Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सेंद्रीय भाज्या खरेदीसाठी गर्दी

0
0

रोटरी क्लबतर्फे 'भाजीपाला महोत्सव'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही रसायनाचा वापर न करता, पूर्णत: नैसर्गिक पद्धतीने शेतात पिकविलेला भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. शेतकरी ते थेट ग्राहक या तत्त्वावर आधारित भाजीपाला महोत्सवातील सेंद्रिय भाज्यांची 'चव' नाशिककरांनी चाखली.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे सेंद्रिय फळे व भाजीपाला विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला. गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये प्रगतशील शेतकरी संदीप जाधव यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात रसायनविरहित भाजीपाला, फळे आणि धान्य विक्रीसाठी ठेवण्यात आले. त्यामुळे सकाळपासूनच ग्राहकांनी महोत्सवात खरेदीसाठी गर्दी केली. महोत्सवात सेंद्रिय शेतीच्या आधुनिक तंत्रावर आधारित पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि इगतपुरी येथील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. अतिशय चांगल्या दर्जाचा हा भाजीपाला तसेच धान्य खरेदीसाठी दुपारनंतर ग्राहकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. गायीचे शुद्ध तूप खरेदीलाही ग्राहकांनी पसंती दिली. सिन्नरचे अनिल शिंदे, बोरगावचे सोमनाथ दळवी, चांदवडचे संदीप जाधव या प्रगतशील शेतकऱ्यांनी महोत्सवात स्टॉल लावले. महोत्सवाचे संयोजन रोटरी क्लब सदस्य हेमराज राजपूत, गौरी पाठक, मकरंद चिंधडे यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केले. बोरगाव येथील सोमनाथ दळवी यांनी सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची शेती केली असून, तिला या महोत्सवात सर्वाधिक मागणी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तणावावर आज व्याख्यान

0
0

\Bतणावावर आज व्याख्यान\B

नाशिक : स्वर्गीय सतीश बूब यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रिकल्चर तर्फे 'व्यावसायिक ताणतणावाचे व्यवस्थापन' या ‌विषयावर बुधवारी (दि. ३०) व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उंटवाडी रोड येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता व्याख्यान होईल. या व्याख्यानास व्यावसायिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमाण घसरले, अस्तित्व कायम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महारोग अशी कधीकाळी ओळख असलेल्या कुष्ठरोगाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. मात्र, या आजाराचे अस्तित्व आजही थोड्याशा दुर्लक्षामुळे कायम आहे. ३० जानेवारी रोजी जागतिक कुष्ठरोग दिन साजरा केला जातो. त्याद्वारे या आजाराबाबत जनजागृती करण्याबरोबर रुग्णांचाही शोध घेतला जात आहे.

जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, नर्स, आशा वर्कर यांच्या मदतीने जिल्हाभरात हे काम केले जात असल्याचे कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रकाश पाडवी यांनी सांगितले. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू झालेली ही मोहीम १३ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. कुष्ठरोगाबाबत डॉ. पाडवी म्हणाले की, मागील काही वर्षांचा आढावा घेतला असता या आजारात हळूहळू घट होत असल्याचे दिसते. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कुष्ठरोग संशयित रुग्णांची शोधमोहीम राबवण्यात आली होती. त्यात ३७८ व्यक्ती सापडल्या होत्या. जीवघेणा ठरत नसल्याने या आजाराची लागण झाली तरी त्याकडे दुर्लक्ष होते. या आजाराबाबत आजही अनेक गैरसमज असून, पेशंट अंगावर दुखणे काढण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे दरवर्षी साधारण एक हजार पेशंट समोर येतात. २०१५ पर्यंत नवीन पेशंटची संख्या एक हजार ते बाराशेच्या घरात होती. यानंतर, हळूहळू हे प्रमाण कमी होत गेले. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ९६८, २०१७-१७ या वर्षात ९०० तर, २०१८-१९ या चालू वर्षात आतापर्यंत ८०० नवीन पेशंट सापडले आहेत. याच कालावधीत अनुक्रमे ८७५, ९३७ आणि ५६९ पेशंट या आजारातून बरे झाले. कुष्ठरोग आजार पूर्णत: बरा होणारा असून, आजाराची लक्षणे दिसल्यानंतर लागलीच उपचार मिळणे आवश्यक असल्याचे डॉ. पाडवी यांनी स्पष्ट केले. पेशंटला सहा ते १२ महिन्यांच्या कालावधीत मल्टिड्रग्ज थेरपीनुसार औषधोपचार केले जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये शीतलहर

