Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तज्ज्ञ संचालकपदी मुनोत, मंडलिक

$
0
0

'नामको'च्या जनसंपर्क संचालकपदी जैन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर संचालक मंडळाने तज्ज्ञ संचालकपदी अरुण मुनोत, संजय मंडलिक यांची नियुक्ती केली आहे. तर बँकेच्या जनसंपर्क संचालकपदी अनुभवी व ज्येष्ठ संचालक कांतीलाल जैन यांची निवड केली आहे.

तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती झालेले अरुण मुनोत यांनी या आधी नामको ट्रस्ट दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच नामको बँकेवर उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तर दुसरे तज्ज्ञ संचालक संजय मंडलिक अहिर सुवर्णकार समाजाचे नेते व उद्योजक आहेत. सामाजिक संस्थामध्ये त्यांचा सहभाग असतो. जनसंपर्क संचालक झालेले कांतीलाल जैन हे बँकेचे ज्येष्ठ संचालक असून ते पाच वेळा बँकेवर निवडून आले आहे. यापूर्वी, नामको बँकेचे चेअरमनपदही त्यांनी भूषविले आहे. अनेक संस्थांवर त्यांनी विविध पदावर काम केले आहे. या निवडीनंतर चेअरमन सोहनलाल भंडारी, व्हाईस चेअरमन नरेंद्र पवार यांच्यासह संचालक मंडळाने नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थंडीत सांभाळा बालकांचे आरोग्य

$
0
0

नाशिक : शहरातील वातावरणात तीन-चार दिवसांपासून गारवा वाढत असून, त्याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. बालकांना साथीच्या रोगांची लागण होत आहे. गारठा वाढल्याने बालरुग्णांची संख्याही वाढत असून, पालकांनी बालकांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

शहरात थंडीचा पारा घसरत असल्याने बालकांना सर्दी, खोकल्याचे आजार होत आहेत. त्यासोबत बालरुग्णांमध्ये विंटर डायरियाचे प्रमाण वाढल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे, सहा महिन्याच्या खालील बाळास पूर्णत: उबदार कपडे परिधान करावे. बाळाच्या अंघोळीनंतर तेलाने मालीश करावी. सर्दी, खोकला आणि ताप जाणवल्यास लागलीच वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. थंडीचा जोर वाढल्याने बालकांना सर्दी, खोकला व ताप होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच सध्या अतिसार, उलट्या आणि त्वचेच्या आजारांमध्ये वाढ होत आहे.

बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास मेंदूत ताप जाण्याची शक्यता असते. तसेच न्युमोनिआ देखील होऊ शकतो. त्यामुळे बालकांना साखरेचे पाणी, कोमट पाणी पाजावे, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद भारडिया यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकपेक्षाही मालेगाव ‘कूल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकपेक्षा नेहमीच हॉट असणारे मालेगाव मंगळवारी मात्र कोल्ड झाल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली. नाशिकमध्ये ७ तर मालेगावात ६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. निफाड मात्र राज्यात सर्वात थंड ठिकाण ठरले असून येथील तापमान पुन्हा चार अंशावर घसरले आहे. वातावरणातील गारठा सातत्याने कमी अधिक होत असून यामुळे आरोग्याच्या तक्रारीही डोके वर काढू लागल्या आहेत.

काही दिवसांपासून थंडीने शहरासह जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत गायब झालेली थंडी परतली असून हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा अनुभव पुन्हा एकदा जिल्हावासीय घेत आहेत. विशेष म्हणजे दिवसभर हवेचा जोर कायम असून थंड हवा आरोग्याच्या तक्रारी वाढविणारी ठरते आहे. त्यामुळे दिवसभर उबदार कपडे परिधान करण्यास नागरिकांकडून पसंती दिली जात आहे.

नाशिकमध्ये मंगळवारी किमान तापमान ७.० अंश सेल्सियस तर कमाल तापमान २५ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. मालेगावात ६.८ अंश सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात बुधवारपर्यंत निचांकी तापमान कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे १० आणि २६ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे थंडी परतीच्या प्रवासाला लागण्याचे संकेत हवामान विभागाकडून दिले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राम, आडगावला बसडेपो

$
0
0

बससेवेसाठी पायाभूत सुविधांसाठी महापालिकेची तयारी; कंपनी गठण प्रक्रियेस वेग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या माध्यमातून सिटीबस सेवा चालविण्याच्या तयारीला आता वेग आला असून पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. बससेवेसाठी निविदा काढल्यानंतर आता प्रशासनाने दोन ठिकाणी बसडेपो उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. आडगाव येथील ट्रक टर्मिनसच्या जागेत तब्बल १७ कोटी ६४ लाख रुपये तर तपोवनातील साधुग्रामलगतच्या जागेत ३३ कोटी ६२ लाख रुपये खर्चातून बसडेपो उभारले जाणार आहेत. त्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत ठेवला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून चालवली जाणारी बससेवा महापालिकेमार्फत चालविण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्र्यानी सुचवेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. महासभेचा 'ग्रॉस कॉस्ट कटिंग'बाबतचा बससेवाचा ठराव प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने त्याची कार्यवाही सुरू केली आहे.

बससेवेच्या संचलनासाठी महापालिकेने निविदा जारी केल्या आहेत. बससेवेकरीता कंपनी गठणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बससेवेसाठी डेपो, टर्मिनल, शेल्टर्स आदी पायाभूत सुविधांची निर्मिती महापालिकेलाच करावी लागणार आहे. महापालिका चार ठिकाणी बसडेपो उभारणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीचे बसडेपो भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकने महामंडळाकडे पाठविला आहे. त्यानुसार सीबीएस येथील मध्यवर्ती बसस्थानक, सातपूर तसेच नाशिकरोड विभागातील आनंदनगर येथील डेपो क्रमांक ३ ची जागा महापालिकेला भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याची महामंडळाने तयारी दर्शविली आहे. आनंदनगरच्या डेपो क्रमांक ३ चे सुशोभिकरण स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून केले जाणार आहे. मात्र, आडगाव टर्मिनस लगत तसेच औरंगाबाद नाका परिसरातील साधुग्रामलगतच्या जागेत महापालिकेला स्वखर्चातून बसडेपोची निर्मिती करावी लागणार आहे.

