Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आइस्क्रीमची रेसिपी आज समजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध फ्लेवर्सचे आईस्क्रीम घरच्या घरी बनवता यावे, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'कल्चर क्लब'तर्फे 'अॅडव्हान्स आईस्क्रीम मेकिंग' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (७ एप्रिल) दुपारी १२ वाजता हॉटेल रॉयल हेरिटेज येथे आईस्क्रीम ही कार्यशाळा घेण्यात येईल.

या कार्यशाळेत संडे आईस्क्रीम, फ्राईड आईस्क्रीम, ब्लॅक फॉरेस्ट केक आईस्क्रीम असे विविध प्रकारचे आईस्क्रीम शिकविण्यात येतील. रितू मेहरा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे असून, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

...

\B'मटा' संगे शिका

आज डेझर्ट मेकिंग \B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डेझर्ट हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रकार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गोड डेझर्ट आकर्षित करीत असतात. हल्ली तर परदेशात आवडीचे असलेले डेझर्ट आपल्याकडेही सहजपणे मिळतात. परंतु, असे डेझर्ट घरी बनविण्याची मजा वेगळीच असते. हे ओळखत महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे डेझर्ट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता हॉटेल रॉयल हेरिटेज, शालिमार येथे हे वर्कशॉप होणार आहे. फज ब्राउनी, रेड वेलवेट लावा केक, चिया फ्रुट कस्टर्ड पुडिंगचे विविध प्रकारचे डेझर्ट रितू मेहरा यावेळी शिकविणार आहेत. कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे असून, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शोभायात्रेने हिंदू नववर्षाचे स्वागत

$
0
0

राम मंदिर संस्थानातफे उत्सव; रथ चौकात उभारली गाव गुढी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव नगररचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे शहरातील विविध पंथ, संप्रदाय, सामाजिक संस्था, भजनी मंडळे, गणेश मंडळांकडून शोभायात्रा काढून हिंदू नववर्षाचे शनिवारी (दि. ६) जल्लोषात स्वागत करण्यात आले. या निमित्त शहरातील रथ चौकात परंपरेप्रमाणे गावगचढी देखील उभारण्यात आली.

शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत अश्‍वाच्या पाठीवर गुढी अग्रभागी होते. त्यानंतर शोभायात्रेत साई बाबा, श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच अनेक संताच्या वेशभूषा परिधान केलेले बालक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी महिलांनीदेखील पारंपरिक मराठमोळा पोशाख परिधान केला होता.

शोभायात्रेला विसनजी नगरातील पंचमुखी गणपती मंदिरापासून सुरुवात झाली. शोभायात्रा जयप्रकाश नारायण चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, साने गुरूजी चौक, बळीरामपेठ, शिवाजी चौक, राष्ट्रीय संस्कार केंद्र, गांधी मार्केटमार्ग सुभाष चौक, सराफ बाजारमार्गे रथचौकात उभारण्यात आलेल्या गावगुढींचे मंगेश महाराज जोशी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलाभ रोहन, प्रभाकर पाटील, शनीपेठ पोलिस स्टेशन निरीक्षक विठ्‌लराव कोलते, जिंतेंद्र सांगोरे, योगेश कासार, अशोक माळी, बापू सपके, राजू कोळी, अमित भाटीया आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा जुने जळगावातील श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावगुढीचे पूजन करून व महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर लेझीमचा ठेका धरला होता.

‘स्वच्छ भारत’चा संदेश
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री संप्रदाय सेवा मंडळाच्या जळगाव शाखेतर्फे शनिवारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ‘आपला भारत स्वच्छ भारत’, ‘स्त्री-पुरूष समानता’, ‘धुम्रपान छोडो, आयु बढाओ’, ‘पाणी वाचवा’ यांसारखे संदेश देण्यात आले. विसनजी नगरातील गायत्री मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात करून नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे शाळा, सुभाष चौक, सराफ बाजार मार्गे, रथ चौक येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन
जळगाव शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुढीपाडवा उत्सव व पथसंचलन साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी (दि. ६) सकाळी पथसंचलन करण्यात आले. वाल्मिक नगरातील नगरपालिका शाळा, शिवाजीनगर नगरपालिका शाळा क्र. १, इंदिरा मैदान, खेडी गाव, शिव कॉलनी, आशाबाबा मंदिरासमोरील मैदान, प्रेमनगरातील वरद विनायक गणपती मंदिरात पथसंचलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान जनजागृतीसाठी दिल्लीत उभारली गुढी

$
0
0

नाशिक सायकलिस्टचा ७२ तासात मुंबई ते दिल्ली प्रवास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सहा सायकलिस्ट मतदान जनजागृतीचा संदेश देत सायकलवर स्वार झाले अन् अ‌वघ्या ७२ तासांत त्यांनी मुंबई ते दिल्ली हे अंतर पूर्ण केले. १ हजार ४४० किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर दिल्लीतील इंडिया गेट येथे सायकलिस्टनी मतदान जनजागृतीची अनोखी गुढी उभारत सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशात सुरू असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, हा संदेश देण्यासाठी नाशिक सायलिस्टनी 'सायकल रॅली' मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत ३ एप्रिल रोजी मुंबई येथून सायलिस्टनी मतदान जनजागृतीचे फलक हाती घेत दिल्लीच्या दिशेने सायकलिंग करण्यास सुरुवात केली. मुंबईचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी सायकलिस्ट रॅलीला मुंबईच्या हुतात्मा चौकात हिरवा झेंडा दाखवला. ७२ तासांनंतर म्हणजेच, ६ एप्रिल रोजी सायकलिस्टने दिल्ली गाठली. नाशिकच्या चंद्रकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली, श्रीराम पवार, मोहन देसाई, राजेंद्र गुंजाळ, रवींद्र दुसाने आणि पूर्वांश लखलानी या सायकलस्वारांनी ही मोहीम राबविली. महाराष्ट्रात मतदानाची सर्वात कमी टक्केवारी दक्षिण-मुंबईत असल्याने तेथून जनजागृती सायकल रॅलीस प्रारंभ केल्याचे सायकलिस्ट म्हणाले.

