Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विमानतळावर करडी नजर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने विमानतळावरही पोलिस आणि आयकर अधिकाऱ्यांची करडी नजर आहे. एक लाखापेक्षा अधिक रक्कम किंवा अतिशय मौल्यवान वस्तू आढळल्यास त्याची चौकशी केली जात आहे. ओझर विमानतळावरही सध्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून चौकशी होत आहे.

आचारसंहिता काळात एक लाखापेक्षा अधिक रोख रक्कम बाळगणे, व्यवहार करणे किंवा वाहतूक करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात येते. निवडणुकीशी निगडीत काही व्यवहार किंवा मतदारांना प्रलोभन देण्याबाबत काही हालचाली यानिमित्ताने सुरू आहेत का, याची खातरजमा केली जाते. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार ओझर विमानतळाच्या ठिकाणीही सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. अतिशय मौल्यवान वस्तू आणि एक लाखापेक्षा अधिक रोख रक्कम असणाऱ्या प्रवाशांची चौकशी केली जात आहे. त्यासाठी पोलिस आणि आयकर विभागाचे पथक तेथे सक्रीय झाले आहे. सध्या ओझर विमानतळावरुन नवी दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांसाठीची सेवा सुरू आहे. त्यास मोठा प्रतिसाद आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि आचारसंहिता काळात नियमांचे उल्लंघन होऊ नये याची खातरजमा केली जात आहे. संभाव्य चौकशी आणि ससेमिरा टाळण्यासाठी प्रवाशांनी अधिकची रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू जवळ बाळगणे टाळावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.

मौल्यवान वस्तू किंवा अधिक रोख रक्कम प्रवाशाकडे असेल तर त्याची नक्कीच चौकशी होईल. त्या चौकशीसाठी प्रवाशांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसे पुरावे प्रवाशांनी आमच्याकडे सादर करावेत.

- भगवान मथुरे, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शनिवारी करा, हवामान केंद्राची सफर

$
0
0

'मटा'तर्फे आयोजन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हवामानाचे आपल्या जीवनाशी अतिशय घट्ट नाते आहे. तापमानात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा परिणाम जीवनशैलीवर जाणवतो. आरोग्याच्या बाबतीतही हवामान महत्त्वाचे ठरते. जीवन, आरोग्यापासून व्यवसायावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हवामान बदलावर अर्थकारणही मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. काहींना या क्षेत्रात करिअरची उत्तुंग स्वप्ने असतात. तर, प्रत्येकाला हवामान विभागाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता. त्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' घेऊन आलाय 'हवामान केंद्राची सफर' हा उपक्रम.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने शनिवारी (२३ मार्च) 'हवामान केंद्राची सफर' हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता उपक्रमास सुरुवात होणार असून, हवामान विभागाची यंत्रणा त्यातून जाणून घेता येणार आहे. 'मटा'च्या वाचकांसाठी हा खास उपक्रम होणार असून, हवामान केंद्रातील सर्व उपकरणांची माहिती अन् त्यांचे विश्व त्या निमित्ताने उलगडणार आहे. तसेच, हवामान विभागातील तज्ज्ञांशी संवाद साधत हवामानातील बदलांविषयीचे प्रश्न तुम्हाला विचारण्याची संधी मिळणार आहे. हवामानाच्या रोजच्या रोज नोंदी कशा प्रकारे घेतल्या जातात, हवामान केंद्रातील यंत्रणा नेमकी कशी असते यासह हवामान विभागाचे कामकाज जवळून पाहता येईल. चला तर मग, या अद्भूत सफरीत सहभागी होण्यासाठी तुमचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता आणि इच्छुकांची संख्या ९१५८६२७५४५ या क्रमांकावर आजच व्हॉट्सअॅप करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग-व्यापाराला मिळावी चालना

$
0
0

नाशिक शहरात उद्योगाला पूरक वातावरण आहे. मात्र, केवळ राजकीय अनास्थेपायी शहरात उद्योगांची पाहिजे तशी भरभराट होऊ शकली नाही. जीएससटीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यात नोटाबंदीमुळे व्यापारी अजूनही सावरलेला नाही. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलून उद्योग व्यवसायाला चालना देण्याची गरज असल्याचे मत शहरातील व्यावसायिकांनी व्यक्त केले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित 'मटा जाहीरनामा' या 'राउंड टेबल कॉन्फरन्स'मध्ये विद्यमान सरकारने सराफ व्यावसायिकांबाबत घेतलेली भूमिका आणि येणाऱ्या सरकारकडून व्यावसायिकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित व्यावसायिकांनी काही पर्यायदेखील सुचवले.