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुका पुन्हा गारठला असून, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमानाचा पारा ३ अंशांनी घसरला. मंगळवारी ४ अंश सेल्सिअस इतकी नीचांकी तापमानाची निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नोंद झाली.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शीतलहरीने कहर केला आहे. सोमवारी निफाडमध्ये ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी त्यात आणखी घट होऊन ४ अंशांवर आले. तापमान दिवसेंदिवस कमी होत असल्याने द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. द्राक्षाला तडे जाणे आणि पाणी न उतरलेल्या द्राक्षमण्यांची फुगवन थांबल्याची स्थिती निर्माण झाल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. यामुळे ऐन हंगामात द्राक्ष उत्पादकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. २७ डिसेंबर २०१८ रोजी निफाड तालुक्यात १.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती.

निफाड : ४ अंश
मालेगाव : ६.८ अंश
नाशिक : ७ अंश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंदू।

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

‘आता कोठे धावे मन। तुझे चरण देखीलीया। भाग गेला शीण गेला। अवघा झाला आनंदू। संत तुकाराम महाराजांच्या या पंक्तींप्रमाणे शेकडो किलोमीटर चालून संत निवृत्तिनाथांच्या भेटीची आस घेऊन आलेल्या दिंड्यांची थकलेली पावले अखेर त्र्यंबकनगरीत विसावली आहेत.

पूर्वी पायी दिंड्या दशमीस येत. मात्र, आताच्या दिंड्या एक दिवस अगोदरच दाखल झाल्या आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत ५० पेक्षा अधिक दिंड्या दाखल झाल्या होत्या. दिंड्यांचे स्वागत आणि नोंदणी संत गजानन महाराज संस्थान यांच्या वतीने करण्यात येत आहे. त्र्यंबकला आल्यानंतर वारकरी त्र्यंबकराजाच्या मंदिर प्रांगणात अभंगसेवा रूजू करतात. फुगड्या खेळून आनंद व्यक्त करतात. त्यानंतर कुशावर्तावर येतात. येथे शिणलेले पाय गोदामाईच्या शीतल स्पर्शाने सुखावतात. तेथून श्रीकृष्ण मंदिराच्या बाजूने संत निवृत्तिनाथांच्या मंदिरात येत आहेत. येथे विश्वस्त पुंडलिकराव थेटे यांनी दिंड्यांचे स्वागत केले.

यावर्षी यात्रेत खाद्यपेयांसह विविध विक्रेतेही काही दिवस अगोदरच दाखल झाले आहेत. त्र्यंबक नगरपालिकेने व्यावसायिक गाळे आखले आहेत. अनेक वर्षांपासून ठरावीक व्यवसाय करणारे ठरलेल्या जागेत बसत असतात. त्याप्रमाणे दुकाने लावण्यात येत आहेत. संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त काही वर्षांपासून दिंड्यांचा रिंगण सोहळा पहायला मिळत आहे. ‘महावारी’ सोहळ्यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचे विद्यमाने दरवर्षी गणपतबारी प. पू. सागरानंद महाराज आश्रमाशेजारी दाखल होणाऱ्या विविध दिंड्यांचा एकत्रित रिंगण सोहळा साजरा केला जातो. हभप कृष्णा माऊली यांचा सर्वात मोठा दिंडी सोहळा असतो. ते अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात काही वर्षांपासून रिंगण करतात.

महापूजा पालकमंत्र्यांच्या हस्ते

एकादशीच्या पहाटेला होणारी नगरपालिकेची महापूजा यावर्षीही पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय महाराज धोंडगे यांनी मुख्यमंत्री महापूजेला आले तर मंदिराचा जीर्णोद्धार तसेच परिसर विकासाला काही मदत जाहीर करतील, यासाठी काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. यासाठी २२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अध्यक्षांच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि मंदिर परिसराच्या कामास ठोस मदत मिळेल म्हणून विश्वस्त मंडळाने अध्यक्षपदाची निवड लांबणीवर टाकली आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी नकार दिल्याने अखेर पालकमंत्रीच यावर्षीचे प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावणार असल्याचे संकेत आहेत. यात्रा कालावधीत संत निवृत्तिनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी लागलेली रांग थेट ब्रह्मगिरीच्या पायथ्यापर्यंत पोहचत असते. गंगासागर तलावाच्या समोर अग्नी आखाड्याच्या बाजूने रांगेचे नियोजन करण्यात येते. यावर्षी त्यासाठी सिंहस्थातील पोलिस बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे येथे रस्ता संकुचीत होऊन रहदारीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

माऊली थकला आहात, मालीश करून घ्या!