५१ कोटींचा खर्च

साधुग्रामलगत २८२१ चौरस मीटर जागेत बसडेपोची उभारणी केली जाणार आहे. याठिकाणी तब्बल ५७५ चौरस मीटर क्षेत्रात बसडेपोची इमारत तसेच उर्वरित जागेवर रिपेरिंग ॲण्ड मेन्टनन्स शेड, विद्युतविषयक कामे, अग्निरोधक यंत्रणा, उद्यान आदी कामे केली जाणार आहेत. यासाठी ३३.६४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आडगाव ट्रक टर्मिनसलगत २०२४५ चौरस मीटर क्षेत्र बसडेपोसाठी उपलब्ध झाली आहे. यातही ५७५ चौरस मीटर क्षेत्रात बसडेपोची प्रशासकीय इमारत तसेच उर्वरित जागेवर रिपेरिंग ॲण्ड मेन्टनन्स शेड, विद्युतविषयक कामे, अग्निरोधक यंत्रणा, उद्यानविषयक कामे केली जाणार असून यासाठी १७.६२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या दोन बसडेपोंसाठी ५१ कोटी २६ लाखांचा खर्च येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नैसर्गिक संपत्तीचा नवतंत्रज्ञानामुळे ऱ्हास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञानात होणारे बदल स्वीकारत उद्योगधंद्यांचे स्वरुप बदलू लागले आहे. पण, त्यामुळे नैसर्गिक संसाधनांना ठेच पोहोचू लागली आहे. देशात अनेक ठिकाणी वृक्षतोड होत असून, रासायनिक खतांचा वापर शेती व्यवसायात अधिक होताना दिसतो आहे. त्यामुळे मानवी स्वास्थ बिघडत असून, विज्ञानामुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास काही अंशी होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी केले.

'मविप्र'च्या केटीएचएम कॉलेजच्या पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागातर्फे डॉ. वसंतराव पवार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे सभापती माणिक बोरस्ते, संचालक नाना महाले, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, सेवक संचालक प्रा. नानासाहेब दाते, गुलाब भामरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एन. एस. पाटील, प्रा. एस. के. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एम. बी. मत्सागर, डॉ. जे. एस. आहेर, डॉ. बी. डी. पाटील, प्रा. डी. आर. पताडे, डॉ. बी. जे. भंडारे होते. व्याख्यानमालेचे यंदा १० वे वर्ष आहे.

उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, की मानवाच्या गरजा दिवसेंदिवस वाढत असून, त्याला मर्यादा घालणे आता कठीण होऊ लागले आहे. विज्ञानाच्या जोरावर मानवाने अतिशय उत्तुंग प्रगती केली असली, तरी त्याचा बोजा मात्र पर्यावरणावर आल्याचे स्पष्ट जाणवते. एकीकडे पर्यावरण रक्षणाचे नारे लगावले जात असले, तरी त्यासाठी ठोस उपाय योजल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येत्या काही काळात विज्ञानाच्या मार्गावर चाललेला मानव नैसर्गिक संपत्तीला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात २

$
0
0

'आतला आवाज'चे

आज प्रकाशन

नाशिक : प्रसिद्ध साहित्यिक विवेक उगलमुगले यांनी महात्मा गांधी यांच्यावर लिहिलेल्या कवितांचा समावेश असलेल्या आणि पुण्याच्या वैशाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'आतला आवाज' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गांधीजींच्या स्मृतिदिनी म्हणजेच बुधवार (दि. ३०) नाशिकच्या महामार्ग बसस्टॉपवर जवळील कालिका मंदिर सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांच्या हस्ते होणाऱ्या या प्रकाशन समारंभास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक व अधीक्षक अभियंता इंजिनीअर राजेश मोरे, माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, कालिका देवी संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील, कवी रवींद्र मालुंजकर, प्रकाशक विलास पोतदार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात १

$
0
0

मिश्र यांचे आज व्याख्यान

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे बुधवारी, ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता कुसुमाग्रज स्मारकात महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अंबरीश मिश्र यांचे व्याख्यान होणार आहे. 'महात्म्याचे मोठेपण' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना अध्यक्षीय नामफलकाचे अनावरण

$
0
0

सावाना अध्यक्षीय

नामफलकाचे अनावरण

नाशिक : सार्वजनिक वाचनालय,नाशिक या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या महनीय व्यक्तींच्या नामफलकाचे अनावरण डॉ. यशपाल विकास गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. उपलब्ध कागदपत्रांनुसार १९२१ पासून आजवर २९ मान्यवरांनी सावानाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे नाव आणि कार्य याचा नामफलक विद्यमान कार्यकारिणीने बनवला असून त्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे, मकरंद दातार, रामभाऊ जानोरकर, चिन्मय वझे, डॉ. विकास गोगटे, विवेक गोगटे, राजेंद्र झेंडे यांचा यावेळी सावाना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुष्ठरोग पीडितांवर भीक मागण्याची वेळ

