Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उन्हाळी सुट्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

उन्हाळी सुट्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई, बरौनी, वाराणसी आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्यांना नाशिकरोडला थांबा देण्यात आला आहे.

मुंबई एलटीटी-बरौनी साप्‍ताहिक (०११३३) विशेष सुपर फास्ट गाडी चार जुलैपर्यंत धावेल. तेरा फेऱ्या होणारी ही गाडी एलटीटीहून ०५.१० वाजता सुटेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, इलाहाबाद छिओकी जंक्शन, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन बक्सर, आरा, पाटलीपुत्र एवं हाजीपुर येथे थांबा आहे.

एलटीटी-वाराणसी साप्ताहिक विशष गाडी (८२१०१) एलटीटीहून प्रत्‍येक सोमवारी मध्यरात्री पाऊणला सुटेल. एक जुलैपर्यंत ११ फेऱ्या मारणारी ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावल, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, इलाहबाद छियोकी जंक्शन येथे थांबेल. मुंबई सीएसटीहून मुंबई-नागपूर सुपरफास्ट साप्‍ताहिक विशेष गाडी (०२०२१) प्रत्‍येक रविवारी सव्वाबारा वाजता सुटेल. ३० जूनपर्यंत १२ फेऱ्या मारणाऱ्या या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगांव आणि वर्धा येथे थांबा आहे.

सीएसटीवरून मुंबई-नागपुर सुपरफास्ट साप्‍ताहिक विशेष गाडी (०१०७५) प्रत्‍येक सोमवारी रात्री साडेअकरा वाजता सुटेल. १ जुलैपर्यंत १२ फेऱ्या मारणारी ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामनगांव, पुलगांव व वर्धा येथे थांबेल. विशेष शुल्कासह सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच http://www.irctc.co.in/"www.irctc.co.in या वेबसाईटवर या गाड्यांचे आरक्षण सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेला पेट्रोल ओतून जाळले, महिला गंभीर

0
0

नाशिक

नाशिकमधील पंचवटी भागात एका महिलेला पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला जाळणारा पुरूषही किरकोळ भाजला आहे. हा पुरुष नेमका कोण आहे, तसेच या मागचे कारण काय आहे याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. या घटनेमुळे पंचवटीतील टकलेनगर भागात खळबळ उडाली आहे.

पंचवटीमधील टकलेनगर येथील हरिसिद्धी अपार्टमेंटमध्ये आज पहाटे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत महिलेच्या घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या घटनेबाबतचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.

68654115


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्वानाच्या भुंकण्याचा भुर्दंड तीस हजार!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहा महिन्यांचे श्वानाचे पिल्लू भुंकते म्हणून सुरू झालेला वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. चॅप्टर केसमुळे सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सुनावणी सुरू झाली. सहाय्यक पोलिस आयुक्तांनी तक्रारदाराला लोकसभा निवडणुकीच्या शांततेचे कारण पुढे करीत प्रत्येकी दोन असे तिघांना चक्क ३० हजार रुपयांचे जामीनदार देण्याबाबत नोटीस काढली. पोलिसांच्या या कारभाराची सर्वत्र चर्चा सुरू असून, लोकसभा निवडणुकीचा जाच सर्वसामान्यांनी कुठपर्यंत सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

या वादाची घटना अंबड पोलिस ठाणे हद्दीतील खुटवडनगरमध्ये २२ मार्च रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी लीलाबाई गौतम मोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबड पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मोकळ कुटुंबाकडे एका विदेशी जातीच्या श्वानाचे १० महिन्यांचे पिल्लू आहे. मोकळ यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला पाहून हे श्वान भुंकते. सुरुवातीला हा त्रास नव्हता. मात्र, काही दिवसांपासून हा प्रकार वाढला. याच कारणामुळे २२ मार्च रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दोन्ही शेजाऱ्यांमध्ये शिवीगाळ होऊन भांडण झाले. मोकळ यांच्यापाठोपाठ त्या कुटुंबानेसुद्धा तक्रार दिली. मुलीची दहावीची परीक्षा असल्याचे त्या कुटुंबाने सांगितले. चॅप्टर केस झाल्याने हा वाद सहाय्यक पोलिस आयुक्त शांताराम पाटील यांच्यापर्यंत पोहोचला. तिथे मोकळ यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना हमीपत्र देणारे प्रत्येकी दोन जामीनदार, तसेच सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचे शांतता राखण्याबाबतचे बंधपत्र देण्याबाबत आदेशित करण्यात का येऊ नये, अशी नोटीस काढण्यात आली. लोकसभा निवडणुका सुरू असून, भांडणामुळे शांतता भंग होत असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या नोटिशीबाबत २६ एप्रिल रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. कौटुंबिक पातळीवर, तसेच शेजाऱ्यांशी सातत्याने वाद होत असतात. त्यात पोलिसांकडून अशी कारवाई सुरू झाल्यास सर्वसामान्य जनता पोलिसांपर्यंत पोहोचण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल, असे मत काही वकिलांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीचा आणि किरकोळ भांडणाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्याबाबतसुद्धा आश्चर्य व्यक्त होत आहे.

परस्परविरोधी एनसी आणि पुढे चॅप्टर असे या केसचे स्वरूप आहे. अद्याप सुनावणी पूर्ण झालेली नाही. दोघांच्या कायदेशीर बाजू समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- शांताराम पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोल्ट्रीत शिरला बिबट्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे गावातील जनता शाळेजवळ असलेल्या एका पोल्ट्री फॉर्ममध्ये रविवारी बिबट्या शिरल्याने ग्रामस्थाचा थरकाप उडाला. चार तासांनंतर बेशुद्ध करून बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

भक्षाच्या शोधात व उन्हाच्या तडाख्यात वनवन फिरणाऱ्या बिबट्याने रविवारी सकाळी दहा वाजता बेलगाव कुऱ्हेत येथील जनता विद्यालयाच्या जवळच असलेल्या संजय गुळवे यांच्या पोल्ट्रीफॉर्मचा ताबा घेतला. बिबट्याने शेडला फेरी मारली आणि नंतर शेडवर चढला. मात्र फुटलेल्या पत्र्यावर त्याचा पाय पडल्याने तो थेट पोल्ट्रीतच पडला. मात्र जाळीच्या एका बाजूला कोंबड्या व दुसऱ्या बाजूला रिकामी पोल्ट्री असल्याने रिकाम्या पोल्ट्रीत बिबट्या पडल्याने गुळवे मोठ्या नुकसानीपासून वाचले.

