Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बुथनिहाय संघटन मजबूत करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने तालुकानिहाय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने घोटी येथेही उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी तालुका व मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यां बैठक घेऊन मतदारसंघाचा आढावा घेतला. पदाधिकारी व शिवसैनिकांना बुथनिहाय संघटन मजबूत करण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या.

नाशिक जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळलेले शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांनी घोटी येथील बैठकीत पदाधिकारी व शिवसैनिकांची 'मन की बात' जाणून घेतली. यावेळी मिर्लेकर यांनी स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही टिप्स दिल्या. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाध्यक्ष निवृती जाधव, मनोहर मेढे, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, रघुनाथ तोकडे आदींनी मनोगत व्यक्त करून या निवडणुकीत पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचे नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावरकरांचे साहित्य भावोत्कट

$
0
0

मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्वच साहित्य भावोत्कट, मनातील उदात्तेची क्षितीजे विस्तारणारे आणि मन उन्नत करणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी केले. या सर्व साहित्यांतील चमकता तारा म्हणजे जयोस्तुते हे मातृभूमी गीत आहे. जगातील मातृभूमीस्तवनपर गीतांची स्पर्धा ठेवली, तर त्यात प्रथम क्रमांकाचे गीत ठरेल, असेही ते म्हणाले.

धुळे शहरात ३१ वे आखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनास शनिवारी (दि. ३) सुरुवात झाली. हे संमेलन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन मुंबई व धुळे एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कान्हा रिजन्सी येथे होत असून, आज (दि. ३) सायंकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

या वेळी संमेलनात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, प्रांत संघचालक मधुकर जाधव, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, सावरकर प्रतिष्ठानचे भिकूजी इदाते, संमेलनाचे आयोजक रवी बेलपाठक, संतोष अग्रवाल, हर्षल विभांडिक यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी अशोक मोडक लिखित ‘सावरकर आपल्या संदर्भात’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी १९०३ मध्ये पुणे येथे ‘जयोस्तुते’ हे गीत सावरकरांनी लिहिले होते. त्यावेळी ते अवघे वीस वर्षांचे होते. सावरकर हे शक्तीचे उपासक आहेत. या जगात जगण्यासाठी केवळ आत्मशक्तीच्या बळावर जगता येते. यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणारे आहेत, असे मत संमेलनाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी व्यक्त केले. जीवनमुल्य व जीवनदृष्टी बदलत नसते आणि साहित्यदृष्टी आणि जीवनदृष्टी समोर ठेवून काम करीत समाजात राजकीय नेत्याला पुढे करून चळवळ उभी केली जात आहे. हे मोडीत काढले पाहिजे, असे भाजपा उपाध्यक्ष सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांना मिळाले बदलत्या मूल्यमापनाचे धडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

औरंगाबाद येथील विभागीय विद्या प्राधिकरण, नाशिक येथील डीआयईसीपीडी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी उद्बोधन वर्ग नुकतेच झाले. नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल केंद्रावर हा वर्ग झाला. या वेळी शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमावरील सुधारित मूल्यमापन पद्धती आणि गुणांकनाची सविस्तर माहिती देण्यात आली.

उद्बोधन कार्यशाळेत विषयतज्ज्ञ रमेश वाघ, दिलीप ढाकणे, प्रकाश गरूड, संजय शेलार, बाबासाहेब कलकत्ते आदींनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषा विषयाच्या अध्यापनावेळी येणारा इतर विषयांचा संबंध, इतर विषयांच्या शिक्षकांचे सहकार्य व त्याचे महत्त्व, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि क्षमता, अध्यापन व अध्ययनपद्धती, दैनिक पाठ टाचणाचे महत्त्व व रचना, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि क्षमता विद्यार्थ्यांना साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे तंत्र, उद्दिष्टे आणि क्षमता यातील फरक, आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन व अध्यापनातील वापर व त्यावरील मर्यादा, परीक्षा आणि मूल्यमापन पद्धती, कृतिपत्रिकेची रचना, काठिन्यपातळी, विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रवृत्त करण्याची तंत्रे, कौशल्ये, उपक्रम, खेळांद्वारे अध्यापन व अध्ययन, सुसंवादाचे प्रकार, कृतिपत्रिका तयार करण्याचे तंत्र व घ्यावयाची काळजी, कृतींनुसार काठिन्यपातळी, गुणांचे भारांकन, मूल्यमापनातील बदल, अभ्यासात मागे पडण्याची कारणे आणि त्यावरील उपाय आदी महत्त्वाच्या बाबींबर मार्गदर्शन केले. उद्बोधन कार्यशाळेत नाशिकरोड विभागासह ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांतील ५२ शिक्षक सहभागी झाले होते.

