Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मृत्यूस कारणीभूत तिघांविरूद्ध गुन्हा

$
0
0

मृत्यूस कारणीभूत तिघांविरूद्ध गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आजारी असतांनाही निष्काळजीपणा केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून उपनगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवराम अप्पाजी केदारे (वय ५५, रा. समतानगर, आगरटाकळी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. केदारे यांचा मुलगा दीपक (वय ३१) हा १६ मार्च रोजी सकाळी घरातून गेला. तो रात्री उशिरापर्यंत परतलाच नाही. त्याचे मित्र संशयित प्रदीप मोरे, शशिकांत उर्फ टिंकू जाधव व नितीन दिवे यांनी घरी येऊन सांगितले, की दीपकला बिटको रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात जाऊन पाहिले असता डॉक्टरांनी दीपकला तपासून मृत घोषित केले. दीपकला कोणतेही व्यसन नव्हते. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हे माहिती असतांना संशयितांनी त्यास जबरदस्तीने दारू पाजली. त्यामुळेच त्रास होऊन त्याचा मृत्यू झाला. संशयितांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयकर विभागाची पालिकेला नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नियमित वेतन घेणाऱ्यांसह सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून प्राप्तीकराची कपात करण्याचा विसर महापालिकेला पडला आहे. महापालिकेच्या माध्यमातून हा कर अदा न झाल्याने आयकर विभागाने अखेर पालिकेला नोटीस बजावली आहे. आयकर विभागाच्या नोटिसीनंतर जागे झालेल्या प्रशासनाने नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वर्षभराची कर कपात करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात कमी वेतन पडणार आहे. तर सेवा निवृत्तांच्या बाबतीत अडचण निर्माण झाल्याने त्यांना महापालिकेने संबंधितांना प्राप्तीकराची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेतर्फे गेल्या वर्षभरात कोणत्याही कराची वजावट करण्यात आलेली नव्हती. ही बाब आयकर विभागानेच पालिकेच्या लक्षात आणून देत नोटीस बजावली आहे. त्यानंतर नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वर्षभराचा कर अदा करणे शक्‍य असले तरी, सेवानिवृत्तांचा वेतन अदा करण्याशिवाय पालिकेशी संबंध येत नसल्याने प्रशासनाची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तांना नोटीस पाठवून बँकेत कराची ठराविक रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबाद महाविद्यालय नामकरणाला मिळेना मुर्हूत

$
0
0

कै. पोपटराव पिंगळे यांचे नाव अद्याप प्रस्तावितच

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबादचे सुपूत्र व सहकारमहर्षी कै. पोपटराव पिंगळे यांच्या निधनानंतर मखमलाबादच्या कला व वाणिज्य महाविद्यालयास त्यांचे नाव देण्याच्या घोषणेला दशक उलटले आहे. मात्र अजूनही महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. येत्या ७ एप्रिल रोजी कै. पिंगळे यांचा स्मृतिदिन आहे. यावेळी तरी मविप्र समाज संस्थेने त्यांचे नाव महाविद्यालयास देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी अपेक्षा मविप्र समाज वर्तुळातून व्यक्त होते आहे. यासंदर्भात मविप्र समाजाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी संस्थेस निवेदन देऊन पिंगळे यांचे नाव महाविद्यालयास देण्याची मागणी केली आहे.

कै. पिंगळे यांनी शिक्षणासोबतच कृषी, सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता. राष्ट्रसेवा दल आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी समाजात रचनात्मक कामास प्राधान्य दिले होते. मखमलाबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना करून सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रवेश केला होता. यानंतर मखमलाबाद हायस्कूलची स्थापना, नाशिक तालुका पंचायत समिती, नाशिक जिल्हा भू विकास बँक, नाशिक जिल्हा कांदा बटाटा संघ, नाशिक सहकारी कारखान्याची उभारणी, पहिल्या गळीत हंगामाचे यशस्वी नेतृत्व, आळंदी धरणासाठी आंदोलने आदी संस्था-वर्तुळाच्या माध्यमातील त्यांच्या ठळक कार्याचा संदर्भ सरचिटणीसांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आला आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते त्यावेळी पिंगळे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.

निवेदनावर संस्थेचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, माजी सभापती अॅड. नितीन ठाकरे, माजी खासदार माधवराव पाटील, माजीमंत्री विनायकदादा पाटील, माजी अध्यक्ष अरविंद कारे, माजी महापौर प्रकाश मते, ज्येष्ठ विधीज्ञ दौलतराव घुमरे आदींच्या सह्या आहेत.

...