कोंबड्यांचा आवाज व बिबट्याची गुरगुर ऐकून परिसरातील नागरिकांनी पोल्ट्रीकडे धाव घेतली. त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. काही वेळातच तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनची टीम बोलावण्यात आली.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास नाशिक येथून वनरक्षक एस. पी. थोरात यांच्या नेतृत्वाखाली व तालुक्यातील वनपाल यांच्या सहकार्याने रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. तासभरात साधारण तीन वाजेच्यासुमारास अवघ्या दीड ते दोन फुट अंतरावरून बिबटयाला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला पोल्ट्रीच्या बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीसाठी रेटकार्ड!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीची उमेदवारी म्हटली, की कार्यकर्ते सांभाळणे आलेच. त्यांच्या चहापानासह अगदी निवासाची व्यवस्था करणे हीदेखील त्याची जबाबदारीच; परंतु उमेदवाराकडून पार पाडली जाणारी प्रत्येक जबाबदारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पैशांमध्ये मोजली जाणार आहे. एका चहाचा खर्च १० रुपये, तर एकवेळच्या शाकाहारी जेवणाचा खर्च १०० रुपये एवढा गृहीत धरला जाणार आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करूनच जिल्हा प्रशासनाने हे दर निश्चित केले आहेत.

सैन्य पोटावर चालते, असे म्हणतात. निवडणुकांचे मैदान मारण्यासाठी सज्ज होणाऱ्या उमेदवारांचे सैन्य म्हणजे त्यांचे कार्यकर्ते. निवडणूक काळात सतरंजी उचलणाऱ्यासह अगदी सर्व प्रकारची फिल्डिंग लावणारा प्रत्येक कार्यकर्ता तेवढाच महत्त्वाचा. उमेदवाराच्या जय-पराजयात कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते उमेदवारासाठी राबतात. अशा कार्यकर्त्यांसह त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला हातही सैल सोडावे लागतात. लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला ७० लाख रुपये एवढी खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. उमेदवार आणि त्याच्या यंत्रणेकडून होणाऱ्या खर्चावर निरीक्षकांची नजर असणार आहे. या खर्चाचा ताळेबंद मांडता यावा याकरिता जिल्हा निवडणूक शाखेने खाद्यपदार्थांसह उमेदवाराच्या प्रचारासाठी वापरात येणारी वाहने, ध्वनिक्षेपक, हॅलोजन, कूलर, संगणक, मंडप, कमानी, इतकेच नव्हे, तर शाल, फेटा, पुष्पगुच्छाचेही दर निश्चित केले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून हा प्रत्येक दर निश्चित करण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेतील सूत्रांनी दिली आहे. उमेदवारांच्या बैठकी, कोपरा सभा, रॅली अशा प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचे व्हिडीओ सर्व्हेलन्स पथक खर्चावर लक्ष ठेवणार आहे. याखेरीज व्हिडीओ व्हीविंग पथक (व्हीव्हीटी), खर्च निरीक्षक हेदेखील उमेदवाराने सादर केलेला खर्च आणि पथकाने नोंदविलेला खर्च याची पडताळणी करणार आहे. उमेदवाराच्या खर्चात हा खर्च मोजला जाणार आहे.

अशा सेवा असे दर (प्रतिदिन आणि प्रतिनग)

सेवा- दर (रुपये)

मध्यम बुके- १५०

मोठा बुके- ६००

मोठा सफारी हार- ४५०

फेटा- ३००

शाल- २५०

सोफासेट- ८५०

स्वागत गेट- १६५००

ध्वनिक्षेपक- ७८४४

चहा- १०

कॉफी- १५

पाणी- २०

नाश्ता- २० ते ५०

शाकाहारी जेवण- १००

मांसाहारी जेवण- १५०

एसी रूम- २०००

पाणी टँकर- ६००

१० हजार मेसेज- २५००

१ लाख मेसेज- १७५००

झेरॉक्स- २

झेरॉक्स कलर- २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेसबुक, इन्स्टाग्रामवर प्रचाराचा जोर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे प्रचार करून नेटिझन्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. नाशिक मतदारसंघातील उमेदवार ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर प्रचार करीत आहेत. त्या तुलनेत दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांचा सोशल प्रचार काहीसा थंड असल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर प्रचार करण्याचा फंडा बहुतांश उमेदवारांनी अंगीकारला असून, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा सर्वाधिक वापर केला जात आहे. त्यापाठोपाठ ट्विटरद्वारे नागरिकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न उमेदवार करताना दिसून येत आहेत. प्रचारसभा, रॅली आणि इतर माहितीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. नाशिक मतदारसंघातील सर्व उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचार जोरात सुरू असून, दिंडोरीतल्या उमेदवारांनी फक्त फेसबुकची साथ घेतल्याचे दिसते. काही उमेदवारांचा सोशल मीडियावर एकापेक्षा अधिक खाती असल्याने त्यांच्या समर्थकांच्या संख्येचे विभाजन झाले आहे. मात्र, असे असले, तरी सोशल मीडियाच्या सर्व खात्यांवर उमेदवार अपडेट राहत आहेत. मतदारसंघात प्रचारादरम्यान नागरिकांशी साधलेला संवाद, जाणवलेल्या समस्या आणि निवडून आल्यानंतर करणाऱ्या कामांची आश्वासनेदेखील सोशल मीडियाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचविली जात आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियावरील प्रचारदेखील निर्णायक ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


मतदारसंघ व उमेदवारनिहाय स्थिती



\Bउमेदवाराचे नाव.............. ट्विटर फॉलोअर्स .............. इन्स्टाग्राम फॉलोअर्स ......................... फेसबुक फ्रेंड्स................. पेज लाइक्स

(नाशिक लोकसभा)\B

हेमंत गोडसे..................... ६३४.............................. ९६६.............................................. ४ हजार ७३२ ........................ ४४ हजार

