Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भाजप विरोधात आदिवासींचे ‘उलगुलान’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार विरोधात निघालेल्या लाल बावट्याच्या एल्गाराला शमविण्यात कसेबसे यशस्वी झालेल्या फडणवीस सरकारला आता आदिवासींच्या एल्गाराचा सामना करावा लागणार आहे. भाजप सरकारने राज्यातील धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू केल्याने आदिवासी समाजात नाराजी पसरली आहे. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी बुधवारी (६ मार्च) रोजी नाशिक येथून मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपने धनगरांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील चार लोकसभा आणि २५ विधानसभा मतदारसंघात आदिवासींकडून भाजपला इंगा दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण लागू करू, असे आश्वासन भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. त्यामुळे मराठा समाजापाठोपाठ आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने सरकारवर दबाव वाढवला होता. भाजपने मराठा समाजाला लागू केलेले १६ टक्के आरक्षण न्यायालयात अडकले असताना निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाला खुश करण्यासाठी भाजप सरकारने ‘टिस’च्या अहवालाच्या आधारे आदिवासींच्या सामाजिक व शैक्षणिक सवलती या धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय २ मार्च रोजी घेतला आहे. धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करण्यास राज्यातील आदिवासींचा तीव्र विरोध असतानाही भाजप सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात आदिवासींमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे राज्य सरकारने धनगर समाजाबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात आदिवासींनी एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला असून, धनगर समाजाला लागू केलेल्या सवलती रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ६ मार्च रोजी नाशिकमधून लाँग मार्च काढला जाणार आहे. नाशिक ते मुंबई असा हा लाँग मार्च असून, तो मंत्रालयावर धडकणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा लाँग मार्च सर्वपक्षीय आहे. भाजपसह, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनाही त्यात सामील करून घेतले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा भाजपची कोंडी होणार असून, भाजप या लाँग मार्चला कसे थोपावतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

चार लोकसभांवर प्रभाव
राज्यातील अनुसूचित जमातींचे चार लोकसभा, तर २५ विधानसभा मतदारसंघ आहेत. दिंडोरी, पालघर, नंदूरबार आणि गडचिरोली या चार लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचेच खासदार आहेत. परंतु, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी समाजामध्ये असलेल्या नाराजीचा फटका भाजपला या मतदारसंघांत बसू शकतो. एवढेच नव्हे तर २५ विधानसभा मतदारसंघांतही त्याचे प्रतिबिंब उमटू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सैन्य दलातील जवानाच्या घरी चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पळसे गावातील फुलेनगरातील सैन्यातील जवानाच्या घरी झालेल्या घरफोडीत कोठीत ठेवलेले १ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले. याच चोरट्यांनी जवानाच्या शेजारील बंद घरातून रोख २० हजार रुपये लुटले. तसेच एका नागरिकाच्या घरासमोरील दुचाकी लंपास केली. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने पळसे परिसरात खळबळ उडाली आहे.

रोहिणी संदिप म्हस्के (वय २७, रा. फुलेनगर, पळसे) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचे पती संदीप म्हस्के सैन्यदलात नोकरीस आहेत. गेल्या काही दिवसांपासून म्हस्के कुटुंबीय देवळाली कॅमम्मधील वेलमन कॉलनीत तात्पुरते वास्तव्यासाठी गेलेले होते. फुलेनगर येथील त्यांच्या घरी कुलूप असल्याने शनिवारी (दि. २) रात्री उशिरा चोरट्यांनी घरफोडी केली. यात घरातील लोखंडी कोठीत ठेवलेली १ लाख ५ हजार रुपये किंमतीची साडेतीन तोळे सोन्याची पोत आणि ४५ हजार रुपयांचा दीड तोळे सोन्याचा नेकलेस चोरट्यांनी चोरून नेला. याच चोरट्यांनी म्हस्के यांच्या घराशेजारील रामदास भिकाजी पाटील यांच्या बंद घरात शिरकाव करीत रोख २० हजार रुपये लंपास केले. पाटील कुटुंबीय त्यांच्या मूळ गावी कावणी येथे गेलेले होते. यानंतर चोरट्यांनी संदीप सुधाकर गायधनी यांच्या घरापुढे उभी केलेली दुचाकीही (एमएच १५ ईआर १२६९) चोरुन नेली. या तिन्ही घटनांची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त ईश्वर वसावे, नाशिकरोड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने, उपनिरिक्षक सचिन शेंडकर, वैशाली मुकणे आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले नाही.

आडगावातही घरफोडी
विश्‍वनाथ वसंत बेडसे (रा. वृंदावननगर, आडगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. हा प्रकार २४ फेब्रुवारी ते ३ मार्च यादरम्यान घडला. चोरट्यांनी किचनमधील कपाटातून ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यात ४० हजार रुपयांची २४ ग्रॅमची सोनसाखळी, ११ हजार रुपयांची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, चार हजार रुपयांचे दोन ग्रॅमचे वेढे, २० हजार रुपयांची रक्कम व ११ हजार रुपयांची एक अंगठी असा ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत आडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइकर्णींनो, चला सज्ज व्हा!

