Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नवनगरे विकसितची जबाबदारी निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ठाणे आणि नाशिक या दोनच जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्र असून, नवनगरे विकसित करण्यात येणाऱ्या अडचणी चर्चेतून दूर करण्याची जबाबदारी अपर जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचे आदेश शनिवारी निर्गमित केले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महामार्गावर २४ ठिकाणी नवनगरे (कृषी समृद्धी केंद्रे) स्थापित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यापैकी १७ नवनगरांसाठी जागा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. जमीनमालक किंवा हितसंबंधित व्यक्तींच्या जमिनींचा वापर नवनगरे विकसित करण्याकरिता केला जाणार आहे. दहा जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार असला तरी पेसा क्षेत्र ठाणे आणि नाशिक या दोनच जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे तेथे ग्रामसभेच्या मंजुरीसह अन्य काही मुद्दे उपस्थित झाल्यास हा प्रश्न चर्चेद्वारे हाताळून नवनगरांच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी अपर जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. अवर सचिव रामचंद्र जोशी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

..

ठाण्यात दोन नवनगरे

ठाणे जिल्ह्यात महामार्गावर दोन ठिकाणी नवनगरे विकसित करण्यात येणार आहेत. परंतु, नाशिक जिल्ह्यात सुरुवातीपासूनच या नवनगरांकरिता जमिनी देण्यास शेतकऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात या महामार्गावर एकही नवनगर विकसित केले जाणार नसल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. भविष्यात नवनगर विकसित करण्याचा मुद्दा पुढे आलाच तर संबंधित शेतकऱ्यांशी संवादातून तोडगा काढण्याची जबाबदारी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पार पाडावी, असे या आदेशात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाडगाव येथे शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक तालुक्यातील वाडगाव येथील वामन सदू निंबेकर (वय ६५) या ज्येष्ठ शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली. यामुळे चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सहा झाली आहे. निंबेकर यांनी २४ जानेवारी रोजी विषारी औषध सेवन केले. कुटुंबीयांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना १ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी आत्महत्येचा प्राथमिक अहवाल नाशिक तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. निंबेकर यांच्याकडे गट क्रमांक १३७ सामाईक क्षेत्र १ हेक्टर ४९ आर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आत्महत्येची कारणे समजून घेऊन सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वत:सह विश्वासाठी पर्यावरण संतुलन गरजेचे

$
0
0

परिसंवादातील तज्ज्ञ मंडळींचा सूर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरणाचे संतुलण राखणे हे स्वत:साठी, शहरासाठी, राज्यासाठी, देशासाठी व विश्वासाठी गरजेचे आहे. परमेश्वर हा पर्यावरणातून दिसून येतो, त्यामुळे पर्यावरणाला सर्वांनी महत्त्व देण्याची गरज असल्याचे सांगत पर्यावरणातील तज्ज्ञ शिवाजीराव पालव, कौस्तूभ ताम्हणकर, संतोष तोत्रे यांनी पर्यावरणाचे महत्त्व विषद केले.

जीवनविद्या मिशनतर्फे शंकराचार्य न्यास येथे आयोजित 'पर्यावरण हाच नारायण' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी या प्रमुख वक्त्यांची मुलाखत जीवनविद्या मिशनचे आनंद राणे यांनी घेतली. या परिसंवादात निसर्ग व पर्यावरणात काय फरक आहे? अध्यात्म, विज्ञान व पर्यावरण, घनकचराचे महत्त्व असे विविध प्रश्न विचारून आनंद राणे यांनी मुलाखतीतून हा परिसंवाद घडवून आणला. यावेळी 'नियोजन करणारा तो निसर्ग' आणि 'नियोजनानुसार जो चालतो ते पर्यावरण' असे सांगत पर्यावरणाचा विषय सोप्या शब्दात या वक्तांनी मुलाखतीतून मांडला. निसर्ग दिसतो व पर्यावरण असतो असे सांगत. निसर्ग व पर्यावरण हेच नारायण असल्याचेही सांगण्यात आले.

परिसंवादापूर्वी 'हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्य दे' ही प्रार्थना सर्वांनी म्हणत या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी जीवनविद्याचे तत्वज्ञ, समाजसुधारण सद्गुरू वामनराव पै यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. त्यानंतर परिसंवादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष शांताराम काळे, सचिव दिलीप कुलकर्णी, सुरेश देवरे, सुनील बेळे, राजेश जोशी, जयंत जोशी, चारुलता पगार, रवी सूर्यवंशी यांनी केले.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ कारणावरून हत्या करण्यात आलेल्या शैलेश दत्तात्रय सासे (२६) या तरुणाच्या हत्येप्रकरणी कोर्टाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. साठे चौकातील किटकॅट दुकानासमोर शैलेशची ३१ मे २०१५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास निघुर्ण हत्या झाली होती.

संतोष कोतवाड (२१, रा. काठेगल्ली, द्वारका), अक्षय युवराज पाटील (२०, रा. श्रमिकनगर, सातपूर) आणि काऊ उर्फ फ्रान्सिस पॅट्रिक मॅनवेल (२१, रा. अरिंगळे मळ्याजवळी झोपडपट्टी, एकलहरे) अशी जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोई गल्लीत राहणाऱ्या आणि मासे विक्रीचा व्यवसाय असलेला शैलेश व साजन मोहन ठाकरे हे दोघे भाऊ घटनेच्या दिवशी सागर रसवंती आणि कोल्ड्रीक्स या दुकानात गेले होते. या ठिकाणी शैलेशने पाण्याच्या बॉटल्स घेऊन काऊंटरवर ठेवल्या. त्यास संतोष कोतवाडचा धक्का लागून बॉटल्स खाली पडल्या. याचा शैलेशने जाब विचारला असता संतोषने बाहेर उभ्या असलेल्या साथिदारांना बोलावून घेतले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत शैलेशला मारत रस्त्यावर आणले. तिथे त्याच्यावर चॉपरने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या शैलेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संशयित पळून गेले.

