Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

केंद्राकडून कांदा खरेदीचे आमिष!

$
0
0

५० हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग केंद्र सरकारवर नाराज असल्याने लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसू शकतो हे लक्षात आल्याने केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन इतका विक्रमी कांद्याची खरेदी करणार असल्याची माहिती आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून तो साठवणार कुठे, असा प्रश्न उपस्थित होत असून, हा निर्णय केवळ नाराज शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी तर नाही नाही, असा मुद्दा समोर आला आहे.

यातील ४५ हजार टन कांदा महाराष्ट्रातून तर ५ हजार टन कांदा गुजरात राज्यातून खरेदी केला जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केंद्राकडून महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, केंद्रावर ही कांदा खरेदी सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात उन्हाळ कांद्यासह लाल कांद्याला सरासरी ३०० ते ६०० रुपयांपर्यंतचे दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत. निर्यात मूल्य शून्य करूनही कांद्याचे मार्केट वधारले नाही. त्यामुळे २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. तरीही ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याने आता नाफेडमार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.

कांद्याचे दर वाढल्यानंतर नाफेडमार्फत कांदा खरेदी केला जातो. आपत्तकालीन पुरवठ्याअंतर्गत प्रतिवर्षी कांदा खरेदी होत असतो. आतापर्यंत १३ हजार मेट्रीक टनपर्यंत कांदा खरेदी केल्याचा इतिहास आहे. यावेळी मात्र ५० हजार मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये ४५ हजार मेट्रीक टन कांदा महाराष्ट्रातून तर ५ हजार मेट्रीक टन कांदा गुजरातमधून खरेदी केला जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाफेड ही खरेदी करणार आहे. नाफेड व्यतीरिक्त शेतकरी समूह गट शेतकरी कंपन्या यांच्या मार्फतही नाशिक, पुणे, नगर, धुळे येथे खरेदी करण्यासंदर्भात नाफेडचे कार्यकारी संचालक यांची बैठक झाली असल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांना फसवणारा आहे. मुळात हा खरेदी केलेला कांदा साठवायला जागाच नाही. गेल्यावर्षी खरेदी केलेला कांदा गोडाऊनमध्ये सडला. २५ हजार मेट्रिक टनाचे असलेले उद्दिष्ट साठवणुकीअभावी साडेतेरा हजार मेट्रिक टनापर्यंत खाली आणावे लागले. तर ५० हजार मेट्रिक टनाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार. हा तर फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे.

-- चांगदेवराव होळकर ,

माजी उपाध्यक्ष नाफेड

आचारसंहितेचा भंग?

५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचा परिणाम अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे कदाचित याबाबतीत तक्रार करण्यात आली तर येत्या काळात हा निर्णय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यास हा निर्णय मागेही घ्यावा लागू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेकायदेशीर हड्डी कारखाने सील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील पवारवाडी पोलिस ठाणे हद्दीत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हड्डी कारखान्यांवर अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला. रविवारी सायंकाळी पथकाने ओवाडी नाला परिसरात असलेल्या ४ ते ५ बेकायदेशीर कारखाने सीलबंद करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत पवारवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर मागच्याच आठवड्यात मृत जनावरे फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. रविवारी पथकाने बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हड्डी व चरबी कारखान्यावर कारवाई केल्याने या कारखान्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे उघड झाले आहे. विशेष पोलिस पथकास याविषयी माहिती मिळाल्यावर रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याठिकाणी असलेले हड्डी उकळ्याचे साहित्य पालिका प्रशासनाच्या मदतीने नष्ट केले जाणार आहे. बेकायदेशीर कारखान्यांवर कारवाई दरम्यान काहींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या कारवाईस पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी मटाशी बोलताना दुजोरा दिला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई व सुरत पॅसेंजर २३ एप्रिलपर्यंत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबई-भुसावळ आणि भुसावळ-सुरत पॅसेंजर या रेल्वेगाड्या दि. १ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे ही माहिती प्रसिद्धिपत्रकान्वये देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ-भादली सेक्शनदरम्यान नवीन तिसऱ्या रेल्वे मार्गाचे, तसेच नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे विभागातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे तांत्रिक ब्लॉक घेण्यात येणार असून, २३ एप्रिलपर्यंत या मार्गावरील मुंबई व सुरतकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक ५११५४ अप भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी १ ते २३ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक ५११५३ डाऊन मुंबई-भुसावळ पॅसेंजर ही गाडीदेखील या कालावधीत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५९०७६ अप आणि ५९०७५ डाऊन सुरत-भुसावळ, तसेच गाडी क्रमांक ५९०७८ अप आणि ५९०७७ डाऊन भुसावळ-सुरत पॅसेंजर या गाड्याही १ ते २३ एप्रिलपर्यंत धावणार नाहीत.

