Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

धर्मस्थळांसाठी हवी एकजूट

0
0

महापौर रंजना भानसी यांचे प्रतिपादन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याविरोधात सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे असून, या मुद्याचे राजकारण होता कामा नये. धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी ट्रस्ट व विश्वस्तांनी पुढाकार घ्यावा. जाहीर झालेल्या यादीविरोधात वैयक्तिक स्तरावर हरकती नोंदवाव्यात. सर्व आमदार, नगरसेवक व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसोबत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करते. पण, त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवली, तरच हा लढा लढता येईल', असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी केले.

महापालिकेने प्रसिध्द केलेल्या अनधिकृती धार्मिक स्थळांच्या यादीविरोधात सर्व धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची बैठक घेण्यात आली. बैठकीत अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरातील धार्मिक स्थळांच्या फेरसर्वेक्षणानंतर महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी जाहीर केली. पण, या यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याने धार्मिक स्थळांचा वाद पुन्हा पेटायला सुरुवात झाली आहे. या यादीविरोधात उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यासाठी धार्मिक स्थळ बचाव समितीचे समन्वयक तथा सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विश्वस्तांची बैठक बोलावली होती. बुधवारी सकाळी ११ वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात ही बैठक घेण्यात आली. त्यावेळी महापौर रंजना भानसी, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील, नगरसेवक विलास शिंदे व्यासपीठावर होते.

दिनकर पाटील म्हणाले, की धार्मिक स्थळांचा बचाव करणे आपले कर्तव्य आहे. याबाबतीत राजकारण आणू नये. सर्व पक्षांनी धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी लढा उभारावा. बाजू मांडण्यासाठी आपल्याकडे एक महिना असून, त्या काळात सर्व विश्वस्तांनी वैयक्तिक हरकती दाखल कराव्यात. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढू.

नगरसेवक विलास शिंदे यांनी उपस्थित विश्वस्तांना एकत्रित येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की धार्मिक स्थळांचा बचाव हा प्रत्येकाच्या मनातील ज्वलंत मुद्दा आहे. असे असले तरी या बैठकीस काही कारणास्तव सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त उपस्थित राहू शकले नाहीत, याची खंत वाटते. प्रत्येकाने शहरातील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी या लढ्यात उतरायला हवे. बैठकीत विश्वस्तांनी आपले मते मांडली. वैयक्तिकरित्या यादीविरोधात हरकती नोंदवू, पण लोकप्रतिनिधींनी धार्मिक स्थळे वाचविण्याच्या लढ्यात शेवटपर्यंत साथ द्यावी, अशी अपेक्षा विश्वस्तांनी व्यक्त केली.

...

\Bहे षडयंत्र!

\B'तीन दिवसांत आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुद्दाम अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. आचारसंहितेत लोकप्रतिनिधींना जनतेच्या हितासाठी एल्गार पुकारता येणार नाही. नागरिक आणि लोकप्रतिनिधींची गळचेपी व्हावी, त्या हेतूने हे षडयंत्र रचले आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतूनही यावर तोडगा निघाला नाही, तर शहरात जे काही होईल, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल', अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मांडली.

....

\Bआमदारांसह विश्वस्तांची पाठ\B

या बैठकीला शहरातील तीनही आमदारांनी पाठ फिरवली. नगरसेवकही या बैठकीस उपस्थित नव्हते. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांच्या फेरसर्वेक्षणात तब्बल ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरविण्यात आली आहेत. मात्र, सभागृहात अवघे शंभरच्या आसपास विश्वस्त उपस्थित होते. त्यामुळे धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी एल्गार पुकारायचा असेल, तर सर्वांनी एकत्रित येऊन लढा द्यावा, असा सूर त्या बैठकीत व्यक्त झाला. त्यामुळे मंदिर विश्वस्तांच्या वतीने गुरुवारी आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोपी १३ वर्षांपूर्वीच येरवडा जेलमध्ये वर्ग

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सातोटे हत्याकांड खटल्यातील फाशीची शिक्षा रद्द झालेल्या सर्व सहाही आरोपींना नाशिकरोड कारागृहातून १३ वर्षांपूर्वीच पुणे येथील येरवडा कारागृहात स्थानांतरीत करण्यात आले होते. विशेष म्हणजे नाशिकरोड कारागृहात फाशी यार्डची सुविधा उपलब्ध नसल्याने या सहाही आरोपींना तेव्हा येरवड्याला हलवावे लागले होते.

नाशिक सत्र न्यायालयाने सातोटे हत्याकांडातील सहाही आरोपींना १२ जून २००६ रोजी दोषी ठरविले होते. त्यानंतर त्यांना नाशिकरोड कारागृहातून १४ जून २००६ रोजी येरवडा कारागृहात हलविण्यात आले होते. या सर्व सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचे वृत्त समजतात विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाकडे धाव घेतली. मात्र, आरोपी येरवडा कारागृहात असल्याची माहिती समजताच त्यांचा हिरमोड झाला.

प्रस्ताव धुळखात पडून

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात फाशी यार्डला मंजुरी मिळावी यासाठी स्थानिक कारागृह प्रशासनाकडून काही वर्षांपासुन पाठपुरावा केला गेला. परंतु, त्यास मंजुरी मिळालेली नाही. अद्यापही कारागृह प्रशासनाकडून नाशिकरोड कारागृहात फाशी यार्ड मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले ७ आरोपी स्थानबद्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांची शहरात होर्डिंगबाजी

0
0

निवडणूक घोषणेआधीच बांधले गुडघ्याला बाशिंग

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी इच्छुकांनी राजकीय पतंग उडविण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली नसली तरी, नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मात्र राजकीय होर्डिंगबाजी सुरू केली आहे. 'नाशिकला काय हवंय' इथपासून ते 'आता नाही तर, कधी नाही' अशा राणाभीमदेवी थाटात शहरात पोस्टर्स झळकावून इच्छुक उमेदवारांनी अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

