Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘एफडीए’ची विशेष मोहिम १ पासून

$
0
0

परवान्यासह नोंदणीची होणार तपासणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेकायदेशीरपणे होणारी अन्न विक्रीला चाप लावण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) १ फेब्रुवारीपासून तीन दिवस परवाना व नोंदणी पडताळणी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील अन्न विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही समोर येणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल व विविध खाद्य पदार्थ विकणारी दुकाने सुरू झाली आहेत. पण, यातील काहींनी अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार परवाना व नोंदणी केलेली नाही. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार वार्षिक उलाढाल १२ लाखापेक्षा जास्त आहे. त्यांनी एक वर्षासाठी दोन हजार रुपये भरून परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच १२ लाखांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांनी १०० रुपये शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही नोंदणी व परवाना आता सर्वांकडे उपलब्ध असावा यासाठी ही मोहिम आहे.

ऑनलाइन खाद्यपदार्थ विकणाऱ्या काही कंपन्यांना परवाना नसणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडून माल खरेदी न करण्याचे निर्देश 'एफडीए'ने दिले होते. त्यामुळे विनापरवाना विक्री करणाऱ्या हॉटेलचालकांना याचा दणका बसला होता. अन्न सुरक्षितता ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने गेल्या काही दिवसापासून त्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे.

डाटीही मिळणार

हॉटेलची वेळोवेळी तपासणी करणे त्यात सुधारणा करण्याच्या सूचना देणे यासारखे अनेक तपासण्या अगोदर झाल्या. पण, त्यातून हॉटेल व्यावसायिकांचा एकत्रित डाटा उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे ही मोहीम राबवून हा डाटा एकत्र केला जाणार आहे. त्यानंतर एका अॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे.

तीन दिवसाची मोहिम १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. परवाना व नोंदणी करणे प्रत्येक अन्न विक्री करणाऱ्यांनी आवश्यक आहे. ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी या मोहिमेनंतर ग्राहकांना अॅपद्वारे पडताळणी करता येणार आहे.

- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरकुल गैरव्यवहार प्रकरणी माजी नगरसेवक अटकेत

$
0
0

न्यायालयाकडून उद्यापर्यंत पोलिस कोठडी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगरसेवक गिरधारी रामराख्या यांना मंगळवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांना बुधवारी (दि. २३) दोंडाईचा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दि. २५ जानेवारीपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जिल्हा सत्र न्यायालयात घरकुल गैरव्यवहारातील संशयित आरोपी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, गुलाबसिंग सोनवणे, विक्रम पाटील यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून, त्यांना तात्पुरता जामिन यापूर्वीच मंजूर झाला होता. यावर आता कोर्टात हजर झाल्यानंतर जामिनावर पुढील कामकाज होणार आहे. या प्रकरणी, दोंडाईचा घरकुल गैरव्यवहाराबाबत औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये दलित, आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्‍यक्ष कृष्णा नगराळे यांच्या तक्रारीवरून दोंडाईचा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये माजी नगरसेवक गिरधारी रामराख्या हे तपासाअंती गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिस कोठडीतून गिरधारी रामराख्या कडून पोलिस काय माहिती घेतात आणि याचे धागेदोरे कुठेपर्यंत जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्कलकुव्यात बालिकेची हत्या

$
0
0

पोलिसांकडून आरोपीस अटक; शहरात तणावपूर्ण शांतता

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरालगत असलेल्या सोरापाडा गावातील आठ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २२) रात्री उघडकीस आली. याबाबत अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून बालिकेवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अशी घटना प्रथमच अक्कलकुवा तालुक्यात घडल्याने या घटनमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या घटनेतील पीडितेचे वडील अक्कलकुवा शहरालगतच्या सोरापाडा गावात छोटामोठा व्यवसाय करतात. ते मंगळवारी सायंकाळी आपले काम आटोपून घरी आले. त्यांना आपली मुलगी घरात नसल्याचे पाहून आजूबाजूला त्यांनी तपास केला मात्र, मुलगी सापडली नाही. तेव्हा बाजूच्याने येऊन त्यांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पीडितेचे कुटूंब घटनास्थळी पोहोचले. त्यावेळेस पीडित बालिका रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. ही माहिती अक्कलकुवा पोलिसांना दिल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर नवले, पोलिस उपनिरीक्षक मेघशाम डांगे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास करून अवघ्या तासभरात पोलिसांनी कोमलसिंग करतासिंग शिकलीकर (वय ३०, रा. सोरापाडा, ता. अक्कलपाडा जि. नंदुरबार) यास अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम ३०२ सह बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनिमियान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचा तहसीलवर मोर्चा
मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे नंदुरबार जिल्हा शिवसेनाप्रमुख आमश्या पाडवी, महिला आघाडीच्या वंदना पाटील, निता माळी, सुमित्रा पाडवी, यांच्यासह सोरापाडा गावातील सर्व ग्रामस्थांनी घटनेतील आरोपींला फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही मागणी केली. या वेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. या घटनेमुळे बुधवारी अक्कलकुवा शहरात तणावपूर्ण शांतता होती.

