Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिककरांवर घोषणांचा वर्षाव!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा आणि पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीपाठोपाठ महापौर रंजना भानसी यांनीही २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये घोषणांचा वर्षाव केला आहे. स्थायी समितीचे हंगामी सभापती दिनकर पाटील यांनी महासभेला १९८३ कोटींचे बजेट सादर केल्यानंतर महापौरांनी यात विविध योजनांची घोषणा करत, त्याला मंजुरी दिली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह, महापालिका हद्दीतील खेडे विकासाचा 'संकल्प' जाहीर करत नियमीत करदात्यांसाठी ५० हजाराच्या अपघात विमा योजनेची घोषणा केली आहे. शहरात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या नागरिकांना 'लोककल्याण पुरस्कार' तसेच पंचवटीच्या धर्तीवर सहाही विभागात महिला उद्योग भवन उभारण्यासह नगरसेवकांच्या प्रभाग निधीत २५ लाखांची वाढ करत तो ७५ लाख केल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली आहे.

स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी तयार केलेला महापालिकेचे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे १९८३.५० कोटी रुपयांचे बजेट स्थायीचे हंगामी सभापती दिनकर पाटील यांनी गुरुवारी महासभेत सादर केला. स्थायीच्या बजेटमध्ये चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकात पीपीपी तत्त्वावर फिल्मसिटी, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या सुशोभिकरणासाठी पाच कोटी, द्वारका येथील मनपाच्या जागेवर पीपीपी तत्त्वावर अटल उद्योग संकुल, युवा धोरणासाठी अतिरीक्त तरतूद, महिला सबलीकरणासाठी पिंक रिक्षा तसेच रिक्षा चालविण्याकरीता महिलांना प्रशिक्षण व परवानासाठी आर्थिक तरतूद, आनंदवल्ली ते तपोवनदरम्यान गोदाकाठी ठिकठिकाणी दशक्रिया विधी सुविधा, प्रायोगिक तत्त्वावर मनपाच्या दोन शाळांमध्ये खासगी सहभागातून सीबीएससी पॅटर्नचे अभ्यासक्रम, प्रभाग १५ मधील भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या नुतनीकरणासाठी नऊ कोटी, तर टाकळी रोड येथील मनपाच्या आरक्षित जागेत डॉ. आंबेडकर नॉलेज बॅँक उभारणीसाठी १० कोटी, प्रभाग १२ मध्ये दोन एकर जागेत पीपीपी तत्त्वावर स्टेडिअम कॉम्प्लेक्स, पीपीपी तत्त्वावर स्वागत कमानींचा विकास आदींसाठी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्यात पाटील यांनी वाढ करत मनपा हद्दीतील २२ खेड्यांच्या विकासासाठी प्रत्येकी १ कोटींची तरतूद करण्यात यावी तसेच शहराच्या समतोल विकासासाठी बजेटमध्ये तरतूद करण्याची सूचना केली.

हिमगौरा आहेर-आडके यांनी बजेटमध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत, शहराचा विकास आणि पालिकेचे उत्पन्न याचा ताळमेळ साधूनच बजेटमधील जमा बाजुत ८९ कोटींची वाढ सूचविण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तब्बल सात तास चाललेल्या या महासभेत सुमारे ४८ नगरसेवकांनी विविध सूचनाचा वर्षाव केला. चर्चेअंती महापौर भानसी यांनी बजेटमध्ये दुरुस्ती व उप सूचनांसह बजेटला मंजुरी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. शहरातील २२ खेड्यांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केले.

सातवा वेतन आयोग लागू

केंद्र व राज्य शासनाच्या पाठोपाठ नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला आहे. यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रारुप बजेटमध्ये यापूर्वीच तरतूद देखील केली असून, वेतन फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाचा लाभ दिला जाणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले. परंतु, यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज भासणार असून, त्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे कर्मचासाठीच्या सातवा वेतन आयोगाला धोरणात्मक मान्यता मिळाल्याने सातवा वेतन आयोगाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

अपघात विमा योजना

महापालिकेच्या नियमित करदात्यांना ५० हजार रुपयांचा अपघात विमा यापूर्वी लागू होता. नियमीत कर भरत असलेल्या करदात्याचा मृत्यू झाल्यास त्याला पालिकेकडून ५० हजाराची आर्थिक मदत दिली जात होती. परंतू तांत्रिक कारणास्तव योजना बंद करण्यात आली होती. परंतु, महापौरांनी या वर्षापासून योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शहरात नियमीत करदाते वाढतील, असा अंदाज आहे.

पाच विभागात उद्योग भवन

यापूर्वी पंचवटी विभागात महिला उद्योग भवनाची निर्मिती करण्यास मान्यता दिली होती; परंतू महिला नगरसेवकांनी प्रत्येक विभागात मागणी केली होती. त्यानुसार महासभेत पंचवटीच्या धर्तीवरच सातपूर, सिडको, नाशिकरोड, नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व विभागात महिला भवन उभारण्याची घोषणा महापौर भानसी यांनी केली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी भेट आहे.

दोनशे कोटींची वाढ

आयुक्तांनी प्रारुप बजेट सादर केल्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षांपूर्तीसाठी स्थायी समिती आणि महासभेकडून अंदाजपत्रकातील जमा बाजू फुगविली जाते. आयुक्तांनी १८९५ कोटींचे बजेट सादर केले होते. त्यात स्थायी समितीने पुन्हा ८९ कोटींची वाढ सुचवली आहे. महासभेकडून पुन्हा त्यात शंभर कोटींची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक वर्षाअखेर पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाचा आढावा घेता आयुक्तांचेच अंदाज वास्तवदर्शी ठरतात, हा आजवरचा अनुभव आहे. स्थायी समिती आणि महासभेने अंदाजपत्रकात सुमारे २०० कोटी रुपयांची वाढ सुचविली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आयुक्तांच्याच हाती असणार आहे.

महापौरांच्या घोषणा

- सत्तारूढ भाजपकडून खेडे विकासाचा 'संकल्प'

- शहरातील प्रभागातील रस्त्यांनाही निधी

- नियमीत करदात्यांसाठी अपघात विमा योजना

- उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांना लोककल्याण पुरस्काराने गौरविणार

- पंचवटीच्या धर्तीवर सहाही विभागात महिला उद्योग भवन

- सातवा वेतन आयोग लागू होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागपूरला निधी,नाशिकला ठेंगा

$
0
0

नागपूरला निधी; नाशिकला मात्र ठेंगा

नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांनी नाशिककरांची फसवणूक केल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महासभेत केला. नागपूर शहराच्या विकासासाठी १५० कोटींचा 'विशेष विकास निधी' देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'दत्तक नाशिक'ला मात्र ठेंगा दाखवला असून, नाशिकला सापत्न वागणूक कशासाठी? असा सवाल बोरस्तेंनी उपस्थित करत, भाजपवर टिका केली. नाशिकवर भाजपचे प्रेम असेल तर, भाजपने नाशिकसाठी दोनशे कोटींचा निधी आणून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

सूचनांचाही पाऊस..