शहराच्या दोन किलोमीटर अलीकडे प्रयाग तीर्थ तलावाचे समोर महानिर्वाणी आखाडा आहे. येथे आयुर्वेदिक डॉक्टरांनी तपासणी शिबिर लावले आहे. येथे रस्त्यावर पाच-दहा वैद्य आलेल्या वारकरी भाविकांच्या पायांना तेल लावून मालीश करतात. शिबिरात तपासणी करून औषधे दिली जातात. त्याचबरोबर पंचकर्म विभाग सेवेसाठी तत्पर आहे. येथे औषधी वाफ आदि उपचार केले जातात. श्री रुकडीकर महाराज ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या नावाने ही सेवा दिली जाते. त्र्यंबकेश्वर येथे दर एकादशीला संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर येथे रुग्णतपासणी, औषधोपचार होत असतो. यावर्षी पहिल्या दिवशी ५० वैद्य येथे सेवा देत आहेत. बुधवारी दशमीला ही संख्या वाढविण्यात येणार आहे. नाशिकसह सटाणा, मालेगाव, धुळे, नंदुरबार आदि शहरांतील डॉक्टर हा उपक्रम स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने चालवितात.

जय बाबाजी भक्त परिवार दिंडीचे आगमन

आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र वेरूळहून निघालेल्या या दिंडीचे मंगळवारी शहरात आगमन झाले. निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधिश्वर शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीक्षेत्र वेरूळ ते त्र्यंबकेश्वर वार्षिक दिंडी सोहळा याही वर्षी गावोगावी सत्संग, प्रवचन-भजन, नामजप आदी करीत शहरात आला. जनार्दन स्वामींच्या पादुका असलेल्या चांदीच्या रथासह यावर्षीचा दिंडी सोहळा सुरू आहे. सकाळी सिन्नर फाटा येथे आगमन होऊन नाशिक रोड, जेलरोड, नांदूरनाका, जत्रा हॉटेल, विडी कामगार नगर, आडगाव नाका, रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, ठक्कर बाजार, पवन नगर, सिडको येथे सायंकाळचा सत्संग होऊन त्र्यंबकेश्वरसाठी दिंडी मार्गस्थ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाख सौर कृषिपंप वाटणार

0
0

ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारतर्फे सौर कृषिपंप वाटप करण्यात येत आहेत. त्यात केवळ ३० हजार रुपये घेऊन शेतकऱ्यांना ते मिळणार आहेत. अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना केवळ १५ हजार रुपयांत हा पंप देण्यात येणार आहे. राज्यात एक लाख सौर कृषिपंपाचे वितरण करण्यात येणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

भुजबळांनी दिले पत्र

नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी या कार्यक्रमात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एकलहरे प्रकल्पाबाबत निवेदन देऊन त्यांनी मंजूर झालेल्या ६६० मेगावॅट प्रकल्पाचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावेळी हे काम होणार असे आश्वासन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काव्यातून स्वभाव व्यक्त होतो: मुकुंद दीक्षित

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यक्तीच्या आत असलेला विवेकी भाव जागा झाल्याशिवाय, व्यक्तिला आतला आवाज ऐकू येत नाही. जेव्हा व्यक्ती आतला आवाज ऐकू लागतो, तेव्हा व्यक्तीतील कवी जन्म घेतो. कवी त्याच्या काव्यातून ज्या भूमिका मांडत असतो. त्या भूमिकांना कवीच्या स्वभावाची आणि गुणदोषांची जोड असते. म्हणजेच, काव्यातून कवीचा स्वभाव व्यक्त होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांनी केले. 'आतला आवाज' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