जळगावातही घटनेचा निषेध
अक्कलकुवा येथे सोरापाडा भागात जो अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा हत्या करण्यात आली, या घटनेचा लोकसंघर्ष मोर्चाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे. गुन्ह्याची तत्काळ चौकशी करून सदर खटला हा फास्ट ट्रॅक वर घेऊन या नराधमाला शिक्षा व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या वेळी रामदास तडवी, झिलाबाई वसावे, रमेश नाईक, काथा वसावे, अशोक पाडवी, देवीसिंग वसावे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार’

$
0
0

वृत्तसंस्था, अमेठी (उत्तर प्रदेश)

आपला पक्ष आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान जाहीर सभेत बोलताना, 'पुढील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकू', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी बुधवार आणि गुरुवारी आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. गुरुवारी दिल्लीला परतण्यापूर्वी त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ उद्योगपतींनाच कर्जमाफी दिली, अशी टीका केली. चौकीदार चोर आहे हे त्यांनी सिद्ध केले असल्याचे सांगत, राहुल यांनी 'गली गली में शोर हैं, चौकीदार चोर हैं' या घोषणेचा पुनरुच्चार केला. मोदी हे देवाची शप्पथ घेऊन खोटे बोलतात. अच्छे दिन कुठे आहेत? नोटाबंदी हा सर्वात मोठा घोटाळा होता, असे सांगत, सीबीआयच्या प्रमुखांना घाईघाईत हटवण्याचे कारण काय, असा सवाल राहुल यांनी यावेळी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालेंच्या भेटीगाठी सुरू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी दिंडोरी लोकसभा मतदार संघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. या मतदारसंघातून पक्ष त्यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले जाते.

दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे यापूर्वी त्यांचे वडील स्व. हरिभाऊ महाले यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. तेव्हा मालेगाव मतदार संघ होता. मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर तो दिंडोरी झाला, त्यातील मालेगाव तालुका वगळण्यात आला. भाजपचे तीन वेळा खासदार असलेले हरिश्चंद्र चव्हाण यांना शह देण्यासाठी महाले यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर महाले यांनी आपला संपर्क वाढवला असून, त्यांनी वडिलांचे जुने कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शिवसेनेच्या काही नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात नांदगाव, येवला, चांदवड, दिंडोरी, कळवण, निफाड या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. येथे तीन मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात तर प्रत्येकी एक जागा भाजप, शिवसेना व माकपकडे आहे.

डॉ. भारती पवार नाराज

दिंडोरी लोकसभा मतदार संघातून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे मानून डॉ. भारती पवार यांनी लोकांशी संपर्क सुरू केला होता. पण, महाले यांच्या प्रवेशामुळे त्या नाराज झाल्या आहेत. डॉ. पवार नाराज असल्या तरी त्यांनीही चाचपणी सुरू केली आहे. त्या भाजप किंवा शिवसेनेच्या वाट्यावर असल्याचेही बोलले जाते.

समर्थकांचा प्रवेश सोहळा लांबणीवर

महाले यांच्या प्रवेशसोहळ्यामुळे जिल्हा परिषदेतील शिवेसेनेचे सदस्य त्यांच्याबरोबर जातील, असे बोलले जात होते. पण, त्यांच्या प्रवेशसोहळ्यानंतर एकानेही शिवसेनेला रामराम ठोकला नाही. त्यामुळे हा प्रवेश सोहळा लांबणीवर असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गटामार्फत पुरवा पोषण आहार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आतार्पंत महिला बचत गटामार्फत शालेय पोषण आहार पुरविण्यात येत होता. परंतु, सध्याच्या नियमात बदल करून त्या ऐवजी शासन स्तरावरुन सेंट्रल किचनद्वारे शालेय पोषण आहार देण्यात येणार आहे. यामुळे अनेक महिला बचत गटांचे काम हिरावले जाईल, असे सांगत राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी विरोध करत महापालिकेच्या उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांना निवेदन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या पदधिकारी व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

या निवेदनात म्हटले आहे की, बचत गटातील महिला अतिशय सर्व सामान्य कुटुंबातील आहेत. काही महिला तर अशिक्षित आहेत. नोकरी न मिळाल्याने या कामाने त्यांना रोजगार मिळत असतो. रोजगार हिरावल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल. सेंट्रल किचन योजनेसंदर्भात अनेक तक्रारी असून, शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर अन्न न मिळणे तसेच अन्नाचा दर्जा ही नित्कृष्ट असतो हे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार महिला बचत गटा मार्फतच महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना मिळावा.

हे निवेदन देताना राष्ट्रवादी माजी गटनेत्या कविता कर्डक, नगरसेविका सुषमा पगारे, समिना मेमन, डॉ, माधवी गायकवाड, सलमा शेख, पुष्पा राठोड, रजनी चौरसिया, संगिता सानप, अर्चना कोथमिरे, शकिला शेख, शाहिन शेख, प्रमिला शिरसाठ, संगिता वाघ, कल्पना सोनवणे, हिना शेख, लता जाधव, नरगिस शेख, मंगल सोनवणे, आशा साळवे, समिना शेख, नरगिस सय्यद यासह अनेक महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधीर मुनगंटीवार

$
0
0

राज्याच्या प्रगतीसाठी युती आवश्यक

सुधीर मुनगंटीवारांचा दावा; काँग्रेस आघाडीवर टीका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युती करण्यास अनुकूल आहे. गेल्या २५ वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची युती कायम असून, युतीची पुनरावृत्ती राज्याच्या प्रगतीसाठी गरजेची असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी (ता. २४) येथे केला. गेल्या १५ वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याची वाट लावल्याचा आरोपही त्यांनी केला.

