालावधीत मुख्यालयी राहणे अनिवार्य असल्याचे आदेश नगरविकास विभागाचे सहसचिव सं. श. गोखले यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जवाटपाचे खुलासासत्र

0
0

जिल्हा बँकेतील संचालकांच्या अडचणी वाढल्या

...

- कर्जवाटप संचालकांच्या आदेशानेच

- अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुनावणी

-

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी आजी-माजी ३८ संचालकांसह ८० अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावल्यानंतर संचालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता खुलासासत्र सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांना बजाविलेल्या नोटिंसावर सोमवारी जिल्हा उपनिंबधक गौतम बलसाणे यांच्याकडे प्राथमिक सुनावणी सुरू झाली. यात कर्जवाटपात सहभागी असलेल्या आणि १० ते १५ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावत बाजू मांडली. आम्ही फक्त आदेशाचे पालन करतो, कर्जवाटपाचा आमचा अधिकार नाही असे सांगत, आमचा दोष नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे संचालकांच्याच अडचणी अधिक वाढल्या आहेत.

जिल्हा सहकारी बँकेने सन २००२ ते २०१२ मध्ये केलेल्या कर्जवाटपात ३४७ कोटींची थकबाकी असून, लेखापरीक्षक जयेश आहेर यांनी या कर्जवाटपाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला होता. यात मोठी अनियमितता आढळून आल्याने गेल्या आठवड्यात बँकेच्या माजी-माजी ३८ संचालकांना नोटिसा बजाविल्या. तसेच, तत्कालीन कार्यकारी संचालक वाय. आर. शिरसाठ, सुभाष देसले, बी. आर. पाटील यांच्यासह ८० अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविल्या. सोमवारी यात अनेक संचालकांनी बाजू मांडली, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या कर्जवाटपाचे खापर संचालक मंडळावर फोडले. कर्मचाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक बलसाणे यांच्यासमोर हजेरी लावत आपली बाजू मांडली.

..

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले हात वर

अनेक कर्मचाऱ्यांनी आमचा दोष नसल्याचे स्पष्टीकरण देत, संचालकांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम केल्याचा दावा केल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही फक्त आदेशाची अंमलबजावणी करतो, आमचा दोष नाही असे सांगत सर्व खापर संचालक मंडळावर फोडले आहे. त्यामुळे या संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

..

संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढविणार

संक्रांतीनंतर कर्जाच्या वसुलीसाठी तत्कालीन संचालकांच्या स्थावर मालमत्ता शोधून त्यावर बँकेचा बोजा नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. सध्या पीककर्ज वसुलीस स्थगिती असल्याने बिगर शेतीकर्ज वसुलीवर भर दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमातर्फे प्रशिक्षणवर्ग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथे निमा हाऊसमध्ये 'बेसिक एमएस-एक्सेल' या विषयावर प्रशिक्षणवर्ग झाले. या प्रशिक्षणवर्गात सीए अविनाश शुक्ल यांनी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणवर्गास ४५ प्रशिक्षणार्थींचा सहभाग होता. या प्रशिक्षणवर्गात बहुमूल्य प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्याचे समाधान व्यक्त करीत भविष्यातदेखील अशा तऱ्हेच्या व्यवहारोपयोगी प्रशिक्षणवर्गांचे आयोजन व्हावे, अशी भावना व्यक्त केली.