या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक वाल्मीक पाटील, निरीक्षक महादेव ढाकणे, सहायक निरीक्षक विलास शेळके आदींनी वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने तपास करीत फरार आरोपींना अटक केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश जी. पी. देशमुख यांच्या कोर्टात पार पडली.

१३ साक्षीदारांचा जबाब

विशेष सरकारी वकील अॅड. दीपशीखा भीडे यांनी १३ साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने समोर आणलेल्या साक्षी पुराव्यांनुसार कोर्टाने तिघा आरोपींना दोषी ठरवित जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी विभागाचे हवालदार आय. एस. पिरजादे व पोलिस शिपाई एस. आर. साळवे यांनी खटल्याचा पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसायकर नोंदणीसाठी अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यवसायकर कायद्यांतर्गत नावनोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती किंवा मालकांना नोंदणी करून करभरणा करणे आवश्यक आहे. व्यवसायकर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसायकर विभागातर्फे ८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत अभियान राबविण्यात येणार आहे.

व्यवसायकर विभागातर्फे 'शासन आपल्या दारी' उपक्रमांतर्गत अधिकारी व्यवसायाच्या ठिकाणी भेट देणार आहेत. व्यवसाय अनोंदीत असल्यास जागेवर नोंदणी करून घेतील. बाजारपेठा, मॉल, औद्योगिक वसाहत आदी ठिकाणी नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याबाबतची माहिती www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. द्वारका येथील वस्तू व सेवाकर कार्यालयात याकरिता मदतकक्ष सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रात १ एप्रिल १९७५ पासून व्यवसायकर कायदा लागू आहे. १ जुलै २०१७ पासून जीएसटी आल्यावर व्यवसायकर रद्द झाल्याबाबत माहितीमध्ये तथ्य नाही. व्यवसायकर कायद्यांतर्गत नावनोंदणी अद्यापही सुरू असून, जीएसटीखाली नोंदणीकृत असलेल्या व्यावसायिकांनी व्यवसायकर कायद्याअंतर्गत नोंदणी घेणे आवश्यक आहे. व्यवसायकर क्रमांक घेतलेल्यांनी विहीत मुदतीत कर भरणे आवश्यक असल्याचे व्यवसायकर सहआयुक्त उदय संकपाळ यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार पीडित अल्पवयीन युवती गर्भवती

$
0
0

अंबडमध्ये गुन्हा दाखल; संशयित आरोपी फरार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुटुंबाला मारून टाकीन, अशी धमकी देत १६ वर्षांच्या युवतीवर एका संशयिताने वारंवार बलात्कार केला. यामुळे गर्भवती राहिलेल्या शुक्रवारी (दि.१) तिने एका अर्भकास जन्म दिला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाळंतपण झाल्याने ही घटना पोलिसांपर्यंत पोहचली. त्यानुसार, अंबड पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बलात्काराची घटना समोर आली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध बलात्कारसह पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केले. मात्र, संशयित आरोपी मागील दोन महिन्यांपासूनच बेपत्ता झाला आहे.

खंडू भोये, असे संशयिताचे नाव असून, तो वेठबिगादार आहे. घटनेतील पीडिता १६ वर्षांची असून, ती आई-वडिलांसह उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉलजवळील भागात राहते. वेठबिगारी करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबाशी खंडू भोये या वेठबिगाराचा संबंध येत होता. याचा फायदा घेत खंडूने १ मे २०१८ ते १ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत युवतीला मारण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्या घरी व स्वत:च्या घरी नेत बलात्कार केला. कालांतराने युवती गर्भवती राहिली. ही बाब लक्षात आल्याने खंडू दोन महिन्यांपासून बेपत्ता झाला. पीडतेच्या पोटात दुखू लागल्याने आईवडिलांनी तिला उपचारासाठी शुक्रवारी (दि.१) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तिचे बाळंतपण झाले. मात्र, पीडतेच्या वयाबाबत सिव्हिल प्रशासनाला संशय आला. त्यांनी प्राथमिक चौकशी करून ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार अंबड पोलिस सिव्हिलमध्ये पोचले. मात्र, याबाबत काहीही बोलण्यास कुटुंबियांनी नकार दिला. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य समजावून सांगितल्यानंतर त्यांनी फिर्याद दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस फरार झालेल्या खंडूचा शोध घेत आहेत.

..

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या कल्याण येथील उमडेगाव येथे राहणाऱ्या संशयिताविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चैतन्य किशोर चौधरी (३०, रा. बी-७०४, उमडेगाव, कल्याण, जि. ठाणे) असे संशयिताचे नाव आहे. चैतन्यने ८ मे ते ३० जून २०१८ या कालावधीत जुन्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. संशयित चैतन्य याने ३० जून २०१८ रोजी तरुणीच्या रूमवर आल्यावर तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या नाशिक येथे राहणाऱ्या नातेवाइकांच्या घरी नेले आणि तेथे तिच्यावर तीन महिने लैंगिक अत्याचार केले. याच दिवशी मोबाइल घेण्याच्या कारणातून त्याने तिला मारहाण केली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी बलात्कारचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक छाया पिंपरे करीत आहेत.

..

