Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पोलिश कॉन्सुल जनरल ‘निमा’त

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक, औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्रांत मजबूत भागीदारीसाठी पोलंडचे कॉन्सुल जनरल डेमियन इरझिक यांनी नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्सरर्स असोसिएशनच्या (निमा) कार्यालयास भेट देत उद्योजकांशी संवाद साधला.

इरझिक यांनी पोलंडची वैशिष्ट्ये सांगत संशोधन आणि विकास, मोटार वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, कॉल सेंटर्स, बिझनेस ऑउटसोर्सिंग, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण आदी क्षेत्रांत पोलंडमध्ये औद्योगिक गुंतवणुकीस वाव असल्याची माहिती दिली. यावेळी पोलिश इन्व्हेस्टमेंट अॅण्ड ट्रेड एजन्सीच्या मुंबई ब्यूरो चीफ अडा दिंडो, तसेच निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर, खजिनदार कैलास आहेर, मानद सचिव सुधाकर देशमुख, नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया, निमाच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रोत्साहन समितीचे अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर उपस्थित होते. निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

पोषक बाबींची दिली माहिती

कॉन्सुल जनरल इरझिक यांनी यावेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे पोलंडच्या अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणा, उद्योगव्यवसाय स्थापनेसाठी असलेल्या पोषक बाबी, गेल्या काही वर्षांत कमी झालेला बेरोजगारीचा दर, सद्य:स्थितीत पोलंडमध्ये व्यवसाय करीत असलेल्या भारतीय कंपन्यांची माहिती देत नाशिकमधील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले. नरेंद्र गोलिया यांनी या भेटीचे प्रयोजन स्पष्ट केले व पोलंडशी व्यापार करीत असताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. हर्षद ब्राह्मणकर यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोवासीयांना दिलासा

0
0

'डीसीपीआर'मधून वगळण्याचे नगरविकास विभागाचे महापालिकेला आश्वासन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने सिडकोसाठी सिडकोचीच नियमावली लागू करण्याच्या प्रस्तावाबाबत नगरविकास विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. यासंदर्भात 'नगरविकास'चे प्रधान सचिव नितीन करीर यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. सिडकोतील बांधकाम परवानग्यांचा गोंधळ सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शहरात सिडकोच्या माध्यमातून तयार केलेल्या सहा योजना सध्या महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. मात्र, या योजनांना शहर विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या नियमावलीनुसार यातील एकाही घराच्या बांधकामाला मंजुरी मिळणार नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने ऑटो-डीसीआर या ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून परवानग्या देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नवीन विकास नियंत्रण नियमावली किंवा महापालिकेचे प्रचलित नियमांमध्ये सिडकोतील एकही घराला मंजुरी मिळत नसल्याचे चित्र आहे. साइड मार्जिन व रस्त्यांची रुंदीही महापालिकेच्या प्रचलित नियमाप्रमाणे नसल्याने सिडकोतील प्रकरणे ऑटो-डीसीआर प्रणालीत अडकली आहेत. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर डीसीपीआरनुसार सिडकोतील अतिक्रमणे अनधिकृत ठरवित ती पाडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आमदार सीमा हिरे यांनी शासन दरबारी तर महापालिकेचे माजी सभागृहनेता दिलीप दातीर यांनी अनेकदा या विषयावर महासभेत आवाज उठविला. शहर विकास नियंत्रण नियमावलीत सिडकोचाही समावेश केल्याने महापालिकेडून सरकारकडे बोट दाखवले जात होते.

नूतन आयुक्त गमे यांनी याबाबत तोडगा काढण्यासाठी थेट सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. सिडकोला शहर विकास नियंत्रण नियमावली लागू होत नसल्याचा दाखला दिला. त्यानुसार नगरविकासने यात दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सिडकोतील रखडलेल्या बांधकाम पुनर्विकास व नवीन ले-आऊट मंजुरीचा विषय निकाली लागणार आहे. सिडकोतील बांधकामांसाठी सिडकोचीच नियमावली लागू होणार असून सरकारकडून दुरुस्ती करून आल्यानंतर तात्काळ परवागन्या सिडकोप्रमाणे दिल्या जाणार आहेत.

कंपाउंडिंगबाबत छाननी

बांधकामातील कपाटांसह अनधिकृत बांधण्यात आलेल्या मिळकतींना अधिकृत करण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या कंपाउंडिंग पॉलिसी अंतर्गत साडे तीन हजार प्रकरणे 'नगररचना'त दाखल झाली आहेत. मात्र, या कंपाउंडिंग पॉलिसीलाच उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे कपांचा पेच वाढला असला तरी यातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त गमे यांनी स्पष्ट केले आहे. कंपाउंडिंग अंतर्गत दाखल प्रकरणांचे हार्डशिप व मार्जिन स्पेसबाबत प्रकरणांची प्राथमिक छाननी करण्याचे आदेश दिले असून यातूनही तोडगा निघेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

शहर विकास नियंत्रण नियमावलीत सिडकोवगळून असा उल्लेख नसल्याने सिडकोच्या परवानग्याबाबत वाद निर्माण झाला आहे. परंतु, सिडकोला सिडकोची नियमावली लागण्याची गरज असून त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा आहे. 'नगरविकास'ने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सिडकोचीच नियमावली लागू होणार आहे.

