Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तात्पुरती यादी म्हणजे नियुक्ती नव्हे

0
0

राज्य गुप्तवार्ता विभागाची ताकीद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य गुप्तवार्ता विभागात अधिकारी पदाच्या २०३ जागांसाठी घेण्यात आलेल्या शारीरिक पात्रता चाचणी नंतर तात्पुरती नियुक्तीसाठीची निवड यादी जाहीर झाली आहे. असे असले तरी, तात्पुरत्या निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून अधिकारी पदावर नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला, असे समजू नये, अशी सक्त ताकीद राज्य गुप्तवार्ता विभागाने उमेदवारांना दिली आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागात 'गट - क' अंतर्गत सहायक गुप्तवार्ता अधिकारी पदाच्या २०३ जागांसाठी भरती राबविण्यात येत असून, त्याची लेखी परीक्षा २०१८ मध्ये घेण्यात आली. या लेखी परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार २७९ उमेदवारांना शारीरिक पात्रता चाचणी व कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय, विशेष सुरक्षा विभाग, दादर येथे ९ जानेवारी २०१९ रोजी उमेदवारांची शारीरिक पात्रता चाचणी व कागदपत्र तपासणी झाली. या चाचणीसाठी अनुपस्थित राहिलेले उमेदवार भरतीप्रक्रियेत अपात्र ठरले. चाचणीच्या गुणवत्ता यादीनुसार तसेच कागदपत्रांची पूर्तता केलेल्या उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार करण्यात आला आहे. त्यानुसार २०३ उमेदवारांची तात्पुरती नियुक्ती यादी जाहीर केली असून, १०६ उमेदवार प्रतिक्षेत आहेत. मात्र, तात्पुरत्या यादीनुसार अधिकारी पदाचा हक्क मिळाला, असे समजू नये. काही तांत्रिक प्रक्रियेनंतर अंतिम यादी जाहीर होईल. त्यात नावे आलेल्या उमेदवारांना विभागातर्फे नियुक्ती पत्र दिले जाईल, अशी सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने केली आहे. www.mahapolice.gov.in या वेबसाइटवर उमेदवारांनी तात्पुरती नियुक्ती यादी पहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

\Bतर नोकरीसंधी जाणार

\Bतात्पुरत्या नियुक्ती यादीतील २०३ उमेदवारांची फेरतपासणी केली जाईल. त्या अंतर्गत उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणी केली जाईल. तपासणी व पडताळणीनंतरचे अहवाल, उमेदवारांनी अर्जात भरलेली माहितीची सत्यता पडताळणी होईल. एखाद्या उमेदवाराने खोटी माहिती सादर केली अथ‌वा वैद्यकीय तपासणीत व चारित्र्य पडताळणीत उमेदवार अपात्र ठरल्यास त्या उमेदवाराची नियुक्ती रद्द केली जाईल. त्या जागेवर प्रतिक्षा यादीतील उमेदवाराचा विचार होईल, असे राज्य गुप्तवार्ता विभागाने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदारांना कळणार उमेदवाराचे चारित्र्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करावी लागणार आहे. तसे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून, यामुळे नागरिकांना उमेदवारांचे चारित्र्य पडताळता येणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून, जिल्हा प्रशासनाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी याबाबत सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रशांत पाटील आदी या वेळी उपस्थित होते. राधाकृष्णन बी. म्हणाले, की नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणांसोबत बैठकी घेऊन आढावा घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांबाबत आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास येत असेल तर त्याची माहिती नागरिकांनी तत्काळ जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला द्यावी. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम व तत्सम यंत्रसामग्री उपलब्ध झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. व्यक्ती किंवा पक्षाचा प्रचार होईल असे फ्लेक्स, बॅनर काढण्यास सुरुवात झाली असून, पदाधिकाऱ्यांची वाहनेदेखील जमा करून घेतल्याचे या वेळी सांगण्यात आले.

आचारसंहिताभंगावर करा तक्रार

निवडणुकीशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी शाखेने १९५० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला असून, त्यावर निवडणुकीशी संबंधित माहिती, तसेच शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. याशिवाय आचारसंहिताभंगाची तक्रारही या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नागरिक करू शकणार आहेत. 'सिविजिल अॅप'वरही पुराव्यानिशी याबाबत तक्रार करता येणार आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्याची, तसेच त्याने केलेल्या तक्रारीवर कोणती पाऊले उचलण्यात आली, याची माहिती एसएमएसद्वारे संबंधित तक्रारदाराला देण्यात येणार आहे.

मतदार नोंदणी ३० मार्चपर्यंत

ज्यांची नावे मतदार यादीमध्ये नाहीत, त्यांना अजूनही मतदार नोंदणीची संधी असणार आहे. ही मतदार नोंदणी ३० मार्चपर्यंत करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी अर्ज भरता येऊ शकतो. याव्यतिरिक्त मतदार नोंदणी कार्यालयात संपर्क साधून मतदार नोंदणी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे त्यास जोडल्यास मतदार नोंदणी होऊ शकेल. नवमतदारांची नावे पुरवणी मतदार यादीत घेतली जाणार असून, त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख : २ एप्रिल २०१९

नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत : ९ एप्रिल २०१९

नामनिर्देशन पत्राची छाननी : १० एप्रिल २०१९

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : १२ एप्रिल २०१९

मतदान : २९ एप्रिल २०१९

मतमोजणी : २३ मे २०१९

निवडणूकप्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : २७ मे २०१९

- आचारसंहिताभंगाच्या तक्रारींसाठी सिविजिल अॅप दोन दिवसांत होणार कार्यान्वित

- सुगम अॅपद्वारे घेता येणार जाहीर सभेची परवानगी

- निवडक मतदार केंद्रांचे होणार वेबकास्टिंग

- निवडणुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

- सुविधा, सुगम, पीडब्लूडी, सीविजिल यांसारख्या ॲपचा प्रथमच वापर

- मतदानासाठी १०,५०२ बॅलट युनिट, ६,२१५ कंट्रोल युनिट आणि ६,४८९ व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त

- निवडणुकीशी संबंधित सर्व वाहनांवर जीपीएस प्रणाली

- प्रत्येक मतदान केंद्रावर १४०० पेक्षा कमी मतदार

- निवडणूक खर्च, दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र निवडणूक निरीक्षक

- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने ताब्यात.

- निवडणूक काळातील दूरध्वनीची बिलेदेखील अदा न करण्याच्या सूचना.

- उमेदवारांना सोशल मीडिया अकौंटची माहिती द्यावी लागणार.

४,४४६ मतदान केंद्रे

२३,३२,५९० पुरुष मतदार

२१,१२,८८३ महिला मतदार

०७ अनिवासी भारतीय मतदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाची आरोग्य भरती संशयास्पद?

0
0

उमेदवार डॉ. बोरसे यांचे ठिय्या आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या आरोग्य विभागातील सेवा दर्जा सुधाराव्यात यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश भामरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आरोग्य विभागातील २२ पदांसाठी पालिकेकडून जाहिरात देण्यात आली होती. यासाठी डॉ. सचिन बोरसे यांनी देखील अर्ज केला होता. मात्र ही पदभरती प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप डॉ. सचिन बोरसे यांनी केला असून सोमवारी त्यांनी पालिकेत ठिय्या मांडला होता.

पलिकेकडून जुलै २०१८ मध्ये आरोग्य विभागातील २२ पदांसाठी विशेष सरळ सेवा भरतीची जाहिरात देण्यात आली होती. यासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र भरती प्रक्रियेस पालिका प्रशासनाकडून विलंब झाल्याने न्यायालयाने फटकारले होते. अखेर जानेवारी २०१९ मध्ये थेट मुलाखती घेण्यासाठी उमेदवारांना पत्र पाठवण्यात आले होते. असे पत्र डॉ. सचिन बोरसे यांना देखील प्राप्त झाले होते.

मात्र बोरसे यांनी या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून, सर्वच प्रकार संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा का घेण्यात आली नाही, मुलाखती दरम्यान समाज कल्याण अधिकारी देखील नव्हते. तसेच पालिकेने मुलाखती नंतर थेट ८ मार्च शुक्रवारी रोजी निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र दिलीत तसेच शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाच त्यांना रुजू का करून घेतले? असा आक्षेप घेत ही निवड प्रक्रिया संशयाचा भोवऱ्यात सापडली आहे. सोमवारी डॉ सचिन बोरसे यांनी याबाबत निवड झालेल्या उमेदवारांची यादी पालिका प्रशासनाकडे मागितली त्यावेळी त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर त्यांनी आयुक्त कार्यालय बाहेर ठिय्या मांडला. सायंकाळी उशिरा उपायुक्त नितीन कापडणीस यांची देखील त्यांनी भेट घेतली. मात्र उशिरापर्यंत बोरसे यांना याद्या मिळाल्या नाहीत. या भरती प्रक्रियेची चौकशी झाल्यास संशयास्पद प्रकार समोर येईल असे बोरसे यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचिंग प्रकरणी १५० जणांची तपासणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागील १० दिवसात दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने क्राइम ब्रँचने संशयितांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. यासाठी तब्बल १५० संशयितांना चौकशीसाठी रडारवर घेतले आहे. त्यांचा शोध सुरू झाला असून, जेलमधून जामिनावर सुटलेल्या इराणींकडे सुद्धा लक्ष देण्यात येत आहे.

शहर पोलिसांनी मागील दोन वर्षात चेन स्नॅचर्सला वठणीवर आणण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. अगदी परराज्यातील कनेक्शन उघड करीत पोलिसांनी अनेक गँग कोठडीत डांबल्यात. स्थानिक आणि इराणी टोळ्य वठणीवर आल्याने चेन स्नॅचिंगचा आलेख वर्षागणिक उरत गेला. शहरात २०१६ या वर्षात ११८ चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. २०१७ हे प्रमाण घटून १०२ इतके झाले होते. यानंतर चेन स्नॅचर्सने नाशिक शहराकडे पाठ फिरवली. त्यामुळे २०१८मध्ये ७७ घटना झाल्या. या वर्षात चेन स्नॅचिंगला जणू ब्रेकच लागला होता. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक एक घटना झाली. इतर शहराच्या तुलनेत हे प्रमाण फारच चांगले ठरते. मात्र, मार्च महिन्यातील पहिल्या १० दिवसातच दोन घटना घडल्या. या चारही घटनांमागे एकच टोळी आहे की नवीन गुन्हेगार हात साफ करीत आहेत, याचा तपास पोलिस करीत आहे.

