Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विवाहाचे आमिष; महिलेवर बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

विवाहितेशी प्रेमसंबंध निर्माण करून आणि विवाहाचे आश्वासन देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी औरंगाबादच्या व्यक्तीवर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडिता २९ वर्षांची असून ती नाशिकरोड परिसरात राहते. औरंगाबाद येथील संशयित आशिष सूर्यवंशी याने तिच्याशी ओळख निर्माण करून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. याद्वारे तिच्या वैवाहिक जीवनात दुफळी निर्माण केली. फूस लावून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तरुणीकडून रोख व ऑनलाइनद्वारे दीड लाख रुपये घेतले. ते परत करण्यास नकार दिला. आशिषने तिला औरंगाबाद, माथेरान, गोवा येथे फिरायला नेले. विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केला. संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्राहकदिनानिमित्त आज व्याख्यान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

ग्राहक पंचायत नाशिक महानगरतर्फे शुक्रवारी (दि. १५) जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. सिडकोतील शिवशक्तीनगरमधील नवजीवन लॉ कॉलेजमध्ये सकाळी साडेनऊ वाजता ग्राहक संरक्षण कायद्यावर ग्राहक पंचायतीचे विभागीय संघटक अरुण भार्गवे यांचे व्याख्यान होईल. तसेच शिवशक्तीनगरमधील नवजीवन डे स्कूलमध्ये 'विद्यार्थी ग्राहक' या विषयावर दुपारी चार वाजता जिल्हा संघटक दत्ता शेळके यांचे व्याख्यान होईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, महानगरप्रमुख सुरेन्द्र सोनवणे, शशिकला धारणकर, वंदना जगताप यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे गंगाद्वार पायथ्याशी राहणाऱ्या प्रसाद अशोक झोले (वय ३५) यांनी घराजवळील अंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवार सकाळी ही घटना उघडकीस आली. गंगाद्वार पर्वताच्या पायथ्याशी दुर्गामंदिराचे जवळ झोले यांचे घर आहे. झोले हे विवाहित असून त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बंद घरामधून

टीव्ही, दागिने लंपास

मालेगाव : शहरातील पवारवाडी पोलिस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, टीव्ही व रोख रक्कम असा ६१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी घरमालक इरफान उस्मान (वय १९, रा. अख्तराबाद, मालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. इरफान हे ११ ते १३ मार्च दरम्यान घराबाहेर असताना हा प्रकार घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर सटाण्यात टँकरने पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरात मागील १५ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून, उशिरा का असेना पालिका प्रशासनाला जाग आली आहे. पालिकेकडून तात्पुरती उपाययोजना म्हणून प्रत्येक प्रभागात दोन असे २० टँकरने ठेंगोडा व सटाणा येथून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याबाबत नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी माहिती दिली.

सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी चनकापूर, पुनद व केळझर धरणातून आवर्तन आल्यानंतरच नळांना मुबलक पाणी येते. परंतु नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांडकडे सहा मार्च रोजी पाण्याचे आवर्तन सोडा अशी मागणी केली होती. तरी देखील आवर्तन न सोडल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. परंतु तात्पुरती उपाय म्हणून नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सर्व नगरसेवकांची बैठक बोलावून शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जाईल असे सांगितले. सद्यस्थितीत शहरात ११४ हातपंप व ३५ विंधन विहिरीतून पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पुढील दोन महिन्यांसाठी देखील केळझर व पुनद धरणातून दोन पाण्याचे आवर्तन राखीव असून, त्यामुळे पुढील काळात पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे ही नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडांना खिळे ठोकाल तर गुन्हा दाखल होणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

झाडे आणि पथदीपांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. अनधिकृत बॅनरबाजीतून झाडांना मोठ्या प्रमाणावर खिळे ठोकले जात असल्याने झाडांनाही इजा पोचत आहे. त्यामुळे महापालिकेने झाडे आणि पथदीपांवर बॅनर्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. झाडांना खिळे ठोकल्याचे आढळल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार आहे. तसेच फुटपाथवर अडथळा निर्माण होईल, असे कृत्य करणे अपराध ठरणार आहे.

शहरात अनधिकृतपणे बॅनरबाजी करणाऱ्यांसह शहरातील झाडांना खिळे ठोकून त्यांना इजा पोचवण्यासाठी महापालिकेने आवाहन केले आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर्स व होर्डिंग्ज लागल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक, दुकानांसमोरील जागा, झाडे, पथदीपांवर अनधिकृतपणे जाहिरातींचे फलक लटकविले जात असल्याने शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. त्यामुळे अशा छोट्याशा बाबींवर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. झाडांवर जाहिराती लटकविण्यासाठी खिळे ठोकले जात असल्याने झाडांना इजा होत असल्याचा दावा करीत पुढील दोन दिवसात अशा प्रकारच्या जाहिराती हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच फुटपाथवर अनधिकृतपणे व्यवसाय होत असल्याने रहदारीला अडथळा होत असल्याने ते हटविण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशिर दारु विक्री; पोलिसांकडून कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बेकायदेशिरपणे देशी दारुची विक्री केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सुनील भिमराव बागूल (वय ३२, रा. ज्योतीनगर, मोरे मळा, जेलरोड) या संशयितावर कारवाई करून त्याच्या विरोधात नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला.