पूर्वी बजेट तयार होण्याच्या आधी नाशिक शहरातील उद्योजकांची बैठक आयोजित केली जायची, त्यात उद्योजकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जायच्या. आता मात्र ती परंपरा खंडित झाल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. जीएसटीचा विचार केल्यास काही अंशी ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. मात्र, आकारला जाणारा कर अवाजवी आहे. शैक्षणिक साहित्यावर १२ टक्के टॅक्स आहे, तो सामान्य माणसाला न पेलवणारा आहे. तो कमी होणे गरजेचे आहे. आज कागदांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वह्यांच्या किमतीत दरवर्षी वाढ होत आहे. उच्च शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी शैक्षणिक साहित्याच्या किमती कमी केल्यास सामान्यांना शिक्षण घेणे परवडेल. सरकारने नोटाबंदी करून व्यापार किमान दहा वर्षे मागे नेला आहे. मंदीच्या सावटातून अजूनही व्यापार सावरलेला नाही. बँका आजही कर्ज देण्यासाठी चालढकल करत आहेत. या सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झालेल्या नाहीत. देशात, राज्यात व शहरात गुंतवणुकीची प्रक्रिया थांबली आहे. खरेदीच्या निमित्ताने पैसा बाहेर यायला हवा, तो येत नाही. महाराष्ट्रात जेएनपीटीसारखे बंदर आहे, त्याचा वापर कोणतेही सरकार व्यवस्थित करताना दिसत नाही. चीनमध्ये असलेल्या एका बंदराच्या ३०० किलोमीटर परिसरात उद्योगांची वाढ झाली आहे. भारतात व महाराष्ट्रात असे काही झालेले दिसत नाही. राज्यातील औद्योगिकरणाचा विचार केल्यास फक्त नागपूरकरांना झुकते माप दिले जाते. नाशिकमध्ये येणार असलेले अनेक उद्योग आज नागपूरकडे वळविलेले दिसत आहेत. महाराष्ट्र स्वर्गभूमी आहे. येथे पर्यटनाला चालना मिळू शकते. मात्र, राज्य सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात शेतीमालाची प्रचंड आवक होते, त्यावेळी शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग जर नाशिकमध्ये सुरू झाले, तर शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर फेकावा लागणार नाही. आपल्याकडे औद्योगिकरणाचा रेशो फार कमी आहे. दिंडोरीजवळील आक्राळे येथील प्रकल्पाचे आजही काही झाले नाही. आपल्याकडे उद्योगधंदे आधी सुरू होतात, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर तयार होते. असे व्हायला नको. पायाभूत सुविधा आधी व्हाव्यात, त्यानंतर उद्योगांची उभारणी व्हायला हवी. या सरकारने कॉर्पोरेट कंपन्यांना मुक्त वातावरण दिले आहे. त्यामुळे एकल व्यापारी मरतो आहे. एका दुकानावर १० कुटुंबे पोसली जातात. लहान दुकानेच नष्ट झाली, तर बेरोजगारी वाढेल. इंग्रजांनी आपल्या देशावर केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर राज्य केले. भारतात शैक्षणिक क्रांती व्हावी यासाठी 'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' अशी घोषणा करण्यात आली. मात्र, ती हवेतच विरली.

सरकारला दहापैकी गुण

संरक्षण अंतर्गत सुरक्षा ६.२

परराष्ट्र धोरण ७.७

अर्थिक निती ३

वाहतूक व दळणवळण ७.२

सामाजिक सलोखा ५.७

पर्यावरण उर्जा ६

कृषी ३

सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता ६.७

शिक्षण ५

महिला ५

आमचा जाहिरनामा

१) शैक्षणिक साहित्य करमुक्त करावे

२) कादबंरी, पुस्तके, ग्रंथ यावर कर आकारणी करू नये

३) नोटाबंदीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात

४) औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी इतर देशांचे उद्योग भारतात येण्यासाठी प्रयत्न करावेत

५) बांधकाम व्यवसायाला चालना द्यावी

६) नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीच्या अटी-शर्ती शिथिल कराव्यात

७) शेतमालावर प्रक्रीया करणारे उद्योग सुरु करावेत

८) नवीन उद्योजकांना सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळाव्यात

९) छोट्या व्यवसायाच्या वाढीसाठी अर्थसहाय्य द्यावे

१०) जीएसटीमध्ये सुसूत्रता आणावी

११) शिक्षण खर्च कमी करावा

१२) सर्व स्तरांतील लोकांना आरोग्य सुविधा मोफत मिळावी

१३) उद्योगासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे

१४) द‌ळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात आणावी

१५) मालवाहतुकीसाठी महामार्गाला कनेक्टिव्हिटी असावी.

भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र, त्या पूर्ण झालेल्या नाहीत. हे सरकार आल्यानंतर गुंतवणुकीची प्रक्रिया थांबली आहे. नोटाबंदी झाल्यानंतर सामान्य दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातदेखील फार काही करण्याची संधी होती, मात्र ती या सरकारने गमावली आहे. विकासाचा वेग राज्यात फक्त नागपूरकडे वाहताना दिसतो आहे. वेगाने विकास व्हायला हवा, तो झालेला नाही.

-नंदकिशोर साखला, फर्निचर व्यावसायिक

पूर्वीचे खासदार बजेटच्या वेळी शहरातील उद्योजकांची मते जाणून घेत होते. आता मात्र राज्यकर्त्यांना वाटेल त्या प्रमाणे कृती केली जाते. देशात शैक्षणिक प्रगती चांगली होत आहे. प्रत्येक घरात एकतरी लहान मुलगा शिकतो आहे. शाळांची फी जास्त आहे. अशा वेळी शैक्षणिक साहित्यावरदेखील मोठ्या प्रमाणात कर आकारणी केली जाते. यामुळे पालक पिचलेला आहे. शैक्षणिक साहित्य करमुक्त केले, तर पालकांना दिलासा मिळेल.