निम्म्यावर शाळांचे दुर्लक्ष

उद्बोधन कार्यशाळेतील विषयांची माहिती करून घेणे शिक्षकांसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व शाळांना या उद्बोधन वर्गाच्या आयोजनाबाबत आणि सहभागाबाबत यापूर्वीच कळविले होते. मात्र, प्रत्यक्षात निम्म्याहून कमी शाळांतील शिक्षक सहभागी झाल्याचे दिसून आले. बहुतांश शाळांनी शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून उद्बोधन वर्गाकडे पाठ फिरवली. त्यामुळे बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सुधारित मूल्यमापन पद्धतीबाबत बहुतांश शाळांतील शिक्षक अनभिज्ञ राहण्याची शक्यता आहे. या प्रकारास अशा शाळांतील मुख्याध्यापकच कारणीभूत असल्याने शिक्षण विभागाचे अधिकारी या प्रकाराची दखल घेतात की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहरला गुलाब!

$
0
0

कधीकाळी गुलशनाबाद अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये सध्या गुलाबपुष्प चांगलेच बहरले आहे. मखमलाबाद, पिंपळगाव खांब या शहरीभागासह जिल्हाभरातून गुलाबाची फुले शहरात दाखल होत असतात. अवघ्या दहा दिवसांवर असलेला 'व्हॅलेंटाइन डे' आपल्याला चांगली बरकत देईल या आशेवर फुल उत्पादकांनी अशी शेतं फुलवली आहेत.

फोटो - पंकज चांडोले

--संपली---

\Bगुलाब पुष्पांचा बहर!\B

दहा दिवसांवर आलेल्या 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने जिल्ह्यातील शेतांमध्ये गुलाब पुप्षांची बहर आल्याचे दिसून येत आहे. गुलाब पुष्प देत, प्रेम भावना व्यक्त केल्या जातात. त्यासाठी गुलाबांची मागणी वाढत असून, जिल्ह्यातील शेतांमधून शहरासह देशात अनेक ठिकाणी गुलाब विक्रीसाठी पाठविले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आभाळ दाटलं, थंडी पळाली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गत आठवड्यात हुडहुडी भरविणारी थंडी पुन्हा माघारी फिरली आहे. शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने गारठा कमी झाल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. रविवारी जिल्ह्यात किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने चढउतार होत आहेत. २९ जानेवारी रोजी जिल्हावासीयांनी हुडहुडी भरविणारी थंडी अनुवभली. या दिवशी किमान तापमान ७ तर कमाल तापमान २५.३ अंश सेल्सियस ऐवढे नोंदविले गेले. विशेष म्हणजे या दिवशी निफाडमध्ये पुन्हा एकदा चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परंतु त्यानंतर सातत्याने कमाल आणि किमान तापमानात वाढ होते आहे. गेल्या सहा दिवसांत किमान तापमानात ६.२ अंश सेल्सियसने तर कमाल तापमानात पाच अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून नाशिकमध्ये ढगाळ हवामान आहे. त्यामुळे थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. विशेष म्हणजे गत आठवड्यात जाणवणारा हवेतील गारवाही कमी झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी द्राक्ष काढणीच्या अवस्थेत असून, बदलत्या हवामानाचा फटका त्यांना बसू शकतो. उशिरा छाटणीच्या द्राक्षांसाठी हे हवामान त्रासदायक ठरणार असून फवारणीसाठी शेतकऱ्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी भेडसावत असून, सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीच्या तक्रारींनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे.

कमी दाबाचा पट्टा कारणीभूत

पंजाबपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने उत्तरेकडील थंड हवेला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. बंगालच्या उपसागरावरून राज्याकडे उष्ण हवेचा प्रवाह वाढल्याने किमान तापमानात मोठी वाढ होते आहे. त्यामुळे थंडी गायब होत असल्याचा अनुभव नाशिककरांना येतो आहे. शनिवारी आणि रविवारी कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र ते मालदीव बेटांपर्यंत सक्रिय होता. त्यामुळे रविवारी दुपारनंतर राज्यात बहुतांश ठिकाणी अंशत: ढगाळ हवामान होते.

-

पुढील सप्ताहातील संभाव्य तापमान

दिनांक किमान तापमान कमाल तापमान

४ फेब्रुवारी १४.० ३१.०

५ फेब्रुवारी १४.० ३१.०

६ फेब्रुवारी १३.० २९.०

७ फेब्रुवारी १३.० २९.०

८ फेब्रुवारी १२.० २८.०

९ फेब्रुवारी १२.० २९.०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मास्टर्स स्पर्धेत पदकांची लयलूट

$
0
0

१ हजार १३४ पदके बहाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित ३९ व्या राष्ट्रीय मास्टर्स मैदानी स्पर्धांचा समारोप रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो विजेत्यांना पदके व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

