Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उपमहापौरांनी वाचला तक्रारीचा पाढा

$
0
0
लोकप्रतिनिधींच्या तक्रारी सोडवण्यास अधिकारी तयार नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना काय न्याय मिळत असेल, असा आरोप करीत उपमहापौर सतिष कुलकर्णी यांनी आयुक्त संजय खंदारे यांच्यासमोर अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढाच वाचला.

IT ची रुजवणूक देईल संशोधनाला चालना

$
0
0
आगामी काळात आयटीमुळे भोवतालच्या जगात अकल्पनीय बदल वेगाने होतील. रोजचे व्यवहार ऑनलाइन होतीलच शिवाय संशोधनासारख्या विषयांनाही यामुळे विशेष गती मिळेल, असे भाकीत आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी शुक्रवारी केले.

संशयित पोलिस कर्मचारी बडतर्फ

$
0
0
घरफोडी करून पैसे मिळवायचे म्हणून दोघा पोलिसांसह अन्य पाच सराईत गुन्हेगारांनी त्यांचाच साथीदार असलेल्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक बाब मागील महिन्यात उघडकीस आली होती.

एमआयडीसीत बंदचे वारे

$
0
0
ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदीचा परिणाम नाशिकमधील सातपूर आणि अंबड एमआयडीसीवरही होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील ४८ उपकोषागारांचे पोलिस संरक्षण काढले

$
0
0
बहुतांश सरकारी व्यवहार धनादेश, ईसीएस व एनईएफटीद्वारे होत असल्यामुळे सरकारी कोषागारांमध्ये रोकड रकमेची जोखीम कमी झाली आहे. यामुळे सरकारने राज्यातील ४८ कोषागार आणि उपकोषागारांचे पोलिस संरक्षण काढून घेतले आहे.

सराफ नगराला समस्यांची बाधा

$
0
0
इंदिरानगरलगत असलेल्या विविध कॉलनी व छोट्या वसाहतींपैकी एक असलेला सराफ नगर परिसर सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहे. चिखलात बुडालेले रस्ते व दुर्गंधी ही या नगरातील प्रमुख समस्या आहे.

शासकीय कन्या विद्यालयाचा निर्णय गुलदस्त्यातच

$
0
0
विद्यार्थिनींच्या आक्रमक आंदोलनामुळे श‌िक्षण विभागाच्या पुण्याच्या बैठकीत पोहचलेल्या या प्रश्नावर झालेला निर्णय अद्याप गुलदस्त्यातच राहीला आहे. श‌िक्षण संचालकांसह विविध अध‌िकाऱ्यांची बैठक रात्री उशीरापर्यंत पुण्यात सुरू होती.

दारू-सिगारेट चालते तर सुगंधित तंबाखू का नाही?

$
0
0
सुगंधित तंबाखूपेक्षा कितीतरी जास्त अपायकारक असूनही दारू, बिडी-सिगारेट चालते तर सुगंधित तंबाखू विक्रीवरच बंदी का? असा सवाल करीत पान-बिडी विक्रेता संघाने शुक्रवारी महसूल कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले.

...तर आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात जाऊ

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर शिवसंग्राम केंद्र व राज्यातील सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीविरोधात उतरेल असा इशारा शिवसंग्रामचे प्रवक्ते अॅड. विजय कातोरे यांनी दिला.

डिटर्जंट का कमाल

$
0
0
नाशिक शहराचा विस्तार जसा वाढतो आहे तसा या शहरात व्यवसाय करण्याचा प्रयत्नही कसोशीने होत आहे. याचाच एक भाग म्हणून विविध ब्रँडस आणि प्रॉडक्टस सेल्समनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले जात आहे.

करमणूक करासाठी सोमवारचा मुहूर्त

$
0
0
मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे येत्या सोमवारी करमणूक कर भरण्याचा निर्णय नाशिक केबल ऑपरेटर संघटनेने घेतला आहे. कर घेण्यासंदर्भात सरकारकडून मार्गदर्शन मागविल्याचे अप्पर जिल्हाधिकारी सांगत असून कर घेण्यास नकार दिला तर तो कोर्टात जमा करण्याचेही संघटनेने ठरविले आहे.

यंदाही नाशिकला रणजी सामना नाहीच !

$
0
0
२००५ सालापासून नाशिकमध्ये एकूण आठ रणजी सामने झाले आणि नाशिकला रणजी क्रिकेट सेंटर चा दर्जा मिळाला त्यात नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा यांचा वाटा मोठा आहे.

महिलांना जगण्याचा आधार

$
0
0
काही माणसं जन्माला येतात ती सतत काम मग्न असण्याचा मूलमंत्र घेऊनच. वय कितीही असो, परिस्थिती कशीही असो तुम्ही सतत काहीना काही केले पाहिजे, नवीन काहीतरी शिकले पाहिजे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांच्या उद्धारासाठी झाला पाहिजे असे त्यांना वाटतं.

वृक्षपुनर्रोपणाला लाभावे ‘बिल्डरां’चे पालकत्व!

$
0
0
नाशिक ते त्र्यंबक रस्त्याच्या विस्तारीकरणाअंतर्गत करण्यात येणाऱ्या दुर्मिळ आणि जुन्या वृक्षांच्या पुनर्रोपणाला पालकत्वाचा हातभार आवश्यक बनला आहे.

स्थायीच्या आदेशाला प्रशासनाचा ठेंगा

$
0
0
शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचे आदेश स्थायी बैठकी दरम्यान देऊनही प्रशासनाने शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ववत केला नाही. तांत्रिक कामांची पूर्तता केल्यानंतर दोन वेळेस पाणीपुरवठा करता येईल का यासंदर्भात आढावा घेऊन ठरवू अशीही भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

उंबरदरी, कोनांबे ओव्हरफ्लो

$
0
0
सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे पश्चिम पट्ट्यात असलेली उंबरदरी व कोनांबे ही धरणे पूर्णपणे भरली आहेत. म्हाळुंगी नदीचे पाणी वाढल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचप्रमाणे देव नदीही वाहती झाल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.

‘जेईई मेन्स’वर मोफत सेमिनार

$
0
0
आयआयटीयन पेसच्या नाशिक शाखेमार्फत ‘जेईई मेन्स’ परीक्षेसंदर्भात मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, रविवारी (४ ऑगस्ट रोजी) प. सा. नाट्यगृहामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा सेमिनार होणार आहे.

उपमहापौरांनी वाचला तक्रारीचा पाढा

$
0
0
महापालिका प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधींच्या तक्रारी सोडवण्यास अधिकारी तयार नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना काय न्याय मिळत असेल, असा आरोप करीत उपमहापौर सत‌िष कुलकर्णी यांनी आयुक्त संजय खंदारे यांच्यासमोर अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढाच वाचला.

चित्रकार शिवाजी तुपे अत्यवस्थ

$
0
0
विख्यात निसर्गचित्रकार शिवाजी तुपे यांच्यावर लाइफ सपोर्ट सिस्टिमच्या मदतीने उपचार सुरू आहेत. बुधवारपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोपान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सहा वर्षांतील सर्वाधिक वर्षा!

$
0
0
नाशिक जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून गंगापूर धरणातून ५०००, दारणा धरणातून ८००० तर कडवा धरणातून ३५०० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images