तब्बल नऊ तास चाललेल्या महापालिकेच्या बजेटच्या महासभेत ४८ नगरसेवकांनी सहभाग घेत विविध सूचनाचा वर्षाव केला. यावेळी शहराच्या विकासासाठी व प्रभागातील विविध कामांना निधी मिळावा यासाठी नगरसेवकांनी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, मनसे गटनेते सलीम शेख, चंद्रकांत खोडे, गुरमीत बग्गा, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, सरोज अहिर, अजिंक्य साने, आशा तडवी, शांता हिरे, हर्षदा गायकर, नयना गांगुर्डे, सुनिता कोठुळे, ॲड. शाम बडोदे, सुनील गोडसे, उद्धव निमसे, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, प्रियंका माने, सत्यभामा गाडेकर, सीमा निगळ, रविंद्र धिवरे, पंडीत आवारे, आदींनी विविध सुचना मांडल्या. तर, करवाढ रद्द करण्याच्या महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने घोर निराशा झाल्याचे सांगत दातीर यांनी सभात्याग केला.

'गोदावरी'वर बिल्डरांसाठी पूल

स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या ग्रीनफिल्डला जोडण्यासाठी गंगापूर शिवारात गोदावरी नदीवर समांतरपुल उभारण्यासाठी बजेटमध्ये २० कोटीची तरतुदीवर शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेविका नयना गांगुर्डे यांनी जोरदार आक्षेप घेतला. इथे वस्ती नसतानाही बिल्डरांच्या भल्यासाठीच गोदावरीवर हा पूल उभारण्यात येत असल्याचा आरोप करत ही तरतूद रद्द करून प्रभागातील रस्ते विकासासाठी निधी वर्ग करण्याची जोरदार मागणी या नगरसेवकांनी केली. स्मार्ट सिटीसाठी पूल उभारत असल्याचा दावा प्रशानाने केला. मात्र स्मार्ट सिटी गंगापूरला नव्हे; तर मखमलाबादला असल्याचे सांगत, बिल्डरांच्या जमिनींचे भाव वाढविण्यासाठीच पूल मंजूर केल्याचा आरोप सदस्यांनी केला.

अन् महापौरांची दिलगिरी

प्रभागातील विकासकामांसाठी पत्र देण्यासाठी महापौरांकडे गेले असता, त्यांनी पत्र स्विकारले नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांनी महासभेत केला. महापौरांच्या या कृतीमुळे अपमान झाल्याचा राग त्यांनी महासभेत व्यक्त केला. यावर सेनेच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवत महापौरांनी दिलगीरी व्यक्त करण्याची मागणी केली. गायकर यांच्याबाबत असा कुठलाचा प्रकार आपण केला नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी देखील महापौरांची बाजू घेत शिवसेना नगरसेवकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सभागृहातील गोंधळ वाढू लागल्यानंतर महापौरांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थायरॉईडची आज मोफत तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला दिनानिमित्त क्रस्ना डॉयग्नोस्टिकतर्फे महिलांसाठी शहरात शुक्रवारी (दि. ८) आठ ठिकाणी मोफत थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. याचा अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असतांना थायरॉईडसारखा आजार महिलांच्या वाटचालीत अडसर ठरत आहे. दरहजारी ८० महिलांना या रोगाने ग्रासल्याचे वैद्यकीय पाहणीत आढळून आले आहे. ऐरवी वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आढळून येणारा हा आजार सध्या वयाच्या १० ते १४ पासूनच आढळून येत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन क्रस्ना डॉयग्नोस्टिकने थायरॉईड हार्मोन्सची तपासणी महिलांनी ही दर महिन्याला अथवा निदान दर दोन ते तीन महिन्यांनी करावी अशी भूमिका घेतली आहे. यासाठी सावरकरनगर व इंदिरानगरमधील ग्रीन प्लस फार्मसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा इपीसी, तपोवन रोडवरील वात्सल्य वृद्धाश्रम, सातपूर एमआयडीसीतील सीएट कंपनी, केटीएचएम कॉलेज, दिंडोरी रोडवरील न्यू सहारा हॉस्पिटल तसेच ड्रिम सिटी रोडवरील गीताई क्लिनिक येथे मोफत तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती क्रस्ना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुथा आणि व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन-भटेवरा यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस महासंचालकांनी घेतला विभागाचा आढावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरुवारी शहरासह जिल्हा आणि विभागातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

गत आठवड्यात पदभार स्वीकारल्यानंतर जयस्वाल यांनी गुरुवारी नाशिक गाठले. दुपारी बारा वाजेपासून तीनपर्यंत पार पडलेल्या या बैठकीत जयस्वाल यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण सुचना केल्या. या आढावा बैठकीस परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षक डॉ. आरती सिंह, विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील अधीक्षक यांच्यासह उपायुक्त, सहाय्यक आयुक्त हजर होते. सर्वच विभागांच्या प्रमुखांशी त्यांनी यावेळी चर्चा केली. लोकसभा निवडणूक हे पुढील दोन ते अडीच महिन्यांसाठी सर्वांचे ध्येय असून, ती शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी प्रोफेशनल पोलिसिंगचे तत्त्व सातत्याने अमलात आणावे, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारी, समाजकंटक यांची माहिती घेताना पोलिस महासंचालकांनी अशा घटकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. अवैध व्यवसाय, अनधिकृत शस्त्रे, मद्य पुरवठा आदी लक्ष्य करण्यासह प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याकडे लक्ष देण्याचे आदेश त्यांनी दिले.

बंदोबस्ताबाबत सविस्तर चर्चा

या बैठकीदरम्यान पोलिस महासंचालकांनी बंदोबस्ताचे नियोजन समजून घेतले. शहर आणि जिल्हानिहाय किती मनुष्यबळ उपलब्ध आहे, कोठे आणि किती बंदोबस्त लागेल, याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहारासह विभागात व्हीआयपींची लगबग वाढेल, अशावेळी प्रत्येक घटक प्रमुखाने सातत्याने बंदोबस्ताचा आढावा घेऊन बंदोबस्तात कोठेही कमी पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी स्पष्ट सूचना यावेळी महासंचालक जयस्वाल यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गौरव महाराष्ट्रा’चा नाट्यप्रयोग १० मार्चला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे रविवार (१० मार्च) सायंकाळी ५ वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर नाशिक येथे सांधेबदल शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. योगेश चौधरी यांच्या 'सदा सर्वदा चालत रहा' या अस्थिविकारावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. चौधरी म्हणाले,'अस्थिविकाराच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी व हाडांचा ठिसुळपणा व यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर जनजागृती होणे गरजेचे आहे. 'सदा सर्वदा चालत रहा' या शिर्षकाखाली या कार्यक्रमातून सर्वांना अस्थिविकारातून उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे हॉस्पिटलतर्फे सर्वांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती मिळावी यासाठी मुंबई येथील ४० कलाकरांचा 'गौरव महाराष्ट्राचा' या प्रयोगाचेही विनामूल्य आयोजन करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. सुनील बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष उत्पादकाची आत्महत्या

$
0
0

निफाड तालुक्यातील घटना; कर्जाला कंटाळून घेतला गळफास

म. टा. वृत्तसेवा निफाड

मोठ्या कष्टाने पिकविलेले द्राक्ष बाजारात मातीमोल भाव, डोक्यावर वाढता कर्जाचा, परतफेडीसाठी बँकेने लावलेला तगादा, कर्ज न भरल्यास सातबाऱ्यावर बँकेचे नाव लावण्याची नोटीस आदी चोहीकडून झालेल्या कोंडीमुळे तालुक्यातील औरंगपूर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. भाऊसाहेब शिवाजी खालकर (वय ४४) असे त्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे.