मोरे मळ्यात सुनील बागूल हा बेकायदेशिरपणे देशी दारू विकत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. पोलिसांनी छापा टाकून त्यास देशी दारु विक्री करताना रंगेहाथ पकडले होते. त्याच्याकडून ६२४ रुपयांची देशी दारू जप्त केली होती. सुनील बागूल याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यालय जप्तीची नामुष्की

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नाशिकमधील शहर कार्यालयावर २२ लाख ३९ हजारांच्या थकबाकीपोटी जप्तीची नामुष्की ओढावली आहे.

महापालिकेच्या कर विभागाने काँग्रेस कार्यालयावर थकबाकी भरण्यासाठी जप्ती वॉरंट बजावले असून, थकबाकी भरण्यासाठी दिलेल्या २१ दिवसांपैकी दहा दिवस उलटूनही काँग्रेसकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत थकबाकी भरली नाही, तर कार्यालय जप्त करण्याचा इशाराच देण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालयाची थकबाकी २२ लाखांवर पोहोचली असतानाही शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष खुर्ची उबविण्याचेच काम करीत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान, आता थकबाकी भरण्यास नगरसेवकांनीही नकार दिल्याने शहराध्यक्ष शरद आहेर जप्ती कशी टाळतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्याने महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. थकबाकी वसुलीसाठी शहरातील २५ हजारपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावले आहेत. या जप्ती वॉरंटमध्ये शहरातील बड्या हस्तींसह राजकीय पक्षांच्या नेत्यांचाही समावेश आहे. सध्या गल्ली ते दिल्ली अनेक संकटांचा सामना करणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसच्या शहरातील एम. जी. रोडवर असलेल्या कार्यालयाचाही थकबाकीदारांमध्ये समावेश आहे. काँग्रेस कार्यालयाकडे २२ लाख ३९ हजार ७०७ रुपयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची थकबाकी असून, गेल्या वर्षाही महापालिकेने काँग्रेस कार्यालयावर २७ लाखांच्या वसुलीसाठी जप्ती वॉरंट बजावले होते. मात्र, त्यावेळी स्थायी समितीवरील दोन नगरसेवकांनी सहा लाख रुपये भरल्यावर काँग्रेसने जप्तीची नामुष्की टाळली होती. परंतु, आता ही थकबाकी पुन्हा २२ लाख ३९ हजारांपर्यंत पोहोचली असल्याने महापालिकेच्या कर विभागाने ३ मार्च रोजी जप्ती वॉरंट बजावले आहे. काँग्रेसला त्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नोटीस देऊन दहा दिवस लोटले, तरी काँग्रेसकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे कर विभागाने पुन्हा स्मरणपत्र दिले असून, आता थकबाकी जमा करण्यासाठी दहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या दहा दिवसांत थकबाकी भरली नाही, तर थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. गेल्या वेळेस स्थायीतल्या दोन नगरसेवकांनी आर्थिक भार उचलला होता. आता मात्र सर्व सहाही नगरसेवकांनी याबाबत हात वर केल्याने काँग्रेसची अडचण वाढली आहे.

--

...तर निवडणुकीत लिलाव

काँग्रेस कार्यालयाला थकबाकी भरण्यासाठी आता दहा दिवसांचीच मुदत शिल्लक आहे. या मुदतीत थकबाकी जमा केली नाही, तर महापालिकेकडून हे कार्यालय जप्त केले जाईल. थकबाकी वसुलीसाठी लिलाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. लिलावात बोलीला प्रतिसाद मिळाला नाही, तर महापालिका एक रुपया बोली लावून संबंधितांच्या मालमत्तेवर आपले नाव लावू शकते. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एकीकडे काँग्रेस देशभरात पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करीत असताना नाशिकमधील पक्षाच्या कार्यालयावर मात्र लिलावाची नामुष्की ओढावण्याची चिन्हे आहेत.

--

शहराध्यक्षांची जबाबदारी

काँग्रेसच्या या कार्यालयावर शहराध्यक्ष शरद आहेर यांचा ताबा आहे. जिल्हा काँग्रेसचेही कार्यालय असले, तरी येथे जिल्ह्यातील लोकांची वर्दळ कमीच असते. परंतु, शहराध्यक्ष आहेर मात्र दिवसभर कार्यालयात तळ ठोकून असतात. परंतु, त्यांनीदेखील ही थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. आहेर फक्त शहराध्यक्ष नावाचे पद मिरविण्यात व्यस्त असून, त्यांना काँग्रेस वाढविण्यात रस नसल्याचा आरोप आता निष्ठावंत करीत आहेत. त्यामुळे आहेरांच्या काळात काँग्रेस पक्ष वाढण्याऐवजी पक्षाची बदनामीच अधिक होऊन पक्ष संपविला जात असल्याची प्रतिक्रिया आता विरोधी गट व्यक्त करीत आहे. त्यामुळे आहेर ही रक्कम भरून कारवाई टाळतात का, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकींच्या अपघातात माजी सैनिकाचा मृत्यू

$
0
0

दोघा जखमींवर मनमाडमध्ये उपचार

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

तालुक्यातील भडाणे येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात माजी सैनिक दत्तात्रय यादव बोडके (वय ३७, रा. निफाड) यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत.