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : काळाच्या ओघात कुष्ठरुग्णांना समाजाने स्वीकारले असले तरी त्यांची स्थिती दयनीय असल्याचे वास्तव आहे. शहराचे पालकत्व सांभाळणाऱ्या महापालिकेनेही त्यांची उपेक्षाच केली आहे. महापालिकेकडून मिळणारे अनुदानच बंद झाल्याने शहरातील तब्बल ३३८ कुष्ठरोग पीडितांवर चक्क भीक मागण्याची वेळ आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार जगात अडीच लाखांवर कुष्ठरुग्णांची संख्या आहे. त्यातील एक लाख कुष्ठरोगी भारतात आहेत. त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करून प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम तयार करण्यात आला. त्या माध्यमातून सध्या काम सुरू आहे. कुष्ठरोग झालेल्यांना कोणी कामावर घेत नाही व घरातील मंडळीही त्यांच्याशी संपर्क ठेवत नसल्याने कुष्ठरोग पीडितांनी प्रत्येक शहरात स्वतंत्र वस्ती तयार केली आहे. संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारच्या ४७ वस्त्या आहेत. नाशिक शहरातील पंचवटीत वाल्मीकनगर हा भागदेखील त्यापैकीच एक. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून कुष्ठरोगी वास्तव्यास आहेत. कुष्ठरोग झालेल्यांना कोणी काम देत नसल्याने त्यांचा जगण्याचा प्रश्न सुटावा यासाठी महापालिकेने त्यांना अनुदान द्यावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कल्याण महापालिकेने अडीच हजार, पनवेल महापालिकेने अडीच हजार, पुणे महापालिकेने एक हजार असे अनुदान देणे सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनेदेखील अनुदान सुरू केले होते. मात्र, पाच महिन्यांचे अनुदान दिल्यानंतर अचानक ते बंद करण्यात आले. महापालिकेकडून मिळणारे अनुदान आणि संजय गांधी निराधार योजनेतून येणारे अनुदान यावर बहुतांश लोकांची गुजराण सुरू होती. मात्र, महापालिकेने अनुदान बंद केल्याने यातील अनेकांना जगणे मुश्किल झाले. कुष्ठपीडित सहाय्यक संस्थेच्या वतीने या कुष्ठरोग्यांवर उपचार केले जातात. रोज या ठिकाणी ४० ते ५० रुग्णांवर उपचार करण्यात येतात.

…..

मी एकटी आहे. महापालिकेकडून १ हजार ५०० रुपये मिळत होते. संजय गांधी निराधार योजनेचेही पैसे मिळत होते. त्यातून दोनवेळचा जेवणाचा खर्च भागायचा. आता पैसे मिळत नसल्याने भीक मागून जगते.

- कुष्ठरुग्ण महिला

कुष्ठरोग झालेल्यांना जिल्हा रुग्णालयाच्यावतीने औषधोपचार केले जातात. नाशिक शहरात ३३८ रुग्ण आहेत व ११४ रुग्ण पूर्ण बरे होणारे आहेत. त्यांच्यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार उपचार केले जातात. त्यांचे सर्वेक्षणदेखील करीत आहोत.

- वसंत चव्हाण, कुष्ठसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधींचा संग्रह ई-टपालद्वारे!

$
0
0

भारतीय पोस्ट विभागाकडून तिकिटांची ऑनलाईन विक्री

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय टपाल विभागाने महात्मा गांधी यांच्या कार्यावर आधारित अनेक टपाल तिकिटांचे प्रकाशन केले असून, महात्मा गांधींचे विचार सर्वदूर पोचविण्यासाठी हे तिकीट ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भारतीयांसह परदेशातील नागरिकांना देखील हे ई-तिकीट खरेदी करता येतात. महात्मा गांधी यांच्यावर आधारित टपाल तिकिटांचा संग्रह करायचा आहे, त्यांनी ई-पोस्ट सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.

१९४८ पासून २०१८ पर्यंत महात्मा गांधी यांच्या कार्यावर आधारित अनेक टपाल तिकिटे प्रकाशित करण्यात आलेली आहे. खास बाब म्हणजे, महात्मा गांधीजींच्या कार्यावर आधारित टपाल तिकिटे संग्रहित करणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे टपाल विभागाने ई-तिकीट सुविधा कार्यान्वित केली आहे. टपाल विभागाच्या https://www.epostoffice.gov.in/ या वेबसाइटवरून संग्रहकांना टपाल तिकिटे खरेदी करणे शक्य झाले आहे. महात्मा गांधीजींनी दिलेल्या शांततेच्या संदेशावर आधारित २००९ मध्ये टपाल तिकीट प्रकाशित केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये टपाल तिकीट संग्राहक दिनानिमित्ताने गांधींचा फोटो असलेले तिकीट प्रकाशित झाले. २०१७ मध्ये १९४२ चे भारत छोडो आंदोलनावर आधारित तर २०१८ मध्ये गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ५ रुपये, १२ रुपये, २० रुपये, २२ रुपये, २५ रुपये आणि ४१ रुपयांचे तिकीट प्रकाशित केले गेले. गेल्या १० वर्षांत गांधींच्या प्रकाशित झालेल्या या तिकिटांसह त्यापूर्वीचीही तिकिटे संग्रहकांना मागविता येतात.

संग्राहकांसाठी विशेष सुविधा

संग्राहकांनी ई-टपाल सेवेच्या वेबसाइटवर खाते तयार केल्यानंतर उपलब्ध तिकिटांची यादी दिसते. त्यानुसार प्रत्येक संग्राहक अधिकाधिक ५ तिकिटे खरेदी करू शकतो. तसेच संग्रहकांना तिकिटासह गांधींच्या कार्यावर आधारित स्पेशल पोस्ट कव्हर, दिनदर्शिका देखील ई-टपालद्वारे खरेदी करता येतील. अनेक संग्राहक या सुविधेचा लाभ घेत असून, संग्राहकांची संख्या वाढविण्यासाठी ही सुविधा कार्यान्वित केल्याचे टपाल विभागाने सांगितले आहे.

महात्मा गांधींवर आधारित प्रत्येक टपाल तिकीट, पोस्ट कव्हरमागे इतिहासाची जोड आहे. हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी टपाल तिकिटे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे संग्रहकांचीही संख्या वाढत आहे. गांधींवर आधारित टपाल तिकिटांची खरेदी कायमच अधिक होते.

- पंकज कुळकर्णी, मुख्य पोस्ट मास्तर, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यतिथी ऐवजी जयंती!