अशी निघाली रॅली

मुंबईहून सुरू झालेली रॅली गुजरातमधील वापी, सुरत, राजस्थानमधील ब्यावर आणि हरियाणा व उत्तर प्रदेश मार्गे दिल्लीत पोहोचली. दरम्यान सायकलिस्टकडून अनेक ठिकाणी 'मतदान करा, अधिकार बजावा' असे संदेश दिला. मतदान करण्याची शपथही नागरिकांना देण्यात आली.

दिल्ली गौरव

प्रवासात सायकलिस्टला उष्णतेच्या प्रखर झळांसह जयपूर येथे सोसाट्याचा वारा आणि गारपीटांसह झालेल्या पावसाचा सामाना करावा लागला. अखेरीस ६ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ७.३० वाजता दिल्लीतील इंडियागेट येथे गुढी उभारत मतदान जनजागृती प्रवासाची सांगता करण्यात आली. त्यावेळी भारतीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायकलस्वारांचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध पत्नीची तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पतीने छळ करून आपल्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार पत्नीने उपनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. त्या महिलेचे पती नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण अकादमीतील (पीटीसी) निवृत्त सहाय्यक पोलिस संचालक आहेत.

पन्नास वर्षांची ही महिला एका साप्ताहिकाची संपादक असून, मुलासह नाशिकरोडला राहते. एप्रिल १९९९ मध्ये ती वसई पोलिस ठाण्यात बातमीसाठी गेली असता तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दिलीप जगताप यांच्याशी परिचय झाला. त्यांनी लग्नाची मागणी केली. नंतर जगताप यांनी घरी वारंवार जाऊन लग्नाची मागणी केली. तेव्हा महिलेने आपल्या कुटंबियांसमोर त्यांना आपण घटस्फोटीत असून एक मुलगा असल्याचे सांगितले. तेव्हा दोघांची जबाबदारी घेण्याचा ग्वाही दिल्यानंतर महिलेने विवाहाला संमती दिली. २००२ साली विवाह झाला. दोघांनी मिळून मीरारोड, मुंबईला प्लॅट घेतला. जगताप पत्नीसोबत दररोज अनैसर्गिक कृत्य केले. २००७ साली दिलीप जगताप यांना नाशिकच्या पोलिस प्रशिक्षण अकादमीत बढती मिळाली. येथेही जगताप यांनी पूर्वीप्रमाणेच त्रास दिला. त्यामुळे अखेर पत्नीने त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक - महावीरचे विद्यार्थी 'गगनांत-२०१९' स्पर्धेत प्रथम

$
0
0

महावीरचे विद्यार्थी 'गगनांत' स्पर्धेत प्रथम

फूल बॉडी एक्सो स्केलेटन ठरला प्रथम क्रमांकाचा प्रकल्प

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणतेही वजन उचलताना कंबर, पाठीचा कणा यावर मोठा ताण येत असतो. अनेकदा वजन उचलल्यामुळे बरी न होणारी दुखापतही होत असते. हे टाळण्यासाठी श्री महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर पॉलिटेक्निकच्या मॅकेनिकल इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी फूल 'बॉडी एक्सो स्केलेटन' या नावीन्यपूर्ण आणि समाजपयोगी प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प पीव्हीजी कॉलेज, नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या 'गगनांत-२०१९' या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शन आणि स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

औद्योगिक वसाहतीत हजारो मजूर काम करत असतात. वेल्डिंग करताना वस्तुंचा भार पेलवावा लागणे, शेतकऱ्यांना उत्पादीत मालाची कॅरेट्स उचलावी लागणे, पेस्ट्रिसाइडच्या कॅन्स अथवा अन्य कारणांसाठी वजन उचलण्याची कामे अनेक क्षेत्रांमध्ये करावी लागतात. ही कामे सोपी करण्यासाठी महावीर पॉलिटेक्निकच्या यश भदाणे, प्रियदर्शनी देवरे, संकल्प नेटके, ऋतिक वाघुलीकर, सोमेश सूर्यंवंशी या विद्यार्थ्यांनी 'फूल बॉडी एक्सो स्केलेटन' हा प्रकल्प तयार केला आहे. वजन उचलणे आणि वजन पेलवणे या दोन्हीही क्रिया यामुळे सहज शक्य होणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रकल्पाची उपयुक्तता जाणून घेत त्यास प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. सामजिक प्रश्नावर तोडगा काढणाऱ्या या विद्यार्थ्यांचे श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय विश्वस्थ राहुल संघवी, डीन डॉ. प्रियांका झवर, महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य संभाजी सगरे, प्रा. राजीव शिंदे, प्रा. पूजा भालेराव, प्रा. वर्षा गाढे, प्रा. नंदिनी खुटाडे, जगदीश कोल्हे, प्रा. गौरव चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

- -

फूल बॉडी एक्सो स्केलेटन प्रकल्पाद्वारे व्यक्तीने उचललेले वजन हे हातावरील फ्रेमच्या सपोर्टरच्या सहाय्याने हलके वाटते. उचललेले वजन हे प्रथम बॅक फ्रेमवर जाऊन मग ते हिप जॉइंटवर आणि नंतर दोन्ही पायांकडे समांतर विभागले जाते. यावेळी मिळणाऱ्या न्युमेटिक लिफ्टचा फायदा त्या मजूराला मिळू शकतो. शंभर किलो वजनापर्यंत हे वजन या फ्रेमच्या सहाय्याने पेलने शक्य आहे.