लासलगाव-मनमाड मार्गावरील भारतनगर (भडाणे) परिसरात गुरुवारी सायंकाळी एमएच १५ जीक्यू २३११ आणि एमएच ४१ एडब्ल्यू ४९६६ या दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. यामध्ये माजी सैनिक दत्तात्रय बोडके (मूळ रा. कातरगाव, निफाड) यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला तर बबन दत्तू उगले (वय ५०, रा. सत्तेगाव ता. येवला) आणि राहुल दिलीप आवारे (रा. सावकारवाडी, ता. मालेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघा जखमींवर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातात दत्तात्रय बोडके यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व भाऊ-भावजाई असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच बोडके यांच्या कुटुंबीयांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संमिश्र वातावरणाने नाशिककर हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सकाळी गारवा, तर दुपारी कडाक्याचे ऊन अशा संमिश्र वातावरणामुळे नाशिकर हैराण झाले असून, विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून, गुरुवारी कमाल तापमान ३१.८, तर किमान तापमान १६.५ इतके नोंदवले गेले.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात आमूलाग्र बदल जाणवत आहे. सकाळी गारवा जाणवात असून, दुपारी कडक उन्हाने अंगाची लाही होते आहे. बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस आकाशात ढग जमा झाल्याने पाऊस पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीमुळे ज्यांना दम्याचे आजार आहेत, त्यांना उपचारासाठी डॉक्टरकडे जावे लागले. दुपारच्या कडाक्याच्या उन्हानंतर सायंकाळी मात्र वातावरणात गारवा निर्माण होत आहे. थंडी ओसरल्याने शहरातील जॉगिंग ट्रॅकवर फिरणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. आगामी आठ दिवस परिस्थिती अशीच राहील, असा अंदाज वेधसाळेने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादन शुल्क विभागाचे छापासत्र

$
0
0

जिल्हाभरात ३१ जणांना अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तस्करांविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. विभागाने गेल्या चार दिवसांत सिमावर्ती भागासह जिल्हाभरात छापासत्र राबवित ३१ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख १८ हजार ५०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात मद्यासह तीन ऑटोरिक्षांसह एका मारुती कारचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत आणि उपअधिक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्य तस्करी, निर्मिती आणि बेकायदा विक्री रोखण्यासाठी तीन भरारी पथकांसह दोन विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत. सिमावर्ती भागातून होणारी तस्करी रोखण्यासाठी अंबोली, हरसूल आणि बोरगाव या सिमा तपासणी नाक्यांवर २४ तास वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी कर्मचारी पुरविण्यात आले आहे. याबरोबरच परवानाधारक दारू दुकानांनाही विक्री बाबत आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचार संहिता लागू होताच या विभागाने १० ते १४ मार्च दरम्यान जिल्ह्यात छापे टाकण्यास सुरुवात केली. यात ३५ गुन्हे दाखल केले असून, त्यात ३१ संशयितांना अटक करण्यात आली.

लाखाचा मद्यसाठा ताब्यात

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहर परिसरातून होणारी मद्य तस्करी रोखण्यासाठी गस्तीवर भर दिला आहे. भरारी पथक क्रमांक एक आणि निरीक्षक ब पथकाने केलेल्या कारवाईत वैभव बाळू साबळे (रा. वाल्मीकनगर, पंचवटी) आणि सरताज रमेश रोकडे (रा. समतानगर, आगरटाकळी) या दोघांना बेड्या ठोकत मारुती कार (एमएच १५ आर ०२९०) व ऑटोरिक्षा (एमएच १५ झेड ९०६७) जप्त केली आहे. वैभव साबळे बुधवारी अंबड औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात तर गुरूवारी रोकडे गावठी दारूची वाहतूक करतांना आढळून आला आहे. संशयितांच्या ताब्यातून वाहनांसह मद्यसाठा असा सुमारे एक लाख १७ हजार ७७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयितांकडून हे जप्त

- ५८१ लिटर गावठी दारू

- १७०० लिटर रसायन

- २१९.२४ लिटर देशी

- ३.६ लिटर विदेशी

- १५० लिटर ताडी

- मारुती कारसह तीन ऑटोरिक्षा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाकडून पेपर तासभर ‘लेट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अपेक्षित प्रश्नपत्रिका आनलाइनद्वारे उशिरा मिळाल्याने नाशिकरोडच्या महिला महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेचा पेपर एक तास विलंबाने सुरू झाली. दरम्यान, इंटरनेट रेंज मिळत नसल्याने तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे पेपर सुरू होण्याच्या वेळांवर परिणाम होत आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या दरवर्षी जाणवत आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे परिक्षा विभाग हैराण झाले आहेत.

महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी एफवायबीएचा कला शाखेचा मराठीचा पेपर होता. त्याची वेळ दुपारी दोन ते पाच अशी वेळ होती. नाशिकरोडच्या महिला महाविद्यालयात प्रथम वर्ष कलाचे १५८ विद्यार्थी आहेत. विद्यापीठामध्ये फक्त या महाविद्यालयातच व्यावहारिक मराठी हा विषय शिकवला जातो. त्याची प्रश्नपत्रिका अपेक्षित असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने साहित्यिक मराठी पेपरचा कोड इंटरनेटद्वारे पाठवला. अपेक्षित पेपर आला नसल्याची माहिती महाविद्यालयाने विद्यापीठाला कळवली. व्यावहारिक मराठीची प्रश्न पत्रिका येण्यास, तिची झेरॉक्स काढून ती विद्यार्थ्यांच्या हातात पडेपर्यंत एक तास लागला. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यास एक तास विलंब झाला. विद्यार्थ्यांना एक तास वाढवून देण्यात आला. कधी लोडशेडिंग तर कधी इंटरनेटची रेंज नसल्याने प्रश्नपत्रिका मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियामनुसार परिक्षेचा वेळ वाढवून दिला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी लसीकरणाचे आव्हान कायम

$
0
0

आरोग्य विभागापुढे पेच

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुस्लिमबहुल असलेल्या मालेगाव शहरात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी नेहमीच आरोग्य विभागाकडून प्रयत्न होत असले तरी आजवर शंभर टक्के लसीकरणात मालेगाव मागे राहिले असल्याचे चित्र कायम आहे. यावर्षीचा पोलिओ लसीकरणासाठीचा पहिला टप्पा रविवारी झाला. यात देखील केवळ ४० टक्केच लसीकरण झाले. विशेषतः शहरातील मुस्लिमबहुल पूर्व भागात पालकांमध्ये असलेले अज्ञान, धार्मिक कारणे, सोशल मीडियावर व्हायरल होणारी चुकीची माहिती यामुळे पालकांकडून नेहमीच आरोग्य विभागास नकाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरात शंभर टक्के लसीकरणाचे आव्हान आरोग्य विभागापुढे कायम असून यासाठी घरोघरी जाऊन प्रबोधन व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शहरात नुकतेच गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात आले. यात देखील मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात समाजकंटंकांकडून गैरसमज पसरवण्यात आल्याने प्रारंभी लसीकरण टक्का कमी होता. अखेर तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मालेगावी दौरा करून शहरातील मौलाना तसेच मुस्लिम संघटनांची बैठक घेवून गैरसमज दूर करून लसीकरणाचे आव्हान केले होते. नोव्हेंबर २०१८ ते आतापर्यंत शहरात १ लाख ५१ हजार २० बालकांना हे लसीकरण पूर्ण झाले असून, आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर लसीकरणचा आकडा ८५ टक्क्यांवर पोचला आहे. शहरात १ वर्षांच्या आतील बालकांना देखील पूर्ण संरक्षित बालक लसीकरण अभियान राबविले जाते. यात विविध प्रकारच्या ९ लसेस दिल्या जातात. आरोग्य विभागाला यात देखील पालकांचे मतपरिवर्तन करण्याचे आव्हान पेलावे लागत असून, एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत ६० टक्के बालकांना याचे लसीकरण झाले. मार्चअखेर ९० टक्के बालकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे.

भारत पोलिओमुक्त घोषित झाला असला, तरी पोलिओमुक्तीचा लढा शहरात अद्याप सुरू आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ९८ टक्के बालकांना पोलिओ लसिकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले होते. यंदा देखील रविवारी बूथ लसीकरण झाल्यानंतर सोमवारपासून आरोग्य विभागाच्या तब्बल ३९४ टीम घरोघरी जावून लसीकरण करीत आहेत. पूर्वभागात लसीकरणास नकार देणाऱ्या १ हजार ७२८ जणांचे मतपरिवर्तन करण्यासाठी बैठका, जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम घेतले जात आहेत.