समीर भुजबळ.................. ३५९............................... ३ हजार २८९................................... ४ हजार ६४१......................... २३ हजार

पवन पवार...................... ---................................ १ हजार ६०...................................... ४ हजार ८३५......................... २ हजार

\B(दिंडोरी लोकसभा)

\Bधनराज महाले................. ---................................. ---------...................................... ४ हजार ८७०.......................... ३ हजार ७००

डॉ. भारती पवार............... ---................................. ---------......................................-----------........................... ३ हजार २००

जिवा पांडू गावित.............. ---................................. ---------..................................... ४ हजार ७३१...........................----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्राच्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटविले

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कृष्णनगर परिसरात हरी सिद्धी अपार्टमेंट येथे मित्राकडे राहणाऱ्या एकाने मित्राच्याच पत्नीला पेट्रोल ओतून पेटविल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेत रेखा बाळू मोरे ही (वय ३२) महिला सुमारे ९० टक्के भाजली आहे, तर तिला पेटविणारा तिचा मानलेला भाऊ आणि पतीचा मित्र संशयित रवींद्र भामरेदेखील १० टक्के भाजला आहे.

रवींद्र याने रेखाला पेटविल्यानंतर विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेत भाजलेल्या रेखाला खाजगी तर रवींद्रला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी भरवस्तीत घडलेल्या घटनेने पंचवटी परिसरात खळबळ उडाली होती. हरी सिद्धी अपार्टमेंट येथे फ्लॅट क्रमांक ७ मध्ये बाळू मोरे पत्नी रेखा व मुलगी सायली, तसेच पत्नीचा मानलेला भाऊ आणि स्वत:चा मित्र रवींद्र भामरेसमवेत गेल्या अनेक वर्षांपासून राहतात. बाळू मोरे खासगी नोकरी करतात, पत्नी घरकाम करते आणि मुलगी सायली सातवीत शिक्षण घेत आहे. मूळचा गणेशवाडीतील शेरी मळ्यात राहणारा भामरे मिसळपावची गाडी लावतो. रवींद्र व रेखा यांच्यातील वादाची परिणती या धक्कादायक घटनेत झाली. या घटनेबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकत्र राहण्यावरून वाद?

रेखा मोरे व रवींद्र भामरे यांच्यात एकत्र राहण्यावरून शनिवारी रात्री वाद झाला. रविवारी सकाळी रेखाचा पती कामासाठी बाहेर गेला. त्यानंतर पुन्हा रेखा व रवींद्र यांच्यात वाद झाला. त्यावेळी मुलगी सायली बाथरूममध्ये होती. रवींद्रने बेडरूममधील रेखावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. ही बाब समजल्यावर नागरिकांनी अग्निशामक दलास माहिती कळविली. दलाच्या जवानांनी व नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून आग विझविली. त्यावेळी रेखा गंभीर भाजल्याचे, तसेच रवींद्र यानेदेखील विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहखरेदीची गुढी गगनाला!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाच दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर घर खरेदीसाठी बांधकाम व्यावसायिकांनी आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्यानिमित्त घराच्या बुकिंगला ग्राहकांची पसंती मिळत असून, नवे मराठी वर्ष आणि बुकिंगला मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद पाहता यंदा गृहखरेदीची उंच गुढी उभारली जाईल, असा अंदाज बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये बांधकाम क्षेत्रात गुढीपाडव्याच्या औचित्याने कोट्यवधींची उलाढाल होणार असून, शहरातील, तसेच लगतच्या परिसरातील फ्लॅट्स आणि प्लॉट्सचे बुकिंग जोर धरू लागले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी वास्तू खरेदीचा प्लॅन अनेकांनी आखला असून, त्यानुसार आर्थिक उलाढालीस शहरात वेग आला आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही बांधकाम क्षेत्रात खरेदी-विक्रीचा उत्साह अधिक आहे. घराच्या मूळ किमतीत सूट, मोठ्या इमारतींच्या कॅम्पसमध्ये असलेल्या सुविधांच्या रकमेत सूट, फ्री फर्निचर, रेडी पझेशन फ्लॅटच्या किमतीत सूट, तसेच व्याजदरावर दोन टक्के सूट यांसह इतर अनेक आकर्षक ऑफर्स बांधकाम व्यावसायिकांनी दिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ३० ते ४० लाखांतील फ्लॅट बुकिंगला सर्वाधिक पसंती देण्यात येत असून, गुढीपाडव्यापर्यंत शहरात फ्लॅट्स व प्लॉट्सचे विक्रमी बुकिंग होईल, असा अंदाज बांधकाम व्यावसायिकांनी वर्तविला आहे. यंदा बांधकाम क्षेत्रातील खरेदी-विक्रीचा उत्साह पाहता घराघरांतील मांगल्याच्या गुढ्यांसोबत पाडव्यानिमित्त प्रॉपर्टी बुकिंगची गुढीही गगनाला भिडेल असेल, असा आशावाद बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

शंभर कोटींवर उलाढालीची चिन्हे
शहरातील लहान व मोठे बांधकाम व्यावसायिक पाहता त्यांची संख्या ९०० च्या घरात आहे. त्यापैकी बहुतांश बांधकाम व्यावसायिकांकडे प्रॉपर्टी बुकिंगने सध्या जोर धरला असून, शहरातील सध्याची उलाढाल लक्षात घेता गुढीपाडव्यापर्यंत १०० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होईल, असा अंदाज बांधकाम व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

दर वर्षीप्रमाणे यंदाही गृहखरेदीचा उत्साह अधिक आहे. बांधकाम व्यावसायिकांनी अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. खरेदीच्या रकमेत सूट देण्यापासून फ्री फर्निचरपर्यंतच्या ऑफर्स असल्याने ग्राहकांची बुकिंगला पसंती मिळत आहे. यंदा पाडव्यानिमित्त मोठी आर्थिक उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.

