Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अजित दादा फोटो


गोवर्धनेमध्ये भूगोल दिन साजरा

$
0
0

गोवर्धने कॉलेजात भूगोल दिन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी येथील मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स भूगोल विभागाच्या वतीने भूगोल दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन व पृथ्वी गोलाचे पूजन करण्यात केले. प्रास्तविक पूजा जाखेरे या विद्यार्थिनीने केले. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थांनी नेहमी पृथ्वीवरील सर्व घटकांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, पर्यावरण संतुलन राखण्यास जणजागृती करावी तसेच सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी पर्यटन स्थळ यांना भेटी देऊन संशोधन करावे असे त्यांनी सांगितले. तसेच राजेश गोवर्धने, रश्मी बिडवे, प्रेरणा जाधव, या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, भूगोल विभागप्रमुख प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. डॉ. एम. एस. पाटील, प्रा. बी. एस. राजेभोसले, प्रा. एल. सी. देवरे व विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजनीताईंमुळे विशेष मुलांच्या सक्षमीकरणास बळ

$
0
0

रजनीताईंमुळे विशेष मुलांचे सक्षमीकरण

नीलिमा पवार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देव प्रत्येक व्यक्तीचे नशीब लिहून त्याला पाठवत असतो, तसे; रजनीताईंचे नशिबही देवाने लिहून पाठवले होते. त्यांच्या पोटी 'विशेष' मुलाला देऊन शेकडो मुलांमध्ये सक्षमीकरणाचे बीज त्यांनी रोवले. या मुलांच्या प्रश्नाचे उत्तर त्या स्वत:च्या मुलामध्ये शोधत असत. एक आई आपल्या मुलाला घडविण्यासाठी किती कष्ट घेऊ शकते, हे रजनीताईंनी वेळोवेळी दाखवून दिले, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.

प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा रजनीताई लिमये यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त 'दरवळ रजनीगंधाचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सुनीता महाले यांना लिमये यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीलिमा पवार होत्या. रजनीताईंचे अनुकरण खूप लोकांनी करत मानसिक अपंग असलेल्या मुलांना बळ दिले असेही त्या म्हणाल्या. पुरस्कारार्थी सुनीता महाले यांनी रजनीताईंच्या कामाला आणखी सक्षम करू, अशी भावना व्यक्त केली. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संध्या देवरुखकर यांनी पत्ररुपातून रजनीताई आणि त्यांची मैत्री समोर आणली. कवी किशोर पाठक यांनी रजनीताई या दीपस्तंभासारख्या होत्या असे म्हणत कवितेचे सादरीकरणही केले. लिमये यांची मुलगी अंजू यांनीदेखील आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रबोधिनी ट्रस्टच्या अध्यक्षा सुलभा सरवटे, उद्योजक प्रकाश रत्नपारखी, दिलीप भगत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी 'आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही', या गीतांनी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात उदंड जाहली दारू!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक कार्यालयाला दारूच्या उत्पादन शुल्कापोटी नऊ महिन्यांत गेल्या वर्षीपेक्षा ५१४ कोटींचे जास्त उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१७ या नऊ महिन्यांत १३६० कोटी रुपये शुल्क मिळाले होते. पण, २०१८ मध्ये ही रक्कम १८७४ कोटींपर्यंत गेली आहे. ही वाढ तब्बल ३८ टक्के आहे. जिल्ह्यात चार दारू निर्मिती कारखाने असून, त्यांच्या उत्पादनावरील हे शुल्क आहे. त्यात किरकोळ रक्कम जिल्ह्यातील मद्यपरवाना शुल्काची आहे.

या विभागाला २०१७-१८ या आर्थिक वर्षात १८८० कोटी रुपये उत्पादन शुल्क मिळाले होते. त्यावेळी त्यात ४० कोटी रुपये जिल्ह्यातील दारु दुकानांच्या लायसन्स फीचे होते. ही वाढ त्यावेळेस १३ टक्के होती. २०१६-१७ मध्ये हेच उत्पन्न १६६२ कोटी होते. पण, २०१८ मधील अवघ्या नऊ महिन्यांतच हे उत्पन्न १८७४ कोटी झाले आहे. जिल्ह्यातील दारू बनविणाऱ्या चार कारखान्यांमधून उत्पादन झाल्यानंतर ते राज्यात व देशभरात जाते. पण, त्याचे उत्पादन शुल्क हे संबंधित जिल्ह्यात भरावे लागते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला हा फायदा झाला आहे. राज्यात या उत्पन्नामुळे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात चाळीसहून अधिक वायनरीज् असल्या तरी सरकारने २०२१ पर्यंत त्यांना करात सूट दिली आहे. त्यामुळे या उत्पन्नामध्ये मोठा भाग हा दारू, बीअर व देशी दारुच्या उत्पादनावरील आहे. त्यातून हे शुल्क मिळालेले आहे. जिल्ह्यात दारूचे तीन कारखाने दिंडोरी तालुक्यात आहेत, तर एक इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथे आहे. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात दारू उत्पादन केले जाते.