बालक तेथे लसीकरण

शहरातील १ लाख २० हजार ४४७ बालकांना पोलिओ लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून शुक्रवारअखेर १ लाख १० हजार ६४५ म्हणजे ९१ टक्के बालकांना लसीकरण पूर्ण झाले आहे. येत्या तीन दिवसात हा लसीकरणचा टक्का वाढवा यासाठी आरोग्य विभागाकडून घरोघरी लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज चोरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरफोडी करणारे गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले असून, नुकत्याच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड असा सुमारे एक लाख ६८ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात भरदिवसा झालेल्या एका घरफोडीचा समावेश आहे. या प्रकरणी भद्रकाली आणि सातपूर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

द्वारका परिसरातील सिताराम ज्ञानदेव जेजुरकर (रा. पिनाक बी अपार्ट, सिंगापूर गार्डन, टाकळीरोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. जेजुरकर कुटुंबीय गुरुवारी (दि.१४) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातून सुमारे ९८ हजाराचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. अधिक तपास निरीक्षक मुदगल करीत आहेत. दुसरी घटना सातपूर परिसरात घडली. सोमेश्वर येथील निरंजन पुंजाराम मुटकरे (रा. व्यायाम शाळेजवळ) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. मुटकरे कुटुंबीय ७ ते १४ फेब्रुवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व मनगटी घड्याळ असा सुमारे ७० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक आवतारे करीत आहेत.

परिचिताकडून रोकड लंपास

पत्नीचे दागिने तारण गहाण करून रोकड घेऊन घराकडे परतणाऱ्या कारचालकाच्या अडीच लाखांच्या रोकडवर एका परिचित व्यक्तीने डल्ला मारला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जिग्नेश विपीन व्होरा (रा. आराधना अपार्ट. सौभाग्यनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. जिग्नेश व्होरा बुधवारी (दि. १३) पत्नीचे दागिने तारण गहाण करण्यासाठी जेलरोड भागात गेले होते. मुथ्थुट फायनान्स कार्यालयात दागिने गहाण ठेवून ते अडीच लाखांची रोकड घेऊन कारने (एमएच ०२ बीए ९५८२) घराकडे परतत असतांना ही घटना घडली. दुपारच्या सुमारास घराकडे परतत असतांना वाटेत त्याना छोटू नामक परिचित व्यक्ती भेटला. संशयिताने भारतनगरपर्यंत लिफ्ट मागितल्याने व्होरा यानी त्यास कारमध्ये बसविले. प्रवासादरम्यान भामट्याने व्होरा यांना बोलण्यात गुंतवून अडीच लाखाच्या रोकडवर डल्ला मारला. भारतनगर येथे व्होरा यांनी कार थांबवून सिगारेट घेण्यासाठी रस्त्यावरील पानस्टॉलवर गेले असता संशयित रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेची दखल घेण्यात आली असून, त्यातील तथ्य तपासले जात असल्याचे मुंबई नाका पोलिसांनी स्पष्ट केले. अधिक तपास हवालदार कैलास ठाकूर करीत आहेत.

सहप्रवाशाकडून तरुणीचा विनयभंग

ऑटोरिक्षा प्रवासात सहप्रवाशाने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली. रमेश मांगीलाल चव्हाण (वय ३२, रा. कसाबखेडा, ता. नांदगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सरस्वतीनगर भागात राहणारी तरुणी गुरुवारी (दि. १४) औरंगाबाद नाका भागात शिकवणीसाठी गेली होती. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारात ती रिक्षातून घराकडे प्रवास करीत असतांना ही घटना घडली. औरंगाबाद नाका येथून ती ऑटोरिक्षात बसली असता सहप्रवाशी असलेल्या संशयिताने तिचा विनयभंग केला. ही बाब तरुणीने अन्य प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्या तरुणाला पोलिसांकडे नेण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

अ‍ॅट्रोसिटीप्रकरणी गुन्हा

धनादेश परत केल्याप्रकरणी खटला दाखल केल्याने संतप्त झालेल्या एका व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश राजाराम भोसले (रा. मातोश्री कॉलनी, खोडेनगर) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी अतुल आनंत दोंदे (रा. खोडेनगर, पखालरोड) यांनी तक्रार दिली. आर्थिक व्यवहारापोटी भोसले यांनी दोंदे यांना धनादेश दिला होता. मुदतीत पैसे न आल्याने दोंदे यांनी सदर धनादेश बँकेत पाठविला असता तो न वटता परत आला. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यातून हा वाद झाला. खटला दाखल झाल्याचे कळताच भोसले यांनी दोंदे यांना गाठून जातीवाचक शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक आयुक्त अशोक नखाते करीत आहेत.

सिगारेटची बेकायदा विक्री

वैधानिक इशारा व छायाचित्र नसलेली सिगारेटची पाकिटे बेकायदा विक्री करणाऱ्या किराणा दुकानदाराविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात सिगारेट व तंबाखूजन्य जाहिरातीस प्रतिबंध, व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरीफ अली अन्सारी (रा. नानावली) असे संशयित बेकायदा सिगारेट विक्रेत्याचे नाव आहे. अन्सारी यांचे नानावली भागात रॉयल किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात बेकायदा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (दि. १४) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला असता दुकानात ८५०० रुपये किमतीचे ५४ बेकायदा सिगारेटची पाकिटे आढळून आले. पोलिसांनी ही पाकिटे हस्तगत केली. या प्रकरणी पोलिस शिपाई सुरेश खालकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चांदवड तालुक्यातील शिरूर येथे शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. यामुळे जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १४ झाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेला आत्महत्येच्या घटनेचा प्राथमिक अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. योगेश रमन देशमाने (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने मंगळवारी (दि. १२) सायंकाळी सात ते आठच्या सुमारास विषारी औषध सेवन केले होते. त्याचा मृत्यू झाल्याने चांदवड तहसीलदारांनी याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला. देशमाने याचे वडील रमन देशमाने यांच्या नावे एक हेक्टर ५० आर क्षेत्र आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या