$
0
0

बाइक रॅलीच्या तयारीला वेग

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोपेडपासून स्पोर्टस् बाइकच्या वेगावर स्वार होत, फॅशनचा जलवा दाखवत बाइक रॅलीत धूमशान करण्याची संधी महिलांना मिळणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल वूमन बाइक रॅली'चा आवाज रविवारी शहरात घुमणार आहे. त्यासाठी महिलांचे ग्रुप्स मोठ्या संख्येने नावनोंदणी करीत असून, बाइकर्णी रॅलीसाठी सज्ज होत आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'ऑल वूमन पॉवर रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० मार्च) सकाळी ७.३० वाजता या बाइक रॅलीला प्रारंभ होईल. त्यासाठीच्या नावनोंदणीला सुरुवात झाली असून, तरुणींसह गृहिणी, महिला बचतगट, ऑफिस महिलांच्या ग्रुपची नोंदणी होत आहे. मोपेडसोबतच स्पोर्टस् बाइक्सवर स्वार होत रॅलीत जल्लोष करण्यासाठी महिलावर्ग आतूर झाला आहे.

अगदी नववारीपासून वेस्टर्न आऊटफिटपर्यंतची फॅशन फॉलो करीत रॅलीत सहभागी होण्यासाठी महिलावर्गाचा उत्साह दरवर्षी असतो. यंदादेखील रॅलीत मैत्रिणींसोबत सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार आहे. नव्या मैत्रिणींचा ग्रुपदेखील त्या निमित्ताने होणार आहे. त्यामुळे या जल्लोषमय पर्वणीत सहभागी होण्यासाठी तुम्ही मागे राहू नका. बाइकर्णींनो चला, सज्ज व्हा आणि आजच तुमचे नाव नोंदवा.

..

'मटा'च्या बाइक रॅलीचं दमदार सेलिब्रेशन, सामाजिक प्रबोधन आणि वाहतुकीचे नियम पाळत बाइक्सवर महिलांची निघणारी स्वारी अनोखी असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही रॅलीत धूमशान असणार आहे. महिलांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळत बाइक रॅलीत सहभागी होत, महिलादिनाचं हटके सेलिब्रेशन करायलाच हवं. \B

- माधुरी कांगणे, पोलिस उपायुक्त

\B....

महिला प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवीत आहेत. बाइक रॅलीच्या माध्यमातून महिलांमधील सामर्थ्य आणि धैर्य दाखण्याची संधी 'मटा' दरवर्षी देत असतं. नारीशक्तीला सलाम करीत महिला दिन उत्साहात साजरा करण्यासाठी बाइक रॅलीत नक्की सहभाग घ्या.

\B- रंजना भानसी, महापौर

\B....

\Bऑनलाइन करा नावनोंदणी\B

'ऑल वूमन बाइक रॅली'त सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी 'PowerrallyNSK' हा एसएमएस कोड 58888 या क्रमांकावर पाठवावा अथवा www.allwomenbikerally.com या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल. तसेच ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधूनही नोंदणी करता येणार आहे.

--

\B'ऑल वूमन बाइक रॅली'\B

\Bकधी - \Bरविवार १० मार्च, २०१९

\Bवेळ - \Bसकाळी ७.३० ते १०

\Bकुठे - \Bईदगाह मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागलाणवासीयांना मार्चमध्ये गारव्याचा अनुभव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मार्च महिन्यात उन्हाळ्याच्या झळा बसण्याऐवजी भरदुपारी कडकडीत उन्हात हवेतील गारवा सध्या बागलाणवासीय अनुभवीत आहेत. दिवसा गारवा आणि सांयकाळी तर हिवाळ्याप्रमाणे थंडी वाजत असल्यामुळे कपाटात ठेवलेले उबदार कपडे पुन्हा बाहेर काढावे लागले आहेत. हवामानातील या बदलामुळे सर्दी, खोकला, तसेच तापांच्या रुग्णांची वाढ झाली आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाच्या झळा अंगावर येतात. फेब्रुवारी महिन्यात महिलांची वाळवणाचे पदार्थ बनविण्याची घाई असते. मात्र यंदा मार्च सुरू झाली तरी थंडी कमी होत नसल्यामुळे वाळवणाचे साहित्य बनविण्यासही उशीर होत आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांतील उन्हाच्या झळा जीवेघण्या ठरतात. मात्र यंदा फेब्रुवारी महिनादेखील अत्यंत आल्हादायक व थंडावा देणारा ठरला आहे. तसेच मार्च महिन्यातील पहिला सप्ताह देखील अत्यंत गारवा देत आहे. ही थंडी अतून आठवडाभर तरी राहणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात व फेब्रुवारीच्या प्रारंभी सर्वत्र थंडपेये, लस्सी, उसाची रसवंती सुरू होते. व्यावसायिक देखील टोपी, उपरणे, स्कार्प विक्रीसाठी बाहेर काढतात. मात्र यंदा मार्च महिन्याला प्रारंभ होवून देखील कडकडीत उन्हाऐवजी सर्वत्र आल्हाददायक थंड गारवा जाणवते आहे. मात्र या गारव्यामुळे ताप, सर्दीचे रुग्ण शहरात वाढले आहेत. शहरातील खासगी व सरकारी दवाखाने गर्दीने फुल्ल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजीच्या पेपरला २३ कॉपी प्रकरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीचा इंग्रजीचा पेपर मंगळवारी पार पडला. या पेपरला २३ कॉपीबहाद्दर पकडले असून हे सर्व जळगाव जिल्ह्यातील आहेत.