--

फायदा मोठा, तोटा नगण्य

कल्याण ते इगतपुरीदरम्यान तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम झाले आहे. इगतपुरी ते भुसावळपर्यंत काम सुरू आहे. तिसरी रेल्वेलाइन झाल्यानंतर गाड्यांच्या फेऱ्यांचे प्रमाण वाढणार असून, तांत्रिक कारणांमुळे गाड्या रद्द करण्याची नामुष्की टळणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर गाडी रुळांवरून घसरली किंवा अन्य अपघात झाला, तरी तिसरी लाइन सुरू असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. त्यामुळे या कामासाठी ब्लॉकमुळे काही दिवस रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागत असल्या, तरी भविष्यातील फायदा विचारात घेता ब्लॉकमुळे होणारा तोटा नगण्य आहे, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावाना’त भाकरी फिरणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेतील राजकारणाने पुन्हा डोके वर काढले असून, नव्या कार्यकारी मंडळाच्या आगामी बैठकीत भाकरी फिरविली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे वातावरण प्रमुख सचिवांच्या विरोधात गेले असून, या पदावरच गदा आली आहे. प्रमुख सचिव हे पद संस्थेत सर्वांत महत्त्वाचे असून, त्यासाठी आता रस्सीखेच सुरू होण्याची चिन्हे आहेत. 'सावाना'तील कार्यकारी मंडळाची धुसफूस एव्हाना जगजाहीर झाली असून, कार्यक्षम आमदार पुरस्कारावेळी प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी धनंजय मुंडे यांना पुरस्कार जाहीर केल्याने धमक्या आल्याचे भर कार्यक्रमात सांगितले होते. त्यावरून कार्यकारी मंडळात उभी फूट पडली आणि 'सावाना'चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर व कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके यांच्या स्वाक्षरीने याबाबत तात्काळ खुलासा करण्यात आला. परंतु, हे प्रकरण तेथेच थांबलेले नसून, त्याने आता वेगळे वळण घेतले आहे. कार्यकारी मंडळाच्या बैठकांवर बैठका होत असून, काही गुप्त खलबतेदेखील होत आहेत. काही पदाधिकारी एका बाजूला झाले असून, आपल्यातीलच एकाला प्रमुख सचिव करावे, असा आग्रह धरला जात असल्याचे ऐकिवात आहे. आता नव्या कार्यकारी मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत प्रमुख सचिव पदावरच गदा येणार असल्याचे सूतोवाच काही पदाधिकाऱ्यांनी केले असून, या बैठकीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

--

अद्याप मी अजेंडा काढलेला नाही. बैठकीच्या चार दिवस अगोदर अजेंडा काढला जातो. नव्या कार्यकारी मंडळाची बैठक हा रूटीन प्रकार आहे. अजून त्याला वेळ आहे. सध्या मार्चएण्डच्या कामात व्यग्र आहे.

-श्रीकांत बेणी, प्रमुख सचिव, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सावाना'त भाकरी फिरणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेतील राजकारणाने पुन्हा डोके वर काढले असून, नव्या कार्यकारी मंडळाच्या आगामी बैठकीत भाकरी फिरविली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वातावरण प्रमुख सचिवांच्या विरोधात गेले असून, या पदावरच गदा आली आहे. प्रमुख सचिव हे पद संस्थेत सर्वांत महत्त्वाचे असून, त्यासाठी आता रस्सीखेच सुरू होण्याची चिन्हे आहेत. 'सावाना'तील कार्यकारी मंडळाची धुसफूस एव्हाना जगजाहीर झाली असून, कार्यक्षम आमदार पुरस्कारावेळी प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी धनंजय मुंडे यांना पुरस्कार जाहीर केल्याने धमक्या आल्याचे भर कार्यक्रमात सांगितले होते. त्यावरून कार्यकारी मंडळात उभी फूट पडली आणि 'सावाना'चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर व कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके यांच्या स्वाक्षरीने याबाबत तात्काळ खुलासा करण्यात आला. परंतु, हे प्रकरण तेथेच थांबलेले नसून, त्याने आता वेगळे वळण घेतले आहे. कार्यकारी मंडळाच्या बैठकांवर बैठका होत असून, काही गुप्त खलबतेदेखील होत आहेत. काही पदाधिकारी एका बाजूला झाले असून, आपल्यातीलच एकाला प्रमुख सचिव करावे, असा आग्रह धरला जात असल्याचे ऐकिवात आहे. आता नव्या कार्यकारी मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत प्रमुख सचिव पदावरच गदा येणार असल्याचे सूतोवाच काही पदाधिकाऱ्यांनी केले असून, या बैठकीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालये गजबजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्चएंड म्हणजे महसूल वसुलीसह चालू आर्थिक वर्षातील सर्व व्यवहारांना अंतिम रूप देण्याचा काळ. रविवार असूनही ३१ मार्च रोजी बहुतांश सरकारी कार्यालयांमध्ये सुटीच्या दिवशीही आर्थिक ताळेबंद पूर्ण करण्याची लगबग पाहायला मिळाली.