डॉ. पवारांनी केली होती घोषणा

एप्रिल २००८ मध्ये पिंगळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत मविप्रचे तत्कालीन सरचिटणीस डॉ. वसंतराव पवार यांनी मखमलाबादच्या नियोजित कला व वाणिज्य महाविद्यालयास स्व. पिंगळे यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. या घोषणेस आता दशकभराचा कालावधी उलटत असल्याने संस्थेने आता याबाबत कार्यवाही करीत असे नामकरण केल्यास त्यांच्या येत्या स्मृतिदिनास खरी श्रध्दांजली ठरेल, अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रज्ञा शोध १६ जूनला

$
0
0

नाशिक : राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा १६ जून रोजी ही परीक्षा होणार आहे. राज्यस्तर परीक्षेत निवड झालेल्या इयत्ता दहावीच्या पात्र विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी या परीक्षेची १२ मे ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणूक कामकाजामुळे १६ जून रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत ४ नोव्हेंबर २०१८ रोजी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) घेण्यात आली होती. राज्यातून ८६ हजार २८१ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट होते. या परीक्षेत एनसीईआरटी नवी दिल्लीकडून राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातून ३८७ विद्यार्थी कोटा ठरविण्यात आला असून, या विद्यार्थ्यांची यादी १ मार्च रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. यामध्ये निवड झालेले विद्यार्थी १६ जून रोजी होणाऱ्या परीक्षेस पात्र ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचालकाविरोधात गुन्हा

$
0
0

लाच मागितल्याचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

बेकायदा मुरूम वाहतूक करण्याच्या मोबदल्यात कारवाई न करण्यासाठी दरमहा हप्ता म्हणून लाच मागितल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी नांदगाव तहसील कार्यालयात काही महिन्यांपूर्वी कार्यरत असलेल्या वाहनचालक ज्ञानेश्वर कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तात्कालिक तहसीलदार भारती सागरे यांच्यासाठी दहा हजार व स्वतःसाठी दोन हजार असे १२ हजार रुपये चालक कदम याने लाच म्हणून मागितल्याची तक्रार मनमाड येथील तक्रारदाराने नाशिक 'एसीबी'कडे डिसेंबर २०१८ मध्ये दाखल केली होती. याप्रकरणी ३१ डिसेंबर २०१८ रोजी पंचासमक्ष लाचेची मागणी करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने व नंतरच्या काळात 'एसीबी'ने केलेल्या तपासात तक्रारदाराकडे लाचेची मागणी होत असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून 'एसीबी'ने गुरुवारी कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम, वैभव देशमुख, नितीन कराड आदींनी ही कारवाई केली. या प्रकरणी नांदगाव तहसीलमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या हा वाहनचालक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे स्त्रीदाक्षिण्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील अन्य पक्षांतील उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी देण्याचा सपाटा लावला असतानाच उत्तर महाराष्ट्रात उमेदवारी देताना महिलांना प्राधान्य दिले आहे. येथील सहापैकी चार जागांवर भाजपने महिलांना उमेदवारी बहाल केली असून, विशेष म्हणजे या चारही महिलांचा सामना पुरुष उमेदवारांसोबत होणार आहे.

या भागात भाजपच्या दोन महिला महापौर असून, एक जिल्हा परिषद अध्यक्षा असल्याने भाजपने उमेदवारीसाठी महिलांवरच अधिक विश्वास दाखविला आहे. आता महिला मतदार त्यांना कितपत साथ देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असले, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या आरक्षणाची मागणी धूळ खात पडून आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी आरक्षण नसल्याने महिला या दोन संस्थांमध्ये तशा दुर्लक्षित आहेत. काही ठिकाणी महिलांनी स्वबळावरच आपली ताकदही सिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुकीत ओडिशात बिजू जनता दलाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महिलांना विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के जागांवर उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे, तर पश्चिम बंगालमध्येही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उमेदवारी देताना महिलांना झुकते माप दिले आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपनेही महिलांना उमेदवारी देताना हात आखडता घेतला आहे. भाजपनेही राज्यात महिलांबाबत हात आखडता ठेवला असला, तरी उत्तर महाराष्ट्रात मात्र त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा असून, त्यातील दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या पाच जागा भाजपकडे आहेत, तर नाशिकची एकमेव जागा शिवसेनेकडे आहे. भाजपने पाचपैकी चार लोकसभा मतदारसंघांत महिलांना उमेदवारी बहाल केली आहे. दिंडोरीतून राष्ट्रवादीकडून आयात केलेल्या डॉ. भारती पवार, नंदुरबारमधून डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांना रिंगणात उतरविले आहे, तर रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. या चार जागांवर महिलांचा विजय झाला, तर उत्तर महाराष्ट्रात भाजपचे महिलाराज अवतरणार आहे. नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या रंजना भानसी असून, जळगावच्याही भाजपच्या महापौर सीमा भोळे आहेत. जळगाव जिल्हा परिषदेत भाजपच्याच उज्ज्वला पाटील या अध्यक्षा आहेत, तर नाशिकमध्ये सीमा हिरे आणि प्रा. देवयानी फरांदे यांच्या रुपाने दोन महिला आमदार आहेत. भाजपच्या कोट्यातील धुळे या एकमेव जागेवर केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे हे उमेदवार आहेत.