लोकसभा निवडणुकीचा बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने दिल्ली ते गल्लीचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना-भाजपची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने अनेक इच्छुकांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने एकतर्फी लोकसभेच्या रिंगणात उडी मारत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. या नेत्यांचे 'आता दिल्ली गाठायचीच' हे शहरभर झळकलेले पोस्टर्स सध्या शहरात चर्चेचा विषय बनले आहे. अपक्ष का होईना निवडणूक लढविणारच असे सांगत,'तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण' अशी मतदारांना भावनिक साद घातली आहे. एका इच्छुकाने 'नाशिकला काय हवंय' या टॅगलाइनद्वारे गावभर सर्वेक्षण केले आहे. आता या सर्वेक्षणाचा निष्कर्ष मात्र या इच्छुकाने पुन्हा होर्डिंगद्वारे शहरभर झळकवले आहेत. त्यामुळे या इच्छुकांच्या या पोस्टर्सबाजीमुळे मात्र दुसरीकडे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे.

...

आम्हाला अस्वच्छता नकोय

एका राजकीय पक्षाच्या इच्छुकाने 'शहराला काय हवंय' या टॅगलाइने नुकताच एक सर्वे केला असून, त्यात नागरिकांना काय हवंय या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत. या इच्छुकांकडून सर्वेक्षणात आढळलेल्या बाबींचे गावभर पोस्टर्स झळकविण्यात आले आहेत. त्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडली आहे. शहरात झळकलेल्या या पोस्टर्सबाजीमुळेच नाशिककर त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिघावकर यांना चव्हाण युवा पुरस्कार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मुबंईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे अभियानचा यंदाचा राज्यस्तरीय युवा पुरस्कार बागलाण तालुक्यातील नीताने येथील अभिजीत दिघावकर यांना जाहीर झाला.

पुण्यातील धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्रजी पवार भवन येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिघावकर यांनी युवक विकास, शिक्षण, पर्यावरण, ग्रामीण भागातील युवक-युवतींना विविध विषयांवर वेळोवेळी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत, तसेच युनायटेड नेशनस च्या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत त्यांनी भारताचे आणि भारतीय युवकांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. ते सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय युवक समितीचे देशातील एकमेव जागतिक युवा राजदूत आहेत.

यावेळी पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे आणि दत्ता धनकवडे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विश्वास ठाकूर, नीलेश राऊत, पुण्याचे नगरसेवक विशाल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यमान राज्यकर्ते केवळ बोलघेवडे’

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये होती. आताच्या राज्यकर्त्यांमध्ये शेतकऱ्यांना देण्यासाठीची दानत दिसत नाही. आताचे राज्यकर्ते बोलतात खूप काम मात्र कमी करतात. सत्ताधारी युती सरकारकडून केवळ आश्वासनांचा पाऊस पडला जात असून काम करण्याचा दुष्काळ असलेले हे बोलघेवडे सरकार आहे, असा चिमटा माजी उपमुख्यमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी घेतला.

राज्याचे माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ हे आपल्या दोन दिवसीय येवला दौऱ्यास बुधवारी सुरुवात केली. यावेळी ते बोलत होते. विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करतेवेळी भुजबळ यांनी ठिकठिकाणी जनतेशी संवाद साधला. तसेच, विद्यमान राज्यकर्त्यांवर शरसंधान केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत केवळ आमच्या आघाडी सरकारची होती. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात ७७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. आज मात्र सद्याच्या सरकारने निकष व ऑनलाइनच्या नावाखाली थट्टा चालवली आहे. आघाडी सरकारमध्ये बोलणारे कमी व काम जास्त करणारे होते. आता सद्याचे सरकार बोलते खूप मात्र काम कमी करते, असा आरोप करत सध्याच्या राज्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रात विकासकामांचा वेग कमी झाला आहे. काम करणारे कोण आणि बोलघेवडे कोण आता जनतेने वेळीच ओळखण्याची गरज आहे. अच्छे दिनचे अपचन झाले असेल तर सच्चे दिन कसे येतील त्यासाठी प्रयत्न करा, असे भुजबळ यावेळी म्हणाले.

भुजबळ यांच्या हस्ते बुधवारी येवला तालुक्यातील धामणगांव येथे धामणगांव (महादेववाडी) येथील आदिवासी वस्तीत स्थाानिक विकास निधीतील विद्युत पुरवठा काम, महालगांव (गोल्हेवाडी) सामाजिक सभागृह,वाईबोथी येथील सामाजिक सभामंडप या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय तालुक्यातील पाटोदा येथे देखील भुजबळ यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नेट’ परीक्षेचेमोफत धडे

0
0

नाशिक : प्राध्यापक होण्याची इच्छा बाळगून त्यासाठी 'नेट' या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मोफत परीक्षेचे धडे मिळणार आहेत. एकूण १,५०० विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार असून, पुण्यासह औरंबाद व नागपूर येथील नामवंत संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी अर्ज नोंदणी ९ मार्चपासून सुरू होणार असून, ३१ मार्च रोजी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

सविस्तर वृत्त...प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मविप्र साकारणार स्पोर्टस् क्लब

0
0

ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळणार प्रशिक्षण

…...

Fanindra.Mandlik@timesgroup.com

Tweet :

...

नाशिक : नाशिक शहर हे क्रीडा हब म्हणून वाटचाल करीत असताना शहराने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू भारताला दिले आहेत. शहरातून येणाऱ्या खेळाडूंपेक्षा ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंची संख्या जास्त असून, त्यांच्यातील क्रीडा नैपुण्य समोर यावे, यासाठी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने जिल्हाभर असलेल्या त्यांच्या कॉलेजेसमध्ये स्पोर्ट्स क्लब स्थापन करण्यात येणार आहे.