याबाबत गुन्हे शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले, की चेन स्नॅचिंगच्या घटना घडू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही १५० संशयितांची यादी तयार केली. हे संशयित सातत्याने चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अटक झालेले आहेत. क्राइम ब्रँचचे एक पथक सातत्याने या गुन्हेगारांचा मागोवा घेत आहेत. या वर्षातील चार घटनांमध्ये या १५० पैकी कोणाचा हात आहे की नवीन गुन्हेगार आले आहेत, हे सध्या वेगवेगळ्या मार्गाने शोधले जात आहे.

चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात इराणी टोळ्यांचा समावेश असतो. यातील काही संशयित जामीनावर असून, ते सध्या कोठे आणि काय करताहेत याचाही तपास सुरू आहे. चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न सुरू असून, या घटना रोखण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी.

- पौर्णिमा चौगुले, उपायुक्त, गुन्हे शाखा

जेलरोडला चेनस्नॅचिंग

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ६३ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेल्याची घटना जेलरोडच्या शिवाजीनगर भागात घडली. या प्रकरणी रंजना कौतिक देवरे (५०, रा. चिनार सोसायटी, इच्छामणीनगर, जेलरोड) यांनी फिर्याद दिली. रंजना देवरे रविवारी (दि. १०) दुपारी माऊली कॉलनीतील धारबळे मळा येथून जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने रंजना देवरे यांच्या गळ्यातील ६३ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने तोडून नेले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजल्याने वृद्धाचा मृत्यू

0
0

नाशिक : शेकोटीवर शेकत असतांना तोल जावून पडल्याने ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना माळेगाव पठार (ता. संगमनेर) येथे घडली. या प्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

भास्कर विश्वनाथ भोर (८५) असे भाजल्याने मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. भोर हे रविवारी (दि. १०) सकाळी शेकटीजवळ बसलेले असतांना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने ते शेकोटीत पडले होते. या घटनेत ते ४४ टक्के भाजल्याने रवींद्र मोरे यांनी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

अतिमद्य सेवनाने तरुणाचा मृत्यू

नाशिक : अति मद्यसेवन केल्याने आगरटाकळी भागात राहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रफुल्ल जाधव (३०, रा. भीमशक्तीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रफुल्ल याला दारुचे व्यसन होते. गेल्या तीन चार दिवसांपासून जेवण न करता मद्याच्या नशेत राहिल्याने ही घटना घडली. प्रफुल्ल यास रविवारी (दि. १०) अचानक अशक्यपणा जाणवू लागल्याने परिसरातील हिरामण पवार यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवारी (दि. ११) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेकडून जमिनीचा लिलाव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याकरीता थकबाकी वसुलीसाठी बँकेकडून कठोर पावले उचलण्यात आले असून थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीला सुरुवात झाली आहे.

थकबाकी वसुलीसाठी बँकेच्या वतीने वडगाव गिरणारे आदिवासी संस्थेचे सभासद खंडेराव भागूजी कातड (पाटील) यांची जमीन जप्त करून त्यावर बँकेचे नाव लावण्यात आले होते. परंतु, सात दिवसात त्यांनी थकबाकी भरली नसल्याने आता थेट त्यांची नाईकवाडी येथील जमीन लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या ११ एप्रिल रोजी त्यांच्या जमिनीचा थकबाकी वसुलसाठी जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. दरम्यान, बँकेकडून जवळपास ७० थकबाकीदार सभापसदांची जमीन लिलावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यांच्याही जमिनीचा लिलाव लवकरच केला जाणार आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा ३१ मार्चपर्यंत करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मंजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मंजुरी मिळाल्याने आयटीआय संघटनांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीपीपी योजनेंतर्गत संस्था व्यवस्थापन समितीच्या कोट्यातील जागांवर आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. परिणामी राज्यातील अंदाजे ५५ हजार ४७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याची माहिती खासगी आयटीआय संघटनेचे राज्य अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी दिली.

संघटनेच्या दोन प्रमुख मागण्यांपैकी एक महत्त्वाची मागणी सरकारने पूर्ण करताना समन्वय साधल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. या व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस २०१९-२० या सत्रापासून या शैक्षणिक सत्रापासून मान्यता देण्यात आली. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अभ्यासक्रमांच्या शासकीय व पीपीपी योजनेंतर्गंत जागांसाठी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गंत प्रवेशासाठी उपलब्ध जागांवर व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती दिली जाणार आहे.

या योजनेंतर्गंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाने प्रशिक्षण शुल्काइतकी प्रतिपूर्ती दिली जाईल. सामाजिकदृष्टया मागास व आर्थिक दृष्टया दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक क्षमतेअभावी व्यावसायिक कौशल्यापासून वंचित रहाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना प्रशिक्षण सत्र २०१९-२० पासून लागू करण्यात येणार आहे. २०१९-२० पासून सुमारे ५५ हजार ४७८ विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. सुमारे ६० हजारावर विद्यार्थ्यांसह ७ हजार सेवकांनाही याचा लाभ होईल. आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाचा प्रश्नही मार्गी लावावा.