नाशिक, नंदुरबार, धुळे येथे एकही कॉपी प्रकरण समोर आले नसल्याची माहिती विभागीय मंडळाकडून देण्यात आली आहे. १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. नाशिक विभागातून २ लाख ७ हजार ९८५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. नाशिक जिल्ह्यातील ९४ हजार ५३३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट आहेत. मराठी भाषेच्या पेपरनंतर ५ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर पार पडला. आता गुरुवारी, ७ मार्च रोजी हिंदीचा पेपर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचा ‘तो’ कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठक्कर बाजार बसस्थानकात अपंग बांधवाला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश विभाग वाहतूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले. येवला बस आगारात कार्यरत या वाहकाला दररोज सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत आगार प्रमुखांकडे हजेरी लावण्याचे आदेशात म्हटले आहे.

अपंग क्रिकेट खेळाडू खंडू कोटकर हे शुक्रवारी दुपारी तीन वाजता ठक्कर बाजार बस स्थानकात आले असता किरकोळ कारणावरून शरद उंडे या एसटी कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण केली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या पटेल रोडवरील विभागीय कार्यालयात धाव घेतली. कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन करून अपंग बांधवांची हेटाळणी करणाऱ्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा निषेध नोंदविण्यात आला. विभाग नियंत्रक नितीन मैंद यांना निवेदन देण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे जगन काकडे, नितीन गवळी, शाम गोसावी आदींनी केली.

आंदोलकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते, भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयाकडे धाव घेतली. या एकूण प्रकाराची दखल घेऊन विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी शरद उंडे यास निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. सक्षम अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय अन्यत्र जाऊ नये, कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी ११ ते दुपारी एक यावेळेत आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात हजेरी लावावी, असे या आदेशात म्हटले आहे.

..

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मस्थळांचा वाद पुन्हा न्यायालयात

$
0
0

महापालिकेच्या प्रसिद्ध यादीत त्रुटी; आज विश्वस्तांची बैठक

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फेरसर्वेक्षणानंतर महापालिकेने प्रसिध्द केलेल्या अधिकृत आणि अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याने हा वाद पुन्हा एकदा न्यायालयाच्या वाटेवर आहे. उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यासाठी धार्मिक स्थळ बचाव समितीचे समन्वयक तथा सभागृहनेते दिनकर पाटील यांनी धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची आज (दि. ६) सकाळी १० वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात बैठक बोलवली आहे.

महापालिकेने शहरातील धार्मिक स्थळांवरील कारवाई नियमाप्रमाणे केली नसल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने नव्याने फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फेरसर्वेक्षण करीत नियमित व निष्कासित करावयाच्या धार्मिक स्थळांची अधिसूचना सोमवारी (दि. ५) महापालिकेने प्रसिध्द केली. प्रसिद्ध यादीत ८८९ धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले असून, तब्बल ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवली आहेत. त्यापैकी २००९ नंतरच्या ७१ धार्मिक स्थळांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. पुरातन व मान्यताप्राप्त असलेली २४२ धार्मिक स्थळे या कारवाईतून बचावली असून, नियमित होणार आहेत. तर ५७६ धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत हरकती व सूचनांसाठी महिनाभराची मुदत दिली आहे. परंतु, महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीतही त्रुटी असल्याचे समोर आले आहे. यादी प्रसिध्द होताच सभागृहनेते पाटील यांनी धार्मिक स्थळ बचाव समितीचे उच्च न्यायालयातील वकील ॲड. प्रवर्तक पाठक यांची मुंबईत भेट घेत त्रुटींबाबत माहिती दिली. पालिकेच्या कारवाईबाबत पाटील व ॲड. पाठक यांच्यातील चर्चेअंती मनपाने प्रसिध्द केलेल्या यादीतील सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक आज (दि. ६) सकाळी १० वाजता बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालिकेच्या कारवाईतून वाचविण्यासाठी प्रत्येक धार्मिक स्थळाकरिता स्वतंत्र हरकत नोंदवावी लागणार आहे. यासंदर्भात या बैठकीत माहिती दिली जाणार असल्याने सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी या बैठकीस हजर राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

...

सर्वपक्षीयांना आवाहन

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप हे आमदार, तसेच मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते संभाजी मोरुस्कर, विलास शिंदे, गजानन शेलार, शाहू खैरे, सलीम शेख, दीक्षा लोंढे, सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. मनपाने प्रसिध्द केलेल्या यादीवर हरकत नोंदविण्यासंदर्भात या बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करार रद्द करण्याचा ‘सॉफ्टटेक’ला इशारा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बांधकाम परवानग्या ऑनलाइन करण्यासाठी महापालिकेने नगररचना विभागात सुरू केलेल्या ऑटो-डीसीआर प्रणालीतील त्रुटी वर्षभरानंतरही जैसे थे आहेत. आयुक्तांनी दिलेल्या मुदतीनंतरही सॉफ्टेक कंपनीला त्रुटी दूर करण्यात अपयश आल्याने पालिकेने कंपनीचा करार रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

दुसरीकडे नगररचना विभागाकडून होत असलेल्या अडवणुकीमुळे त्रस्त झालेल्या वास्तुविशारदांनीही पालिकेची कोंडी सुरू केली आहे. २८ दिवसांत बांधकाम परवानगीसंदर्भात मंजुरी मिळत नसल्याने त्यांनी पालिकेला नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. वेळेत परवानगी न मिळाल्यास बांधकामाला मंजुरी समजून कामे सुरू करू, असा इशाराच त्यांनी पालिकेला दिला आहे. परवानग्यांअभावी जवळपास ६०० प्रकरणे प्रलंबित आहेत.