या वर्गात फॉरमॅटिंग, कंडिशनल फॉरमॅटिंग, फॉर्म्युलास, टेक्स्ट फॉर्म्युलास या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी निमा दिंडोरीचे अतिरिक्त उपाध्यक्ष संजय सोनवणे, निमा सिन्नरचे अतिरिक्त उपाध्यक्ष संदीप भदाणे, निमा आयटी व सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर तसेच, सौमिक बॅनर्जी, आयटी व सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडी परतली; पारा सात अंशावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडी परतली असून निफाडमध्ये सोमवारी पुन्हा किमान तापमान ४ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. नाशिकमध्येही ७.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत थंडीचा कडाका कायम राहील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रात रविवारपासून थंडीची लाट येण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तविली होती. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. रविवारी कमाल तापमान २८.७ तर किमान तापमान ९.७ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. हेच तापमान सोमवारी अधिक घसरले. कमाल तापमान २६.६ तर किमान तापमान ७.६ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले. निफाडमध्ये तर किमान तापमान चार अंश सेल्सियस नोंदविले गेले असून थंडीचा कडाका वाढू लागल्याने द्राक्ष उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी झाल्याने मध्य भारताच्या मैदानी प्रदेशातून उत्तरी वारे वाहू लागल्याने थंडी वाढली असून मंगळवारी देखील नाशिककरांना थंडीच्या कडाक्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिंत कोसळून मायलेक ठार

0
0

ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने अपघात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंटवाडी रोडवर ट्रॅक्टरच्या धडकेतून घरावर कोसळलेल्या भिंतीमुळे मायलेक ठार झाल्याची गंभीर घटना सोमवारी दुपारी घडली. गुदमरल्याने १८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर उपचार सुरू असताना आईचीही प्राणज्योत मालवली. प्रकाश सरकटे (वय १८) आणि सत्यभामा सरकटे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

उंटवाडी रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात रस्त्याचे काम सुरू आहे. मुरुमाने भरलेला ट्रॅक्टर मागे घेत असताना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे हा ट्रॅक्टर कार्यालयाच्या दगडी भिंतीवर जोरदार धडकला. यामुळे भिंत लगतच्या पत्र्याच्या घरातील कोसळली. यात मायलेक ढिगाऱ्याखाली दाबले गेले. श्वास गुदमरल्याने प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सत्यभामा सरकटे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री त्यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत सरकटे कुटूंबाचा संसार उद्‌ध्वस्त झाला. अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. घडलेल्या घटनेबाबत परिसरातील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भिंत कोसळल्यानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

\Bगंभीर गुन्हाची व्हावी नोंद!

\Bअपघातासाठी ट्रॅक्टर चालकासोबतच बांधकाम विभाग व महापालिकेचे अधिकारीही दोषी आहेत. अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने काम होते की नाही याकडे लक्ष दिले नाही. तसेच कामात हलगर्जीपणा केला. त्यामुळे भिंत कोसळून दोन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकावर गंभीर गुन्ह्याची नोंद व्हावी, अशी मागणी नगरसेविका रोशनी घाटे आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटे यांनी केली आहे. घटनास्थळी भेट देऊन त्यांनी पाहणी केली. तसेच, याप्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा सडला, उकिरड्यावर फेकला

0
0

बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या दहा महिन्यांपासून चाळीत साठविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. रोजच कोसळणाऱ्या बाजारभावामुळे चाळीतील कांदा पाहून शेतकरी पश्चाताप करीत आहेत. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून दहा महिन्यांपासून चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांद्या कोंब फुटू लागल्यामुळे सडलेला कांदा फेकण्याची शेतकऱ्यांवर आली आहे. बागलाण तालुक्यातील बहुसंख्य कांदा चाळीतील कांदा सडण्याचा मार्गावर असून, काह कांद्याला कोंब फुटले आहेत.

बागलाण तालुक्यातील नवेनिरपूर येथील शेतकरी शांताराम दादाजी गुंजाळ यांनी आपल्या ३०० क्किटंल कांद्याची लागवड केली होती. उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल, कर्ज फेडून दोन पैसे काही उरतील या अपेक्षेने त्यांनी सुमारे सगळा उन्हाळ कांदा (३०० क्विंटल) दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवला होता. कांद्याला भाव येतील आणि आपण साठविलेला कांदा विक्रीसाठी चाळीबाहेर काढू या अपेक्षेन दिवसामागे दिवस गेले मात्र बाजारभाव वाढण्याऐवजी कमीच होत गेले.