- यश भदाणे, प्रियदर्शनी देवरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लार्इफोलॉजी : किरण भालेराव

$
0
0

लार्इफोलॉजी : किरण भालेराव

जगण्याची कला

आयुष्य प्रवाही असतं…. ते सतत बदलत असतं… काळाचं आणि वेळेचं भान ठेवून आपणही बदलायला हवं.… पण हा बदल होत असताना आपली तत्त्व आणि मूल्य जपणं, त्यांचं संवर्धन करून ती लोककल्याणासाठी वापरणं, हीच तर खरी जगण्याची कला आहे.

---

१९७७ सालापासून माझ्या वडिलांनी १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला जुने सिडको येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं छत्रपती शिवाजी मार्केट येथे ध्वजारोहण करण्यास सुरुवात केली. समाज कार्यासोबत राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक एैक्य जपण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं. तेव्हापासून न चुकता सिडकोच्या शिवाजी कॉम्प्लेक्सवर ध्वजारोहणाची सुरुवात झाली. २००४ साली त्यांना देवाज्ञा झाली. तेव्हापासून हा उपक्रम खंडीत होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण, मला हा उपक्रम खंडीत होऊ द्यायचा नव्हता, म्हणून मी ही जबाबदारी घेण्याचं ठरवलं आणि बाबा गेल्यानंतरही खंड पडू न देता हा उपक्रम तसाच चालू ठेवला. आजही हा उपक्रम मी, माझे मित्र आणि अर्थातच माझ्या बाबांना त्या काळी ज्या त्यांच्या मित्रांनी साथ दिली ते सर्व मित्र मिळून हा उपक्रम राबवतो.

२००४ साली जेव्हा मी या उपक्रमाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आम्ही जेमतेम १० तो १५ लोक मिळून हा उत्सव साजरा करत असू. मोजक्या लोकांमध्ये फार काही गाजावाजा न करता केवळ राष्ट्रप्रेम या एकमेव भावनेने सारे न चुकता जमत आणि कार्यक्रम पार पाडतो. पण हळूहळू आमच्या लक्षात आलं की, या उपक्रमासोबत आपण समाज प्रबोधनाचं कार्य करू शकतो. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ज्या समाजात आपण रहातो त्या समाजाचं आपण देणं लागतो. त्यामुळे कोणताही स्वार्थ उराशी न बाळगता आम्ही या उपक्रमाद्वारे समाज प्रबोधनाचे वेगवेगळे उपक्रम राबवू लागलो.

पूर्वी मी बँकेत नोकरी करायचो आणि आता मी नोकरी सोडून पूर्णपणे अभिनय क्षेत्रात काम करतो आहे. मी एक कलाकार आहे. त्यामुळे कलेच्या माध्यमातून मी सतत कोणत्या ना कोणत्या कामाद्वारे लोकांपुढे येत असतो, म्हणून मग ठरवलं की आपण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला कलेच्या माध्यमातून जनजागृती आणि समाज प्रबोधन करायचं. त्यासाठी वेगवेगळ्या कलाकारांना आम्ही ध्वजारोहणाला आमंत्रित करू लागलो. नामवंत कलाकारांनी ध्वजारोहणाला यायला सुरुवात केली आणि या कार्यक्रमाला गर्दी जमायला लागली. त्यामुळे आमचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवता येऊ लागले. ढोल पथक, लेझिम, नॄत्य सादरीकरण अशा वेगवेगळ्या कलांचं सादरीकरण इथे होऊ लागलं आणि बघता बघता आज ५०० ते ६०० लोक दर वर्षी या कार्यक्रमाला हजेरी लावू लागले.

माझा चेहरा चित्रपट व मालिकांमुळे लोकांना परिचित आहे. कला क्षेत्रात काम करताना प्रसिद्धी तर मिळतेच पण समाजाकडून तेवढंच प्रेमही मिळू लागते हे मी अनुभवलं आहे. समाजाचे हे ऋण फेडण्यासाठी आपल्या कुवतीप्रमाणे आपण कार्य करत रहाणं गरजेचं असतं. पूर्वी बँक कर्मचारी म्हणून माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. आता ते अभिनेता म्हणून मला ओळखतात… निश्चितच कलाकार या ओळखीला एक वलय असतं…. त्याचा फायदाही होतोच… पण तो फायदा आपाल्याकडून पुन्हा समाजापर्यंत पोहोचवताना जो आनंद आणि जे समाधान मनाला मिळतं ते काही औरच…. स्वच्छता, प्रदुषण, वनसंवर्धन, राष्ट्रप्रेम, सामाजिक ऐक्य अशा वेगवेगळ्या विषयांना दर वर्षी लोकांपुढे मांडून जनजागृती करणं हे आमचं ध्येय असतं. आपण जसजसे मोठे होत जातो तसतशा आपल्या जबाबदाऱ्या वाढू लागतात… प्रसिद्धीचं पण तसंच आहे.… पूर्वी प्रसिद्धीचं वलय मलाही आकर्षित करायचं. पण आता प्रसिद्धीसोबत येणाऱ्या जबाबदारीचंही भान येऊ लागलं आहे…. आयुष्य प्रवाही असतं… ते सतत बदलत असतं.… काळाचं आणि वेळेचं भान ठेवून आपणंही बदलायला हवं.… पण हा बदल होत असताना आपली तत्त्व आणि मूल्य जपणं आणि त्यांचं संवर्धन करून ती लोककल्याणासाठी वापरणं, हीच तर खरी जगण्याची कला आहे.