कवी विवेक उगलमुगले यांच्या 'आतला आवाज' या काव्यसंग्रहाचे बुधवारी प्रकाशन झाले. कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या सभागृहात हा सोहळा झाला. यावेळी मंचावर ट्रस्टचे केशव पाटील, माजी नगरसेविका डॉ. अश्विनी बोरस्ते, कवी रवींद्र मालुंजकर, कवी विवेक उगलमुगले, प्रकाशक विलास पोतदार होते. सोहळ्यात उपस्थित रसिकांसोबत संवाद साधताना दीक्षित म्हणाले, की सध्या प्रत्येकजण इतरांच्या नजरेत प्रतिष्ठा टिकविण्यासाठी झटत आहे. मात्र, इतरांच्या नजरेत प्रतिष्ठा निर्माण करण्यापेक्षा 'स्व' नजरेत प्रामाणिक राहणे, ही काळाजी गरज झाली आहे. तसेच हल्ली नवीन कवींच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य केले जात असून, त्याचा समाजप्रबोधनासाठी मोठा हातभार लागत आहे. तरुण कवींनी सामाजिक भान राखत काव्य निर्मिती करून, समाजप्रबोधन करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. राजू शेळके यांनी प्रास्ताविक केले. सोहळ्यास मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

गांधीजींचे विचार मांडण्यासाठी मी काव्याचा आधार घेतला आहे. काव्यसंग्रहातून गांधीजींची तत्वे आणि भूमिका सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे वाटते. तसेच हा काव्यसंग्रह गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना वंदन म्हणून प्रकाशित केला आहे- विवेक उगलमुगले, कवी


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांसाठी भाडेतत्त्वावर बंगला?

0
0

महापालिका मुख्यालय परिसरात जागेचा शोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासाठी असलेले अधिकृत निवासस्थान हे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विनंतीमुळे मार्चनंतरच खाली होणार आहे. त्यामुळे आयुक्त गमे यांना आपल्या छोटेखानी निवासस्थानातूनच महापालिकेचा कारभार पहावा लागत आहे. खासगी निवासस्थान कामकाजासाठी छोटे पडत असल्याने आता बांधकाम विभागाकडून त्यांच्यासाठी महापालिकेच्या जवळ भाडेतत्त्वावर खासगी बंगल्याचा शोध सुरू केला आहे. या बंगल्यासाठी पालिकेच्या तिजोरीतून खर्च करावा लागणार आहे.

महापालिका आयुक्तांसाठी विश्रामगृहाजवळ प्रशस्त निवासस्थान आहे. तेथे आयुक्तांसाठी कामकाज करण्यासाठी स्वतंत्र कार्यालयही आहे. पालिकेपासून जवळच निवासस्थान असल्याने कामकाजाच्या दृष्टीने ते सोयीचे आहे. अभ्यासगत तसेच अधिकारी हे आयुक्तांच्या घरी जावून सल्लामसलत करतात. परंतु, सध्या हे निवासस्थान तुकाराम मुंढे यांच्या ताब्यात आहे. मुंढे यांनी बदलीनंतर सदरचे निवासस्थान मार्चपर्यंत कायम ठेवण्याची विनंती राज्य सरकारकडे केली होती. सरकारकडून ती मंजूरही करण्यात आली आहे. त्यामुळे नूतन आयुक्त गमे यांना सध्या त्यांच्या गंगापूर रोडवरील खासगी निवासस्थानात मुक्काम ठोकावा लागला आहे. परंतु, हे निवासस्थान कामकाजासाठी आता अपुरे पडत आहे. त्यातच ते महापालिका मुख्यालयापासून लांब असल्याने अधिकाऱ्यांचीही धावपळ होत आहे. त्यामुळे आयुक्तांनाच कामकाजासाठी कसरत करावी लागते आहे. आता ही धावपळ थांबवण्यासाठी मुख्यालयाज‌वळच त्यांच्यासाठी नवीन भाडेतत्त्वावरील बंगल्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करवाढीतून सरसकट दिलासा नाहीच