--

पुरुषांशीच सामना!

भाजपने पाचपैकी चार जागांवर महिलांना उमेदवारी दिली असली, तरी त्यांचा सामना या पाचही ठिकाणी विरोक्षी पक्षांतील पुरुषांशी होणार आहे. दिंडोरीत डॉ. पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीचे धनराज महाले यांचे आव्हान राहणार आहे, तर नंदुरबारमध्ये हीना गावित यांच्यासमोर आमदार अॅड. के. सी. पाडवी यांचे आव्हान आहे. जळगावमध्ये स्मिता वाघ यांचा सामना राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्याशी होणार आहे. रावेरमध्येही रक्षा खडसे यांची लढत चंद्रकांत पाटील किंवा डॉ. उल्हास पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चारही लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक तालुक्यातील चाकोरे शिवारात उसाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. शेतकऱ्याच्या पाठीला, हाताला बिबट्यान पंजा मारल्याने ते जखमी झाले आहेत. जखमी शेतकऱ्यावर त्र्यंबकच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चाकोरे शिवारात सुका महादू खाडे यांची उसाची शेती आहे. सुका खाडे आपल्या कुत्र्यासह शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता अचानक जंगलातून आलेल्या बिबट्याने कुत्र्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पण ती सुका याच्यावरच पडली. पाठीला पायाचा पंजा लागल्याने सुका जखम झाले. त्यांच्या हातालाही लखम झाली आहे. त्यांनी हातातील कुऱ्हाडीने प्रतिकार केल्यामुळे बिबट्या जंगलात पळून गेला. जखमी सुका खोडे यांच्यावर त्र्यंबकच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघांचा अर्ज दाखल न झाल्याने संभ्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या गुरुवारी पहिल्या दिवशी रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. मात्र, बुधवारी घोषणा करूनदेखील गुरुवारी दुपारपर्यंत जळगावच्या जागेसाठी युतीच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांनी अर्ज दाखल न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता आमदार वाघ या केव्हा अर्ज दाखल करतात, मुहूर्त का हुकला याबाबतही वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे.

रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अनुक्रमे खासदार रक्षा खडसे व आमदार स्मिता वाघ गुरुवारी आपले नामनिर्देशन दाखल करतील, असे नियोजन पक्षाकडून करण्यात आले होते. याबाबत अधिकृत घोषणादेखील करण्यात आली होती. या वेळी शक्तिप्रदर्शनही केले जाणार होते. प्रत्यक्षात मात्र, खासदार खडसे यांनीच आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. आमदार स्मिता वाघ या जिल्हाधिकारी कार्यालयात रक्षा खडसे यांच्यासोबत आल्या होत्या. मात्र, त्यांनी अर्ज दाखल केला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याने नाराजी व्यक्त केली होती. खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आल्याने ए. टी. पाटील व पक्षातील काहींनी विरोधही केला होता. पारोळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ए. टी. पाटील यांनी वाघ दाम्पत्यावर टीका केली होती. तसेच काँग्रेस उमेदवार बदलू शकते, तर भाजपही तसा निर्णय घेऊ शकते, अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर आमदार स्मिता वाघ यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने संभ्रमात वाढच झाली. दरम्यान, आमदार स्मिता वाघ या आजचा मुहूर्त साधत आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शक्तिप्रदर्शनाद्वारे भरले अर्ज

$
0
0

महाआघाडीची रॅली तर युतीने घेतला मेळावा; स्मिता वाघांचा अर्ज उद्या

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी (दि. २८) प्रसिद्ध झाली. नामनिर्देशन भरण्याच्या पहिल्याच दिवशी रावेर मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीकडून रक्षा खडसे यांचा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून जळगाव मतदारसंघातून गुलाबराव देवकर यांचे अर्ज सादर करण्यात आले. आघाडीने जाहीर सभा व रॅली काढून तर भाजप-शिवसेना युतीने सागर पार्कवर मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरासह मध्यवर्ती जळगाव शहर घोषणांनी दणाणले होते.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात दि. २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जळगावसाठी आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी तर रावेरसाठी युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीकडून अर्ज सादर करण्यापूर्वी शिवतीर्थ मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या व्यासपीठावर जिल्ह्याचे प्रभारी आमदार दिलीप वळसेपाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, आमदार डॉ. सतीश पाटील, उमेदवार गुलाबराव देवकर, गफ्फार मलिक, माजी खासदार वसंतराव मोरे, दिलीप वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, आमदार सुधीर तांबे, डी. जी. पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला जाहीर सभेत शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर. ओ. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

