Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘बाइक रॅली’तून मिळणार सक्षमतेची ग्वाही

$
0
0

महिलावर्गाचा उत्साह शिगेला; नावनोंदणीला वाढता प्रतिसाद

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घराची धुरा समर्थपणे पेलण्यासह देशावर आलेले संकट पेलण्याची शक्ती... जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रात स्वत:चं नवं कर्तृत्व सिध्द करण्याची जिद्द... त्यासह येणाऱ्या प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात सक्षमतेची प्रचीती देणारी नारीशक्ती रविवारी एकवटणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल वूमन बाइक रॅली'त नारीशक्ती सक्षमतेची ग्वाही देत दोन तास बाइकच्या वेगावर स्वार होणार आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'ऑल वूमन पॉवर रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० मार्च) सकाळी ७.३० वाजता या बाइक रॅलीला प्रारंभ होईल. त्यासाठीच्या नावनोंदणीला सुरुवात झाली असून, कॉलेजच्या तरुणींसह गृहिणी, महिला बचतगट, ऑफिस महिलांचा ग्रुप मोठ्या संख्येने नावनोंदणी करीत आहे. दरवर्षी सामाजिक भान जपत, नेतृत्व कौशल्याची जोड देत, नटून थटून बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी महिलावर्गाचा उत्साह अधिक असतो. यंदादेखील महिलांच्या उत्साहाला उधाण आले असून, रविवारी होणाऱ्या रॅलीसाठी महिलांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. रॅलीत मैत्रिणींसोबत सेलिब्रेशन करण्याची संधी मिळेल, शिवाय नव्या मैत्रिणीदेखील जोडल्या जातील. त्यामुळे महिला दिनाचं खास सेलिब्रेशन करणं महिलांना शक्य होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे नारीशक्ती जिंदाबाद, आव्वाज कुणाचा, हमसे बढकर है कौन, असा थक्क करणारा उत्साह घेऊन साऱ्याजणी नाशिकच्या बाइक रॅलीत दाखल होतील. प्रत्येक क्षणागणिक वाढणारा उत्साहाचा पारा यंदाही वरचढ राहणार आहे. कलात्मक संकल्पनातून केल्या जाणाऱ्या प्रबोधनाला पारितोषिके जिंकण्याची संधीही मिळणार आहे. उत्साहाच्या या पर्वणीत सहभागी होण्यासाठी तुम्हीदेखील मागे राहू नका. आजच तुमचे नाव नोंदवा अन् बाइक रॅलीतील तुमचा सहभाग निश्चित करा.

...

\B'अशी करा नावनोंदणी'\B

'ऑल वूमन बाइक रॅली'त सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी 'PowerrallyNSK' हा एसएमएस कोड 58888 या क्रमांकावर पाठवावा अथवा www.allwomenbikerally.com या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल. तसेच ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधूनही नोंदणी करता येणार आहे.

--

\B'ऑल वूमन बाइक रॅली'\B

\Bकधी - \Bरविवार १० मार्च २०१९

\Bवेळ - \Bसकाळी ७.३० ते १०

\Bकुठे - \Bईदगाह मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळा वाचविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना आवाहन

$
0
0

मनमाड : येथील सर्वात जुन्या व स्वातंत्र्यपूर्व काळातील इंडियन हायस्कूलला रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याची नोटीस दिल्यानंतर शाळा वाचविण्यासाठी सोशल मीडिया वरून आता शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना भावनिक साद घालून रेल्वे विरुद्धच्या संभाव्य जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. रेल्वेविरुद्ध आता एकत्र लढा उभारण्या संदर्भात संचालक प्रयत्नशील असल्याचे सोमवारी संस्थेचे संचालक डॉ. सी. एच. बागरेचा, राजेंद्र गुप्ता, विकास काकडे यांनी सांगितले. दरम्यान शाळा हलविण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला आव्हान दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमाचा राज्यस्तरीयक्रीडा महोत्सव

$
0
0

निमाचा राज्यस्तरीय

क्रीडा महोत्सव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन (निमा) या संघटनेच्यावतीने गोल्फ क्लब मैदानावर ८ ते १० मार्च कालावधीत जिल्हा अंतर्गत आणि राज्यस्तरीय क्रिकेट क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात येणार आहे. वैद्यकिय व्यवसायिकाच्या आरोग्यदायी स्वाथ्यच्या विचार करून जिल्ह्य अंतर्गत क्रिकेट स्पर्धा 'निमा करंडक' या नावाने आयोजन गेल्या सहा वर्षांपासून नाशिक निमा शाखा राबवित आहे. यावर्षी प्रथमच राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील डॉक्टरांचे संघ नाशिक शहरात दाखल होणार आहेत.