राज्यात दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून मराठा विद्या प्रसाराक संस्थेची ओळख आहे. या संस्थेच्या जिल्हाभर विविध ठिकाणी शाखा असून, संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी क्रीडाक्षेत्रात अनेकांनी आपली कारकीर्द गाजवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या खेळाला चालना मिळावी, यासाठी संस्थेच्या वतीने जिल्ह्याच्या विविध भागात स्पोर्टस् कल्ब स्थापन करण्यात येणार असून, त्यामाध्यामातून मुला-मुलींना क्रीडा प्रशिक्षण दिले जाणार आहे. या स्पोर्टस् क्लबमध्ये सुरुवातीला बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, जीम ट्रेनर, लॉन टेनिस, हॉकी, फुटबॉल, शूटिंग, आर्चरी, जिम्नॅस्टिक, स्केटिंग, फेन्सिंग, रोईंग, कॅनॉइंग, कयाकिंग, खो-खो, कुस्ती हे क्रीडाप्रकार शिकविले जाणार आहेत. यासाठी प्रशिक्षकांची नेमणूक केली जाणार असून, या स्पोर्टस् क्लबमध्ये इतरही कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश घेता येणार आहे.

...

क्रीडांगणांचा लाभ

संस्थेच्या प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये अद्ययावत क्रीडांगणे आहेत. त्याचा उपयोग सर्वसामान्यांना व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंची निर्मिती होईल अशी संस्थेची धारणा आहे. या क्लबमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पतियाळा येथून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. या स्पोर्टस् क्लबमुळे ग्रामीण भागातून खेळाडू मोठ्या प्रमाणातून येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

...

शाळेमध्ये प्रत्येक मुलाच्या खेळाकडे लक्ष दिले जात नाही. ज्या मुलाला खेळाची आवड आहे, तो मुलगा या माध्यमातून निश्चित प्रगती करेल. यामुळे सध्यापेक्षा निश्चित जास्त खेळाडू पुढे येतील.

- संजय होळकर, छत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक

....

या उपक्रमामुळे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील खेळाडू शोधण्यास मदत होणार आहे. खेळाडूंना लहानपणापासून प्रशिक्षण मिळाले, तर राष्ट्रीय स्तरावरदेखील मोठ्या प्रमाणात केळाडू पोहचतील.

- हेमंत पाटील, संस्थेचे क्रीडा अधिकारी

...

महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेतून अनेक खेळाडू उदयाला आले आहेत. ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ग्रामीण भागातील टँलेट जगासमोर यावे, यासाठी या क्लबची स्थापना करण्यात येत आहे. मुलांप्रमाणेच मुलींसाठी देखील प्रशिक्षक नेमण्याचा संस्थेचा मानस आहे.

- नीलिमा पवार, मविप्र सरचिटणीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलकांची मुस्कटदाबी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती लागू करण्याच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नाशिक ते मुंबई दरम्यान बुधवारी काढण्यात येणारा लाँग मार्च पोलिसांनी गुंडाळला आहे. लाँग मार्चकरिता मैदानावर जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. योग्य नियोजन न केल्याने लाँग मार्च फसल्याचीही चर्चा आहे.

भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आदिवासी समाजाच्या सवलती लागू करण्याचा निर्णय २ मार्च रोजी घेतला. या निर्णयाच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हा निर्णय रद्द करण्याच्या पार्श्‍वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे ३ मार्च रोजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ६ मार्चपासून नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, पोलिसांनी बुधवारी हा लाँग मार्च हाणून पाडला. या लॉँग मार्चला रोखण्यासाठी सकाळपासूनच गोल्फ क्लब मैदानावर मोठा फौजफाटा तैनात करीत मार्चसाठी येणाऱ्यांची धरपकड केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपा शाळेत ‘युनेस्को क्लब’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी व आंतरराष्ट्रीय प्रश्न त्यांना समजावे यासाठी युनेस्को क्लब अंतर्गत विविध शाळांची निवड झाली असून यामध्ये राज्यातील २९९ तर नाशिक जिल्ह्यातील ११ शाळांचा समावेश आहे. यात महापालिकेच्या आनंदवल्ली येथील शाळा क्रमांक १८ या एकमेव शाळेचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उपक्रमांची, स्पर्धांची जाणीव असावी यासाठी युनेस्को क्लबची स्थापना शाळांमध्ये करण्यात येते. या क्लब अंतर्गत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, कल्चरल एक्सचेंज व स्टडी टूर या युनेस्कोच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशात जाऊन आपली संस्कृती व कला सादर करण्याची, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व स्पर्धांमध्ये संधीदेखील उपलब्ध होणार आहे.

मनपा शाळा क्रमांक १८, आनंदवली शाळेत ८६९ विद्यार्थी शिक्षण घेत असून, एक उपक्रमशील म्हणून शाळेकडे पाहिले जाते. शाळेला युनेस्को क्लबचा मान मिळावा यासाठी शाळेतील शिक्षिका सविता बोरसे या प्रयत्नशील होत्या. या क्लबसाठी 'युनायटेड नेशन्स सोशिअल अँड कल्चरल ऑर्गनाझेशन' या आंतरराष्ट्रीय संस्थेची मान्यता मिळाली असून 'वर्ल्ड फेडरेशन ऑफ युनेस्को क्लब, जनरल सेक्रेटरी सीयूसीएआय कॉन्फडरेशन ऑफ युनेस्को क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्ष डॉ. धीरेंद्र भटनागर यांनी या क्लबच्या स्थापनेसाठी मान्यता दिली आहे.