महामार्गावरील दुकाने सुरू झाल्याचा फायदा

सर्वोच्च न्यायालयाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री करण्यास बंदी घातल्यानंतर देशभर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने बंद झाली. नंतर हळूहळू यातील अटी शिथील केल्यामुळे अधिकृत दुकानांची संख्या वाढली. त्यामुळे देशभर दारूची मागणीही वाढली. त्यामुळे उत्पादन शुल्कही वाढले. दारूच्या किमती वाढल्याचाही शुल्कावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

जिल्ह्यातील उत्पादन शुल्क

२०१६-१७ - १६६२ कोटी

२०१७-१८ - १८८० कोटी

२०१८ -१९ - १९७४ कोटी

(एप्रिल ते डिसेंबर २०१८)

जिल्ह्यातील चार कारखान्यांतून झालेले दारू उत्पादन व लायसन्स फीमुळे नऊ महिन्यांत १८७४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. २०१७ मध्ये हेच उत्पन्न १३६० कोटी होते. ही वाढ ३८ टक्के असून, त्यामुळे उत्पादन शुल्काच्या बाबतीत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- सी. बी. राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा सेनेला धक्का

$
0
0

राजकारण लोगो लावणे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला असून, शिवसेनेचे माजी आमदार व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते धनराज महाले यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रावादीत प्रवेश केला आहे.

मनमाड येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दिंडोरी लोकसभा मतदार संघातील राजकीय गणिते बदलली आहेत. राष्ट्रवादीकडून महाले यांना लोकसभेची ऑफर दिल्याची चर्चा असून, शिवसेनेला मात्र या निर्णयाने मोठा झटकाच बसला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह राष्ट्रवादीने अन्य पक्षांतील बडे मासे गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी शिवसेनेला झटका दिला असून, माजी आमदार महाले यांना पक्षात घेऊन एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकाच वेळी शिवसेना आणि भाजपला चेकमेट देत, दिंडोरीसाठी महाले यांच्या रुपाने तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. शुक्रवारी मनमाडमध्ये राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत महाले यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाले हे जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे पुत्र असून, त्यांनी गेल्या वर्षभरापासून दिंडोरी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, शिवसेना आणि भाजपमधील युतीबाबतचा घोळ मिटत नसल्याने अखेरीस महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत, उमेदवारी मिळ‌वण्याची खेळी खेळली आहे. महालेंच्या रुपाने राष्ट्रवादीला दिंडोरीत तगडा उमेदवार मिळाला असून, भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. महाले यांच्या वडिलांचे समर्थक दिंडोरी मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास फायदा होणार असून, चव्हाण यांना फटका बसणार आहे.

भारती पवार यांचे काय?

दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी डॉ. भारती पवार यांचे जवळपास नाव निश्चित झाले असताना महाले यांच्या प्रवेशामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वेळी त्यांनी या मतदार संघातून उमेदवारी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा रक्षक द्या!

$
0
0

नाशिक : जुने नाशिकमधील जहांगिर मशिद कब्रस्थानमधील सुरक्षा भिंत कोसळल्याने तेथे मोकाट कुत्री घूसून दफन केलेले मृतदेह उकरून काढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करण्यासह भिंतही उभी करण्याची मागणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष शेख हनिफ बशीर यांनी महापौरांकडे केली आहे. महापौरांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांकडून धुडगूस

$
0
0

शाळा, क्लास परिसरात

टवाळखोरांचा धुडगूस

सातपूर : कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात शाळा, खासगी क्लासेसच्या परिसरात टवाळखोरांचा धुडगूस नित्याचा झाला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यावर पेंट्रोलिंग वाहन शाळा व खाजगी क्लासच्या परिसरात येतात. परंतु, पोलिसांचे वाहन येताच टवाळखोर धूमस्टाइल दुचाकी चालवत पोबारा करताना दिसतात. पोलिसांनी टवाळखोरांची योग्य माहिती घेत कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळा व क्लासेसचे मोठे जाळे सातपूर भागात पसरले आहे. शाळा व खाजगी क्लास भरतेवेळी व सुटतांना टवाळखोरांचा जाच विद्यार्थिनींना सहन करावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थाचालकांनीच ठोकले शाळेला कुलूप

$
0
0

धुळ्यातील प्रकार; शिक्षकांच्या मनमानीमुळे निर्णय

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील साक्रीरोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयामागील अग्रसेन शाळेतील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकरणात संस्थाचालक आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गुरुवारी (दि. १७) सकाळी वाद झाला. यातून संस्थाचालक नंदलाल अग्रवाल यांनी संतापाच्या भरात शाळेलाच कुलूप ठोकल्याने पालकांचा संताप अनावर झाला. पालक व विद्यार्थ्यांनी चेअरमन अग्रवाल यांच्या घरावर मोर्चा नेत घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने वाद आटोक्यात आला.