या क्रिकेट महोत्सवाप्रसंगी पहिल्या दिवशी ८ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील तालुकास्तरीय डॉक्टरांच्या स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, निमाचे राष्ट्रीय शाखेचे सहखजिनदार शैलेश निकम, निमा राज्य शाखेचे खजिनदार डॉ. भूषण वाणी, उपसचिव डॉ. अनिल निकम तसेच प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्‍त्या व नाशिक महापालिकेच्या प्रभाग पश्‍चिम समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील निमा नाशिक, सातपूर, पाथर्डी, पंचवटी, दिंडोरी, पेठ, आयएमए, शिवगर्जना लासलगाव हे संघ सहभागी होणार आहेत.

महोत्सवाचा राज्यस्तरीय स्पर्धा या ९ व १० रोजी आयोजित करण्यात आल्या असून त्यात यात नांदेड, नागपूर, शेवगाव, आंबेगाव-जुन्नर, राजगुरुनगर, शिरूर, शहापूर, बार्शी, बुलढाणा, शिरपूर-धुळे, परभणी विविध जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. १० मार्च रोजी क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी परितोषिक वितरणासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विजेत्या संघाला विजेता संघाला चषक व ३१ हजार रुपये रोख आणि उपविजेत्या संघाला चषक व २१ हजार रुपये रोख व याबरोबरच उत्कृष्ट खेळाडूना विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपवासामुळे दूधदरात वाढ

$
0
0

\Bमहाशिवरात्री व सोमवारमुळे झाली वाढ\B

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाशिवरात्री व सोमवार असा दुहेरी योग जुळून आल्याने सोमवारी (दि. ४) दूध विक्रेत्यांनी दूध दरात पाच ते दहा रुपयांची वाढ केली होती. उपवासामुळे मागणी वाढल्याने ही वाढ एका दिवसापुरतीच असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. यामुळे ग्राहकांना जादादराने दूध खरेदी करावे लागले. याशिवाय दही व ताकालाही चांगली मागणी होती.

महाशिवरात्री व सोमवारनिमित्त अनेक भाविक भगवान महादेवांना दुधाचा अभिषेक घालतात. ठिकठिकाणच्या मंदिरात पूजा, अर्चना केली जाते. तसेच घरातील लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच उपवास असल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली होती. यामुळे सोमवारी दुधाचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले होते. ६० ते ६५ रुपये लिटरने दुधाची विक्री करण्यात आली. दुधाबरोबरच ताक व दहीलाही चांगली मागणी होती. दहीची १०० रुपये किलोने विक्री झाली.

...

बाजारात फळांची रेलचेल

महाशिवरात्र व सोमवार यामुळे बाजारात फळांची रेलचेले होती. मागणी अधिक असल्याने रविवारपासूनच विक्रेत्यांना फळांचा जादा साठा करून ठेवला होता. फळांच्या दरातही किरकोळ वाढ करण्यात आली होती. असे असूनही फळांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

द्राक्षांची बाजारात आवक वाढली असून, दर सर्वसामान्यांच्या आवकेत आले आहेत. यामुळे मागणीही वाढली आहे. द्राक्षांना किलोला ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. संत्रीची आवक वाढल्याने दर थोडे कमी झाले आहेत. संत्री ३० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. याशिवाय टरबूजची आवक वाढू लागली आहे. टरबूजला किलोला १५ रुपये दर मिळत असून, नगनुसारही विक्री होत आहे. अॅपल बोरची आवक थोडी कमी झाली असली तरी दर मात्र ४० रुपये किलोवर टिकून आहे.

....

किलोचे दर

द्राक्ष - ५०

सफरचंद १०० ते १६०

संत्री - ४०

पपई - ३०

टरबूज - १५

अॅपल बोर - ४०

चिक्कू - ६०

डाळिंब - ८०

केळी - ३० रुपये डझन

किवी - ४० रु. नग

ड्रॅगन - १०० रु. नग

शहाळे - ४० रु. नग

....

भाजीपाल्याचे दर टिकून

भाजीपाल्याच्या दर गेल्या आठवड्याप्रमाणेचे टिकून आहेत. पालेभाज्यांचे दर जैसे थे आहेत. मेथी, कोथिंबीरची जुडी ५ ते ७ रुपये, तर शेपू व पालकची ५ रुपये जुडीप्रमाणे विक्री होत आहे. कांदापातच्या जुडीला १० रुपये दर मिळत आहे. कारले, गिलके व दोडके यांचे किलोचे दर ५० ते ६० रुपयांवर टिकून आहेत. वांगे मात्र स्वस्त झाले आहेत. वांग्याचे दर २० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मिरची ५० रुपये, टोमॅटो २० रुपये, काकडी २० रुपये, तर शेवगा ६० रुपये किलोने विक्री होत आहे. तसेच कडधान्याचे दरही जैसे थे आहेत. मटकी ४८ रु., पांढरा वाटाणा, हरभरा, मसूर, चवळी यांचे दर किलोला ६० रुपये आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा वेळापत्रक

