Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

टिळकांच्या स्मारकाचा मनसेला विसर

$
0
0
राजकीय इप्सित साधण्यासाठी एखादा मुद्दा उचलायचा आणि त्यानंतर सोडून द्यायचा हे राजकीय पक्षांच्या अंगवळणी पडले आहे. त्यात सतत मराठीची ललकार देणाऱ्या मनसेही मागे नाही. यापूर्वी महापालिकेत विरोधी बाकावर असताना मनसेकडून लोकमान्य टिळकांच्या स्मारकाबाबत तीव्र आंदोलन करण्यात येत होते.

‘मटा’तर्फे ‘फ्रेंडशीप डे’ला विजेत्यांना भेट ‘वऱ्हाड’ची

$
0
0
‘मटा’तर्फे ‘फ्रेंडशीप डे’ला विजेत्यांना भेट ‘वऱ्हाड’ची... रिडर्स ऑफर कॉन्टेस्टला चांगला प्रतिसाद

नाशिकसाठी मुख्यमंत्र्यांनाच गळ घालणार

$
0
0
नाशिकमध्ये मोठ्या कंपन्यांची संख्या अधिक आहे. या कंपन्यांचा फारसा सहभाग राहत नाही. त्यामुळे या उद्योगांना सहभागी करुन घेण्यासाठी निमातर्फे एक फोरम तयार करण्यात येईल. हा फोरम सातत्याने विविध प्रश्न, समस्या आणि आयडीयाजवर काम करेल.

टाळाटाळ पडली महागात

$
0
0
सरकारी ऑफिस म्हणजे कामाची टाळाटाळ हे समिकरण काही नवीन नाही. कामाबरोबरच माणसांना टाळण्याची सवयही या सरकारी कर्मचाऱ्यांना जडलेली असते. दुसऱ्याला आपण कसे शिताफीने टाळले याची बढाई मारणारे कर्मचारी अनेकदा त्यांच्या याच सवयीमुळे तोंडावर आपटतात.

नियम पाळा, पोलिसांची मदत घ्या

$
0
0
‘अनेक विद्यार्थी नियम मोडत असल्यानेच ते पोलिसांना घाबरतात. परंतु विद्यार्थ्यांनी कायदे व नियमांचे पालन करुन गरज भासेल त‌िथे पोलिसांची मदत घ्यावी’, असे मत पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी व्यक्त केले. बीवायके कॉलेजमध्ये आयोजित स्वसंरक्षण कार्यशाळेमध्ये ते बोलत होते.

समस्यांचा भाजी‘बाजार’

$
0
0
नाशिक शहराचा विस्तार वाढतो आहे तशी उपनगरेही विस्तारत आहेत. याच उपनगरांमधील लोकसंख्येला आवश्यक भाजी पुरविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच हेतूने उपनगरांमध्ये ठिकठिकाणी भाजीबाजार सुरु झाले आहेत.

चौकशी नवी; अहवाल जुनाच

$
0
0
खतप्रकल्पाच्या क्षमतावाढीच्या नावाखाली खरेदी केलेली तब्बल ६१ कोटी रुपयांची यंत्रसामग्री वापराविना कचऱ्यात रूपांतरीत झाल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल अखेर स्थायी समितीला सादर करण्यात आला.

सिव्हिलमधील नातेवाईकांना पावतेय ‘अन्नपूर्णा’

$
0
0
अठराविश्वे दारिद्रयामुळे रूग्णावर मोफत उपचार व्हावा यासाठी गाठलेले सिव्हिल हॉस्पिटल...बाहेरगावाहून येऊन रूग्णाला अॅडमिट केल्याने निर्माण झालेला ताणतणाव...

पाणी कपात रद्द ?

$
0
0
धरणात पाणीसाठा मुबलक झाल्यानंतर प्रशासनाने पुढील आठवड्यापासून पाणी कपात रद्द करण्याची तयारी केली आहे. मात्र पूर्वीप्रमाणे शहरात दोन वेळा पाणी पुरवठा केला जाणार नाही अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यावर गुरूवारच्या सभेत जोरदार चर्चा झाली.