युनेस्को क्लब चळवळीचे राज्य समन्वयक विजय पावबाके यांनी मार्गदर्शन शाळेला केले. या शाळेची निवड झाल्याबद्दल मनपा शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक कैलास ठाकरे, क्लब डायरेक्टर सविता बोरसे, सेक्रेटरी अनिता जाधव, कैलास गायकवाड, सुनीता पवार, शिक्षक सदस्य उषा सावकार व इयत्ता दुसरी ते पाचवीचे मुले विद्यार्थी क्लबचे सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेणींना सावानाचा अहेर

0
0

(निष्पक्ष लोगो-कल्चर वार्ता-लोगो)

वक्तव्याशी संस्थेचा संबंध नसल्याचा औरंगाबादकरांचा खुलासा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माधवराव लिमये स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणाऱ्या कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरणप्रसंगीवेळी सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक असून, वाचनालयाचा त्या विधानाशी काहीही संबंध नसल्याचे पत्रक वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी काढले आहे. बेणींच्या वक्तव्याचा असा थेट समाचार अध्यक्षांनीच घेतल्याने सावाना पदाधिकाऱ्यांमधील बंद दारामागील बेबनाव पुढे आल्याची चर्चा आहे.

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना नुकताच कार्यक्षम आमदार पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करताना बेणी म्हणाले, की मुंडे यांना पुरस्कार जाहीर केल्यानंतर आम्हाला धमक्या देण्यात आल्या. वाचनालयाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, हा पुरस्कार मुंडे यांना देऊ नका, असे मेसेज पाठवण्यात आले. बेणींच्या या वक्तव्याने सारे सभागृह अवाक् झाले होते. माझ्या निवडीमुळे संस्थेला त्रास झाला असेल तर याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. तथापि, बुधवारी वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी बेणींचे वक्तव्य सपशेल फेटाळून लावत एक खुलासेवजा निवेदन प्रसिद्ध करून बेणींच्या वक्तव्यातील हवा काढली. पत्रकात म्हटले आहे, की आमदार पुरस्कार प्रदान कार्यक्रमात सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी त्यांच्या प्रास्ताविकात व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक असून, त्या मताशी सावाना अथवा कार्यकारी मंडळ सहमत नाही. मुंडे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सावाना अथवा पदाधिकाऱ्यांना कुठल्याही स्वरुपाच्या धमक्या अथवा जाच झालेला नाही. १७८ वर्षांची वैभवशाली व समृद्ध परंपरा असलेली सावाना व वसंत व्याख्यानमाला या दोन स्वतंत्र सांस्कृतिक संस्था असून, त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सावानाच्या व्यासपीठावरून व्याख्यानमालेच्या अनुदानासंबंधाने वक्तव्य करणे औचित्याला सोडून आहे. त्यामुळे बेणी यांनी केलेल्या वक्तव्याशी सावाना सहमत नाही. उलटपक्षी धनंजय मुंडे यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शहरातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे सार्थ निवड केली याबद्दल अभिनंदनच केले. वसंत व्याख्यानमालेच्या अनुदान वादात सार्वजनिक वाचनालयास ओढू नये, सावानाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा इशाराही यात देण्यात आला आहे. हा सांस्कृतिक सोहळा असताना त्यात असा आततायीपणा करणे उचित नाही, असेही औरंगाबादकर यांनी म्हटले आहे. सावाना आणि वसंत व्याख्यानमाला या दोन्ही वेगळ्या संस्था आहेत. खुद्द वाचनालयाच्या अध्यक्षांनी पत्रक काढून नागरिकांच्या मताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाचनालयाचे कामकाज सुरळीत चालले आहे, असा लोकांचा समज होता. या कार्यक्रमामुळे आतली खदखद पुन्हा समोर आल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.

…..

वसंत व्याख्यानमाला अनुदानाकरिता पानिपतची लढाई करीत असताना तिकडे सावानाचे काही हितसंबंधी मंडळी सत्यनारायणाचा नव्हे तर सत्तानारायणाचा प्रसाद मिळविण्यासाठी आतूर झालेले पाहून दुःख होते. ते महात्मा गांधींचा विचार आचरणात आणतील अशी अपेक्षा आहे.

श्रीकांत बेणी, प्रमुख सचिव सावाना

…..

आमरण उपोषण स्थगित

शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या अनुदानाचे पैसे देण्यास महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आमरण उपोषण करण्याचा घेतलेला निर्णय घेतला होता. गुरुवारपर्यंत (७ मार्च) त्यांनी हे उपोषण स्थगित केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासावरच प्रश्नचिन्ह

0
0

संशयित निर्दोष सुटल्याने खऱ्या आरोपींना शोधण्याचे आव्हान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सातोटे हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सहा संशयितांची निर्दोष मुक्तता करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या एकूण तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संशयित निर्दोष सुटल्याने तपासात त्रुटी ठेवणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई होणार, याकडेही आता लक्ष लागले आहे.

नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण शिवारात ५ जून २००२ रोजी मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. त्र्यंबक सातोटे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. महिला-मुलीवर बलात्कार करून त्यानंतर कुटुंबीयांची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने राज्य हादरले होते. घरातील ऐवज आणि मुद्देमाल लुटून नेतानाच दरोडेखोरांनी त्र्यंबक सातोटे यांच्यासह मुले संदीप, श्रीकांत तसेच भारत मोरे यांची निघृण हत्या केली. तसेच सातोटे यांच्या पत्नीवर आणि मुलीवर बलात्कार केला. मुलीने प्रतिकार केल्याने तिची देखील हत्या करण्यात आली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अंकुश मारुती शिंदे, राजा आप्पा शिंदे, अंबादास लक्ष्मण शिंदे, राजू म्हसू शिंदे, बापू अप्पा शिंदे (सर्व रा. भोकरदन, जि. जालना), सुरेश गंगाराम शिंदे (रा. लातूर) यांना अटक केली होती. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने २००६ मध्ये सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने राजा, अंकुश आणि राजू यांची फाशीची शिक्षा कायम ठेऊन अन्य तिघांना जन्मठेप सुनावली. फाशीच्या शिक्षेबाबत आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. एप्रिल २००९ मध्ये तिघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब करत उर्वरित तिघांनाही जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २०१० मध्ये आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने २००९ मध्ये दिलेला आपला निकाल मागे घेत सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या तपासात अनेक यंत्रणांचा सहभाग असूनही त्रुटी राहिल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. संशयित निर्दोष असतील तर मग या हत्याकांडातील आरोपी कोण असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे.