नेत्यांकडून भाजपवर टीका
दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना केंद्र सरकावर टीका केली. या वेळी त्यांनी भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. तसेच आता जनता जागृत झाली असून, भूलथापांना बळी पडणार नाही असे सांगितले. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी महाआघाडीतील सर्व मित्रपक्षांनी एकत्र येऊन दोन्ही उमदेवार विजयी करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, अरुण गुजराथी यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली.

ए. टी. पाटलांचे तिकीट का कापले?
आमदार डॉ. सतीश पाटील यांनी भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना त्यांनी विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट का कापले, असा सवाल केला. मंत्री गिरीश महाजन व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पैसे घेतल्याचा आरोप करीत तोडपाणी करणाऱ्यांना तिकीट देणार का, असा प्रश्नही डॉ. पाटील यांनी विचारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुबारमध्ये भरत गावितांची बंडखोरी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मुलगा भरत गावित यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे माजीमंत्री माणिकराव गावित हे दिल्लीत तळ ठोकूनही काँग्रेसने नवापूरचे विद्यमान आमदार ॲड के. सी. पाडवी यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे गावित कुटुंबांमध्ये पक्षाबाबत नाराजी पसरली आहे. आता भरत गावित नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. उद्या (दि.३०) नवापूर येथे गावित यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून, त्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. पक्षाशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहूनदेखील उमेदवारी न मिळाल्याने गावित कुटूंब नाराज झाले आहे. भरत गावित प्रसंगी अपक्ष उमेदवारी करण्याचा विचारात असल्याचीही चर्चा आहे.

शिवसेनेचा डॉ. गावितांना विरोध
धुळे : धुळे लोकसभेचे युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना मित्रपक्ष शिवसेनेनेच विरोध दर्शविला आहे. काही दिवसांपूर्वी धुळे महानगर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच भाजपाचे लोकसभा उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना कोणतीही मदत निवडणुकीसाठी करणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. त्यानंतर आता साक्री तालुका शिवसेनेने युतीला घरचा आहेर देत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या साक्री तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. हीना गावित यांना कोणतीही मदत करणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली आहे. खासदार डॉ. हीना गावित यांनी शिवसेनेला सोबत घेऊन काम केलेले नाही. गावित यांच्या कोणत्याही कार्यक्रमांच्या फलकावर शिवसेना पदाधिकारी अथवा कार्यकर्ते यांचे नाव व फोटो कधीही घेण्यात आलेला नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

‘भाजपच्या काळात महिला असुरक्षित’
धुळे : भाजपच्या हाती केंद्रात व राज्यात सत्ता आल्यानंतर साडेचार वर्षांत कधी नव्हे एवढे महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे महिला असुरक्षित झाल्या असून, महिलांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होताना दिसत असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांनी केला आहे. निवडणूक प्रचारार्थ शहरातील विविध भागामधील महिलांच्या भेटी घेत असताना त्या बोलत होत्या. महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, महिला असुरक्षित झाल्या आहेत, असेही पाटील यांनी महिलांना माहिती देताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेना युती माझ्यामुळेच झाली

$
0
0

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा युतीच्या मेळाव्यात पुनरुच्चार

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भाजप व शिवसेनेची युती ही माझ्यामुळेच झाली आहे, असा पुनरुच्चार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मेळाव्यात केला. तसेच कोल्हापूर येथे झालेल्या युतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आपल्या भाषणात गिरीश महाजन यांच्यासाठी आपण युती केली असल्याचा खुलासा केला असल्याचेही महाजन यांनी सांगितले. भाजप-शिवसेना युतीकडूनदेखील गुरुवारी (दि. २८) रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला. या वेळी अर्ज भरल्यानंतर सागर पार्कवर युतीचा मेळावा झाला त्यावेळी महाजन बोलत होते.

हल्ली मला ‘संकटमोचक’, ‘सुपरमॅन’ अशा शब्दांच्या बिरुदावल्या लावल्या जात आहेत. मात्र, या अविर्भावात राहू नका कारण मी एकटा काहीही करू शकत नाही. आपण सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक असून, त्यांचा मार्गदेखील जळगावमधून जाणार असल्याचे महाजनांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही टीका करत त्यांच्या जिभेला हाडच नसून, ते काहीही बडबड करत असल्याचा आरोप या वेळी बोलताना केला.