विभागीय स्तरावरील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यासाठी मुनगंटीवार हे नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते. याप्रसंगी त्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-सेना युती, उत्तर प्रदेशमधील निवडणूकपूर्व सर्व्हेक्षण, प्रियंका गांधींची राजकारणातील प्रवेश, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक, राज्यावरील कर्जाचा भार आदी विषयांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. येत्या निवडणुकीत शिसेनेसोबत युतीसाठी भाजप अनुकूल असून, युतीचा फॉर्म्युला एकत्र बसून ठरविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. युतीबाबत चर्चा सुरू असली तरी अजून होकार आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्याची मुख्य अट युतीसाठी शिवसेनेकडून पुढे करण्यात आल्याचा त्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याबाबत त्यांना विचारले असता, राज्य कर्जबाजारी नसल्याचा निर्वाळा देत गेल्या सरकारच्या काळातील कर्जाचा भार २५.२ टक्क्यांवरून १६.५ टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याचा दावा त्यांनी केला.

मुनगंटीवार म्हणाले, की महामानवांची स्मारके ही समाजासाठी प्रेरणादायी असतात. त्यामुळे अशी स्मारके हा खर्चाचा विषय होऊ शकत नाही. स्मारक राष्ट्रभक्तीचे आदर्श असतात. अशा स्मारकांबाबत याचिकांद्वारे भाष्य करणाऱ्यांना इथली संस्कृती समजली नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. शिवाजी महाराजांचे स्मारक का, असे विचारणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजलेच नसल्याची टीका त्यांनी केली.

प्रियंका, काँग्रेसला वाचवू शकणार नाहीत

प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील सक्रीय प्रवेशावर बोलताना मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर सडकून टीका केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सत्ता मिळविणे अशक्य असल्याची खात्री पटल्यानेच काँग्रेसने प्रियंका गांधी यांना राजकारणात उतरविले आहे. पाच वर्षांपूर्वीही त्यांनी राजकारणात येण्याची भाषा केलीच होती. आता त्या प्रत्यक्षात राजकारणात उतरल्या आहेत. डुबणाऱ्या काँग्रेसला त्या वाचवू शकणार नाहीत. दोन आकडी संख्येवरून त्यांना तीन आकडी संख्या गाठायची आहे. मात्र, त्यात त्यांना यश मिळणार नाही. त्यांचे सारे कुटुंबच आता राजकारणात उतरले आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपसंपदेचा आकडा फुगणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र नामेदव जाधव (वय ५७) यांच्या मालमत्तांचा तपास गुरुवारी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केला असून, उत्पन्नापेक्षा २३ टक्के अधिक अपसंपदा असल्याची बाब समोर आली आहे.

याबाबत बोलताना पुणे 'एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की प्रथमदर्शनी जाधव यांच्याकडे अनेक फ्लॅट्स, बंगलो, लॉन्स, तसेच शाळा असल्याचे दिसते. यातील बहुतांश मालमत्ता नाशिकमध्ये आहेत. सध्या सर्व मालमत्तांचा शोध घेणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. सर्व मालमत्तांचा सुगावा लागल्यानंतर अपसंपदेचा आकडा आणखी वाढणार असल्याचा दावा संबंधितांनी केला. नाशिकमध्ये आतापर्यंत चार मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एक असलेल्या चांदवड येथील घरात गुरुवारी सकाळी तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, त्याचा तपशील सायंकाळी उशिरापर्यंत समोर आला नाही. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील मालमत्तांचा तपशील संकलित करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जाधव यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असून, ती किती आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक कामांची पूर्तता झाल्यानंतर ही मालमत्ता सरकारदरबारी जमा करण्याबाबत सरकारला पत्र देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विभागाने १५ जून १९८५ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जमविलेल्या संपत्तीची माहिती घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तक्रारींना फुटणार वाचा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यावर शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आता असंख्य तक्रारदार पुढे येण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेली जाधव यांची निवृत्ती आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात सुरू केलेली कारवाई यामुळेच तक्रारींना वाचा फुटणार असल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. त्यामुळे किती तक्रारदार पुढे येतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विभागाकडून त्यांच्या मालमत्तेची झाडाझडती सुरू आहे. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट कारभार केला जात असल्याचे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशा कारभाराचा निषेध शैक्षणिक वर्तुळातून केला जात असून, जाधव यांच्याविषयी विविध प्रकरणांची चर्चा शिक्षकांमध्ये रंगल्याचेही गुरुवारी दिसून आले. आता जाधव यांच्याविरोधातील तक्रारींची संख्याही वाढण्याची चिन्हे आहेत.

जाधव यांनी लोकसेवक म्हणून काम केलेल्या १९८५ ते २०१२ या कालावधीतील मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्या मिळकतीपेक्षा २३ टक्के अधिक मालमत्ता त्यांच्याकडे आढळून आली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमनानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, जाधव यांच्याविरोधात यापूर्वीही विविध प्रकरणे समोर आली असून, ते एका राजकीय पक्षातील बड्या नेत्याच्या बहिणीचे वर्गमित्र असल्याने त्यांच्या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली जाईल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसेवकांकडून अशा प्रकारे लाचेची मागणी केली जात असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारी करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी विभागाच्या १०६४ हा हेल्पलाइन या क्रमांकावर, http://acbmaharashtra.gov.in/ या वेबसाइटवर, तसेच ९९३०९९७७०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रारी केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या शिक्षकांकडे जाधव यांनी लाच मागितली असेल, त्यांना या क्रमांकांवर तक्रार करता येणार आहे.