शहर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदी नुसार बांधकाम विषयक परवानग्या देण्यासाठी महापालिकेने ऑटो-डीसीआर संगणक प्रणाली कार्यान्वित केली. पुणे येथील सॉफ्टटेक कंपनीला काम देण्यात आले. परंतु,या ऑनलाइन प्रणालीमुळे कामकाजात गतिमानता येण्याऐवजी अधिक विलंब होऊ लागल्याने तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांचीच कोंडी झाली आहे. या प्रणालीत गतीमानता आणण्यात तुकाराम मुंढे यांनाही अपयश आले. त्यामुळे कंपनीचे देयक थांबविण्यात आले होते. परंतु, नूतन आयुक्त राधाकृण गमे यांनी पदभार घेतल्यानंतर संबंधित कंपनीला सर्व त्रुटी दूर करण्यासाठी जानेवारीची मुदत देण्यात आली होती. ऑटो-डीसीआरमध्ये नोंदविण्यात आलेली प्रकरणे छाननीतून बाद झाल्यानंतर वांरवार तपासणी फी भरावी लागत असल्याने वास्तुविशारदांचे आर्थिक नुकसान होत आहे. बांधकाम परवानग्या वेळेत मिळत नसल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मंगळवारी आयुक्तांनी वास्तुविशारद, नगररचना विभागातील अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. कंपनीकडून प्रमुख अधिकारी उपस्थित असणे अपेक्षित असताना दुय्यम अधिकारी बैठकीला हजर राहिले. त्यामुळे आयुक्त गमे संतप्त झाले. अधिक केसेस प्रलंबित राहणे, पीडीएफ न मिळणे यांसारख्या तक्रारी कायम असल्याचे स्पष्ट झाल्याने कंपनीबरोबरचा करार रद्द करण्यावर या बैठकीत एकमत झाले. कंपनीविरोधात गुन्हे दाखल करा, अशा सूचनाही आयुक्तांनी वास्तुविशारदांना केल्या आहेत. या बैठकीला कन्सल्टिंग इंजिनीअर्स असोसिएशनचे विजय सानप, क्रेडाईचे मनोज खिंवसरा, सचिन बागड, वास्तुविशारद म्हाळस आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुंढेंचा ‘तो’ निर्णय अंगलट

$
0
0

- यू. बी. पवार यांची विभागीय चौकशी रद्द

- महासभेची परवानगी घेतली नसल्याचा ठपका

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेची मान्यता न घेताच निवृत्त शहर अभियंता यू. बी. पवार यांची परस्पर विभागीय चौकशी लावण्याचा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा निर्णय पालिकेच्या अंगलट आला आहे. ही चौकशी रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने पवार यांची विभागीय चौकशी रद्द केली असून, नव्याने चौकशीसाठी महासभेवर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. न्यायालयाने सदरची चूक ही गंभीर असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

आयुक्तपदी असताना मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावत पालिकेतील विविध अधिकाऱ्यांचे निलंबन, तर कामात अनियमितता केल्याप्रकरणी अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशा प्रस्तावित केल्या होत्या. त्यात शहर अभियंता पदावरून निवृत्त झालेल्या यू. बी. पवार यांचाही समावेश होता. पवार हे एप्रिल २०१८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या २५७ कोटींच्या रस्ता योजनेला बजेटमध्ये तरतूद नसतानाही त्याला चाल दिल्याचा ठपका पवार यांच्यावर प्रशासनाने ठेवला होता. पवार यांची नियुक्ती प्राधिकरण ही महासभा असतानाही महासभेची परवानगी न घेताच मुंढे यांनी आपल्या अधिकारात पवारांसह सात बड्या अधिकाऱ्यांची बाबूराव हांगे या चौकशी अधिकाऱ्याच्या मदतीने चौकशी सुरू केली होती. या चौकशी प्रक्रियेला पवार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू होती. त्यात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील ८ अन्वये पवार यांची चौकशी प्रक्रिया राबविली गेली नसल्याचा दावा पवारांच्या वतीने करण्यात आला. पवार यांचे नियुक्ती प्राधिकरण हे महासभा असल्याने त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यासाठी महासभेची मान्यता आवश्यक असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. तसेच, त्याची चौकशी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू करण्यात आल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. त्यामुळे प्रशासनाने हे प्रकरण अंगलट येताच पवार यांची चौकशीच रद्द केली आहे. त्यांच्या चौकशीसाठी पुन्हा नव्याने प्रस्ताव महासभेवर सादर केला आहे. त्यामुळे हा निर्णय पवार यांच्यासाठी दिलासादायक आहे.

...