- राधाकृष्ण गमे, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामटवाड्यात एकावर चाकूहल्ला

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

परिसरातील कामठवाडे येथे दोघा भावांच्या वादामध्ये दगडफेकीत महिलेच्या दारावर दगड पडल्यानंतर झालेल्या गैरसमजातून एकावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी अंबड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटवाडे येथे राहणारे पवन सुरवडकर व अर्जुन सुरवडकर या दोघा भावांमध्ये मद्यप्राशनानंतर भांडण सुरू झाले. त्याने एकमेकांना वीट मारून फेकली. यातील एक वीट येथे राहणाऱ्या दिवे यांच्या घरावर पडली. त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेसोबत त्या दोन्ही भावांचे भांडण झाले. दरम्यान हा प्रकार सुरू असताना दिवे यांचा दीर व पुतण्या त्यांचे भांडण ऐकून घराबाहेर आले. पिंट्या दिवे याने पवन सूरडकर यावर चाकूने हल्ला केला. दरम्यान, पवन यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनयाचा कमांडर हरपला

0
0

रमेश भाटकर यांना श्रद्धांजली अर्पण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झाले. नाशिक येथे अभिनेते नाना पाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाट्यसंमेलनामध्ये त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. नाशिककरांनी भाटकर यांच्या याच आठवणी जागवित त्यांना शब्दफुलांची श्रद्धांजली वाहिली.

रंगभूमीच पहिले प्रेम

रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट मालिकामध्ये आपल्या अभिनयाची वेगळी झलक निर्माण केली तरी त्यांचे प्रथम प्रेम रंगभूमी होते. अश्रुंची झाली फुले, राहू-केतू, घोळात घोळ, उघडले स्वर्गाचे दार, षड्यंत्र, मुक्ता, छुपे रुस्तम या नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यांचे फ्रेंडस सर्कलतर्फे हल्ली झालेले शेवटचे नाटक म्हणजे 'मी रेवती देशपांडे' यात त्यांनी मोहन जोशी बरोबर प्रमुख भूमिका होती. चित्रपट, मालिका, नाटक यामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणारे एक झंझावती वादळ अखेर शांत झाले. रुबाबदार व्यक्तीमत्वाला धारदार आवाजाची साथ मिळालेला डॅशिंग हिरोची आपल्यातून एक्झिट झाली. सुप्रसिद्ध संगीतकार स्नेहल भाटकर (रमेश भाटकरांचे वडील) यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आणि तेव्हाच मराठी रंगभूमीवरील कमांडर हरपला.

- जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यवस्थापक

लाल्या प्रेक्षकांपर्यंत आत्मविश्वासाने पोहोचवला

हरहुन्नरी, हसतमुख आणि भूमिकेशी समरस होणारा ज्येष्ठ रंगकर्मी! नवीन कलावंतांशी मनमुराद गप्पा मारणारा आणि त्यांना प्रोत्साहन देणारा आपला वाटणारा माणूस! नाशिकच्या नाट्य संमेलनात सक्रिय सहभाग घेणारे भाटकर हे तेव्हा पूर्णवेळ उपस्थित होते. संमेलनात मी सादर केलेले 'खंडोबाचं लगीन' पाहून त्यांनी त्याचे प्रचंड कौतुक केले होते, ती आठवण माझ्या स्मरणात आहे! डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यानंतर 'लाल्या' प्रेक्षकांपर्यंत आत्मविश्वासाने पोहचविणारे ते एकमेव आहेत.

- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषद शाखा नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनेच्या डोक्यात सासूचा मुसळप्रहार

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पतीशी फोनवर संपर्क होत नसल्याने पतीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या विवाहितेला सासूसह इतरांनी खलबत्त्यातील मुसळीने मारहाण करून जखमी केल्याची घटना पळसेतील नाशिक साखर कारखाना रोडवरील पंकजनगर येथे घडली.

प्रियंका प्रवीण गायकवाड (वय २३) असे जखमी सुनेचे नाव आहे. प्रयंका यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सासू मथुरा गायकवाड, पतीचे भाऊ कैलास गायकवाड आणि जाऊबाई सुजाता गायकवाड या तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. प्रियंका यांचे पती कामावर गेलेले असताना दुपारी त्यांनी पतीशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क न झाल्याने प्रियंका या शेजारीच राहणाऱ्या सासू मथुरा यांच्याकडे चौकशी करण्यासाठी गेल्या. यावेळी तेथे उपस्थित असलेले मथुरा, कैलास आणि सुजाता गायकवाड यांनी प्रियंकाला शिविगाळ करून जुना वाद उकरून काढला. यावेळी कैलास आणि सुजाता गायकवाड यांनी प्रियंकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सासू मथुरा गायकवाड यांनी प्रियंकाच्या डोक्यात खलबत्त्यातील लोखंडी मुसळीने प्रहार केला. यात प्रियंकाचे डोके फुटून रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी शेजाऱ्यांनी मदतीला येऊन प्रियंका हिची या मारहाणीतून सुटका केली आणि वैद्यकीय उपचारांसाठी महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदल्यांची जबाबदारी आता पोलिस आयुक्तांवर