-उमेश वानखेडे, अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुन्हा मुदतवाढ मिळणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केबलचे पॅकेज निवडण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत सांगितली जात असली तरी शहरात अद्याप ५० टक्के ग्राहकांनी पॅकेजेस स्वीकारलेली नाहीत असा दावा केबल व्यावसायिकांकडून केला जात आहे. अशा ग्राहकांचे केबल प्रक्षेपण बंद करण्याच्या कुठल्याही सूचना अद्याप एमएसओ कंपन्यांकडून प्राप्त झाल्या नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पॅकेज न घेणाऱ्या ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेचे काय होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

केबलद्वारे होणाऱ्या वाहिन्यांच्या प्रक्षेपणासाठी ट्रायने नवीन नियमावली आणली आहे. त्यानुसार ग्राहकांना हवे ते चॅनल्स निवडण्याची मुभा त्यामध्ये देण्यात आली आहे. ग्राहकांच्या आवडी, त्यांची मागणी लक्षात घेऊन एमएसओ कंपन्यांनी चॅनल्सचे विशिष्ट पॅकेज तयार केले. ग्राहकांनी यापैकी त्यांना आवडेल ते पॅकेज निवडावे असे आवाहन केबल व्यावसायिकांकडून सातत्याने करण्यात येत होते. पॅकेज निवडण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, वारंवार आवाहन करूनही अद्याप सुमारे ५० टक्के ग्राहकांनी पॅकेजसाठीचे अर्ज भरून दिले नसल्याचे केबल व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. पॅकेजमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आवडीचे चॅनल्स नसणे, पॅकेजचा दर न परवडणे, दहावी, बारावीसह विविध परीक्षांचा हंगाम यांसारख्या अनेक कारणांमुळे ग्राहकांनी पॅकेज निवडीकडे दुर्लक्ष केल्याचे केबल व्यावसायिकांचा अनुभव आहे. यापूर्वी जेवढे मासिक भाडे ग्राहक देत, तेवढेच पैसे आताही देण्याची त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे अशा ग्राहकांना संबंधित मासिक शुल्काच्या रकमेत जेवढे चॅनल्स देणे शक्य आहे, तेवढ्या चॅनल्सची सेवा पुरविली जात असल्याची माहिती केबल व्यावसायिकांनी दिली आहे.

संभ्रम कायम

पॅकेजची निवड न करणाऱ्या ग्राहकांचे प्रक्षेपण बंद करण्याबाबतचे निर्देश अद्याप एमएसओ कंपन्यांकडून प्राप्त झाले नसल्याचे केबल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तूर्तास तरी प्रक्षेपण बंद केले जाणार नसल्याची माहिती केबल ऑपरेटर्स संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी दिली. ५० टक्के ग्राहकांनी पॅकेज निवडले असले तरी त्यापैकी बहुतांश ग्राहकांनी इंग्रजी चित्रपटांचे, इंग्रजी बातम्यांच्या चॅनल्सची निवड केलेली नाही. त्यामुळे असे काही चॅनल संकटात सापडल्याचे ऑपरेटर्सकडून सांगितले जात आहे. चॅनलचे पॅकेज न निवडणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मासिक शुल्काच्या दरात शक्य तेवढे चॅनलचे प्रक्षेपण देण्याचे धोरण व्यावसायिकांनी अवलंबले आहे. परंतु, आयपीएलचा हंगाम, उन्हाळी सुट्या यामुळे चॅनल्सचे पॅकेज निवडण्यासाठी ग्राहकांचा ओघ वाढू शकतो असा अंदाजही ऑपरेटर्सकडून वर्तविला जातो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक कर्मचाऱ्यांची सुटी ‘मार्चएण्ड’च्या कामात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बँका रविवारची सुटी असतानाही सुरू होत्या. रिझर्व्ह बँकेने याबाबत अगोदरच निर्देश दिल्यामुळे शनिवारी बँका ८ वाजेपर्यंत, तर रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होत्या. त्यामुळे बँकांची मार्चएण्डची बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. रविवारी सामान्य खातेदारांसाठी मात्र कामकाज बंदच राहिले.

सरकारी कामांचे पेमेंट आणि सरकारी पावत्यांचे काम या दोन दिवसांत करण्यात आले. त्याचप्रमाणे आरटीजीएस व एनएफएफटी व्यवहारही या दोन दिवसांत सुरू होते. सहकारी बँकादेखील सुरू होत्या. काही ठिकाणी वसुलीचे काम पूर्ण केले गेले. आर्थिक वर्षात बँकेचे अकाउंट क्लोजिंकचे कामकाजही असते. त्यामुळे आज, सोमवारी (दि. १ एप्रिल)सुद्धा हे काम सुरूच राहणार आहे. बँकेचे बहुतांश व्यवहार आता ऑनलाइन झालेले असले, तरी बँकांचे अकाउंटिंगचे काम मात्र कमी झालेले नाही. त्यामुळे काही बँका तर आर्थिक वर्षअखेरीस रात्रीपर्यंत सुरू होत्या.

इन्शुरन्स कंपन्या, पतसंस्थाही सुरू

बँकांप्रमाणे बहुतांश इन्शुरन्स कंपन्यांची कार्यालयेसुद्धा सुरू होती. आर्थिक वर्षातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी त्यांचेही कामकाज सुटीच्या दिवशीदेखील सुरूच होते. त्यामुळे ही कार्यालये रविवारीही गजबजली होते. बँका व सहकारी बँकांबरोबरच जिल्ह्यातील बहुतांश पतसंस्थांची कार्यालयेदेखील सुरू होती. एनपीए वाढू नये याची विशेष काळजी सहकार क्षेत्रात घेतली जाते. त्यामुळे थकबाकीचे व्यवहार पूर्ण करण्यावर जोर दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांना प्राधान्य देणाऱ्यांची सत्ता हवी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'विद्यमान सरकार भांडवलदारांची तिजोरी भरण्यात व्यस्त आहे. सातत्याने कामगारांच्या प्रश्नांना केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे कामगारांचा एल्गार आता वाढविण्याची गरज निर्माण झाली असून, सत्तेमध्येदेखील परिवर्तन करायला हवे. कामगारांच्या धोरणांना प्राधान्य देणाऱ्यांचीच सत्ता असणे गरजेचे आहे', असे प्रतिपादन भारतीय ट्रेड युनियनचे (सिटू) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केले.