नेमक्या वेळीच युती का तुटते?
भाजपशी युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली असून, ती कायम रहावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, भाजप केवळ लोकसभेच्या वेळेस शिवसेनेची मदत घेते तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेला दूर ठेवून सत्ता मिळवली जाते, अशी टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. आता जशी आमची मदत घेतात, तशी मदत इतर निवडणुकीत आमचीही करा, असा टोलाही पाटील यांनी लगावला. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांचा असतात. हा तोच कार्यकर्ता असतो की जो भाजपला लोकसभेच्या वेळेस मदत करतो. मात्र, त्यांच्या निवडणुकांचे लग्न जवळ आले की भाजपकडून लगेच फारकत घेतली जाते, असा चिमटाही शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी काढला. भाजपशी ‘लव्ह मॅरेज’ झाले असून, हे लव्ह मॅरेज कायमस्वरुपी टिकवा, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसला जवळ केले आहे. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचा मुलगा पक्षात घेतला तसेच शिवसेनेलाही जवळ घ्या, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत

$
0
0

जि. प. सीईओ डॉ. गिते यांनी दिली माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात बांधकाम विभाग, लघु पाटबंधरे विभाग तसेच पाणीपुरवठा विभाग प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिम (पीएमएस) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून यापुढे मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पद्धतीनेच करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेस ग्रामविकास विभागाचे याबाबतचे पत्र शुक्रवारी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर निवड झाली असून अंगणवाडींच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सरकारने 'सीडॅक'ची निवड केली असून या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास पेपरलेस कारभार होण्यास मदत होणार असून विविध फाईलींचा प्रवास यामुळे थांबणार असून विनाविलंब देयक अदा करता येणार आहे. या प्रकल्पात काही सुधारण करण्याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार सरकारने ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभाग या प्रकल्पांसाठी कामाची मोजमाप पुस्तिका प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टिममधील संगणकीकृत पद्धतीने राबविण्यास मान्यता दिली आहे.

प्रत्येक पानावर स्वाक्षरी

या सिस्टीममध्ये कोणत्या अभियंत्याने कोणती माहिती भरली ते समाविष्ट करणे, संबंधित अभियंत्याने माहिती भरल्यावर त्याची प्रिंट काढून मोजमाप पुस्तिकेत चिटकविणे, त्यानंतर शाईने प्रिंट आऊटवर चारही बाजुने तिरप्या रेषा मारून साक्षांकित करणे, प्रत्येक पानावर अभियंत्याने स्वाक्षरी करणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

आधी बदल सिस्टिममध्ये

कोणताही बदल करावयाचा झाल्यास तो सर्वप्रथम सिस्टिमवरच करावा, शाईने करू नये, अशाही सूचना राज्य सरकारने दिल्या आहे. त्यामुळे या कामात पारदर्शकता राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी विद्यार्थ्यांमुळे शाळा झाली डिजिटल

$
0
0

बेलगंगा विद्यालयाचे आठ वर्ग झाले स्मार्ट; मंगळवारी उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, चाळीगसाव

'माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजली शाळा', '५० वर्षांनंतर भरला वर्ग', अशा आशयाच्या बातम्या नेहमी दैनिकांतून वाचत असतो. जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट घेण्यासाठी आणि शिक्षकांचा आशीर्वाद घेण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन करून एक दिवस भूतकाळात रमायचे एवढेच या मेळाव्याचे फलित अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना येथील बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यापलीकडे जाऊन शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श उभा केला आहे. व्हॉटस् अॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून आवाहन करीत, एकमेकांशी संवाद साधत या माजी विद्यार्थ्यांनी एक दोन वर्ग नव्हे तर संपूर्ण शाळाच डिजिटल करण्यासाठी निधी उभारला आहे. येत्या मंगळवारी, २ एप्रिल रोजी या आदर्शवत उपक्रमाचे मोठ्या दिमाखात लोकार्पण होणार आहे. हे कार्य पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जी. एन. ढगे सर यांचा सिंहाचा वाटा आहे.