0
0

आयुक्त गमे यांचे सूतोवाच; फेब्रुवारीत होणार फैसला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवीन मिळकतींच्या वार्षिक करयोग्य मूल्य दरवाढीच्या माध्यमातून तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर लादलेली अवाजवी करवाढ सरसकट रद्द होण्याची शक्यता मावळली आहे. करवाढ रद्द करण्याचा ठराव महासभेने संमत केला असला तरी ही करवाढ संपूर्णपणे रद्द होणे अशक्य असल्याचे सूतोवाच आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहेत. महापालिकेच्या जमा खर्चाची बाजू विचारात घेवूनच फेब्रुवारीत यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याचे गमे यांनी सांगितले. त्यामुळे सरसकट दिलासा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

शहरावर लादलेली करवाढ रद्द करण्यासाठी महासभेने तब्बल तीन ठराव प्रशासनाला दिले आहेत. मुंढे यांनी करवाढ रद्द करण्यास नकार दिल्यानंतर नूतन आयुक्त गमे नाशिककरांना दिलासा देतील अशा आशा लागून आहे. अनधिकृत ठरविलेल्या मिळकतीपासून तर करयोग्य मूल्याबाबत चर्चा झाल्यानंतर गमे यांनी अभ्यास करून लवकरच उत्तर देतो, असे सांगितले होते. त्यास महिना उलटल्यानंतरही करवाढीबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने नागरिकांची धडधड वाढली आहे. यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आयुक्त गमे यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करवाढीबाबत निर्णय घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट केले. मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपणार असल्याने तत्पूर्वी फेब्रुवारीत मिळकतधारकांना घरपट्टीची देयके पोहोचणे आवश्यक आहे. मात्र, वाढता खर्च आणि घटत्या महसुलाची सांगड घालणेही तितकेच गरजेचे आहे. पालिकेला मिळणाऱ्या एकूण महसुलात जीएसटी अनुदानाचा वाटा मोठा आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीतून मिळणाऱ्या महसुलातून पालिकेचा आस्थापना खर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यायचा निर्णय झाल्यास आस्थापना खर्च ४०० कोटींपर्यंत जाईल. या खर्चाची अदायगी तरी किमान घरपट्टी, पाणीपट्टीसारख्या पालिकेच्या स्वत:च्या उत्पन्न स्त्रोतातून व्हायला हवी. त्यामुळे योग्य समन्वय साधून तोडगा काढला जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने सरसकट करवाढीतून नाशिककरांची सूटका होण्याची शक्यता मावळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१ मार्चपासून देश भारनियमनमुक्त

0
0

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांची माहिती

...

- भारनियमन केल्यास पुरवठा कंपन्यांना दंड

- दंडाची रक्कम ग्राहकांना मिळणार

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या ३१ मार्चपासून देशात कोठेही भारनियमन केले जाणार नाही. तांत्रिक बिघाडीचा अपवाद सोडल्यास देशात सर्वांना निरंतर वीज मिळेल. भारनियमन केल्यास वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीला दंड ठोठावला जाईल. या दंडाची रक्कम ग्राहकांना त्यांच्या वीजबिलातून दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांनी नाशिकमध्ये दिली.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील शिलापूर येथे राज्यातील पहिल्या इलेक्ट्रीक टेस्टिंग लॅब कामाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आर. के. सिंह नाशिकमध्ये आले होते. सिंह पुढे म्हणाले, की शहरी व ग्रामीण भागात नेहमीच भारनियमन होत असते. मात्र, आता ३१ मार्चनंतर देशातील प्रत्येक घटकाला निरंतर वीजपुरवठा होईल. कुठेही भारनियमन होणार नाही. देशात ऊर्जा क्षेत्रात आम्ही सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात परिवर्तन केले आहे. अगोदर देशभरात भारनियमन होत होते. आता ते दिसत नाही. त्यासाठी उत्पादन क्षमता वाढवून आम्ही साडेचार वर्षांत १ लाख मेगावॅट जास्त विजेची निर्मिती केली. आता तर विदेशात आम्ही वीज निर्यात करीत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

...