- वसंत खैरनार, माजी अध्यक्ष, नाशिक जिल्हा बुकसेलर्स अॅन्ड स्टेशनर्स असोसिएशन

जीएसटी लागू केल्यानंतर जी सुसूत्रता यायला हवी, ती आलेली नाही. यात बऱ्याच किचकट गोष्टी समाविष्ट आहेत. नोटाबंदीनंतर व्यापाराला मरगळ आली आहे. ती दूर होणे गरजेचे आहे. ज्या देशांनी व्यापाऱ्यांना मुक्तहस्ते काम करू दिले, त्या देशाची प्रगती झाली आहे. गुजरातमध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्या व्यापाऱ्याला दहा दिवसांत सर्व परवानग्या दिल्या जातात. महाराष्ट्रात मात्र अशी परिस्थिती अद्याप नाही.

- अनिल बुब, होलसेल व्यापारी, माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती.

नोटाबंदीमुळे सर्वच व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. अजूनही त्यातून फर्निचरचा व्यवसाय सावरू शकलेला नाही. नागरिकांमध्ये कर भरण्यासाठीची जागरूकता सरकारने आणली पाहिजे. जीएसटीचा निर्णयदेखील अतिघाईने घेतला आहे, असे वाटते. गुजरातचा विकास जितका झपाट्याने झाला, तितका महाराष्ट्राचा झाला नाही. आज नाशिक शहराचा विचार करायचा झाल्यास बाहेरची कोणतीही कंपनी शहरात यायला तयार नाही. जे उद्योग सुरू होते ते युनियनमुळे बंद पडले आहेत.

- प्रशांत वाबळे, फर्निचर व्यावसायिक

मटा जाहीरनामा वाचकांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. साहजिकच राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे, सरकारची त्याबद्दलची धोरणे, त्याचा विविध घटकांवर होणारा परिणाम आदिंची चर्चा या व्यासपीठावरुन होणार आहे. त्यामध्ये संबंधित क्षेत्रामध्ये अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते, तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या चर्चेची नाशिकच्या भावी खासदारांना त्यांच्या कामाची दिशा ठरविण्यासाठी मदत होईल, अशी आशा वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्ग खचला, ट्रक रुतला!

$
0
0

रस्त्याच्या दर्जावर शंका; सुदैवाने अपघात टळला

...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावर जयरामभाई शाळेजवळील कलंत्री गेटसमोर बुधवारी सायंकाळी रस्ता अचानक खचून अवजड ट्रक रुतून बसल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्ता खचल्याने त्याच्या दर्जाविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बिटकोहून द्वारकेच्या दिशेने ट्रक (एमएच १५ सीके २१३) जात होता. खडी-डबरची वाहतूक करणारा हा ट्रक बिटको कॉलेजजवळ आला असता, जयराम हायस्कूलच्या वळणावरील कलंत्री गेट येथे रस्ता अचानक खचून ट्रकचे मागील चाक रुतून बसले. हा ट्रक अचानक थांबल्याने मागे असलेले वाहनचालकही भांबवले. त्यांनी वाहनांवर नियंत्रण मिळविल्याने अपघात टळला. यावेळी दत्त मंदिरचा सिग्नल सुटलेला असता, तर वाहने वेगाने या मार्गाने निघाली असती आणि ती ट्रकवर धडकून अनर्थ झाला असता.

..

रस्ता काम निकृष्ट

नाशिकरोडच नव्हे तर शहरातही रस्ते खचण्याचे प्रकार घडत आहेत. कमिशनपोटी रस्त्यांच्या दर्जाशी तडजोड केली जात असून, रस्ता कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप नागरिकांना केला आहे. महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयासमोरच रस्ता खचून दोन वेळा वाहने त्यात फसली होती. अजूनही तेथील काम झालेले नाही. रस्त्यांचे ऑडिट व्हावे, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी बीईंग कामन संस्थेचे अध्यक्ष विक्रम कदम व नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धेत इस्पॅलियर स्कूलच्या २५ विद्यार्थ्यांचे यश

$
0
0

इस्पॅलियर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

नाशिक : इस्पॅलियर द हेरिटेज स्कूल व नाशिक जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोलर स्केटिंग स्पर्धेत इस्पॅलियरच्या २५ खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ४५० हून अधिक विद्यार्थी रोलर स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील अंतिम फेरीत इस्पॅलियर स्कूलमधील ४ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावत उत्तुंग यश पटकावले. तर सात विद्यार्थ्यांनी रौप्य पदक तर १४ विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावत या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवली. विद्यार्थ्यांना स्कूलचे प्रमुख सचिन जोशी, मुख्याध्यापिका अंकिता कुरिया, कुमुदिनी बंगेरा, प्रशिक्षक राहुल जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक काळातील संशयास्पद व्यवहार कळवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक काळात बँकांनी त्यांच्याकडील आर्थिंक व्यवहारांचा संपूर्ण तपशील साठवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात निवडणूक खर्चाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, आयकर विभागाचे सहसंचालक अमित सिंग, उपायुक्त मनोज सिन्हा, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंग राजपूत, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक बी. व्ही. बर्वे आदी उपस्थित होते.

मांढरे म्हणाले,'निवडणूक आचारसंहिता कालावधीत बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे एका बँक खात्यातून अनेक व्यक्तींच्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर बँकांनी लक्ष ठेवायला हवे. एक लाख किंवा त्याहून अधिक रक्कम खातेदाराच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या खात्यात जमा करणे किंवा काढणे यासाठी संबंधित खातेदाराने प्रतिज्ञापत्र बँकेकडे सादर करणे गरजेचे आहे.