तालुका आत्महत्या

मालेगाव ५

नाशिक २

बागलाण २

येवला १

चांदवड १

त्र्यंबकेश्वर १

दिंडोरी १

निफाड १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारी बाळगणारे दोघे जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात जिल्हा पोलिसांनी विशेष मोहिमेतंर्गत धडक कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. अशाच प्रकारे नाशिक जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने येवला तालुक्यातील अंदरसूल येथे गुरुवारी केलेल्या वेगवेगळ्या दोन कारवायांमध्ये दोघा तरुणांना तलवारी बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर होताच जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची नजर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गुन्हेगारांसह अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांकडे वळाली आहे. गुन्हे शाखेने गुरुवारी (दि.१४) दुपारी येवला तालुक्यातील अंदरसूल येथे एकामागोमाग एक केलेल्या कारवाईत घरात तलवारी बाळगणाऱ्या दोघा युवकांविरोधात कारवाई केली. पोलिस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, विशाल आव्हाड आदींच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. या पथकाने अंदरसूल येथील भारम रोडवरील कैलास बबनराव भोसले (वय २१) यास दुपारी तलवारीसह ताब्यात घेतले. तर, अंदरसूल येथीलच दुसऱ्या एका केलेल्या कारवाईत रवींद्र उर्फ वणेश कोंडीराम पगारे (वय २५) या युवकास तलवारीसह ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्डाशिवाय काढा पैसे!

$
0
0

एसबीआयकडून एटीएममध्ये 'योनो कॅश'सेवेला सुरुवात \B

\B...

- नाशिकमध्ये २५ योनो कॅश पॉईंट

- १६ हजार ५०० एटीएममध्ये सुविधा

- मोबाइलवर योनो अॅप डाऊनलोड करणे गरजेचे

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

\Bएटीएम मशिनमधून कार्डच्या वापराशिवायसुध्दा ग्राहकांना पैसे काढता येणार आहेत. यासाठी एसबीआयने योनो कॅश सेवा ग्राहकांसाठी सादर केली आहे. नाशिकमध्ये २५ योनो कॅश पॉईंट विकसित करण्यात आले आहेत. एसबीआयच्या तब्बल १६ हजार ५०० एटीएममध्ये योनो कॅशसेवेद्वारे पैसे काढणे शक्य होणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देणारी एसबीआय ही देशातील पहिली बँक ठरली असल्याची माहिती बँकेचे नाशिक विभागाचे उपमहाप्रंबधक सुधीर भागवत यांनी दिली. \B

\Bदेशात आर्थिक आणि जीवनशैलीविषयक सेवांचा लाभ ज्याप्रकारे घेतला जातो त्यात सुधारणा करण्यासाठी योनो हे एसबीआयचे एक मोठे पाऊल आहे, असे बँकेचे नाशिक विभागाचे उपमहाप्रबंधक सुधीर भागवत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, की ८५ ई-कॉमर्स कंपन्यांकडून कस्टमाइज्ड उत्पादने व सेवा देणारी ही पहिली सर्वंकष डिजिटल बँकिंग सुविधा आहे. योनो एसबीआयमध्ये नोव्हेंबर २०१७ ला दाखल झाले. आता ही सुविधा वर्षभराची झाली आहे. फेब्रुवारी २०१९ पर्यंत योनोने १८ लाखांपेक्षाही अधिक डाऊनलोडची नोंद केली आहे. सात लाखांपेक्षाही अधिक सक्रिय युजर्स आहेत. अँड्रॉइड व आयओएस असणाऱ्या मोबाइल फोनव्दारे आणि ब्राऊजरव्दारे वेबवर योनोचा वापर करता येऊ शकतो, असेही भागवत म्हणाले.

\B ....

असे काढा कार्डशिवाय पैसे

\Bया सेवेचे प्रमुख वैशिष्टे म्हणजे 'स्किमिंग' आणि 'क्लोनिंग'चा धोका या व्यवहारास राहणार नाही. या सेवेसाठी विकसित करण्यात आलेल्या एटीएम मशिन्सना योनो कॅश पॉईंट म्हटले जाणार आहे. ग्राहकांनी त्यांच्या अँड्रॉइड मोबाइलवर योनो अॅप डाऊनलोड करून त्यांना पैसे काढता येऊ शकणार आहेत. या व्यवहारासाठी ग्राहकांना सहा अंकी पीन वापरावा लागेल. ग्राहकाच्या नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर सहाअंकी संदर्भ क्रमांक येईल. मिळालेला संदर्भ क्रमांक आणि पीन वापरून पुढील ३० मिनिटांच्या आत योनो कॅश पॉईंटवर जाऊन ग्राहकांना पैसे काढावे लागतील.