या मैदानी स्पर्धा १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान पंचवटी, परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित केल्या होत्या. यावेळी दिल्ली, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर अशा १७ राज्यांमधील १ हजार ६५० खेळाडू सहभागी झाले होते. ३७८ सुवर्ण पदकांसह १ हजार १३४ पदके बहाल करण्यात आली. यावेळी ६५ वर्षांवरील दिव्यांग खेळाडू हिम्मतसिंग मनदोड यांनी ५०० व १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

१०० मीटरपासून १० हजार मीटरपर्यंत धावणे, उडी प्रकारात लांब उडी, उंच उडी, बांबू उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक, तीन किलोमीटर चालणे आणि ५ किलोमीटर चालणे, ४ बाय ४०० रिले, ४ बाय १०० रिले आदी स्पर्धा पार पडल्या. ३० वयोगट ते १०० वयोगटातील नागरिक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी ३५ पुढे असे १०० पर्यंत वयोगट करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लस-४साठी

$
0
0

अवैधपणे गॅस हाताळणाऱ्या

चार जणांना अटक

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विडी कामगारनगरमधील गंगोत्री विहारमध्ये भारत गॅस एजन्सीच्या वितरकाकडे काम करणाऱ्या चार जणांना शनिवारी (दि. २) रोजी निष्काळजीपणे गॅस हाताळल्याबद्दल आडगाव पोलिसांनी चौघांना पकडले. त्यांच्याकडून घरगुती वापराचे हजारो रुपये किमतीचे तब्बल २९ सिलिंडर, तसेच रिक्षा असा एकूण २ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आडगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोधपथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, हवालदार मुनीर काजी, विनोद लखन, विजय सूर्यवंशी, वाल्मीक पाटील, नकुल जाधव गंगोत्री विहार परिसरात गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला पिवळ्या रंगाची रिक्षा (एमएच १५/ईजी ४७७९) संशयास्पद उभी असल्याची दिसली. पोलिसांनी पाहणी केली असता, राजेंद्र गजानन मोहिते, गजानन कैलास ढाले, मधुकर तुकाराम कोसे, आनंदा गजानन मोहिते (सर्व रा. विडी कामगारनगर, सावित्रीबाई झोपडपट्टी, अमृतधाम) एका लोखंडी पाईपच्या साह्याने गॅस सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस ट्रान्स्फर करीत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचाविनयभंग; एकास अटक

$
0
0

नाशिक : ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संशयितास अटक केली. ऋषिकेश अजित खिरे (वय २३, रा. तिडके कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे. ऋषिकेश सध्या म्हसरूळ येथील निर्मलनगर परिसरात नातलगाकडे राहतो. त्याने शुक्रवारी (ता. १) सकाळी अकराच्या सुमारास परिसरातील अल्पवयीन मुलीचा इमारतीच्या जिन्यामध्ये विनयभंग करीत घरात नेले, तसेच पीडितेने त्याला विरोध केल्यानंतर ऋषिकेशने तिला ठार मारण्याची धमकी दिली. पीडितेने या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी ऋषिकेशला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. आर. पाटील तपास करीत आहेत.

ट्रकची बॅटरी लंपास

नाशिक : मुंबई-आग्रा रोडवरील अमृतधाम परिसराजवळ उभ्या असलेल्या डंपरच्या बॅटरी लंपास करण्यात आली. या प्रकरणी नंदकुमार पोपटराव गांगुर्डे (वय ३९, रा. ओझरमिग) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. गांगुर्डे यांनी डंपर (एमएच १५/एफव्ही ०१११) मुंबई-आग्रा हायवेच्या कामासाठी लावला असता, अमृतधाम चौफुली येथे चोरट्याने ट्रकला लावलेली १६ हजार रुपयांची बॅटरी लंपास केली. या प्रकरणी हवालदार ए. डी. सोनवणे तपास करीत आहेत.

तरुणास मारहाण

नाशिक : मद्यप्राशन करून तिघांनी मोबाइल हिसकावून तो फोडून तरुणाला जबर मारहाण केली. ही घटना जेलरोडमधील नारायणबापू नगर परिसरात घडली. अमित रमेश उगले (वय २५, रा. नारायणबापू नगर) याने उपनगर पोलिस ठाण्यात सचिन तोरवणे उर्फ घोड्या व त्याच्या दोन साथीदारांविरोधात मारहाणीची फिर्याद दिली. अमित त्याच्या घराखाली उभा असताना शनिवारी (ता. २) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. तिघा संशयितांनी अमितकडील मोबाइल हिसकावून फोडला, तसेच शिवीगाळ करून त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार विलास पगारे तपास करीत आहेत.