$
0
0

\Bखादी ग्रामोद्योग मंडळाचा धक्कादायक 'पराक्रम'

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ७१ वी पुण्यतिथी बुधवारी (दि. ३०) असताना राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रदर्शनात मात्र चक्क जयंती साजरी करण्यात आली. गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचा खुलासा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रदर्शनातील विविध बॅनर्सवर जयंतीचाच उल्लेख असल्याने मंडळाचा सावळागोंधळ यानिमित्ताने सर्वांसमोर आला.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ईदगाह मैदानावर मंगळवारी (दि. २९) दुपारी १२ वाजता या प्रदर्शनाचे मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. नीलिमा केरकट्टा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र, यावेळी प्रास्ताविक करताना 'महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे', असे सांगण्यात आले. त्यामुळे उपस्थितांमध्ये 'पुण्यतिथी की जयंती', अशी चर्चा रंगली. त्यानंतर मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केरकट्टा यांनी संवाद साधताना यासंदर्भात खुलासा केला. 'महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त मंडळातर्फे २०२१ पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यातील जिल्हास्तरीय प्रदर्शन हा एक भाग आहे', असे डॉ. केरकट्टा यांनी सांगितले. विशेष म्हणजे प्रास्ताविकात झालेला 'महात्मा गांधी जयंतीनिमित्त' असा उल्लेख प्रदर्शनाच्या कार्यक्रम पत्रिकेसह पोस्टरवरही करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांची बुधवारी, ३० जानेवारी रोजी पुण्यतिथी असल्याने मंडळाने तसा उल्लेख करणे अपेक्षित होते. अथवा महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त, असा स्पष्ट उल्लेख करणे अपेक्षित होते, अशी चर्चा प्रदर्शनात दिवसभर सुरू होती. याचनिमित्ताने मंडळाच्या कारभारही चर्चेत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंड्यांची ‘मुस्कट’दाबी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'घेता नाम विठोबाचे। पर्वत जळती पापांचे।। ऐसा नामाचा महिमा। वेद शिणला झाली सीमा।।' संत सेना महाराजांनी वर्णन केलेला असा नामाचा महिमा. दिंड्यांतून अखंड चालणाऱ्या नामघोषाने अवघे शहर भक्तिरसात न्हाऊन निघते. मात्र, मंगळवारी गंगापूर रोडने जाणाऱ्या काही दिंड्यांना पोलिस आयुक्तालयासमोरून जयघोष बंद करण्याच्या सूचना केल्याने वारकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आपल्या सहिष्णुतेने अखंड महाराष्ट्रात ओळखले जाणारे वारकरी 'भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी' या उक्तीने सर्वत्र परिचित आहेत. वारकऱ्यांच्या सहिष्णुतेचा कुणी अंत पाहिला तर ते रौद्ररूपही धारण करू शकतात, याचा प्रत्यय मंगळवारी आला. मालेगाव तालुक्यातील रावळगावहून जाणारी सोनवणे महाराजांची दिंडी गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालय कार्यालयाजवळून जात असताना पोलिसांनी त्यांना अटकाव करीत भोंगा बंद करण्याची सूचना केली. यावर बाचाबाची होऊन 'भोंगा बंद करणार नाही, काय होईल ते होऊन जाऊ द्या' असा पवित्रा वारकऱ्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण झाले होते.

याआधीही सात ते आठ दिंड्यांना पोलिसांनी भोंगा बंद करण्याची सूचना केली होती. याबाबत अधिक माहिती घेतली असता येथे केटीएचएम कॉलेज, तसेच शाळा असल्याने भोंगा बंद करण्याची सूचना करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परंतु, सिव्हिलसमोरून जात असताना भोंगा बंद केला जात नाही, तर कॉलेजसमोरून अथवा आयुक्तांच्या कार्यालयावरून जात असताना भोंगा बंद करण्याचे कारण काय, असा सवाल वारकऱ्यांनी उपस्थित केला. येथेच आंदोलन करू अशी भूमिकाही वारकऱ्यांनी घेतली. परंतु, पोलिस अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्याने तणावाचे वातावरण निवळले आणि दिंड्यांनी त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान ठेवले.

पोलिस आयुक्तालय कार्यालयाजवळून जात असताना आमच्या दिंडीचा कर्णा (भोंगा) बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या. वारकरी सांप्रदाय हा निरपेक्ष वृत्तीने काम करत असताना नेहमीच त्यांच्याविरोधात काहीतरी अतिरेक करण्यात येतो. आम्ही याविरोधात आंदोलन करू.

-ह.भ.प. वासुदेव महाराज सोनवणे, रावळगाव दिंडीचे प्रमुख

जय बाबाजी भक्त परिवार दिंडीचे आगमन

आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र वेरूळहून निघालेल्या या दिंडीचे मंगळवारी शहरात आगमन झाले. निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधिश्वर शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीक्षेत्र वेरूळ ते त्र्यंबकेश्वर वार्षिक दिंडी सोहळा याही वर्षी गावोगावी सत्संग, प्रवचन-भजन, नामजप आदी करीत शहरात आला. जनार्दन स्वामींच्या पादुका असलेल्या चांदीच्या रथासह यावर्षीचा दिंडी सोहळा सुरू आहे. सकाळी सिन्नर फाटा येथे आगमन होऊन नाशिक रोड, जेलरोड, नांदूरनाका, जत्रा हॉटेल, विडी कामगार नगर, आडगाव नाका, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, ठक्कर बाजार, पवन नगर, सिडको येथे सायंकाळचा सत्संग होऊन त्र्यंबकेश्वरसाठी दिंडी मार्गस्थ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडू संताचे मारग...

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

झाडू संतांचे मारग। आडराने भरले जग। उच्छिष्टाचा भाग। शेष उरले ते सेवू॥ संतांचे मार्ग झाडण्याचे भाग्य ज्यांना लाभते ते भक्त विरळाच असतात, असे कौतुक संत तुकाराम महाराजांचा गाथेमधला हा अभंग करतो. अगदी याबरहुकूम वागणारी एक दिंडी नकाणे (ता. धुळे) येथून त्र्यंबकेश्वरी निघाली असून, स्वच्छतेचा संदेश देणारे फलक, जेथे नाश्ता किंवा जेवणासाठी थांबतील तेथे लगेचच स्वच्छता करून अगदी झाडलोट करणारे तरुण या दिंडीत आहेत. रोज १९ किलोमीटरचा रस्ता पादाक्रांत करणाऱ्या या दिंडीचे आणखी एक विशेष म्हणजे सोबतच्या सर्व दिंड्यांना गोळ्या-औषधे (आरोग्यसेवा) पुरविण्याचे काम यातील तरुण करीत आहेत.