मुलीस पळविण्याचा प्रयत्न

रस्त्याने पायी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा कारचालकाचा प्रयत्न फसला. कुटुंबीयाच्या सतर्कतेमुळे पुणे येथील कारचालक पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रम विजय पोले (२९ रा. काळेवाडी, पुणे) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१) मदिना चौकात घडली. सारडा सर्कल येथील शाळेतून घराकडे परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा संशयिताने कारने (एमएच १२ पीक्यू ९२०१) पाठलाग केला. रस्त्यात कार थांबवून तुझी मैत्रीण मागे आहे, तू मागे बस असा आग्रह करीत त्याने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने थेट आपल्या घराकडे धूम ठोकल्याने संशयिताने पुन्हा तिचा पाठलाग केला. मदिना चौकात आपल्या घरात गेल्यावर तिने आपल्या कुटुंबियांना आपबिती कथन केली. त्यामुळे संशयित पोलिसांच्या हाती लागला. कुटुंबियांनी सतर्कता दाखवित वाहन वळवितांना त्यास पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. अधिक तपास उपनिरीक्षक सोनोने करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅनॉल रोड भागात बिबट्याचा लपंडाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाइपलाइन रोड परिसरातील कॅनॉल रोड भागात बिबट्या पाहिल्याचा दावा नागरिकांनी केल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी सांगितलेल्या विविध ठिकाणी वन विभागाने शनिवारी दुपारी शोधमोहीम राबवली. तब्बल तीन तास रंगलेल्या या शोधाशोधीत बिबट्या वन विभागाच्या निदर्शनास आला नाही. पण, यात वन विभागाच्या यंत्रणेची नाहक धावपळ झाली.

गंगापूर रोडवरील सिरीन मिडोज्, पाइपलाइन रोड येथील कॅनॉल रोड, प्रोफेसर कॉलनी या भागात शनिवारी सकाळी १० वाजेपासून बिबट्या दिसत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास विज्डम हायस्कूलमध्ये बिबट्या शिरल्याची ओरड झाली. त्यामुळे वन विभागाची यंत्रणा तत्काळ त्या ठिकाणी धावली. बराच वेळ हायस्कूल व प्रोफेसर कॉलनी परिसरात बिबट्याचा शोध घेतला. मात्र, बिबट्याच्या पाऊलखुणा वन विभागाला आढळल्या नाहीत. त्यानंतर १ वाजेच्या सुमारास गणेशनगर परिसरातील खांदवे नगर भागात एका शेतात बिबट्या पाहिल्याचे नागरिकांनी सांगितले. वन विभागाने लागलीच तेथे धाव घेतली. त्या ठिकाणीदेखील बिबट्या आढळून आला नाही. त्यानंतर कॅनॉल रोड परिसरात नुकताच बिबट्या पाहिल्याचे एका तरुणाने वनधिकाऱ्यांना सांगितले. त्या तरुणाला घेऊन वन विभागाने कॅनॉल रोड परिसरात पुन्हा शोधमोहीम राबविली. मात्र, तेथील नागरिकांनी बिबट्या पाहिलाच नसल्याचा दावा केला. वन विभागालाही बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले नाहीत. अखेरीस दुपारी तीन वाजता परिसरात बिबट्या असल्याची अफ‌वा काही नागरिकांकडून पसरविली जात असल्याचे वन विभागाने सांगितले. तब्बल तीन तास चाललेल्या बिबट्या शोधमोहीमेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाल्याचे दिसून आले. वनरक्षक सचिन आहेर, उत्तम पाटील यांसह इतर वनरक्षकांनी ही शोधमोहीम राबविली.

\Bबघ्यांची गर्दी\B

बिबट्या दिसला किंवा त्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. शनिवारीदेखील वन विभागाची शोधमोहीम सुरू असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली. त्या गर्दीमुळे अफवा पसरण्याचे प्रमाण वाढते. रेस्क्यू ऑपरेशन किंवा शोध मोहीम राबविण्यात अडचणी येतात. त्यामुळे बिबट्या दिसल्याचे समजल्यास त्या ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा नागरिकांनी सुरक्षित राहण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

\B'बिबट्या'चा फोटो व्हायरल\B

शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर विज्डम हायस्कूल परिसरात बिबट्या असल्याचा फोटो व्हायरल झाला. गंगापूर, गोवर्धन परिसरातून हा बिबट्या तिथे आला असून, परिसरात नागरिकांना जाण्यास बंदी केल्याचा मेसेजही फोटोसोबत व्हायरल झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र, स्थानिकांनी बिबट्या पाहिलाच नसल्याचा दावा केला.

\Bमखमलाबादमध्येही दर्शन

\Bमखमलाबाद येथील कोठुळे मळा परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसल्याचा दावा परिसरातील काही नागरिकांनी केला. वन विभागाने त्या ठिकाणी बिबट्याचा शोध घेतला. पण, तो सापडला नाही. गोवर्धन शिवारात लावलेल्या पिंजऱ्याज‌वळ बिबट्या येऊन गेल्याचा दावा स्थानिकांनी केला. पण, वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला नसल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री २ वाजेच्या सुमारास सिरीन मिडोज परिसरात बिबट्या असल्याचा फोन आला. तेव्हाही आमच्या पथकाने शोधमोहीम केली. बिबट्याच्या शोधात गोवर्धन, मखमलाबाद, नदीकाठचा परिसर, गंगापूर, चांदशी परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. पण, बिबट्या असल्याची खात्री झाल्याशिवाय मेसेज व्हायरल करु नयेत.\B