बॅगममधून राणीहार लंपास

नाशिक : पाथर्डी फाटा येथील वासननगर परिसरात महिलेच्या बॅगमधून दीड तोळ्यांचा राणीहार एका महिलेने लंपास केल्याची घटना २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी मनीषा राधाकिसन मुंढे (रा. पाथर्डी फाटा) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. संशयित महिलेने मनीषा यांच्या बॅगेतून ४० हजार रुपयांचा राणीहार लंपास केला. या प्रकरणी हवालदार रियाज शेख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मानवी जीवनावर संतांचे अनंत उपकार

$
0
0

'मानवी जीवनावर

संतांचे अनंत उपकार'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगावर संतांनी अनंत उपकार केलेले आहे. संत जन्मालाच आले नसते तर आज काय परिस्थिती असती हे सांगणेसुद्धा अशक्य असल्याचे प्रतिपादन हभप सुखदेव जाधव यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथील आनंद आश्रमातील काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.

संत ज्ञानेश्वर, तुकाराम, निवृत्तीनाथ, सोपान, नामदेव, मुक्ताबाई, जनाबाई आदी संत-महंतांनी त्याच्या वाङमय, लिखाणातून जनप्रबोधन केले. म्हणून आजची समाजव्यवस्था एकत्रित जीवन जगत आहे. संतांनी जीवन जगण्याची योग्य दिशा आपणाला दाखवून दिली. लाखो लोक जात-धर्म विसरून एकत्र येऊन हजारो किलोमीटर पायी चालत भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतात. हे फक्त संतांमुळे. यामुळे संतांचे आपणावर अनंत उपकार आहे. असे सांगत याप्रसंगी जाधव महाराजांनी काल्याचे महत्त्व व भगवान श्रीकृष्णाच्या लीला सांगितल्या.

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्यानिमित्त आनंद आश्रमात तीन दिवसीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिमराव नाईक, रजूताई बुधवारे, विजया पंडित आदींनी कीर्तन व प्रवचनातून मार्गदर्शन केले. जिल्हाभरातील वारकरी आनंद आश्रमातील सप्ताह व दिंडीत सहभागी झाले होते. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सुखदेव जाधव महाराज, सातपूर व पंचवटी भजनी मंडळ, अंगुलगाव भजनी मंडळ, नांदगाव भजनी मंडळ आदींनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जॉर्ज यांनी कामगारांमध्ये जागवली उमेद’

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी केंद्रिय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून नेतृत्व कौशल्यासोबतच एकजुटीचे तंत्र शिकण्यासारखे होते. त्यांनी फक्त कामगारांचे संघटनच केले नाही, तर त्यांनी कामगारांना चळवळ उभारण्यास शिकविले. हक्कासाठी, न्यायासाठी आत्मविश्वासाने लढण्याची उमेद त्यांनी कामगारांमध्ये जागवली. जॉर्ज यांच्या जाण्याने कामगारांसाठी लढणारा बुलंद नेता हरपल्याचा सार्वत्रिक सूर पुरोगामी वर्तुळात उमटला.

शहरातील सर्व पुरोगामी संस्था, संघटना आणि पक्ष यांच्या वतीने ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडीस यांना आदरांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. रविवारी हुतात्मा स्मारक येथे सायंकाळी ५ वाजता शहरातील अनेक पुरोगामी नेते व कार्यकर्त्यांनी जॉर्ज यांना आदरांजली वाहिली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, ज्येष्ठ नेते शांताराम चव्हाण, श्रीधर देशपांडे, कुमार औरंगाबादकर, पी. बी. गायधनी, वसंत एकबोटे, पंडित कुमावत, राजू देसले, श्यामला चव्हाण, सचिन मालेगावकर यांसह पुरोगामी चळवळीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीधर देशपांडे म्हणाले, की अनेक संपात आणि आंदोलनात जॉर्ज यांच्यासोबत सहभागी झालो. आंदोलनातून चळवळ बुलंद करण्यासोबतच कामगारांना हक्कासाठी झगडण्याचा विश्वास जॉर्ज यांनी निर्माण करून दिला. त्यांच्या निधनामुळे कामगार चळवळीत एक पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. जॉर्ज हे बंद पुकारण्याचे बादशाह होते. कामगारांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. त्यामुळे जॉर्ज यांनी आंदोलनाची हाक दिल्यास त्यामध्ये प्रत्येक कामगार सहभागी व्हायचा, असे कुमार औरंगाबादरकर म्हणाले. राजू देसले म्हणाले, की कामगार चळवळीत जॉर्ज यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणार नाही. त्यांच्या जाण्याने प्रत्येक कामगाराला दु:ख झाले असून, कामगार चळवळीला कायम जॉर्ज यांची प्रेरणा असणार आहे. त्यांचे विचार, तत्त्वे आणि कामाची शैली प्रत्येक कामगाराने टिकवून ठेवत, ही चळवळ अधिक बळकट करणे, हीच खरी जॉर्ज यांना आदरांजली असेल, असेही ते म्हणाले. यावेळी प्रत्येकाने जॉर्ज यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायला महोत्सव समारोप

$
0
0

रायला महोत्सवाचा समारोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बुद्धीप्रेरक खेळ, ध्यानयोग, क्रीडा मार्गदर्शन, झुम्बा, कृषि प्रक्षेत्र भेट, प्रेरणादायी व्याख्याने, अंतराळ सफर, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी रायला महोत्सव २०१९ चा समारोप मोठ्या उत्साहात झाला. परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो याचा आत्मविश्वास मुलांना मिळाला. आता रडायचं नाही तर चांगले शिक्षण घेऊन लढायचं आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं असा निर्धार सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात तीन दिवसीय 'रायला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप रविवारी उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आहे. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, रायला महोत्सवाचे चेअरमन संतोष साबळे, सचिव मुग्धा लेले आणि हेमराज राजपूत उपस्थित होते.