महाराजा अग्रसेन शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांचा संस्थाचालक यांच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्याचे आज मोठ्या वादात रुपांतर होऊन संस्थाचालक नंदलाल अग्रवाल यांनी शाळेलाच कुलूप ठोकल्याचा प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे म्हणून कुलूप ठोकल्याचा खुलासा चेअरमन अग्रवाल यांनी केला. तर दुसरीकडे संस्थाचालक विश्‍वासात घेत नसल्याची ओरड मुख्याध्यापक, शिक्षकांनी केली. मात्र, या वादात मात्र ऐन थंडीत विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी भेट देऊन माहिती घेत शाळेचे कुलूप काढले. याबाबत सविस्तर माहिती घेऊन जो जबाबदार असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अहिरे यांनी सांगितले.

असे आहे प्रकरण...
साक्रीरोडवरील विद्यावर्धिनी कॉलेज परिसरातील अग्रसेन शाळेत आजमितीस बालवाडी ते दहावीपर्यंत सुमारे १८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ४० शिक्षक अध्यापनाचे धडे देत आहेत. शाळेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते, शाळेच्या इमारतीत सर्व खोल्या, व्हरांड्यांमध्ये खूप घाण साचलेली आहे. मुख्याध्यापकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, शिपायांचा कामचुकारपणा, शिक्षकांची असहकार्याची भूमिका यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने होणारी हेळसांड पहाता प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रत्यक्ष पहाणी करण्यास येईपर्यंत शाळा बंद ठेवली जाईल, असा फलक लिहून चेअरमन नंदलाल अग्रवाल यांनी गुरुवारी (दि. १७) सकाळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शाळेबाहेर काढून शाळेच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा चेअरमन नंदलाल अग्रवाल यांच्या घराकडे वळविला. घरात चेअरमन व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. परंतु, त्यांनी मोर्चेकरी पालकांच्या घोषणांकडे दुर्लक्ष केले. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता. पोलिस निरीक्षक गणेश चौधरी यांना या घटनेची माहिती लागताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत अग्रवाल यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणात संस्थाचालक अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांना योग्य त्या शाळेत वर्ग केले जाईल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बॉम्बच्या अफवेने धुळे कारागृहात धांदल

$
0
0

औरंगाबाद पथकाला निनावी फोन; चर्चांना उधाण

म. टा. वृत्तसेवा, धुळे

औरंगाबाद बॉम्बशोधक पथकाला अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (दि. १७) फोनवरून माहिती दिली की, धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब ठेवण्यात आला आहे. यानंतर औरंगाबाद बॉम्ब शोधक विभागाने ही माहिती धुळे जिल्हा पोलिस कंट्रोल रूमला कळविली. तातडीने गुरुवारी सायंकाळी धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसर बॉम्बशोधक पथकाने पिंजून काढला मात्र, त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही केवळ अफवा ठरली असून, रात्रभर धुळ्यात यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (दि. १७) फोन करून धुळे जिल्हा कारागृहात बॉम्ब असल्याची माहिती दिली. याबाबत धुळे पोलिस यंत्रणेला माहिती मिळाल्यावर तातडीने बॉम्ब शोध पथक बोलाविण्यात आले. ही बातमी समजल्यावर नागरिकांनी कारागृहाजवळ गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक गणेश चौधरी व कर्मचाऱ्यांनी कारागृह व परिसराला छावणीचे स्वरूप दिले होते. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात निरनिराळ्या अफवा पसरत होत्या. सोशल मीडियावरदेखील याबाबत चर्चांना उधाण आले होते.

अगोदरच्या अफवांची झाली आठवण
याअगोदरही गेल्यावर्षी धुळे बसस्थानकावरही बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविण्यात आली होती. या वेळी बसस्थानकावर प्रवाशांची धावपळ उडाली होती. शहरात याची माहिती गेल्यावर नागरिकांत भीतीचे वातावरण निार्मण झाले होते. शहरातील कनोसा इंग्लिश स्कूलमध्येही याअगोदर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. त्यावेळीही सकाळच्यावेळी आलेल्या या अफवेने शिक्षकांची दमछाक उडाली होती. शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अशा अफवेच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या अफवेमागे कोण आहे, याचा शोध अजूनही पोलिसांना लागलेला नाही. हा निव्वळ मनोरंजनाचा भाग असल्याने काहींमध्ये या विषयाची चर्चा रंगली होती.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी सायंकाळी औरंगाबाद फोन आल्याने धुळे जिल्हा बॉम्बशोधक पथकाने तत्काळ कारागृह व परिसराची मेटल डिटेक्टरने तपासणी केली. मात्र, याबाबत कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवावे.
- वैभव आगे, जिल्हा कारागृह अधीक्षक, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मानव हा सर्वात संहारक प्राणी’