त्यामुळे चाळीतील कांद्याला कोंब फुटले आहेत. अशा परिस्थितीत जर कांदा मार्केटमध्ये नेऊन विकला तर त्याला निश्‍चित मातीमोल भाव मिळेल याची जाणीव झाली गुंजाळ यांना झाल्यामुळे त्यांनी हा सगळा कांदा चाळीतून बाहेर काढून उकिरड्यावर फेकण्याची तयारी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमआयडीसीतील कामकाज ‘ऑनलाइन’

0
0

नववर्षापासून 'ऑफलाइन' कामकाज बंद

....

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात १ जानेवारीपासून ऑफलाइन कामकाज बंद करून सर्व कामे आता ऑनलाइन केली आहेत. या ऑनलाइन कामासाठी महामंडळाने सिटीजन चार्टरनुसार सेवा देण्याचा कालवधी निश्चित केला आहे. त्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळणार आहे. सरकारी कार्यालयात सर्वत्र ऑनलाइन सेवा सुरू झाल्यानंतर आता एमआयडीसीचा कारभारही डिजिटल झाला आहे.

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासाठी सातपूर येथे या विभागाचे विभागीय कार्यालय आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील उद्योजकांचा या ऑनलाइनमुळे कामकाजामुळे फायदा होणार आहे. एमआयडीसीने याअगोदर फाइल ट्रॅकिंग सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे लावून कामकाजात सुधारणा केली आहे. त्यात आता ऑनलाइन कामकाजाची भर पडणार आहे. त्याचप्रमाणे फाइल स्कॅनिंगचे कामही या विभागात सुरू असून, ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात सातपूर औद्योगिक क्षेत्रात ११२२, अंबड येथे १६१६ भूखंड आहेत. त्याचप्रमाणे सिन्नर येथे १००२, विंचूर, दिंडोरी, मालेगाव, पेठ, या ठिकाणी भूखंड आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर येथे १४६८, सुपा ५२५, श्रीरामपूर ६४१, नेवासा ३५९, राहुरी ५६, जामखेड येथे २ असे भूखंड आहेत. यातील बहुतांश ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत.

...

असा होता कारभार

एमआयडीसीमध्ये ऑफलाइन काम चालत असल्यामुळे अनेक गैरप्रकार होत होते. त्यातील फाइल गहाळ प्रकरण तर जिल्हाभर गाजले. त्यानंतर एमआयडीसीने आपल्या कामात सुधारणा केली. पण, त्यानंतरही त्यात सुसूत्रता नव्हती. त्यामुळे आता ऑनलाइन काम केल्यामुळे त्यातून दिलासा व गैरप्रकारालाही आळा बसणार आहे.

...

अशी असेल सेवा

भूखंड, गाळे शेड वाटप करणे (२१ दिवस), भूखंड वाटप समितीची बैठक (१५ ते ३० दिवस), देकारपत्र देणे (२ दिवस), देकारपत्राची रक्कम आले नंतर वाटपपत्र देणे (७ दिवस), संपूर्ण रक्कम भरल्यानंतर भूखंडाचा ताबा देणे (७ दिवस), प्राथमिक करारनामा (७ दिवस), उद्योग विस्तारासाठी भूखंड वाटप करणे (२१ दिवस), बांधकाम करण्यास मुदतवाढ देणे (१५ दिवस), भूखंड परत करून परतावा रक्कम देणे ( ३० दिवस), भूखंड एकत्रीकरण (७ दिवस), भूखंड पोटभाड्याने देणे (७ दिवस), भूखंड हस्तांतरण करणे (१५ दिवस), भूखंडाचे विभाजन व हस्तांतरण करणे (२१ दिवस), भूखंड वित्तीय संस्थेस तारण देणे (१५ दिवस), भूखंडाच्या वापरात बदल करणे (२१ दिवस), उत्पादनात बदल करणे (१५ दिवस), प्रॉपर्टी कार्ड (तात्काळ)

...