यावेळी सर्वोत्कृष्ट रायला अॅवॉर्ड सुनील चांडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यात मुलांत मयूर महाले तर मुलींत भारती आहेर यांना देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करताना उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक म्हणाले, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन असणे अत्यंत महत्वाचे आहे. रायला महोत्सवातून चांगल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन जात आहात ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवासाठी कै. शामलाताई बिडकर आश्रमशाळा वाटे (दिंडोरी), माध्यमिक आश्रमशाळा धांडीपाडा (बागलाण), गिरीजादीदी माध्यमिक आश्रमशाळा शिंदे (सुरगाणा), पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक आश्रमशाळा कुकुडणे, रचना ट्रस्ट संचालित आश्रमशाळा धोंडेगाव (नाशिक), एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा उंबरठाम (सुरगाणा), माध्यमिक आश्रमशाळा सुळे (कळवण), माध्यमिक आश्रमशाळा आंबेगन (दिंडोरी) विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा अशा एकूण ९ आश्रमशाळांतील १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

तीन दिवसांच्या या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांची मार्गदर्शने भावली. आपणसुद्धा परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो याचा आत्मविश्वास मुलांना मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेफ्टनंट कर्नलने मोडला कर्नलचा विक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतातील प्रतिष्ठेची गोवा-उटी-गोवा अल्ट्रा स्पाइस सायकलिंग स्पर्धा नाशिकचे ले. कर्नल भारत पन्नू यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केली. गोव्यातून २६ जानेवारी रोजी सुरू झालेली ही १७५० किलोमीटरची स्पर्धा पन्नू यांनी ९५ तासांत पूर्ण करीत नाशिकचे कर्नल श्रीनिवास गोकुळनाथ यांचा विक्रम मोडला आहे. कर्नल गोकुळनाथ यांनी गेल्या वर्षी ही स्पर्धा ९८ तासांत पूर्ण केली होती. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी १२० तासांचा अवधी निर्धारित केलेला असतो. पन्नू यांनी बुधवारी (ता. ३०) सकाळी साडेसहाला स्पर्धा पूर्ण करताना दुसऱ्या क्रमांकाने स्पर्धा पूर्ण करणाऱ्या मुंबईकर कबीर राचुरे यांच्यापेक्षा पाच तासांची आघाडी मिळवली.

स्पर्धेत भारतातून ७ सायकलपटूंनी सहभाग नोंदवला होता. सहाशे किमी आणि १ हजार किमीच्या स्पर्धांसह सर्व स्पर्धा ३१ जानेवारी रोजी संपल्या. गेल्या वर्षी हीच स्पर्धा कर्नल पन्नू यांनी ११३ तास आणि १३ मिनिटांत पूर्ण केली होती. रेस विक्रमी वेळेत पूर्ण करून नाशिकमध्ये परतल्यानंतर पन्नू आणि त्यांच्यासोबत असलेल्या टीमचे व परिवाराचे नाशिक सायक्लिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अशी आहे 'अल्ट्रा स्पाइस'

गोवा येथील बोगमलो समुद्र किनाऱ्यावरून सुरू होणारी ही स्पर्धा दक्षिणेकडे समुद्रालगत असणाऱ्या रस्त्याने पुढे जाते. होणावर येथून आतल्या प्रदेशात जोग धबधब्याजवळून चिकमंगळूरकडे जाताना नयनरम्य अशा वन्यजीव अभयारण्यातून वाट काढावी लागते. संपूर्ण झाडांनी व्यापलेल्या चढ-उताराच्या रस्त्याने पुढे जात कर्नाटकातील मंगळुरू-बंगळुरू महामार्गावरून सायकलिंगचा मार्ग जातो. पुढे आणखी दक्षिणेला जाताना पश्चिम घाटातील कुर्गच्या कॉफी आणि मिरचीच्या शेतांचे दर्शन घडते. नंतर सह्याद्री पर्वतरांगांतून खाली जात केरळमधील इटरी येथून वयानंद आणि पुढे निलगिरी पर्वत रांगांतून उटीपर्यंत जात तेथून यू टर्न घेत पुन्हा बोगमलो, गोवा येथे स्पर्धा पूर्ण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रलंबित मागण्यांसाठीशिक्षकांचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महानगर व तालुका टीडीएफ, तालुका व जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, तालुका मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी शासनाच्या शिक्षण व शिक्षक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन धरणे आंदोलन करण्यात आले. टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी सातवा वेतन आयोग केंद्राप्रमाणे जसाच्या तसा तत्काळ लागू करण्यात यावा, अंशदाई पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, शालार्थ आयडी तत्काळ देण्यात यावेत, २० टक्के अनुदानित शाळांना तत्काळ १०० टक्के अनुदान देण्यात यावे, जुनी पेन्शन मागणी मान्य करा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. निकम यांच्यासह आंदोलनात सचिन देशमुख, शरद शेलार, मंगेश सूर्यवंशी, सचिन शेवाळे यांची भाषणे झाली. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात एस. डी. शिंदे, साहेबराव देवरे, विलास पाटील, मदन देवरे, के. डी. चंदन, संजय वाघ, चंद्रशेखर शेलार, प्रशांत पवार, हंसराज देसाई, सुनील फरस आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदशी शिवारात बिबट्याचे दर्शन