निवडणूक काळात अवैध रोकड नियंत्रणासाठी भारत निवडणूक आयोग आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार एटीएम मशिन्समध्ये रोकड जमा करताना वाहतुकीसाठी विहित कार्यप्रणालीनुसार वापर करावा. तसेच खासगी विमान, हेलिकॉप्टरची सेवा पुरवितांना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवाशांच्या बॅगची तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिल्या. निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवारांच्या खात्यातून १० लाखांहून अधिक रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्याची माहिती मिळाल्यास त्यासंदर्भात आयकर विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, अशा सूचनाही मांढरे यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज निघणार वीरांची मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराला परंपरा लाभलेल्या वीरांची मिरवणूक आज विविध भागांतून निघणार असून, ज्यांच्या घरात वीरांचे टाक आहेत त्यांनी जय्यत तयारी केली आहे.

शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी होळीच्या आगीवर घरातले पाणी तापवून त्यात लहान थोर मंडळींना स्नान घालण्याची प्रथा आहे. त्वचेचे रोग नष्ट व्हावेत यासाठी होळीच्या राखेत पाणी मिसळून तयार झालेला चिखल एकमेकांना लावला जातो. मात्र, कालौघात हे मागे पडले. याच दिवशी वीरांची मिरवणूक काढण्यात येते. ज्यांच्या घरात वीरांचे टाक आहेत, ते या दिवशी पूजले जातात. हे टाक खोबऱ्याच्या वाटीत घेऊन गावात मिरवले जातात. ते मिरवताना पौराणिक पात्रांची वेशभूषा केली जाते. मिरवणुकीदरम्यान होळी दिसली की तिला प्रदक्षिणा मारून पुढे मार्गस्थ होतात. शहरातून मिरवल्यानंतर या टाकांचे रामकुंडावर स्नान घालून विधिवत पूजन होते. त्यानंतर पुन्हा आपल्या घराकडे येऊन नैवेद्य दाखवला जातो. महाराष्ट्रातील एकमेव आणि अनोखी समजली जाणारी पारंपरिक बाशिंगे वीरांची मिरवणूक बुधवार पेठेतील मिरजकर गल्लीतून निघणार आहे. बेलगावकर घराण्याकडे पिढ्यान् पिढ्या चालत आलेली ही अनोखी परंपरा राज्यभरात चर्चेचा विषय असते. मंडपाचा व्यवसाय करणारे विनोद हिरामण बेलगावकर हे बाशिंगे वीर होणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते धुरा सांभाळत आहेत. राज्याच्या अनेक भागात धुळवडीच्या दिवशी वीरांची मिरवणूक निघते. मात्र, बाशिंगे वीरांची मिरवणूक केवळ नाशिक शहरातच निघते. या मिरवणुकीची परंपरा प्राचीन आहे. रात्रभर दाजीबा वीरांना मिरविल्यानंतर सकाळी सहा वाजता मिरजकर गल्लीत समारोप होणार आहे. या पूजेचा मान मागील अनेक वर्षांपासून बेलगावकर घराण्याकडे आहे. गेली २१ वर्षे विनोद बेलगावकर त्याची धुरा सांभाळत आहेत. त्याआधी २६ वर्षे ही परंपरा त्यांचे वडील हिरामण बेलगावकर यांनी सांभाळली आहे. बाशिंगे वीरांची रस्त्यात पूजा करुन विविध प्रकारचे नवस बोलले जातात. ज्यांची मनोकामना पूर्ण होते अशांचे नवसही यादिवशी फेडण्याची प्रथा आहे.

उत्तर भारतीयांची आज होळी

शहरात धुळवड साजरी होते, त्याच दिवशी शहरातील अंबड, सातपूर या भागातील उत्तर भारतीय होळी म्हणजेच रंगपंचमी साजरी करतात. होळीसाठी औद्योगिक वसाहतीतील काही कारखाने आज बंद राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपकोषागार अधिकाऱ्यास लाच घेताना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी मुलींच्या वसतिगृहावरील भोजन पुरवठ्याचे बील मंजूर करण्यासाठी पाच हजार ८०० रुपये लाच मागून त्यापैकी काही रक्कम स्वीकारणाऱ्या उपकोषागार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली.

सिन्नर येथील उपकोषागार अधिकारी वर्ग दोन यांच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. अजित शिवाजीराव खकाळे असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सिन्नर येथे सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह असून भोजन पुरवठा करणाऱ्या गृहपालांनी पाच लाख ७७ हजार रुपयांचे बिल सादर केले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी एक टक्क्याप्रमाणे खकाळे यांनी पाच हजार ८०० रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी दोन हजार रुपये १८ मार्च रोजी त्यांना देण्यात आले. त्यानंतर संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत माहिती दिली. बुधवारी पुन्हा खकाळे यांनी उर्वरित पैशांची मागणी केली. हे पैसे स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोडला कमानीच्या खांबाचे काढले नट बोल्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील दिशादर्शक फलकाच्या खांबाचे नटबोल्ट अज्ञात व्यक्तीने काढून नेले आहेत. पुण्यात गेल्या वर्षी कमान कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला होता. तशी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. डॉ. आंबेडकर रोडवरील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर आंबेडकर पुतळ्यासमोर हा दिशादर्शक फलक आहे. सिंहस्थ काळात महापालिकाने दुभाजकामध्ये हा फलक लावला आहे. खड्डा खणून फलकाचा खांब रोवलेला असून, पाया झाल्यावर त्यावर सिमेंट काँक्रीट भरलेले आहे. त्यावर लोखंडी प्लेट लाऊन नट बोल्टने ती फिट्ट करण्यात आलेली आहे. अज्ञात व्यक्तीने नटाचे बोल्ट काढून नेल्याने हा फलक हवेने हालतो. त्यामुळे तो कोसळून अपघात होण्याची भीती आहे. परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. दिशादर्शक फलक का हालतो याची पाहणी महापालिकेच्या अभियंत्यांनी केली असता, नटबोल्ट काढल्याचे आढळून आले. काही नटाचे बोल्ट अर्धवट काढलेले आहेत. पावसाळा व उन्हाळ्यात सोसाट्याचा वारा सुटल्यावर फलक पडू शकतो. यामुळे लवकरात लवकर येथे नट बोल्ट लावण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होलिकोत्सवाने चैतन्य