$
0
0

विमानसेवा वेळापत्रक

मंगळवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ८.५५ - सकाळी १०.१०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी १०.४० - सकाळी ११.५५

नाशिक…… - हैदराबाद

दुपारी १.००… - दुपारी २.५०

हैदराबाद… - नाशिक

सकाळी ६.४५… - सकाळी ८.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडी पार्किंगवरून टाकळीमध्ये मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रस्त्यात गाडी का उभी केली, असे विचारणाऱ्याला आगर टाकळीतील रामदास स्वामीनगर येथे सहा जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवीण वसंत पवार (४६) व त्याचा भाऊ दिलीप (रा. रामदासस्वामी नगर) हे दोघे भाजीपाला घेऊन घरी जात असताना रामदासस्वामी नगर येथील चौकात मधोमध चारचाकी वाहन उभे होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. प्रवीण याने 'रस्त्यात वाहन का उभे केले', असे नानू साळवे याला विचारले. यामुळे संतापलेल्या नानूने शिवीगाळ करून प्रवीणला लाथाबुक्क्याने मारहाण केली. नानूचे साथीदार रोहित मल्ला व रंका साळवे यांनीही प्रवीणला मारले. तसेच चंद्रमणी जगताप, राजेंद्र जगताप यांनीही त्याला मारहाण केली. जखमी अवस्थेतील प्रवीणला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी नानू साळवे, अंकुश साळवे, चंद्रमणी जगताप, शुभम वर्मा, राजेंद्र जगताप, भारत रामअवतार मल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संदर्भ सेवा’च्या खिडक्यांना जाळीकवच

$
0
0

\B- \Bजाळ्यांसाठी २० लाखांची तरतूद

- रुग्णांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शालिमार येथील विभागीय संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये उंच मजल्यांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी उड्या मारून आत्महत्या केल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भविष्यातसुद्धा हा धोका कायम असल्याने हॉस्पिटलमधील खिडक्यांना जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने २० लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे हा निधी हॉस्पिटलमार्फतच सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे.

हॉर्ट, किडनी यासह इतर महत्त्वाच्या गंभीर आजारांवर संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. शंभर बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलला तीन मजले असून, येथे सतत रुग्णांची वर्दळ असते. नाशिक आणि मराठवाडा विभागातील रुग्ण उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. मुळात या ठिकाणी दाखल होणारे रुग्ण मानसिक व आर्थिक परिस्थितीने गांजलेले असतात. याच मानसिकतेतून संधी मिळताच रुग्ण हॉस्पिटलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करतात. ९ फेब्रुवारी रोजी जवाहरलाल रामकिसन गुप्ता (वय ४८, रा. श्रीरामनगर, घोटी, ता. इगतपुरी) यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी १२ जानेवारी रोजी रहीमखान नबीखान पठाण (वय ५२, रा. मालेगाव) यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तसेच यापूर्वी असे प्रकार सातत्याने घडले आहेत. हॉस्पिटलच्या सर्व खिडक्यांना तसेच ओपन स्पेसमध्ये जाळ्या बसविण्याचा एक प्रस्ताव लालफितीत अडकला होता. त्यामुळे येथे जाळ्या बसविणे शक्य झाले नाही.

...

आत्महत्येच्या घटनांनंतर आली जाग

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील घटनांनी आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. या कामासाठी निधीची जमवाजमव करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यात आरोग्य विभागाने या कामास २० लाखांच्या खर्चास मंजुरी दिली. संदर्भ सेवा हॉस्पिटलला विम्याची रक्कम मिळते. त्यातूनच ही रक्कम काढून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार असल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले. निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम कधी आणि कसे पूर्ण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटच्या प्रतींवरून विरोधक आक्रमक