(लेखक प्रसिद्ध अभिनेता आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रशिक्षणात सारेच घामाघूम मालेगावी रविवारी पा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणूक जाहीर झाली तशी राजकीय पक्षांबरोबर प्रशासन देखील कामाला लागले आहे. धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत येणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य मतदार संघातील मतदान कर्मचाऱ्यांना रविवारी उपकार सिनेमागृहात दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान सारे कर्मचारी आणि अधिकारी मात्र घामाघूम झाले. शहराचे तापमान ४२ अंशापर्यंत गेल्यामुळे दिवसभर खूप उकाडा होता.

मालेगाव बाह्य मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी नरेशकुमार बहिरम, निवडणूक नायब तहसिलदार रमेश वळवी, पुरवठा निरीक्षक अधिकारी पी. बी. मोरे आदी उपस्थित होते. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील ३०८ मतदान केंद्रांसाठी २१०९ मतदान कर्मचाऱ्यांना रविवारी मतदानकेंद्रावरील प्रत्यक्ष कामकाज याबाबत हे प्रशिक्षण देण्यात आले. वाढत्या उन्हाचा तडाखा जसा राजकीय पक्षांना प्रचारात बसतो आहे. तसा तडाखा रविवारी मतदान कर्मचाऱ्यांनाही बसला. रविवारी सकाळ सत्रातील प्रशिक्षण आटोपल्यानंतर दुपार सत्रातील प्रशिक्षणासाठी आलेल्यांची मात्र उन्हामुळे लाहीलाही झाली. रविवारी कमाल तापमान ४२ अंशाच्यापुढे गेल्याने दुपारी आलेल्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता. अनेकांनी दुपारच्या वेळेला प्रशिक्षण ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षण स्थळी पाण्याची सुविधा असली तरी उन्हाच्या झळा आणि उकाडा यामुळे सारेच हैराण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहावीतील मुलगी गर्भवती

$
0
0

शासकीय आश्रमशाळेतील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पेठ तालुक्यातील खरपडी येथील शासकीय आश्रमशाळेतील सहावीतील मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असून, त्याच शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याविरुद्ध मुलीच्या पालकांनी हरसूल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलगा आणि मुलगी हे दोघेही पेठ तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी असून, ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलींची नियमित आरोग्य तपासणी होत असते. मात्र, तीन महिने उलटले तरी याबाबत आश्रमशाळेच्या अधीक्षकांना हा प्रकार कसा लक्षात आला नाही, याबाबत चर्चा होत आहे. या प्रकरणाने आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या पालकांपासून दूर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार रविवारी उघड झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या दोघांचेही लग्न लावून देण्याची तयारी दोन्ही कुटुंबांनी दाखवली; मात्र दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, हरसूल येथे ग्रामीण रुग्णालय असताना त्र्यंबकेश्वर येथे वैद्यकीय तपासणी करता येणार नाही, म्हणून त्यांना परत पाठविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युती झाली म्हणून मतभेद मिटले नाहीत!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, राम मंदिर या तीन प्रश्नांची उत्तरे भाजपकडून घेण्यात आल्यानंतरच शिवसेनेने युती केली. हिंदुत्ववादी व विकासवादी पक्ष एकत्र आल्याने देशाचा फायदा होईल. युती झाली म्हणून मतभेद मिटलेत, असे नाही. नोटाबंदीस आमचा अजूनही विरोध आहे. जे राष्ट्रहिताचे मुद्दे असतील त्यांना आमचा पाठिंबा राहील, असे सांगत शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

नाशिक येथे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी डोंगरे वसतिगृहाच्या मैदावर आयोजित आदित्य संवाद या कार्यक्रमात ते बोलते होते. यावेळी ओंकार रोकडे या तरुणाने भाजप व शिवसेना युती का केली, हा प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सत्तेत असताना भाजपबरोबर वैचारिक मतभेद होते, असे सांगितले. पण, आता युती झाली असल्याचे सांगून त्यामागची कारणेही सांगितली. या कार्यक्रमात सायली निकम, राहुल चौधरी, मानसी खरकोतकर यांच्यासह अनेक तरुणांनी प्रश्न विचारले. कार्यक्रमाअगोदर विविध क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नाशिकच्या तरुणांचा नाशिक ढोल, रॉक शो झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी, खासदार हेमंत गोडसे यांनी काय काम केले? नाशिकला विद्यापाठीचे उपकेंद्र केव्हा होईल? रोजगाराची संधी केव्हा मिळेल? यांसारख्या प्रश्नांना उत्तरे देत त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनही दिले. शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत अभ्यासक्रम बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमाला नाशिकच्या तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे हा कार्यक्रम चांगलचा रंगला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हलक्या फुलक्या प्रश्नांवर ठाकरे यांनी साधलेल्या संवादामुळे तरुणाईने हा कार्यक्रम चांगलाच एन्जॉय केला. नेहमीच्या चाकोरीपेक्षा हटके असलेल्या 'आदित्य संवाद' या कार्यक्रमात तरुणाई हरखून गेल्याचे चित्र डोंगरे वसतिगृह येथे रविवारी दिसून आले.