लांबलेल्या थंडीमुळे द्राक्षमालाला भाव मिळत नसल्यामुळे तालुक्याील द्राक्ष उत्पादकांमध्ये प्रचंड भीती भरली आहे. वारेमाप पैसा खर्च करूनही द्राक्षमालाल भाव मिळत नसल्यामुळे निफाडसह, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

औरंगपूर येथील द्राक्षउत्पादक भाऊसाहेब खालकर यांनी गुरुवारी (दि. ७) रोजी पहाटे घरासमोर असलेल्या कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्मत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि शेतमालाला भाव नसल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली आहे.

खालकर यांनी दोन एकर क्षेत्रावर थॉमसन वाणाच्या द्राक्षाची बाग फुलविली होती. सलग दोन वर्षे नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षशेतीतून काहीही हाती आले नाही. यावर्षी द्राक्षबाग चांगली बहरली होती. मात्र बाजारभाव घसरले असून अवघे १५ रुपये किलो द्राक्ष विकले जात आहे. त्यामुळे बागेसाठी केलेला खर्चही वसूल होत नाही. एकिकडे अल्प भाव तर दुसरीकडे कर्ज भरण्यासाठी बँकेचा तगादा यामुळे खालकर खचले होत.

चिठ्ठीत कर्जाचे विश्लेषण

देना बँकेचे आठ लाख रुपये, सरस्वती बँक ओझर यांचे ८० हजार रुपये, सोसायटीचे ७० हजार, दुकानदारी उधारी १ लाख, उसनवरीने घेतलेले ९० हजार असे कर्ज असल्याची माहिती खालकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिली आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

शासन निर्णयाला केराची टोपली

औरंगपूर हे गाव अत्यल्प अवर्षणात येते. वर्षानुवर्षे दुष्काळ या गावाच्या पाचवीलाच पुजला आहे. केवळ ५ टक्के लोकांच्या विहिरी आणि बोरवेलला पाणी आहे. अशा दुष्काळग्रस्त भागात सहकारी संस्था आणि बँक यांनी कर्जवसुली करू नये. कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी असे आदेश सरकारने दिले आहेत. असे असतानाही खालकर यांच्याकडे देना बँक, ओझर येथील सरस्वती बँकेने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला. या भीतीतूनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडल्याची चर्चा त्यांचे नातेवाईक करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदेत मिसळणारे सांडपाणी रोखा

$
0
0

'निरी'ची सूचना; एमपीसीबी, महापालिकेची पाहणी

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गोदावरीत मिसळणारे सांडपाणी कायमस्वरूपी बंद करावे, अशी अपेक्षा नागपूर येथील निरी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) व महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'निरी'च्या पदाधिकाऱ्यांसोबत गुरुवारी पाहणी दौरा केला.

नाशिकमधून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याच्या तक्रारी सामाजिक संघटनांकडून नेहमीच केल्या जातात. याबाबत 'मटा'नेही अनेकदा लक्ष वेधून गोदावरीत मिसळणारे सांडपाणी बंद करण्याबाबत वृत्त प्रसारित केले. न्यायालयाच्या दणक्यानंतर एकाच आठवड्यात महापालिकेने गोदावरीत मिसळणारे सांडपाणी अखेर बंद केले. परंतु, नैसर्गिक नाल्यालगतच्या ड्रेनेज चेंबर फोडून गोदावरीत सांडपाणी मिसळले तर त्यास जबाबदार कोण? तसेच न्यायालयाच्या आदेशावरूनच एमपीसीबी किंवा महापालिकेचा ड्रेनेज विभाग काम करणार का, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

गंगापूर, गोवर्धन परिसरातून गोदावरी प्रदूषित होण्याची सुरुवात होते. फुटलेले ड्रेनेजच्या चेंबरमधून सांडपाणी थेट गोदावरीत मिसळते. गंगापूर गावातील नैसर्गिक नाला, सोमेश्वर नाला, बेंडकोळी मळ्याशेजारील नाला, आनंदवल्ली गावातील नाला, चोपडा लॉन्सच्या बाजूकडील नाला यांच्यातून सांडपाणी वाहून येत थेट गोदावरीत मिसळत असल्याचे वृत्त 'मटा'ने अनेकदा प्रसारित केले आहे. मात्र, केवळ नावालाच सांडपाणी रोखण्याचे काम महापालिका हाती घेते. आता 'निरी'च्या पुढाकाराने न्यायालयाच्या आदेशावरून आठच दिवसात गोदावरीत मिसळणारे सांडपाणी महापालिकेने बंद केले. निरी संस्था, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, गोदावरी प्रदूषण बचाव समिती यांनी गुरुवारी संयुक्त पाहणी दौरा केला. गोदावरीत सांडपाणी मिसळत नसल्याचे दाखविण्याचा एमपीसीबी व महापालिकेचा प्रयत्न होता. मात्र, गेल्याच महिन्यात हजारो लिटर सांडपाणी गंगापूर गावातील नैसर्गिक नाला व सोमेश्वर नाला येथून गोदावरीत मिसळत असल्याचे पहायला मिळाले. केवळ नावालाच गोदावरीत सांडपाणी मिसळणे बंद न करता कायमस्वरूपी त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

गोदावरीत सांडपाणी मिसळत असल्याच्या अनेकदा तक्रारी नाशिककर करतात. परंतु, महापालिका याकडे दर्लक्ष करते. याप्रश्नी महापालिकेने ठोस उपाय केले पाहिजे.

- ज्ञानेश्वर गांगुर्डे, पर्यावरण प्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंबसंस्था धोक्यात

$
0
0

काडीमोड वाढले; महिलांच्या भावविश्वाला अजूनही दुय्यम स्थान

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुन पुरुषांपेक्षा काकणभर अधिक प्रगती करीत असल्याचे गर्वाने सांगितले जाते. मात्र, कौटुंबिक आघाडीवर समाजात आजही कित्येक महिलांच्या भावविश्वाला दुय्यम स्थान दिले जात आहे. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दाखल प्रकरणांच्या संख्येवरून हे उघड होते. गेल्या चार वर्षांत कौटुंबिक न्यायालयात दाखल ४ हजार १९० पैकी तब्बल ३ हजार १८९ दाव्यांत घटस्फोट झाले. उर्वरित ४६४ जोडप्यांचे संसार रुळावर आणण्यात व्यवस्थेला यश आले आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सबलीकरणाची जोरदार चर्चा केली जाते. विविध उपक्रम राबवून महिला सबलीकरणासाठी प्रयत्नही होतात. शिक्षण, राजकारण आणि नोकरी या आघाड्यांवर आजच्या आधुनिक महिलेने आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. काही क्षेत्रांत तर आजच्या सु्शिक्षित महिला पुरुषांपेक्षा काकणभर पुढे असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहेच. एकीकडे महिला सबल होत असल्याचे हे चित्र असले तरी कौटुंबिक स्तरावर आजची महिला विविध स्वरुपाच्या छळाची बळी ठरत असल्याचे कुटुंब न्यायालयातील दाव्यांच्या आकडेवारीवरून हे वरवरचे चित्र असल्याचे म्हणता येईल. आजच्या महिलेची कौटुंबिक स्तरावरील छळातून अजूनही सुटका झालेली नसल्याचे चित्र या आकडेवारीतुन उघड होते. घटस्फोट मागणीसाठी महिलांकडून दाखल दाव्यांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. या प्रकारामुळे कुटुंबव्यवस्थाही मोडकळीस आली आहे.