'एक ग्रीड एक देश'

संपूर्ण देश आता एका ग्रीडमध्ये जोडला जाणार आहे. त्यासाठी 'एक देश एक ग्रीड' ही योजना हाती घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणाहून वीज घेता येणार आहे. देशातील १ लाख ८० हजार किलोमीटरची वाहिनी एका ग्रीडमध्ये जोडण्यात आली आहे. येत्या ३ फेब्रुवारीला लडाख, लेह, कारगिल, द्रास या अधिक उंचीच्या क्षेत्रांना देशाच्या ग्रीडने जोडण्यात येणार आहे. त्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नरेडको’तर्फे अर्थमंत्र्यांना साकडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

बांधकाम व्यवसायात पारदर्शकात यावी, यासाठी १९९८ पासून कार्यरत असलेल्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेन्ट कौन्सिल (नरेडको) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नुकतीच भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. नरेडको नाशिकचे सुनील गवांदे, राजन दर्यानी, शंतनू देशपांडे, मयूर कपाटे, पवन भगुरकर, किरण बागूल आदी उपस्थित होते. नाशिकरोड येथे राज्यस्तरीय आढावा बैठकीसाठी अर्थमंत्री नुकतेच आले होते. निर्माणाधीन इमारतीत मिळकत खरेदीवरील आकारला जाणारा जीएसटी, संयुक्त उद्यम करार, जमीन/टीडीआर/ भाडेपट्टा व्यवहारावर आकारला जाणारा जीएसटी, विद्यमान धारकांना आकारीत जीएसटी, भाडेपट्टा करतेवेळी मिळणारे इनपुट, क्रेडिट, बुकिंग रद्द केल्यावर जीएसटी परतावा आदी समस्यांबाबत हे निवेदन देण्यात आले. या अनुषंगाने लवकरच मुंबई येथे बैठक आयोजित करण्याचे सूतोवाच मंत्र्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो ओळ

0
0

धुक्याची झालर...

सध्या गुलाबी थंडीचा अनुभव नाशिककर घेत असून, थंडीबरोबर आता धुक्याची दुलई अनुभवायलाही मिळू लागली आहे. गोदाकाठावरील धुक्यात हरविलेली मंदिरांचा नयनरम्य देखावा भाविकांना आकर्षत करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंड्यांवर निर्बंध लादू नका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संत निवृत्तिनाथांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या दिंड्यांचे ध्वनीक्षेपक पोलिस आयुक्तालयासमोर बंद करण्यास लावल्याचा शिवसेनेने निषेध नोंदविला आहे. दिंड्यांमधून चालत येणाऱ्या वारकऱ्यांवर असे निर्बंध लादू नका, असे आवाहन पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची बुधवारी भेट घेतली. दरवर्षी वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथांच्या दर्शनासाठी जातात. ध्वनीक्षेपकाची ध्वनी मर्यादा किमान पातळीवर ठेऊन या दिंड्या मार्गस्थ होतात. महाराष्ट्राचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या या दिंड्यांवर कोणतेही निर्बंध लादू नयेत. अन्यथा, सर्व वारकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा डॉ. सिंगल यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, विजय करंजकर, अजय बोरस्ते, देवा जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनिटात निवळला वाद

0
0

गोडसे-भुजबळ एकाच व्यासपीठावर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये होणाऱ्या राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या श्रेयाचा वाद काही दिवस सुरू होता. पण, भूमिपूजन सोहळ्यात हा वाद मिनिटातच निवळला. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर खासदार हेमंत गोडसे हे निवेदिकाकडे गेले. त्यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेले माजी खासदार समीर भुजबळ व माजी आमदार जयंत जाधव यांना मंचावर बोलावण्याची सूचना केली. त्यानंतर भुजबळ व जाधव मंचावर गेल्यानंतर गोडसे यांनी त्यांचे हस्तांदोलन करत स्वागत केले.

इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब नाशिकला व्हावी यासाठी खासदार असतांना भुजबळ यांनी प्रयत्न केले. त्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. पण, हा प्रकल्प रखडला. गोडसे यांनी खासदार झाल्यानंतर पुन्हा पाठपुरावा केला. त्यामुळे या प्रकल्पात दोघांचेही श्रेय असल्याने हा वाद सुरू झाला होता. पण, भूमिपूजन सोहळ्यात हा वाद निवळला. या कार्यक्रमात भुजबळांनी माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्याबरोबर हजेरी लावली.

बावनकुळेंचा मध्यम मार्ग

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सोहळ्यात विकास आमच्या सरकारनेच नाही तर पहिल्या सरकारनेही केल्याचे सांगत या वादात मधला मार्ग काढला. यावेळी त्यांनी समीर भुजबळ यांच्यासह खासदार गोडसे यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी मंचावर भुजबळ निवेदन देण्यासाठी आल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चाही केली.