सहा अधिकाऱ्यांनाही फायदा

पवारांबाबतीत उच्च न्यायालयाने चौकशी प्रक्रिया रद्द करण्याबरोबरच महासभेची मान्यता घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याचा फायदा पालिकेतील अन्य अधिकाऱ्यांनाही होणार आहे. सेवानिवृत्त अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांच्यासह ग्रीन फिल्ड प्रकरणात चौकशी लागू असलेल्या अधिकाऱ्यांनाही फायदा होईल. त्यामुळे या अधिकाऱ्यांकडूनही चौकशी रद्द करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झूम बैठक तातडीने घ्या’

$
0
0

नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा उद्योग मित्र बैठकीचे आयोजन झाले नसल्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परिणामी, उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याने ही बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात यावी, अशी मागणी निमातर्फे करण्यात आली आहे. अशा आशयाचे निवेदन निमातर्फे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग मित्र (झूम) बैठकीचे आयोजन नियमितपणे होत असे. ही बैठक म्हणजे जिल्ह्यातील उद्योजकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय विभागाशी निगडित समस्या मांडण्याचे स्थान असते. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी भावना निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर व शशिकांत जाधव, खजिनदार कैलास आहेर, मानद सचिव किरण पाटील व सुधाकर देशमुख यांच्यातर्फे व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरला पाण्यासाठी वणवण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर

इंदिरानगरमध्ये नागरिकांना टँकरद्वारे पाणी भरावे लागत आहे. महापौरांनी वारंवार इंदिरानगरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सूचना करूनही सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.

मागील आठ दिवसांपासून इंदिरानगर परिसरातील गंधर्वनगरी, बजरंग सोसायटी, गणराज कॉलनी, रथचक्र परिसर, परबनगर, आत्मविश्वास सोसायटी, यांसह अनेक भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दोन दिवसांपासून तर या भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांना टँकरने पाणी भरावे लागले आहे. विशेष म्हणजे याबाबत नगरसेवकांना विचारणा केली असता नगरसेवकांचेही फोन अधिकारी उचलत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदिरानगर परिसराचे उपअभियंता पाटील व वामन गांगुर्डे हे तक्रार ऐकण्यासाठी फोनच उचलत नसल्याची खंत नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पाणी का येत नाही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर गंगापूर धरण परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तामसवाडीमध्ये तिसरा बिबट्या जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील तामसवाडी शिवारात बिबट्याचे बस्तान असल्याचे समोर आले आहे. अवघ्या ११ दिवसांच्या अंतराने तालुक्यातील तामसवाडी भागात सोमवारी (दि. ४) लावलेल्या पिंजऱ्यात तिसरा बिबट्या जेरबंद झाला.

तामसवाडीमध्ये चार ते पाच वर्षाचा नर बिबट्या भ्रमंती करीत होता. त्याचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसरातील शेतकरी दहशतीखाली होते. त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली होती. वन विभागाने किरण रामनाथ शिंदे यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. या पिंजऱ्यात २३ फेब्रुवारीच्या रात्री नर बिबट्या अडकला होता. मात्र, त्यानंतर याच परिसरात अजून एका बिबट्याचे दर्शन होत असल्याचे शिंदे यांनी वनाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे शिंदे यांच्या शेतात पुन्हा दुसरा पिंजरा तातडीने लावण्यात आला. शुक्रवारी (दि. १ मार्च) रात्री त्यात दुसरा बिबट्या जेरबंद झाला. त्यानंतर सोमवारी (दि. ४) रात्री भास्कर यशवंत शिंदे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात तिसरा बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती भास्कर शिंदे यांनी येवला वन विभागाला दिली.

यानंतर येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख व वनमजूर यांच्या पथकाने शिंदे यांच्या शेतात तातडीने भेट दिली. पिंजऱ्यात जेरबंद बिबट्याला वन विभागाच्या निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. अवघ्या ११ दिवसाच्या अंतरात तीन बिबटे तामसवाडी येथे जेरबंद करण्यात वन विभागाच्या यश आल्याने तामसवाडी येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी कट्ट्यासह मोटारसायकल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गावठी कट्टा विकण्यासाठी शालिमार परिसरात आलेल्या एका संशयिताला भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. दुर्गेश उत्तम वाल्डे (वय २०, रा. बिडी कामगार नगर, पंचवटी) असे त्याचे नाव आहे.

वाल्डे गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाी होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पंचवीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्ट्यासह ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक विशाल मुळे, हवालदार सुधीर पाटील, कैलास शिंदे, वसिम शेख, सुरेश खालकर, जी. एस. निंबाळकर आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकच्या हापूसचे आगमन