$
0
0

मंजुरीसाठी गुरुवारी विशेष महासभा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकून अर्थसंकल्पाची मंजुरी रखडू नये यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने गुरुवारी (दि. ७) महासभा बोलविण्यात आली आहे. परंतु, अर्थसंपल्पाच्या प्रती नगरसेवकांना न मिळाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. मूळ अर्थसंकल्पाच्या प्रती वेळेत न मिळाल्याचे कारण देत, विरोधकांकडून महासभेत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीने प्रशासनाने सादर केलेले २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेट मंजुरीसाठी महासभेकडे पाठवले आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्थायी समितीला १८९४.५० कोटींचे प्रारूप अर्थसंकल्पीय बजेट सादर केले. स्थायी समितीने त्यात ८९ कोटींची वाढ सूचवल्याने हे बजेट १९८३ कोटींपर्यत पोहचले. लोकसभा निवडणुकीची घाई असल्याने भाजपला हे बजेट आचारसंहितेपूर्वीच अंमलबजावणीला पाठवायचे आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने स्थायीचे बजेट प्राप्त होताच, त्याला मंजुरीसाठी गुरुवारी सकाळी १० वाजता विशेष सभा बोलवली आहे. या बजेटमध्ये पुन्हा महासभेकडून ७० कोटींची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेचे हे वाढीव बजेट दोन हजार कोटींवर गेले असून प्रशासनाकडे छपाईसाठी पाठवण्यात आले आहे. बजेटवर अभ्यास करण्यासाठी सदस्यांना किमान सात दिवस आधी बजेटच्या प्रति मिळणे आवश्यक होते. परंतु, महासभेला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असतांनाही, बजेटच्या प्रति सदस्यांच्या हाती पडलेल्या नाहीत. त्यामुळे विरोधक यावरून सत्ताधारी भाजपला घेरण्याच्या तयारीत आहेत. बजेट तयार नसतांना महासभा कशी बोलवली, असा सवाल आता विरोधकांकडून केला जात असून भाजपची या विषयावरून महासभेत कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटवरून महासभा वादळी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्री रुग्णालयास लाभला मुहूर्त

$
0
0

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज भूमिपूजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या वादात अडकलेले शहरातील पहिले स्री रुग्णालय अखेर मार्गी लागले असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते या रुग्णालयाची कोनशिला मंगळवारी (दि. ५) ठेवण्यात येणार आहे.

माजी आमदार वसंत गिते यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची अखेर सरशी झाली असून सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय असे या रुग्णालयाचे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील पहिले स्री रुग्णालय दृष्टीपथास आले आहे. आमदार विकास निधीतून ४२ कोटींच्या कामांचा शुभारंभ केला जाणार असून त्यात गोल्फ क्लब मैदानाच्या सुशोभिकरणाचाही समावेश आहे.

राज्य सरकारने शहरात मंजूर केलेले पहिले स्री रुग्णालय हे पाच वर्षापासून आ. फरांदे आणि वसंत गिते यांच्यातील वादात अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आ. फरांदे यांच्या बाजूने कौल दिला. आता भाभानगरमध्येच हे रुग्णालय साकारले जाणार आहे. आमदार फरांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्री रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याची माहिती दिली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते कोनशिला बसविण्यात येणार आहे. या रुग्णालयासह साईनाथनगर चौफुली ते वडाळा चौफुली दरम्यान मंजूर झालेल्या सायकल ट्रॅकचे, पाच कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाचेही भूमिपूजन केले जाणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले आहे.

चार वर्षांचा संघर्ष

आपण या रुग्णालयासाठी चार वर्षांपासून संघर्ष केला असून त्यामुळे महिलांना मध्यवर्ती ठिकाणी उपचारासाठी एक रुग्णालय उपलब्ध झाले आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यात १२ ओपीडी असणाऱ्या या वास्तूत आयसीयू, एनआयसीयू देखील असणार आहेत. तसेच तीन ऑपरेशन थिएटरही येथे असेल, असेही आमदार फरांदे यांनी सांगितले.

गोल्फ क्लबचे बदलणार रुपडे

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान अर्थात गोल्फ क्लब येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या कामांचेही भूमिपूजन केले जाणार आहे. या मैदानात ७.५ मीटर रुंदीचा मातीचा जॉगिंग ट्रॅक, तीन मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक, योगासाठी स्वतंत्र जागा, ग्रीन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा, फुटबॉल व क्रिकेटसाठी स्वतंत्र ग्राउंड, क्रिकेटच्या सरावासाठी नेट, महिला व पुरुषांसाठी ई-स्वच्छतागृह, लहान मुलांच्या खेळण्यासाठी स्वतंत्र जागा, पेव्हर वाहनतळ व्यवस्था, बसण्यासाठी स्वतंत्र लॅान व्यवस्था, फुलांचे आकर्षक गार्डन असे विविध कामे केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ आग फटाक्यांमुळेच;

$
0
0

शालेय व्यवस्थापनाचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चेहेडी नाका येथील आदर्श विद्यामंदिराच्या स्नेहसंमेलनप्रसंगी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ लागलेली आग ही एका वाढदिवसानिमित्त हुल्लडबाजी घालणाऱ्या तरुणांनी उडविलेल्या फटाक्यांमुळेच लागली होती. स्नेहसंमेलन आणि आग यांचा काहीही संबंध नाही, असा दावा शालेय व्यवस्थापनाने केला आहे.