--

कोणत्याही लोकसेवकाकडून लाचेची मागणी करण्यात आल्यास विभागाकडे तक्रार करावी. कोणत्याही प्रकरणात जाधव यांनी लाच मागितली असल्यास संबंधितांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे.

-संदीप दिवाण, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालसुधारगृहातून पळाला अन् वाहनचोरीत गुंतला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध भागांमधून दुचाकींची चोरी करणाऱ्या त्रिकुटास अटक करण्यात आली आहे. त्यात दोन विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. हत्येच्या गुन्ह्यात मुंबईतील माहिम येथील विशेष बालसुधारगृहातून पळून आलेल्या मुलाने आपले लक्ष वाहनचोरीकडे केंद्रित केल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

या संशयितांच्या ताब्यातून साडेसात लाख रुपये किमतीच्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटच्या पथकाने ही कारवाई केली. शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असल्याने सेंट्रल युनिट आपले लक्ष या गुन्ह्याच्या तपासाकडे वळविले. युनिटचे सहाय्यक निरीक्षक सचिन सावंत यांना या त्रिकुटाबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरून कचरू पाटीलबा हिंगमिरे व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर वाहनचोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या टोळक्याने शहरातील पंचवटी, गंगापूर, सरकारवाडा, म्हसरूळ, नाशिकरोड, मुंबई नाका, उपनगर आदी पोलिस ठाणे हद्दीतून, तसेच अन्य ठिकाणी बारा गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरीनंतर विक्री करण्यात आलेली ही वाहने औरंगाबाद, लासलगाव, तसेच नाशिक शहरातून हस्तगत करण्यात आली. संशयितांनी दोन दुचाकी तर नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात टाकून पोबारा केला होता. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक के. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कुमार चौधरी, सहाय्यक निरीक्षक एस. सी. सावंत, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक निरीक्षक शंकर गोसावी, हवालदार बी. आर. कर्डिले, ए. व्ही. रेवगडे, दीपक पाटील, पोलिस नाईक जी. एस. केदार, एस. पी. गामणे, एस. एस. पवार, रेखा गायकवाड, शिपाई भरत हिंडे, कानमहाले आदींच्या पथकाने केली.

--

यापूर्वीही दहा-बारा गुन्हे दाखल

या गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती देताना युनिटचे वरिष्ठ निरीक्षक के. डी. पाटील यांनी सांगितले, की या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अल्पवयीन युवक आहे. अंबड पोलिस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी झालेल्या हत्या प्रकरणात या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला माहिम (मुंबई) येथील विशेष बालगृहात पाठविण्यात आले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच तो तेथून पसार झाला होता. शहरात आल्यानंतर कचरू हिंगमिरे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी वाहनचोरीचा उद्योग सुरू केला. चोरी केलेल्या वाहनांची संशयित आरोपी कचरू ठिकठिकाणी विक्री करीत होता. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा अल्पवयीनांची बालनिरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली असून, हत्येतील त्या अल्पवयीन युवकाविरुद्ध यापूर्वी १० ते १२ गुन्हे दाखल असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरा अल्पवयीन शिक्षण घेतो. त्याच्यावर यापूर्वी किती आणि कोणते गुन्हे दाखल आहेत, याची माहिती संकलित करण्यात येते आहे. वाहनचोरीच्या गुन्ह्यातील चौकशीनंतर आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाटील यांनी वर्तविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मालक-चालकांनी संघटित होण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालक-चालक यांचे प्रश्न, आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य, रस्त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटित शक्ती उभी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय राऊत यांनी व्यक्त केले.

टुरिस्ट मालक-चालक यांच्या प्रश्नांवर विचारविनिमय करण्याच्या हेतूने पंचवटीत गुरुवारी बैठक झाली. त्यात मालक-चालक सेवा समितीची स्थापना करण्याचा निर्णय झाला.

जिल्हास्तरीय संघटन असणे गरजेचे असून, त्या माध्यमातून व्यवसायवृद्धीबरोबरच रस्त्यात होणारे अपघात अथवा अडचणीच्या वेळी सहकार्य मिळत नसल्याने चालक व मालक यांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त विजय राऊत यांनी व्यक्त केले. मालक-चालक सेवा समितीच्या स्थापनेचा ठराव प्रमोद दुसाने यांनी मांडला. त्याला उपस्थित चालक-मालकांनी एकमताने मंजुरी दिली. मालक-चालक सेवा समितीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली या संघटनेचे सल्लागार व मार्गदर्शक विजय राऊत, संस्थापक प्रमोद दुसाने, तर अध्यक्षपदी बाळासाहेब जाधव, कार्याध्यक्ष- पवन निकम, उपाध्यक्ष- रमेश सांगळे, उपाध्यक्ष- राजू नागरे, सरचिटणीस- विशाल खामकर, चिटणीस- मंगेश (बंटी) ठाकूर, चिटणीसपदी विशाल सागवेकर यांची, तर कार्यकारिणी सदस्यपदी मंगेश ननावरे, नितीन चौधरी, गजानन सोनवणे, संजय शेजवळ, मनीष लुथरा, मुकुंद परदेशी यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय राऊत यांची अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे श्रेयवाद नमा:!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्रुत्थान योजनेंतर्गत मुकणे धरणातून थेट पाइपलाइन टाकण्याचे काम जूनपर्यंत पूर्ण होणार होते. मात्र, सत्ताधारी भाजपने योजना अर्धवटच असताना त्याचे श्रेय घेण्यासाठी घाई सुरू केली आहे. लोकसभा निवडणूकांच्या आचारसंहितेपूर्वीच फेब्रुवारीत या मुकणे पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्याची तयारी भाजपने केली आहे. या योजनेच्या उद्घाटनासाठी थेट मंत्रालयातून पालिकेच्या अधिकाऱ्यांना हा सोहळा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्याने प्रशासनानेही लगीनघाई सुरू केली आहे.