$
0
0

कोकणचा हापूस महिनाअखेरीस येणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोकणच्या हापूस आंब्यांची आवक होत असते. मात्र, त्या अगोदरच कर्नाटकातून आलेल्या हापूस आंब्यांनी नाशिकच्या बाजारपेठेचा ताबा घेतला आहे. या आंब्याचे दर ३०० रुपये प्रतिकिलो असे आहेत. कर्नाटक हापूसला गोडी नसल्याने कोकणच्या आंब्यासाठी नाशिककरांना वाट पहावी लागणार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक हापूस आंबे हे कोकणातून येतात. हा आंबा साधारणत: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतो. यंदा थंडी जास्त असल्याने कोकणातील आंब्याचा बहर हा एप्रिल महिन्यात जास्त चांगला येईल, असा अंदाज आहे. कोकणातील आंबा बाजारात आल्यानंतर कर्नाटकातून आलेल्या आंब्याची बाजारपेठ कोसळते. त्यामुळे कर्नाटकातील व्यापारी आपल्याकडील आंबे हे कृत्रिमरित्या पिकवून लवकरात लवकर बाजारात आणतात. बेंगळुरूच्या जवळपास असलेल्या भागातून हा आंबा आणला जातो. हा आंबा पुणे बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात येतो. यंदाही हा आंबा बाजारपेठेत आला आहे. या आंब्याची चव व गोडी कोकणातील कोणत्याही आंब्याच्या जवळपास जाऊ शकत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. केवळ लवकर येत असल्याने आकर्षणापोटी या आंब्याची खरेदी होते, मात्र जे खव्वये आहेत ते कोकणच्याच आंब्याची वाट पहात असतात. कर्नाटकातून आलेला आंबा हा सध्या १ हजार ७०० ते २ हजार रुपये पेटीने विकला गेला. मार्च ते एप्रिल आणि एप्रिल ते मे हे कोकणातील हापूस आंब्याचे मुख्य हंगाम मानले जातात. कारण या काळात मोठ्या प्रमाणात कोकणातील सर्वच भागांतील हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. त्यामुळे या दरम्यान हापूसचे दर सर्वसामान्यांनाही परवडतील असे उतरलेले असतात. त्यामुळे सर्वांना या फळांच्या राजाची चव चाखता येते. हंगामाअगोदर येणाऱ्या या आंब्याला दरही चांगला मिळतो. त्यामुळे व्यापारीही या आंब्याचे स्वागत करतात. मात्र यावेळी दिवाळीनंतर आलेल्या पावसाने हापूस आंब्याला पकडलेला मोहोर गळून गेला असल्याने यावेळी बाजारात हवा तसा नेहमीसारखा कोकणातील हापूस आंबा बाजारात आलेला नाही. त्या मानाने इतर ठिकाणाचे आंबे बाजारात येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात हवा तसा हापूस आलेला नाही. मात्र ही उणीव मार्च नंतर भरून निघणार आहे. आता पडलेल्या थंडीमुळे आंब्याच्या मोहराला चांगली फळधारणा झाली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत बाजारात चांगल्या हापूसची आवक होण्यास सुरुवात होईल.

कनार्टकचा हापूस - ३०० रुपये किलो

अफ्रिकेचा हापूस - १५०० रुपये पेटी

कनार्टक हापूस पेटी - १७०० रुपये पेटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत उद्या दीक्षा वर्धापनदिन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

जैन साध्वी म्हणून परिचित असलेल्या प. पू. माताजी म. सा. व वाणी भूषण संस्कारभारती प्रीतिसुधाजी म. सा. यांचा दीक्षा वर्धापनदिन गुरुवारी (दि. ७)सकाळी ते ११ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात ७ मार्च १९६२ रोजी गाजलेल्या या आई व मुलीच्या दीक्षा सोहळ्याचा हा वर्धापनदिन राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. वाणी भूषण संस्कारभारती प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या माध्यमातून १६ गोशाळा सुरू आहे. मूळच्या पिंपळगाव बसवंत येथील रायसोनी परिवारातील या माय-लेकींसह १५ व्यक्तींनी जैन समाजाची दीक्षा घेतलेली आहे. लामरोड भागात असणाऱ्या विरायतन सोसायटीमधील मातृतीर्थ स्थानक येथे होणाऱ्या या वर्धापन दिन कार्यक्रमात प. पू. श्री मधुस्मिताजी यांच्या सानिध्यात सकाळी ९ ते १० ध्यान व कार्योत्सर्ग, १० ते ११ भक्ती, गुणानुवाद व संन्यासदीक्षा व अनुमोदन धार्मिक विधी होणार आहे. यावेळी जिल्हाभरातून शिष्य परिवार उपस्थित राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावाच्या किडनीने मिळाले जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

एकिकडे जमिनीच्या वादातून असो किंवा अनुदानाच्या रकमेवरून भाऊ भावाचा जीव घेत असल्याच्या घटना घडत असताना

कळवण तालुक्यातील निवाने येथील निकम परिवारातील एका भावाने दुसऱ्या भावाला किडनी दान करून जीवदान दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. निकम बंधूंसह त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा निवाने ग्रामस्थांनी सत्कार केला. आज समाजात 'सख्खा भाऊ पक्का वैरी' अशी म्हण प्रचलित होत असताना निकम बंधूंनी समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे.

पांडू सोनू निकम व बापू सोनू निकम हे दोन भाऊ निवाने येथील रहिवाशी. त्यापैकी बापू निकम यांची वर्षभरापासून प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालात दाखल करण्यात आले होते. बऱ्याच चाचण्या केल्यानंतर त्यांची किडनी निकामी झाली असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा वेळ न दवडता त्यांचे बंधू पांडू निकम यांनी आपली एक किडनी देऊन भावाचे प्राण वाचवले. निकम बंधूंसह शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे निवाने ग्रामस्थांनी सत्कार केला. या सत्कार सोहळ्याआधी पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांना निवाने ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. अनिरुध्द ढोकरे, डॉ. अस्मिता ढोकरे, डॉ. श्याम पगार, डॉ. प्रतिभा पगार या टीमने ही शस्त्रक्रिया केली.

समाधान आहेर, दिनकर आहेर, राजू आहेर, रोहन आहेर, बाळू आहेर, शरद बोरसे आदींनी हा सोहळा पार पाडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दांडीबहाद्दर एनएसएस अधिकाऱ्यांवर कारवाई!