0
0

फेब्रुवारी अखेरपर्यंत होणार कार्यवाही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलातील पोलिस उपायुक्त ते पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्याबाबत पोलिस आयुक्त आणि पोलिस महानिरीक्षक यांना अधिकार देण्यात आले आहे. यापूर्वी हे अधिकार पोलिस महासंचालकांकडे देण्यात आले होते. मात्र, यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशानुसार आणि अधिकारानुसार यात मोठा गोंधळ उडण्याची शक्यता समोर आल्याने हा नवीन पर्याय निवडण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या आणि तीन वर्ष पूर्ण झालेल्या किंवा २०१४ च्या निवडणुकींवेळी कार्यरत असलेल्या किंवा फौजदारी गुन्हे नोंद असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची अकार्यकारी शाखांमध्ये बदली करण्यात येणार आहे. बदली करण्यात आलेले अधिकारी पुन्हा नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोलिस स्टेशन किंवा कार्यकारी शाखेत येणार नाही. निवडणुकीसंदर्भांत या अधिकाऱ्यांना कोणतीही जबाबदारी सोपविण्यात येणार नाही. जर, अशा अधिकाऱ्यांना अकार्यकारी शाखेत समावून घेणे शक्य नसेल तर त्याबबत पोलिस महासंचालक पुढील निर्णय घेतील. अशाचे प्रकारचे निर्देश पोलिस महानिरीक्षकांना देण्यात आले असून, या बदल्यांचे गणित आता सुरू झाले आहे. यात अधिकाऱ्यांचा कालावधी, संभाव्य बदलीचे ठिकाण, साईड ब्रँच अशी मोठी यादी असून, जिल्ह्याबाहेर बदली होणारच असेल तर त्यादृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत.

कार्यपद्धती बदलाची शक्यता

निवडणूक आयोगाच्या वेगवेगळ्या निर्देशानुसार आतापर्यंत दोन वेळा बदलीची कार्यपद्धती बदलण्यात आली असून, यापुढेही त्यात काही बदल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. पोलिस अधिकाऱ्यांची उपलब्ध संख्या आणि निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ याचाही विचार होऊ शकतो. दरम्यान, या नवीन निर्देशानुसार पोलिस आयुक्तालयात काम सुरू झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवती अमावस्येची भाविकांनी साधली पर्वणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सात वर्षांनी आलेल्या सोमवती मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी रामकुंडावर सकाळपासून गर्दी झाली होती. दिवसभर भाविक मोठ्या संख्येने रामकुंडात स्नान करीत होते.

उत्तर प्रदेशातील प्रयागराग येथे होत असलेल्या कुंभमेळ्याची सोमवारी (दि. ४) मौनी अमावस्येला मुख्य शाहीस्नान पर्वणी होत आहे. याच वेळी रामकुंडावरही ही स्नानाची पर्वणी साधण्यासाठी गर्दी भाविकांनी गर्दी केली. स्नान करून मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविक जात असल्याने पंचवटी परिसर सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने फुलून गेला.

पौष सोमवती मौनी अमावस्येस सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी सुरुवात झाली. या अमावस्येला तीर्थस्नान केल्यास १०० सूर्यग्रहण पर्वकाळात केलेल्या स्नानाचे पुण्यफल प्राप्त होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे याचे महत्त्व लक्षात घेऊन भाविकांनी स्नानास गर्दी केली. कपालेश्वर महादेव मंदिर, सांडव्यावरची देवी, काळाराम मंदिर, सीतागुंफा, कार्तिकस्वामी मंदिर, तपोवनातील श्रीराम पर्णकुटी, बडा लक्ष्मीनारायण मंदिर, कपिला संगम येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

बाहेरगावाहून आलेल्यांप्रमाणेच स्थानिक भाविकांचाही स्नान आणि दर्शनासाठी येत असल्याचे दिसले. भाविकांची वाहने गौरी पटांगण आणि म्हसोबा पटांगणावर पार्क करण्यात येत होती. तेथून रिक्षातून भाविक रामकुंड आणि पंचवटी परिसरातील इतर मंदिरांमध्ये जात होते. त्यामुळे मंदिर परिसरातील आवारात रिक्षांची प्रचंड वर्दळ झालेली होते. रिक्षाचालकांनीही मौनी अमावस्येची पर्वणी साधली.

महिला भाविकांची अडचण

रामकुंडात स्नानानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी अजूनही सोय नसल्याने उघड्यावरच कपडे बदलावे लागले. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली. सिंहस्थ कुंभमेळ्यात तात्पुरती व्यवस्था होती, तशी व्यवस्था करण्याकडे महापालिका लक्ष देत नसल्याने महिला भाविकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रामकुंडाजवळ असलेल्या वस्त्रांतरगृहाची बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना फारशी माहिती नसल्याने त्यांची अडचण होते. या वस्त्रांतरगृहाचा वापर करण्याच्या सूचना महिलांना देण्याची व्यवस्था नसल्याने त्याचा वापर होत नाही.

..

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंतरिम’ म्हणजे करायचे काही नाही!

0
0

अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी उपस्थित केले प्रश्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लग्नाच्या खरेदीला सुद्धा ४४ दिवस पुरत नाही, तेव्हा ४२ दिवसात हे सरकार अंतरिम अर्थसंकल्पातील घोषणा कशा पुऱ्या करतील, असे सांगत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी या अर्थसंकल्पाबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी सरकारला फक्त ४२ दिवसात शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे आहे, इतर काहीही नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे 'करायचे काही नाही', झालं तर झालं; नाही तर नाही असा आहे. हा अर्थसंकल्प मंजूर झाला तर ठीक नाही तर लोकसभा निवडणुकीसाठीही खर्च करता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस्, अंबड इंडस्ट्रीज् अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यातर्फे टिळक यांचे अर्थसंकल्पावरील व्याख्यान उंटवाडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या अशोका हॉलमध्ये झाले. यावेळी त्यांनी अर्थकसंकल्पातील अनेक गोष्टींवर भाष्य करीत त्यातील तरतुदीबाबत सविस्तर विश्लेषण केले. यावेळी टिळक म्हणाले, की या अंतरिम अर्थकसंकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. हा सत्तासंकल्प आहे का? हा अंतरिम अर्थसंकल्प की अर्थसंकल्प? तेव्हा मी त्यांना सांगतो यातून आपल्याला काय घेता येईल, याबाबत विचार करावा. एकाच अर्थसंकल्पातून काही मिळत नाही. पण, या अर्थसंकल्पामधील काही मुद्दे विचार करणारे आहे. १९९१ पासून आर्थिक सुधारणा कार्यक्रम देशात सुरु झाला. आतापर्यंत अनेक पक्षांचे सरकार आले पण, याबाबत कोणीही आर्थिक सुधारणा बाबत 'यू-टर्न' घेतला नाही. आपण या अर्थसंकल्पावर विश्वास ठेवालयचा की नाही. हे आपण ठरवावे.