कृषी प्रक्रिया क्षेत्रात करिअरसाठी मुबलक संधी

$
0
0
भारतात दर्जेदार कृषी उत्पादनांची निर्मिती होते. मात्र, उत्पादनाच्या तुलनेत अत्यल्प कृषीमालावर प्रक्रिया केली जाते. परिणामी बाजरपेठेत बहुतांश माल नाशवंत राहतो. कृषी मालावरील प्रक्रियेच्या उद्योगाला कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांनी चालना द्यावी व मुबलक संधी निर्माण करण्यावर भर द्यावा.

एलबीटी जमा, मात्र सहायक निबंधक कार्यालयात

$
0
0
घराच्या खरेदी-विक्रीसंदर्भात जमा होणाऱ्या एलबीटी अर्थात लोकल बॉडी टॅक्समधून ५ कोटी ३५ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. मात्र हा महसूल सहायक निबंधक कार्यालयाकडून महापालिकेला कशा पद्धतीने वर्ग करायचा याबद्दल कोणतेही मार्गदर्शक तत्त्व राज्य सरकारने आखून दिले नसल्याने ही रक्कम कशी मिळवायची, याबाबत महापालिका वर्तुळात खल सुरू आहे.

‘एज्युकेशन आंत्रप्रिनर’ अॅवॉर्ड

$
0
0
सपकाळ नॉलेज हब आणि कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक रवींद्र सपकाळ यांना सिंगापूर येथे झालेल्या चौथ्या एशिया बेस्ट बी स्कूल अॅवॉर्ड कार्यक्रमात ‘एज्युकेशन आंत्रप्रिनर अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

प्राध्यापकांसाठी तक्रार निवारण समिती

$
0
0
प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी केलेल्या संपामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी राज्य सरकारमार्फत प्राध्यापक तसेच शिक्षक संघटनांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली.

प्रकल्पांबाबत खासदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

$
0
0
नाशिक शहरात रॅपिड रेल्वे किंवा मेट्रो रेल प्रकल्प उभारण्यासह नाशिकरोड रेल्वे स्टेशन आधुनिकीकरण व कळमुस्ते वळण योजनेसंबंधी खासदार समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या प्रमुख प्रश्नांसह इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

महिनाभरात डेंग्यूचे २२ पेशंट

$
0
0
नाशिक शहरात जुलै महिन्यात जीवघेण्या डेंग्यू रोगाचे २२ पेशंट आढळून आले आहेत. शहरातील साफसफाईचा बोजवारा उडाल्याचे हे उदाहरण असून डेंग्यूचे पेशंट वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महिंद्रात बंदचे चक्र सुरूच राहणार

$
0
0
ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदीचा परिणाम लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने घेतला आहे. त्यासंबंधीचे पत्र कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला (बीएसई) दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महिंद्राच्या कार विक्रीत तब्बल २१ टक्क्यांनी घट झाली आहे.

पानविक्रेते आंदोलनाच्या तयारीत

$
0
0
गुटखा, पान मसाल्याच्या पाठोपाठ तंबाखू, जर्दा, सुगंधित सुपारी, मिश्र मावा, खर्रा या तंबाखूजन्य पदार्थांवर राज्य सरकारने घातलेल्या बंदीला नाशिकच्या पानविक्रेत्यांनी विरोध दर्शविला आहे.

पूरस्थिती कायम

$
0
0
पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी आणि दारणा नदीची पूरस्थिती कायम आहे. गंगापूर धरणातून बुधवारी चार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता. तर जोरदार पावसामुळे गुरुवारी रात्रीच्या सुमारास हाच विसर्ग सात हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. मात्र धरण परिसरातील पावसाचा जोर पाहता पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

उंबरदरी, कोनांबे ओव्हरफ्लो

$
0
0
सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम पट्ट्यात असलेली उंबरदरी व कोनांबे ही धरणे पूर्णपणे भरली आहेत.

सभापतींच्या बैठकीला स्वच्छता निरीक्षकांची दांडी

$
0
0
नाशिकरोड विभागीय कार्यालयामार्फत केल्या जाणाऱ्या विविध कामांची झाडाझडती शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांनी घेतली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images