\B- संजय बोरस्ते,

अध्यक्ष, खासगी आयटीआय संघटना \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक वाद; हत्येचा प्रयत्न

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद कॅनॉलजवळ असलेल्या तुळजाभवानीनगर येथून जाणाऱ्या एका व्यक्तीला कौटुंबिक कारणावरून रस्त्यात अडवून चौघा संशयित आरोपींनी डोक्यात लोखंडी रॉड तसेच लाठ्या काठ्यांनी मारहाण करत जखमी करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी (दि. ११) उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेत जुना गंगापूर नाका येथील लक्ष्मी विलास अपार्टमेंट मध्ये राहणारे संदीप सखाराम लहामगे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहेत.

याबाबत माहिती अशी, की लहामगे व मुर्तडक हे एकमेकांचे नातेवाईक आहे. लहामगे सोमवारी दुपारी पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार बाजार समितीत भावाला मोबाइल देण्यासाठी तुळजाभवानीनगर गॅलक्सी अपार्टमेंट रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या संशयित आरोपी नितीन रामदास मुर्तडक, चेतन रामदास मुर्तडक, रामदास पुंजाजी मुर्तडक व अंबादास पुंजाजी मुर्तडक आदींनी कौटुंबिक कारणावरून कुरापत काढून लहामगे यांना शिवीगाळ करून हातातील लोखंडी रॉड डोक्यावर मारला या घटनेत लहामगे गंभीर जखमी झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागा कमी; अर्ज अधिक

0
0

\B'शिक्षण हक्क'साठी पालकांची लगीनघाई

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणहक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेशांसाठी ५ मार्चपासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ सहा दिवसांमध्ये उपलब्ध जागांपेक्षाही जास्त अर्ज या प्रवेशांसाठी नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ जागा असून त्यासाठी ५ हजार ९८४ अर्ज सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले. २२ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास मुदत असून या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

शिक्षणहक्क प्रक्रियेबाबत जनजागृती आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना या प्रक्रियेतून चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळत असल्याने अर्जप्रक्रियेवर पालक लक्ष ठेवून असतात. यंदाही पालक प्रक्रिया सुरू होण्याची फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच वाट बघत होते. अखेरीस, ५ मार्च रोजी अर्जप्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. सहाच दिवसात जिल्ह्यात ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ जागांसाठी ५ हजार ९८४ अर्ज सोमवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाले. राज्यभरात या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहे. १६ हजार ६१९ जागांसाठी २५ हजार १२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर नागपूर येथे ७ हजार २०४ जागांसाठी १४ हजार ४६० अर्ज म्हणजेच उपलब्ध जागेच्या दुप्पट प्राप्त झाले आहेत.

\Bअर्ज भरण्यास अडचणी \B

अर्जप्रक्रियेस मिळत असलेला प्रतिसाद चांगला असला तरी काही पालकांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. नोंदणी करताना व नोंदणी झाल्यानंतर अतिरिक्त माहिती भरताना अडचणी येत असून यामुळे पालक वैतागले आहेत. हा अर्ज भरणारे पालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून तंत्रज्ञानाविषयी माहिती नसल्याने सायबर कॅफेवर अवलंबून असतात. तेथे जाऊनही वेबसाइटमधील त्रुटींमुळे अडचणी येत असल्याने पालक निराश होत असल्याचे सायबर कॅफे चालकांकडून सांगण्यात येत आहे.

लोगो : शाळा-कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांना ‘ब्रेक’

0
0

आचारसंहितेमुळे स्मार्ट सिटीतील प्रकल्प लांबणीवर

...

- महापालिकेचे बजेटही अडकले कात्रीत

- शहर बससेवा, स्मार्ट लायटिंग, गोदा प्रोजेक्टला फटका

- कार्यारंभ आदेश निघूनही काम न सुरू झाल्याने पंचाईत

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीसह महापालिकेच्या अखत्यारितील महत्त्वपूर्ण विकासकामे ही निविदा आणि कार्यारंभ आदेशाच्या टप्प्यात आले असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता ही कामेही लटकली आहेत. शहर बससेवा, स्मार्ट लायटिंग, गावठाण विकास या कामांसह पालिकेने नुकताच उद्घाटनाचा बार उडविलेल्या जवळपास ८० कोटींच्या कामांचा त्यात समावेश आहे. तसेच, महापालिकेच्या बजेटमधील योजनांचीही अंमलबजावणी रखडणार आहे. त्यामुळे शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांवर आचारसंहितेचा मोठा परिणाम होणार असून, संबंधित प्रकल्पांचा प्रवास लांबणीवर पडला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच रविवारपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली. या आचारसंहितेची कडेकोट अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश, निविदा प्रक्रियेतील तसेच भूमिपूजन झालेल्या कामांची यादी महापालिकेकडून मागविण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेत सोमवारी दिवसभर कामांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. एखाद्या कामाला कार्यारंभ आदेश दिला असेल परंतु, काम सुरू झाले नसेल तरी ते काम थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी पालिकेतील सर्व विभागप्रमुखांना रजिस्टर थांबविण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या वतीने संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविलेल्या अहवालातून पालिकेच्या महत्त्वाच्या कामांना ब्रेक लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ऐन मंजुरीच्या टप्प्यात असलेल्या स्मार्ट सिटीतील कामांसह पालिकेतील कामांना त्याचा फटका बसणार आहे. शहरात ९२ हजार एलईडी दिवे लावण्याच्या कामांची निविदा मंजूर झाली आहे. परंतु, काम सुरू न झाल्याने आता हे काम थांबणार आहे. शहर बससेवेची निविदा काढण्यात आली आहे. गावठाण विकास व प्रोजेक्‍ट गोदाच्या कामांनाही ब्रेक लागला आहे.