अर्थसंकल्पात कित्येक वर्षांनंतर 'मिडल क्लास'चा विचार केला ही गोष्ट महत्त्वाची आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम असल्यामुळे तो चौकटीबाहेर आला असे सांगत त्यांनी ब्लू इकॉनॉमी, डिजिटल शहरे याचाही उल्लेखही केला. या अर्थसंकल्पात कोणताही सरचार्ज लावला नाही. असे टिळक यांनी सांगितले. व्याख्यानात चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिल लोढा, सीए असोसिएशनचे अध्यक्ष मीलन लुणावत, दीपाली चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.

अनेक मुद्दे अस्पष्ट

अर्थतज्ज्ञ टिळक यांच्या या व्याख्यानातून व्यापारी, उद्योजक व कर सल्लागारांना मोठी अपेक्षा होती. पण, त्यांनी या व्याख्यानात इतर अर्थसंकल्प वगळता अन्य मुद्यांवर अधिक भर दिला. त्यामुळे श्रोत्यांची निराशा झाली. अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींवरील त्यांचे मत असष्टच राहिले.

मी भाजप समर्थक

मी भाजपचा समर्थक असे अर्थतज्ज्ञ टिळक यांनी स्पष्ट केले. पण, अर्थसंकल्पावर चर्चा करतांना वैयक्तिक गोष्टी मी बाजूला करतो. कारण हा अर्थकारणाचा विषय आहे. त्यामुळे त्यादृष्टीने त्याकडे बघणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

..

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्याची पडझड

0
0

त्र्यंबक पंचायत समितीतील आरोग्य केंद्राची दुरवस्था

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्याची भीस्त असलेली ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. त्र्यंबक पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यालयातील आरोग्य केंद्राची पडझड झाल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. अंजनेरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने निर्माण उभारण्यात आले आहे. मात्र हे केंद्रही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे.

अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर तेथून ६० किमी अंतरावर असलेल्या टाके देवगावपर्यंतचे ग्रामस्थ उपचारासाठी अवलंबून होते. अंजनेरी येथे नाशिक त्र्यंबक रस्त्यावरील ब्रह्माव्हॅली शिक्षण संकुलाच्या बाजूस असलेल्या जागेत २ कोटी ५४ लाख रुपये खर्च करून अद्यावत इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आरोग्य सेवा सुरू नसल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

या केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी देखील रूजू झाले आहेत. तथापि वीज आणि पाणी नाही म्हणून उद्घाटन खोळंबले असल्याचे सांगितले जाते. अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय उभारण्यात आले आहे.

सुमारे ६५ वर्षांपूर्वी बांधलेल्या त्र्यंबक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दगडी बांधकाम असलेल्या इमारतीतूनच त्र्यंबक पंचायत समितीचा काभार चालतो. याच जागेच्या एका कोपऱ्यात असलेल्या पडझड झालेल्या बांधकामात तालुका आरोग्य विभागाचे कार्यालय थाटले आहे. दगडी भिंतीचा मुलामा कधीच निघून गेला आहे. या भींती केव्हाही कोसळतील अशा अशी अवस्था झाली आहे. छप्पराचही अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या जागेत उंदीर आणि त्याच्या शिकारीवर येणारे साप हे नित्याचे झाले आहेत. पावसाळ्यात तर येथे उभे राहणे देखील अवघड झाले आहे. संगणकाचा वापर आता अपरिहार्य झाला आहे. मात्र येथे संगणक ठेवताना अनेक समस्या निर्माण होत आहेत.

त्र्यंबक शहरात पंचायत समिती कर्यालयास जागा नसल्याने आरोग्य विभागाची देखील पंचाईत झाली आहे. आरोग्य विभागाचे कार्यालय अंजनेरी येथे बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत हालविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र हा योग कधी जुळून येईल, याबाबत शंका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलागुणांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हवा

0
0

युवक महोत्सवाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाविद्यालयाच्या वर्गांमध्ये त्या-त्या विषयांचे ज्ञान दिले जाते. परंतु, व्यवहारिक जीवनामध्ये जीवन कसे जगायचे आणि त्यातून आपल्या कलागुणांना वाव कसा द्यायचा या विषयात आपली शिक्षण पद्धती तोकडी पडलेली आहे. हे आपणास मान्य करावे लागेल आणि म्हणून त्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला पाहिजे, असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा युवक महोत्सवाचे कार्याध्यक्ष दिलीप रामू पाटील यांनी धुळे जिल्हास्तरीय विभागाचा युवक महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी केले.

विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक व पालक यांचा एक शैक्षणिक परिवार निर्माण झाला करून या परिवारात सर्व विषय आदानप्रदानाने सोडविले पाहिजेत, असेही ते म्हणाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुसुंबा, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. ४) कुसुंबा येथे धुळे जिल्हास्तरीय विभागाचा ‘युवारंग’ युवक महोत्सवाची सुरुवात झाली. या वेळी स्वरस्वती देवी व बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. व्यासपीठावर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. नितीन बारी, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल चौधरी, उपाध्यक्षा यमुनाबाई चौधरी, सचिव प्रा. डॉ. दीपिका चौधरी, प्राचार्य एन. टी. थोरात, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य जे. बी. नाईक, डॉ. डी. एस. सूर्यवंशी, डॉ. एम. पी. पावरा, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. संजय सोनवणे, पी. बी. अहिरराव आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना दिलीप पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना रचनात्मक आणि विधायक दृष्टिकोनातून कामाला लावले तर ही युव शक्ती राष्ट्र उभारणीच्या कामी येऊ शकते. आपले विद्यापीठ नेहमी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून उपक्रम राबवते. युवकांनी बहिणाबाई चौधरी यांनी व्यवहारिक जीवन कसे जगावे हे सांगितले असून, त्याचे कायम स्मरण करावे असेही ते म्हणाले.

युवक महोत्सवाची वैशिष्ट्ये...
धुळे जिल्ह्यातील ३७ महाविद्यालयांचा सहभाग
५८६ विद्यार्थी कलाकारांकडून सादरीकरण
सहा रंगमंचांची आखणी

सामाजिक विषयांवर भाष्य
बहिणाबाई चौधरी रंगमंच क्रमांक एकवर विडंबन नाट्य कला प्रकारात ‘मोबाइल’, ‘महाविद्यालयीन जीवन’, ‘लिंगभेद, जातीभेद’, ‘जातीचे राजकारण’, ‘बेरोजगारी’, ‘तृतीयपंथीयांच्या समस्या’, ‘स्त्री भ्रूण हत्या’ या विषयांवर सादरीकरण केले. याच रंगमंचावर मुकनाट्य, मिमिक्री व समूह लोकनृत्य हे कलाप्रकार सादर करण्यात आले. नर्मदाई रंगमंच क्रमांक दोनवर ‘लोकगीत’ या कलाप्रकारात १० महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी आपली कला सादर केली. याच रंगमंचावर लोकसंगीत भारतीय, सुगम गायन (पाश्चिमात्य), सुगम गायन (भारतीय), समूहगीत (भारतीय) हे कला प्रकार सादर करण्यात आले. यमुनाई रंगमंच क्रमांक तीनवर शास्त्रीय गायन या कला प्रकारात तीन महाविद्यालयांनी तर शास्त्रीय गायन या प्रकारात एका महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. याच रंगमंचावर शास्त्रीय वादन (सुरवाद्य) शास्त्रीय वादन (तालवाद्य),समुहगीत (पाश्चिमात्य) हे कला प्रकार सादर करण्यात आले. तापी रंगमंच क्रमांक चारवर काव्यवाचन, वादविवाद हे कला प्रकार सादर करण्यात आले. पांझरा रंगमंच क्रमांक पाचवर क्ले मॉडलिंगसह कोलाज, स्पॉटपेटिंग, इन्स्टॉलेशन व व्यंगचित्र हे कला प्रकार सादर करण्यात आले. गिरणा रंगमंच क्रमांक सहावर फोटो व रांगोळी, चित्रकला व मेंहदी या कला प्रकारांत विद्यार्थी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईत २० फेब्रुवारीला पुन्हा धडकणार ‘लाँग मार्च’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी मुंबईत काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चने पुन्हा एल्गार पुकारला आहे. मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने किसान सभेने २० फेब्रुवारी रोजी लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी मोर्चा असून, या वेळी मोर्चात शेतकऱ्यांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट असेल, अशी माहिती किसान सभेने सोमवारी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. हा लाँग मार्च २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकणार आहे.

नाशिक येथे किसान सभेच्या कौन्सिल बैठकीत सरकारवर टीका करण्यात आली असून, गेल्या वर्षी लाँग मार्च मुंबईत धडकल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या; पण त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याची भावना वाढल्यामुळे हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. लाँग मार्चमध्ये या वेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देऊ नये हा मुद्दाही घेण्यात आल्याची माहिती किसान सभेचे आमदार जे. पी. गावित यांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड या वेळी उपस्थित होते. किसान सभा या वेळी निर्णायक लढाईसाठी पुन्हा रस्त्यावर येणार आहे. विशेष म्हणजे या वेळी हा मोर्चा नाशिकमधील शालिमार येथून न जाता तो गावाबाहेरून जाणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही.

लाँग मार्चमध्ये नाशिक, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यांबरोबरच मराठवाडा व विदर्भातून शेतकरी सहभागी होणार आहेत. सर्व शेतकरी आपल्या शिधाची व्यवस्था स्वत:च करणार असले तरी इतर व्यवस्थेसाठी कामगार संघटनेने पाच लाखांची मदतीची घोषणाही या वेळी सीटूचे डॉ. कराड यांनी केली.

...तर महाराष्ट्र बंद

सरकारने लाँग मार्चकडे दुर्लक्ष केल्यास कामगारही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरेल. त्याचप्रमाणे सर्व पक्षांच्या नेत्यांना सामावून घेऊन महाराष्ट्र बंद करण्याचा विचारही असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Priyanka Gandhi: पहिली सभा नंदूरबारमध्ये?