\B- रवींद्र सोनार, वनपाल, पश्चिम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाची अंत्ययात्रा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पूर्ववत सुरू करण्याबाबत महासभेने ठराव देऊनही प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शनिवारी महापालिका मुख्यालयावर प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध केला. यावेळी पालिका मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पटसंख्या कमी असल्याचे कारण देत ४१३ पैकी १३६ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे १३६ मदतनीस आणि सेविका असे २७२ जणांना कामावरून कमी करण्यात आले होते. परंतु, बंद केलेल्या या अंगणवाड्या पूर्ववत सुरू करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने करून प्रशासनाला निवेदने सादर केली. सत्ताधारी भाजपनेदेखील या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी ठराव करून प्रशासनाला दिला होता. पटसंख्येबाबत सर्वेक्षण करण्याचेही आदेश दिले होते. तथापि, त्याची प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने या कर्मचाऱ्यांकडून अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. तरीही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारी (दि.२) भारतीय हितरक्षक सभेचे प्रमुख किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी प्रशासनाच्या निषेधाच्याही घोषणा यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांबरोबरच भारतीय हितरक्षक सभेचे कृष्णा शिंदे, शरद जाधव, भागवत गांगुर्डे, विकास रोकडे, सचिन भरीत, संजय गायकवाड, ज्ञानेश्वर भालेराव, दीपक अचलखांब, सचिन जाधव, राजेंद्र मोहिते, समाधान तायडे आदी सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या

अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची पटसंख्या किमान १५ व जास्तीत जास्त २० करण्यात यावी. यासंदर्भातील ठराव मंजुरीचा अधिकार महासभेला दिला जावा. लोकसंख्येच्या निकषांनुसारच अंगणवाड्यांची पुनर्रचना केली जावी. अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. कर्मचाऱ्यांना १९९४ पासून भविष्य निर्वाह निधी लागू न केल्याने सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यावर कोसळणारे आर्थिक संकट लक्षात घेता आर्थिक सहाय्य योजना लागू करावी. त्यांच्यासाठी शैक्षणिक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाव्यात अशा मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरिकांना करदिलासा?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेल्या आदेश क्र. ५२२ नुसार नवीन तसेच जुन्याही मिळकतींच्या सामासिक अंतर, पार्किंग क्षेत्रावर लागू केलेली घरपट्टी रद्द होण्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबतची फाइल नगररचनाकडून विधी विभागाकडे रवाना झाली आहे. विधी विभागाच्या अभिप्रायानंतर यावर अंतिम निर्णय होणार असल्याने नागरिकांना करदिलासा मिळणार आहे.

तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिल २०१८ पासून नव्याने अस्तित्वात येत असलेल्या नवीनसह जुन्या मिळकतींवरही भरमसाठ कर लागू केला होता. प्रस्तावित ३३ ते ८२ टक्के करवाढीचा प्रस्ताव महासभेने फेटाळून लावल्यानंतर मुंढे यांनी करवाढीचा एकतर्फी निर्णय घेत, सर्वच मिळकती कराच्या जाळ्यात आणल्या होत्या. नवीन मिळकतींचे करयोग्य मूल्य ५ रुपये चौरस मीटरवरून थेट २२ रुपये चौरस मीटर केले गेले. त्यामुळे ८०० चौरस फुटाला पूर्वी येणारी तीन हजारांची घरपट्टी थेट २० ते २२ हजारांवर गेली होती. पार्किंग, सामासिक अंतरालाही कर लागू केला. कार्पेट एरियावर लावण्यात येणारी घरपट्टी थेट बिल्टअप एरियावर लागू केली होती. त्यामुळे घरपट्टीत २० टक्के वाढ झाली होती. या करवाढीविरोधात आगडोंब उसळल्यानंतर मुंढे यांनी यात ५० टक्के कपात केली होती. परंतु, ही ५० टक्के वाढही नागरिकांना असह्य झाली होती. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या कार्यकाळात करवाढ रद्द करण्यात आली होती. त्यानुसार गमेंनी याबाबत दिलासा देण्याची तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या उत्पन्नाचा विचार करून सरसकट वाढ रद्द न करता त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून घरपट्टीत दिलासा देण्यासाठी नगररचना व विधी विभागाचा अभिप्राय घेण्याचे त्यांनी ठरवले. बांधकाम नियमावलीबाबत नगररचना विभागाला तांत्रिक ज्ञान असल्यामुळे त्यांच्याकडून पार्किंग, सामासिक अंतरावरील घरपट्टी तसेच बिल्टअप व कार्पेट एरियासंदर्भात अभिप्राय मागवला आहे. यात नगररचना विभागाने कार्पेटवरच करआकारणी करण्यावर भर देत पार्किंग व सामासिक अंतरावर कर लावणे चुकीचे असल्याचे मत नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. पार्किंग आणि सामासिक अंतर हे विकास नियंत्रण नियमावलीचाच भाग असल्याचे स्पष्ट केल्याने यातून नागरिकांची सुटका होऊ शकणार आहे.

आयुक्त घेणार निर्णय

नगररचना विभागाच्या या अभिप्रायानंतर ही फाइल आता विधी विभागाकडे गेली आहे. विधी विभागाच्या अहवालानंतरच याबाबतच अंतिम निर्णय होणार आहे. विधी विभागाच्या अभिप्रायानंतर आयुक्तांकडे ही फाइल अंतिम निष्कर्षासाठी जाणार आहे. आयुक्तांच्या सकारात्मक निर्णयानंतरच नागरिकांची जाचक करवाढीतून सुटका होण्याची आशा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडीवासियांचे आंदोलन