बेलगंगा साखर कारखाना वसाहतीवर बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडविले. आज ते विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत. मात्र तरीही आयुष्यातील पहिली शाळा, पहिले शिक्षक, जुने मित्र यांच्याविषयीची ओढ कायम राहतेच. दहावीनंतर उच्च शिक्षण, पदवी, नोकरी, लग्न, संसार आणि मुलांच्या संगोपणात अडकल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जर एकमेव ठिकाण असेल तर ते म्हणजे माध्यमिक शाळा. आयुष्याची खरी जडणघडण याच शाळेत झालेली असल्यामुळे शाळेविषयी, तिथल्या परिसराविषयी, शिक्षकांविषयी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांच्या मनात एक आठवणींचा आणि आदराचा असा कोपरा असतो. त्याच आठवणींना साद घालत शाळेचे मुख्याध्यापक जी. एन. ढगे सरांनी काही माजी विद्यार्थ्यांजवळ आपला मानस बोलून दाखवला आणि शाळेचे डिजिटलायजेशनाचे रोप रोवले गेले. पाहता पाहता माजी विद्यार्थ्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. फेसबुक, व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून सगळे माजी विद्यार्थी ढगे सरांशी जोडले गेले. काहींनी थेट शाळेत येवून मदत केली तर काहींनी आपल्या मित्रांच्या हातोहात मदत पोहच केली.

संपूर्ण शाळा झाली डिजिटल

माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीतून आठ वर्गांसाठी प्रत्येकी ५० इंची स्मार्ट अॅण्डड्रॉइड टीव्ही संच आणि वर्गाचा संपूर्ण अभ्यासक्रम असलेला पेन ड्राईव्ह खरेदी करण्यात आला आहे. या भरघोस निधीसाठी सन १९९० ते २००५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत केली.

मंगळवारी उद्घाटन

२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बेलगंगा शाळेत शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या हस्ते आणि चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव विनोद कोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या आदर्शवत उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री एम. के. पाटील असतील. कार्यक्रमाला सचिन परदेशी (गट शिक्षण अधिकारी), विलास भोई (शिक्षण विस्तार अधिकारी) उपस्थित राहणार आहेत. सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याध्यापक ढगे सर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'अस्तिव'तर्फे महिलांचा सन्मान

राज्य बॅडमिंटन स्पर्धेत दर्शनाला विजेतेपद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई येथील परळीमध्ये मनोरा बॅडमिंटन अकॅडमीतर्फे झालेल्या १०२ व्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत दहा वर्षांखाली मुलींच्या गटात नाशिकच्या दर्शना राजगुरूने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत २९२ खेळाडू सहभागी झाले होते. दर्शनाने अंतिम फेरीत मुंबईच्या अन्वेषा शर्माचे आव्हान ३०-८ असे सहज मोडीत काढले. दर्शनाने १३ वर्षांखालील गटातही आपले कौशल्य सिद्ध करीत उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली.

स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, वाशी, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले. खेळाडूंची संख्या अधिक असल्याने उपउपांत्य फेरीनंतर प्रत्येक गटात ३० गुणांचा एकच सेट खेळविण्यात आला. दहा वर्षांखालील मुलींच्या गटात खेळताना दर्शनाने मुंबईच्या अन्वेषा शर्माला निष्प्रभ ठरवले. अन्वेषाला केवळ आठ गुण घेता आले. मात्र, तिला अखेरपर्यंत दर्शनाच्या गुणांच्या जवळही जाता आले नाही. एकतर्फी झालेल्या या लढतीत दर्शनाने ड्रॉप्स शॉट आणि स्मॅशेसचा उत्तम वापर केला. अखेरीस ३०-८ असा पराभव करीत दर्शनाने विजेतेपदावर नाव कोरले. दर्शना सिम्बॉयसिस शाळेत चौथीमध्ये शिकत असून, तिला माणिकनगरमधील शिवसत्य क्रीडासंकुलाचे प्रशिक्षक मकरंद देव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. दर्शनाबरोबरच शिवसत्य क्रीडासंकुलाचे प्रज्वल सोनवणे, श्रावणी वाळेकर, पार्थ देवरे यांनीही चमकदार कामगिरी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समर स्पेशल’चा ठेंगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी मुंबई ते लखनौ आणि एलटीटी ते गोरखपूरदरम्यान दोन समर स्पेशल ट्रेन धावणार आहेत. मात्र, त्यापैकी पहिल्या गाडीच्या थांब्यांच्या यादीतून नाशिकरोडचा, तसेच दोन्हीही गाड्यांच्या थांब्यांच्या यादीतून मनमाडचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे सुटीतही नाशिक-मनमाडच्या प्रवाशांना नेहमीच्या गाड्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

उन्हाळ्याच्या कालावधीत रेल्वेगाड्यांना प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी भारतीय रेल्वेने मध्य रेल्वे मार्गावरून दोन समर स्पेशल ट्रेनच्या ५० फेऱ्यांचे नियोजन जाहीर केले आहे. त्यापैकी पहिली साप्ताहिक समर स्पेशल ट्रेन (०१०१९) सीएसएमटी मुंबई ते लखनौदरम्यान ११ एप्रिल ते ४ जुलैदरम्यान धावणार आहे. ही गाडी प्रत्येक गुरुवारी सीएसएमटीहून सकाळी ११ वाजुन ५ मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी ही गाडी लखनौ येथे दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार आहे. ही गाडी (०२१०८) लखनौ रेल्वे स्थानकातुन १२ एप्रिल ते ५ जुलैदरम्यान प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३ वाजुन १० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सीएसएमटी येथे सायंकाळी ४.४५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या २६ फेऱ्या होणार असून, दादर, कल्याण, इगतपुरी, भुसावळ, इटारसी, भोपाळ, वोरई, झाशी, कानपूर या स्थानकांवर ती थांबणार आहे.या गाडीला १२ स्लीपर क्लास आणि ५ जनरल सेकंड क्लास कोच राहणार आहेत.