चार वर्षांत तीन हजार घटस्फोट

नाशिक शहरात २०१५ ते २०१८ या कालावधीत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट आणि इतर कारणांखाली ४ हजार १९० दावे दाखल झाले. त्यापैकी ३ हजार १८९ प्रकरणांत घटस्फोट झाले. तर ४६४ जोडप्यांचे मने जुळविण्यात व्यवस्थेला यश मिळाले. घटस्फोटांच्या तुलनेत कुटुंबे जोडण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कौटुंबिक पातळीवर महिलांना स्वतःच्या हक्कांसाठी आजही संघर्ष सुरुच असल्याचे या आकडेवारीतून उघड झाले आहे. विविध प्रकारची सुमारे १ हजार ५६० दावे अद्यापही प्रलंबित आहेत.

मने जुळविताना

वर्ष..........जोडलेले संसार

२०१५..........८७

२०१६..........१२२

२०१७..........११५

२०१८..........१४०

घटस्फोटाची ठळक कारणे

मोबाइल फोन, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर

संशयाची वृत्ती

कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष

पालकांचा मुलींच्या संसारात हस्तक्षेप

उच्च शिक्षणामुळे वाढलेल्या अपेक्षा

चैनीची जीवनशैली

विभक्त कुटुंबपद्धतीचा आग्रह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लेक्चर्ससाठी युवा सेनेचा ठिय्या

$
0
0

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक / म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे लेक्चर्स बंद करण्याचा अधिकार संस्थेस नाही. अंतर्गत प्रश्न असतील तर ते संस्थास्तरावर सोडवावेत पण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळून त्यांची अडवणूक करू नये, अशी मागणी करत युवासेना आणि शिवसेनेने त्र्यंबक रोडवरील सपकाळ नॉलेज हबच्या कॅम्पसमध्ये तीन तास ठिय्या देत आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांचे नुकसान न होऊ देण्याबाबत व्यवस्थापनाच्या वतीने लेखी पत्र घेतल्यानंतरच संघटनेने आंदोलन मागे घेतले.

याबाबत माहित अशी, की संबंधित संस्थेतील प्राध्यापकांचे पगार दीर्घकाळापासून खोळंबले असल्याचा दावा युवासेनेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केला आहे. परिणामी या कॅम्पस प्राध्यापकांनी जानेवारीच्या मध्यापासूनच अनेक अभ्यासक्रमांचे लेक्चर्स घेणेच बंद केल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी संघटनेकडे केल्या होत्या. यासह विविध प्रश्न घेऊन सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे सिनेट सदस्य व युवा सेना विस्तारक अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे अंदोलन छेडण्यात आले.

प्रारंभी विद्यार्थ्यांना वर्गात बसविण्यात आले. मात्र, अंदोलकांनी आग्रह धरला तेव्हा त्यांना प्रांगणात सोडण्यात आले. यावेळेस विद्यार्थ्यांनी हाती फलक घेऊन निषेध नोंदवला. संस्थेच्या फार्मसी आणि इंजिनिअरिंग शाखांमध्ये तीन महिन्यांपासून लेक्चर्स बंद असल्याची तक्रार यावेळी युवासेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्ते व प्रतिनिधींनी केली. या आंदोलनात पालकही सहभागी झाले.

या आंदोलनात विद्यापिठाचे सिनेट सदस्य व युवा सेना विस्तारक अमित पाटील यांसह नाशिकमधील कार्यकर्ते, विद्यार्थील पालक व त्र्यंबकमधून युवा सेना जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे, शिवसेना माजी तालुका प्रमुख निवृत्ती लांबे, तालुका समन्वयक समाधान बोडके, युवा सेनेचे रामनाथ बोडके, शिवसेना तालुका प्रमुख रवी वारुणसे, संपत चव्हाण, नगरसेविका कल्पना लहांगे, त्र्यंबकेश्वर शहर संपर्क भूषण अडसरे, शहर प्रमुख सचिन दीक्षित, शिवाजी कसबे, समाधान आहेर, मनोहर महाले, संजय मेढे, नितीन पवार, सागर पन्हाळे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

व्यवस्थापनाकडून आंदोलकांना आश्वासन

याप्रश्नी सिनेट सदस्य पाटील यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही याप्रश्नी तक्रार केली. शिवाय आंदोलनानंतर व्यवस्थापनाने आंदोलकांना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावे लिखित पत्राद्वारे आश्वस्त करत विद्यार्थ्यांच्या तासिका नियमित सुरू राहतील, असे सांगितले. विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान यापुढे सुटीच्या दिवशीही भरून काढण्यात येईल आणि विद्यापीठाशी संवाद साधून इतर मागण्याही मार्गी लावल्या जातील, अशा आशयाचे पत्र व्यवस्थापनाच्या वतीने प्रा. आर. बी. सौदागर आणि एस. बी. बागल यांनी दिले आहे. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निनादपश्चात विजेता जाणार हवाई दलात

$
0
0

Bhavesh.Brahmankar@timesgroup.com

Twitter - @BhaveshBMT

नाशिक : हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत पतीने प्राण गमावल्यानंतर देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार विजेता मांडवगणे यांनी केला आहे.

पतीच्या पश्चात संरक्षण क्षेत्रात जाणाऱ्या विजेता या राज्यातील तिसऱ्या महिला ठरणार आहेत. आपल्या दोन वर्षांच्या कन्येलाही संरक्षणाचे धडे देऊन तिनेही देशरक्षणात भविष्य घडवावे, अशी विजेता यांची इच्छा आहे.

काही दिवसांपूर्वीच स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरमरण आले. निनाद हे अतिशय धाडसी आणि संयमी अधिकारी होते. देशरक्षणाचे त्यांचे ध्येय पूर्ण व्हावे, हीच निनाद यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांचे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी हवाई दलात सामील होण्याचा निश्चय त्यांच्या पत्नी विजेता मांडवगणे यांनी केला आहे. तसे झाले तर तीच निनाद यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांचे मत आहे. तसेच, दोन वर्षांची कन्या निया हिचे संगोपनसुद्धा अशा वातावरणात करायचे आहे, की तिलाही देशरक्षणाचे बाळकडू मिळेल. घरातील प्रमुख व्यक्ती गेल्यानंतर शोक करण्यापेक्षा त्याच्या विचारांचे स्वप्न साकारण करणेच अधिक उपयुक्त आहे, अशी विचारधारा मांडवगणे कुटुंबीयांनी अंगी बाणवली आहे.