$
0
0

झोपडीवासियांचे आंदोलन

नाशिक : शहरातील झोपडपट्टीवासियांच्या संविधानिक मूलभूत अधिकाराची महापालिका प्रशासनाकडून पायमल्ली केली जात असल्याचा गंभीर आरोप करत झोपडपट्टीवासियांनी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनासमोर धरणे आंदोलन केले. पंचवटी विभागातील शाहूनगर, रमाबाई आंबेडकरनगर, म्हसरूळ राजवाडा, नाशिकरोड विभागातील चव्हाणमळा, सामनगाव रोड, हनुमाननगर आदी भागातील नागरिकांना प्रशासन मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत आहे. दलितवस्ती सुधार योजना, आदिवासी उपाययोजना, तांडा वस्ती सुधार योजना आदींच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इलेक्ट्रिक मोटार पळसेमध्ये लंपास

$
0
0

इलेक्ट्रिक मोटार

पळसेमध्ये लंपास

नाशिकरोड : पळसे येथील साखर कारखाना परिसरातील सध्या बंद स्थितीत असलेल्या श्री ब्लॅक स्टोन मेटल या खडी क्रशरच्या तीन इलेक्ट्रिक मोटारींची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी मालक विजय निवृत्ती टर्ले (वय ५८, रा. मनीषा राजेंद्र कॉलनी, बिटको हॉस्पिटल शेजारी) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या खडी क्रशरच्या व्यवसायाच्या ठिकाणाहून एक ७० अश्वशक्तीची आणि दोन २० अश्व शक्तीच्या अशा तीन इलेक्ट्रिक मोटारींची अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी येथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला होता. या तिन्ही इलेक्ट्रिक मोटारींची किंमत ७० हजार रुपये इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानटपरीत चोरी

$
0
0

पानटपरीत चोरी

नाशिकरोड : देवळालीगाव रस्त्यावरील टाउन हॉलसमोरील सत्कार पॉईंटवर असलेल्या सत्कार पान स्टॉल या पानटपरीतून चोरट्यांनी ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पानटपरी चालक शेख अब्दुल समद हुसेन (वय ३८, रा. निशाद हौसिंग सोसायटी, विहितगाव) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या मालकीची पानटपरी चोरट्यांनी गुरुवारी रात्री फोडून आतील १५ हजार ५०० रुपयांच्या रोकडसह २० हजार ५०० रुपयांचे सिगारेटची ३०० पाकिटे, अत्तराच्या ७० बाटल्या आणि चॉकलेट बिस्किटे अशा स्वरुपाचे साहित्य चोरून नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट कारभार वादाच्या भोवऱ्यात

$
0
0

कर्जरोख्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्याची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी कंपनीकडून जादा दराच्या निविदांचा भार महापालिकेवर टाकण्याची तयारी सुरू झाल्यानंतर प्रशासनाची आर्थिक कोंडी होणार हे आता स्पष्ट झाले आहे. स्मार्ट सिटीतल्या प्रकल्पांसाठी आता तीनशे कोटींचे कर्जरोखे महापालिकेच्या माथी मारल्याचा प्रयत्न झाला तर, अतिरिक्त निधीचा प्रस्ताव महासभेवर सादर करावा, अशी मागणी स्मार्ट सिटीचे संचालक व नगरसेवक गुरूमित बग्गा यांनी केली आहे. तर काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीचे प्रकल्पच अडचणीत सापडला आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी एक हजार ८४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी केंद्र आणि राज्य सरकारकडून ९४४ कोटी रुपये शासन अनुदान प्राप्त होणार असून उर्वरित १४४ कोटींची तूट महापालिकेला भरून काढावी लागणार आहे. याशिवाय प्रोजेक्ट गोदा आणि गावठाण पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदा या अनुक्रमे ३८ आणि ६० टक्के जादा दराने आल्या आहेत. त्यामुळे १६० कोटींचा बोजा अतिरिक्त पडणार आहे. त्यामुळे ३०४ कोटींचा वाढीव बोजा भरून काढण्यासाठी म्युन्सिपल बॉण्ड काढण्याचा पर्याय स्मार्ट सिटी कंपनीने सुचविला आहे. त्यास स्मार्ट सिटीचे संचालक बग्गा व शाहू खैरे यांनी यांनी विरोध केला आहे. स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना होत असताना त्याचवेळी धोके लक्षात आणून दिले होते. परंतु, दुर्दैवाने ते खरे ठरताना दिसत असल्याचे बग्गा यांनी यावेळी सांगितले.

कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सध्याची आर्थिक परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप बग्गा यांनी केला. तसेच प्रत्येक कामाची स्वतंत्र निविदा काढली असती तर अनेक छोट्या ठेकेदारांना भाग घेता आला असता तसेच त्यातून कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्या असत्या असा दावाही त्यांनी केला. करारानुसार स्मार्ट सिटी कंपनीला प्रकल्पांवरचा अतिरिक्त खर्च महापालिकेला देणे बंधनकारक असले तरी सदरचा विषय महासभेवर चर्चेसाठी आला पाहिजे. तोपर्यंत एकाही कामाची निविदा काढू नये अशी मागणी बग्गा यांनी केली.

थेट पंतप्रधानांकडे तक्रार

स्मार्ट सिटी कंपनी मार्फत प्रोजेक्‍ट गोदा व गावठाण विकासासाठी काढण्यात आलेल्या निविदा ३८ आणि ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आल्यावर नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. स्मार्ट सिटी कंपनीचा एका मोठ्या एजन्सीला लाभ देण्यासाठीच निविदा उघडण्यात आल्या. या संदर्भात पंतप्रधांनांशी पत्रव्यवहार करून चौकशीची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाकवी कालिदास कला मंदिर, महात्मा फुले कलादालन आणि नेहरू उद्यानाच्या कामात अनेक त्रुटी आहेत. दोन वर्षात कंपनीने काम न केल्यास बरखास्त करता येते. परंतु, तीन वर्षे होऊनही कंपनीकडून समाधानकारक काम झालेले नाही. त्यामुळे प्रोजेक्‍ट गोदा, गावठाणाच्या निविदांमध्ये त्रुटी असल्याने कंपनी बरखास्त करावे.