धुळे तालुक्यातील नकाणे येथील या दिंडीत तरुणाईचा अधिक भरणा आहे. या दिंडीचा मुक्काम ज्या ठिकाणी असतो तेथे आधी ते सर्व परिसर झाडून स्वच्छ करतात. कचऱ्याची विल्हेवाट लावतात आणि मग प्रवचन अथवा कीर्तनाला उभे राहतात. या दिंडीचे नेतृत्त्व युवराज महाराज पाटील यांच्याकडे असून त्यांचे शिक्षण एमएपर्यंत झालेले आहे. देशसेवा करण्यासाठी हा वेगळा मार्ग निवडला असल्याचे ते सांगतात. जवळपास ७० तरुण या दिंडीत आहेत. प्रथमोपचाराची एक बॅग, सर्दी, खोकला, अॅसिडिटी, अंगात कणकण, डायबिटिज, ब्लडप्रेशर अशा विविध विकारांच्या गोळ्या या दिंडीत पुरवल्या जातात. विशेष म्हणजे दुसऱ्या दिंड्यांची चौकशी करून त्यांना तेथे जाऊन ही सेवा पुरवली जाते. त्याचा मोबदला घेतला जात नाही.

दिंडी ही समतेचा संदेश देण्यासाठी असते. आमची दिंडी समतेबरोबरच स्वच्छतेचा आग्रह धरणारी आहे. आपण ज्या मार्गाने निवृत्ती महाराजांकडे जाणार आहोत, तो स्वच्छ असावा असे आमचे ध्येय आहे. कोणत्याही दिंडीत आजारी व्यक्ती असल्यास त्याची सेवा शुश्रूषा आम्ही करतो. त्याला मेडिसीन पुरवतो, या कामी आम्हाला आनंद मिळतो.

-ह.भ.प. युवराज महाराज पाटील, दिंडीप्रमुख

---

याआधी अनेक दिंड्यांमध्ये भालदाराचे काम केलेले आहे. हे काम करण्याचा अभिमान वाटतो. आमची नकाण्याची दिंडी औषधोपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यात तरुणांचा भरणा अधिक असून रोज १९ किलोमीटर अंतर आम्ही कापत असतो.

-ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील, भालदार

---

आजचा आमचा नववा दिवस आहे. धुळ्याहून निघून सतत कीर्तन आणि प्रवचन करणारी अशी एखादी दिंडी तुम्हाला कमी प्रमाणात पहायला मिळेल. अनेक भाविक प्रवचन, कीर्तनाचा कंटाळा करतात, परंतु या दिंडीत तसे नाही.

-ह.भ.प. सुहास पाटील महाराज, वीणेकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर वाहन खरेदीला ब्रेक

$
0
0

मटा इम्पॅक्ट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्तांच्या नावाखाली महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी पाच इनोव्हा घेण्याचा प्रस्ताव अखेर भाजपच्या अंगलट आला असून, पदाधिकाऱ्यांनी या वाहन खरेदीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष शिवसेनेसह सर्वसामान्य नागरिकांकडून या वाहनांच्या नव्या खरेदीवर टीका होऊ लागल्यानंतर महापौरांसह उपमहापौर, स्थायी समिती सभापतींनी नवीन वाहने घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही भाजपवर हल्लाबोल करत, स्वत:चे वाहनही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देऊ केले आहे. आपण वाहनाची मागणीही केली नव्हती, असा खुलासा करीत बोरस्तेंनी सत्ताधाऱ्यांना तिजोरीचे भान ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता महापालिकेत केवळ आयुक्तांसाठीच नवीन वाहन खरेदी केले जाणार आहे.

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नवीन खरेदी केलेल्या वाहनांना अवघे दीड वर्ष उलटत नाही, तोच पुन्हा या पदाधिकाऱ्यांना आता नव्या इनोव्हा कारचे वेध लागले होते. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या नादुरुस्त झालेल्या टोयोटो करोला या वाहनाचा आधार घेत, आयुक्तांच्या नावाखाली तब्बल सहा इनोव्हा कार खरेदीचा बार उडवण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली होती. विशेष म्हणजे महापौरांच्या वाहनाला चार वर्षेही झाली नसताना आणि गेल्याच वर्षी आठ नव्याने वाहने खरेदी केली असताना महापौरांसह उपमहापौर, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता आणि स्थायी समिती सभापतींसाठी नवीन वाहने खरेदी करण्याची लगीनघाई सुरू झाली होती. गमे यांच्या टोयोटो करोला वाहनाचे सुटे भाग मिळत नसल्याने त्यांच्यासाठी नवीन वाहन खरेदी केले जाणार आहे. त्यामुळे आयुक्तांसह उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यासाठी नवीन दोन इनोव्हा कार खरेदी करण्याचा ठराव स्थायी समितीने दिला होता. मात्र, मुकेश शहाणे यांनी त्यात उपसूचना देत, सभागृहनेता, स्थायी समिती सभापती, महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांसाठीही इनोव्हा कार खरेदीचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी तब्बल सव्वा कोटींची उधळपट्टी केली जाणार होती. या संदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये झळकल्यानंतर भाजपवर सर्वदूर टीका होऊ लागली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुषमा पगारे यांनी भाजपवर टीका करत वाहनांच्या खरेदीवरच आक्षेप घेतला. एकीकडे करवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रास सहन करीत असताना, मुख्यमंत्र्यांनी नाशिक पदाधिकाऱ्यांची हौस पुरविण्यासाठी दत्तक घेतले का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सर्वसामान्य नागरिकांकडूनही या खरेदीवर टीका होत आहे. त्यामुळे अखेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बॅकफूटवर येत वाहनांच्या खरेदीला ब्रेक लावला आहे. महापौर रंजना भानसी यांनी आपले वाहन नवीनच असल्याचे सांगत, आपण वाहन घेणार नसल्याचा खुलासा केला आहे, तर उपमहापौर प्रथमेश गितेंनी आपले वाहन सुस्थितीत असून, आपल्याला नव्या वाहनाची आ‌‌वश्यकता नसल्याचे आयुक्तांना कळवले आहे. स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडकेंनीही नवीन वाहन घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेतील वाहन खरेदी अखेर बारगळली असून, आता आयुक्तांसाठीच नवीन वाहन खरेदी केले जाणार आहे. दरम्यान, सभागृहनेता दिनकर पाटील यांनीही आपले वाहन आयुक्तांना देण्याची तयारी केली आहे.