\B..

\Bग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी बँकेने योनो कॅशचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. व्यवहारातील जोखीम नाहीशी करण्यासाठी हा पर्याय उत्कृष्ट ठरेल. आगामी दोन वर्षात संपूर्ण व्यवहार एकाच सुविधेंतर्गत आणून इतरही सेवा डिजिटल करण्याचा बँकेचा प्रयत्न असणार आहे.

\B- सुधीर भागवत, नाशिक विभाग उपमहाप्रबंधक, एसबीआय\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारची काच फोडून साडेसात लाख लांबविले

$
0
0

पिंपळगाव बसवंत येथील घटना;Ḥ पोलिस म्हणतात ऑनलाइन व्यवहार करा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गाडीला कट मारण्याचा वाद निर्माण करून संशयितांनी कारच्या काचा फोडून तब्बल ७ लाख ३५ हजार रुपये चोरून पळवल्याची घटना पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे घडली आहे. एखाद्या चित्रपटातील घटनेला शोभावी अशी ही घटना शुक्रवारी पिंपळगाव शहरात घडली. पोलिसांनी चोऱ्या रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना त्यांनी मात्र नागरिकांना अशा घटना टाळण्यासाठी ऑनलाइन व्यवहार करण्याची सूचना केली आहे.

खाणगाव नजीक येथील संदीप जयराम गारे हे पिंपळगाव बसवंत येथे वडील जयराम गारे यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी ओरियंटल बँकेत आले होते. बँकेतून ७ लाख ३४ हजार रुपये कॅश काढले. त्यानंतर ते त्यांचा मित्र रायते व चालक सुनील गारे यांच्यासह कारने (एमएच १५ एफटी ८२७७) चिंचखेड रोड पिंपळगाव येथून सौभाग्य मंगल कार्यालयांकडून निघाले होते. तेव्हा पिंपळगाव मर्चंट बँकेजवळ दुचाकीवर हेल्मेट घतलेल्या दोन तरुणांनी गारे यांच्या वाहनाने कट मारल्याची कुरापत काढून वाद घालायला सुरुवात केली. त्यांनी गारे यांच्या चालकाला कार बाजूला घायला सांगितली. त्यावेळी सौभाग्य मंगल कार्यालयाजवळ कार घेतल्यानंतर वाद उभा केला. नंतर तो मिटल्यानंतर गारे मित्रांसह कारकडे आले असता कारची काच फोडत कारमधील रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले.

या घटनेवरून अज्ञात संशयित आरोपींनी बँकेपासून गारे यांच्यावर लक्ष ठेऊन प्लॅन करून रोकड पळवली असल्याचे समोर आले. या बाबत पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बँक, एटीएम अशा ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पिंपळगाव पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी होत आहे.

पिंपळगाव बसवंत ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथील बँकामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. शेतकरी वर्ग अथवा व्यापारी वर्गांनी मोठ्या रकमेसाठी चेक अथवा कॅसलेस सुविधाचा वापर करावा सोपी सुविधाचा वापर न करता मोठ्या रकमा बँकेमधून काढणे हे धोकादायक ठरू शकते. सध्या मोबाइलच्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर करणे सोपे झाले असताना, त्याचा वापर करावा असे केल्यास लुटीचे प्रकार घडणार नाही याची शेतकरी व व्यापारी वर्गांनी काळजी घ्यावी

-संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा उद्या मनोमिलन मेळावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप व शिवसेनेची युती झाली असली, तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अजूनही दुरावा आहे. राज्यात युतीचे सर्वाधिक उमेदवार जिंकून येण्यासाठी कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात आता दोन्ही पक्षांकडून मनोमिलन मेळावे घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी(दि. १७) नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत असा मेळावा होणार आहे.

चोपडा लॉन्स येथे दुपारी ३ वाजता होणाऱ्या या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांचे १६०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मेळाव्याच्या नियोजनासाठी दोन्ही पक्षांच्या पाच सदस्यांची नियोजन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. १७ मार्च रोजी होणारा मेळावा हा फक्त पदाधिकाऱ्यांसाठीच राहणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी शंभर पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्याचेही यावेळी ठरले. शिवसेना-भाजपने अगोदर लोकसभा निवडणूक एकत्र लढविली. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती तुटली. त्यानंतर स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकींतही दोन्ही पक्ष एकमेकांसमोर बहुतांश ठिकाणी उभे ठाकले होते. त्यामुळे त्यांच्यात मनोमिलन व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर येथील लोकसभा मतदारसंघांतील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते, पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