जिल्हाधिकारी कार्यालयासह कोशागारात सकाळपासूनच कामाची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत होते. वीज वितरण कंपनीनेही आज ग्राहकांसाठी वीजबिल भरण्याची सुविधा सुरू ठेवली होती. सुटी असूनही इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांची कार्यालये सुरू ठेवून नियमितपणे कामकाज केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा कोशागारासह १४ उपकोशागारांमध्ये विविध सरकारी कार्यालयांनी सुमारे २०० कोटी रुपयांची ६०० बिले सादर केली. मार्चमध्ये कोशागार विभागात सुमारे १२०० कोटी रुपयांची ८,७०० बिले सादर झाली. ३१ मार्च रोजी रविवार असल्यामुळे दोन ते तीन दिवस आधीच बिले सादर करण्यास सरकारी कार्यालयांनी प्राधान्य दिले. त्यामुळे रविवारी कोशागार विभागावरील ताण काहीसा हलका झाला. मार्चअखेरीस सादर झालेली बिले पुढील आठ दिवसांत निकाली काढली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोकडजप्ती, मद्यसाठा तक्रारींचा अहवाल दररोज द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आचारसंहिता काळात पोलिसांनी शस्त्रास्त्र व मद्यसाठा, तसेच रोकड जप्तीसंदर्भातील तक्रारींचा दैनंदिन अहवाल निवडणूक शाखेस सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारी दिले.

मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर, लक्ष्मण राऊत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सी. बी. राजपूत, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. या वेळी मांढरे म्हणाले, की जाहिरात प्रसारण, सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराचा खर्चदेखील निवडणूक खर्चात अंतर्भूत असल्याचे पत्र निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांना द्यावे. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे पालन होईल, याकडेही सर्वांनी लक्ष ठेवून सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या. भरारी पथकांची कारवाई, मनुष्यबळ उपलब्धतेचा आढावा, मतदानाच्या दिवशी करण्यात येणाऱ्या बंदोबस्ताचा आढावा, तसेच सी व्हिजिल्सवर प्राप्त तक्रारींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

सहाय्यक खर्च नियंत्रकांची जबाबदारी मोठी

निवडणूक काळात उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकांनी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी आढावा बैठकीत दिल्या.

सागर म्हणाले, की निवडणुकीसाठी उमेदवाराला ७० लाख रुपये खर्चमर्यादा आहे. प्रत्येक सहाय्यक खर्च नियंत्रकानी उमेदवाराच्या प्रत्येक निवडणूक कार्यक्रमांवर बारकाईने लक्ष ठेवावे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी नियोजनपूर्ण काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दोन एप्रिल रोजी जाहीर होणार असून, प्रत्यक्ष निवडणूकप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व सहाय्यक खर्च नियंत्रकांनी नेमून देण्यात आलेल्या मतदारसंघात उपस्थित राहून उमेदवार व पक्षांच्या मार्फत होणाऱ्या प्रचारसभा, प्रचारफेऱ्या अशा विविध माध्यमांद्वारे करण्यात येणाऱ्या खर्चावर देखरेख ठेवून दैनंदिन अहवाल निवडणूक खर्च निरीक्षक व निवडणूक शाखेस सादर करावा, असे निर्देश आनंदकर यांनी या वेळी दिले. भरारी पथकाद्वारे जप्त करण्यात आलेली रोकड, मौल्यवान ऐवज यांची परिपूर्ण चौकशी करून जप्त केलेले ऐवज निवडणूक शाखेत जमा करून त्याचा अहवालदेखील सादर करावा, असेही आनंदकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडावर १३ पासून चैत्रोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सालाबादप्रमाणे कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावर १३ ते १९ एप्रिल दरम्यान चैत्रोत्सव होणार आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी गडावर सोमवारी प्रशासकीय बैठक पार पडली. या बैठकीत यात्रेचे नियोजन, पायी येणारे भविक, पायऱ्यांनी गडावर येणारे आणि ट्रॉलीने येणारे भाविक यांची दर्शनाची सोय, पाण्याची सोय आदी विषयांवर चर्चा करून संपूर्ण यात्रेचे नियोजन करण्यात आले.

सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. पोलिस उपअधीक्षक वाघमारे, तहसीलदार बंडू कापसे, देवस्थान ट्रस्ट विश्वस्थ डॉ. रावसाहेब शिंदे, सप्तशृंगीगड सरपंच सुमन सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, पंचायत समिती कळवणचे गटविकास अधिकारी डी. एल. बहिरम, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ प्रशांत खैरे उपस्थित होते.

देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी माहिती दिली. यात्राकाळात चार डेटल डिटेक्टर असतांनाही गर्दीमुळे ते काढून ठेवावे लागतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असताना त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून गर्दीचे योग्य नियोजन करून मेटल डिटेक्टरचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी पोलिस व महसूल यंत्रणेसह देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यासाठी ग्रामपंचायत, पोलिस यंत्रणेला सूचना देण्यात आल्या.

घाटातील कठडे दुरुस्ती, संरक्षण भिंती दुरुस्ती, धोंड्या कोंड्याच्या मार्गावरील धोकादायक विहिरीबाबत तसेच अन्य डागडुजी करणे बाबत उपजिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता केदार यांना सूचना केली. ६ एप्रिलपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामे न झाल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी उपस्थित यंत्रणेला दिले. गर्दीकाळात मोबाइल रेंज उपलब्ध राहील, याबाबतीतही बीएसएनएल अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. स्थानिक ग्रामस्थांना व शासकीय यंत्रणेला तसेच देवस्थान ट्रस्ट कर्मचारी वर्गाला देण्यात येणाऱ्या पासेसबाबत कडक धोरण अवलंबवावे हेही या बैठकीत ठरविण्यात आले. फ्युनिक्युलर ट्रॉली संबंधित सदस्य या बैठकीस उपस्थित नव्हते. अन्न सुरक्षा व भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पहिल्यांदाच उपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला.

शनिवारी पुन्हा आढावा

अनेकदा चैत्रोत्सव नियोजन बैठकीत झालेल्या चर्चेनुसार होईल ही अपेक्षा असते. प्रत्यक्षात मात्र त्यावर नियोजन होत नाही. हे लक्षात आल्याने नियोजन काय केले यासंदर्भात अहवाल सादर करण्यात यावा. त्यासंबंधीची बैठक प्रांताधिकारी कार्यालयात येत्या ९ एप्रिल रोजी घेण्यात येईल, असा फतवा तहसीलदार बंडू कापसेंनी काढल्यामुळे यंत्रणा कामाला लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानसेवा वेळापत्रक

$
0
0

विमानसेवा वेळापत्रक

--

सोमवार

नाशिक - अहमदाबाद

सकाळी ८.५५ - सकाळी १०.१०

अहमदाबाद - नाशिक

सकाळी १०.४० - सकाळी ११.५५

नाशिक…… - हैदराबाद

दुपारी १.००… - दुपारी २.५०

हैदराबाद… - नाशिक

सकाळी ६.४५… - सकाळी ८.३०

नवी दिल्ली… - नाशिक

सकाळी ११.०० …- दुपारी १२.५५

नाशिक… - नवी दिल्ली

दुपारी १.२५… - दुपारी ३.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शक्ती विकासतर्फे मतदान जागृती

महावादनाने निनादणार आज गोदाघाट

$
0
0

महावादनाने आज

निनादणार गोदाघाट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय विकास मंडळ, संचलित नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत आज (२ एप्रिल) महावादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ढोलताशा महासंघ अध्यक्ष पराग ठाकूर, ज्ञान प्रबोधिनीचे जेष्ठ ताशावादक राजन घाणेकर, श्रद्धा नालंमवार प्रवीण व्यवहारे, हर्षल सदगीर, मोनिका आथरे, शैलजा जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. पाडवा पटांगण, गोदाघाट येथे सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रात ढोल वादनाची परंपरा प्राचीन असून पुरुषांच्या बरोबरीने महिला भगिनींचा सहभाग ढोल वादनात अत्यंत स्फुर्तीदायक आहे. तरुण वर्गाचे आकर्षण असलेले ढोल-ताशा वादनाचा महोत्सव या वर्षी भारतीय सैन्यदलातील जवानांनी केलेल्या कामगिरीला समर्पित आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ३५ ढोल पथके सहभागी होणार आहेत. १५०० ढोलवादक, ताशावादक, आणि तास-झांज वादकांच्या सहभागांतून लय-ताल आणि नाद यांची एकतानता साधली जाणार असून जवळजवळ दीड ते दोन तास ब्रह्मनादाचा आत्मानुभव या कार्यक्रमाद्वारे नाशिककरांना घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाजन बंधूंच्या सी टू स्काय मोहिमेला सुरुवात