काँग्रेसच्या सत्ताकाळात जवाहरलाल नेहरु पुनर्रुत्थान योजनेंतर्गत मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे नाशिक शहरात पाणी आणण्याची योजना मंजूर करण्यात आली होती. मनसेच्या सत्ताकाळात या योजनेला चालना देवून मंजूर करण्यात आली असून, त्यासाठी २६७ कोटींचा खर्च केला जाणार आहे. केंद्र, राज्य सरकारसह महापालिका यात वाटा उचलत आहेत. मुकणे धरणातून १८ किलोमीटर पाइपलाइनद्वारे रोज ४०० दशलक्ष लिटर पाणी आणले जाणार असून, त्यासाठी विल्होळीला जलशुद्दीकरण केंद्र उभारले आहे. डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार होते. परंतु, पावसाळ्यामुळे हे काम लांबणीवर पडले आहे. सध्यस्थितीत जूनपर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणार आहे. परंतु, लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने विकासकामे दाखवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या काळात मंजूर झालेल्या मुकणे पाइपलाइन योजनेची निवड करण्यात आली असून, फेब्रुवारीत याचा उदघाटन सोहळा आयोजित करण्याची घाई सुरू केली आहे.

प्रशासनाला तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नारळ फोडले जाणार आहेत. त्यामुळे भाजपची ही घाई सध्या पालिकेत चर्चेचा विषय बनली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्गो सेवेला स्पाईसजेटचे पंख!

$
0
0

Bhavesh.Brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

नाशिक : ओझर येथून प्रवासी विमानसेवेला गती येत असतानाच आता कार्गोसेवेला नवे पंख लाभणार आहेत. आघाडीची कंपनी स्पाईसजेटने नाशिकहून पूर्णवेळ कार्गो सेवा देण्याचे निश्चित केले आहे. येत्या २ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होणार असून, याद्वारे नाशिकमधील बहुविध उत्पादनांची परदेशात निर्यात होण्याचा मार्ग सुकर होणार आहेत. देशासह परदेशात आयात-निर्याती मोठी सुविधा या सेवेद्वारे उपलब्ध होणार आहे.

ओझर विमानतळावरुन सध्या नाशिक ते दिल्ली ही विमानसेवा सुरू आहे. पुढील महिन्यात अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी दोन कंपन्यांची सेवा सुरू होत आहे. सद्यस्थितीत नाशिकची विविध उत्पादने दिल्ली विमानसेवेद्वारे देशाच्या विविध भागात तसेच परदेशात जात आहेत. ही सारी लगबग सुरू असतानाच आता नाशिकच्या कार्गो सेवेलाही गती मिळणार आहे. आघाडीच्या स्पाईसजेट कंपनीची भारतात सध्या तीन कार्गो विमाने आहेत. यातील एक कार्गो विमान पूर्णवेळ कार्गो सेवा देण्यासाठी नाशिकला आणण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. यासंदर्भात कंपनीने हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) शी पत्रव्यवहारही केला आहे. या विमानाची रात्रीची पार्किंग नाशिक येथेच राहणार आहे. २३ टन क्षमता असलेले हे विमान असून, आठवड्यातील सातही दिवस ते ओझर विमानतळावरुन सेवा देणार आहे.

पहिला करार झाला

नाशिकमधील निर्यातदार सानप अॅग्रो यांच्याशी कंपनीचा पहिला करार झाला आहे. तब्बल दोन कोटी रुपये किंमतीचा हा करार असून, पहिल्या तीन दिवसांचे बुकिंग करण्यात आले आहे. नाशिक ते दुबई कृषी उत्पादनांची निर्यात तसेच परदेशातील मालाची ओझर येथून आयात होणार आहे. यापुढील काळात इतरही कंपन्यांबरोबर करार होणार आहेत.

२ फेब्रुवारीला प्रारंभ

येत्या २ फेब्रुवारीला भव्य सोहळ्यात पूर्णवेळ कार्गो सेवा प्रारंभ करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक तसेच उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्याचाही कंपनीचा मनोदय आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत ओझरहून नॉनशेड्यूल कार्गोसेवा उपलब्ध आहे. मात्र आता पूर्णवेळ तसेच विशिष्ट शेड्यूलची सेवा उपलब्ध होणार आहे.