ऑल इंडिया पोस्टल इम्प्लॉइज युनियन तर्फे द्वि-वार्षिक अधिवेशन रविवारी (३१ मार्च) घेण्यात आले. वकीलवाडी येथील हॉटेल पंचवटी यात्रीमध्ये हे अधिवेशन झाले. यावेळी पोस्ट कर्मचाऱ्यांची गेल्या दोन वर्षांतील आंदोलने, संप आणि प्रशासनाच्या विरोधात मांडलेल्या भूमिका यांवर चर्चा करण्यात आली. युनियनच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष अशोक खांडबहाले अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 'सिटू'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, नाशिक पोस्ट विभागाचे सहाय्यक अधीक्षक पंकज कुळकर्णी, युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण चाळके, सर्कल सचिव आर. पी. सारंग, नवी मुंबई रिजन सचिव आनंता म्हसकर, सहाय्यक सचिव सुशांत नारकर, नाशिक शाखा सचिव सुशाष दराडे, खजिनदार उत्तम धुर्जड व्यासपीठावर होते.

अधिवेशनात पोस्ट कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कराड म्हणाले, की कामगार आणि प्रशासन यांच्यातील सुसंवादानेदेखील कामगारांची लढाई जिंकता येते. पण, सरकार कामगारांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचू देत नाही. रिक्त पदांची भरती करण्यास होणारी टाळाटाळ आणि कंत्राटी कामगारांची वाढणारी संख्या ही कामगार चळवळीच्या समोरील मोठी आव्हाने आहेत. कामगारांची युनियन ही आव्हाने यशस्वीरित्या दूर करण्यासाठी सक्षम आहे. पण, सरकार वारंवार कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदान करताना कामगारांचे प्रश्न सोडविण्याची खात्री देणाऱ्यालाच मतदान करा.

अधिवेशनात पोस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व कर्मचारी प्रत्येक आंदोलनात सहभागी होतील, असे एकमताने ठरविण्यात आले.

\Bनियुक्तीसंदर्भातील नियम धाब्यावर

\Bरिक्त पदे भरण्याबाबत डॉ. कराड म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये २४ लाख तर, राज्यात ३ लाख पदे विविध विभागात रिक्त आहेत. पण, रिक्त पदावर कायमस्वरुपी उमेदवार भरती करण्यापेक्षा दीड, दोन आणि तीन वर्षांचे कंत्राटी कामगार नियुक्त करणे सरकारला सोपे वाटते. मुळातच, कंत्राटी कामगार हे नियमित चालणाऱ्या कामासाठी नियुक्त करू नयेत, असा कायदा आहे. पण, भांडवलदारांसह सरकारी क्षेत्रातही हा कायदा धाब्यावर बसविण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांची संख्या वाढत असून, किमान वेतन देण्यासही टाळाटाळ होत आहे. त्यामु‌ळेच समविचारी लोकप्रतिनिधींची सत्ता स्थापन करण्यासाठी मतदान करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेअर’ गुंतवणूक ; दक्ष रहा

0
0

'शेअर' गुंतवणूक; दक्ष रहा

तज्ज्ञांचा गुंतवणुकदारांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दलालांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे आवश्यक असून, कोणत्याही चुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे टाळावेच. तसेच शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत दलालांचा अधिक हस्तक्षेप असेल आणि तुम्हाला योग्य माहिती मिळत नसेल तर, लागलीच 'एसईबीआय' किंवा 'एनएसडीएल'कडे संपर्क साधावा. तसेच शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कायम दक्ष रहा', असा सल्ला 'भारतीय शेअर बाजार यंत्रणेविषयी माहिती' या परिसंवादात तज्ज्ञांनी गुंतवणुकदारांना दिला.

भारत प्रतिभूति आणि विनिमय बोर्ड (एसईबीआय) आणि राष्ट्रीय प्रतिभूति डिपॉजिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या संयुक्त विद्यामाने 'भारतीय शेअर बाजार यंत्रणेविषयी माहिती' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता त्र्यंबकरोडवरील हॉटेल ऐमराल्ड पार्क येथे हा परिसंवाद झाला. एसईबीआयचे जनरल मॅनेजर संजय पुरव आणि एनएसडीएलचे मॅनेजर मिहीर मोघे यांनी उपस्थितांना शेअर मार्केट संदर्भात मार्गदर्शन केले.

एसईबीआयचे जनरल मॅनेजर पुरव म्हणाले की, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दलालांकडून फसवणूक होतेय, असे वाटल्यास एसईबीआयकडे संपर्क साधा. ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची देखील सोय असल्याने आर्थिक नुकसान सहन करु नका. शेअर गुंतवणूक केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेसह जागतिक अर्थव्यवस्थेचाही तितकाच अभ्यास करायला हवा. शेअर गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक आहे. पण, यातील चुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे टाळायला हवे. त्यासाठी गुंतवणुकदारांनी कायम दक्ष रहावे. बँक आणि ब्रोकर्स यांच्या हालचालींवर गुंतवणुकदारानेच बारिक लक्ष ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला.

एनएसडीएलचे मॅनेजर मोघे म्हणाले, की ऑनलाइन तंत्रज्ञानामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूक सोपी झाली आहे. शेअर मार्केटमधून होणारा नफादेखील अधिक आहे. पण, गुंतवणुकदारांची अनेकदा फसवणूक झाल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे गुंतवणुकदारांनी प्रत्येक शेअर खरेदी करताना खबरदारी घेणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. शहरातील शेअर गुंतवणुकदार मोठ्या संख्येने त्यावेळी उपस्थित होते. गुंतवणुकदारांनी शेअर मार्केटमधील अनेक शंकांचे निरसन करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दापूरकर यांचा गौरव

0
0

प्रा. दापोरकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

नाशिकरोड : नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. जे. मेहता हायस्कूल आवारातील के. एन. केला महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. अश्विनी दापोरकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गणपतराव मुठाळ, सचिव प्रवीण जोशी, खजिनदार मिलिंद पांडे, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. मीना कुटे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. मीना कुटे यांनी प्रा. दापोरकरांवरील आठवणींचा हिंदोळा पुस्तिकेचे प्रकाशन केले. मंगेश जोशी व निलोफर शेख यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ जारस यांनी आभार मानले. संजय शिंदे, अशोक अरिंगळे, वृषाली कुलकर्णी आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमी संघटनेवर केंद्राकडून बंदी