प्रश्नांचा भडिमार अन् हशा

या कार्यक्रमात नाशिकच्या युवक व युवतींनी त्यांच्यावर प्रश्नांचा जणू भडिमारच केला. मोकळ्या मैदानात तिन्ही बाजूंनी असलेल्या खुर्च्या व त्यात मधोमध केलेल्या रॅम्पमुळे सर्वांशी संवाद साधणे सोपे गेले. यावेळी एका सीनिअर केजीच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्याची खूण केल्यामुळे आदित्य यांनी त्याला स्टेजवर नेले. त्यावेळी आदित्य यांनी सांग काय आहे तुझा प्रश्न, म्हटल्यावर त्या लहान मुलाने 'काहीच प्रश्न नाही' असे सांगितले. त्यामुळे एकच हशा पिकला.

'नीलेश राणे'मुळे विकेट

या कार्यक्रमात पहिलाच प्रश्न नीलेश राणे नावाच्या व्यक्तीचा आल्यामुळे आदित्य ठाकरेंची विकेट पडली. यावेळी त्यांनी 'अरे बापरे' म्हणत नाशिकच्या नीलेश राणेच्या आदिवासी मुलांच्या क्रीडा सुविधेसंदर्भातील प्रश्नाला साजेसे उत्तर देत वातावरण हलके फुलके केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शास्त्रीय बंदिशी अन् उपशास्त्रीय गीतांची सुरेल पेशकश... गायक अन् वादकांच्या जुगलबंदीने तृप्त झालेले कान अशा अशा स्वराविष्काराच्या आनंन्नुभूतीने नाशिककरांची मराठी नववर्षाच्या प्रारंभीची सायंकाळ श्रीमंत झाली. अभिजात भारतीय संगीताच्या दुर्मिळ कलाविष्काराने नाशिककरांना केवळ मंत्रमुग्धच केले नाही, तर सुरावटींमधून शब्दांच्या पलीकडची अनोखी सफरही घडविली. निमित्त होते महेश काळे या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायकाच्या गीतमैफलीचे.

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या सदस्यांसाठी मराठी नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूररोडवरील सावरकरनगर येथे नंदनवन लॉन्समध्ये आयोजित या मैफलीस नाशिकमधील दर्दी रसिकांनी तोबा गर्दी केली होती.

मैफलीच्या प्रारंभीच महेश काळे यांनी प्रसिद्ध अशी 'ला दे ला दे पिया' ही बंदिश सादर करीत रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. काळे यांची ताकदीची गायकी, प्रत्येक शब्दावर चढविला जाणारा सुरांचा साज अन् आलापीसमवेत वादकांचा रंगलेल्या जुगलबंदीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी 'शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' हे रसिकप्रिय गीत त्यांच्या आगळ्यावेगळ्या अंदाजात सादर केले. नाशिककर रसिकांनीही त्यांच्या या गायकीला टाळ्यांच्या कडकडाटात मनमुराद दाद दिली. या गीताच्या सादरीकरणातून जणू काळे यांनी सूरावटींतून रसिकांना शब्दांच्या पलीकडील सुश्राव्य दुनियेची सफर घडविली. त्यानंतर त्यांनी संत चोखामेळा यांची 'आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण' या रचनेसह रसिकांच्या आवडीची अनेक गाणी सादर केली. संवादिनीवर राजू तांबे यांनी साथसंगत केली. प्रसाद पाध्ये (तबला), श्रुती भावे (व्हायोलिन), सूर्यकांत सुर्वे (तालवाद्ये) यांनी काळे यांना साथसंगत करीत मैफल अधिकच बहारदार केली.

-----पॉइंटर्स---

स्वागत यात्रांतून जनजागृती -२

...तर नाशिकरोडला पाणीबाणी-३

करवसुलीसाठी नोटिसा -४

भयकंप अन् थरार -५

'फिशिंग'चा वाढता धोका -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

$
0
0

दहा दिवसांसाठी आधार सुविधा केंद्र बंद

...

- स्कॉलरशीपच्या विद्यार्थ्यांची पंचाईत

- १ मार्चनंतर सुविधा होणार सुरू

- शहरात १६, तर जिल्ह्यात १०० केंद्र

- पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक, कामगार, नोकरदारांनाही फटका

....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा कार्यान्वित होत असल्याने आगामी दहा दिवसांसाठी राज्यातील आधार सुविधा केंद्र बंद ठेवण्याच्या सूचना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाने दिल्या आहेत. परिणामी, आधार अपग्रेडेशनच्या भरवश्यावर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ पाहणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यातच भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क-परीक्षा शुल्क योजना आणि इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी अपग्रेड आधारसह विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. मुदतीच्या दिनांकानुसार कागदोपत्री विद्यार्थ्यांच्या हाती आठ दिवस दिसत असले तरीही आधार केंद्र १ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांच्या हातची मुदत आताच संपली आहे. ही मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत.

शासनाच्या सर्वच योजनांसाठी आधारकार्डचा अद्ययावत तपशील गरजेचा आहे. मात्र, आधार अपग्रेडेशनसाठी नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा यापुढील कालावधीत वापरण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक अडचणींमुळे आगामी ७ ते १० दिवस आधार केंद्र बंद राहणार आहेत. १ मार्चनंतर ही सुविधा पुन्हा सुरू होईल. मात्र त्या अगोदर २८ फेब्रुवारीपर्यंत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करायचे आहेत. ज्यांचे आधार अपडेट नाही त्यांना मात्र या योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हा कालावधी शासनाने वाढवून द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

...