$
0
0

चांदशी शिवारात

बिबट्याचे दर्शन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद गावाच्या जवळील चांदशी-मातोरी शिव रस्त्यावरील शेतकरी बाळकृष्ण थोरात यांचा पाळीव कुत्रा बिबट्याने फस्त केल्याची घटना उजेडात आली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मखमलाबाद शिवारात बिबट्याचा वावर आहे. शनिवारी(दि.२) रात्री उशिरा थोरात यांच्या मळ्यात बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्याला त्याने द्राक्षबागेत ओढत नेले. थोरात यांनी सकाळी उठून कुत्र्याचा शोध घेतला असता, तो द्राक्षबागेत मेलेल्या अवस्थेत आढळला. बिबट्याने त्याला फस्त केले होते. याबाबत वनविभागास कळविण्यात आल्यानंतर पाहणी करण्यात आली. यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी थोरात यांना 'तुम्ही रोज रात्री मिरच्यांचा धूर करा, त्याने बिबट्या येणारच नाही' असा अजब सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ही वेळ सांभाळाच!

$
0
0

- सायंकाळी ६ ते रात्री १२ ही वेळ सर्वांत धोकादायक

- सुमारे ५० टक्के अपघात आणि मृत्यू याच वेळेत

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : रस्ते अपघातांच्या दृष्टिकोनातून सायंकाळचे ६ ते रात्री १२ या वेळेत सर्वाधिक अपघात झाले असून, मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही ४१ टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे. सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत सर्वाधिक वर्दळ असते.

नाशिक शहरात २०१८ मध्ये जीवघेणे, गंभीर, किरकोळ असे एकूण ५८१ रस्ते अपघात झाले. यात २१७ व्यक्ती मृत्युमुखी पडले, तर ३९६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. तब्बल ४३ टक्के अपघात सायंकाळी ६ ते रात्री १२ या अवघ्या सहा तासांत झाले आहेत. याच कालावधीत एकूण रस्ते अपघातातील बळींपैकी ४१ टक्के मृत्यू झाले. हे अपघात कमी करण्यात यश मिळाले, तर शहरातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आपोआप कमी होऊ शकते.

याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की रस्ते अपघात होतात ही मोठी समस्या आहे. शहरात वर्षाकाठी ३५ ते ४० हत्या होतात. यानंतर बरीच ओरडदेखील होते. याउलट रस्ते अपघातांमध्ये दोनशेपेक्षा अधिक जणांचा मृत्यू होतो, याचा विचार होणे अपेक्षित आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ ही वेळ महत्त्वाची असते. दिवसभराचे काम आटोपून नागरिक घराकडे परततात, तर बरेच घराबाहेर पडतात. याच वेळी काळोख पसरतो. वाहनांचा स्पीड, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष अशा नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. अशा वेळी भरधाव वाहनासमोर अचानक पादचारी आला किंवा कुत्रे आडवे आले की अपघात होतात. बहुतांश पादचारी याच वेळेत मृत्युमुखी पडले आहेत. रात्री ९ ते १२ या दरम्यान होणाऱ्या अपघातांमागे बहुतांश मद्यपी वाहनचालक असतात. यानंतर ओव्हरस्पीड हेसुद्धा कारण आहे. याबाबत सातत्याने कारवाई होते. प्रबोधनसुद्धा होत असते. वाहनचालकांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे. हेल्मेटचा वापर नसल्याने ८० टक्के दुचाकीचालकांचा मृत्यू होतो, हे सर्वांनी समजून घेतल्यास रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे पोलिस आयुक्त सिंगल यांनी स्पष्ट केले.