एक जानेवारीपासून ऑफलाइन कामकाज बंद करून सर्व कामकाज ऑनलाइन सुरू केले आहे. त्यामुळे उद्योजकांचा वेळ वाचणार आहे. ऑनलाइन कामामुळे त्यांना मेसेजसुध्दा जाणार आहेत. त्यातून त्यांना आपल्या कामाची माहितीही मिळणार आहे.

- हेमांगी पाटील-भामरे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कार्यालये ओसवीज कर्मचारी संपास नव्वद टक्के प्रतिसाद,कार्यालयांत शुकशु

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राज्यातील वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आणि सार्वजनिक ऊर्जा-उद्योग धोरणाबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करुनही यश मिळाले नाही. त्यामुळे वीज कर्मचारी-अभियंते संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी (दि. ७) पुकारलेल्या लाक्षणिक संपास नव्वद टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा कृती समितीकडून करण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील वीज भवनासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.

कृती समितीच्या निवेदनानुसार चारही वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आणि ऊर्जा-उद्योग धोरणाबाबत कृती समिती व्यवस्थापनाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यासाठी वेळोवेळी बैठका होऊन मंत्री व व्यवस्थापन पातळीवर वाटाघाटीही झाल्या. मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कृती समितीने संप पुकारला. सोमवारच्या संपात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक फेडरेशन, वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सबॉर्डिनेट इंजिनीअर असोसिएशन, म. रा. वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस आदी संघटनांचे अरुण म्हस्के, पंडित कुमावत, मधुकर जाधव, विशाल निंबाळकर, लक्ष्मण बेलदार, हर्षद काठे, सुनील पाटील, सुधीर गोरे, किरण मिठे, किसन बगड, मिलिंद दंडगव्हाळ, दीपक कास आदी उपस्थित होते.

सार्वजनिक वीज उद्योगांबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी वीज अभियंते आणि कर्मचारी कृती समितीने पुकारलेल्या एक दिवसीय संपास नव्वद टक्के प्रतिसाद मिळाला. काही संघटना आज आणि उद्याच्या देशव्यापी संपातही सहभागी होणार आहेत.

- अरुण म्हस्के, उपसरचिटणीस, महाराष्ट्र वीज वर्कर्स फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविष्कार निवड चाचणीत ३८१ विद्यार्थ्यांचा सहभाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरिष्ठ महाविद्यालयीन स्तरापासून संशोधनास चालना मिळावी यासाठी आयोजित अविष्कार संशोधन महोत्सव आता आंतरविद्यापीठ स्तरावर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार प्राथमिक निवड चाचणी झाली. यात इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी, मेडिकल आणि फार्मसी, वाङमय, भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन या विषयांवर विविध महाविद्यालयांमधून आलेल्या ३८१ विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला.

स्पर्धेत पदवीपूर्वचे २६३, पदव्युत्तरचे ९२ विद्यार्थी, निष्णात (पदव्युत्तर एम. फिल, पीएच. डी)चे ५ आणि शिक्षक गटातून २१ स्पर्धक सहभागी आहेत. अशा संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यार्थी कल्याण विभागचे संचालक डॉ. संदीप गुंडरे, डॉ. विनय सोनांबेकर, डॉ. पुरुषोत्तम गिरी, डॉ. शिशिर पांडे, डॉ. नीता गांगुर्डे, डॉ. संजय खेडकर डॉ. महेश मित्र, डॉ. ज्ञानदेव चोपडे, डॉ. सुनील थिमदे, डॉ. अशोक वानकुद्रे, डॉ. हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक गरजा लक्षात घेऊन नाविण्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागावी, त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या संशोधनास व्यासपीठ मिळावे तसेच केलेल्या संशोधनला लोकमान्यता मिळावी, असे विविध हेतू साध्य व्हावे यासाठी अविष्कार संशोधन प्रकल्प आंतरविद्यापीठस्तरीय महोत्सव सुरू करण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले. आविष्कार प्राथमिक निवड चाचणीसाठी विद्यापीठातील किशोर पाटील, राजेश इस्ते, सीमा नाटेकर, स्मिता करवल, आबाजी शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. डॉ. रत्नपारखी यांचे शनिवारी व्याख्यान