$
0
0

जेलरोड :

बोधनात्मक क्रांतीमध्ये महावानरापासून निर्माण झालेल्या ऑस्ट्रेलोपेथिस, निएंडरथल, इरेक्टस आणि सेपिअन्स (आजचा मानव) या भावंडांमध्ये तीव्र संघर्ष होऊन सेपिअन्स विजयी होऊन शिल्लक राहिले. मात्र, त्याने पृथ्वीवरील ६० ते ७० टक्के जीवसृष्टी नष्ट केली. तो आता स्वतःला नष्ट करण्याचा मार्गावर आहे. जीव विज्ञानाच्या इतिवृत्तानुसार मानव हा सर्वात संहारक प्राणी आहे, असे प्रतिपादन राहुल बनसोडे यांनी केले.

नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात युवा सप्ताह व्याख्यानमालेत बनसोडे बोलत होते. त्यांनी 'सेपिअन्स - मानवी उत्क्रांतीच्या पाऊल खुणा' या विषयावर मार्गदर्शन केले. जगात सध्या गाजत असलेल्या 'सेपिअन्स' या युवा नोह हरारी यांच्या पुस्तकातील दाखले देऊन मानवाची उत्क्रांतीचा इतिहास उलगडला. सेपिअन्स यांनी धर्म, राष्ट्र, भांडवलवाद, समाजवाद,मानवाधिकार निर्माण केले. तो सेपिअन्स आफ्रिकेतून निघून जगात सर्वत्र पोहचला. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मानव जातीच्या अस्तित्वाला कशाप्रकारे धोका निर्माण करत आहे यावर बनसोडे यांनी प्रकाश टाकला.

डॉ संजय तुपे यांनी प्रास्तविक केले. प्रा. विजय सुकटे, डॉ. विजया धनेश्वर, डॉ. संतोष बोडके, प्रा. शशिकांत खेमनर, डॉ. कृष्णा शहाणे उपस्थित होते. साक्षी गोरवाडकर हिने सूत्रसंचालन केले. राहुल गायकवाड याने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नौदलाच्या पंखांना एचएएलचे बळ

$
0
0

नाशिक :

नौदलाच्या हवाई विभागाला हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) बळ लाभणार आहे. नौदलाकडील मिग २९ या लढाऊ विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी नौदल आणि एचएएल यांच्यात शुक्रवारी (१८ जानेवारी) सामंजस्य करार होणार आहे. तशी अधिकृत माहिती नौदलाचे रिअर अॅडमिरल व्ही. मोहनदास यांनी 'मटा'ला दिली. यामुळे मिग २९ विमानांचे आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे.

नौदलाच्या हवाई विभागाकडे सध्या मिग २९ श्रेणीची लढाऊ विमाने आहेत. या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती सध्या गोवा येथील कमांडमध्ये केली जाते. मात्र, नौदलाकडे अनुभवी आणि तंत्रज्ञ यांची कमतरता आहे. त्यामुळेच मिग २९ विमानांची देखभाल, दुरुस्ती करताना अनेक अडचणींना सध्या नौदलाला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात काही प्रमाणात नाशिक एचएएलची मदत नौदलाकडून घेतली जाते. पण, तो पर्यायही अधिक सक्षम नाही. गेल्या तीन वर्षांपासून एचएएल आणि नौदल यांच्यात बोलणी सुरू होती. आता नौदल आणि एचएएल यांच्यात विशेष सामंजस्य करार करण्याचे निश्चित झाले आहे. डिफेन्स सेमिनारसाठी नाशकात आलेले नौदलाचे रिअर अॅडमिरल व्ही मोहन दास हे गुरुवारी नाशिक मुक्कामी आहेत. शुक्रवारी (१८ जानेवारी)सकाळी ओझर एचएएलच्या मुख्यालयात या करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे.

असा होणार फायदा

रशियन बनावटीच्या मिग २९ विमानांचे उत्पादन ओझर एचएएलमध्येच करण्यात आले आहे. तसेच, त्याच्या देखभाल, दुरुस्तीमध्ये एचएएलचा हातखंडा आहे. नौदलाकडे ही विमाने आल्यापासून काही दशके लोटली आहे. त्यामुळे या विमानांची देखभाल, दुरुस्ती करण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच हा करार करण्यात येणार आहे. या करारामुळे एचएएलचे कुशल मनुष्यबळ नौदलाच्या गोवा येथील कमांडमध्ये थेट उपलब्ध असेल. सद्य:स्थितीत एचएएलची २५ जणांची टीम तेथे जाईल. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाला वेग दिला जाईल. एचएएलच्या कर्मचाऱ्यांची संख्या नजिकच्या काळात शंभरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत मिग २९ विमानांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाणार आहे. या करारानुसार नौदलाकडून थेट एचएएलला आर्थिक रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे एचएएल आणि नौदल दोघांनाही फायदा होणार आहे.