- शाहू खैरे, गटनेते, काँग्रेस

स्मार्ट सिटी योजनेत कुठली कामे घेतली पाहिजे याचा ताळमेळ नाही. नेहरू उद्यान, कालिदास कलामंदिर तसेच सुस्थितीत असलेला अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानचा स्मार्ट रस्त्याचे काम सध्या सुरु आहे. वास्तविक या कामांवर निधी खर्च करण्याची गरज होती का? स्मार्ट प्रकल्पांच्या निविदा काढताना फुगविलेले इस्टिमेट, चुकीच्या पद्धतीने निधीचा विनियोग याबाबी आक्षेपार्ह आह. या कामांची चौकशी होणे गरजेचे आहे.

- डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवाब मलिक यांचा निषेध

$
0
0

मलिक यांचा निषेध

नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आंदालने पैशांसाठी आणि तडजोडीसाठी असतात, असे निराधार आरोप करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हजारे हे जनहितासाठी आंदोलन करतात. त्यांच्यावर असे बेछूट आरोप करणे क्लेशदायक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

$
0
0

मनमाड व्यापारी महासंघाची मागणी

...

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रस्त्यावरील बेफाम वळूने दिलेल्या धडकेत येथील व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेत आठ दिवसांत रस्त्यांवरील मोकाट जनावरांना आवरा, अन्यथा व्यापारी महासंघातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनमाड नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. या निमित्ताने मनमाडमधील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

मनमाडच्या विविध चौकात जनावरांचे साम्राज्य असते. वाहनधारक व पादचारी यांना या जनावरांच्या फ्रीस्टाइल झुंजीने जीव मुठीत धरून जावे लागते. याकडे वेळोवेळी पालिकेचे लक्ष वेधण्यात आले. निवेदने, तक्रारी देण्यात आल्या, पण हा प्रश्न जैसे थे असल्याचे दिसते. दरम्यान, वळूच्या धडकेत येथील ज्येष्ठ व्यापारी झुंबरलाल बेदमुथा यांचा मृत्यू झाल्याने पालिका प्रशासनाविरोधात नाराजी व संतापाची लाट उसळली असून, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांची भेट घेऊन मोकाट जनावरांचा आठ दिवसांत बंदोबस्त करा, अन्यथा व्यापारी महासंघातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी राजकमल पांडे, सुरेश लोढा, रईस फारुकी, दिनेश व्यवहारे, गुरूदीपसिंग कांत, कुलदीप चोटमुरादी, मनोज जंगम, फिरोज अत्तार, रवी लोढा आदी उपस्थित होते.

..

रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न नागरिकांना भेडसावणारा असून, जीवावर उठणारा आहे. यापूर्वीच

अशा जनावरांच्या बंदोबस्त करण्याबाबत ऑक्टोबर २०१७ मध्येच काही नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेण्यात आली नाही. ज्येष्ठ व्यापाऱ्याचा वळूच्या हल्ल्यात झालेला मृत्यू हा पालिकेच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे झाल्याची जनतेत भावना आहे. तसे पुन्हा होऊ नये, यासाठी तातडीने उपाय योजले जावेत.

- राजाभाऊ पारीक, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सेट’चे अर्ज भरण्यास २१ फेब्रुवारीपर्यंत संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहाय्यक प्राध्यपक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेसाठी (सेट) अर्ज भरण्यास दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. यंदा प्रथमच ही परीक्षा नेट परीक्षेच्या धर्तीवर पार पडणार आहे. नेट प्रमाणेच यंदापासून सेटसाठीही आता दोनच पेपर असणार आहेत.

२३ जून रोजी होणारी ही ३५ वी सेट परीक्षा आहे. या परीक्षेचे वेळापत्रक पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना २१ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. पहिल्या प्रश्नपत्रिकेत ६० ऐवजी ५० प्रश्न असतील. हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील. तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना १०० प्रश्न सोडवावे लागतील. सेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून सहा टक्के उमेदवार पात्र ठरविले जाणार आहेत. खुल्या वर्गासाठी ४० टक्के तर आरक्षित प्रवर्गासाठी ३५ टक्के गुण मिळविण्याचे निकष यासाठी लावण्यात आले आहेत. अधिक माहिती किंवा ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांना http://setexam.unipune.ac.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल.

असा आहे बदल

सेट परीक्षेसाठी यापूर्वी तीन पेपर सक्तीचे होते. आता या रचनेत नेटच्या धर्तीवर बदल करण्यात आला असून उमेदवारांना दोनच पेपरला सामोरे जावे लागेल. अगोदरची परीक्षा ३५० गुणांसाठी होती तर आता ३०० गुणांसाठी ही परीक्षा पार पडणार आहे. पेपर क्रमांक १ हा १०० गुणांसाठी तर पेपर क्रमांक २ हा २०० गुणांसाठी पार पडणार आहे. यंदा नेट परीक्षा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती; पण सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे. पुढील वर्षी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची शक्यता आहे.