...

महत्त्वाची कामेही रखडणार

गेल्या आठवड्यात भूमिपूजन करण्यात आलेल्या भाभानगर येथील महिला रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव, अनंत कान्हेरे मैदानावर सुविधा पुरविणे, त्र्यंबक नाका ते सावरकर जलतरण तलाव दरम्यान स्मार्ट रस्ता तयार करणे आदी महत्त्वाची कामे रखडणार आहेत. नगरसेवकांचीही जवळपास ४० कोटींची कामे रखडणार आहेत. मुकणे धरणातून थेट पाइपलाइन योजनेचे काम पूर्णत्वास आले असून, सध्या पाण्याची चाचणी सुरू आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन समारंभ घेता येणार नसल्याने राजकीय महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी लागणार आहे.

...

बजेटच्या योजना अडकल्या

आचारसंहितेमुळे महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेटही कात्रीत अडकले आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, खेडे विकासासाठी तरतूद तसेच नियमित करदात्यांसाठी अपघात विमा योजना, मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी नाशिकची 'सुकन्या' योजना आणि पंचवटीच्या धर्तीवर उर्वरित पाचही विभागांत महिला उद्योग भवन साकारण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला होता. तसेच, नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी देणे, सुकन्या योजना सुद्धा आता आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. बजेटचा महासभेचा ठराव प्रशासनाला प्राप्त न झाल्यामुळे या सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी आचारसंहिता संपुष्टात येण्याची वाट बघावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य दलांतील करिअरबाबत मार्गदर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड देशाच्या संरक्षण दलांत करिअरचे अनेक युवकांचे स्वप्न असते. मात्र, या संरक्षण दलांत प्रवेशासाठीच्या पात्रता आणि निकष याविषयी पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती नसते. त्याविषयी वेळीच जाणून घेतल्यास संरक्षण दलांत करिअरचे ध्येय प्राप्त करता येऊ शकते, असे मत हवाई दलात कार्यरत एअरमन एम. ब्रिजमोहन यांनी व्यक्त केले. देशाच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या संरक्षण दलांत करिअर करू इच्छिणाऱ्या शहरातील युवकांसाठी अशोक स्तंभ येथील गुरुकुल फाउंडेशतर्फे रविवारी एम. ब्रिजमोहन यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, भारतीय नौदल प्रबोधिनी, भारतीय हवाई प्रबोधिनी, भारतीय सैनिकी महाविद्यालय प्रवेश परीक्षा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, मुलाखतीचे स्वरूप, वैद्यकीय चाचणी परीक्षा आदींबाबत सविस्तर माहिती दिली. याशिवाय सैनिक म्हणून भरती होण्यासाठीच्या पात्रतांबद्दलही माहिती दिली. तांत्रिक, प्रशासन, सिग्नलिंग अशा विविध विभागांतील पदे आणि त्यासाठीच्या पात्रतांविषयी माहिती दिली. सीडीएस, एसएसबी, ओटीए याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या शंकांचेही समाधान त्यांनी केले. या व्याख्यानास गुरुकुल फाउंडेशनचे अमोल ताके, सुनील शेळके, भूषण दळवी आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रदान समारंभ

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड उद्योग क्षेत्रास आवश्यक असणारी विविध कौशल्ये आणि तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण संस्थांनी उद्योग क्षेत्राशी समन्वय साधला पाहिजे, असे मत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी व्यक्त केले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांच्या पदविका प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. केवळ शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यात विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची व्यावसायिक शिक्षण संस्थांची भूमिका असता कामा नये. त्यापुढे जाऊन या विद्यार्थ्यांत प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि तंत्रज्ञान शिकविण्याची जबाबदारीही व्यावसायिक शिक्षण संस्थांनी उचलली पाहिजे. त्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांत समन्वय ही काळाची गरज असल्याचे प्रा. वायुनंदन यांनी सांगितले. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योग क्षेत्र बळकट होणे आवश्यक आहे. या उद्योग क्षेत्राला आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशातच विकसित व्हावे, यासाठी कुशल तंत्रज्ञ निर्माण करण्याची जबाबदारी व्यावसायिक शिक्षण संस्थांपुढे असल्याचे मत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अभय वाघ यांनी व्यक्त केले. त्यासाठी आपल्या उद्योग क्षेत्रापुढील आव्हानांचा विचार करून सध्याच्या अभ्यासक्रमात काळानुरूप बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्राचार्य ज्ञानदेव नाठे, नियामक मंडळाचे सदस्य अशोक कटारिया, संतोष मुथा, सुरेश वाघ, किशोर पाटील, प्रा. एफ. ए. खान आदी उपस्थित होते. प्राचार्य ज्ञानदेव नाठे यांनी प्रास्ताविक केले. परीक्षा नियंत्रक प्रा. गिरीश वानखेडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. प्रा. नितीन ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन लाख रुपयांची जेलरोडला घरफोडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुलीच्या लग्नासाठी मंगल कार्यालयात गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरट्यांनी तब्बल २ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना रविवारी (दि. १०) रात्री जेलरोडला घडली.