'स्नेहसंमेलनात आग' या मथळ्याखाली सोमवारी 'मटा'त प्रकाशित झालेल्या वृत्तानंतर शालेय व्यवस्थापनाने बाजू मांडली आहे. याबाबत माहिती अशी, की रविवारी चेहडी नाका परिसरातील संस्थेत आयोजित स्नेहसंमेलनादरम्यान शाळेजवळ आग लागली होती. या परिसरातील रस्त्याच्या चौफुलीवर रात्री काही लोकांनी वाढदिवस साजरा करताना फटाके फोडले. या फटाक्याची एक ठिणगी जवळील शेतातील गंजीवर पडून ही आग लागली. स्नेहसंमेलनाचे नियोजन आणि लागलेली आग यात काहीही संबंध नसून उलट संयोजकांनी संमेलनस्थळी पाच अग्निरोधक सिलिंडर व प्रतिबंधक यंत्रणा सज्ज ठेवली होती. परिणामी, घटनास्थळी विद्यार्थी व पालकांचा गोंधळ झाला नाही. पालकांनी यावेळी सादर सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बहुसंख्येने उपस्थिती लावली, असा खुलासा समता समाज विकास संस्थेच्या मानद सचिव मनीषा विसपुते, अध्यक्ष मधुकरराव सातपुते, समन्वयक रविकिरण औटे यांनी केला आहे. याशिवाय या परिसरात रात्री उशिराच्या वेळेत चौकाचौकात तरुणांचे वाढदिवस साजरे केले जातात. परिसरात बेकायदा गर्दी जमवून रहदारीसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा रस्ताही यामुळे अडला जातो. या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, अशीही मागणी औटे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्री रुग्णालयास लाभला मुहूर्त

$
0
0

नाशिक : भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या वादात अडकलेले शहरातील पहिले महिला रुग्णालय अखेर मार्गी लागले असून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते या रुग्णालयाची कोनशिला मंगळवारी (ता. ५) ठेवण्यात येणार आहे. माजी आमदार वसंत गिते यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची अखेर सरशी झाली असून सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय असे या रुग्णालयाचे नामकरण करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्टेशनची ‘एजीएम’कडून पाहणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेचे मुंबई येथील सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) डॉ. आर. बद्री नारायण यांनी सोमवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्टेशनला भेट दिली. स्थानकातील प्रवासी सुरक्षा व सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

रेल्वेस्टेशनमधील चारही प्लॅटफार्म, बुकिंग व रिझर्व्हेशन ऑफिस, सरकते जिने, रेल्वे सुरक्षा कार्यालय, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आदींची त्यांनी पाहणी करून सूचना केल्या. स्टेशनमधील स्वच्छतेबाबत पाहणी करतानाच कंत्राटी सफाई कामगारांशी संवाद साधून त्यांना योग्य ते मानधन मिळते की नाही याची माहिती घेतली. या कामगारांना कागदोपत्री जेवढा पगार दाखवला जातो, त्यापेक्षा कमी पगार त्यांच्या हातात मिळतो असे पत्रकारांनी निर्देशनास आणून दिले असता कामगारांनीच याबाबत जागरुक रहावे, रेल दृष्टी या संकेतस्थळावर कंत्राटाची सर्व माहिती दिलेली आहे, असे त्यांनी सांगितले. नाशिक-कल्याण लोकल नाशिककरांच्या सेवेत कधी रुजू होणार याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. स्टेशनमधील विकासकामे प्रगतिपथावर असून, त्रुटी दूर केल्या जात असल्याचे ते म्हणाले.

यावेळी स्टेशनमास्तर आर. के. कुठार, भुसावळचे वरिष्ठ तिकीट अधिकारी अजयकुमार, वरिष्ठ डीसीएम आर. के. शर्मा, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, अभियंता एस. जी. सैय्यद, गणेश पाटील, एम. बी. डोके, आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, संजय गांगुर्डे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वराजतर्फे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अस्मिता रॅली

$
0
0

स्वराजतर्फे गुरुवारी

अस्मिता रॅली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वराज फाउंडेशन व आकार फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक संदेश देण्यासाठी व महिलांची अस्मिता उंचावण्यासाठी अस्मिता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (७ मार्च) सायंकाळी ६.३० वाजता डोंगरे वसतिगृह येथून या रॅलीची सुरुवात होणार आहे. गंगापूर रोड, कॉलेजरोड या भागात या रॅलीचे संचलन होणार आहे. या अस्मिता रॅलीमध्ये महिला ढोल पथक महिला लेझीम पथक मुलींचे कराटे प्रात्यक्षिक बेटी बचाव अवयव दान प्रदूषण टाळावे शिक्षण अशा विषयाचे विविध संदेश या रॅलीमध्ये देण्यात येणार येणार आहे. तसेच झाशीची राणी, इंदिरा गांधी, कल्पना चावला अशा विविध महिला नेतृत्वाचे प्रतीक म्हणून वेशभूषा करण्यात येणार आहेत या अस्मिता रॅलीमध्ये शहरातील महिला संस्था व शहरातील महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद हास्य क्लबचा वर्धापनदिन

$
0
0

आनंद हास्यक्लबतर्फे

निरोगी रहा कार्यक्रम

नाशिकरोड : नाशिकरोडच्या आनंद हास्य योग क्लब आणि अपोलो हॉस्पिटलतर्फे काळजी मानसिक व शारीरिक आरोग्याची हसा व निरोगी रहा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. क्लबच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकरोडच्या ऋतुरंग भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. क्लबचे अध्यक्ष वसंतराव पेखळे, वैशाली सहस्त्रबुध्दे, आशा बोराडे, विद्या माळवे, सुरेखा दुसाने, नंदा शेळके, निशा काथवटे, विजया करवा आदींची यावेळी उपस्थिती होती.