असे आहे पेपरचे स्वरूप

पेपर ......................एकूण प्रश्न........गुण

पेपर क्रमांक १..........५० ..............१००

पेपर क्रमांक २ .........१०० ............२००

एकूण गुण ..................................३००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ५७,६७२ युवा मतदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेमध्ये ५७ हजार ६७२ युवा मतदारांनी आपली नावे नोंदविली आहेत. १८ ते १९ वर्षे वयोगटातील हे युवक-युवती यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, एप्रिलमध्ये कधीही या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. याच वर्षात विधानसभा निवडणुकीचाही धुरळा उडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबविण्यात आली. १ जानेवारी २०१९ या दिनांकाला वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवा मतदारांना मतदार नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हाभरातून या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑनलाइन पध्दतीने तसेच त्या त्या विधानसभा मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये जाऊन मतदार नोंदणी करण्यास युवकांनी पसंती दिली. सप्टेंबर २०१८ मध्ये मतदार पुनरीक्षण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. १ जानेवारी २०१९ या दिनांकाला वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे युवक-युवती मतदार नोंदणी करू शकतील, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३५ हजार ९०० युवकांनी, तर २१ हजार ७७१ युवतींनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून मतदार नोंदणी करवून घेतली.

..

मालेगाव मध्यमध्ये सर्वाधिक युवा मतदार

जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघ असून, मालेगाव मध्य या मतदारसंघामध्ये सर्वाधिक ५ हजार १४ युवा मतदारांनी मतदारनोंदणी केली आहे. त्यामध्ये २ हजार ८७९ युवकांनी, तर २ हजार १३४ युवतींनी मतदार नोंदणी केली. त्या खालोखाल नाशिक पूर्वमध्ये ४ हजार ७४८ युवा मतदारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये २ हजार ७३७ युवक, तर २ हजार ११ युवतींनी मतदार नोंदणी करवून घेतली आहे. देवळालीत सर्वात कमी २ हजार ९३१ युवा मतदार आहेत. यामध्ये १ हजार ७८२ युवक तर १ हजार १४९ युवतींचा समावेश आहे. बागलाण तालुक्यात १८ ते १९ वयोगटातील युवती मतदारांची संख्या अवघी ९८३ आहे.

..

विधानसभा मतदारसंघनिहाय युवा मतदारांची संख्या

मतदार संघ युवक युवती एकूण

नांदगाव २४६३ १३७५ ३८३८

मालेगाव मध्य २८७९ २१३४ ५०१४

मालेगाव बाह्य २१३० १३१० ३४४०

बागलाण १९९२ ९८३ २९७५

कळवण २२८५ १४७९ ३७६४

चांदवड २६०९ १२०४ ३८१३

येवला २१७१ १०२४ ३१९५

सिन्नर २२२९ १२०१ ३४३०

निफाड २४८३ १२८५ ३७६८

दिंडोरी २७०१ १५४० ४२४१

नाशिक पूर्व २७३७ २०११ ४७४८

नाशिक मध्य २४०२ १८०६ ४२०८

नाशिक पश्चिम २२७३ १४९० ३७६३

देवळाली १७८२ ११४९ २९३१

इगतपुरी २७६४ १७८० ४५४४

एकूण ३५९०० २१७७१ ५७६७२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इतिहास अन् भूगोल कृतिपत्रिकेवर आज मार्गदर्शन

$
0
0

महाराष्ट्र टाइम्स व रेषा सेंटरचा उपक्रम

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी रेषा एज्युकेशन सेंटर व महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आज (३ फेब्रुवारी) इतिहास आणि भूगोल या विषयाच्या कृतिपत्रिका मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोड येथील रेषा सेंटर येथे ४ ते ७.३० या वेळेत हे सत्र होणार आहे.

दहावीची पारंपरिक परीक्षा पध्दती आणि कृतिपत्रिका पध्दती यांच्यातील फरक, कृतिपत्रिका सोडविताना घ्यायची काळजी आदी मुद्द्यांबाबत इतिहास आणि भूगोल या विषयाचे शिक्षक 'समजावून घेऊ या कृतिपत्रिका' या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व पालकांशी संवाद साधतील. इतिहास विषयासाठी पुरुषोत्तम ठोके हे दुपारी ४ ते सायंकाळी ६ आणि भूगोल विषयासाठी सदिच्छा पवार या सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत मार्गदर्शन करतील. कृतिपत्रिका सोडविण्यासाठी आवश्यक घटक कोणते, त्यांची तयारी पालकांनी कशी करून घ्यावी, विद्यार्थ्यांनी कुठल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे आदी विषयांवर या उपक्रमात पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमात विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला जाईल. हा सर्व उपक्रम ३ बी, कौस्तुभ, एस. टी. कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे. सत्रात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी इच्छुकांनी ९८५००१९६०६ किंवा ९८२२०११९६७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडे तक्रार दिल्याने मारहाण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसात तक्रार दाखल केल्याच्या कारणातून त्रिकुटाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना हमालवाडी भागात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सागर येलमामे, सागर कडक्या, पप्पू रणमाळे (रा. हमालवाडी) अशी मारहाण करणाऱ्या टोळक्याची नावे आहेत. मखमलाबाद रोडवरील हमाल सोसायटीत राहणारे सचिन दशरथ आमटे या युवकाने या प्रकरणी तक्रार दिली. गुरुवारी रात्री आमटे मार्केट यार्डातील काम आटोपून आपल्या घराकडे जात असताना ही घटना घडली. पाटाजवळच्या हमालवाडी पाटावर सागर येलमामे याने रस्ता अडवून माझ्या मावस भावाविरुध्द पोलिसात तक्रार का दाखल केली असा जाब विचारीत शिवीगाळ करून दोघा साथीदारांच्या मदतीने लाकडी बॅटने बेदम मारहाण केली. अधिक तपास हवालदार ढुमसे करीत आहेत.

...