एचएएलकडे अत्याधुनिक आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यांच्यासोबत करार करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या करारामुळे मिग २९ विमानांची कार्यक्षमता वाढविता येईल. परिणामी देशाच्या सागरी सुरक्षेला अधिक फायदा होणार आहे.
-व्ही मोहन दास, रिअर अॅडमिरल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोराच्या पिलांची कोंबडी झाली माय!

$
0
0

नांदगाव:

आज माणुसकी हरवल्याचे चित्र असताना सर्व घटकांना प्रेरणा देणारी घटना नांदगावमधील साकोरे येथे घडली आहे. येथील एक कोंबडी मोरांच्या दोन पिलांची माय झाली आणि या मोरांचा तब्बल तीन महिने जिवापाड सांभाळ करून रवींद्र पगार या पक्षीमित्राने माणुसकीचे आगळे दर्शन घडविले आहे. बुधवारी या दोन मोरांना वन खात्याच्या ताब्यात देताना पगार यांचे कुटुंब गहिवरले होते.

वाचलेली, पाहिलेली, पुस्तकातील ती माणसे गेली कुठे, असा प्रश्न आज विचारला जातो. मात्र रवींद्र पगार यांच्यासारख्या माणुसकीच्या देवदूताच्या रुपात ती अजूनही भेटू शकतात, याची साक्षच या अनोख्या घटनेने पटवून दिली. नांदगाव तालुक्यातील साकोरे येथील वेहेळगाव रस्त्यावर सरताळे वस्तीवर राहणारे पक्षीमित्र रवींद्र पगार याना बांधावर फिरताना दोन अंडी सापडली, ही अंडी तशीच वाऱ्यावर न सोडता माणुसकीच्या भावनेने त्यांनी ती घरी आणली आणि आपल्या घरच्या कोंबडीखाली ती उबवली. या अंड्यांतून दोन पिलांचा जन्मही झाला. सुरुवातीला ही पिले कोंबडीच्या पिलांपेक्षा काहीशी वेगळी भासली, ती कोंबडीची पिल्ले नसतानादेखील कोंबडीला त्या पिलांचा लळा लागला. कोंबडीची पिलेदेखील या नव्या पिलांसोबत आनंदाने बागडू लागली. काही महिन्यांनी या नव्या पिलांना पिसे येऊ लागली, तुरेदेखील आले आणि मग ही मोराची पिले असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

जडले अनोखे नाते

कोंबडीदेखील आपल्या पिलांसह या मोरांच्या पिलांना जीव लावत असल्याने त्यांच्यात ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे अनोखे नाते जडले. कोंबडीची ऊब, माया मोराच्या पिलांना हवीहवीशी वाटू लागली. तब्बल तीन महिने पगार कुटुंबीयांनी मोराच्या या पिलांना जिवापाड जपले. मोराची पिलेदेखील या मायेच्या छायेत छान वाढली. पक्षीमित्र रवींद्र पगार यांना राष्ट्रीय पक्षी मोर ही राष्ट्राची संपत्ती आहे, हे माहिती असल्याने सामाजिक भावनेतून त्यांनी या मोरांच्या पिलांबद्दल वन खात्याला माहिती दिली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सरताळे वस्ती येथे येऊन पाहणी केली. पगार यांनी मोरांची पिले त्यांच्या हवाली केली. त्यावेळी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गहिवरून आले होते.

सारेच झाले सैरभैर

तीन महिने जिवापाड सांभाळलेली आणि सर्वांनाच लळा लागलेली मोरांची पिले अंगणातून बाहेर पडली आणि पगार कुटुंबीयांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. दुसरीकडे काही काळ या पिलांची माय झालेली, त्यांना मायेची ऊब देणारी कोंबडी आणि तिची पिलेदेखील ही ताटातूट मूक मनाने पाहताना सैरभैर झाल्याचे दिसून आले. माणुसकी हरवलेल्या जगात ही मोरांच्या पिलांची कहाणी माणूसपणाचा जयघोष आणि पुरस्कार करणारी ठरली

मोराची पिले कोंबडीलाच आई समजत होती आणि कोंबडीनेही त्यांना आपल्या पंखाखाली घेतले, मायेची ऊब दिली. मोराची पिले वन खात्याकडे सोपविल्यावर आमच्या कुटुंबातील दोन सदस्यच जणू घरापासून दूर गेल्याचे दुःख झाले. - रवींद्र पगार, पक्षीमित्र

कोंबडीने मोराची अंडी उबविणे, पिलांचे जतन करणे अनेकदा घडते. मुळात कोंबडी हा पक्षी आपल्या पंखाखालील अंड्यांबाबत दक्ष असतो. मात्र, मोराची अंडी आणि कोंबडीची अंडी यात काहीसे साम्य असल्यामुळे असे होणे नैसर्गिक आहे. - दिगंबर गाडगीड, पक्षीमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जबाजारीपणाला कंटाळून कांदा राशीवरच शेतकरी आत्महत्या

$
0
0

मालेगाव:

नापिकी, शेतमालाला भाव नसणे, कर्जबाजारीपणा या कारणांनी शुक्रवारी मालेगाव तालुक्यात एकाच दिवशी घडलेल्या तीन तरुण शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. कंधाणे, सायने खु. व नांदगाव बु. येथे या घटना घडल्या. दर नसल्याने कंधाणेच्या शेतकऱ्याने तर कांद्याच्या राशीवरच विष प्राशन करून आत्महत्या केली. नववर्षाच्या सुरुवातीलाच या तीन दुर्दैवी घटना घडल्या असून, एकूणच शेती आणि शेतकरी प्रश्न जटील बनत चालला आहे.

मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. कंधाणे येथील शेतकरी ज्ञानेश्वर शेवणकर (वय ३५) यांनी शुक्रवारी याच कारणामुळे आपली जीवनयात्रा संपवली. शेवणकर हे एकत्र कुटुंबात राहत होते. सहा एकर कोरडवाहू शेतीक्षेत्र असलेल्या शेवणकर यांच्यावर सोसायटीचे दीड लाख, तर हातउसनवारीचे दीड लाख असे तीन लाख कर्ज होते. दर वाढल्यावर कांदा विक्री करू या आशेने शेवणकर यांनी शेतात कांद्याची ढिग केला होता. शुक्रवारी सकाळी याच कांद्याजवळ त्यांनी विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार ज्योती देवरे, बाजार समिती उपसभापती सुनील देवरे, तालुका पोलिस निरीक्षक कांतिलाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. शेवणकर यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, आईवडील असा परिवार आहे.

सायने येथील शेतकरी वसंत बंकट पाटील (वय ४५) यांनीदेखील गुरुवारी आपल्या शेतातील घरात सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांच्या नावे ०.८५ आर शेती असून, सोसायटीचे दीड लाखाचे कर्ज होते. शेतीमालास भाव नसल्याने व कर्जबाजारीपणामुळे नैराश्येतून त्यांनी विष प्राशन केल्याचे बोलले जाते आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

नांदगाव बु. येथील चेतन केदा बच्छाव (वय २३) या तरुण शेतकऱ्याने देखील कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे ०.०४ आर शेती असून, त्यांच्यावर सोसायटीचे ६५ हजार, तर एका खासगी कंपनीचे पाच लाख कर्ज होते. चेतन हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई वडील व दोन अविवाहित बहिणी असा परिवार आहे.

वर्ष शेतकरी आत्महत्या

२०१४ ४६

२०१५ ८५

२०१६ ८७

२०१७ १०४

२०१८ १०८

२०१९ ०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत अन् हिंदीच्या कृतिपत्रिकेवर मार्गदर्शन

$
0
0

रेषा एज्युकेशन सेंटरसोबत 'मटा'चा रविवारी उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदललेली पाठ्यपुस्तके आणि मूल्यमापन पद्धतींचा सोबत घेऊन दहावीचे विद्यार्थी यंदा कृतिपत्रिकेवर आधारित परीक्षेस सामोरे जाणार आहेत. दहावीची पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यामध्ये नेमका फरक काय हे इतर विषयांच्या बाबतीत समजावून घेतल्यानंतर आता अंतिम टप्प्यात हिंदी आणि संस्कृत या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या रविवारी (दि. २०) या दोन्ही विषयांच्या कृतिपत्रिकेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

पारंपरिक परीक्षा पद्धती आणि कृतिपत्रिका यातील फरक, कृतिपत्रिका सोडविताना घ्यायची काळजी आदी मुद्द्यांवर यावेळी संस्कृत विषयासाठी मार्गदर्शक कुमुदीनी फेगडे आणि हिंदी विषयासाठी मार्गदर्शक सुरेखा बोंडे या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी व पालक सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना रविवारी सकाळी १० ते ११.३० या वेळेत संस्कृत या विषयाचे तर दुपारी १२ ते १.३० या वेळेत हिंदी या विषयाचे मार्गदर्शन मिळेल.

येथे साधा संपर्क

कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असला तरीही यासाठी नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी रेषा एज्युकेशन सेंटर, ३ ब, कौस्तुभ, एसटी कॉलनी, गंगापूर रोड या पत्त्यावर किंवा ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नौदल-एचएएलमध्ये करार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि नौदल यांच्यात शुक्रवारी (दि. १८) सामंजस्य करार झाला. मिग २९ विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठीचा हा करार आहे.