वेळ- जीवघेणे अपघात- एकूण अपघात- मृत्यू - गंभीर जखमी- वेळेनुसार मृत्यूची टक्केवारी

स. ६ ते ९- १९- ६२- १९- ५२- ८.७५

स. ९ ते दु. १२- १९- ७२- १९- ६१-८.७५

दु. १२ ते ३- २१- ७१- २२- ५१- १०.१३

दु. ३ ते सायं. ६- २५- ७४- २६- ५६- ११.९८

सायं. ६ ते रा. ९- ४९-१२०- ५३- ६७- २४.४२

रा. ९ ते १२-४३- १०५- ४५- ६३- २०.७३

रा. १२ ते ३- २५- ४९- २५- २८- ११.५२

प. ३ ते ६- ८- २८- ८- १८- ३.६८

एकूण- २०९- ५८१-२१७-३९६-१०० टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फॉरेन्सिक लॅबचे आवाहन

$
0
0

फॉरेन्सिक लॅबचे आवाहन

नाशिक : गृह विभागातंर्गत कार्यरत न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाकडून जनजागृती सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. नाशिक- दिंडोरीरोड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅबोरटरी) येथे ६ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत न्यायसहायक जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत प्रयोगशाळेद्वारे करण्यात येणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या कामकाजाची माहिती व्हावी या हेतून् या सप्ताहाचे आयोजन करण्यत येत असते. उपरोक्त कालावधीत नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन प्रयोगशाळेचे उपसंचालक भा. प. मोरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅशनल डेफ क्रिकेट टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्र विजयी

$
0
0

नॅशनल डेफ क्रिकेट टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्र विजयी

नाशिकच्या सुदीश नायरचा विजयात मोलाचा वाटा)

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑल इंडीया क्रिकेट असोसिएशन ऑफ डेफ यांच्या मान्यतेने तेलंगणा स्टेट क्रिकेट असोसिएशन ऑफ द डेफ, तेलंगणा राज्य सरकार व हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय २०-२० डेफ क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजय मिळवला. या विजयात नाशिकच्या सुदीश नायर याचा मोलाचा वाटा उचलला.

या स्पर्धा २२ ते ३० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत यजमान तेलंगणासह महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, पाँडेचरी, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश व जम्मू आणि काश्मिर असे १० संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम साखळी, उपउपांत्य, उपांत्य व अंतीम पध्दतीने स्पर्धा पार पडली. यामध्ये महाराष्ट्र सरकारने सर्व लीग व उपउपांत्य, उपांत्य सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाने दिल्ली संघाने ४० धावांनी मात करुन विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या हर्षल जाधव, विराज कोलते, रतनदिप धानू, इंद्रजित यादव प्रणील मोरे, सुदीश नायर इत्यादिनी महत्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्राच्या संघाने २० ओव्हरमध्ये ७ बाद १६१ धावा केल्या. यात प्रणील मोरे ३९, विराज कोलते ३४, हर्षल जाधव १८, इंद्रजीत जाधव १६, सुदीश नायर १६, रुपेश कुमार १६, दिपक रावत ३०, धिरज २५ इत्यादी धावांचा समावेश होता. दिल्ली संघाने २० षटकांत ९ बाद १२१ धावा केल्या. अंतीम सामन्याचा पारितोषिक वितरण खासदार विवेकानंद यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्राच्या हर्षल जाधव याला मॅन ऑफ द सिरीज (१७९ धावा, ५ सामने, ६ विकेट) विराज कोलते उत्कृष्ट उत्कृष्ठ फलंदाज १७४ धावा, ५ सामने व रतनदीप धानू ११ विकेट्स, ५ सामने अशी वैयक्तीक पारितोषिके मिळाली. महाराष्ट्र संघाला ५१ हजार रुपये रोख व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

मुकबधीर आणि कर्णबधीर असलेला नाशिकचा सुधिश नायर हा भारताच्या डेफ क्रिकेट संघाकडून खेळत असून आजपर्यंत त्याने बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगणिस्थान, पाकिस्तान या देशाबरोबर खेळून आपली कामगिरी बजावली आहे. त्याच्या कामाचा गौरव म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील त्याचे कौतुक केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्ग मोठा पण निधीचा तोटा!

$
0
0

पुणे रेल्वेमार्गाला अर्थसंकल्पात अवघा १० लाखांचा निधी

..

- दोन वर्षांपासून रेल्वेमार्गाला खोळंबा

- आराखडा आणि सर्वेक्षणातच वेळ खर्ची

- 'स्पीड ट्रेन'चा मार्गात नवा अडथळा

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात पुणे-नाशिक लोहमार्गासाठी अवघी १० लाखांची तरतूद करून वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने केले आहे. दोन वर्षापूर्वी अर्थसंकल्पात २ हजार ४२५ कोटी मंजूर केले होते. पण, त्यानंतर रेल्वे प्रशासनाला या कामाला अजूही चालना देता आलेली नाही. केवळ आराखडा व सर्व्हे करण्यात प्रशासनाचा वेळ जात आहे. आता स्पीड ट्रेनचा विषय पुढे केल्यामुळे पुन्हा सर्व आकडेही बदलणार आहेत.