0
0

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक अतुट नाते राहीले असून लोकसभा असो की,विधानसभा गांधी कुटूंबाकडून प्रचाराचा नारळ नंदूरबार मधूनच फोडला जातो.इंदीरा गांधीपासूनची ही परंपरा आजही कायम असून आता सोनिया गांधीपाठोपाठ प्रियंका गांधीचे राजकारणातील पदार्पण आता नंदूरबार मधूच करण्याची तयारी सुरू आहे. देशातील लोकसभेच्या प्रचाराचा नारळ प्रियंका गांधीच्या हस्ते नंदूरबारमधून फुटावा यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी प्रियंकालाच साकडे घालण्यात आले आहे.त्यासाठी प्रियंका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पत्र पाठवण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूकांचा बिगूल वाजण्यास सुरूवात झाली असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आगामी लोकसभा निवडणूका जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी जोरदार प्रयत्न करत असतांनाच,काँग्रेसने प्रियंका गांधीना उत्तर प्रदेशच्या राजकारणात उतरवून भाजप आणि मोदींना मोठा झटका दिला आहे.इंदीरा गांधीचे सगळे गुण प्रियंकात असल्याने राहूल गांधी ऐवजी प्रियंका गांधीनी काँग्रेसची धूरा सांभाळावी अशी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची मागणी होती.त्यामुळे उशीरा का होईना प्रिंयका गांधीची राजकारणात प्रवेश झाला आहे.त्यामुळे प्रिंयका गांधीच्या राजकारणातील प्रवेशाचा शुभांरभ काँग्रेसच्या पंरपंरेप्रमाणे नंदूरबार मधून व्हावा अशी काँग्रेसच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची इच्छा आहे.गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक वेगळे नाते आहे.स्व.इंदिरा गांधी,स्व.राजीव गांधी,सोनिया गांधी यांनी नंदूरबार मधून सभा घेवूनच घवघवीत यश मिळ‌वले आहे.विशेष म्हणजे सोनिया गांधीच्या राजकारणातील प्रवेशाची पहिली सभाही नंदूरबारमध्येच झाली होती.नंदूरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने येथील आदिवासींचे काँग्रेसवर विशेष प्रेम आहे.परंतु,गेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा हा गडही कोसळला होता.त्यामुळे प्रथमच काँग्रसला येथे पराभवाचा सामना करावा लागला होता.त्यामुळे हे अपयश धुवून काढण्यासाठी प्रियंका गांधीच्या रुपाने काँग्रेससमोर संधी चालून आहे.प्रियंका गांधीचा राजकारणातील प्रवेश आणि लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ नंदूरबार जिल्ह्यातून व्हावा यासाठी नंदूरबार मधील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.काँग्रेसचे लोकसभेसाठीचे इच्छुक उमेदवार आमदार के.सी.पाडवी आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी प्रियंका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला साकडे घातले आहे.त्यामुळे याबाबत काँग्रेस काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.

काँग्रेसची रणनिती
दरम्यान प्रदेश काँग्रेसकडूनही राज्यातील काँग्रेसच्या लोकसभा निवडणूकीतील प्रचाराचा श्री गणेशा नंदूरबारमधूनच व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.त्यासाठी नंदूरबार मधील काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा लवकरच केली जाणार असून या घोषणेनंतर लगेचच राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एकत्रीत सभा नंदूरबारमध्ये घेण्याचा प्रदेश काँग्रेसचा विचार आहे.त्यासाठी पक्षाकडून रणनिती आखली जात आहे.त्यामुळे या सभेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेस शनिवारी प्रारंभ

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उपनगर नाक्याजवळील सेंट झेवियर इंग्लिश हायस्कूलच्या प्रांगणात बालयेशू मंदिरातील यात्रेला शनिवारी (दि. ९) प्रारंभ होत आहे. दोन दिवसाच्या यात्रेसाठी जय्यत तयारी सुरू आहे.

विविध भाषिक भाविकांसाठी मराठी, हिंदी, तामिळ व इंग्रजी भाषेत पवित्र मिस्सा (उपदेश) होणार असल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे. या भाविकांसाठी मंदिर मागील जुन्या व नव्या सभागृहात व्यवस्था करण्यात आलेली आहे. नाशिक-पुणे मार्गावर भरणारी ही बाळ येशूची यात्रा देशातील एकमेव आहे. झेवियर शाळेच्या प्रांगणात मुख्य शामियाना उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. यात्रेमुळे बाळ येशू मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त शाळेच्या प्रांगणात व बाहेर विविध खाद्यपदार्थ, खेळण्यांची दुकाने, विविध वस्तू, फळे आदींचे स्टॉल्स उभारण्यास सुरवात झाली आहे.

३१ जानेवारी ते आठ फेब्रुवारी या काळात मिसाबली व नोव्हेनाची इंग्रजी, मराठी व कोकणी भाषेत भक्ती सुरू आहे. शनिवारी (दि. ९) सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी सहाला मराठी मिसा, दुपारी चारला तामिळ मिसा व सायंकाळी आठला कोकणी मिसा होईल. अन्य वेळेत इंग्रजी मिसा होतील. तसेच रविवारी (दि. १०) सकाळी सहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत मिसा होणार आहेत. अनेक भाविक विशेष वाहनांनी येतात. त्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी नेहरुनगरमधील केंद्रीय विद्यालय परिसरात तसेच जेतवनच्या मैदानात सुविधा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजी रोडवर दिवसभर कोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एम. जी. रोडवर मंगळावारी सकाळपासून तर सायंकाळी उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसले. काँग्रेसच्या पदग्रहण सोहळ्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी या रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी झाली. दिवसभर ही कोंडी कायम होती. मात्र, फक्त काही मिनिटेच वाहतूक कोंडी असल्याचा दावा पोलिसांनी केला.

ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झालेले डॉ. तुषार शेवाळे यांचा पदग्रहण सोहळा नाशिक जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एम. जी. रोडवरील काँग्रेसच्या कार्यालयात जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आणलेल्या कार रस्त्यावरच उभ्या केल्या. वाहनांची दुहेरी पार्किंग करण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. स्मार्ट रस्त्याचे काम सुरू असल्याने अगोदरच एम. जी. रोडवरील रहदारीवर ताण आला. त्यातच, मंगळवारी कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांमुळे त्या ठिकाणी वाहतुकीचा फज्जा उडाला. मात्र, पोलिसांनी फक्त २ ते ३ मिनिटेच वाहतूक कोंडी असल्याचा दावा करीत आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ४ नंतर तेथील वाहतूक सुरळीत झाल्याने, दिवसभर वाहनचालक हैराण झाले होते.

\Bटोइंग व्हॅनची कोंडी!

\Bवाहतूक कोंडीत टोइंग व्हॅन देखील बराच वेळ अडकले होते. त्यामुळे पोलिसांच्याच वाहनाला कोंडीचा सामाना करावा. टोइंग व्हॅनला वाहतूक कोंडीतून बाहेर पडणे कठीण झाल्याने, ज्यांची वाहने टोइंग केली होती. त्यांना देखील मनस्ताप सहन करावा लागला.

\Bघडवा बदल तुमच्या बातमीने (\Bसिटिझन\B रिपोर्टर लोगो)

\Bशहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर उभी केलेली वाहने टोइंग केली जात नाहीत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी 'मटा सिटिझन रिपोर्टर' अॅपद्वारे तुम्हाला फोटो पाठविता येतील. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. अॅपद्वारे वाहतूक कोंडीच्या संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांचे फोटो, ठिकाण आणि माहिती पाठवा आणि घडवा बदल तुमच्या बातमीने!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षण क्षेत्रात राज्यातील २० उमेदवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संरक्षण मंत्रालयातर्फे विविध सेवांतील पदांकरिता घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्याद्वारे देशभरातील १७२ उमेदवारांची निवड झाली आहे. त्यात राज्यातील १७ पुरुष, तर तीन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे या २० उमेदवारांना संरक्षण क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळणार आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या विविध सेवांकरिता उमेदवारांच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१८ मध्ये लेखी परीक्षा घेतली होती. या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतल्या असून, मंगळवारी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. देशातील १३० पुरुष व ४२ महिला अशा एकूण १७२ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांत मयूर मनोहर हिवळे, योगेश शिवाजी वानवे, सिद्धेश कावळकर, विनोद राजेंद्र शिंदे, ओंकार दिगंबर उधाण, अक्षय बब्रुवाहन टाळके, अनिवेश अरविंद होळे, मयूर राजेश तलवाले, अभिजित दत्तात्रय ताह्मणकर, रिषभ भारत भालेराव, कैवल्य सतीश कुळकर्णी, हर्षवर्धन अनिल चव्हाण, उदित हेमंत देसाई, संकेत भरत जाधव, भरत शंकर गंटी, अभिनव प्रधान, श्रेयस बब्रुवाहन पाटील, तसेच प्रीती पवार, राधिका सतीश तळेकर, अन्वेशा प्रधान यांचा समावेश आहे.

--

\Bएप्रिलपासून प्रशिक्षण\B

संरक्षण विभागात निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण संस्थेत होईल. पुरुष उमेदवार १०९ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स, तर महिला २३ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्समध्ये सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्योजक पेशकार यांना ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रदीप पेशकार यांना ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (बीबीएनजी) तर्फे 'उद्यम कौस्तुभ' पुरस्काराने गौरविण्यात आले. ठाणे येथे झालेल्या 'बीबीएनजी'च्या राष्ट्रीय परिषदेत त्यांना हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठाणे (प.) मधील आर. नेस्ट बँक्वेट येथे पार पडलेल्या या एकदिवसीय परिषदेत विविध तज्ज्ञांनी, व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. अविनाश धर्माधिकारी यांनी व्यवसाय हीच देशसेवा, मृगांतक परांजपे यांनी जागतिक बाजारपेठेतील संधी, संजय ढवळीकर यांनी 'एनपीए'चा चक्रव्यूह कसा भेदाल व शिवानंद अप्पाराज यांनी हॉस्पिटलमधील व्यवसाय संधी यावर उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात उद्योजिका नेहा कांदळगावकर व शरयू देशमुख या सहभागी झाल्या होत्या. परिषदेचे उद्घाटन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले. उद्घाटनप्रसंगी अशोका बिल्डकॉनचे संजय लोंढे, अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूगर्भातल्या नोंदी गडप!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भूगर्भातील हालचालींचा वेध घेताना भूवैज्ञानिकांनी नोंदविलेली बरीचशी निरीक्षणे आज त्यांच्या हातात नाहीत. बॅग गहाळ झाल्याने या नोंदी असलेली डायरी आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रेही हरविली आहेत. गेल्या चार महिन्यांपासून घेतलेली मेहनत पाण्यात जाते की काय, या धास्तीने नाशिककरांचे पाहुणे म्हणून आलेल्या भूवैज्ञानिकांची झोप उडाली आहे.