$
0
0

शहर परिसरात पूजन, बाजारपेठेतही गर्दी

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फाल्गून महिन्यातील हुताशनी पौर्णिमेस साजऱ्या होणाऱ्या होलिकोत्सवानिमित्त शहरात चैतन्याचे वातावरण होते. होळीच्या निमित्ताने गत दोन दिवसांपासूनच बाजारपेठ फुलली होती. शेणाच्या गोवऱ्या, साखरेच्या गाठी-हार-कडे आणि होळीपूजनाचे विविध साहित्यही बाजारात विक्रीस आल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली होती. पंचवटीतील पारंपरिक होळीसह शहरातील विविध उपनगरांमध्येही होलिकोत्सव साजरा करण्यात आला.

बुधवारी सायंकाळच्या सुमाराला सार्वजनिक आणि घरोघरी होळीचे प्रज्वलन करण्यात आले. त्या अगोदर शेणाच्या गोवऱ्या, ऊस, एरंडाच्या झाडाची पाने आदी साहित्याच्या सहाय्याने होळी सजविण्यात आली होती. महिलांनी होळीभोवती सडे घालत रंगबेरंगी रांगोळीही रेखाटली. सार्वजनिक जागेत वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा कोपऱ्या-कोपऱ्यांवर या होळीचे प्रज्वलन करण्यात आले. दिवस मावळून अंधार दाट झाल्यानंतर होळीस नैवेद्य दाखविण्यात आला. यासोबतच होळीच्या विस्तवावर खोबरे भाजून प्रसादाचे वाटपही करण्यात आले.

होलिकोत्सवामुळे अबालवृध्दांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सायंकाळी पुरणपोळी आणि गोडधोडाच्या नैवेद्यामुळे या सणास रंगत आली. पंचवटीत काही ठिकाणी मंत्रोच्चारात होळी प्रज्वलीत करण्यात आली. अमंगल प्रवृत्तींचा नाश करण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली. याशिवाय शहरातील उपनगरांमध्ये विविध सोसायट्यांच्या समोरही होळी प्रज्वलीत करण्यात आली.

...

गोवऱ्या विक्रेत्यांची लक्षणीय उपस्थिती

होळीमुळे जिल्ह्यातील आदिवासी आणि इतर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर गोवऱ्या विक्रेत्यांनी हजेरी लावली. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी परिसरातील गोवऱ्या विक्रेत्यांची संख्या लक्षणीय होती. ग्राहकांनीही या विक्रेत्यांकडील होळी साहित्य खरेदी करण्यास प्राधान्य दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनिता विकाम मंडळतर्फे जनजागृती

$
0
0

वनिता विकास प्रशालेत जनजागृती फेरी

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

येथील वनिता विकास मंडळ प्रशालेतर्फे बुधवारी मतदार जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. गोरेवाडी, हिवाळेवाडी, शास्त्रीनगर नाशिकरोड या परिसरात मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान करण्याविषयी विविध घोषणा दिल्या. या फेरीत इयत्ता पाचवी ते अठवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षक सहभागी झाले होते. या जनजागृती फेरीनंतर शाळेत पालकांसाठी सभा घेण्यात आली. या सभेत समूह साधन केंद्रच्या केंद्र प्रमुख राजश्री गांगुर्डे, संस्थेच्या सहकार्यवाह कविता देशपांडे, मुख्याध्यापक अनिल नागरे, मुख्याध्यापिका गीता घुटे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा धरती पांडे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा मोरे उपस्थित होत्या. यावेळी उपशिक्षिका मंजुषा उदार व केंद्र प्रमुख राजश्री गांगुर्डे यांनी उपस्थित पालकांना मतदान करण्याविषयी मार्गदर्शन व आवाहन केले तसेच आपल्या परिसरात मतदान जनजागृती करण्याविषयी सांगितले. सभेचे सूत्रसंचालन सुप्रिया बनसोड यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल नागरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक बिझनेस मिट’चे अनावरण

$
0
0

'नाशिक बिझनेस मिट'चे अनावरण

सातपूर : अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर असोसिएशन (आयमा) संघटनेच्या वतिने जुलै महिन्यात बिझनेस मिटचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी आलेले आयु्क्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते नाशिक बिझनेस मीट पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात मोठे उद्योग समुहांनी यावे याकरीता बिझनेस मिटचे आयोजन करण्यात आले. असल्याचे आयमाचे अध्यक्ष वरूण तलवार यांनी सांगितले. बिझनेस मिटसाठी तरूण उद्योजकांचा मोठा सहभाग राहणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सूर्याच्या अंतिम किरणापासून...’ नाटक सादर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठान व कलाकौस्तुभ संस्था नाशिक यांच्या वतीने कुसुमाग्रज स्मरण या कार्यक्रमांतर्गत 'सूर्याच्या अंतिम किरणापासून सूर्याच्या प्रथम किरणापर्यंत' या नाटकाचा प्रथम प्रयोग नुकताच कुसुमाग्रज स्मारक, येथे सादर झाला. हा शुभारंभाचा नाट्यप्रयोग कलाकौस्तुभ संस्थेने कुसुमाग्रजांना अर्पण केला.