या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी स्वतंत्र १.५८ कोटीची तरतूद करण्यात आली असून, त्यात मध्य रेल्वेला ७ हजार ६७२ कोटी मिळाले आहे. पण, या पैशातून पुणे विभागात कोणतीही मोठी घोषणा केलेली नाही. त्याचप्रमाणे नाशिक-पुणे रेल्वेचा विषयसुध्दा फारसा गांभीर्याने घेतला नाही. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग व्हावा ही गेल्या वर्षाच्या मागणीनंतर या मार्गाला मंजुरी मिळाली असली तरी निधीसाठी मात्र सरकारने हात आखडते घेतले आहेत. या मार्गासाठी ५३४१ खर्च अपेक्षित आहे. पण, रेल्वे प्रशासनाने या मार्गावर हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचा विचार सुरू केल्यामुळे त्याची किंमत ७ हजार कोटीच्या आसपास जाणार आहे. सुमारे २१४ कि.मी अंतराच्या या मार्गासाठी १२५० हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला दिलेल्या निधीतून पायाभूत सुविधा व नियोजित खर्चासाठीच तरतूद मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. याअगोदर काँग्रेस आघाडीची सत्ता असताना या मार्गाकडे असेच दुर्लक्ष झाले. आता भाजप सरकारनेही असेच दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गाचे भवितव्य पुढील सरकारच्या हातात असणार आहे.

...

मराठी मंत्री असूनही दुर्लक्ष

रेल्वे मंत्रालयाची धुरा यापूर्वी सुरेश प्रभू यांच्याकडे होती. त्यानंतर आता पीयूष गोयल हे या खात्याचे नेतृत्व करीत आहेत. म्हणजेच, रेल्वे मंत्रालय मराठी माणसाकडे असतानाही नाशिक-पुणे रेल्वे हा प्रकल्प रखडल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणुकांच्या तोंडावर या मार्गासाठी भरघोस तरतूद होऊन हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी ठोस प्रयत्न होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. त्यामुळे आता पुढील अर्थसंकल्पात किती निधी मिळतो, यावरच या प्रकल्पाचे भविष्य अवलंबून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टागोर करंडक स्पर्धेत ‘होरायझन’ची आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रवींद्रनाथ विद्यालयाच्या वतीने आयोजित रवींद्रनाथ टागोर क्रिकेट चषक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी होरायझन अॅकॅडमीच्या संघाने आघाडी घेतली. द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात ही स्पर्धा सुरू आहे. तिसऱ्या दिवशीचा प्रथम सामना रवींद्रनाथ टागोर इंग्रजी मीडियम स्कूल विरुद्ध होरायझन अॅकॅडमी यांच्यात झाला. होरायझन अॅकॅडमीने प्रथम फलंदाजी स्वीकारत रवींद्रनाथ टागोर स्कूलपुढे १६४ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात रवींद्रनाथ टागोर संघ ४८ धावांत गारद झाला. सामनावीराचा किताब ९१ धावा व दोन बळी घेणाऱ्या होरायझनच्या आदित्य मोरेने पटकावला. रवींद्र विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे, बँकेचे व्यवस्थापक विकास झामटे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मा पाटील प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा

$
0
0

धुळे ः जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या वर्षी २८ जानेवारी २०१८ रोजी जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी जाणीवपूर्वक वाढीव मूल्यांकन करीत बनावट कागदपत्राद्वारे सरकारची फसवणूक केल्याबाबत धुळे येथील तत्कालीन भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रतिभा सपकाळ, तत्कालीन तलाठी रोहिदास भटू खैरनार आणि साक्री तालुक्यातील कासारे येथील व्यक्ती दत्तात्रय जयदेव देसले यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत मंत्रालयात धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्मत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत चौकशी सुरू असताना शनिवारी (दि. २) धुळे जिल्ह्यातील तत्कालीन भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रतिभा सपकाळ, तत्कालीन तलाठी रोहिदास भटू खैरनार आणि साक्री तालुक्यातील कासारे येथील व्यक्ती दत्तात्रय जयदेव देसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित आधिकाऱ्यांनी धर्मा पाटील यांच्या गावातील गट क्रमांक २९०/३ मधील डाळींब फळ झाडांचे जाणीवपूर्वक वाढीव ९४ लाख ७१ हजार ५२१ रुपयांचे मूल्यांकन करून बनावट कागदपत्रे तयार केली होती. यामुळे त्यांनी सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारने धुळ्याचे अवर सचिव अ. ज. शेट्ये यांनी जिल्हाधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने तपासअंती अखेर शनिवारी (दि. २) रात्री गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी सर्व संशयितांची चौकशी करून सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्याचे आदेशदेखील सरकारकडून देण्यात आल्याने तपास शिरपूर येथील उपपोलिस अधीक्षक संदीप गावीत करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images