--

एलटीटी-गोरखपूरला थांबा

दुसरी साप्ताहिक स्पेशल समर ट्रेन (०१०२३) एलटीटी ते गोरखपूरदरम्यान धावणार असून, या गाडीच्या २४ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी १३ एप्रिल ते २९ जून या कालावधीत एलटीटीहून दर शनिवारी मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता गोरखपूर येथे पोहोचणार आहे. गोरखपूर येथून ही गाडी (०१०२४) १४ एप्रिल ते ३० जूनदरम्यान दर रविवारी दुपारी २ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री ११.५५ वाजता एलटीटीला पोहोचणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, कटनी, अलाहाबाद, वाराणसी, मऊ, बेलथरारोड, औनरीहर, भटनी, देवरिया आदी स्थानकांवर थांबे देण्यात आलेले असून, या गाडीला १३ एसी थ्री टीअर कोचेस राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठात पीएच. डी. अॅडमिशन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास नियमित पूर्णवेळ व अर्धवेळ नियमित पद्धतीने एम. फिल. आणि पीएच. डी. संशोधन शिक्षणक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यता दिली असल्याने पीएच. डीचे प्रवेश सुरू करण्यात आले आहे. या प्रवेशांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना संशोधनपर उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, एम. फिल. आणि पीएच. डी. संशोधन शिक्षणक्रम पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असणार आहे. 'यूजीसी'ने निर्देशित केल्यानुसार एम. फिल. आणि पीएच. डी. शिक्षणक्रमांची संरचना आणि कार्यपद्धती विद्यापीठास बंधनकारक असणार आहे. 'यूजीसी'च्या २०१६ च्या निर्देशानुसार विद्यापीठास हे दोन्ही संशोधन शिक्षणक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

'यूजीसी'चे निकष लागू करीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे २०१२ च्या शैक्षणिक वर्षापासून बंद पडलेली पीएच. डी. काही काळाने सुरू करण्यात आली होती. मुक्त विद्यापीठाने १९९३ ते २०१० या काळात अडीचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डॉक्टरेट दिली. मात्र, गुणवत्ता नसल्याचे कारण पुढे करीत दूरशिक्षण परिषदेतर्फे मुक्त विद्यापीठाकडून पीएच. डी. चे अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यामुळे २०१० ते २०१२ या काळात पीएच. डी. साठी प्रवेश बंद होते. तब्बल पाच वर्षांनंतर २०१७ मध्ये ही पीएच. डी. पुन्हा एकदा सुरू करण्यात आली.

मुक्त विद्यापीठात जे विद्यार्थी या पदवीला प्रवेश घेतात, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, हा मलिदा मिळविण्यासाठी संशोधनाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानेही ही पीएच. डी. बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र प्रवेश होणार असल्याने पुन्हा एकदा पीएच. डी. साठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकाला तरुणांनी लुबाडले

$
0
0

नाशिकरोड : उपनगर येथील ज्येष्ठ नागरिकाला दोन तरुणांनी फसवून त्याच्या 'एटीएम'मधून ३३ हजार रुपयांची रोकड लंपास केली. उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक बाबुराव शिराळे (वय ५९, मनपा वसाहत, महाराष्ट्र हायस्कूलजवळ, उपनगर) यांनी फिर्याद दिली. शिरोळे हे बुधवारी (दि. २७) सकाळी अकराच्या सुमारास स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तेथे दोन तरुण उभे होते. त्यांनी शिराळे यांना तुम्ही बाजूला व्हा, आम्ही तुमचे पैसे काढून देतो असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड काढून घेतले. नंतर बाहेर आल्यावर दुसरेच कार्ड परत करत सांगितले, की तुमच्या खात्यात पैसे शिल्लक नाहीत. शिराळे हे स्टेट बँकेच्या शिवाजीनगर शाखेत गेल्यावर गेल्यावर पासबुक भरून घेतले. बँक कर्मचाऱ्याने खात्यावर कमी रक्कम शिल्लक असल्याचे सांगितल्यावर शिराळे यांना धक्का बसला.