जेलरोड, पंचक शिवारातील जागृतीनगरमधील दीपलक्ष्मी अपार्टमेंटमधील दत्तात्रय फकिरा धात्रक यांच्या घरी चोरी झाली. धात्रक हे एका शिक्षणसंस्थेचे संचालक आहेत. त्यांची कन्या कीर्ती हिचे रविवारी (दि. १०) सायंकाळी नाशिक औरंगाबाद रोडवरील एम्पायर गार्डन येथे लग्न होते. त्यामुळे धात्रक कुटुंबीय विवाहस्थळी गेले होते. विवाहाला जातांना घराला कुलूप लावलेले होते. रात्री अकरा वाजता धात्रक यांनी घर सांभाळण्यासाठी शाळेतील शिक्षक राहुल सानप आणि शिपाई दौलत देवरे यांना पंचक येथे पाठवले. ते दोघे जण घरी पोचले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळून आले. चोरट्यांनी घरातील कपाटात असलेल्या कोटच्या खिशातील चावीने लॉकर उघडून २ लाख ८३ हजाराचे सोने-चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दत्तात्रय धात्रक यांच्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौशी राज्य नाट्यस्पर्धेत नाशिकचा ठसा

0
0

लक्ष्मी गाडेकर-पिंपळे, दीप्ती चंद्रात्रे यांना रौप्यपदक

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने आयोजित ५८ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत फोंडा येथील हंस संगीत नाट्य मंडळ‌ाच्या अव्याहत नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत नाशिकमधून सहभागी झालेल्या 'तिरथ में तो सब पानी' है या नाटकासाठी लक्ष्मी गाडेकर-पिंपळे व विसर्जन नाटकासाठी दीप्ती चंद्रात्रे यांना रौप्यपदक जाहीर झाले आहे.

या स्पर्धेत परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेच्या 'ऱ्हासपर्व' या नाटकाला द्वितीय पारितेषिक आणि नगर अर्बन बँक स्टाफ कला व क्रीडा मंडळ अहमदनगर या संस्थेच्या 'द ग्रेट एक्सेंज' या नाटकाला तृतिय पारितोषिक जाहीर झाले आहे. त्याचप्रमाणे नाशिकचे प्रकाश योजनाकार राहुल गायकवाड यांना 'विर्सजन' नाटकासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

नाशिक येथे झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत 'तिरथ में तो सब पानी है' या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. तर 'विसर्जन' नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. या नाटकाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले होते.

अंतिम नाट्य स्पर्धा १५ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली आणि बालगंर्धव नाट्यमंदिर सांगली येथे झाल्या. या स्पर्धेत ३९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रमेश थोरात डॉ. दयानंद नाईक, वसंत दातार, अरुण पटवर्धन, विनीता पिंपळखरे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी वापरात सूक्ष्म नियोजन गरजेचे

0
0

सत्यजित भटकळ यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजमितीस पाण्याबद्दलचे वास्तव अतिशय भीषण आहे. जेथे पाणी मुबलक आहे तेथे त्याचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात येत नाही. पण मराठवाड्यासारख्या दुष्काळाचे तीव्र चटके भोगणाऱ्या परिसरातील नागरिकांची स्थिती आपण विचारात घ्यायला हवी. पाणी उपलब्धतेची समस्या आजमितीस जितकी तीव्र नसेल त्याहीपेक्षा भविष्यात ती अधिक तीव्र बनत जाणार आहे. भविष्यातील पाणी प्रश्नावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजच पाण्याचे सूक्ष्म नियोजन गरजेचे आहे, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले.

प्लंबिंगमधील नवीन तंत्रज्ञान आणि पाणी वापराबाबत जागृतीसाठी कार्यरत इंडियन प्लंबिंग संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे 'शेवटची संधी' या विषयावर भटकळ यांचे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात व्याख्यान झाले. यावेळी प्लंबिंग संघटनेचे नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

भटकळ म्हणाले, की पाणी बचत आणि संवर्धनासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाणी फाउंडेशनचे कार्य सुरू आहे. आतापर्यंत ७ हजार गावांपर्यंत हे कार्य पोहचले आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड आणि सिन्नर तालुक्यात संस्थेचे काम सुरू आहे. भूगर्भ जलाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. केवळ धरणसाठ्यांमधून गावापर्यंत पाणी आणण्याची उपाययोजना या प्रश्नासाठी पूरक नाही. पुरेशा पावसाअभावी धरणेच कोरडी पडू लागली तर तेथे गावागावात जलवाहिनी पोहचविण्याचा प्रयत्नही तोकडा पडेल. जलयुक्त शिवाराची योजनाही भूजलसाठ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरत असल्याचेही भटकळ यांनी सांगितले.

प्रत्येकाने द्यावे योगदान

राजकीय धोरणेही निसर्गाच्या सत्तेपुढे काहीही करू शकत नाहीत. त्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवून पाण्याचे नैसर्गिक श्रोत पुनरुज्जीवीत किंवा सशक्त करणे इतकाच पर्याय आपल्या हाती राहतो. त्यासाठीची जबाबदारी केवळ सरकारची नाही तर सरकार सोबतच ग्रामस्थांपासून प्रत्येक घटकाने यासाठी योगदान द्यायला हवे, असेही भटकळ यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पुलं’च्या साहित्यातील मर्म चित्रांतून समजते

0
0

प्रसाद पवार यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पु. ल. देशपांडे यांचा साहित्यपट या चित्रप्रदर्शनातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रांतून पुलंच्या साहित्यातील मर्म समजून येते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार प्रसाद पवार यांनी केले.