0
0

म टा प्रतिनिधी, नाशिक

स्टुडंटस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे असून, तशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ (सुधारणा-२००४) अन्वये सिमी संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत केंद्र शासनाने अधिसूचना काढून बंदीबाबत निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयाने आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ओडिसा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्ये आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांना योग्य ते कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सिमीशी संबंधितांना न्यायाधीकरणाने नोटिसा बजावल्या असून त्या-त्या पातळीवर त्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा उलटून ज्येष्ठ नागरिक ठार

0
0

मनमाड : अॅपे रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू व ५ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी

नांदगाव तरोडा मार्गावर घडली. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी दिघोळे (रा. जळगाव बुद्रुक) यांचा या अपघातात मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना मालेगाव येथे हलविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओझरखेडमधून मिळणार दिंडोरी, निफाडला पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरीसह निफाड आणि चांदवड तालुक्यातील तहानलेल्या गावांसाठी ओझरखेड धरणामधून पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हे आवर्तन सोमवारी (ता. १) सोडण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याची गरजही वाढली आहे. यामुळेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी दिंडोरीसह निफाड आणि चांदवड तालुक्यातून होत होती. त्यानुसार केवळ पिण्यासाठी ६३० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. चांदवड तालुक्यातील पिंपळद, दिंडोरीतील सोनजांब या प्रासंगिक गावांसह निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव, लासलगावजवळच्या रानवड, मिरचीचे पालखेड व इतर अनेक गावांनाही या आवर्तनाचा लाभ होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. पाण्याच्या वहनमार्गावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सतर्कता बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिकी

0
0

सांस्कृतिकी

---

सोमवार, १ ते शनिवार ६ एप्रिल

सांस्कृतिक महोत्सव

राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे १ ते ६ एप्रिल या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. अंतर्नाद, महावादन, लघुचित्रपट महोत्सव, महारांगोळी तसेच सेवा सरिता या शीर्षकाने कार्यक्रम होणार.१ एप्रिल रोजी अंतर्नाद कार्यक्रम. शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्यक्षेत्रातील १००० कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार. २ एप्रिलला महावादन. १५०० ढोल वादकांचे एकत्रित महावादन. ३५ ढोल पथके या कार्यक्रमांत सहभागी. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन. कुर्तकोटी शंकराचार्य न्यास संकुल, गंगापुर रोड येथे हा महोत्सव होईल. महोत्सवात वोट फॉर भारत, इंडिया ते भारत, माय फॅमिली माय स्ट्रेंथ, इंडियन सोल्जर, सामाजिक मुद्यांवरील साधारणत: १५ फिल्मस् प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचदिवशी ३ एप्रिल रोजी शहराच्या विविध ८ भागांत रांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. मोदकेश्वर मंदिर, इंदिरा नगर, कालिका मंदिर, मुंबई नाका, मुक्तीधाम मंदिर, नाशिकरोड, बनारसी नगर, हिरावाडी, यशवंत मंगल कार्यालय, मेरी, श्रीगुरुजी रुग्णालय, गंगापूर रोड, पवन नगर, सिडको, गामणे मळा, पाथर्डी फाटा या भागातून २५०० स्क्वेअर फुटाच्या रांगोळी आपले सण आपली संस्कृती या विषयाला अनुसरून काढण्यात येणार आहे. ४ एप्रिल रोजी २५,००० चौरस फुटाची महारांगोळी. या सर्व रांगोळी रचनेच्या प्रारंभासाठी नाशिक मधील शहिद जवानांच्या माता-पत्नी यांची उपस्थिती. ५०० महिलांच्या सहभागातून ही रांगोळी काढण्यात येणार आहे. सर्व रांगोळ्या पूर्ण करण्यासाठी १० टन रंग व रांगोळी वापरण्यात येणार आहे. याच दिवशी चित्रकला प्रदर्शन. सायकल रॅली ५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पाडवा पटांगण ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा. गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत श्री साक्षी गणपती मंदिर भद्रकाली कारंजा आणि श्री काळाराम मंदिर पुर्व दरवाजा या दोन ठिकाणाहून ६ एप्रिल रोजी सकाळी ६.३१ वाजता हिंदु नववर्षा दिनानिमित्त यात्रा आयोजन केलेले आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांचे नियोजन महिलावर्ग करीत आहे.

पाडवा पटांगण, गोदाघाट सायंकाळी ६.३० वाजता

-----

सोमवार, १ ते बुधवार ३ एप्रिल

चित्र-शिल्प प्रदर्शन

के.के. वाघ शिक्षण संस्थेच्या ललित कला महाविद्यालयाच्या वतीने चित्र-शिल्प प्रदर्शन २०१८-१९ होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील आधुनिक चित्रकार पंडित खैरनार यांच्या हस्ते व प्राध्यापक चित्रकार संजय बागुल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी चित्रकार गणेश शिंदे कलाक्षेत्रातील व्यावसायिक दृष्टिकोन व संधी याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रदर्शनात बीएफए पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती, प्रदर्शित करण्यात येणार आहेत. पेंटिंग विभागातील फुल फिगर कॅनव्हास पेंटिंग, रचनाचित्र, प्रिंट मेकिंग तसेच मांडणी शिल्प यावर आधारित साधारण १५० कलाकृती तर शिल्पकला विभागात फुल फिगर, थ्री फोर, व्यक्तीशीर्ष शिल्प तसेच रचना व लोरिलिफ, हायरिलीग या कलाकृती विविध माध्यमाद्वारे निर्माण करून त्या प्रदर्शित केल्या जाणार आहेत. साधारण ७५ शिल्पाकृती आहेत. मंगळवार २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुंबई कलाक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे व ललित कला अॅकॅडमीचे पारितोषिक विजेते चित्रकार विक्रांत भिसे मुंबई यांचे रचनाचित्रावर प्रात्यक्षिक होईल. बुधवार ३ एप्रिल रोजी कोल्हापुर नगरीचे शिल्पकार गणेश कुंभार यांच्या व्यक्तीशिल्पाचे प्रात्यक्षिक सकाळी १० वाजता होणार आहे.