नौदलाचे असिस्टंट चिफ ऑफ नाव्हल स्टाफ रिअर अॅडमिरल व्ही. मोहनदास आणि एचएएलच्या लढाऊ विमान निर्मिती विभागाचे ए. बी. गरड यांनी या करारावर स्वाक्षरी केली. ओझर येथील एचएएलच्या मुख्यालयात झालेल्या छोटेखानी समारंभात हा करार करण्यात आला. या कराराद्वारे गोवा येथील नौदलाच्या कमांडमध्ये मिग २९ विमाानांच्या देखभाल आणि दुरुस्तीला वेग दिला जाणार आहे. हा करार करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया दास आणि गरड यांनी दिली आहे. यापुढेही अशा प्रकारचे सामंजस्य करार होणार असून त्याद्वारे सहकार्य, तंत्रज्ञानाची मदत आणि कुशल मनुष्यबळाचा पुरवठा हे साधले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नौदलाला नाशिकमधून रसद

$
0
0

उद्योजकांना मिळाली ऑर्डर; सुट्या भागांचा पुरवठा सुरू

Bhavesh.Brahmankar@timesgroup.com

Twitter - @BhaveshBMT

नाशिक : नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हब घोषित झाले असतानाच येथील उद्योजकांना दिलासा देणारे वृत्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेच्या पातळीवर असलेल्या आठ उद्योजकांची नौदलाने निवड केली आहे. या उद्योगांना ऑर्डरही मिळाली असून उत्पादनांचा पुरवठाही सुरू झाला आहे. आणखी १० ते १२ उद्योगांचीही निवड होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एचएएल पाठोपाठ आता नौदलालाही सुट्या भागांचा पुरवठा नाशिकमधून होणार आहे.

ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या लढाऊ विमानांची निर्निती करणाऱ्या कारखान्याला नाशिकमधील २५० उद्योगांकडून विविध सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून नौदल आणि नाशिकचे उद्योजक यांच्यामध्ये विविध प्रकारच्या गाठी-भेटी सुरू होत्या. यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी निमा हाऊसमध्ये बैठकही झाली. नाशकातील २०हून अधिक उद्योजकांनी नौदलाला सुटे भाग पुरविण्याची इच्छा दर्शविली. त्यानंतर विविध प्रकारच्या प्रक्रिया पार पडल्या. या उत्पादनांची चाचणीही घेण्यात आली. यातील आठ उद्योगांची निवड नौदलाने केली आहे. त्यामध्ये शमन इंजिनीअरिंग, आरपीएम इंजिनीअरिंग, सारंग ऑटो अँड एरोनॉटिक्स लिमिटेड, प्रिसिझन टूल इंजिनीअरिंग वर्कस, सोनिक मल्टिटेक, रक्षा पॉलिकॉट आणि अॅडटेक लिमिटेड या आठ कंपन्यांचा समावेश आहे.

गोवा आणि कोची येथील नौदलाच्या कमांडमध्ये विविध प्रकारच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा या उद्योगांकडून केला जाणार आहे. यातील शमन इंजिनीअरींगला नुकतीच पहिली ऑर्डर देण्यात आली आहे. अन्य सात कंपन्यांनी त्यांची पहिली ऑर्डर पूर्ण केली आहे, अशी माहिती कमांडर राजेश बाबू यांनी 'मटा'शी बोलताना दिली. नाशकातील आणखी १० ते १२ कंपन्यांशी बोलणी अंतिम टप्प्यात आहे. ही बोलणी यशस्वी झाल्यास संरक्षण क्षेत्राशी निगडीत विविध उद्योगांना नाशिकमध्ये चालना मिळू शकेल.

नौदलाने भारतीयकरणासाठी धोरण निश्चित केले आहे. त्याअंतर्गत आम्ही परदेशातून उत्पादने आयात करण्याऐवजी देशांतर्गत उद्योगांना प्राधान्य देत आहोत. त्याअंतर्गतच नाशिकच्या आठ उद्योगांची आम्ही निवड केली. ज्यांना हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्या वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करावी. आम्ही त्यांना संपर्क करू. नाशिकमध्ये कमांडर बाबू यांच्याशीही संपर्क साधता येईल.

- व्ही. मोहनदास, रिअर अॅडमिरल

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगरला उद्या हॅपी स्ट्रीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोविंदनगर परिसरदेखील वाहतुकीने गजबजलेला असतो, या रस्त्यावर आपल्याला खेळता येईल, मौज मजा करता येईल ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट 'मटा'च्या माध्यमातून साध्य होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने रविवार (२० जानेवारी ) सकाळी ७ ते ९ या वेळेत गोविंदनगर येथे हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन केले आहे. यावेळी झुंबा, जादुगाराचे खेळ, सायकलिंग, स्केटिंग, जुन्या गाड्यांचा नजराणा, अशा अनेक गोष्टी नाशिककरांना पुन्हा अनुभवता येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून हॅप्पी स्ट्रीटने नाशिककरांना अक्षरश: वेड लावले आहे. लहान मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील व्यक्ती हॅप्पी स्ट्रीटची वाट पाहून असतात. मागील आठवड्यात नाशिकरोड व त्या अगोदर व्हिरिडीयन व्हॅली व कॉलेजरोड येथे झालेल्या हॅप्पी स्ट्रीटला नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदनगर येथे हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सह्याद्री सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटलतर्फे हॅप्पी स्ट्रीटमध्ये सहभागी होणाऱ्यांची मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचे धरणे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कमी पटसंख्येचे कारण दाखवत १३६ अंगणवाड्या बंद करून सात महिन्यांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन थांबविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनासमोर धरणे आंदोलन केले.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय काटकसरीच्या नावाखाली १३६ अंगणवाड्या बंद केल्या आहेत. यात कार्यरत १३६ सेविका आणि तेवढ्याच मदतनीस अशा २७२ जणांना कमी करण्यात आले आहे. परंतु, महासभेने आयुक्तांचा निर्णय फिरवत, या सर्वांना कामावर घेऊन अंगणवाड्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मुंढेंनी मात्र हा प्रस्ताव केवळ दप्तरी दाखल करून घेत आपला निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलन केले आहे. मुंढेंच्या बदलीनंतर गमे यांनीही यासंदर्भात काही पावले उचलली नाहीत. त्यामुळे पुन्हा शुक्रवारी या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर प्रशासनाच्या निषेधार्थ एकदिवसीय धरणे आदोलन केले.