आयात-निर्यात वाढणार

नाशिकमधील कृषी, औद्योगिक तसेच फार्मा उत्पादनांना भारतासह परदेशातील बाजारपेठेत पाठविण्याचा मार्ग या सेवेमुळे मोकळा होणार आहे. तसेच, परदेशातील अनेक उत्पादने भारतात आणण्यासाठी ओझर हे महत्त्वाचे ठरणार आहे. नााशिकमधील द्राक्ष, कांदा, डाळिंब, भाजीपाला तसेच अन्य कृषी उत्पादनांना यामुळे चालना मिळणार आहे. लासलगाव येथून आंबे मुंबईहून परदेशात जातात. आता आंब्यांचा हंगाम येणार असल्याने त्याची निर्यातही याच सेवेद्वारे होणार आहे.

ते हॉटेलात राहणार

कार्गोसेवेसाठी पायलटसह सहा ते सात जणांचा स्टाफ नाशिकलाच राहणार आहे. यासंदर्भात कंपनीकडून नाशिकच्या एका हॉटेल व्यावसायिकाशीही बोलणी सुरू आहेत. परिणामी, याद्वारे नाशिकच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे.

स्पाईसजेट कंपनीशी कार्गो सेवेबाबत आम्ही करार केला आहे. पहिल्या तीन दिवसांचे बुकिंग आम्ही घेतले आहे. ओझर येथून प्रथमच पूर्णवेळ कार्गो सेवा मिळणार असल्याने कृषी उत्पादनांच्या निर्यात आणि आयातीचे नियोजन आम्ही करीत आहोत.

- हेमंत सानप, निर्यातदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुशावर्ताला येणार झळाळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकनगर परिषदेला कुशावर्ताच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. राज्याच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांना तसे पत्र दिले आहे.

काही महिन्यांपूर्वी अर्थमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार येथे आले असता त्यांनी कुशावर्त सुशोभिकरण करू तसेच ब्राह्मगिरी डोंगरा दत्तक घेत असल्याचे जाहीर केले होते. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आणि सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. कुशावर्ताच्या सुशोभिकरणासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आणि तो शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार नगर विकास विभागाने पाच कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. यातून यामध्ये कुशावर्त तीर्थ कुंडाचे पुर्नसंचयीत काम ३ कोटी १३ लक्ष ४० हजार रुपये, कुशावर्त तिर्थाच्या बाजूस असलेल्या मंदिरांचा जिर्णोधार १ कोटी ४० हजार रुपये, कुशावर्ताच्या बाजूस असलेल्या परिसराचा विकास ३५ लाख ७० हजार रुपये, पाण्याच्या प्रवाहांची स्वच्छता यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणी शहरावर शोककळा

$
0
0

चांदवड अपघातात समदडीया कुटुंबातील तिघांचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

चांदवडजवळ झालेल्या कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वणी शहरावर शोककळा पसरली आहे.

वणी वणी येथील इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर व्यापारी महेंद्र चंपालाल समदडीया हे आपल्या कुटुंबासह धुळ्याहून वणी येथे येत असताना त्यांच्या कारला चांदवड येथील रेणुका देवी मंदिराजवळ अपघात झाला. या अपघातात महेंद्र चंपालाल समदडीया, पत्नी वंदना महेंद्र समदडीया, मुलगा हिमांशू महेंद्र समदडीया यांचा मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा हार्दिक समदडीया गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.

या अपघातात तिघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची बातमी वणीत कळताच शहराततील त्यांचे मित्र व नातेवाइक चांदवडकडे रवाना झाले. महेंद्र समदडीया यांचे वडील चंपालाल समदडीया यांनी वणी शहरात तीस वर्षांपूर्वी इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचरचा व्यावसायाची सुरू केला. त्यांच्या व्यवसाय आता महेंद्र हेच सर्व बघत होते. महेंद्र यांना चार अपत्य असून त्यात दोन मुली, दोन मुले आहेत. यातील मोठी मुलगी सीएचा, तर लहानी मुलगी दंतरोगतज्ज्ञचा अभ्यासक्रम करीत आहे. एक मुलगा बारावीत आहे. हे कुटुंब भाचीच्या लग्नासाठी धुळे येथे आठवडाभरापासून गेले होते. गुरुवारी ते सकाळी वणीकडे यायाला निघाले होते. महेंद्र समदडीया हे सप्तशृंगी पतसंस्थेचे संचालक तसेच किसनलालजी बोरा स्कूलचे संचालक होते. तसेच जैन स्थानकवासी मंडळाचे खजिनदारही होते. सायंकाळी शोकाकुल वातावरणात वणी येथील स्मशानभूमीत तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंगणातील औषधाने बालकाचा बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगणात खेळता खेळता हाती लागलेले विषारी औषध प्राशन केल्याने दहा वर्षांच्या बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. निफाड तालुक्यातील करंजगाव येथे ही घटना घडली.