अन्य लाभार्थ्यांचीही परवड

शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, रेशनकार्डधारक नागरिक, खासगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार आदींना याचा फटका बसणार आहे. यासंदर्भातील सूचना ऐनवेळी मिळाल्याने नागरिकांच्या हाती दुसरा पर्याय राहिलेला नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. सद्यस्थितीत शहरात १६ शासनाधिकृत, तर जिल्ह्यात १०० केंद्र सुरू आहे. या सर्व ठिकाणचे काम आगामी आठ ते दहा दिवस ठप्प होणार असल्याने नागरिकांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुणाल पाटलांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत आदर्श आचारसंहितेची प्रशासनाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. धुळे लोकसभेचे काँग्रेस उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी सभेस परवानगी घेतली नाही म्हणून तालुका पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शुक्रवारपासून आमदार कुणाल पाटील यांचा प्रचारार्थ मालेगावात दौरा सुरू आहे. शुक्रवार ५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान तालुक्यातील सौंदाणे गावी ग्रामपंचायत समोरील सभामंडपात त्यांनी सभा घेतली होती. उमेदवारांना सभेच्या परवानगीसाठी मालेगाव बाह्य मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी एक खिडकी योजना सुरू केली आहे. दरम्यान आचारसंहिता भंगची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सभेच्या परवानगी बाबत अर्ज दिलेला आहे किंवा नाही याची खात्री केली असता सभेची परवानगी घेतली नसल्याचे समोर झाले. यामुळे पोलिस शिपाई सचिन बाबूलाल दळवी यांच्या फिर्यादीवरून कुणाल पाटील यांच्यासह ६० ते ७० जणांवर विनापरवानगी सभा घेवून कायद्याचे उल्लंघन केले.

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आमदार कुणाल पाटील आज (दि. ८) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वा. धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालय देवपूर येथून रॅली निघणार आहे. दुपारी ११.४५ वा. पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमरीश पटेल, रोहीदास पाटील, हेमंत देशमुख, डॉ. प्रशांत हिरे, राजवर्धन कदमबांडे, आमदार असिफ शेख, दीपिका चव्हाण, महापौर रशीद शेख, मौलाना मुफ्ती इस्माईल, डॉ. अद्वय हिरे, प्रसाद हिरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, संजय चव्हाण आदी उपस्थित राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगरवाडीत शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्यातील धनगरवाडी (पिंपळगाव) येथील ५० वर्षीय रमेश मारुती डुंबरे या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून झाडाला फाशी घेत रविवारी आत्महत्या केली. सिन्नरपासून पूर्व भागातील ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाडी येथे ही घटना घडली. रमेश डुंबरे यांनी रविवारी पहाटे साडेपाच वाजता शेतातील निंबाच्या झाडाला फाशी घेतली. कालच त्यांनी शेतातील कांदे काढून ठेवले होते. पत्नी जयश्री या सकाळी झोपेतून उठल्यानंतर कांद्यावर पात टाकण्यासाठी शेतात आल्या. त्यावेळी पतीला त्यांनी बांधावर उभ्या अवस्थेत पाहिले. त्यांनी बांधावर काय करतात? असे विचारता त्यांना पतीकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या गळ्यात दोरी होती व ते मृतावस्थेत आढळले. नंतर त्यांनी आरडाओरड करून कुटुंबातील व्यक्तींना घटनास्थळी बोलावले. ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी सिन्नरला पाठविला. सिन्नरच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर धनगरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्जाळा कंटाळून घेतला निर्णय

घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यात सोसायटी व बँकेच्या कर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी सदर नोट जप्त केली आहे. डुंबरे यांच्या नावावर धनगरवाडी शहरात दीड एकर जमीन आहे. यापूर्वीही धनगरवाडी गावात दोन शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. डुंबरे त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. मुसळगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकाला फसविले

$
0
0

दर्जाहीन मशीन मारले माथी; एक कोटीची फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कंपनीत आवश्यक असणारे एसक्युएफ मशीन तयार करून देण्याच्या बदल्यात एक कोटी तीन लाख एक हजार ५६२ रुपये घेऊन निकृष्ट दर्जाचे मशीन देऊन नाशिकच्या उद्योजकाची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबईस्थित नऊ जणांविरूद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पॉवेल वॅरेझेकोस्की, स्लावोमिर वॉझनियाक, कांची वरदैय्या, मिलिंद कुलकर्णी, हरिष खट्टर, रॉअर्ट सेनोस्की, प्रशांत रॉय, नितीन कुमार पांडे, हेमंत खाचणे (सर्व रा. महापे औद्योगिक वसाहत, मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील विनीत प्रकाश पोळ यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोळ यांना त्यांच्या कंपनीत आवश्यक असलेली एसक्यूएफ मशीनची आवश्यकता होती. ८ एप्रिल २०१५ रोजी या मशीनचे उत्पादन करून देतो, असे आश्वासन देऊन संशयितांनी पोळ यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. मार्च महिन्यांमध्ये त्यांनी मशीन सुद्धा दिले. परंतु, पोळ यांच्या कंपनीला अपेक्षित असलेले डिझाइन देण्यात आले नाही. तसेच, संबंधित मशीन निकृष्ट पद्धतीने तयार केले. त्या मशीनवर पोळ काहीच काम करू शकले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्याने फिर्यादीने अंबड पोलिस ठाणे गाठून विश्वासघात

फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तोतया पोलिसांनी वृद्धास लुटले