मेंदू व मणके शस्त्रक्रियात्जज्ञ डॉ. संजय वेखंडे, किडनी विकारतज्ज्ञ डॉ. प्रकाश उगले, अस्थिरोग व गुढ़घेबदल शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अनिल जाधव, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. प्रवीण गोवर्धने यांची व्याख्याने झाली. निरोगी आरोग्यासाठी हास्ययोग कसा पूरक आहे याविषयी क्लबचे अध्यक्ष वसंतराव पेखळे यांनी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता परिवर्तनाची आवश्यकता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आता परिवर्तनाची आवश्यकता व राष्ट्रीय गरज आहे. देशावर भाजपची राष्ट्रीय आपत्ती आली आहे. त्यासाठी जागृत राहावे लागेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

चोपडा लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघ 'कार्यकर्ता संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बूथ प्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळी ती यंत्रे तपासून घ्यावीत. भाजप रडीचा डाव खेळणार असले, तरी परिवर्तन होणार आहे. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती, ती राज्ये त्यांच्या हातातून गेल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या कामांचे कौतुक करुन त्यांच्यामुळे नाशिकचा चेहरा बदलल्याचे सांगितले. नाशिकची संपूर्ण जबाबदारी भुजबळांकडे आहे. त्यामुळे या विकास पुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या शेतकरीविरोधी भाजप सरकारला हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राफेल, नोटाबंदी व भाजपच्या कारभाचे वाभाडे काढून शेतकऱ्यांना दिलेल्या योजनांवर टीका केली. रोजगार देण्यातही सरकारला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाच वर्षात माझ्या काळात जवळपास पूर्ण झालेले प्रकल्प सुरू केले नसल्याचे सांगत सरकारवर टीका केली. माजी आमदार अपूर्व हिरे यांनी सिडकोचा प्रश्न मांडत महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, गटनेते गजानन शेलार, नगरसेविका सुषमा पगारे, समीना मेमन, विष्णूपंत म्हैसधूणे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार हेमंत टकले, माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी आमदार जयवंत जाधव यांनी केले.

'मुख्यमंत्र्यांनी नाशिकला काय दिले?'

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, देशात प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिक सोळाव्या स्थानी होते, आज ते शंभरातही नाही. आता नाशिकची जागा नागपूरने घेतली. नागपूरने पुढे जावे. पण, मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले असताना नाशिक गायब झाले कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी राज्यसरकारने आपला वाटा जाहीर केला आणि त्यानंतर केंद्रीय बजेटमध्ये मंजुरी मिळाली. मात्र, अद्याप ते झाले नाही. आता पुन्हा एकदा सर्वेक्षणाचा घाट घालून जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले जात आहे. नाशिकमध्ये बोट क्लब, कालाग्रामसारखे अनेक प्रकल्प पूर्ण केले, तसेच अनेक प्रकल्पांचे काम सुरू करून दिले. ते दत्तक पित्याने पूर्ण करून प्रकल्प का सुरू केले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला नेमके काय दिले, असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'चौकीदारही चौर है' असे म्हणणारे उद्धव ठाकरे पुन्हा त्यांच्यासोबत जाऊन बसले आहेत. सरकारने जनतेला फसवले असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी कबूल केले आहे. सरकारचे निर्णय जनतेच्या विरोधात गेले असतील तर त्याला शिवसेनादेखील तितकीच जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

एका परिवारावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोनच गोष्टी सांगतात. ते सांगतात 'देश मजबूत हाथों मैं हैं', तर दुसरे 'एका परिवाराने देशाचे वाटोळे केले'. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाला मजबूत करण्याचे काम केले. या परिवारातील दोन पंतप्रधानांची हत्या झाली. पंतप्रधांनानी जपून बोलले पाहिजे. इंदिरा गांधी यांनी पाकचे दोन तुकडे केले, तर राजीव गांधी यांनी देशाला विज्ञानाची दृष्टी दिली, असेही ते म्हणाले.

निवडणुका एप्रिलमध्ये

लोकसभा निवडणुका ७ किंवा ८ मार्चला जाहीर होतील व एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होईल, असे सांगत पवार यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भरली नाही तरी निघाली...