एसएसबीतच झाली भेट

निनाद यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी)ची परीक्षा दिली. याच परीक्षेच्या वेळी निनाद आणि विजेता यांची भेट झाली. त्यानंतर निनाद यांची हवाई दलात निवड झाली. पुढे निनाद आणि विजेता यांनी लग्न केले. मात्र, कौटुंबिक कारणामुळे विजेता या संरक्षण क्षेत्रात गेल्या नाहीत. आता निनाद यांनी देशसेवेसाठी बलिदान दिल्यानंतर विजेता यांनी निनाद यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कौटुंबिक वातावरण

विजेता यांचे वडिल केंद्रीय राखीव पोलिस दलात होते. दोन वर्षांपूर्वीच ते निवृत्त झाले. विजेता यांचे आजोबा (वडिलांचे वडील) हेसुद्धा हवाई दलात कार्यरत होते. विजेता यांचे काका सध्या हवाई दलात आहेत. त्यामुळे संरक्षण क्षेत्र आणि देशरक्षणाचे वातावरण विजेता यांना कुटुंबात मिळाले आहे. त्यामुळे निनाद यांच्या पश्चात हवाई दलात कार्यरत होण्याची त्यांची मनीषा जागृत झाली आहे.

राज्यातील तिसरी महिला

कर्नल संतोष महाडिक यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी स्वाती लष्करात लेफ्टनंट झाल्या आहेत. मेजर प्रसाद महाडिक यांच्यानंतर त्यांची पत्नी गौरी महाडिक यांनीही संरक्षण क्षेत्रात जाण्यासाठीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या दोन्ही वीर पत्नींनंतर संरक्षण क्षेत्रात जाणाऱ्या विजेता या राज्यातील तिसरी वीरपत्नी ठरणार आहेत.

कठीण, पण अशक्य नाही

विजेता यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. हवाई दलात जाण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. पण, हवाई दलात जाण्याची प्रक्रिया सोपी नाही. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर अनेक कसोट्यांना सामोरे जावे लागते. त्यातच हवाई दलात जाण्यासाठी तर शर्थीचे प्रयत्न करावे लागतात, असे संरक्षण करिअर मार्गदर्शक लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर यांनी सांगितले. स्वाती महाडिक यांनाही ब्राह्मणकर यांनी मार्गदर्शन केले आहे.

हवाई दलात जाण्याचा विजेता हिचा मनोदय आहे. तसेच, मुलीलाही संरक्षण क्षेत्राच्या वातावरणात वाढविण्याचा तिचा निश्चय आहे. आमचा संपूर्ण पाठिंबा तिला आहे.

-अनिल मांडवगणे, सासरे

विजेतालाही हवाई दलाची आवड आहे. निनादवर तिचे अपार प्रेम होते. त्यामुळेच त्याच्या पश्चात हवाई दलात जाण्याचे तिने योजले आहे. आम्हाला समाधान वाटत आहे.

-सुषमा मांडवगणे, सासू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मठ मंदिर बचाव समितीचा घंटानाद

$
0
0

महापौर निवासस्थानी आज बैठक

...

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करीत ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे जाहीर केले. शहरातील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी गुरुवारी (दि. ७) आमदार बाळासाहेब सानप यांच्या कार्यालयासमोर मठ मंदिर बचाव समितीतर्फे घंटानाद करण्यात आला. आमदार सानप यांनी लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन समितीच्या सदस्यांना दिले. या संदर्भात आज (दि. ८) महापौर निवास येथे बैठक बोलविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंदिर वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यासाठी गुरुवारी सकाळी साडेदहापासून मठ मंदिर बचाव समितीचे सदस्य रामसिंग बावरी, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, मारुतीनंद महाराज, विनोद थोरात, कैलास देशमुख, नंदू कहार, प्रवीण जाधव, विजय पवार, मोहन गोसावी आदी आमदार सानप यांच्या कार्यालयासमोर जमा झाले होते. दीड तास आमदारांची प्रतीक्षा केल्यानंतर सदस्यांनी कार्यालयासमोर ठिय्या देत घंटानाद आणि श्रीराम जय राम जय जय राम असा जयघोष सुरू केला. दुपारी साडेबाराला आमदार सानप आल्यानंतरही घंटानाद सुरू होता. घंटानाद करणाऱ्यांनी प्रश्न सुटल्याशिवाय येथून उठणार नसल्याचे सांगितले.

सानप यांनी आंदोलकांना विनंती करून कार्यालयात बोलावून घेतले. तेथे चर्चा करण्यात आली. या संदर्भात शुक्रवारी महापौर निवासस्थानी बैठक घेण्यात येईल. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सर्व धार्मिक स्थळे वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यात येईल, असे सानप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसववेदनेतून सुटका करणारी अनुसया

$
0
0

सुनील कुमावत, निफाड

भगवान दत्तात्रेयांना जन्म देणारी अनुसया आपल्याला माहीत आहे, पण अशीही एक अनुसया आहे की, जीने इतर मातांच्या प्रसूतीकळा कमी करून त्यांची प्रसूती सुलभ केली आहे. विशेष म्हणजे ज्या काळात आरोग्य सेवा ग्रामीण भागात पोहोचलेली नव्हती तेव्हापासून तर आजच्या प्रगत युगातही ही 'अनुसया' घरोघरी जाऊन महिलांना मदत करी आहे.

अनुसया पोपटराव गांगुर्डे. वय ९७ वर्षे. गाव जोपुळ (ता. दिंडोरी) असे त्या महिलेचे नाव आणि साधासरळ पत्ता. सगळीकडे त्या 'अनुसया आजी' म्हणून प्रसिद्ध आहेत. अनुसया आजींनी लोखंडेवाडी, धामणवाडी, चिंचखेड, पिंपळगावसह परिसरातील छोट्या मोठ्या वस्त्यांवरील महिलांचे बाळंतपण केले आहे. त्या दिंडोरी परिसरात आपल्या पतीसह मोलमजुरी करून राहत होत्या. मात्र सन १९६६ साली त्यांच्या पतीचे निधन झाले आणि कुटुंबाचा गाडा चालवायची वेळ त्यांच्यावर आली. अशा अवघड परिस्थतीतही त्यांनी मोलमजुरी आणि सुईन म्हणून काम करून कुटुंबाचा गाडा हाकला.

शिक्षणापासून वंचित राहिल्याची खंत बाईंना कायम राहिली. पण त्याची चिंता कधी त्यांनी केली नाही. प्रसूती करण्यात आजींचा हातखंडा आहे. परिसरातील गावांतून रात्री अपरात्री त्यांना बोलावणे आले तरी त्यांनी कधी कंटाळा केला नाही. प्रसूतीसाठी अडकलेली महिला मोकळी झाली की मनाला समाधान देऊन जायचे असे त्या सांगतात. त्याकाळी चोळी-बांगडी देवून त्यांचा सन्मान केला जायचा आणि धान्यही दिले जायचे. आजींचे हे कसब पाहून सन १९७३ मध्ये दिंडोरी येथील रुग्णालयाने त्यांना प्रसूती करण्याचे प्रशिक्षण दिले, ओळखपत्र दिले. तेव्हापासून त्यांनी सन २०१० पर्यंत दोन हजार पेक्षा अधिक प्रसूती केल्या आहेत.