कुसुमाग्रज स्मारक येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन प्रसाद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, लोकेश शेवडे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुरेश गायधनी, कवी किशोर पाठक, मिलिंद शिंदे, समन्वयक राजेश जाधव, मीना वाघ, अमोल थोरात, अजय तारगे, हेमंत गव्हाणे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील विविध व्यक्तीरेखा, घटना, प्रसंग चित्रांच्या सहाय्याने रेखाटत त्यांचा साहित्यप्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनातून साकारलेली पुलंची विविध रूपं साहित्यप्रेमींसाठी मेजवाणीच ठरणार आहे.

प्रदर्शनात मौज प्रकाशनने प्रकाशित केलेले पुलं यांचे चित्रमय स्वगत देखील मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनात पुलं यांची ३३ पुस्तकेही ठेवण्यात आली आहे. म्हैस, असा मी असा मी, मी आणि माझा शत्रूपक्ष, पाळीव प्राणी, बिगरी ते मॅट्रिक अशा पुलं यांच्या साहित्यातील विविध व्यक्तीरेखा आणि प्रसंग चित्राद्वारे साकारले आहेत. या चित्रांतून पुलंच्या विनोदी साहित्याचे दर्शनही रसिकांना पाहायला मिळते.

प्रदर्शन उद्यापर्यंत खुले

प्रदर्शनात रविश धनवडे, मोहित जोशी, विजयराज बोधनकर, पराग बोरसे, नितीन खिलारे, मनोज सताळे, विशाल वाड्ये, गोपाळ देऊसकर, पारूल शहा, स्नेहल पागे, दिलीप दुधाने, प्रमोद कुर्लेकर, यांची चित्रे तर प्रदीप शिंदे, चंद्रजित यादव यांची शिल्पे मांडण्यात आली आहेत. प्रदर्शन गुरुवारपर्यंत (दि. १४) सकाळी ११ ते रात्री साडेआठ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. बाबूराव ठाकरे स्मृतिग्रंथासाठी आवाहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अॅड. बाबूराव ठाकरे यांनी शिक्षण, विधी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा आगळावेगळा ठसा उमटवला. बहुजन समाजाला शिक्षण आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे कार्य जतन व्हावे आणि तरुण पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी अॅड. बाबूराव ठाकरे स्मृतिग्रंथ समितीतर्फे ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. या स्मृतिग्रंथासाठी काही संस्मरणीय आठवणी, लेख लिहून सहकार्य करावे तसेच काही दुर्मिळ छायाचित्रे, माहिती असल्यास अॅड. बाबूराव ठाकरे स्मृतिग्रंथ समिती, द्वारा अॅड. नितीन बाबूराव ठाकरे, दीपज्योती, गंगापूर रोड, नाशिक, ४२२००२ या पत्त्यावर पाठवावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. ए. बा. ब्राह्मणकर, प्राचार्य एस. एम. पाटील, डॉ. बाळासाहेब गुंजाळ, अॅड. नितीन ठाकरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीचा फैसला आता १८ मार्चला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची आर्थिक तिजोरी असलेल्या स्थायी समितीवरील वर्चस्वासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या तौलनिक संख्याबळाच्या वादावर मंगळवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्यासमोर युक्तीवाद झाले. शिवसेनेच्या वकिलांनी तौलनिक संख्याबळ बदलण्याची गरज असल्याचे सांगत, शिवसेनेचा एक सदस्य स्थायीवर पाठविण्याची मागणी केली. तर पालिकेच्या वकिलाने नवा तौलनिक संख्याबळ ठरविण्याचा अधिकार पालिकेचा असून, गट एकदा नोंदणी करतांनाच संख्या निश्चित होत असल्याचा दावा केला आहे. निवडणूक झाल्यानंतर सदस्यसंख्या कमी झाल्यानंतरच याबाबत निर्णय होईल, असा दावा केला. त्यामुळे विभागीय आयुक्तांना उच्च न्यायालयाचा निर्णय अध्याप आला नसल्याचे सांगत, यापुढील सुनावणी १८ मार्च रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १० ड मधील जागेसाठी पोटनिवडणूक वेळेत न झाल्याने पालिकेतील भाजपचे संख्याबळ ६६ वरून ६५ झाले आहे. त्यामुळे सध्या १२१ संख्याबळानुसार स्थायीतील भाजपचे शिल्लक गुणोत्तर प्रमाण हे ०.५९ आहे. तर शिवसेनेचे प्रमाण हे ०.६२ एवढे आहे. त्यामुळे ०.०३ चे गुणांकन शिवसेनेचे जास्त असल्याने भाजपचा स्थायीवर एक सदस्य कमी होवून शिवसेनेचा एक सदस्य वाढवावा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेचे विलास शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. तसेच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्या. रंजित मोरे यांच्या पिठाने सदरचा विषय हा विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीत असल्याचे सांगत सोमवारी शिवसेनेची याचिका निकाली काढली होती. त्यामुळे मंगळवारी विभागायी आयुक्त माने यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. त्यात शिवसेनेतर्फे अॅड. आनंद जगताप यांनी युक्तीवाद करत, नव्या तौलनिक संख्याबळानुसार स्थायीवर सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. त्यावर पालिकेचे वकील अॅड. विश्वास पारख यांनी आक्षेप घेत, सदरचा विषय हा पालिकेच्या अखत्यारीत असल्याचे सांगत, गटाची नोदंणी एकदाच होत असल्याचा दावा केला.