संशोधनासाठी नागपूरहून आलेल्या या भूवैज्ञानिकांनी पोलसांकडे धाव घेऊन बॅग परत मिळवून देण्याचे साकडे घातले आहे. जिल्ह्यात कळवण, पेठ, सुरगाणा, दिंडोरीसह काही भागात अनेकदा भूकंपाचे धक्के बसतात. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भूवैज्ञानिकांचे पथक ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील भूगर्भामधील हालचालींचा अभ्यास करीत आहे. वेगवेगळ्या भागात जाऊन विशिष्ट उपकरणांच्या सहाय्याने भूगर्भातील हालचाली टिपण्याचे काम या तज्ज्ञांकडून सुरू आहे. या निरीक्षणांच्या नोंदी घेतल्या जात असून, त्याचा सखोल अहवाल प्रशासनातील वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. परंतु, अशा नोंदी घेतलेली भूपेश उरकुडे या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिकाची डायरी रिक्षा प्रवासात गहाळ झाली आहे. सोमवारी (दि. ४) रात्री दहाच्या सुमारास त्यांनी मुंबई नाका परिसरातील रामा हेरिटेज हॉटेल ते पाथर्डी फाटा या मार्गावर रिक्षाने प्रवास केला. त्यावेळी सोबत असलेली बॅग ते रिक्षामध्येच विसरले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित रिक्षाचालकास शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना अपयश आले. या बॅगमध्ये डायरी असून, त्यामध्ये त्यांनी भूगर्भ अभ्यासाच्या नोंदी केल्या आहेत. याशिवाय या बॅगमध्ये त्यांच्या कामकाजाशी संबंधित, भारतीय भूवैज्ञानिक संस्थेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, जीपीएस सिस्टीम आहे. ही बॅग परत मिळावी याकरिता त्यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तेथे तक्रार अर्ज दिला आहे.

---

मी गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यातील भूगर्भातील हालचालींचा अभ्यास करीत आहे. याबाबतच्या महत्त्वपूर्ण नोंदी असणारी डायरी, काही महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग गहाळ झाली आहे. ही डायरी आणि कागदपत्रे इतरांसाठी उपयोगाची नाहीत. ही बॅग परत मिळावी यासाठी नाशिककरांचे सहकार्य अपेक्षित आहे.

-भूपेश उरकुडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेची फेब्रुवारीत चाचणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तहान भागवण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत साकारण्यात येत असलेल्या मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे आले असून फेब्रुवारी अखेर या योजनेची चाचणी महापालिकेकडून घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास मार्चपासूनच नाशिककरांना मुकणेचे पाणी मिळणार असून सिडको,पाथर्डी परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

नाशिकची लोकसंख्या २०४१ पर्यंतच्या ५० लाखांचा टप्पा ओलडू शकते. या संभाव्य लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत महापालिकेच्या माध्यमातून २६७ कोटी रुपयांची मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. या योजनेचे काम जुलै २०१८ मध्ये पुर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, पावसाळ्यामुळे सदरचे काम विस्कळीत झाले होते. त्यामुळे दोनदा या कामाला मुदतवाढ देण्यात आली असून आता मार्चची डेडलाइन देण्यात आली आहे. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महिनाभरापूर्वी या प्रकल्पाला भेट देत कामांची पाहणी केली होती. फेब्रुवारी अखेर योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व मक्तेदार कंपनीला देण्यात आले होते. त्यानुसार, योजनेच्या कामाला गति देण्यात आली असून पंपिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

विल्होळी येथील जलशुद्धिकरण केंद्र तसेच मुकणे धरण ते जलशुद्धिकरण केंद्रापर्यंतच्या १८ किलोमीटरच्या थेट जलवाहिनीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस याची चाचणी घेतली जाणार असून मार्चपासून मुकणे धरणातून पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या शहरात सुरू असलेला विस्कळीत पाणीपुरवठा कमी होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ १३० ठिकाणी कनेक्टिविटी द्या!

0
0

निवडणूक आयोगाचे जिल्हा यंत्रणेला निर्देश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल टॉवर, इंटरनेट यासारख्या सुविधा नसलेल्या १३० मतदान केंद्रांच्या ठिकाणी लवकर कनेक्टिविटी सेवा उभारा, असे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुका सुरळीतपणे पार पाडाव्यात, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असून आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी निवडणूकपूर्व कामांचा आणि निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रांची पाहणी करून ती सज्ज ठेवण्याबाबतची खातरजमा करा, असे निर्दश यावेळी देण्यात आले.

बागलाण तालुक्यातील साल्हेर-मुल्हेरसह पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये मतदान केंद्र असली तरी तेथे मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिविटीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली. अशी १३० मतदान केंद्र असून या गावांमध्ये मोबाइल टॉवर, वायरलेस सुविधा उभारण्याचे काम लवकर हाती घ्या, असे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

पुन्हा व्हीव्हीपॅट जनजागृती

यंदा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनची मदत घेण्यात येणार आहे. आपण दिलेले मत संबंधित व्यक्तीलाच मिळणार असल्याबाबतची खातरजमा त्यामुळे होणार आहे. व्हीव्हीपॅट नेमके कसे काम करते याची प्रात्यक्षिके गेल्या महिन्यात जिल्हाभर दाखविण्यात आली. जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा लोकांपर्यंत पोहोचून ही प्रात्यक्षिके दाखवा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनर्सचा उद्या थाळीनाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारने पेन्शनधारकांची फसवणूक केली असून त्याबाबत खासदारांना जाब विचारण्यासाठी गरुवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता जनरल पोस्ट ऑफिस खडकाळी सिग्नल येथील खासदार हेमंत गोडसे यांच्या संपर्क कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पात इपीएस ९५ पेन्शनधारकाना पेन्शन वाढ केली नाही, पाच वर्षांपूर्वी भाजप सरकार सत्तेत आल्यावर महागाई भत्तासह पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले नाही. याबाबतचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी (दि. ७) नवी दिल्लीत लोकसभेमध्ये या विषयावर चर्चा होणार आहे. तरी खासदारांनी आमच्या समस्या मांडाव्यात यासाठी नाशिक जिल्हा इपीएस ९५ पेन्शनधारक फेडरेशनवतीने आंदोलन करण्यात येणार आहे. तरी पेन्शनरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images