९७ वय असलेल्या आजी आजही ठणठणीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाशिकला आले होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी त्या बैलगाडीने गेल्या होत्या. आजींनी तीन मुलांना शिकवले. त्यांचा संपूर्ण परिवार सुशिक्षित आहे. आज वयोमानामुळे त्या हे काम करू शकत नाही. पण त्यांचा अनुभव या क्षेत्रातल्या एखाद्या तज्ज्ञापेक्षाही लाखमोलाचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांना दणका

$
0
0

शहर पोलिसांकडून ५२ जणांवर कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी मागील दोन दिवसांपासून टवाळखोरांविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. यात ५२ जणांवर मुंबई पोलिस अॅक्टमधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येते आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी विशेषत: छेडछाडीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ही कारवाई होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. ५) ठिकाणी ३२ संशयितांवर कारवाई केली होती. यानंतर बुधवारी देखील ही कारवाई सुरू ठेवण्यात आली.

भद्रकाली, इंदिरानगर, अंबड, म्हसरूळ व मुंबई नाका पोलिस ठाण्यात १९ पेक्षा जास्त संशयित टवाळखोरांवर पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हसनेन मुश्ताक शेख, इम्तियाज अली शेख, अरबाज शेख, गौस अमून शेख, शरद रमाकांत पगारे (सर्व रा. भद्रकाली), इंदिरानगर हद्दीत नवनाथ अर्जुन मोर, प्रकाश फुलसिंग पाटील, काळू संतू बेंडकुळे, सुरेश गंगाराम जाधव, मच्छिंद्रनाना बुरकुले (सर्व रा. वडाळा गाव, नाशिक), अंबड हद्दीत समाधान बबन थोरात, प्रवीण वसंत देवकर, वासुदेव चिंधा सोनवणे, विक्रम रामनाथ कराड, विष्णू उत्तम वाघ (सर्व रा. निफाड व उपेंद्रनगर, नाशिक), तर म्हसरूळ हद्दीत दीपक नामदेव कोकाटे, सोमनाथ भाऊराव बेंडकुळे, अनिल जयराम कोरडे (तिघे रा. दिंडोरी), संजय उत्तम टकनसार (पेठ रोड, पंचवटी), बाळू हिरामण धोत्रे (अश्‍वमेघनगर, पंचवटी) अशी कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

कारवाईत सातत्य राखणार

रात्री अपरात्रीपर्यंत किंवा वर्दळीच्या वेळी टवाळखोरी सुरू राहिल्यास त्याचा परिणाम रस्त्यावरील गुन्हेगारीवर होतो. विशेषत: महिला व युवतींच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. बहुतांशवेळी असे प्रकार पोलिस ठाण्यापर्यंत पोहचतच नाही. त्यामुळे ही कारवाई साततत्याने सुरू राहिल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, बुधवारी शहरातील विविध भागातील चौकाचौकात बसणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी पिटाळले. या कारवाईत ३२ पैकी तब्बल १६ जणांवर अटक करण्यात आल्याने टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. शहरात एकाच वेळी प्रथमच अशा प्रकारची कारवाई पोलिसांनी हाती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन डब्यांसह इंजिन गेले पुढे!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रेल्वे प्रवाशांच्या सेवेत वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या नव्या पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग गुरुवारी सकाळी मुंबईला जाताना कल्याणजवळ तुटल्याने तीन कोच (डबे) घेऊन इंजिन सुमारे एक किलोमीटर पुढे गेले, तर बाकीचे १८ डबे मागेच राहिले. सकाळी नऊच्या सुमारीस ही घटना घडली. त्यामुळे चाकरमान्यांना लेटमार्क पडला. तथापि, कोणतीही जीवित हानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नाशिकहून सकाळी सव्वासातला गाडी मुंबईला निघाली. दहाच्या सुमारास कल्याण स्थानकाजवळ आली असताना ठाकुर्लीजवळ दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटले. तीन डब्यांसह इंजिन सुमारे एक किलोमीटर पुढे गेले. बाकीचे १८ डबे मागेच राहिले. बाकी डब्यांचा वेग कमी होऊन गाडी थांबली. काय झाले हे पाहण्यासाठी प्रवासी रुळावर उतरले तेव्हा हा प्रकार लक्षात आला, तेव्हा प्रवाशांना धक्काच बसला. पंचवटी गाडीला २१ बोगी असून, त्यात एसी दोन, दोन एमएसटी, एक लेडीज व बाकी जनरल बोगी आहेत.

दैव बलवत्तर म्हणून...

ज्याच्यावर देवाची कृपा असते त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही, असे म्हणतात. पंचवटीचे जे प्रवासी गुरुवारी सुदैवाने वाचले त्यांना या म्हणीचा प्रत्यय आला. कपलिंग हे दोन डब्यांना जोडते. या जोडवरून एक डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी लोखंडी पट्ट्या असतात. गर्दीमुळे त्यावरही प्रवासी बसलेले असतात. फेरीवाले व प्रवासी ये-जा करीत असतात. जेथे कपलिंग तुटले तेथे प्रवासी बसले असते किंवा कोणी ये-जा करीत असते, तर प्राणाला मुकले असते. सुदैवाने तसे काही झाले नाही. तीन बोगी घेऊन इंजिन पुढे निघून गेल्याचे समजल्यावर बाकीच्या डब्यांतील प्रवाशांना घामच फुटला. हे डबे सुदैवाने रुळांवरून घसरले नाहीत. त्यामुळे रेल्वेने या गाडीची व्यवस्थित देखभाल करावी, अशी मागणी होत आहे.

--

वर्षभरात दुसरा अपघात

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे म्हणाले, की नव्या पंचवटीला वर्षभरातील असा हा दुसरा अपघात आहे. पंचवटी गेल्या मे महिन्यात नव्या स्वरुपात दाखल झाली होती. बदललेला रंग, आसनव्यवस्था, सुविधा आदी वेगळ्या स्वरुपात ही गाडी दाखल झाली. त्यानंतर काही महिन्यांनी ठाकुर्लीजवळ कपलिंग तुटून अपघात झाला होता. त्याच परिसरात गुरुवारी दुसरा अपघात झाला आहे. नवी गाडीची ब्रेक सिस्टीम व सुरक्षाव्यवस्था चांगली असल्याचा दावा केला जात असताना वर्षभरातच दुसरा अपघात कसा झाला याचा विचार रेल्वेने करावा. जुनी पंचवटी भरवशाची व आरामदायी होती. तिच्यात जागा जास्त होती. त्यामुळे रेल्वेला महसूलही चांगला मिळत होता. तीच गाडी पुन्हा सेवेत दाखल करावी.