के. के. वाघ ललितकला महाविद्यालय, सरस्वती नगर. सकाळी १० वाजता

-----

मंगळवार, २ एप्रिल

गांधी व्याख्यानमाला

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्यावतीने आयोजित महात्मा गांधी विचारमालेचे सातवे पुष्प पत्रकार सुनील तांबे गुंफणार आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सावाना आवारातील औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. 'महात्मा गांधी आणि फेक न्यूज' या विषयावर तांबे यांचे व्याख्यान होणार आहे. दै. मराठवाडा, औरंगाबाद या वर्तमानपत्राचा मुंबई प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेला सुनील तांबे यांनी सुरुवात केली. इंग्रजी वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करू लागले, २००६ साली रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेत कमोडिटी करस्पॉन्डंट म्हणून काम केले, रॉयटर्स मार्केट लाईट या माहितीसेवेचे संपादक म्हणून काम त्यांनी पाहिले. २०१४ पासन स्वतंत्र पत्रकार म्हणन तांबे यांनी कामास सुरुवात केली.

औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, टिळकपथ. सायंकाळी ६ वाजता

-----

शुक्रवार, ५ एप्रिल

सुरेल मैफल

संस्कारभारती इंदिरनगर विभाग यांच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता मोदकेश्वर गणपती मंदिर, इंदिरानगर येथे नववर्ष पूर्वसंध्येला सुरेल मैफलीचे आयोजन. गायन आशिष रानडे आणि ज्ञानेश्वर कासार. तबल्यावर रसिक कुलकर्णी, हार्मेनियमवर दिव्या रानडे, पखवाजवर दिगंबर सोनवणे, तालवाद्यावर अमित भालेराव राहतील.

मोदकेश्वर गणपती मंदिर, इंदिरानगर सायंकाळी ६.३० वाजता

----

शुक्रवार, ५ एप्रिल

सुनहरी यादें

तरुण सुगंधित क्षणांची सुनहरी यादें हा कार्यक्रम बाबाज थिएटर च्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. लहानपण देगा देवा सारखेच तारुण्यातील फुलपंखी दिवस पुन्हा परत हवेसे वाटतात. वय वाढल्याने जेष्ठ नागरिक श्रेणी मिळाली तरी एखादी सुरेल सुरावट कानावर आली किंवा तारुण्यातील गाण्याचे शब्द आठवले तर मन क्षणात त्या सोनेरी दिवसात जाऊन पोहोचते. या सुनहरी यादें बरोबर कॉलेजचे दिवस आठवतात, तेव्हाची धमाल, मित्रमैत्रिणींची मजामस्ती आवडलेले चेहरे, दिली-घेतलेली वचने, कुणाकुणात गुंतलेले रेशीम धागे यांच्या स्मरणाने पुन्हा ताजेतवाने झाल्याची अनुभूती मिळते. हेच गतकाळातले तरुण सुगंधीत सोनेरी क्षण सुनहरी यादेंमध्ये आहेत. बाबाज थिएटर प्रस्तुत गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला नुतन वर्षाच्या संगीतमय शुभेच्छा देण्यासाठी जेष्ठ नागरिकांसाठी ही खास मैफल. ४०-५० वर्षांपूर्वीच्या तरुणाईमध्ये रमून जाण्यासाठी गाजलेल्या हिंदी चित्रपट गीतांची संगीतमय सुरेल मेजवानी आहे.

परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळकपथ. सायंकाळी ५.३० वाजता

शनिवार, ६ एप्रिल

संगीत मैफल

चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा नूतन संवत्सर प्रारंभ. शनिवारी यादिवशी बागेश्रीच्यावतीने 'गा बाळांनो श्रीरामायण' ही भक्ती संगीताची मैफल. निर्मिती-संकल्पना-निवेदन-लेखन चारूदत्त दीक्षित. गायक शीला दंडवते, हेमंत कुलकर्णी, वैभव काळे गायन करणार आहेत.

प्रौढ नागरिक मित्र मंडळ, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड सायंकाळी ५.३० वाजता

शनिवार, ६ एप्रिल

वासंतिक नवरात्रोत्सव

श्रीकाळाराम संस्थानतर्फे ६ ते १६ एप्रिल या कालावधीत वासंतिक नवरात्रोत्सव. महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्याख्यानांचे आयोजन. शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध वक्ते सचिन कानिटकर व जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन. सायंकाळी ५ वाजता सचिन कानिटकर यांचे 'राम चिंतित जावा' व्याख्यान, रविवारी ७ एप्रिलला 'जय श्री हनुमंता' व्याख्यान. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात शनिवारी दीपक मंडळाचे 'संगीत अथंग आवली' तर रविवारी प्रांजली बिरारी-नेवासकर व अभिषेक पटवर्धन यांचे 'अवघा रंग एक झाला' हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्ही बेशिस्तच!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंदिरानगर अंडरपास येथे वाहनचालकांच्या बेशिस्तीवर 'एआय' तंत्रज्ञानाचा उतारा शोधण्यात आला. मात्र, तरीदेखील या अंडरपास परिसरात 'हम नहीं सुधरेंगे'च्या थाटात वाहनचालकांकडून 'वन वे'च्या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा येथील वाहतुकीच्या फेरनियोजनाचे आव्हान यंत्रणांपुढे ठाकले आहे.

इंदिरानगर अंडरपास येथे आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (एआय) या तंत्रज्ञानाचा वापर करून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीने यंत्रणेने क्लिक केलेल्या छायाचित्रांच्या आधाराने एक हजार २०९ जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. नोटिसा बजावण्याचे काम जोरात सुरू असले, तरी या ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते. विशेषत: रात्री ९ ते सकाळी ९ वाजेदरम्यान शेकडो वाहनचालक 'वन वे'च्या नियमाकडे सर्रास दुर्लक्ष करून येथून वाहने दामटत असल्याची स्थिती आहे.