प्रमुख मागण्या

अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या निर्धारणाचे अधिकार महासभेलाच असावेत, तसेच ही मर्यादा किमान १५ व कमाल २० पर्यंत केली जावी. शहराच्या लोकसंख्येनुसार अंगणवाड्यांची पुनर्रचना केली जावी. अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. अंगणवाड्या १९९४ पासून सुरू झाल्या असताना भविष्य निर्वाह निधी मात्र गत दोन वर्षांपासून सुरू झाल्याने ज्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना सेवानिवृत्तीनंतर जगणे सुसह्य व्हावे यासाठी आर्थिक मदतीची योजना सुरू केली जावी. अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी वर्ग, कर्मचारी, मुख्य अंगणवाडी सेविका, सेविका आणि मदतनीस यांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले जावे. अंगणवाड्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर नियोजनातील अडथळे दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित सीएम चषक जिल्हास्तरीय स्पर्धेत नियोजनाचा अभाव असल्याची बातमी गुरुवारी 'मटा'त प्रसिद्ध होताच आयोजक खडबडून जागे झाले. आयोजनात ज्या काही त्रुटी होत्या त्या तातडीने दूर करण्यात आल्या असून, खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.

२०१९ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभानिहाय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. १५ विधानसभेच्या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी देण्यात आली. नाशिकमध्ये झालेल्या स्पर्धेच्या आयोजनात मोठ्या प्रमाणात त्रुटी होत्या. याबाबत 'मटा'त वृत्त प्रकाशित होताच आयोजकांची चांगलीच धांदल उडाली. शुक्रवारी सकाळी तातडीने या त्रुटी दूर करण्यात आल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील १ हजार ७९० खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंना क्रीडांगणावर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली नव्हती. शुक्रवारी खेळाडूंना ये-जा करण्यासाठी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले. गुरुवारी देण्यात आलेल्या जेवणात मसाला भात, बुंदी, पातळ भाजी आणि पुऱ्या इतकाच मेनू ठेवण्यात आला होता. शुक्रवारी त्यात अमूलाग्र बदल झाले. जेवणासाठी बुफे आणि डायनिंग पद्धत ठेवण्यात आली. वरण-भात, पुलाव, पोळी, भेंडीची भाजी, पातळ भाजी, जिलेबी असा मेनू खेळाडूंना शुक्रवारच्या जेवणात देण्यात आला. ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता, तो काढण्यात आला असून पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खोचे ग्राऊंड पाणी मारून तयार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणचे खासगीकरण थांबा

$
0
0

आमदार शेख यांचे जनआक्रोश आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील यंत्रमाग कारखान्यांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली असून या विरोधात शुक्रवारी मालेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार असिफ शेख व महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वात जुने पॉवरलूम परिसरात जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.

शहरातील यंत्रमाग कारखान्यांना महावितरण कंपनीद्वारे वीजपुरवठा केला जात आहे. परंतु वीज चोरी, विजेचा अपव्यय अशा अनेक कारणांमुळे शासनाने महावितरणचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात आमदार असिफ शेख यांच्याकडून सातत्याने आवाज उठवण्यात येत आहे. शुक्रवारी देखील या निर्णया विरोधात जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. शेख म्हणाले, महावितरणचे खासगीकरण झाल्यास संपूर्ण यंत्रमाग उद्योग संकटात येईल. खासगी कंपनीच्या मनमानीमुळे यंत्रमाग उद्योगातील अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शासनाने शासनाने महावितरण कंपनीचे खासगीकरण संबधी शासनाने फेरविचार करावा तसेच कोलकत्ता येथील एका खासगी कंपनीस देण्यात येणार मक्ता त्वरित रद्द करावा. कार्यकारी अभियंता यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस नगरसेवकांसह शहरातील यंत्रमाग कारखानदार, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images