$
0
0

पुणे विद्यापीठाने कारवाईचा दिला इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे विद्यापीठात गेल्या महिन्यात २३ व २४ रोजी झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेला राज्यभरातील ७२२ जणांनी दांडी मारली होती. यात नाशिक जिल्ह्यातील १७० जणांचा समावेश होता. आता अनुपस्थित राहणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे पुणे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. तसेच अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या कॉलेजचे 'एनएसएस'चे एककही बंद केले जाऊ शकते, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातर्फे राज्यातील सर्व कॉलेजेसमधील 'एनएसएस'च्या कार्यक्रम अधिकाऱ्यांची पुणे येथील बालेवाडीतील शिव छत्रपती क्रीडापीठ संकुलात दोन दिवसीय कार्यशाळा घेतली. यात कोणत्याही कार्यक्रम अधिकाऱ्याने अनुपस्थित राहू नये, असे विद्यापीठाने सूचित केले होते. तरी देखील पुणे विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजेस पैकी ७२२ कार्यक्रम अधिकारी कार्यशाळेस अनुपस्थित होते. त्यांच्या या अनुपस्थितीबाबत राज्य संपर्क अधिकाऱ्यांनी लेखी खुलासा मागितला असून, त्या आधारे संबंधित अधिकारी व कॉलेजांवर कारवाई करण्याची सूचना पुणे विद्यापीठाला दिली आहे.

विद्यापीठाने अनुपस्थित 'एनएसएस' कार्यक्रम अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १७० प्राध्यापकांचा समावेश आहे. त्यामुळे या प्राध्यापकांनी लेखी खुलासा सादर केल्यानंतर, त्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे. तसेच कारवाई अंतर्गत संबंधित कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे एकक देखील बंद केले जाऊ शकते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य खुलासा तात्काळ विद्यापीठास कळवावा, असे विद्यापीठाने सूचित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कीर्ती कलामंदिरातर्फे रविवारी ‘रसयात्रा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कीर्ती कलामंदिर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे रविवारी (दि. १०) सायंकाळी साडेसहा वाजता एकाच वेळी महाकवी कालिदास कलामंदिर, परशुराम सायखेडकर नाट्यगृह आणि कुसुमाग्रज स्मारक आा तीन ठिकाणी रसयात्रा या कुसुमाग्रजांच्या कवितांचा नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कीर्ति कला मंदिर, नाशिकमधील एक नामवंत कथ्थक नृत्य संस्था असून १९७६ मध्ये ज्येष्ठ नृत्यांगना गुरू रेखा नाडगौडा यांनी संस्थेची स्थापना केली आणि नाशिकच्या रसिकजनांसाठी नृत्यकलानुभवाचे वेगळे दालन उघडे झाले. तेव्हापासून विविध विषयांना केंद्रस्थानी ठेवून नृत्यसंरचना सादर करण्याची परंपरा संस्थेने आजतागायत जपली आहे. अशाच नृत्यसंरचनांमधील एक 'रसयात्रा' हा कार्यक्रम आहे. नाशिकचे नामवंत कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मविभूषित स्व. वि. वा. शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज, ह्यांच्या कवितांवर आधारित कलाकृती आहे.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच दिवशी तीन ग्रुप्स तीन वेगळया ठिकाणी रसयात्रा सादर करणार आहेत. एकच संकल्पना असली तरी तीन ठिकाणी 'आदिरेखा' द्वयींनी सादरीकरणात विविधता ठेवली आहे. यामध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र सेवा संघ, फ्रावशी अॅकॅडमी यांच्यासह शहरातील अनेक शाळांचा महत्त्वाचा सहभाग असेल. तसेच १९८८ मध्ये केलेल्या पहिल्या प्रयोगातील 'आगगाडी-जमीन' प्रेक्षकांच्या पुनर्भेटीला येणार आहे.

नृत्यसंरचनाकार 'आदिरेखा' (रेखा नाडगौडा आणि अदिती पानसे) सह-दिग्दर्शन 'श्रीमधुर्वा' (श्रिया पांडे, मधुश्री वैद्य आणि दुर्वाक्षी पाटील),

संगीत कुमुदताई अभ्यंकर आणि बाळ भाटे तसेच निवेदन सदानंद जोशी, रेणुका येवलेकर, आनंद प्रभू हे करणार आहेत.

जुन्या आठवणींना उजाळा

तात्यासाहेबांच्या पंच्याहत्तरीनिमित्त १९८८ मध्ये रसयात्रेचा पहिला प्रयोग सादर केला. त्यांनी भरभरून कौतुक केलेल्या या कलाकृतीचे ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान सोहोळ्यात थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरही झाले. सगळ्या नाशिककरांसाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. तात्यासाहेबांचे साहित्यातील अमूल्य योगदान पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करण्यासाठी पुन्हा 'रसयात्रा' करण्याचा विचार रेखा नाडगौडा यांच्या मनात आला. ज्यामध्ये काही नवीन कवितांचाही समावेश करण्यात आला आहे.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी विरोधकांचा सभात्याग

$
0
0

महासभेत गठबंधनच्या नगरसेवकांच्या तोंडाला पट्ट्या

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत पाणीपट्टीवरून विरोधी महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी निदर्शने करीत काँग्रेसकडून सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला. मंगळवारी पालिकेच्या सभागृहात आयोजित विशेष महासभेत देखील याच विषयावरून महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बालयांच्यासह सर्व नगरसेवकांनी तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध करीत सभात्याग केला.