शहरात पुन्हा एकदा तोतया पोलिस सक्रीय झाले असून, त्यांनी वृद्धांना लक्ष्य केले आहे. पोलिस असल्याची बतावणी करीत दोघांनी वृद्धाच्या अंगावरील दागिने काढून घेत त्यांना लुटल्याची घटना शनिवारी (दि. ६) सकाळी म्हसरूळ परिसरात घडली. प्रल्हाद सुकलाल राठोड (६५, रा. चाणक्यपुरी सोसायटी, मखमलाबाद लिंकरोड) यांनी तक्रार दिली. राठोड हे शनिवारी सकाळी किशोर सूर्यवंशीमार्गावरील सप्तशृंगी देवीच्या मंदिरासामोरून जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करीत दागिने काढून ठेवा, अशी दमदाटी केली. तसेच, त्यांच्या गळातील सोन्याची चेन व अंगठी असे ६५ हजाराचे दागिने घेऊन पळून गेले. ही बाब निदर्शनास येताच राठोड यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

एटीएम बदलले, ४१ हजारांवर डल्ला

पासवर्ड निर्माण करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने पासवर्ड माहिती करून घेत एटीएम कार्डची बदली करून वृद्धाची ४१ हजार २७८ रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील स्टेटबँक एटीएम परिसरात घडली. विजय उगडू मेतकर (रा. दुर्गानगर कामठवाडे) यांनी तक्रार दिली. २१ मार्च रोजी ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भारतीय स्टेट बँकेत नवीन एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी गेले होते. नवीन कार्डचा पासवर्ड तयार करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने

संशयिताने त्यांचा पासवर्ड माहिती करून घेतला. तसेच, हातचलाखीने कार्ड बदलून घेतले. यानंतर विविध ठिकाणांवरून त्यांच्या बँक खात्यातील ४१ हजार २७८ रुपयांची रक्कम काढून घेतली. सरकारवाडा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल हिसकावला

मोबाइलवर बोलत रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीवरील तिघा चोरट्यांनी हिसकावून धूम ठोकली. ही घटना भद्रकालीतील पिंपळचौक परिसरात शुक्रवारी (दि. ५) रात्री घडली. अश्विनकुमार नंदकिशोर शौचे (४१, रा. दिंडोरीरोड, पंचवटी) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी रात्री ते आठ वाजेच्या सुमारास मेनरोडकडून पिंपळपार चौक परिसरात जात असताना पाठीमागून एका दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी त्यांच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सखी मतदान केंद्रासाठी आवाहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

महिलांमधील कर्तृत्व व हुशारीला वाव देण्यासाठी व पुरुषांच्या बरोबरीने महिलाही सक्षमपणे काम करू शकतात म्हणून आता येत्या लोकसभा निवडणुकीत सबकुछ महिलाराज असणारे 'सखी मतदान केंद्र' नांदगाव मतदार संघात असणार आहे. मतदान केंद्राध्यक्षापासमन जर पोलिस कर्मचारीपर्यंत सगळ्या महिलाच कार्यरत असणार आहेत. हे आव्हान स्वीकारून

धाडसाने काम करण्यासाठी महिलांनी पुढे यावे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मल यांनी नांदगाव येथे केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या ,आदर्श असे सखी मतदान केंद्र निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शना नुसार कार्यन्वयीत करण्यात आले असून नांदगावमध्ये ही विशेष योजना राबवली जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी निर्मल यांनी सांगितले

अनेकदा मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी म्हणून पुरुष कर्मचाऱ्यास नेमले जाते व महिलांना शक्यतो इतर अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाते. शक्यतो मतदान केंद्राध्यक्ष जबाबदारी पुरुष वर्गाकडे देण्याकडे कल असतो, मात्र सखी मतदान केंद्र या विशेष संकल्पनेत मतदान केंद्राध्यक्ष या जबाबदारीच्या पदावर महिला असणार आहे. तसेच मतदान अधिकारी क्रमांक १ व २ साठी महिलांचीच निवड केली जाणार आहे. शिपाई, मदतनीस देखील महिला असतील तर या मतदान केंद्रावर असणारा पोलिस फाटा देखील महिलांमधूनच निवडला जाणार आहे, अशी माहिती देत पल्लवी निर्मल यांनी या मतदान केंद्रासाठी महिलांनी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


६३ वर्षांत ४ लाख मते बाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही निवडणुकीत एका मताला महत्त्व असताना नाशिक व दिंडोरी मतदार संघात गेल्या १६ लोकसभा निवडणुकांत आतापर्यंत ४ लाख ५ हजार २०४ मते बाद झाली आहेत. तर २० हजार ८ मतदारांनी 'नोटा'चा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले आहे.

दिंडोरी हा मतदारसंघ पूर्वी मालेगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. पण, २००९ मध्ये दिंडोरी हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. हा मतदारसंघ मालेगाव असतानाची आकडेवारी १९५१ ते २००४ च्या निवडणुकीपर्यंत आहे. तर नाशिकच्या बदलाची आकडेवारीसुद्धा निवडणुक यंत्रणेकडून मिळालेली आहे. त्यात ६३ वर्षांत झालेल्या १६ लोकसभा निवडणुकांत बाद व नोटा मतांची आकडेवारी समोर आली आहे.