नावाचा घोळ

केंद्रीय उर्जा मंत्री राज्यमंत्री आर. के. सिंह यांनी माजी मंत्री बबनराव घोलप यांचे नाव घेतांना बाबुराव घोलप असे घेतले. तर समीर ऐवजी त्यांनी पंकज भुजबळांचे नाव घेतले. इंग्रजीत लिहिलेल्या नावामुळे घोलपचे नाव घेतांना घोळ झाला असला तरी भुजबळांचे नाव कसे चुकले यावर मात्र चर्चा रंगली. दरम्यान, गोडसे व भुजबळ समर्थकांनी या भूमिपूजन सोहळ्याचे डिजिटल फलक शहरात ठिकठिकाणी लावत आपापल्या नेत्यांना श्रेय दिले. कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा हे पोस्टर होते.

गोडसेंनी टाळले नाव

खासदार हेमंत गोडसे यांनी समीर भुजबळांचा मंचावर बोलावून सत्कार केला. पण, आपल्या भाषणात त्यांनी भुजबळांचे नाव घेणे टाळले. यावेळी त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरी तो रखडला होता. त्यामुळे तो दुसऱ्या ठिकाणी जाणार होता. पण, नंतर मी पाठपुरावा केल्याने तो नाशिकला आल्याचे सांगितले. या भाषणानंतर निवेदिकेने गोडसे यांचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थितांना उभे राहण्याची सूचनाही केली.

भाजपचे स्थानिक नेते दूर

राज्यातील पहिल्या लॅबच्या सोहळयात दोन्ही प्रमुख पाहुणे भाजपचे असले तरी या कार्यक्रमात स्थानिक भाजप नेत्यांनी दूर राहणेच पसंत केले. आमदार देवयानी फरांदे वगळता इतर भाजपचे नेते या कार्यक्रमात हजर नव्हते. त्यामुळे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भाजपचे असले तरी शिवसेनेचे सर्व नेते हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपार ताब्यात

0
0

नाशिक : शहरासह जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही वडाळागावात वास्तव्यास आलेल्या नाजिर शाकीर शेख (वय २६, रा. झीनतनगर, नूरजहाँ मंजिल, बडी मस्जिदीच्या मागे, वडाळागाव) याला राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. हवालदार रवींद्र बागूल यांना याबाबतची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशाल काठे, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे यांनी त्याला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमयूएच एस

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील नळवाडी शिवारातील शेतकऱ्याच्या विहिरीत बुधवारी (दि. २९) पडलेल्या बिबट्याला दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून पिजऱ्यात जेरबंद केले. बिबट्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

नळवाडी येथे चिकणी रोडवर पांढरी वस्ती येथे सजन सीताराम नाईकवाडी यांची वस्ती आहे. घराजवळील विहीर आहे. त्या विहिरीला पाणी असून सुमारे नऊ परस विहीर खोदलेली आहे. अन्नपाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या मंगळवारी रात्री विहिरीत पडला. सकाळी साडेसातच्या सुमारास नाईकवाडी यांचा मुलगा योगेश हा रोजच्याप्रमाणे शेतात पाणी भरण्यासाठी विहिरीकडे गेला असता त्याना कपारीत असलेला बिबट्या त्याला दिसून आला. त्यावेळी बिबट्याने डरकाळी फोडल्याने त्याची घबराट झाल्यानंतर त्याने घराकडे धाव घेतली. वनविभागाचे अधिकारी वनपाल प्रीतेश सरोदे, अनिल साळवे यांनी सकाळी १० च्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.

बिबट्याचे दर्शन

घोटी : इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे व वैतरनानगर गावालगत बिबट्याचे भरदिवसा दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. बुधवारी सकाळी ८ ते ९ वाजे दरम्यान मुकणे धरणाच्या दिशेने एक बिबट्या येतांना शेतावर जाणाऱ्या काही महिलांनी पाहिला असता त्यांचीही काहीवेळ भंबेरीच उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव आंदोलन महत्त्वाचे

0
0

मालेगावी कामबंद आंदोलन

मालेगाव : श्वान दंश झाल्याने येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यास आलेल्या रुग्णाच्या सहकाऱ्याने परिचारिकेस शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने बुधवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. अखेर एक तास आंदोलन सुरू राहिल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारत संबंधित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या रुग्णालयात डॉक्टर्स तसेच अन्य कर्मचारी यांची रिक्त पदे असल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असल्याचा दावा केला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोखाली सापडून बालकाचा मृत्यू