रिक्षा अडवून प्रवाशास मारहाण

रिक्षा अडवून चौघांच्या टोळक्याने प्रवाशास बेदम मारहाण केली. ही घटना त्र्यंबकरोडवरील श्रीराम चौकात घडली. या घटनेत प्रवाशाच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आसिफ अश्पाक शेख, शाकिब अश्पाक शेख (रा. गुलशननगर, वडाळानगर) आणि त्यांचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. वडाळागावातील महेबूबनगर भागात राहणाऱ्या हुसेन युसूफ शहा या युवकाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हुसेन शहा बुधवारी रात्री मित्र सादिक तांबोळी याच्या ऑटोरिक्षातून प्रवास करीत असताना ही घटना घडली. दोघे मित्र सातपूर येथून आनंदवलीच्या दिशेने प्रवास करीत असताना श्रीरामचौकात संशयितांनी रिक्षा अडवून शिवीगाळ करीत हुसेन शहा यास हाताबुक्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत शहा याचा मोबाइल आणि चांदीची साखळी असा सुमारे १५ हजारांचा मुद्देमाल गहाळ झाला. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, अधिक तपास हवालदार कोटमे करीत आहेत.

...

टागोरनगरला घरफोडी

टागोरनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रूचा हेमंत संधानशिव (रा. भावेष रो हाऊस, टागोरनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. संधानशिव कुटुंबीय चार दिवस बाहेरगावी गेले असता, ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्याची पोत चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.

...

तीन इलेक्ट्रीक मोटारी लांबविल्या

पळसे येथील साखर कारखाना रोडवरील गट नंबर ६९७ मधून चोरट्यांनी तीन इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेल्या आहेत. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २६ व २७ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी नाशिक साखर कारखाना रोडवर गट नंबर ६९७ मधून विजय निवृत्ती टर्ले (रा. बिटको हॉस्पिटलशेजारी, नाशिकरोड) यांच्या मालकीच्या तीन विद्युत मोटारी चोरून नेल्या. यात ५० हजार रुपयांची ७० एचपीची मोटार, तसेच २०-२० एचपीच्या २० हजार रुपयांच्या दोन मोटारींचा समावेश आहे. पोलिस हवालदार उजागरे घटनेचा तपास करीत आहेत.

...

शहरात तिघांची आत्महत्या

शहरात शुक्रवारी (दि.१) दोघा युवकांसह एका वृद्धाने आत्महत्या केली. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी भद्रकाली, गंगापूर आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पंचशिलनगर भागात राहणारे महेंद्र मधुकर दवणे (वय ३२, रा. देवी मंदिराजवळ) यांनी शुक्रवारी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. गंगापूर गावातील गोदावरीनगर भागात राहणाऱ्या मनोज राजू आघाव (वय ६५) यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार उगले करीत आहेत. दरम्यान, वडाळानाका भागातील रेणुकानगर येथे राहणाऱ्या अक्षय प्रकाश गाडे (वय २३) या युवकाने शुक्रवारी आपल्या आजीच्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यास नजीकच्या खासगी हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्स्पायरमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

$
0
0

बोर्डाचे विभागीय अध्यक्ष के. बी. पाटील यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इन्स्पायर अॅवॉर्ड या विज्ञान प्रदर्शानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळत आहे. अशा प्रदर्शनांमधून भावी संशोधक निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभाग अध्यक्ष के. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी केंद्र सरकारने इन्स्पायर अॅवॉर्ड अंतर्गत राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था, नागपूर) व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक व मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, भुजबळ नॅालेज सिटी, नाशिक यांच्यातर्फे आठवे जिल्हास्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड प्रदर्शन झाले. प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा मेट - भुजबळ नॉलेज सिटी येथे झाला. यावेळी अध्यक्ष पाटील बोलत होते. या प्रदर्शनातून ९९२ पैकी ८९ प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. कार्यक्रमास माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह आमदार नरहरी झिरवाळ, उपशिक्षणाधिकारी आर. बी. पाटील, दादा मोरे, केंद्रीय निरीक्षक विशाल वाघमारे, प्रा. डॉ. घोडेराव, डॉ. शेफाली भुजबळ, डॉ. राजेंद्र नारखेडे, डॉ. अनिल कोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले, की संशोधनाद्वारे कृषी व औद्योगिक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगाद्वारे कमी खर्चात सर्वांना परवडेल, असा भारतीय ब्रँड विद्यार्थ्यांनी विकसित करायला हवा. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न केल्यास हे शक्य होईल. तसेच विज्ञान प्रदर्शनाचे माध्यम यासाठी उपयुक्त ठरेल. प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे. या प्रदर्शनातून संशोधन क्षेत्रात करियर करण्यासाठी इच्छूक असलेल्या आणि आर्थिक किंवा इतर कुठल्याही अडचणीमुळे शक्य होत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी मेट संस्था सदैव प्रयत्नशील असेल, असेही सांगितले.

\Bशेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी भेट

\Bमेट कॉलेजमध्ये झालेल्या प्रदर्शनाला जिल्हाभरातील शेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी भेट दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांतून विद्यार्थ्यांनी नवनवीन व सृजनात्मक संकल्पना सादर केल्या होत्या. यामध्ये झाडांना आपोआप पुरेसे पाणी पुरविणारी प्रणाली, स्मार्ट शेती प्रकल्प, सायकलद्वारे लोणी घुसळणारी यंत्रणा, वॉटर सेव्हिंग शॉवर, सिलिंडरमधील एलपीजी गॅसची गळती रोखणारी अलर्ट सिस्टम, चोराच्या घटना टाळणारी आधुनिक तिजोरी, केआरआरवायपी गारबेज सिस्टम, यांसारख्या अनेक प्रयोगांचा समावेश होता.

लोगो : शाळा-कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images