हिंदी साहित्यातील प्रथितयश नाट्यलेखक सुरेंद्र वर्मा यांचे 'सूर्य की अंतीम किरण से सूर्य की पहली किरण तक' हे दर्जेदार नाटक. नाटकाची बांधणीच इतकी सुदृढ की नाटक राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एन. एस. डी.), नवी दिल्ली येथील अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश केला आहे. ही भारदस्त नाट्य कलाकृती, मराठी भाषेमध्ये नाशिकचे नाट्यकर्मी सतीश कोठेकर यांनी अनुवादित केली आहे. 'नियोग विधी' या प्रथेचा उल्लेख मनुस्मृतीमध्ये आहे. महाभारत काळामध्ये ही प्रथा समाजामध्ये प्रचलित होती. यानुसारच कौरव, पांडवांची उत्पत्ती तथा महाभारत घडले. या ऐतिहासिक दाखल्याची नोंद घेत, असामान्य, खळबळजनक, संवेदनशील कथेवर आधारीत हे दोन तास अवधी असलेले तीन अंकी नाटक आहे. नाटकाचे दिग्दर्शन सतीश कोठेकर यांनी केले होते. नेपथ्य सतीश कोठेकर आणि चंद्रकांत जाडकर, पार्श्वसंगीत स्वप्निल कोठेकर, संगीत संचालन इंद्रनील कोठेकर, वेशभूषा नीता सतीश आणि प्रणाली कोठेकर, रंगभूषा माणिक कानडे, प्रकाश योजना रवी रहाणे, कलावंत सतीश कोठेकर, पल्लवी ओढेकर, रवींद्र कटारे, डॉ. सोनाली कुलकर्णी-गायकवाड, विवेकानंद भट, सागर कोरडे, मनीषा अक्कर-शिरसाट, प्रशांत सोनवणे यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची सेवा सुधारणार!

$
0
0

विविध सेवांचे मोबाइल, मेलवर मिळणार संदेश अन् प्रमाणपत्र

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या १९ नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू दाखल्यासह ५० प्रकारच्या विविध सेवा-सुविधांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणि गतिमानता आणून त्या अधिकाधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. या सेवांसाठी नागरिकांना आता सुविधा केंद्रामध्ये चकरा कमी होणार असून, विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अर्जाच्या स्थितीची माहिती मोबाइलवर मॅसेजद्वारे व मेलद्वारे पाठविली जाणार आहे. तसेच, अर्जकर्त्यांना हार्डकॉपीसाठी वाट पहावी लागणार नसून सॉफ्टकॉपी मोबाइल, मेलवर तर हार्डकॉपी स्पीडपोस्टद्वारे घरबसल्या मिळणार असल्याची माहिती गमे यांनी दिली.

आयुक्त गमे यांनी आता प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. गमेंनी कार्यालयातील मुक्काम आता फिल्डवर हलवला असून, पालिकेच्या विविध प्रकल्पांसह कार्यालयांच्या भेटी सुरू केल्या आहेत. विभागीय कार्यालये, रुग्णालये तसेच नागरी सुविधा केंद्रांना भेटी देऊन तेथील प्रत्यक्ष परिस्थिती, नागरिकांना सेवा-सुविधा पुरविताना येणाऱ्या प्रशासकीय पातळीवर अडचणींचा आढावा घेतला जात आहे. त्यात नागरी सुविधा केंद्रांचा कारभार ऑनलाइन असला तरी, काम प्रत्यक्षात ऑफलाइन सुरू असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांना विविध कामांसाठी अनेकदा हेलपाटे माराव्या लागत असल्याचे समोर आले, तर काही प्रमाणपत्रांसाठी गरज नसलेल्या कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे समोर आले. त्यामुळे या त्रुटी दूर करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

नागरी सेवा-सुविधा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जकर्त्याला अनुक्रमे रुग्णालय व स्मशानभूमीतून प्रमाणपत्र मिळवावे लागते. ते प्रमाणपत्र अर्जासोबत सादर केल्यानंतरच क्लिष्ट प्रक्रियेअंती मिळते. वास्तविक या सर्व यंत्रणा महापालिकेशी संबंधित असल्याने नागरी सेवा केंद्रांवर अर्ज केल्यानंतर या बाबींची तत्सम पडताळणी यंत्रणांनीच करायला हवी. यामुळे नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी या प्रक्रियेत काही सुधारणा केल्या जाणार आहेत. नागरी सेवा केंद्रांकडे अर्ज करणाऱ्या अर्जकर्त्यांला त्याने दाखल केलेल्या प्रकरणाची स्थिती काय याची माहिती मोबाइल संदेशाद्वारे कळवली जाणार आहे. त्याचबरोबर प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर ते मेलवर अथवा व्हॉट्सअॅपवर पाठविले जाणार आहे. त्याचबरोबर प्रमाणपत्र स्पीडपोस्टाद्वारे अर्जकर्त्याला घरपोच पाठविण्याबाबत उचित कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली.