लोगो : सातोटे हत्याकांड निकाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखाधिकारी शिंदेनाआयुक्तांचा दणका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासोबत जनावरांच्या कंत्राट निविदेवरून गैरवर्तन करणाऱ्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. सुहास शिंदे यांना आयुक्तांशी केलेले गैरवर्तन भोवले आहे. शिंदे यांच्याकडे असलेला मिळकत तसेच जाहीरात व परवाने विभागाचा उपायुक्तपदाचा पदभार काढून घेतला असून, त्यांच्याकडील विभाग नव्याने दोन अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात पशुवैद्यकीय विभागाकडून जनावरे पकडण्यासाठी निविदेवरून लेखाधिकारी शिंदे आणि आयुक्त गमे यांच्यात वाद निर्माण झाला होता. सदरची निविदा जादा दराची प्राप्त झाल्याने आयुक्त गमे यांनी लेखाधिकारी शिंदे यांना तपासून बघण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून शिंदे व गमे यांच्यात बाचाबाची झाली होती. शिंदे यांनी यावेळी गमेंनाच खडे बोल सुनावल्याने गमेंनी त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास सांगीतले होते. तरीही शिंदेचा स्वर उंच राहिल्याने त्यांना गैरवर्तनाची नोटीस बजावण्यात झाली. त्यानंतर आता शिंदे यांच्याकडील दोन विभागांचा कार्यभार काढण्यात आला आहे. मिळकत विभागाची जबाबदारी नगरनियोजन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सोपविण्यात आली आहे. तर जाहिराती व परवाने विभाग उपायुक्त (कर) महेश डोईफोडे यांच्या अखत्यारित देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदेना हा मोठा झटका मानला जात आहे.

अभियंत्याना अच्छे दिन

मे पर्यंत बदल्यांसाठी आपल्याकडे येवू नका, असे फर्मान काढणाऱ्या आयुक्तांनी मात्र विभाग प्रमुखांच्या सोयीनुसार बांधकाम व नगररचना विभागातील अभियंत्याच्या बदल्यांचा सिलसिला चालूच ठेवला आहे. विभागप्रमुखांच्या प्रस्तावानुसार महापालिकेतील सहा उपअभियंत्यांच्या खातेअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. उपअभियंता चंद्रशेखर आहेर यांची सार्वजनिक बांधकाम विभागात तर निलेश साळी यांची पाणी पुरवठा विभागातून नाशिकरोड विभागातील बांधकाम विभाग बदली केली आहे. विनोद माडीवाले यांची पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. सचिन जाधव यांची नगरनियोजन विभागात बदली करण्यात आली तर अनिल नरसिंगे यांची पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली. शाखा अभियंता काझी महमद एजाज यांची सिडको विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागात बदली करण्यात आली आहे. नगरसिंगे आणि माडीवाले या दोघा अभियंत्यांविरोधातील वाढत्या तक्रारी या बदल्यांना कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्धनग्न राहण्याची शेतकऱ्याची प्रतिज्ञा!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि प्रश्नांकडे सातत्याने लक्ष वेधूनही केंद्र व राज्य सरकारने दुर्लक्ष केले असून, शेतकरी मोठ्या अर्थसंकटात सापडला आहे, असा आरोप करीत येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी आपल्या शर्टसह बनियन आणि एक निवेदन नगरसूल येथील पोस्टातून स्पीड पोस्टाद्वारे दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयास धाडले आहे.

कांद्याच्या ढासळत्या बाजारभावाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दोन वर्षांपूर्वी डोंगर यांनी आपल्या शेतातील पाच एकर लाल कांदा स्वतःच्या हाताने जाळून टाकला होता. त्यांनी आता पुन्हा एकदा शेतकरीप्रश्‍नी विद्यमान राज्यकर्ते उदासीन असल्याचा आरोप करीत हा नवा पवित्रा घेतला आहे. कांद्यासह विविध शेतमालाचे गेल्या काही वर्षांतील ढासळणारे बाजारभाव बघता शेतकऱ्यांच्या विविध समस्या अन प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आजवर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांकडून विविध क्लृप्त्या लढविल्या गेल्याचे दिसते. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी कवडीमोल बाजारभावामुळे हाती पडलेले पैसे थेट मनिऑर्डरद्वारे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविले होते, तर कुणी अनोखा फंडा वापरून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या भावनांना प्रातिनिधिक स्वरूपात वाट मोकळी करून दिलेली आहे. आजवर अशा अशारीतीने शेतकरी भावनेचे अनेक पडसाद उमटतानाच डोंगरे यांनी आता आगळावेगळा मार्ग चोखाळला आहे.

राज्यकर्त्यांच्या उदासीनतेने संताप

शेतकऱ्यांच्या समस्या अन् प्रश्नांकडे सातत्याने लक्ष वेधूनही विद्यमान राज्यकर्ते उदासीन दिसत आहेत, असा आरोप करीत डोंगरे यांनी आता नवीन मार्ग निवडताना जोवर सध्याचे राज्यकर्ते सत्तेतून जात नाहीत तोवर अर्धनग्न राहण्याची प्रतिज्ञाच केली आहे. ही प्रतिज्ञा पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी गुरुवारी सकाळी आपल्या अंगावरील शर्ट व बनियन उतरवून टाकला. ती वस्त्रे त्यांनी नगरसूल येथील पोस्टातून स्पीड पोस्टद्वारे 'पीएमओ'ला रवाना केली. त्यांनी चप्पल न वापरण्याचादेखील पण केला असून, आपल्या चपला नगरसूल गावातील खंडेराव मंदिराच्या बाहेर काढल्या आहेत. अर्धनग्न राहण्याची प्रतिज्ञा केलेले कृष्णा डोंगरे गुरुवारी विनाशर्ट गावात फिरताना दिसत होते. त्यांचा प्रतिज्ञा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक सेनेचे लाक्षणिक उपोषण

0
0

नाशिकरोड : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्राथमिक विभागाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर गुरुवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले. यावेळी नाशिक गटातील गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अरेरावीपणाचा निषेध करण्यात आला.