$
0
0

महाजन बंधूंच्या मोहिमेला सुरुवात नाशिक : महाजन बंधू फाउंडेशनतर्फे आयोजित 'सी टू स्काय' या अनोख्या आणि साहसी मोहिमेला मुंबईतून उत्साहात सुरुवात झाली. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्र पार करण्यासाठी स्काय जोश मोहीम आहे. महाजन ब्रदर्स आणि मुंबईच्या रहिवाशांनी या मोहिमेला उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या प्रोत्साहनाच्या शब्दांनंतर रॅलीची सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीर्ण झाल्यानंतरच सुटेल ‘शिवबंधन’ !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाजप शेतकरी हिताचे निर्णय घेत नव्हते. शिवसेनेत असताना कित्येक दिवस राजीनामे खिशात ठेवले. पण, शिवसेनेनेही शेतकरी हिताचे निर्णय न घेणाऱ्या भाजपसोबत पुन्हा मैत्रीबंध जोडले. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण माझ्यात रुजल्याने शिवबंधन सोडलेले नाही. ते जेव्हा जीर्ण होईल तेव्हाच सुटेल, असे स्पष्टीकरण महाआघाडीचे दिंडोरी मतदार संघातील उमेदवार धनराज महाले यांनी दिले. एचपीटी-आरवायके महाविद्यालयातील राजकीय जनजागृती कार्यक्रमात 'शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावरही शिवबंधन कायम कसे', या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते.

एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागातर्फे सोमवारी राजकीय जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, सुरेश भटेवरा, प्रकाश अकोलकर, राजकीय विश्लेषक डॉ. मेधा सायखेडकर, प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विभागप्रमुख डॉ. वृन्दा भार्गवे होते.

पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना महाले म्हणाले, की पर्यटन विकासातून शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे दिंडोरीत पर्यटन विकासाला चालना देण्यासह तेथील पिण्याच्या पाण्याची समस्या निवारण्यासाठी कार्य करण्याची इच्छा आहे. सत्ता मिळावी म्हणून नव्हे, तर शिवसेनेतील सध्याची तत्त्वे आणि त्यांची भूमिका न पटल्याने पक्ष बदलला, असे ते म्हणाले.

दुसऱ्या सत्रात डॉ. सायखेडकर यांनी लोकसभा निवडणुकीची पूर्वपीठिका सांगताना लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व विशद केले. अकोलकर यांनी 'निवडणुका आणि माध्यमे' या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर भटेवरा यांनी दोन्ही सत्रांचे विवेचन केले. राजकीय जनजागृती कार्यक्रमात मंगळवारी (दि. २) सकाळी ९ वाजता महायुतीचे नाशिक मतदार संघाचे उमेदवार हेमंत गोडसे व दिंडोरी मतदार संघाच्या उमेदवार भारती पवार विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

\Bजिल्ह्याला नाही वाली

\Bजिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या पण, पालकमंत्र्यांनी एकाही शेतकऱ्याच्या घरी भेट दिली नाही. सत्ता उपभोगणारे नागरिकांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांच्या भावना जाणून घेण्याचे भान हरपले आहे. त्यामुळे जिल्ह्याला वाली उरला नाही, अशी टीका करीत नाशिकला खंबीर आणि पाणीदार नेतृत्वाची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

नाशिककर मृण्मयीचाआशियाई स्पर्धेत ठसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थायलंडमध्ये ३० व ३१ मार्च रोजी झालेल्या ज्युनिअर आशियाई स्पर्धेत भारताची रोइंगपटू मृण्मयी सालगावकर हिने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके मिळवत ठसा उमटवला. मृण्मयीने एस ४ (५०० मीटर) व पेअरमध्ये (२००० मीटर) प्रत्येकी एक सुवर्ण, तर सिंगल प्रकारात २००० मीटर रोइंगमध्ये रौप्यपदक मिळविले. मृण्मयी नाशिकची रोइंगपटू असून, ती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिककर मृण्मयीचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय यश आहे.