...

आता स्व:सांक्षाकित प्रतिज्ञापत्र

महापालिकेच्या विविध प्रमाणपत्रांसाठी प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते. विवाह नोंदणीसाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक असल्याने ही प्रक्रिया क्लिष्ट झाली आहे. विवाह नोंदणी अर्ज सादर करताना स्टॅम्पपेपरवरील प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्राची अट रद्द करून साध्या कागदावर स्व:साक्षांकित प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांची आर्थिक बचतही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणेसाठी ‘अलायन्स’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-पुणे या हवाई मार्गासाठी अलायन्स एअर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया पार पडून येत्या पावसाळ्यात ही सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. नाशिक-मुंबई आणि नाशिक-सिंधुदुर्ग या दोन मार्गांसाठी अद्याप कंपनीची निश्चिती झालेली नाही.

'उडे देश का आम आदमी' हे घोषवाक्य असलेली उडान योजना केंद्र सरकारने सुरू केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नाशिक-पुणे आणि नाशिक-मुंबई या दोन सेवांचा समावेश होता. हे दोन्ही मार्ग एअर डेक्कन या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने सेवा सुरू केली पण ती अतिशय सुमार दर्जाची होती. त्याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनियमित आणि बेभरवशाची ही सेवा अखेर गेल्या वर्षी बंद पडली. त्यानंतर मुंबई आणि पुणे हे दोन्ही मार्ग उडानच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील नाशिक-पुणे या मार्गासाठी एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून त्यासंदर्भातील कार्यवाही सध्या सुरू आहे. सर्व प्रक्रिया पार पडून ही सेवा येत्या पावसाळ्यात सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यास अलायन्स एअरच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

कांडला सेवा लांबणीवर

अलायन्स एअरकडून सध्या नाशिकहून हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन सेवा सुरू आहेत. त्यास चांगला प्रतिसाद लाभत आहे. अहमदाबादची सेवा पुढे कांडला बंदरापर्यंत करण्याचे कंपनीकडून प्रस्तावित आहे. मार्चमध्ये ही सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कांडला बंदर विमानतळाचे काम सध्या पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण झाल्यावरच सेवा सुरू होणार आहे. त्यास साधारण एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे.

हिंदनची सेवा मेमध्ये

इंडिगो कंपनीने येत्या १२ मे पासून कोल्हापूरहून तिरुपती आणि हैदराबाद या दोन सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यातच हिंदन (गाझियाबाद) येथील विमानतळाचे काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. त्यामुळे इंडिगो कंपनीकडून नाशिकहून हिंदन, भोपाळ आणि बंगळुरू या सेवा मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीने विविध कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सेवेच्या घोषणेची नाशिककरांना प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काम चांगले, पण रेटिंग वांगले!

$
0
0

मनपा अॅपला अवघे ३.५ स्टार

...

एनएमसी ई कनेक्ट अॅपवरील तक्रारी

प्राप्त तक्रारी : ३७ हजार २९३

तक्ररींचा निपटारा : ३७ हजार १४०

प्रलंबित तक्रारी : १५३

....

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेचे प्रशासन गतिमान आणि अधिक पारदर्शक करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनएमसी ई कनेक्ट अॅपवरील तक्रारींचा निपटारा ९९ टक्के होत असला तरी नागरिकांकडून पालिकेला तक्रारी सोडविल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाकंनाबाबत (रेटिंग) हात आखडता घेतला जात आहे. नागरिकांच्या प्रतिसादाअभावी पालिकेचा स्वच्छतेतील टक्का घसरल्याने आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालिकेच्या कामगिरीबाबत नागरिकांचा प्रतिसाद वाढवण्यासह रेटिंग सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रतिसाद आणि रेटिंगबाबत पालिकेच्या कार्यालयांसह नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

नागरिकांच्या तक्रारी जलद गतीने सोडविण्यासाठी महापालिकेकडून २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्मार्ट नाशिक ॲप्लिकेशनची निर्मिती केली होती. त्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या तक्रारी करणे शक्‍य झाले. स्मार्ट नाशिक ॲप्लिकेशन तब्बल ५८ हजार नाशिककरांनी डाऊनलोड केले होते. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या ॲप्लिकेशनमध्ये बदल करीत एनएमसी ई-कनेक्‍ट सुधारित ॲप्लिकेशन आणले. त्यात चोवीस तासांत तक्रारीची दखल घेण्याबरोबरच सात दिवसांत निवारण करणे बंधनकारक केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे नागरिकांचा तक्रारींकडे ओढा वाढला. या तक्रारी सोडविताना महापालिकेचा प्रतिसाद कसा होता, याबाबत फिडबॅक तसेच, तक्रारी सोडविल्याबद्दल रेटिंग देण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, महापालिकेचे तक्रारी सोडविण्याचे प्रमाण जास्त असले तरी, त्या तक्रारी सोडविल्याबद्दल रेटिंग देतांना मात्र नागरिक कुचराई करीत असल्याचे चित्र आहे. एनएमसी ई कनेक्ट अॅपवर आतापर्यंत ३७ हजार २९३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ३७ हजार १४० तक्रारी पालिकेने सोडविल्या आहेत. केवळ १५३ तक्रारी प्रलंबित असून, त्यावर कारवाई सुरू आहे. नागरिकांकडून आलेल्या तक्रारी सोडविण्याचे प्रमाण हे ९९.५९ एवढे आहे. त्यामुळे पालिकेला फाइव्ह स्टार रेटिंग मिळणे अपेक्षित आहे. परंतु, सद्यस्थितीत नागरिकांकडून केवळ ३.५ ऑनलाइन रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे या तक्रारी सोडविण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेटिंग कमी मिळत असलेल्या प्रकाराची आयुक्त गमेंनी गंभीर दखल घेतली आहे. रेटिंग वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असून, नागरिकांमध्ये पालिकेच्या कामकाजाबाबत आता जनजागृती केली जाणार आहे. तक्रारी सोडविल्यानंतर रेटिंग देण्याची सवय नागरिकांना लागावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