आकाश संतोष मोरे (रा. मूळ चाटोरी, हल्ली करंजगाव, ता. निफाड) असे या बालकाचे नाव आहे. शेतीकाम करणारे संतोष मोरे रोजगारासाठी चाटोरी सोडून करंजगाव येथील शिवाजी वामन जाधव यांच्या मळ्यात राहण्यासाठी आले होते. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास संतोष मोरे शेतात पाणी भरण्याचे काम करीत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा आकाश अंगणात खेळत होता. खेळता खेळता कोणते तरी विषारी औषध त्याच्या हाती लागले. हे विषारी औषध आकाशने प्राशन केले. त्यानंतर त्याला त्रास सुरू झाला. त्याला लागलीच निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथून त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी तीन वाजता आकाशचा मृत्यू झाला. या प्रकरणी निफाड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड-नाशिक लोकललाही प्रशासनाची अनुकूलता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-नाशिक दरम्यान मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) पद्धतीची लोकल सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दर्शवली असल्याचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नितीन पांडे यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या सध्या दोन लाइन असून, तिसरी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जानेवारी २०२० मध्ये मनमाड-नाशिक लोकल सुरू करणे मध्य रेल्वेला शक्य असल्याचा सूर मुंबईतील बैठकीत उमटल्याचे पांडे म्हणाले.

मध्य रेल्वेच्या मुंबई क्षेत्रीय समितीची बैठक नुकतीच मुंबईत आयोजित करण्यात आली. या बैठकीत भाजप नाशिक जिल्हा उपाध्यक्ष व मध्य रेल्वे क्षेत्रीय समिती सदस्य नितीन पांडे यांनी मनमाड-नाशिक मार्गावर रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा सुरू करावी, तसेच हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसला मनमाड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, या मागण्या केल्या. मनमाड शहरातून विद्यार्थी, व्यापारी, व्यावसायिक, सरकारी कर्मचारी, शेतकरी, कामगार, कारागीर यांच्यासह हजारो सामान्य प्रवासी मनमाड ते नाशिक असा प्रवास करतात. याबरोबरच दैनंदिन प्रवाशांची संख्या वाढत असून, मनमाड शहरात नव्याने येऊ घातलेल्या मनमाड-इंदूर मार्गामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. म्हणून रेल्वे प्रशासनाने मनमाड-नाशिक लोकल सुरू करावी अशी मागणी त्यांनी मांडली. लोकल सुरू केल्यास रेल्वे प्रशासनाला कसा आर्थिक फायदा होईल, याची आकडेवारी त्यांनी सादर केली.

सन २००५ पासून सातत्याने ही मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली असल्याचे व सन २००९, २०१२, २०१४ मध्ये झालेल्या भुसावळ रेल्वे मंडळ सल्लागार समितीच्या बैठकीतदेखील मागणीचा पाठपुरावा केल्याचे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पांडे यांच्या या मागणीला मध्य रेल्वेचे मुंबई क्षेत्राचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भुसावळ-इगतपुरी या सेक्शनमध्ये तिसरी रेल्वे लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर त्वरित मनमाड-नाशिक रेल्वे मार्गावर मेमू पद्धतीची दिवसातून ७ ते ८ वेळा फेऱ्या मारणारी लोकलसेवा सुरू करण्यात येईल, असे शर्मा यांनी बैठकीत सांगितले. गीतांजलीच्या थांब्याचा मुद्दा रेल्वे बोर्डाच्या अधीन असल्याचे ते म्हणाले. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानकावर महिला बचत गटांना प्राधान्याने रेल्वे खाद्य पदार्थांचे स्टॉल देण्यात यावे, तसेच प्रवासी गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून रोजच्या प्रवाशांची सुरक्षा वाढवावी अशाही मागण्यात पांडे यांनी केल्या. बैठकीत तीन राज्यांतील ५५ सदस्य उपस्थित होते. पांडे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी महेश श्रीश्रीमाळ, रेल परिषद मुंबईचे प्रमुख सुभाष गुप्ता, नितीन परमार, मीनाक्षी पाटील, सिद्धेश्‍वर शिंदे आदी सदस्यांनी मुख्य चर्चेत सहभाग नोंदवला.

मनमाड नाशिक लोकलच्या मागणीसाठी रेल्वे प्रशासन सकारात्मक असून मेमू प्रकारची सर्वसाधारण रेल्वे डब्यांची लोकल सुरू करणे शक्य होऊ शकते, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा होरा आहे.

- नितीन पांडे, सदस्य, मुंबई रेल्वे क्षेत्रीय समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामचंद्र जाधवांवरएसीबीचा फास घट्ट

$
0
0

मालमत्तांचा शोध; २३ टक्क्यांहून अधिक अपसंपदा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र नामेदव जाधव (वय ५७) यांच्यावर पुणे अँटिकरप्शन ब्यूरोने (एसीबी) कारवाईचा फास आणखी आवळला असून, तपासात जाधव यांच्याकडे उत्पन्नापेक्षा २३ टक्के अधिक अपसंपदा असल्याची बाब तपासात समोर आली आहे. हा आकडा प्रत्यक्ष तपासानंतर आणखी वाढण्याची शक्यताही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जाधव यांच्या बहुतांश मालमत्ता नाशिकमध्येच असून, त्यापैकी चांदवड येथील घराची तपासणी गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आली.

शिक्षण उपसंचालकपदावर कार्यरत असलेले जाधव यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पुणे एसीबीने या तक्रारीची चौकशी केली. त्यात ज्ञात स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ४६ लाख ८२ हजार इतकी अधिक अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे निष्पन्न झाले. या मालमत्तेबाबत जाधव यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे एसीबीने पुण्यातील चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये जाधव यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी चौकशी सुरू असून, मालमत्तांचा तपशील संकलित करण्यात येत आहे. बँक खाती, त्यानुसार आवश्यक कागदपत्रे हाती आल्यानंतर एकूण अपसंपदेचा आकडा निश्चित होईल. आजमितीस त्यांच्याकडे २३ टक्के अपसंपदा असल्याचे दिसते. त्यात वाढ होऊ शकते.