अधिक माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून ३३ हजार रुपये काढण्यात आल्याचे समजतले. नांदूर नाका एटीएममधून बुधवारी रात्री वीस हजार रुपये तर गुरुवारी (दि. २८) सकाळी १३ हजार रुपये काढण्यात आले. शिराळे यांनी आपल्या मुलाला हा प्रकार सांगितला. नंतर उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडचे पाणी कुठे जिरले?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वाहेगावातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पालखेडच्या आवर्तनातून वाहेगाव गावासाठी गोई नदीवरील बंधारा भरून देण्याचे नियोजित असताना कालव्यातून या नदीत पाणी दिले गेले. पण बंधारा अर्धाही न भरल्यामुळे नागरिक संतापले आहेत.

वाहेगाव येथील गोई नदीवरील बंधारा पालखेड डाव्या कालव्यावर आरक्षित आहे. बंधारा शासनाच्या नियमानुसार ५० टक्के भरायला हवा होता परंतु बंधाऱ्यात फक्त १० ते १५ टक्केच पाणी सोडले असून पालखेडचे पाणी बंद केल्याने बंधारा न भरल्याने निफाड तालुक्यातील वाहेगाव गावावर पिण्याच्या पाण्याचं संकट आहे. हा गोई नदीवरील बंधारा शासनाने जर आरक्षित केला होता तर बंधारा पूर्ण भरण्याआधी पालखेड पाटबंधारे विभागाने पाणी का बंद केले, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. बंधाऱ्यासाठी आरक्षित असलेले पाणी कुठे जिरले, की पाटबंधारे विभागाने जिरविले असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे. निफाड तालुक्यातील पूर्व भागातील वाहेगाव, दहेगाव, गोळेगाव, भरवस, मानोरी, वाकद, शिरवाडे या गावांना कायमच पाण्याचा दुष्काळ असतो. त्यात गेल्या तीन वर्षांपासून पूर्व भागात निसर्गाच्या लहरीपणामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्यावरची मांसविक्री थांबणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मांसविक्रीचा वार्षिक परवाना घेण्यासाठी महापालिकेच्या सहा विभागांत सुमारे २५० अर्ज दाखल झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून या अर्जांची छाननी केली जाणार असून, प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. स्वच्छतेच्या पुरेशा हमीनंतरच संबंधिताला सशुल्क परवाना दिला जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. महापालिका क्षेत्रात आता उघड्यावर मांसविक्री बंद होणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीला प्रतिबंध घालण्यासह मांसविक्रीसाठी स्वतंत्र परवाना धोरणाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मांसविक्रीसाठी परवाना घेण्याचे आवाहन विभागीय कार्यालयांकडून करण्यात आल्यानंतर त्याला आता विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. महापालिका कार्यक्षेत्रात मटण, चिकन, मासळी अशी मांसविक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर असून, त्यांच्याकडून उघड्यावर मांसविक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्याही धोक्यात येते. उघड्यावरील मांसविक्रीमुळे मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे महापालिकेने उघड्यावर मांसविक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्रपणे धोरण तयार केले आहे. स्थायी समितीतच सदरचे धोरण आल्यानंतर त्यात सविस्तर चर्चा झाली. उघड्यावर मांसविक्रीचा परवाना देण्याऐवजी बंदिस्त ठिकाणी मांसविक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शहरात बंदिस्त ठिकाणीच मांसविक्री करण्यासाठी धोरण ठरविण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली होती. स्थायीच्या मंजुरीनंतर आता महापालिका क्षेत्रात उघड्यावर मांसविक्री बंद होणार असून, मांसविक्रीसाठी महापालिकेचा परवाना शुल्क भरून घेणे बंधनकारक झाले असून, त्याची अंमलबजावणी पशुंसवर्धन विभागामार्फत सुरू झाली आहे. विभागीय कार्यालयांमार्फत मांसविक्रेत्यांना परवाना घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सहा विभागांत मांसविक्रेत्यांना अर्ज करण्याचे आवाहन केल्यानंतर सहा विभागांत आतापर्यत २५० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची महापालिकेकडून छाननी केली जाणार आहे. प्रत्यक्ष भेटी देऊन जागा बंदिस्त आहे का, स्वच्छतेची काळजी घेतली आहे आदी बाबींची तपासणी झाल्यानंतरच शुल्क भरून परवाने दिले जाणार आहेत.

--

परवाना प्रकार अन् शुल्क

--

प्रकार शुल्क (रुपयांत)

--

मटण व चिकन एकत्रित विक्री परवाना- ५०००

मासळी विक्री व्यवसाय परवाना- २५००

मांसविक्रीसाठी व्यक्तिगत परवाना- ५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images