बारावीची कस्टडी सोडून जिल्हा परिषद शाळा संसरी येथे गटशिक्षणाकारी भेट देतात. त्यामुळे परीक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करून त्यांच्या या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी या शिक्षकांनी केली. अर्जित रजा देण्यातही मनमानी केली जात असल्याचा आरोप केला आहे. चटोपाध्याय श्रेणी तात्काळ लागू करावी, सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा, शेवगे दारणा येथे मुख्याध्यापकपद कोणत्या नियमानुसार लागू केले याची चौकशी करावी आदी मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी महेंद्र अहिरे यांनी रोस्टर हक्क संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवला. जितेंद्र मानकर, साहेबराव कसबे, बबन चव्हाण, संजय पगार, धनंजय सरक, खंडू सानप, विलास बांगर, नानासाहेब गोराणे, बाळासाहेब सानप, कैलास चव्हाण, विलास हडस, भारत कानडे, रंजन कदम, श्रीकांत मगर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला आरोग्य सुधारणेसाठी मोलाची ‘स्टेप’

0
0

\Bस्कॉटलंडची नोकरी सोडून सामाजिक कार्यात सहभाग

\B

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : @ashiwinikawaleMT

नाशिक : हल्ली परदेशात शिक्षण, नोकरी मिळविण्यासाठी तरुणवर्ग धडपड करत असल्याची कित्येक उदाहरणे दिसतात. पण, परदेशातील नोकरी सोडून नाशिकमध्ये महिलांचे आरोग्य निरोगी सुधारावे, या हेतूने काम करणारे विरळच. रसिका जानराव या असेच एक उदाहरण असून स्कॉटलंडमधील नोकरी सोडून महिलांचे आरोग्य चांगले राहावे, या हेतूने त्या कार्य करत आहेत. स्टेपअप फाउंडेशनच्या सहसंस्थापक असलेल्या रसिका यांनी आतापर्यंत एकटीनेच आठशेहून अधिक सेमिनार घेऊन मासिक पाळी, त्याविषयी असलेल्या अंधश्रद्धा, परदेशात हा विषय हाताळण्याची पद्धत आदींविषयी जनजागृती करत आहेत.

रसिका यांना सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले. लहानपणापासून विविध सामाजिक उपक्रम त्या बघत आल्याने आपणही समाजासाठी काहीतरी करावे, अशी इच्छा त्यांच्यात निर्माण झाली. मास्टर ऑफ इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्कॉटलँडमध्ये नोकरी मिळवली. दीड वर्षे तेथे राहत असताना महिलांची स्वत:च्या आरोग्याबाबत असलेली काळजी, मासिक पाळी या विषयाबाबत असणारा मोकळेपणा त्यांना जाणवला. तर दुसरीकडे, भारतात हा विषय अजूनही लपूनछपून बोलण्यापर्यंतच मर्यादित असल्याची खंतही वाटली. या लपाछपीमुळे महिलांच्या आरोग्यावर किती दुष्परिणाम होत आहे, याची जाणीव करून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यादृष्टीने स्टेपअप फाउंडेशनअंतर्गत कामास सुरुवात केली.

स्वदेशी नॅपकिन्सची निर्मिती

मासिक पाळीची व्याख्या काय, सॅनिटरी नॅपकिन्स कसे, कोणते वापरावेत, नॅपकिन्स कशापासून बनवले जाते, एक्स्पायरी डेटबाबत काळजी घेण्याची गरज, याबाबत त्या जनजागृती करत आहे. या चार दिवसांमध्ये मंदिरात जाऊ नये यांसारख्या अंधश्रद्धा कुठून आल्या, पाळीविषयक अशा सर्व प्रश्नांची उत्तरे त्या गावागावात जाऊन देत आहेत. नॅपकिन्समधील केमिकल्समुळे कोणत्याही आजाराचा सामना करावा लागू नये, यासाठी पाइन वूड पल्प, कापडाचे शीट वापरून नॅपकिन्सचा स्वदेशी ब्रँड त्यांनी आणला आहे.

\Bजबाबदारी आईची...

\Bआजी आणि आईच्या काळात पाळी या विषयाबाबत अधिक लपवाछपवी झाल्याचे रसिका सांगतात. या चार दिवसात मंदिरात जाऊ नये, यामागे देवाला विटाळ होण्याचे कारण कधीच नव्हते, तर स्वच्छतेचा मुद्दा होता. परंतु, परिस्थितीनुसार अनेक चुकीच्या गोष्टी पुढे येत आहेत. हेच आपल्या पणजीच्या काळात हा विषय गंभीरतेने पाहिला जात असल्याचे त्या सांगतात. त्यामुळे पुन्हा हा विषय योग्यरितीने मुलींना समजावून सांगण्याची जबाबदारी आईची असून या जबाबदारीची जाणीव स्टेपअप फाउंडेशनद्वारे त्या गावागावात पोहोचवत आहेत.

आपले शरीर स्वआरोग्याबाबत नेहमी सूचित करत असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मासिक पाळी या विषयावर मोकळेपणाने बोलल्यास, त्यातील शास्त्र समजून घेतल्यास ही 'अडचण' वाटणार नाही. त्यामुळे हा विषय मोकळेपणाने हाताळावा, या मी कार्य करीत आहे.

-\B रसिका जानराव,

सहसंस्थापक, स्टेप अप फाऊंडेशन

\B

लोगो : महिला दिन विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्याच्या पैठणीवर राष्ट्रीय पुरस्कारांची मोहोर

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केंद्राच्या वस्त्रोद्योग विकास मंत्रालयातर्फे देशातील हातमाग विणकरांसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांत राज्यातील १४ हातमाग विणकरांनी बाजी मारत एकूण १५ पुरस्कार पटकावले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १० कारागिरांचा समावेश आहे. या हातमाग विणकरांना मुंबईत विद्यापिठाच्या सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले.

देशातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील हातमागावर विणल्या जाणाऱ्या वस्त्रांची कला-संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आणि या क्षेत्रातील विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राच्या वस्त्रोद्योग विकास मंत्रालयातर्फे देशभरातील हातमाग विणकरांना पुरस्काराने गौरविले जाते. गेल्या काही वर्षांचे राष्ट्रीय पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. राज्यातील १४ हातमाग विणकरांना एकूण १५ विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ७ राष्ट्रीय, ६ मेरिट आणि २ संत कबीर पुरस्कारांचा समावेश आहे. यापैकी ४ राष्ट्रीय, ५ मेरिट आणि १ संत कबीर पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील येवला येथील हातमाग विणकरांनी पटकावले आहे. या पुरस्कार वितरण समारंभास वस्त्रोद्योग संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. उर्वरित राष्ट्रीय पुरस्कारार्थींत पैठण येथील ३, कल्याण येथील १ आणि अक्कलकोट तालुक्यातील मैंदगिरी येथील १ अशा पाच विणकरांचा समावेश आहे.

असे आहेत जिल्ह्यातील पुरस्कारार्थी

राष्ट्रीय पुरस्कारार्थींत जिल्ह्यातील रमेशसिंग परदेशी- २०१४ (रा. नागडे, ता. येवला), दत्ता हांडी - २०१६ (रा. येवला), राजेश भांडगे -२००३ (रा. येवला), शांतीलाल भांडगे - १९९१ (रा. येवला) या विणकरांचा समावेश आहे. येवल्याचे शांतीलाल भांडगे यांनी २०१० या वर्षाचा संत कबीर पुरस्कारही पटकावला आहे. याशिवाय नॅशनल मेरिट ॲवॉर्ड पंकज पहिलवाल - २०११ (रा. येवला), मनोज दिवटे - २०११ (रा. येवला), ललित भांडगे - २००९ (रा. येवला), विजय रामभाऊ डालकरी - २०११(रा. नाशिकरोड), राजूसिंग परदेशी - २०१६ (रा. नागडे, ता. येवला) या पाच हातमाग विणकरांचा समावेश आहे.

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिझनेस बँकला ‘न्यूबा अ‍ॅवॉर्ड’

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक अर्बन को ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनतर्फे नाशिकरोड येथील बिझनेस बँकेला न्यूबा अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले. बँकेचे उपाध्यक्ष डॉ. उमेश नगरकर, संचालक अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे, दयानंद सदाफुले यांनी संघटक सहकारभारती उदय जोशी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे न्यूबा कॉन्फरन्स झाली. यात देशभरातील शंभर ते दीडशे कोटींच्या आत ठेवी असणाऱ्या बँकांच्या वर्गवारीत कामाची गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुखता या गुणांवर बिझनेस बँकेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कॉन्फरन्सचे अध्यक्ष वसंत खैरनार, असोसिएशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, कार्याध्यक्ष दत्ता गायकवाड, संचालक विश्वास ठाकूर, सदस्य रत्नाकर कदम, नानासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष पुरुषोत्तम फुलसुंदर, संचालक अशोक तापडिया, वसंतराव नगरकर, विजय संकलेचा, श्रीनिवास लोया, बसंत गुरुनानी, विजय चोरडिया, डॉ. पूनमचंद ठोहे, नेमीचंद कोचर, मोहन लाहोटी, सुरेश टर्ले, सचिन घोडके, गोपी आलठक्कर, संचालिका आशा जाजू, राजश्री कपोते, राजन लोंढे, कमलेश छाजेड, अशोक भाबड आदींनी अभिनंदन केले. टेक्नोसॅव्ही म्हणून बँकेने भरारी घेतली आहे. सभासद, ठेवीदार, खातेदार,कर्मचारी व संचालकांच्या सहकार्यातून बँकेची प्रगती होत आहे. त्यामुळे हा पुरस्कार म्हणजे सर्वांचा सन्मान असल्याचे संचालक मंडळाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव पाणीपट्टीची होणार चौकशी

0
0

आयुक्तांचे आश्वासन; स्थायीच्या संमतीविनाच स्लॅबमध्ये बदल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंनी करयोग्य मूल्यदरवाढ वाढवण्याबरोबरच शहरातील पाणी वापराचे परिमाण बदलून करवाढीचा नवा दणका दिल्याचे समोर आले आहे. मुंढेंनी पाणीपट्टीच्या बदललेल्या परिमाणानुसार नागरिकांना बिले येण्यास सुरूवात झाल्यानंतर आगडोंब उसळला असून, नव्या परिमाणानुसार पाणी बिलात पाच ते तीसपटीत वाढ झाल्याचे पडासद महासभेत गुरुवारी पहायला मिळाले. स्थायी समितीची मंजुरी न घेताच, परस्पर ही वाढ करण्यात आल्याचे समोर आले असून, यावर नगरसेवकांनी जाब विचारल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबतची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत झालेल्या बजेटच्या विशेष महासभेत नगरसेवक गुरुमीतसिंग बग्गा आणि सुधारकर बडगुजर यांनी वाढीव पाणीपट्टीचा विषय मांडला. जेवढे पाणी कमी वापराल, तेवढा दर कमी असणे आवश्यक असताना प्रशासनाने मात्र जेवढे कमी पाणी वापराल, तेवढे जास्त बिल भरावे लागेल, असे धोरण स्विकारल्याची टिका बग्गा यांनी केली. पाणी कमी वापरले तर नागरिकांना गुन्हेगार समजले जात असल्याचा आरोप करत, 'कुणाच्या समंतीने पाणीपट्टी वाढवली,' असा सवाल केला. तर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पाणीपट्टीच्या वाढीव आदेशातील कलम १३४/२ चा संदर्भ पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रवींद्र नलावडे यांना वाचण्यास सांगितला. त्यात 'स्थायी समितीच्या पूर्वसंमतीने हा स्लॅब बदलता येईल,' असे त्यात नमूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, सदरचा स्लॅब बदलण्याचा आदेश हा स्थायी समितीच्या संमतीने काढला नसल्याची कबुली त्यांनी दिली. मान्यता नसताना अंमलबजावणी कशी केली त्यावर बग्गा यांनी जाब विचारला. त्यावर 'बघून घेतो', अशी सारवासारव नलावडे यांनी केल्याने मान्यता नसताना अंमलबजावणी केलीच कशी असा सवाल उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांनी याला मुकसंमती आहे का, असा आरोपही सदस्यांनी यावेळी केला. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत तपासणी केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे या वाढीव पाणीपट्टीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सरासरी तीस पट वाढ