0
0

नाशिक : छोटा हत्ती टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडल्याने दोन वर्षीय बालकाचा करुण अंत झाला. वडाळागावातील मेहबूबनगरमध्ये मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा अपघात झाला. इंदिरानगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. रय्यान रईस शेख (वय २, रा. मदिनानगर, वडाळागाव) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. सत्तार मुनाफ शेख (वय ४२, रा. मदिनानगर, वडाळागाव) यांनी घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रय्यान हा मंगळवारी त्याच्या काकांसमवेत मेहबुबनगरमध्ये आला होता. काकांनी त्याला खाऊ घेऊन दिला. रय्यान खाऊ खात असताना काका कामानिमित्त घरातून बाहेर पडले. ते त्यांच्या छोटा हत्ती टेम्पोमध्ये जाऊन बसले. मागोमाग रय्यान घरातून बाहेर आल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही. टेम्पो सुरू केला असता तो चाकाखाली सापडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक होणार विकासाचे केंद्र

0
0

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री सिंह यांचे स्पष्टीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबमुळे नाशिक हे विकासाचे केंद्र होईल. आसपासच्या उद्योजकांना फायदा होईल. नवीन इलेक्ट्रिकल उद्योग येथे येतील, असे सांगत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांनी या लॅबचे महत्त्व स्पष्ट केले. केंद्रीय विद्युत अणुसंधान ही संस्था फक्त टेस्टिंग पुरती मर्यादित नसून ती संशोधन सुद्धा करते. या संस्थेत देशातील कामांबरोबरच विदेशातील इलेक्ट्रिकल उपकरणेही येथे टेस्ट केली जातात. त्यामुळे तिचे महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील शिलापूर येथे राज्यातील पहिल्या केंद्रीय इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबच्या कामाच्या भूमिपूजन सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, योगेश घोलप, ऊर्जा मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार राज पाल, सीपीआरआयचे महासंचालक व्ही. एस. नंदकुमार, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी सिंह यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली. आतापर्यंत काँग्रेस सरकारने ७० वर्षात काय केले? हजारो घरात वीज कनेक्शन नव्हते. पण, एक हजार दिवसात वीज कनेक्शन सर्वापर्यंत पोहचवण्याचे काम सरकारने हाती घेतले आणि ९८७ दिवसात वीज पोहचवली. आता देशातील सर्व गावात वीज दिसते. त्यासाठी सॅटेलाईट फोटो बघितल्यास ते चित्र समोर येते. आम्ही २ कोटी ५५ लाख घरात वीज दिली. अजूनही ६० हजार घरे बाकी आहेत. महाराष्ट्रतही साडेबारा लाख कनेक्शन १० महिन्यात दिल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार गोडसे यांनी नाशिक हे इलेक्ट्रिकल हब होईल, असे सांगत या प्रकल्पासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.

दोन हजार कोटी देणार

आतापर्यंत प्रत्येक गावात वीज जोडणी देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेव्यतिरक्त ८०० कोटी रुपये देण्यात आले आहे. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रीड स्वतंत्र करण्यासाठी आणखी दोन हजार कोटी देण्यात येतील असे आश्वासनही सिंह यांनी यावेळी दिले.

अशी असेल लॅब

१०० एकर जागेवर केंद्रीय विद्युत अणुसंधान संस्थेमार्फत ११५ कोटी खर्च करून पश्चिम विभाग केंद्रीय इलेक्ट्रिकल टेस्टिगं लॅब येथे होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र व आजूबाजूच्या राज्यांनाही या लॅबचा फायदा होणार आहे. आतापर्यंत इइलेक्ट्रिकल वस्तूंचे टेस्टिंग करण्यासाठी बेंगळुरू, दिल्ली व भोपाळ येथे जावे लागत होते. पण, आता राज्यातील सर्वांना या लॅबचा फायदा होणार आहे. या लॅबच्या पहिल्या टप्यात ट्रान्सफॉर्मर, विद्युत मीटर, ट्रान्सफॉर्मर ऑइल, स्वीच गिअर टेस्टिंगची सुविधा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images