$
0
0

प्रवाशांअभावी धावली एसटी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एसटी बसमध्ये प्रवाशांची संख्या फुल्ल झाली की, एसटी निघते, असे सर्वसाधारण दृश्य दिसून येते. मात्र, महाशिवरात्रीच्या दिवशी 'भरली की निघाली' हे वाक्य सफशेल फोल ठरले. भाविकांच्या गर्दीअभावी अवघ्या तीन ते चार प्रवाशांसाठी एसटी बस सीबीएस येथून त्र्यंबककडे रवाना करण्यात आल्या.

महाशिवरात्रीसाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली होती. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकनगरीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता ७० हून अधिक बस त्र्यंबकसाठी तयार ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सोमवारी भाविकांनी एसटी बसकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. सकाळी ९पर्यंत प्रवाशांची संख्या चांगली होती. पण, त्यानंतर एसटीला प्रवाशी मिळेनासे झाले. सकाळी ११ नंतर सीबीएस येथील जुने मेळा बस स्थानक येथून त्र्यंबककडे जाणाऱ्या बसेस अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या प्रवाशांसहित सोडण्यात आल्या. खासगी वाहतुकीवर प्रवाशांच्या कमतरेचा परिणाम जाणवला. मेळा बस स्थानकाच्या बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सी तासन् तास प्रवाशांची वाट पाहत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात दुमदुमली शिवमंदिरे

$
0
0

येवला : 'शिवशंभो, नमामि शंभो', 'हर हर महादेव' असा जयघोष करीत येवला शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील मंदिरामंमध्ये भाविकांनी शिवमहिमा वर्णिली. शहरातील पुरातनकालीन मोठे महादेव मंदिर, बसस्थानकानजीकचे जुने शिवमंदिर, बदापूर रोडवरील रोकडोबा महाराज मंदिर यासह तालुक्यातील पाटोदा येथील रामेश्वर मंदिर, अंदरसूलचे प्राचीन नागेश्वर मंदिर, चिचोंडी येथील राघवेश्वर मंदिर,तसेच मुखेड, नगरसुल आदी ठिकाणच्या शिवमंदिरात दिवसभर शिवभक्तांची मोठी गर्दी दिसत होती. अंदरसूल येथील श्री क्षेत्र नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबिराचा सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आला. सावता युवक गणेश मंडळ यांनी नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य दलातील जवानाच्या घरी चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पळसे गावातील फुलेनगरातील सैन्यातील जवानाच्या घरी झालेल्या घरफोडीत कोठीत ठेवलेले १ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले. याच चोरट्यांनी जवानाच्या शेजारील बंद घरातून रोख २० हजार रुपये लुटले. तसेच एका नागरिकाच्या घरासमोरील दुचाकी लंपास केली. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने पळसे परिसरात खळबळ उडाली आहे.

रोहिणी संदिप म्हस्के (वय २७, रा. फुलेनगर, पळसे) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संदीप म्हस्के सैन्यदलात नोकरीस आहेत. गेल्या काही दिवसांपासून म्हस्के कुटुंबीय देवळाली कॅमम्मधील वेलमन कॉलनीत तात्पुरते वास्तव्यासाठी गेलेले होते. फुलेनगर येथील त्यांच्या घरी कुलूप असल्याने शनिवारी (दि. २) रात्री उशिरा चोरट्यांनी घरफोडी केली. यात घरातील लोखंडी कोठीत ठेवलेली १ लाख ५ हजार रुपये किंमतीची साडेतीन तोळे सोन्याची पोत आणि ४५ हजार रुपयांचा दीड तोळे सोन्याचा नेकलेस चोरट्यांनी चोरून नेला. याच चोरट्यांनी म्हस्के यांच्या घराशेजारील रामदास भिकाजी पाटील यांच्या बंद घरात शिरकाव करीत रोख २० हजार रुपये लंपास केले. पाटील कुटुंबीय त्यांच्या मूळ गावी कावणी येथे गेलेले होते. यानंतर चोरट्यांनी संदीप सुधाकर गायधनी यांच्या घरापुढे उभी केलेली दुचाकीही (एमएच १५ ईआर १२६९) चोरुन नेली. या तिन्ही घटनांची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे, नाशिकरोड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने, उपनिरिक्षक सचिन शेंडकर, वैशाली मुकणे आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले नाही.