हे तर तिजोरीचे भक्षक!

विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या वाहनखरेदीत आपल्याला विनाकारण गोवल्याचा आरोप केला आहे. मला नवीन कार हवी आहे, असे मी तोंडी किंवा लेखीही कोणाला कळवले नाही. तरीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर माझे नाव घुसडले आहे. मला वृत्त वाचून धक्काच बसला आहे. मला महापालिकेच्या तिजोरीचे भान आहे. त्यामुळे मला नवीन गाडी नको, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. घरपट्टीसह अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असतानाही, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नव्या वाहनांची खरेदी करणे खेदजनक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांच्या अच्छे दिनसाठीच दत्तक घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्याचे तिजोरीचे रक्षकच भक्षक बनले आहे.

कोट...

नव्या वाहनाचा प्रस्ताव मी दिलेला नाही. माझे सध्याचे वाहन नवीनच आहे. त्यामुळे मला नवीन वाहन नको आहे. मी तीन दिवस पक्षाच्या कार्यकारिणीला उपस्थित होते. त्यामुळे या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही.

- रंजना भानसी, महापौर

कोट...

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वाहनांची गरज असेल तर माझे वाहन देण्यास मी तयार आहे. घरपट्टी कमी करण्यावर सभागृहात ५० वेळा चर्चा झाली आहे; परंतु त्याकडे लक्ष द्यायला भाजपचे पदाधिकारी तयार नाहीत. मात्र, स्वत:च्या हौसेसाठी नवीन गाड्या हव्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कृतीचा आम्ही निषेध करतो.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयीच्या बदलीसाठी लॉबिंग

$
0
0

निवडणूक काळात अधिकाऱ्यांचा आटापिटा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बदल्यांचे निर्देश दिले असून, सरकारकडून कधीही याबाबतचे आदेश निघण्याची शक्यता आहे. सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच लॉबिंगला सुरुवात केली असून, निवडणूक काळात बदल्या पावन करून घेण्याचा आटापिटा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल, हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक काळात अधिकारी वर्गाकडून कुठल्याही प्रकारच्या हस्तक्षेपाद्वारे कोणत्याही उमेदवाराला मदत होऊ नये याकरिता बदल्या केल्या जातात. यंदाही बदल्यांबाबत निवडणूक आयोग आग्रही असून, त्याबाबतचे निकषही अधिक काटेकोरपणे पाळले जावेत, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ३१ मे २०१९ रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या फेब्रुवारीतच बदल्या करा, असे आदेश आयोगाने दिले आहेत. बदलीसाठी ग्राह्य कार्यकाळ पूर्ण करणारे, तसेच मूळचे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या होणार असून, याबाबतची माहिती आयोगाने मागविली होती. महसूलसह अन्य विभागांनीही ही माहिती पाठविली असून, बदली निश्चित असली तरी ती कोठे होणार याबाबतची टांगती तलवार अधिकाऱ्यांच्या डोक्यावर आहे. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, आठ उपविभागीय अधिकारी, तसेच उपजिल्हाधिकारी, १६ तहसीलदार व समकक्ष अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे महसूल विभाग ७० ते ८० टक्के रिकामा होणार असून सोयीच्या कोणत्या ठिकाणी बदली मिळवता येऊ शकते याची चाचपणीही अधिकारी वर्गाकडून सुरू आहे. याकरिता वेगवेगळ्या निमित्ताने जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला जातो आहे. अधिकारी वर्गाच्या मुंबई फेऱ्याही वाढल्या असून, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांची शिक्षणे व तत्सम कारणे देत सोयीच्या ठिकाणी बदली देण्याचे साकडे अधिकाऱ्यांकडून घातले जात आहे.

दुष्काळग्रस्तांचा प्रश्न

जिल्हावासीय दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात असून, अशा परिस्थितीत बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह बहुतांश अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन या जागी नवीन अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळेल. मात्र, तोंडावर आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येणारे अधिकारी जिल्ह्याची एकंदर परिस्थिती समजून घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कितपत न्याय देऊ शकतील, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. याखेरीज मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासह व्हीव्हीपॅट जनजागृतीपर्यंतच्या अनेक मोहिमा हाताळणाऱ्या निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांची नावेदेखील संभाव्य यादीमध्ये आहेत; परंतु यामुळे जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात बदलीवर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागण्याची शक्यता असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी आणि निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांना या बदल्यांमधून सूट देण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते. नाशिक, चांदवड आणि सटाण्याचे उपविभागीय अधिकारी वगळता अन्य उपविभागीय अधिकाऱ्यांची बदली निश्चित मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१७५ बेशिस्त ‘क्लिक’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) या तंत्रज्ञानाचा वापर करून इंदिरानगर अंडरपास येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेने आतापर्यंत पावणेदोनशे बेशिस्त वाहनचालकांच्या वाहनांचे फोटो टिपले आहेत. या ठिकाणी नव्याने दोन कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यातील एक कॅमेरा दुचाकीस्वारांच्या मागील नंबर प्लेटचे फोटो काढणार आहे.

शहरात प्रथमच एआय या तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही इंदिरानगर अंडरपासमध्ये बसविण्यात आले. या सिस्टिमचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. उद्घाटनापासून सोमवारी (दि. २८) रात्रीपर्यंत या कॅमेऱ्यांनी १७५ फोटोग्राफ्स काढून त्याची माहिती वाहतूक पोलिसांना दिली. या प्रक्रियेबाबत अॅपक्राफ्टझ या सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक महेंद्र एकबोटे म्हणाले की, सुरुवातीस येथे दोन कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, गोविंदनगरच्या दिशेकडून येणाऱ्या दुचाकीच्या लाइटमुळे लहान नंबर प्लेटचा फोटो मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे येथे आता नव्याने दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे एकाच वाहनाचा पुढील आणि मागील असे दोन्ही फोटो काढता येणे शक्य होणार आहे. साधारणत: रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत येथे वाहतूक पोलिस कार्यरत असतात, तोपर्यंत सर्व सुरळीत असते. वाहतूक पोलिसांचे ड्युटी संपली की वाहनचालक 'नो एंट्री'मध्ये प्रवेश करतात. यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीही झाली. या सर्व वाहनचालकांच्या वाहनांचे फोटो वाहतूक शाखेला मिळाले आहेत.