मृण्मयीने थायलंडमध्ये ३० मार्च रोजी झालेल्या ज्युनिअर गटातील इनडोअर रोइंग चॅम्पियनशिपमध्ये सिंगल प्रकारात रौप्यपदक पटकावले. हा पदकांचा धडाका दुसऱ्या दिवशीही कायम ठेवत ३१ मार्च रोजी तिने एस ४ आणि पेअरमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली. मृण्मयीचे लक्ष्य मिशन ऑलिम्पिक असून, २०२४ मधील ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत गोल्ड मेडल जिंकण्याचे तिचे ध्येय आहे. आनंदनिकेतनमध्ये दहावीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मृण्मयीला रोइंगमध्येच करिअर करायचे असून, त्यासाठी तिने मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. माजी महापौर प्रकाश मते व विक्रांत मते यांनी स्थापन केलेल्या वॉटर्सएज क्लबवर ती गेल्या चार वर्षांपासून सराव करीत असून, तिला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक अंबादास तांबे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. वॉटर्सएज क्लबने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले असून, मृण्मयी हा यशाचा वारसा पुढे नेत असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक तांबे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकला दिवसाआड नव्हे दररोज पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा उच्चांक गाठत असल्याने परिसरातील जलाशयातील पाणी साठवणीचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. असे असले तरी त्र्यंबक शहरावर घोंगावणार पाणीसंकट तुर्तात तरी टळले आहे. गत ११ वर्षांपासून उन्हाळ्यातील तीन महिने एक दिवसाड होणारा पाणीपुरवठा यावर्षी मात्र दररोज आणि नियमीत वेळेत होणार आहे.

यावर्षी १ एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठा करावा लागणार अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र गौतमी बेझे प्रकल्पावर असलेली तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. शहराला अंबोली आणि गौतमी बेझे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सिंहस्थ २०१५ मध्ये २७ कोटी रुपये खर्च करून गौतमी बेझे धरणातील पाणी त्र्यंबक शहरासाठी आणले आहे. तत्पूर्वी अंबोली धरणात असलेला पाणीसाठा उन्हाळयात पुरवठा करणे शक्य होत नव्हते म्हणून एक दिवसआड नियोजन करावे लागत होते. गौतमी बेझे धरणातील पाणी आले मात्र तरी देखील तांत्रिक अडचणीमुळे गतवर्षांपर्यंत एक दिवसआड पाणी हे नियोजन कायम राहीले होते. यावर्षी दोन महिने आगोदरच पाणी पुरवठा सभापती शिल्पा रामयणे यांनी दोन्ही धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर गौतमी बेझे धरणाची परिस्थिती समजावून घेतली आणि त्या ठिकाणी अतिरिक्त वीजपंप बसविण्यात आले आहेत. गौतमी बेझे धरणात पाणीसाठा पुरेसा आहे. यापुढील तीन महिने दररोज नियमीत पाणी पुरवठा करणे शक्य आहे. त्यामुळे या वर्षी त्र्यंबकवासियांचे पाणी संकट टळले आहे. दरम्यान सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना त्र्यंकेश्वर येथे दररोज पाणीपुरवठा होणार आहे. मात्र नागरिकांनी जपून पाणी वापरावे व पाण्याची बचत करावी, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती शिल्पा रामयणे, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेगावकर, ठक्कर क्रेडाईच्या कार्यकारिणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुण्याचे सतीश मगर यांची, तर चेअरमनपदी अहमदाबादचे जक्षय शहा यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष अनंत राजेगांवकर यांची कोषागारपदीवर नियुक्ती करण्यात आली आहे. क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष जितेंद्र ठक्कर यांची राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी तथा घटना समितीचे अध्यक्ष या विशेष निमंत्रित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

क्रेडाई नॅशनल व क्रेडाई महाराष्ट्राची सर्वसाधारण सभा पुणे येथे नुकतीच पार पडली. क्रेडाई नॅशनलच्या सर्वसाधारण सभेत २०१९-२१ या कालावधीसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुख्य समितीत क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष सुनील कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली. दिल्ली येथे फेब्रुवारीत पार पडलेल्या 'युथकॉन २०१९' परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रेडाईच्या वतीने श्वेतपत्रिका सादर करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी क्रेडाई नाशिकचे कार्यकारिणी सदस्य गौरव ठक्कर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच, क्रेडाई महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव पारीख यांची, तर क्रेडाई नाशिकचे सुनील कोतवाल यांची मानद सचिव या पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली. यावेळी नाशिकचे विद्यमान अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रॉपर्टी एक्झिबिशन कमिटीच्या समन्वयक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. युथविंगचे समन्वयक निशित अटल यांची महाराष्ट्राच्या सहसमन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला क्रेडाई नॅशनलचे मावळते चेअरमन गीतांबर आनंद, जक्षय शहा यांच्यासह देशभरातील क्रेडाईचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीचा डोंगर वाढताच!