शहरात निवासी नळजोडणी अर्धा इंचपासून ते बारा इंचापर्यंत दिली जाते. त्यासाठी एक हजार लिटरला पाच रुपये दर कायम ठेवण्यात आला आहे. परंतू पाणी वापराचे परिमाणानुसार वाढ करण्यात आली आहे. अर्धा इंची नळजोडणीधारकाला दीडशे मासिक, तीस किलो लिटरला दीडशे तर बारा इंची नळजोडणी धारकाला ४० हजार ५०० मासिक किलोलीटरला २ लाख अडीच हजार कमीतकमी पाणी वापराचा दर राहणार आहे. त्यामुळे शंभर रुपये बिल येणाऱ्यांना दिडशे, ३४० रुपये मासिक बिल येणाऱ्यांना ६०० तर ५,६०० रुपये बिल येणाऱ्यांना आता ५६०० एवढी पाणीपट्टी येत आहे. व्यापारी व औद्योगिक दरात पाणी वापराचे परिमाण साधारण तीसपटीपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे या वाढीव पाणीपट्टीच्या बिलाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊर्जा, उत्साहाची बाइक रॅली रविवारी

0
0

- महिलांसाठी धम्माल मस्तीची पर्वणी

- शेकडो महिलांनी केली नोंदणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नारीशक्तीच्या आत्मसन्मानाला हॅट्स ऑफ करण्यासाठी महिला वर्ग सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाइक रॅलीत एंट्री घेण्यासाठी नावनोंदणीला वेग आला असून, शेकडो महिलांनी रजिस्ट्रशन केले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' आयोजित 'ऑल वूमेन बाइक रॅली'चा प्रारंभ रविवारी ईदगाह मैदानापासून होणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे 'ऑल वूमेन पॉवर रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या बाइक रॅलीला रविवारी (१० मार्च) सकाळी ७.३० वाजता प्रारंभ होणार असून, बाइकर्णींना सकाळी पावणेसातपर्यंत ईदगाह मैदानावर उपस्थित राहायचे आहे. बाइक रॅलीसाठी तरुणींपासून तर महिला मंडळ, ऑफिस महिला ग्रुपसह किटी पार्टी ग्रुपची मोठ्या संख्येने नावनोंदणी होत आहे. रॅलीतून महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडविण्यासाठी नारीशक्तीचे नवे प्लॅन्स आता तयार होण्यास सुरुवात झालीय. यंदाच्या बाइक रॅलीत आपल्या ग्रुपचे हटके सेलिब्रेशन व्हावे, त्यासाठी पारंपरिकपासून वेस्टर्न आऊटफिटपर्यंतचा ट्रेंड फॉलो केला जाणार आहे. जुन्या मैत्रिणींना सोबत घेऊन रॅलीत सहभागी होत नव्या मैत्रिणींचा ग्रुप तयार करण्यासाठी महिलांचा उत्साह वाढला आहे. धम्माल मस्तीच्या या पर्वणीत वेगावर स्वार होतानाच समाजप्रबोधनासह वेगळी टशन देण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तुम्हीदेखील ही संधी आजमावण्यासाठी आजच बाइक रॅलीत नाव नोंदवा.

'ऑनलाइन नोंदणी करा'

'ऑल वूमेन बाइक रॅली'त सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी 'PowerrallyNSK' हा एसएमएस कोड 58888 या क्रमांकावर पाठवावा अथवा www.allwomenbikerally.com या वेबसाइटवरही नोंदणी करता येईल. तसेच ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधूनही नोंदणी करता येणार आहे.

नियमांचे पालन करणे गरजेचे

- रॅलीमध्ये सहभागी होताना लायसन्स, पीयूसी आणि गाडीची कागदपत्रे जवळ ठेवा

- गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा

- वळणांवर बाइक काळजीपूर्वक चालवा

- रॅलीसाठी निश्चित केलेल्या मार्गावरूनच सहभागी व्हा

संबंधित वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभा निवडणुकीसाठी स्वंतत्र कक्षाची स्थापना

0
0

जिल्हाभरासाठी २३ समित्यांची निर्मिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीसाठी विभागस्तरावर निवडणूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याद्वारे निवडणूक कामांचा आढावा घेऊन समन्वय साधण्याचे काम कले जाणार आहे. उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कक्ष कार्यरत रहाणार आहे. यात सहायक आयुक्त उन्मेश महाजन, मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांच्यासह तहसीलदार व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी ही कार्यावाही केली. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा अगोदरच सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी निवडणूक यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. निवडणूक कामकाजासाठी २३ प्रकारच्या समित्यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक समितीसाठी स्वतंत्र समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. समित्यांना निवडणुकीची पूर्वतयारी येत्या एक-दोन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यावर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजवणी करण्याबाबत सर्व सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण झालेल्या क्षेत्राचे आणि ठिकाणांचे सर्वेक्षण होणार असून निवडणूक जाहीर झाल्यावर त्याबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. निवडणुकीदरम्यान असे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाने फरार घोषित केलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी आवश्यक माहिती पोलिस विभागाकडून मागविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images