आडगावातही घरफोडी

विश्‍वनाथ वसंत बेडसे (रा. वृंदावननगर, आडगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. हा प्रकार २४ फेब्रुवारी ते ३ मार्च यादरम्यान घडला. चोरट्यांनी किचनमधील कपाटातून ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यात ४० हजार रुपयांची २४ ग्रॅमची सोनसाखळी, ११ हजार रुपयांची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, चार हजार रुपयांचे दोन ग्रॅमचे वेढे, २० हजार रुपयांची रक्कम व ११ हजार रुपयांची एक अंगठी असा ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत आडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाल्याच्या पदार्थांना मोठी मागणी

$
0
0

मसाल्याच्या पदार्थांना मोठी मागणी

'गोदाई' महोत्सवाचा समारोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खडा मसाला, मसाल्याचे पदार्थ, चटणी, मसाला बनविण्यासाठी लागणारे पदार्थ, लोणचे या आणि अशा विविध पदार्थांना गोदाई महोत्सवात मोठी मागणी असल्याचे दिसून आले. उन्हाळ्याला प्रारंभ होताच घराघरामध्ये मसाला तयार करण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, महोत्सवात तयार मसाले मिळत असल्याने नाशिककरांनी त्यास प्रतिसाद दिला.

राज्य सरकारचा ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे डोंगरे वसतिगृह मैदानावर भरविण्यात आलेल्या या महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला.

या ठिकाणी घरगुती मिरची, मसाले उपलब्ध असल्याने नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील बचतगटाच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी त्या माध्यमातून महिला सक्षम व्हाव्यात यासाठी राज्य सरकारच्यावतीने डोंगरे वसतीगृह येथे बचतगटाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात सर्व प्रकारचे घरगुती पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते. सध्याच्या सिझन हा मिरची- मसाले करण्याचा असल्याने नाशिकमधील नागरिकांनी या महोत्सवातून मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी केली. या ठिकाणी धुळे, शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार भागातून मिरची ची आवक झाली होती. या भागातील मिरची जास्त तिखट असल्याने व चव वेगळी असल्याने अनेकांनी खरेदी केली. त्याच बरोबर खान्देशी मसाले, विदर्भाचे मसाले, राजापुरची हळद यांना देखील चागली मागणी होती. नाशिकसह राज्याच्या ग्रामिण भागातून अनेक महिला बचत गट या महोत्सवात सहभागी झाले होते. सोमवारी महाशिवरात्र असल्याने या ठिकाणी असलेल्या स्टॉल्समध्ये साबुदाणा वडे, खिचडी, बटाटा वेफर्स याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

…---

प्रशस्तिपत्रक देऊन गौरव

२६ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या महोत्सवाची सोमवारी सांगता करण्यात आली. यावेळी सहभागी झालेल्या बचतगटांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद रत्नागिरी या ठिकाणचे बचतगट सहभागी झाले होते.

…----

आम्ही बचतगटाच्यावतीने कुरडया पापड्या, विविध प्रकारच्या चटण्या, बिबडे विक्रीसाठी आणले होते. सुरुवातीला दोन दिवस ग्राहक नव्हते नंतर मात्र चांगली गर्दी झाली. धुळ्याहून आणलेला सर्व माल संपाला. चागले पैसे मिळाले.

सिताबाई नरोडे, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात पासपोर्ट सेवा कार्यालय सुरू

$
0
0

मुंबई, नाशिकचा फेरा वाचणार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुख्य टपाल कार्यालयातकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते शहरात नुकतेच पासपोर्ट सेवा कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी महापौर चंद्रकांत सोनार, पासपोर्ट सेवा कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी टी. डी. शर्मा, टपाल कार्यालयाच्या औरंगाबाद विभागाचे निदेशक बी. अरुमुगम आदी उपस्थित होते.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, यापूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी मुंबई, नाशिक येथे जावे लागत असे. त्यामुळे धुळे शहरात पासपोर्ट सुविधा केंद्र कार्यान्वित व्हावे, अशी मागणी सातत्याने होत होती. ही मागणी आता पूर्णत्वास आली आहे. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात धुळे शहरात राज्य शासनाच्या सहकार्याने वीजतारा भूमिगत टाकण्यात येतील. तसेच आगामी काळात स्वयंपाकाचा गॅस पाइपलाइनने घरापर्यंत उपलब्ध होईल. याशिवाय सीएनजी गॅसवर रिक्षा धावतील. त्यासाठी शहराच्या विविध भागात गॅस स्टेशन कार्यान्वित करण्यात येतील. त्यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होईल, असेही डॉ. भामरे यांनी सांगितले.

धुळेकरांनी लाभ घ्यावा
शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी, पाणीपुरवठ्यासाठी १७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. धुळे-नरडाणा रेल्वे मार्गासाठी भूमी संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले. धुळे येथे देशात टपाल विभागाच्या सहकार्याने ४०१ वे पासपोर्ट सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पासपोर्ट सुविधा केंद्राचा गेल्या काही वर्षात विस्तार झाला असून, या सेवेत सुधारणा होवून सक्षमीकरणही झाले आहे, असे मत पासपोर्ट सेवा कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी टी. डी. शर्मा यांनी व्यक्त केले. धुळे शहर व परिसरातील नागरिकांना या केंद्रामुळे सुविधा प्राप्त होतील, असे प्रतिपादन निदेशक अरुमुगम यांनी केले. नागरिकांनी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी टपाल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images