फेब्रुवारीपासून कारवाई

पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील म्हणाले की, फेब्रुवारीच्या ४ तारखेपर्यंत वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार नाही. त्यांना याबाबतची पूर्ण कल्पना आल्यानंतर कठोर कारवाई करण्याचे धोरण स्वीकारण्यात येईल. अगदी लायसन्स रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते. जे वाहनचालक सातत्याने नियम मोडतात, त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे आणि दंडात्मक कारवाईपासून वाचावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनपट्टे मिळाल्याने आदिवासी बांधव सुखावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल ५० वर्षांचा संघर्ष. जमीन आपल्याच बापजाद्यांनी कसली, पण मालक आपण नाही ही भावना मन कुरतडणारी. कुणीही उद्या पिटाळून लावलं तर काय...ही धास्ती रोजचीच. बाडबिस्तार गुंडाळून जायचं कुठं ही चिंता डोकं खाणारी; परंतु कसेल त्याची जमीन हा न्याय कामी आला त्यांच्या मदतीला. जिल्ह्यातील १२ हजार आदिवासी बांधव वनपट्ट्यांचे मालक झाले अने 'दान पावलं'चं समाधान या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर झळकले. या वनपट्ट्यांमुळे आदिवासी बांधवांच्या पुढील पिढ्यांचा संघर्षमय प्रवास काहीसा सुखकर झाला आहे.

जिल्ह्यात निम्म्याहून अधिक तालुके आदिवासीबहुल आहेत. शेती हेच येथील बहुतांश लोकांच्या उपजीविकेचे साधन. पन्नास वर्षांहूनही अधिक काळ हे आदिवासी बांधव जमिनी कसत आहेत. मेहनत आणि मेहनताना आपला; परंतु जमिनीचे मालक मात्र सरकार. कसतो ते वनपट्टे आमच्या नावे करा ही या बांधवांची वर्षानुवर्षांची मागणी. त्यासाठीचा संघर्षही तेवढाच मोठा. आता कोठे या वनपट्ट्यांवर त्यांची नावे लागण्यास सुरुवात झाली आहे. सुरगाण्यासह, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, बागलाण, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांना अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. वनपट्ट्यांची मालकी मिळाल्याने हे आदिवासी शेतकरी सुखावले आहेत. आतापर्यंत ११ हजार ९४७ शेतकऱ्यांना वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित वनहक्काचे दावे निकाली काढावेत, यासह विविध मागण्यांसाठी मार्चमध्ये हजारो आदिवासी बांधवांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वनहक्काचे दावे निकाली काढण्याच्या कामास गती देण्यात आली. ३१ हजार ५३४ पैकी ३० हजार ३७६ दावे निकाली काढण्यात आले. त्यापैकी ११ हजार ९४७ दावे पात्र ठरविण्यात आले असून, त्यांना वनपट्ट्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

वनहक्क समितीकडे एकूण ५० हजार ४४३ दावे दाखल झाले होते. त्याचवेळी ४९ हजार ७६९ दावे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. अनेक अर्जदारांचे वनहक्कांचे दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी अनेकांचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. त्यापैकी १८ हजार २३५ अपिले उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले. त्यापैकी १७ हजार ५५१ दावे या समितीने संमत केले. मात्र, या निर्णयानंतर पुन्हा १९ हजार ६०६ दावे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नव्याने दाखल करण्यात आले. यंत्रणेनेही ११ हजार ९२८ अपिले दाखल केली. अशा एकूण ३१ हजार ५३४ दाव्यांपैकी ११ हजार ९४७ दावे मंजूर झाले असून, त्यांना वनपट्ट्यांचे वाटप करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

५०,४४३ दावे वनहक्क समितीकडे दाखल

४९,७६९ दावे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर

१८,२३५ दावे जिल्हास्तरीय समितीकडे सादर

१७,५५१ दावे जिल्हा समितीकडून संमत

१९,६०६ दावे नव्याने दाखल

११,९४७ दावे मंजूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंत डहाके यांना ‘जनस्थान’ पुरस्कार

$
0
0

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे २७ फेब्रुवारीला गौरविणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ लेखक वसंत आबाजी डहाके यांना मराठी साहित्यविश्वातील सन्मानाचा असा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान' पुरस्कार जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी, २७ फेब्रुवारी रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पंधराव्या 'जनस्थान' पुरस्काराने डहाके यांना गौरविण्यात येईल.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. मराठी साहित्यक्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर ठसा उमटविणाऱ्या साहित्यिकाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. वर्षाआड दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेन्द्रगडकर, विलास खोले व रेखा इनामदार-साने, जयंत पवार यांच्या निवड समितीने डहाके यांची या पुरस्कारासाठी निवड केली. सन १९६० मध्ये 'सत्यकथा' मासिकात डहाके यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. योगभ्रष्ट या दीर्घ कवितेमुळे त्यांच्या काव्यलेखनाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. याच नावाने त्यांचा काव्यसंग्रह आला.

कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, सहकार्यवाह अरविंद ओढेकर, माजी पदाधिकारी रंजना पाटील, गुरुमीत बग्गा यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिका गुजराती पदार्थ बनवायला

$
0
0

मटा कल्चर क्लबतर्फे शनिवारी कार्यशाळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सभासदांसाठी येत्या शनिवारी (दि. २ फेब्रुवारी) 'गुजराती फूड मेकिंग वर्कशॉप'चे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्कशॉपमध्ये पानकी, लसनिया बटाटा, सेव खमणी, मुठिया, हांडवो हे गुजरात पदार्थ शिकविले जाणार आहेत. रितू मेहरा हे पदार्थ बनविण्यास शिकविणार आहेत. हॉटेल करी लिव्हज्, जेहान सर्कल, गंगापूर रोड याठिकाणी दुपारी १२ वाजता हे वर्कशॉप सुरू होईल. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सभासदांसाठी १०० रुपये तर इतरांसाठी ४०० रुपये फी आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी रजिस्ट्रेशनसाठी सकाळी ११ ते ५ यावेळेत ९४२२५१३५६९ या मोबाइलवर संपर्क साधावा. महाराष्ट्र टाइम्स, २ रा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड येथेही नोंदणी करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजवाड्याची गोष्ट : प्रमोद अहिरे

$
0
0

राजवाड्याची गोष्ट : प्रमोद अहिरे

आमचा हिरो...!