--

तक्रारींमध्ये वाढच

पंचवटी ही इंटरसिटी ट्रेन आहे. तिला लोकल गाडीप्रमाणे विशेष दर्जा आहे. तरीही मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या दुर्लक्षामुळे पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना कायम अन्याय सहन करावा लागतो. मुंबईला जाताना व येताना गाडी हमखास लेट होते. नव्या डब्यांमुळे गाडीतून प्रवास करणे अवघड झाले आहे. जुनी पंचवटी गाडीच सेवेत आणावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे नितीन चिडे, प्रवासी दत्ताराम गोसावी, प्रकाश रहाणे, किरण बोरसे, राजेंद्र पाटील, दिलीप सातपुते, हर्षल विसपुते, गोपाळ नाईक, रामनाथ गावंडे, संदीप भगत कैलास बर्वे, रामा राठोड, तुषार भंवर, संजय शिंदे, रतन गाढवे, मिलिंद माळवे, कैलास मालुंजकर, रेल्वे प्रवासी संघटनेचे बाळासाहेब केदारे आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक मुलीला पाच हजारांची भेट!

$
0
0

शुभवार्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महापौर रंजना भानसी यांनी शहरात आजपासून जन्माला येणाऱ्या मुलीला पाच हजार रुपयांची अनोखी भेट देण्याच निर्णय घेतला आहे. स्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी तसेच मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतर्फे 'नाशिकची सुकन्या' योजना राबविण्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी बजेटच्या महासभेत केली आहे.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिकेच्या महासभेत ही घोषणा केली. या महासभेत हंगामी सभापती दिनकर पाटील यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेट महासभेला सादर केले. या बजेटमध्ये महिलांसाठी विशेष निधी व महिलांचा सन्मान व्हावा, असे उपक्रम राबविण्याच्या सूचना महिला सदस्यांनी केल्या होत्या. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महापौरांनी शहरातील महिलांना अनोखी भेट द्यावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. त्यामुळे महापौरांनीही महिला सदस्यांना खुष करण्याचा निर्णय घेतला. सात तासाच्या चर्चेअंती महापौर भानसी यांनी निर्णय देताना महापालिका हद्दीत मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी 'नाशिकची सुकन्या योजना' राबविण्याची घोषणा केली. देशातील मुलींचा जन्मदर झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारतर्फे २०१४ पासून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ही योजना राबविण्यात येत आहे. महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरुकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून नाशिकची सुकन्या योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी दिलेल्या या अनोख्या भेटीचे महिला नगरसेविकांनी जोरदार स्वागत केले आहे.

१८ वर्षांनंतर काढता येणार रक्कम

८ मार्च २०१९ पासून शहरात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे महापालिकेकडून पाच हजार रुपयांचे फिक्स डिपॉझीट केले जाणार आहे. सदरची मुलगी १८ वर्ष वयाची झाल्यानंतर त्यांना ही रक्कम काढता येणार आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येईल. त्यासाठी एक समिती स्थापन करून ती याबाबत धोरण ठरवेल. तसेच पालिकेच्या बजेटमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी भरीत तरतूद करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पहिल्या वर्षी साधारणत: पाच कोटींचा निधी उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे.

मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, या हेतूने नाशिक सुकन्या योजना राबविली जाणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही योजनेची घोषणा केली असून, पालिकेच्या या प्रयत्नांना समाजधुरीणांनीही बळ द्यावे.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवतीची छेड काढून शिवीगाळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

छेड काढल्याचा जाब विचारल्याने युवतीच्या आईस शिवीगाळ करणाऱ्या संशयिताने युवतीचा विनयभंग केला. ही घटना उपनगर परिसरातील शिखरेवाडी भागात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनिकेत वाजे, असे संशयित आरोपीचे नाव आहे. शिखरेवाडी भागात राहणारी २२ वर्षांची युवती आपल्या आईसमवेत मैदानावरून जात असतांना ही घटना घडली. संशयिताने अभद्र टिपण्णी करीत तरुणीची छेड काढली. यावेळी मायलेकींनी त्यास जाब विचारला. मात्र, संशयिताने युवतीच्या अंगावर धावून जात दमदाटी करीत या भागात फिरू देणार नाही, अशी दमबाजी केली. याच दरम्यान, त्याने युवतीचा विनयभंग केला.

अल्पवयीन युवकांनी लाख रुपये चोरले

दुकानमालकाचे लक्ष नसल्याची संधी साधत दोघा अल्पवयीन युवकांनी लाख रुपयांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना सिडकोत बुधवारी (दि. ६) दुपारी घडली. ही बाब सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून समोर आली असून, या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दोघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भुराराम खान्नुराम चौधरी (रा. पवननगर, सिडको) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. चौधरी यांचे कैलास सेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस नावाचे दुकान आहे. दोन गाळ्यांचे हे दुकान असून, त्यातील एका गाळ्यात चौधरी जेवणासाठी बसलेले असताना चोरीची घटना घडली. दोघा मुलांनी पाळत ठेवून गल्ल्यातून सुमारे एक लाख रुपयांची रोकड लांबविली. ही बाब दुकान परिसरात लावेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उघडकीस आली. पोलिस संशयित मुलाचा शोध घेत आहेत.

डावखरवाडीत चेन स्नॅचिंग

दूध घेवून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरील चोरट्यांनी तोडून नेल्याची घटना डावखरवाडी भागात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जयभवानीरोडवरील वंदना सदानंद बामणे (रा.पुप्षरंग सोसा.) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. डावखरवाडीतील गुरूमहिमा सोसायटी भागात बामणे या बुधवारी (दि. ६) सायंकाळी दूध खरेदीसाठी गेल्या होत्या. दूध घेऊन घराकडे परतत असतांना ही घटना घडली. घराकडे पायी परतत असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी ओरबाडून पोबारा केला.

चार जुगारी गजाआड

झाडाखाली उघड्यावर मटका जुगार खेळणाऱ्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयित नाशिकरोड येथील राजेंद्र कॉलनी भागात जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजी पुतळा भागातील राजेंद्र कॉलनी येथे पिंपळाच्या झाडाखाली काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (दि. ६) सायंकाळी छापा मारला. यावेळी राजू पवार व त्याचे तीन साथिदार पोलिसांना सापडले. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस शिपाई निखील वाघमारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडला बस पलटी होऊन प्रवाशी जखमी

$
0
0

चांदवड : मालेगाव आगाराच्या मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या बसला रेणुका देवी मंदिराजवळील वळणावर अपघात झाला. बस क्रमांक (क्र एम एच ४०, वाय ५९८६) च्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गाडीत बसलेल्या एका प्रवाशाने प्रसंगावधान ओळखून वेगात असलेली बस थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बस पलटी होऊन बसमधील २५ शाळेतील विद्यार्थी व ५ पाच प्रवाशांना दुखापत झाली आहे. बसमधील सर्व प्रवाशी हे सौदाणे, उमराणा, मालेगाव तालुक्यातील आहेत.

हा अपघात आज सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी झाला. अपघातग्रस्तांना तात्काळ चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई..., स्त्री जन्म घेऊन काय गुन्हा मी केला?

$
0
0

महिला दिनाच्या दिवशीच मातेने सोडले स्वतःच्या चिमुकलीला वाऱ्यावर

....