गट नोंदणी करतानाच संख्याबळ ठरते, त्यामुळे निवडणूक होवून या जागेवर बदल झाल्यानंतरच संख्याबळ बदलेल, असा दावा करण्यात आला. विभागीय आयुक्तांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप मिळाली नसल्याचे सांगत, पुढील सुनावणी ही येत्या १८ मार्च रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाची सांक्षाकित प्रत आल्यानंतर येत्या १८ तारखेलाच याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामान्य नागरिक केंद्रबिंदू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू मानून त्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया नूतन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोंदविली.

मांढरे मंगळवारी रात्री नाशिक शहरात दाखल झाले. आज, बुधवारी (दि. १३) सकाळी ते पदभार स्वीकारणार आहेत. मूळचे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील रहिवासी असलेले मांढरे १९९२ पासून प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी यापूर्वी अमरावती, अकोला, कोल्हापूर, बुलडाणा, सांगली या जिल्ह्यांमध्ये महसूल विभागात उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आदी पदांवर काम केले आहे. २०१० मध्ये ते मराठवाडा विभागात महसूल उपायुक्त म्हणून कार्यरत होते. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. २०१७ पासून ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते. या काळात त्यांनी कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य, शिक्षण अशा अनेक विभागांतील मूलभूत प्रश्न हाताळले. अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत अनेक सुधारणा करून ही कार्यपद्धती जास्तीत जास्त लोकाभिमुख व सुकर करण्यासाठी योगदा दिले. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेची अंमलबजावणी, स्मार्ट गर्ल प्लस मोबाइल ॲप्लिकेशन आणि सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी या बाबी राज्यव्यापी करण्याची प्रक्रियादेखील त्यांनी सुरू केली. पाच तारखेच्या आत सर्व कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन मिळवून देण्यात व सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व अनुज्ञेय रकमा अदा करण्यात शंभर टक्के यश आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून दोघांकडून मायलेकींचा विनयभंग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने दोघा संशयित आरोपींनी पीडित महिलेसह महिलेच्या घरात घुसून मायलेकींचा विनयभंग केला. ही घटना शरणपूररोड भागात घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक मनोहर पवार (वय २६, रा. शरणपूर, कॅनडा कॉर्नर) आणि दीपक रतन घोलप (रा. रचना हायस्कूल शेजारी, शरणपूर) अशी संशयितांची नावे आहेत. नवकार हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली. संशयितांनी महिलेच्या मुलीला शिवीगाळ करीत छेड काढली होती. याबाबत सोमवारी सकाळी महिलेने नवकार हॉस्पिटल परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ संशयितांना गाठून जाब विचारला. यावेळी संशयित आरोपींनी महिलेस शिवीगाळ करून मुलास संपवून टाकू, असा दम देत विनयभंग केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक छाया पिंपरे करीत आहेत.

पतीस मारहाण; पत्नीला धमकी

घरात घुसून दोघांनी दामप्यामधील पतीस मारहाण केली. तवलीफाटा भागातील या घटनेवेळी सदर व्यक्तीची पत्नी मदतीस धावून गेली असता संशयितांनी तिलाही शिवीगाळ करीत इथे कसे राहतात, असा दम भरला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्ञानेश्वर उर्फ शिवाजी नाना कडाळे आणि जयराम शिवाजी कडाळे (रा. रामनगर, तवलीफाटा) अशी संशयितांची नावे आहेत. सिंधूबाई संजय भोये (४० रा.रामनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. घटना शनिवारी (दि. ९) रात्री घडली. भोये दाम्पत्य आपल्या घरात असतांना संशयितांनी दरवाजास लाथा मारून घरात प्रवेश केला. यावेळी संजय भोये यांना कारण नसताना बेदम मारहाण केली. सिंधूबाई भोये आपल्या पतीच्या मदतीस धावून गेली असता त्यांनाही शिवीगाळ दम दिला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.

विवाहितेवर हल्ला

दुसरा विवाह केल्याचा जाब विचारल्याने पतीसह एका महिलेने विवाहितेस मारहाण केल्याची घटना हिरावाडीत घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पराग भरते (४६) आणि भावना पवार (दोघे रा. विधातेनगर, हिरावाडी) असे महिलेस मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी प्रिती भरते (रा. इंद्रकुंड) यांनी तक्रार दिली. भरते दाम्पत्याचा कौटुंबिक वाद कोर्टात सुरू आहे. या काळात पराग भरते यांनी दुसरा विवाह केला. पतीने दुसरा विवाह केल्याचे समजल्याने प्रिती भरते या रविवारी (दि.१०) हिरावाडीतील विधातेनगर येथे आपल्या पतीस जाब विचारण्यासाठी गेल्या. मात्र, पतीसह सदर महिलेने त्यांना शिवीगाळ करीत काठीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत.

बोधलेनगरला तरुणाची आत्महत्या

बोधलेनगर भागात राहणाऱ्या ३५ वर्षाच्या तरुणाने आपल्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन नारायण झुंबड (वय ३५, रा. आरमान अपार्ट. बोधलेनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. चेतन याने सोमवारी (दि.११) आपल्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images