टुरिंग टॉकीजवाले आमच्या वरखेडा या गावात चित्रपट आणायचे. असे चित्रपट, व्हिडिओ पाहायला 'संस्काराच्या नावाखाली' आम्हाला बंदीच असायची. एक दिवस मी 'गौतम गोविंदा' चित्रपट लागला असे वडिलांना सांगितले न् दुसऱ्या क्षणाला पिक्चर पाहायची परवानगी मिळाली! इसाप हा गोष्टीतलं चांगलं-वाईट ठरवत होता. माझं चांगलं- वाईट हे माझे वडील ठरवत होते. 'एक ऋतू आये एक ऋतू जाये, मौसम बदले ना बदले नसीब' या गाण्याप्रमाणे राजवाड्याची परिस्थिती बिकट आहे, असं वाटायचं. बहात्तरच्या दुष्काळात यांनी कुठेही वाढणाऱ्या तोराट्याची भाजी खाल्ली होती म्हणे! आता दिवसभर काम शोधायचं, संध्याकाळी पाट्यावर ठेचा वाटून भाकरीसंगं दिवस काढायचा, पडक्या घरांना मातीचं लिंपण लावायचं, चावडीवरच्या भिंतींना गोवऱ्या थापायच्या, सरपणासाठी खोडक्या वेचून आणायच्या, पायात घुसलेली धसकटं काढीत बसायचं, औषध नाही म्हणून गोधडीत निपचित पडायचं...हा दिनक्रम. खरंच यांचा ऋतू कधी हिरवा होईल काय? यांचेही दिवस पालटतील का? असे प्रश्न चिमुकल्या मेंदूत गर्दी करायचे...

'गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआप बंड करुन उठेल,' हा डॉ. आंबेडकरांचा सुविचार मोठा भाऊ सतीश याने घराच्या वाशावर खडूने लिहिलेला होता. बाबासाहेबांनंतर बंडाची भाषा करणारे दोनच हिरो आमच्यासमोर होते- ते म्हणजे मिथुन आणि बच्चन. मिथुनसारखा काखेत फुगा असणारा बाह्यांचा शर्ट मी घेतलेला होता आणि त्याचा आवाजही मला काढता यायचा. 'अबे वो' या शब्दाने सुरुवात करुन त्याचे अनेक डायलॉग मला तोंडपाठ होते. चावडीतील देवीची मूर्ती फेकून मी बाहेरचं समाजकार्य केल्यानंतर दुसरा मोर्चा आता घराकडे वळविला. आईने घरात देवाची फ्रेम लावलेली होती. घरात कोणी नाही हे पाहून मी ती काढली व एका फ्रेम कारागिराकडून त्यावर बच्चनचा फोटो लावून परत घरात टांगली.

या गोष्टीमुळे आईच्या पायाखालची जमीनच सरकली. वडिलांना मात्र ही गोष्ट आवडली. पण त्याजागी हिरोचा फोटो आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. शेवटी माझ्या बच्चनप्रेमापुढे त्यांनाही हार मानावी लागली. हे बच्चनप्रेम पुढे एवढं वाढलं की तो माझ्या कंपासपेटीवर 'देशप्रेमी' म्हणून, तर कधी वहीच्या पृष्ठावर 'नास्तिक' बनून यायचा. त्याचा कोंबडा भांग पाडायला मी सुरुवात केली. खंडोबाच्या यात्रेत हातात बंदूक धरलेल्या बच्चनच्या पडद्याजवळ उभं राहून लहान भाऊ नितीनसोबत फोटोही काढून घेतला होता. सुट्टीत रवीमामाकडे मालेगावला जायचो. मामा आम्हाला शहरात फिरवायचा. मिथुन व बच्चनचे पोस्टर हाताने रंगवणारे चित्रकार टॉकीजजवळ दिसत. मी पडद्यावर पाहिलेला पहिला चित्रपट म्हणजे 'काला पत्थर'. अंधार, मोठाले चेहरे, दणाणणारा आवाज यामुळे गांगरुन गेलो. परंतु, दगडी कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कष्टकरी, मजूरवर्गाबद्दल सहानुभूती दाटून येण्याचा तो कलात्मक क्षण होता. येथेच आहेरे-नाहीरे वर्गाची सूक्ष्म ठिणगी मनावर पडली.

गावातली डुकरे ही चावडीत येऊन लोळायची. मग पत्ते कुटणारी मंडळी आली की ते त्यांना हुसकावत. त्यात एक तिशीतला बारक्या अंगकाठीचा टीबी अन् दमा झालेला सुभा होता. आपल्या आजारामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून हा एकटाच चावडीत रहायचा, तेथेच झोपायचा. मात्र तो आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेला होता. तो पत्तेही खेळायचा अन् तिथंच 'चपटी' मारुन झोपायचा. मी त्याला विचारलं की 'आंबेडकरांनी आपल्या समाजाला पत्ते खेळायची आन् दारू प्यायची शिकवण दिली का?' त्यावर तो म्हणाला की 'माझे जीवनच एक जुगार आहे. आज आहे तर उद्या नाही. हे दुःख पचवण्यासाठी, निदान मला झोप येण्यासाठी दारू ही माझी गरज आहे. मला आनंद पिच्चरमधल्या राजेश खन्नासारखं हसत हसत मरायचं आहे.' खरंच सुभाचं आयुष्य हातातून निसटणाऱ्या वाळूसारखं होतं. राजेश खन्नाच्या रुपानं हा हिरो चावडीत झोपायला आलाय, या विचारानं मला त्याच्याबद्दल अधिकच गहिवरुन आलं...

(लेखक प्रसिद्ध कवी आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images