म. टा. वृत्तसेवा इंदिरानगर

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सन्मानासाठी शहरात एकीकडे शेकडो कार्यक्रम होत असताना पांडवलेणीच्या पायथ्याशी मात्र एक माता आपल्या चिमुकलीला सोडून निघून गेल्याची धक्‍कादायक घटना शुक्रवारी घडली. महिलांचा आत्मसन्मान करण्याबरोबरच 'बेटी बचाव' या धोरणाची जनजागृती होत असतानाच अशा प्रकारे एक दिवसाच्या स्त्री अर्भकाला वाऱ्यावर सोडून जाण्याच्या प्रकाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे.

जागतिक महिला दिन असल्याने शुक्रवारी (दि. ८) सकाळपासून महिलांसाठी शहरात विविध कार्यक्रम सुरू होते. मात्र पांडवलेणीच्या पायथ्याशी वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले. पांडवलेणीच्या पायथ्याशी सचिन दत्तात्रेय घुगे यांची चहाची टपरी आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास घुगे हे टपरीजवळ बसलेले असताना त्यांना अचानकपणे लहान बालकाचा रडण्याचा आवाज आला. त्यामुळे उत्सुकतेने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले, तर या ठिकाणी एका पांढऱ्या कपड्याच्या पिशवीत स्त्री जातीचे अर्भक असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी तातडीने आजूबाजूच्या नागरिकांना बोलावून या बाळाच्या पालकांचा शोध घेण्याची विनंती केली. नागरिकांना शोध घेतला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस याबाबत इंदिरानगर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांना बाळास ताब्यात घेऊन दवाखान्यात दाखल केले. हा प्रकार अनैतिक संबंधातील आहे की, मुलीच्या जन्मावरून वाद झाल्याने हा प्रकार घडला याबाबत परिसरात चर्चा सुरू होती. पोलिसांनी घुगे यांच्या फिर्यादीवरून बेवारस सोडून जाणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या बाळाच्या पालकांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

....

दुपारी एका बंद पिशवीतून बालकाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने पाहिले तर त्या पिशवीत अर्भक आढळून आले. तातडीने परिसरातील नागरिक व महिलांना बोलाविले. बाळ खूपच रडत असल्याने काही महिलांनी त्याला सावलीत नेऊन पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पालक कोणी दिसूनच येत नसल्याने अखेरीस पोलिसांना याची माहिती दिली.

- सचिन घुगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांसमोर कानउघाडणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आडगाव पोलिसांनी शुक्रवारी टवाळखोरांची धरपकड केली. त्यांना ताब्यात घेऊन पालकांसमक्ष समज देऊन सोडून देण्यात आले. पुन्हा टवाळखोरी करताना दिसल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

पंचवटी महाविद्यालयात बाहेरील तरुणांचा वावर वाढला आहे. त्याचा त्रास महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होतो. ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी तब्बल ३५ युवक-युवतींना ताब्यात घेतले. त्यांना आडगाव पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष बोलावून त्यांना आणि पाल्यांना समज देण्यात आली. जे पालक येऊ शकले नाहीत त्यांच्याशी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी फोनवरून संपर्क साधत आपले पाल्य काय करतात, याची कल्पना दिली. पुन्हा अशी टवाळखोरी करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

प्रेमीयुगलांना समज

तपोवनातील रामसृष्टी उद्यान हे गेली कित्येक वर्षांपासून प्रेमीयुगलांचा अड्डा बनले आहे. या उद्यानात ठिकठिकाणी बसणाऱ्या प्रेमी युगलांमुळे पर्यटक फिरकत नाहीत. या उद्यानातही पोलिसांनी शुक्रवारी दुपारी काही प्रेमीयुगलांना ताब्यात घेतले. पोलिस उद्यानात पाहणी करीत असल्याचे बघून काहींनी पळ काढला तर काही उद्यानात जाणेच टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांवर संक्रात

$
0
0

शहरात पोलिसांकडून ५१ जणांवर कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी टवाळखोरांविरोधातील कारवाई कायम आहे. यात शंभरहून अधिक व्यक्तींवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार वेगवेगळी कारवाई करण्यात आली. कारवाईच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी शहरातील विविध भागात ५१ जणांविरुद्ध कारवाई झाली. त्यात भद्रकाली पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली.

अंबड पोलिस ठाण्याचे हवालदार विजय शिंपी यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार स्टेट बँक चौक परिसरात बुधवारी (दि. ६) रात्री दहा ते बारा इसमांनी बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवून जमाव बंदी आदेशाचे उलंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सर्व आरोपी अज्ञात आहेत. आडगाव पोलिस ठाणे हद्दीत पंचवटी कॉलेजसमोर रात्री अकरा वाजेच्या सुमारास भगवान टोचे, पंकज शिंदे, ऋषिकेश साळवे, श्वेतांबर जोशी आणि अभिजीत बोराडे या पाच तरुणांनी जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी पोलिस नाईक अनिल केदारे यांनी तक्रार दाखल केली आहे.

इंदिरानगर पोलिसांनी पाथर्डी रोडवरील हॉटेल रायबासमोर रस्त्यावर थांबलेल्या संतोष पवार, गणेश माळी, गजानन वाघमारे, हरी कोकाटे, संतोष कडाळे, जनार्दन खंदारे या सहा जणांना अटक केली. गंगापूर पोलिसांनी ध्रुवनगर बस थांबा परिसरात गौरव चौधरी, रवींद्र मटाले, योगेश गुंबाडे, पवन गवई सुधाकर वाठोरे यांना जमावबंदी आदेशाचे भंग केल्याबद्दल अटक करून जामिनावर मुक्त केले.

सातपूर, स्वारबाबानगर येथील पवन पवार, देवानंद काळे, अविनाश शिंदे, अमिन शेख, हेमंत सोनवणे, कमलेश जाधव, इस्माईल शेख, निलेश जाधव यांच्यासह पन्नास ते साठ जणांविरूद्द सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी हाती सापडलेल्या सहा जणांना अटक करून त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

भद्रकालीत मोठी कारवाई

भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत गंजमाळ, कोमलकुशन आणि तलावडी अशा ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. शालिमार येथील नेपाळी कॉर्नर परिसरात भद्रकाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत जितेश वाघेला, दिपक अग्रवाल, संदिप जाधव, इम्रान खान, सागर वाघेला, ताहेर बेग या सहा जणांना समज देऊन सोडण्यात आले. खडकाळी सिग्नलजवळ जमावबंदी आदेशाचे भंग करणारे गोपी आचारी, मुझेफ्फर कुरेशी, वसीम बंजारी, सलीम खान, अबीद हुसेन या पाच जणांना अटक केली. कोमल कुशन समोर जमलेल्या मोजेस लांडगे, विशाल चिलवंते, दीपक जोंधळे, सुधाकर जाधव, आनंद जाधव, अमिर शेख, सनी वारे या सात जणांना अटक केली. तलावडी परिसरात बाळासाहेब पाईकराव, विशाल सदन, रवी वाळे, जलीश ठाकूर, नंदू क्षिरसागर यांच्यावर तर दुसऱ्या घटनेत याच भागातील इरफान पठाण, जय लभडे, दिपक तोकडे, श्यामसिंग चव्हाण, कल्लू चव्हाण, नागराव पिंगळे या सहा जणांवर कारवाई झाली. यातील काही संशयितांना जामीन मंजूर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images