शहरात प्रथमच 'एआय' तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही इंदिरानगर अंडरपासमध्ये बसविण्यात आले. या सिस्टीमचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहनाचे छायाचित्र क्लिक करीत आहेत. वाहनचालकांना जाच होऊ नये म्हणून दंडात्मक कारवाई लागलीच सुरू करण्यात आली नाही. आता मात्र दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येत आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. कॅमेऱ्यांमुळे वन वे नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते. मात्र, नंतर त्याचा प्रभाव ओसरला. बरेचसे वाहनचालक सातत्याने नियमाचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. दरम्यान, नियम मोडणारे वाहनचालक आणि प्रत्यक्षात बजावण्यात येणाऱ्या नोटिसा यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याने नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. अगदी वाहतूक पोलिस असतानाही अनेक वाहनचालक 'वन वे'मध्ये शिरतात. रात्रीच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहने सरळ आत येतात. त्यामुळे एखादा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

--

...तर प्रकरण थेट कोर्टात

आतापर्यंत एक हजार २०९ वाहनचालकांचे पत्ते शोधून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या वाहनचालकांना दंडाची रक्कम भरावी लागेल. नोटिशीत दिलेल्या मुदतीनंतरही वाहनचालक समोर आले नाही, तर त्या वाहनावर ही पॅनल्टी कायम राहते. पुढे हे प्रकरण कोर्टात पोहोचू शकते, असे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या वाहतूक कोंडी आणि नियम मोडण्याचे प्रकार कमी झाले असून, नोटिसा बजावण्याच्या कामास आणखी गती देण्याचा प्रयत्न असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन रिक्षाचालकाची पोलिसावर दादागिरी

0
0

नाशिक : अल्पवयीन रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांना अरेरावी आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार नाशिकरोड येथील दत्तमंदिर सिग्नल परिसरात घडला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अल्पवयीन संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार विलास कोटमे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांना एमएच १५ झेड ९५१३ क्रमांकाच्या रिक्षात फ्रंट सीट प्रवासी दिसले. त्यांनी रिक्षा अडवली असता त्यात १७ वर्षांचा मुलगा रिक्षा चालवताना आढळून आला. तसेच त्याने पोलिसांना धक्काबुक्की करीत अरेरावी केली.

दुचाकी पळविली

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील बळीराम नगर परिसरात कारमधून आलेल्या तिघांनी एका दुचाकीस्वारास मारहाण करून त्याच्याकडील दुचाकी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री घडली. या प्रकरणी दुचाकीचालक योगेश गंगाधर कोर (३१, रा. अंबडलिंक रोड) यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. एमएच १५ एफसी ०२१३ या क्रमांकाच्या दुचाकीवरून कौर जात असताना हा प्रकार घडला.

खंडणी उकळण्याचा प्रयत्न

नाशिक : घराच्या व्यवहारातून दोघांनी महिलेस धमकावत तिच्याकडे लाखो रुपयांची खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार भद्रकालीतील नानावली परिसरात घडला. या प्रकरणी लीलाबाई कचरू राऊत (४५, रा. पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी विकास अशोक ढोले (रा. कुंभारवाडा) आणि त्याचा मित्र राकेश बाळासाहेब भागवत या दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

दुचाकीमालकाची फसवणूक

नाशिक : नवीन दुचाकी विकत घेतल्यानंतर ग्राहकाच्या दुचाकीची नोंदणी करून न देता शोरुम मालकाने ग्राहकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुभाष जवरीलाल नहार (५६, रा. नाशिकरोड) यांच्या तक्रारीनुसार रोमेश लुथरा आणि विजय लुथरा या दोघा शोरुम मालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ११ जुलै २०१८ रोजी त्यांनी आराध्य ऑटो प्रा. लि. शोरुममधून ऍक्सेस दुचाकी रोख पैसे देऊन खरेदी केली. मात्र यानंतर शोरूमचालकांनी वाहनाची नोंदणीच केली नाही.

तीन तलवारी जप्त

नाशिक : गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सिडकोतील पवननगर परिसरात कारवाई करून एका युवकाच्या ताब्यातून तीन तलवारी जप्त केल्या. तसेच संशयित युवक नितीन नामदेव काळे (२९, रा. पवननगर) यास अटक केली. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने नितीन काळे याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एका गोणीत तीन तलवारी आढळल्या. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नितीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदतबाह्य रिक्षांवर आजपासून कारवाई

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात धावणाऱ्या स्कूल बसेस, रिक्षा, टॅक्सी अशा सार्वजनिक परिवहन सेवा पुरविणाऱ्या वाहनांचे आयुर्मान प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने गत वर्षी निश्चित केले. स्कूल बससाठी १५ वर्षे, तर रिक्षांसाठी २० वर्षे आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे. या नियमाआधारे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत १ एप्रिलपासून २० वर्ष आयुर्मान पूर्ण झालेल्या रिक्षांचा शोध सुरू करण्यात येणार आहे.

शहरात २० हजारांहून अधिक रिक्षा आहेत. प्रवासीकेंद्री असलेल्या रिक्षा व्यवसायात दरवर्षी भर पडत असून, अनेकदा नियमबाह्य प्रकार समोर येतात. प्रवासी वाहनांना विशिष्ट वयोमर्यादा असते. त्यानंतर त्या वाहनाचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करता येत नाही. रिक्षांसाठी ही आयुर्मर्यादा २० वर्षे इतकी निश्चित करण्यात आली आहे. अशा वाहनांचा शोध घेऊन त्या स्क्रॅप करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आज, दि. १ एप्रिलपासून शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. रिक्षा, चालक, परमिट अशी महत्त्वाची एकत्रित माहितीचे स्टीकर प्रवाशांना दिसेल, अशा ठिकाणी लावण्याबाबतसुद्धा आरटीओने सूचना केल्या आहेत. त्याचे पालन न करणाऱ्यांवरसुद्धा कारवाई हाती घेण्यात येणार आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट

वाहनचोरी, दुचाकी क्रमांकामध्ये छेडछाड रोखण्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून शहरातील वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्यास सुरुवात होणार आहे. आरटीओने ही जबाबदारी डिलर्सकडे सोपविली असून, ही नंबर प्लेट स्वतंत्र असणार नाही. अत्याधुनिक स्वरुपाच्या या नंबरप्लेटमध्ये छेडछाड करणे शक्य होणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. ही जबाबदारी असलेले डिलर्स यासाठी कितपत इच्छुक आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, यामुळे वाहन नोंदणीचा खोळंबा होऊन ग्राहकांना नाहक मनस्तापाला सामोरे जाऊ लागू नये, याकडे आरटीओने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images