$
0
0

थकबाकी पोहचली अडीचशे कोटींवर; वसुलीसाठी मोहीम

..

- घरपट्टीची थकबाकी : १८४ कोटी

- पाणीपट्टीची थकबाकी : ६७ कोटी

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीची टक्केवारी यंदा वाढली असली तरी, मागील अनेक वर्षांपासूनच्या थकबाकीचाही आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात विक्रमी अशी ११४ कोटींची घरपट्टी ३१ मार्चअखेर वसूल झाली असली तरी, अजूनही ३५ कोटी थकबाकी आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी २५० कोटींवर पोहचल्याने पालिकेने आता घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीला अपेक्षित यश येत नसल्याचे चित्र आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण ४ लाख २८ हजार ४९० मिळकतींची घरपट्टी सदरी नोंद आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टी वसुलीसाठी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २५३ कोटींचे उद्दिष्टे निश्चित केले होते. परंतु, मुंढे यांनी लादलेल्या अवाजवी करवाढीने पालिकेचे उद्दिष्ट कोसळले. त्यातच मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या ५९ हजार मिळकतींचा वाद न्यायालयात अडकला आहे. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यांनी घरपट्टीसाठी १४९ कोटींचे सुधारीत उद्दिष्टे निश्चित केले होते. त्यापैकी ३१ मार्चअखेर ११४ कोटी ३० लाख रुपयांची वसुली होऊ शकली आहे. घरपट्टीची सन २०१९ पूर्वीची १८३ कोटी ७४ लाखांची थकबाकी होती. चालू आर्थिक वर्षात ११५ कोटी असे एकूण २९८ कोटी ७७ लाख रुपयांची वसुली प्रशासनाला अपेक्षित होती. मात्र गेल्या आर्थिक वर्षात ३१ मार्चअखेर मागील थकबाकीपोटी ३४ कोटी ३३ लाख, तर चालू मागणीपैकी ७९ कोटी ९६ लाख रुपये वसूल झाले आहेत. मागील थकबाकीची १८.६९, तर चालू मागणीची ६९.५२ टक्के वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे. सुमारे २९८ कोटींच्या एकूण मागणीचा विचार करता केवळ ११४ कोटींची घरपट्टीची वसूल होऊन थकबाकीचा आकडा हा १८४ कोटींपर्यंत गेला आहे. त्यात पाणीपट्टीचीही थकबाकी जमा केली, तर एकूण थकबाकीचा आकडा हा २५० कोटींपर्यंत पोहचल्याने पालिकेला ही थकबाकी वसुलीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

...

पाणीपट्टीची थकबाकी ६७ कोटी

महापालिकेने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट हे ५४ कोटी निश्चित केले होते. सन २०१८ पूर्वीची थकबाकी ५५ कोटी होती. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात पाणीपट्टीतून पालिकेला एकूण १०९ कोटींची वसुली अपेक्षित होती. प्रत्यक्षात गेल्या वर्षीची वसुली ही ४५ कोटींपर्यंत गेली. त्यात चालू वर्षाच्या मागणीपैकी केवळ २८ कोटींचीच वसुली झाली आहे. त्यामुळे १७ कोटींची थकबाकी राहिली आहे. त्यामुळे आतापर्यंतची पाणीपट्टीची थकबाकी ही ६७ कोटींपर्यत पोहचली आहे.

...

वसुली मोहीम चालणार

पाणीपट्टी आणि घरपट्टी थकबाकीची रक्कम ही २५० कोटींच्या पार गेल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थकबाकी वसुली मोहीम सुरूच ठेवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. पंचवीस हजारांपेक्षा अधिक घरपट्टीची थकबाकी असलेल्या सुमारे दोन हजार थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावले आहेत. वॉरंटची मुदत संपलेल्या मिळकती जप्त करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पाच हजारापेक्षा जास्त रकमेची पाणीपट्टी थकीत असलेल्या थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरील बुडून अपंग तरुणाचा मृत्यू

$
0
0

निफाड : शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अपंग तरुणाचा चांदोरी येथील विठ्ठलवाडी परिसरात गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. सोमवारी ही घटना उघडकीस आली.