...

नागरिकांसाठी फिडबॅक फॉर्म

महापालिकेच्या सुविधांसह तक्रारी सोडविण्याच्या कामगिरीबाबत आता पालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये फिडबॅक फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच, महाविद्यालयीन तरुणांच्या मदतीनेही नागरिकांना पालिकेच्या सुविधा कशा वाटतात आणि पालिकेकडून काय करणे अपेक्षित आहे, याबाबतची चाचपणी केली जाणार असल्याचे आयुक्त गमे यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरांवरची कारवाई थांबवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयातर्फे इलेक्ट्रोहोमिओपॅथी (बीईएमएस) चिकित्सा पद्धतीस मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतचे विधेयक संसदेच्या उंबरठ्यावर असताना जिल्हा आरोग्य विभागामार्फत बोगस डॉक्टर शोध मोहिमेच्या नावाखाली इलेक्ट्रोहोमिओपॅथी डॉक्टरांना वेठीस धरण्यात येत आहे त्याबाबत मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या वतीने नुकतीच बैठक घेण्यात आली.

नाशिक येथे बोगस डॉक्टर शोध मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कारवाईबाबत संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. सतीश जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, आरोग्य मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सा पद्धतीमध्ये व्यवसाय करणाऱ्या चिकित्सकांना मान्यता दिली असताना जिल्हा प्रशासनाकडून मात्र वारंवार या व्यावसायिकांना अवैध ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत यापूर्वीही जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्यावर होणारा अन्याय थांबविण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र सरकारने २२ जानेवारी २०१८ रोजी परिपत्रक काढून महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायदा १९६१ च्या कलम २ व ३ नुसार विनानोंदणी आपला व्यवसाय इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सा पद्धतीमध्ये करू शकतात, असे स्पष्ट केले आहे. असे असतानाही नाशिक जिल्हा आरोग्याधिकारी या व्यावसायिकांवर कारवाई करीत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून, सर्वोच्च न्यायालय व सरकारी आदेशाचे उल्लंघन करणारी आहे.

बैठकीनंतर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आरोग्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यंदाची निवडणूक अत्यंत जिकीरीची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत जिकीरीची असून, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठीही महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील अनुसुचित जाती विभागाच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा मतदारसंघांमध्ये आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावावा,' असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी बुधवारी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागातर्फे बुधवारी चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने देहाडे नाशिकमध्ये आले होते. नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी(ग्रा) मागासवर्गीय विभागातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वाटप करून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा निरीक्षक किशोर केदारे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, अनुसुचितचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, नगरसेवक राहुल दिवे, सुरेश मारू, रमेश साळवे आदी उपस्थित होते. महात्मा गांधीरोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात देहाडे व केदारे यांनी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर रेड क्रॉस सोसायटी परिसर, बोधलेनगर येथे पाणीवाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकाने बंद केल्यास निवडणुकीवर बहिष्कार

$
0
0

दुकाने बंद केल्यास

निवडणुकीवर बहिष्कार

मनमाड : लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचे कारण दाखवित पोलिस सक्तीने रात्री १० वाजता हॉटेल व दुकाने बंद करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करत ही दंडेलशाही थांबली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा शहरातील हॉटेल व्यावसायिक व व्यापारी वर्गाने पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. 'लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू' असा इशारा देणारे पत्र व्यापाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयोग, विशेष पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शासनाचे नोंदणी दाखला व तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या परवान्यात हॉटेल व इतर काही प्रतिष्ठान पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे; मात्र पोलिस अधिकारी व कर्मचारी सध्या आचारसंहिता सुरू असल्याचे सांगत रात्री १० वाजताच सक्तीने हॉटेल बंद करीत असल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शहरातील अनेक हॉटेल्स ही रेल्वे स्थानकाजवळ आहेत. १० नंतर हॉटेल बंद केल्याने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत आहे. अगोदरच मनमाड परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे त्यातच पोलिसांच्या अशा नियमांमुळे नुकसान होत आहे, असेही हॉटेल व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबड वेअर हाऊसची आज पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंबड येथील वेअर हाऊसमध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील गुरुवारी दुपारी एकत्रितरीत्या येथे पाहणी करणार आहेत.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मत मोजणी अंबड येथील वेअर हाऊसमध्ये केली जाणार आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी गत आठवड्यात वेअर हाऊसची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांसमवेत गुरुवारी (दि.२१) दुपारी चार वाजता ही पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images