...अशी आहे नियोजन समिती

मेळाव्याचे नियोजन व समन्वयासाठी दोन्ही पक्षांतर्फे १५ जणांच्या समितीची घोषणा करण्यात आली आहे. त्यात भाजपचे आठ, तर शिवसेनेचे सात पदाधिकारी राहणार आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, विजय करंजकर, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, दादा जाधव, सचिन ठाकरे, प्रशांत जाधव यांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांचे प्रश्न घेऊन राज्यभर उठवणार रान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिलांवरील अत्याचारांच्या घटना आणि बेपत्ता वाढण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारीतदेखील वाढ झाल्याने त्याचा मोठा फटका महिलांना बसला आहे. त्यामुळे महिलांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर रान उठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी भवन येथे लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नाशिकला आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीने महिलांना प्रतिनिधित्व देताना जिल्ह्यात दुर्लक्ष केल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी आमचे काम कार्यकर्त्यांचे व पक्षाचा झेंडा घेऊन प्रचार करण्याचे आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करण्याचे काम आम्ही करतो. निवड करणारी पक्षात वेगळी यंत्रणा असते. तेथे निवडून येण्याची पात्रता बघितली जाते, असे सांगत पक्षाची बाजू मांडली.

भाजप सरकारच्या काळात महागाईतील वाढ हा प्रमुख मुद्दा आम्ही प्रचारात घेणार आहोत. या महागाईमुळे महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. गॅसच्या वाढलेल्या किमती हा मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे. गॅसच्या किमती जास्त असल्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेत ८० टक्के महिला नंतर रिफिलिंगला गेल्याच नाहीत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात रेशनिंगवर रॉकेलही मिळत नसल्यामुळे प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे नमूद करून वाघ यांनी बालमृत्यूचे प्रमाण राज्यात वाढल्याचा मुद्दाही गंभीर असल्याचे सांगितले.

भारती पवारांचे कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांच्या कामाचे कौतुक वाघ यांनी यावेळी केले. डॉ. पवार यांनी चांगले काम केले. मात्र, पक्षातर्फे उमेदवारी देणारी यंत्रणा वेगळी असल्याचेही वाघ यांनी नमूद केले. त्यांना या बैठकीत आमंत्रण दिले होते. पण, त्यांचे वैयक्तिक काम असल्यामुळे त्या आल्या नाहीत, असेदखील वाघ यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोमिलनाची रंगीत तालीम

$
0
0

भाजप-शिवसेना युतीची नाशिकमध्ये पहिलीच बैठक

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कालपरवापर्यंत एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे, उणी-दुणी काढणाऱ्यांना मनोमिलनाचा सांगावा येतो तेव्हा आम्ही सर्व एकच आहोत हा सांगण्याचा एकच आटापिटा सुरू होतो, हे चित्र शुक्रवारी भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात पहावयास मिळाले. आम्ही एकाच कुटुंबातील, आमचे मतभेद असले तरी मनभेद नाही, आमची नैसर्गिक युती आहे, अशा आणाभाका घेत लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेची पहिली मनोमिलनाची बैठक शुक्रवारी भाजप कार्यालयात झाली. यावेळी युतीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

वरिष्ठ स्तरावर युती झाली असली तरी तळागाळातील कार्यकर्त्यांमधील दुरावा दूर झालेला नाही. हा दुरावा मनोमिलनातून दूर करण्याचे दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्यात मनोमिलन बैठका व मेळावे होत आहेत. शिवसेनेने अगोदर मुंबई येथे आपल्या पदाधिकाऱ्यांची मनोमिलनाची बैठक घेतली. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही युती जाहीर झाल्यानंतर तब्बल २५ दिवसानंतर दोन्ही पक्षांतील प्रमुख पदाधिकारी भाजप कार्यालयात शुक्रवारी एकत्र आले. या बैठकीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत १७ मार्च रोजी नाशिक येथे होणाऱ्या मेळाव्याचे नियोजन ठरविण्यात आले.

या बैठकीला शिवसेनेतर्फे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजीमंत्री बबनराव घोलप, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, अनिल कदम, राजाभाऊ वाजे, शहरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते. भाजपतर्फे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागूल यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धारही व्यक्त केला. यावेळी भाजप-शिवसेना युतीचा विजय असो अशा घोषणा देत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत एकजुटीचा संदेश दिला.

...

दादा भुसेंचे समन्वय

उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व समन्वय ठेवण्यासाठी भाजपतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व शिवसेनेतर्फे दादा भुसे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. त्यानंतर दादा भुसे यांनी महाजन यांच्याबरोबर चर्चा करून या बैठकीचे आयोजन केले.

...

आम्ही एकाच कुटुंबातील

आम्ही एकाच कुटुंबातील आहोत. सन १९८० पासून एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढवल्या आहेत. मधल्या काळात मतभेद झाले असले तरी आता आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात आम्हाला विजय मिळेल, असा सूर या बैठकीत सर्वच नेत्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images