चांदोरी बस स्थानकाजवळ राहणारा समाधान देवराम सांबरे (वय २३) हा रविवारी शेळ्या चारण्यासाठी गेला होता. पण तो घरी परत

न आल्याने त्याच्या आईने विचारपूस केली. सोमवारी सकाळी समाधानचे मित्र शुभम गारे गोदावरी नदीपात्राकडे शोधायला गेले असता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाचे कार्यकर्त्यांकडून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. समाधान नदीत पाणी आणण्यासाठी गेला असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. समाधान हा जन्मता अपंग होता त्याचे हात सरळ नव्हते त्यामुळे तो बुडाला असावा, असा अंदाज आहे. समाधानच्या पश्चात वृद्ध आई व तीन विवाहित बहिणी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजातील मुलभूत संकल्पना बदलण्याची गरज

$
0
0

फोटो - सतीश काळे

समाजातील मुलभूत संकल्पना बदलण्याची गरज

मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. वाटवानी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजात गरजू, वंचितांची संख्या खूप मोठी असून या प्रत्येकापर्यंत कोणी एक संस्था, व्यक्ती पोहोचू शकत नाही. अशा गरजूंसाठी आजच्या पिढीने, तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीत संवेदनशीलता असून त्या भावनेशी स्वत:ला जोडण्याची गरज आहे. यासाठी गरजवंतांकडे दुर्लक्ष करण्याची समाजातील मुलभूत संकल्पना बदलण्याची गरज असून दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी डॉ. भरत वाटवानी यांनी केले.

कालिदास कलामंदिरात रविवारी मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवानी, जॉर्डन, सिरिया, येमेनसारख्या संवेदनशील युद्धप्रवण क्षेत्रात वैद्यकीय सेवा दिलेले डॉ. भरत केळकर व सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे प्रमोद गायकवाड यांच्या कार्याची उकल करणारा एक संवाद हा मुलाखतपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. डॉ. वृंदा भार्गवे व वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधत या तिन्ही मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडला.

यावेळी बोलताना डॉ. वाटवानी यांनी निराधार मनोरुग्णांसाठी सुरू केलेल्या श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या निर्मितीविषयी माहिती दिली. आनंदवन, हेमलकसा येथे बाबा आमटे यांची भेट घेत त्यांच्या मार्गदर्शनाने समाजकार्याची दिशा मिळाली. त्यातूनच निराधार मनोरुग्णांसाठी काम करणे सुरू झाले. त्यामुळेच आतापर्यंत साडे सात हजार रुग्णांचे पुनर्वसन करता आले. परंतु, हे काम येथपर्यंतच थांबणारे नसून भारतभरात चार लाख निराधार मनोरुग्ण रस्त्यावर फिरत आहेत. या व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. स्वकेंद्रीत होण्यापेक्षा समाजकेंद्री होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जॉर्डन, सिरिया, येमेन या युद्धप्रवण क्षेत्रात स्वत:चा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. भरत केळकर यांनी यावेळी या सेवेमागील प्रेरणा, अनुभव यावेळी सांगितले. तसेच सोशल नेटवर्किंग फोरमचे प्रमोद गायकवाड यांनीही सामाजिक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभन कथन केले. यावेळी डॉ. हेमंत कोतवाल, विनायक रानडे, अभय कुलकर्णी, विनिता धारकर, किरण चव्हाण, राजेश बोरा, उमेश वानखेडे, राजेश कोठावदे, शिरीष कदम आदी उपस्थित होते.

---

प्रत्येकात दडलाय चांगला माणूस

समाज माध्यमांवर व्यक्त होत असलेले वाद, तंटे यामुळे काही काळात फेसबुक बंद केले. मात्र, त्यानंतर समाजकार्यासाठी हीच समाज माध्यमे उपयुक्त ठरली. लहानपणापासून सामाजिक विषमता बघायला मिळाली. ही विषमता मिटविण्यासाठी काम सुरू केले. या कामात एक एक जण सहभागी झाला आणि सोशल नेटवर्किंग फोरमचे काम सुरू झाले. प्रत्येक व्यक्तीत चांगला माणूस दडला आहे, त्याच्यातील संवेदनशीलता जागृत करण्याची गरज आहे, असे आपले अनुभवकथन करताना प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images