- संदीप दिवाण, पोलिस अधीक्षक, पुणे एसीबी

जाधव नॉट रिचेबल...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दोन नवीन उड्डाणपूल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हनुमानवाडी आणि मखमलाबाद परिसराला शहराशी जोडण्यासाठी गोदावरीवर दोन नवीन उड्डाणपूल बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात येणार आहेत. अशोक स्तंभ ते हनुमानवाडी आणि जेहान सर्कल ते मखमलाबाद क्षेत्र येथे ते प्रस्तावित असून, तसे झाल्यास गंगापूर रोडसह अशोक स्तंभावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

शहराअंतर्गत वाहतूक व दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषत: गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूंना जोडण्यासाठी उड्डाणपुलांवर जोर देण्यात येत आहे. गोदावरीवर सध्या असलेले उड्डाणपूल हे वाढत्या लोकसंख्येमुळे कमी पडत आहेत. त्यातच आता स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात ७५४ एकरावर नव्याने स्मार्ट परियोजना साकारण्यात येणार आहे. त्यामुळे पंचवटी आणि मखमलाबाद परिसरात जाण्यासाठी सध्या चोपडा लॉन्स आणि हनुमानवाडी या दोन पुलांवरच ताण आहे. त्यामुळे वाहतुकीचीही कोंडी होते. अशोक स्तंभ परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून गंगापूर रोडवरील पशुसंवर्धन कार्यालय ते हनुमानवाडी असा, तर जेहान सर्कल ते मखमलाबाद क्षेत्राला जोडण्यासाठी दुसरा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. दोन्हींसाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये निधीची तरतूद करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ३० कोटींची रक्कम ठेवण्यात येणार असून, सविस्तर डीपीआरनंतर त्यात गरजेनुसार वाढ करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलांचा समावेश येत्या बजेटमध्ये करण्यासाठी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रशासनाला पत्र दिल्यानंतर प्रशासनही कामाला लागले आहे.

द्वारका अंडरपास वाहनांना खुला करा

द्वारका सर्कलवरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने अंडरपासमधून चारचाकी व दुचाकी वाहने जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी एनएचएआयकडे केली आहे. सध्याच्या अंडरपासचा कोणताही वापर होत नाही. अंडरपासची उंची जास्त असल्याने त्यातून पायी चालणाऱ्यांसह दुचाकी आणि लहान चारचाकी, रिक्षांची वाहतूक सहज होऊ शकते. या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने प्रवेशद्वार मोठे करून दिल्यास वाहनांची ये-जा शक्य आहे. त्यामुळे हे अंडरपास वाहनांसाठी खुले करावेत, असे पत्र पालिकेने लिहिले आहे. परंतु, या ठिकाणी आणखी एक उड्डाणपूल प्रस्तावित असल्याचे सांगत, तूर्त महामार्ग प्राधिकरणाने पालिकेला वेटिंगवर ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’ आराखड्यात त्रुटींचे हलाहल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने राज्यसरकारकडे अमृत योजनेअंतर्गत पाठवलेल्या ३५४ कोटींच्या आराखड्यात तांत्रिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यासंदर्भातील माहिती पालिकेकडे मागितली असून, ती येत्या सोमवारी नव्याने सादर केली जाणार आहे. ३५४ कोटींचा हा आराखडा तांत्रिक त्रुटींमुळे ४१० कोटींवर पोहचला आहे.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक घेत, शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी तीनशे कोटींचा निधी अमृत योजनेतून देण्याची तयारी केली होती. त्यानुसार महापालिकेने पाणी पुरवठा योजनेसाठी ३५४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून सरकारला सादर केला. त्यात नवीन वसाहतींमध्ये पाइपलाइन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्रांची दुरुस्ती, जलकुंभ दुरुस्त करणे, जुन्या जलवाहिन्या बदलून नव्या टाकणे, मुख्य वितरण वाहिन्यांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश होता. सरकारला अहवाल सादर झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ३२ तांत्रिक बाबींवर बोट ठेवत महापालिकेकडून माहिती मागवली आहे. त्यामध्ये महापालिकेच्या वतीने पाणी पुरवठा आराखडा तयार करताना लोकसंख्येचा उल्लेख नसल्याने सन २०११ नुसार किती लोकसंख्या आहे, दहा वर्षांत किती वाढली, पाणी योजनेच्या जागा ताब्यात आहेत का, गळती थांबवण्यासाठीच्या काय उपाययोजना आहेत, सद्य:स्थितीतील जलशुद्धीकरण केंद्रांच्या स्थितीचे फोटो, औद्योगिक व व्यावसायिक कारणासाठी लागणाऱ्या पाण्याची आकडेमोड असे तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडून नव्याने माहिती मागविल्यानंतर त्यात नवीन नियमांनुसार जिल्हा दर सूचीनुसार आकडेमोड करण्यात आल्याने हा आराखडा ३५४ कोटींवरून थेट ४१० कोटींपर्यंत पोहचला आहे. या तांत्रिक त्रुटींची पूर्तता आता सोमवारी केली जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीस आणखी उशीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images