0
0

नाशिक : परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवकदिनी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. १२ व १३ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे सभागृह, जलशुद्धीकरण केंद्रालगत हॉटेल सिबलजवळ, त्र्यंबकरोड येथे 'अखेर स्वामीजी इष्टस्थळी पोहचले!' या विषयावर प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी यांचे व्याख्यान होणार आहे.

...

उद्या आरोग्यावर व्याख्यान

नाशिक : ओझर येथील योगाकार फिटनेस पार्इंटच्या वतीने महिलांच्या आरोग्याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एम. एन. नागमणी यांचे व्याख्यान होणार आहे. बुधवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजता योगाकार फिटनेस, सिंधू निवास, यमुनानगर, पंचवडनगर येथे हा कार्यक्रम होईल. ओझर व परिसरातील महिलांनी या व्याख्यानाचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याविषयीच्या शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन योगाकार फिटनेस पार्इंट संचालिका नूतन गायकवाड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा महावितरणला ‘झटका’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कधी वीज दरवाढ, कधी लोडशेडिंगचा शॉक देणाऱ्या महावितरणला महापालिकेनेच शॉक दिला आहे. पाथर्डी फाटा येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी सुरू झालेल्या 'वेस्ट टू एनर्जी' या प्रकल्पातून दररोज तयार होणारी एक हजार युनिट वीज फुकट वापरणाऱ्या महावितरणला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दणका दिला आहे. महावितरण वापरत असलेली वीज वापरात वजावट करण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या वतीने जर्मनस्थित जीआयझेड कंपनीच्या वतीने पाथर्डी येथील खत प्रकल्पालगत 'वेस्ट टू एनर्जी' हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जात आहे. शहरातून जमा होणाऱ्या ३० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून ३३०० युनिट वीज निर्मितीची क्षमता या केंद्रात विकसित करण्यात आली आहे. प्रामुख्याने हॉटेल वेस्ट, मलबा, गाळ, गटारयुक्त पाणी, मैला या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. अशा प्रकारच्या कचऱ्यातून वीज निर्मिती करणारी राज्यातील नाशिक मनपा पहिलीच आहे. सध्या या प्रकल्पातून दररोज ८०० ते १००० हजार युनिट विजेची निर्मिती करण्यात येते. प्रकल्पात तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये टाकली जात जाते. परंतु, महावितरणकडून त्याचा परतावा मिळत नव्हता. त्यामुळे महापालिकेला परतफेड होत नसल्याने पालिकेचेच आर्थिक नुकसान होत होते. गेल्या शनिवारी आयुक्तांनी केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली. त्यांनी महावितरणला पुरवल्या जाणाऱ्या विजेची वजावट अन्य वापरातील बिलातून का होत नाही, असा सवाल केला. त्यावर यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता माळी म्हणाले की, 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाजवळ किती विजेचा पुरवठा होतो हे दर्शविणारे स्पेशल मीटर आहे. परंतु, महावितरणने आता नवीन अट टाकत जेथे विजेची वजावट अपेक्षित आहे, तेथे स्पेशल मीटर बसवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने वजावटीचे ठिकाण निश्चित करत, मीटर बसविण्याचे आदेश दिले. महावितरणकडून यापूर्वीचीही वजावट वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

आगरटाकळीत वजावट

महावितरण वापरत असलेली विजेची वजावट आता आगटाकळी येथील मलजलशुद्धीकरण केंद्रात केली जाणार आहे. या ठिकाणी तातडीने स्पेशल मिटर बसवून वीज वजावट सुरू करा, असे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे विभागाने तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या वीज वजावट मीटरमुळे पालिकेचा मोठा आर्थिक फायदाही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images