येथील साथी निहाल अहमद सभागृहात महापौर शेख रशीद, उपमहापौर सखाराम घोडके, नगरसचिव राजेश धसे आदींच्या उपस्थितीत विशेष महासभा झाली. शनिवारी अंदाजपत्रकीय महासभेतील रणकंदनानंतर महापौर शेख यांनी तडकाफडकी गोंधळी नगरसेवकांना निलंबित केले होते. त्यामुळे मंगळवारी आयोजित महासभेत महागठबंधन आघाडीचे नगरसेवक सहभागी होणार का? याचीच चर्चा महापालिका वर्तुळात होती. महासभा सुरू झाली त्यावेळी महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल, शान-ए-हिंद आदींसह सर्व नगरसेवक हजर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. महासभेस प्रारंभ होताच नगरसेवक बुलंद इक्बाल यांनी महापौर शेख रशीद यांना आम्हाला बोलायचे आहे अशी विनंती केली. महापौर शेख यांनी विषयपत्रिकेवरील विषयांवर आधी चर्चा होऊ द्यावी अशी सूचना केली. यावेळी आघाडीचे नगरसेवक आक्रमक झाले. तसेच त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्याबांधून सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप करीत निषेध व्यक्त केला. तसेच घोषणाबाजी करीत सभात्याग केला.

शहरातील पालिकेच्या करारनामा संपलेल्या गाळ्यांचा विषय नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी चर्चेस घेतला. शहरात सुमारे ३०० हून अधिक पालिकेच्या मालकीचे गाळे असून वर्षानुवर्ष त्यांचे करारनामे झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच केवळ स्थायी समितीद्वारे त्यांना दरवर्षी मुदतवाढ देऊन पाच टक्के भाडेवाढ केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर आयुक्त किशोर बोर्ड यांनी कायद्यानुसार भाडेकरार संपुष्टात आलेल्या गाळ्यांचे नव्याने करारनामे करणे, अतिक्रमित गाळे खाली करून त्यांचे लिलाव करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अखेर करारनामे संपलेल्या गाळ्यांचे नव्याने करारनामे करून ज्यांनी गाळ्यांमध्ये अतिक्रमण केले आहे त्यांचे गाळे ताब्यात घेऊन लिलाव करण्यात येतील अशी माहिती महापौर रशीद शेख यांनी दिली.

निलंबन केवळ एका सभेसाठी

महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांना निलंबित केले असताना आजच्या सभेत त्यांची उपस्थिती कशी? याविषयी पत्रकारांनी महापौर शेख यांना विचारले असता आपण त्यांना तीन सभांसाठी निलंबित केले होते. मात्र नियमानुसार एका सभेसाठी निलंबित करण्यात येत असल्याने तीन नव्हे तर अंदाजपत्रकीय एका सभेपुरते निलंबन होते असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेस्ट ऑफ’ची मात्रा

$
0
0

'लॉ'ची फरेपरीक्षा घेऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचे तीन तास ठिय्या आंदोलन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यावर पुणे विद्यापीठ ठाम असून, परीक्षेत 'बेस्ट ऑफ' पॅटर्न वापरण्यात येईल, असे आश्वासन विद्यार्थ्यांना मिळाले आहे. फेरपरीक्षा होऊ नये, त्यासाठी विद्यापीठाच्या उपक्रेंदात विद्यार्थ्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण झाल्यानंतर फेरपरीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना आश्वासित करण्यात आले. परीक्षेनंतर विद्यापीठाने आमच्या तोंडाला पाने पुसू नयेत, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

एलएलबीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. एलएलबीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील काही प्रश्नपत्रिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेच्या अगोदरच वेबसाइटवर प्रसिध्द केल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट कुलगुरूंकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर विद्यापीठाने एक समिती स्थापन केली. त्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची त्या विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन करीत या निर्णयाचा निषेध नोंदवला.

'लॉ ऑफ क्राइम' आणि पर्यायी विषय 'आयपीआर' या विषयाची पुनर्परीक्षा ७ व ८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका अपलोड होणे ही विद्यापीठाची चूक असली, तरी विद्यार्थ्यांना समितीच्या निर्णयानुसार ही परीक्षा देणे अनिवार्य आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट सांगितले. या परीक्षेत विद्यार्थ्यांना सूट म्हणून 'बेस्ट ऑफ' पर्याय वापरण्यात येईल. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली परीक्षा आणि मार्चमध्ये होत असलेली परीक्षा, या दोघांपैकी ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील, ते ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी परीक्षेनंतर गुणांकनात गोंधळ होता कामा नये अन्यथा पुन्हा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यावेळी विद्यार्थी नेता अजिंक्य गिते, जीएस महेश गायकवाड, तुषार जाधव, अभिजित गोसावी यांसह २०० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

...

\Bराजीनामा द्या

\B विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा फटका विद्यार्थ्यांना वारंवार सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी तात्काळ‌ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यावेळी 'शिक्षण आमच्या हक्काचं', 'परीक्षेचा गोंधळ खपवून घेणार नाही', अशी घोषणाबाजी करण्यात आली.

...

\Bपोलिसांची मध्यस्थी

\B पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य विजय सोनवणे आणि सिनेट सदस्य डॉ. मोतीराम देशमुख हे विद्यार्थी नेत्यांची समजूत काढत होते. परीक्षा देणे अनिवार्य असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत होते. मात्र, विद्यार्थी परीक्षा पुन्हा घेऊ नये, या भूमिकेवर ठाम होते. त्यावेळी सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सांगळे यांनी मध्यस्थी केली. पोलिसांचे पथक उपकेंद्रात दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तांत्रिक बाबींची पटवून सांगण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी 'बेस्ट ऑफ'चा पर्याय मान्य करीत आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images