१९५१ ते १९९९ च्या १३ लोकसभा निवडणुकांत मतपत्रिकाद्वारे मतदान केले जात होते. पण, त्यानंतर २००४, २००९ मध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला. २०१४ मध्ये ईव्हीएममध्येच 'नोटा'चा पर्यायही देण्यात आला. बाद होण्याचे प्रमाण मतपत्रिकेद्वारे होणाऱ्या निवडणुकीत होत होते. पण, ईव्हीएममुळे ही डोकेदुखी कमी झाली. देशात ईव्हीएमचा वापर १९८२ मध्ये पहिल्यांदा करण्यात आला. त्यानंतर त्याचा वापर आता सर्वत्र केला जात आहे. पण, या मशिनबद्दल आजही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.

नोटाचा वापर १ ते २ टक्के

दिलेल्यापैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर 'नोटा' (नन ऑफ दि अॅबाव्ह) म्हणजे यापैकी कुणी नाही याचा वापर करता येतो. २०१३ मध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान, मध्यप्रदेश व दिल्ली या ठिकाणी 'नोटा'चा वापर झाला. त्यात एक ते दोन टक्के लोकांनी याचा वापर केला. नाशिकध्ये दोन्ही मतदार संघात याचे प्रमाणे १ ते २ टक्के दरम्यानच आहे. मतपत्रिकेतून बाद मत होण्याचे प्रमाण सरासरी दहा हजारांच्या आसपास होते. आता 'नोटा'चे प्रमाणही तितकेच आहे. त्यामुळे बाद व 'नोटा' सारखेच असले तरी त्यात फरक आहे. बाद मते चुकून झालेली असतात. यात सहसा उमेदवाराला नाकारले जात नाही. पण, नोटामध्ये उमेदवार नाकारला जातो. त्यामुळे या दोघांतील हा फरक महत्त्वाचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतवार्ता-२

$
0
0

मतदानासाठी पत्र्याचे शेड

नाशिकरोड : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम अक्कलकुवा तालुक्यात तीन गावांत मतदान केंद्रांसाठी सार्वजनिक इमारतच उपलब्ध नसल्याने येथील ८०० मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनातर्फे पत्र्याचे शेड ठोकून मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. धनखेडी, मुखाडी आणि झापी अशी या तीन मतदान केंद्रांची नावे आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघात येत्या २९ एप्रिलला सार्वत्रिक मतदान होणार आहे. मतदारांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून मतदान केंद्र दूर नसावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिलेल्या असल्याने प्रशासनाकडून या तिन्ही गावांत मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी पत्र्याचे शेड ठोकले जाणार आहे. मतदानावेळी प्रशासनाकडून सशस्त्र पोलिस बंदोबस्तही उपलब्ध करून दिला जाणार आहे. या तिन्ही मतदान केंद्रांवर ८०० मतदार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा ऋषिकेश यूपीएससीत चमकला

$
0
0

४९१ वे रँकिंग; खडतर परिस्थितीत मिळविले यश

म. टा. वृत्तसेवा सिडको

सिडको परिसरात राहणाऱ्या सुंदरबन कॉलनीतील ऋषीकेश प्रदीप रावले या युवकाने पहिल्याच टप्प्यात यूपीएससीत यश संपादन केले. स्वतःवर असलेल्या आत्मविश्वासामुळेच हे यश संपादित करण्यात आले असल्याचे मत ऋषीकेशने व्यक्‍त केले.

सिडकोतील सुंदरबन कॉलनीत राहणाऱ्या ऋषीकेश हा राणेनगर येथील सेंट फ्रांसिस हायस्कूलमध्ये शिकत होता. दहावी नंतर त्याचा औरंगाबाद येथील एस. पी. आय महाविद्यालयात नंबर लागला. पुढे २०१७ मध्ये त्याने बी. ई मेकॅकिनल केले. त्यानंतर यूपीएससी परिक्षा देण्याचा निश्चिय करून त्याने दिल्लीत अभ्यासाला सुरुवात केली. आणि पहिल्याच प्रयत्नात तो देशभरात ४९१ व्या क्रमांकावर आला. ऋषीकेशचे वडील सिव्हील हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. सन २००८ मध्ये त्यांचे निधन झाले. आई नाशिक महापालिकेच्या शाळेत शिक्षिका आहे. लहान बहीण बी. फार्मसीचे शिक्षण घेत आहे. यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर ऋषीकेशने सांगितले की, ही परिक्षा अवघड असली तरी यात सातत्य असणे आवश्यक आहे. स्वतःचा आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेत यश

$
0
0

चित्रकला स्पर्धेत यश

नाशिक : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स, नाशिक यांच्यातर्फे 'ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह व रस्ता सुरक्षा' या सामाजिक ज्वलंत विषयावर आधारित जिल्हास्तरीय भित्तीचित्र (पोस्टर) स्पर्धा घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये या सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नाशिक मधील कृष्णा सानप, सचिन थोरात या दोघांच्या चित्रांची निवड करण्यात आली. आरटीओचे विभागीय अधिकारी भारत कळसकर यांच्या हस्ते दोघांना पारितोषिके प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक - धनलक्ष्मी शाळेत विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा

$
0
0

धनलक्ष्मी शाळेत ऑनलाइन परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांची माहिती व्हावी, तसेच प्रात्यक्षिकांद्वारे सराव झाल्यास त्याचा निश्चितच भविष्यात फायदा होऊ शकेल, या उद्देशाने मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेतर्फे गेल्या सहा वर्षांपासून ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. अशा प्रकारची परीक्षा घेणारी मराठी माध्यमाची पहिली शाळा म्हणून शाळेस बहुमान प्राप्त झाला असून यंदाही ही परीक्षा घेण्यात आली.

दहावी व बारावीनंतर सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता ऑनलाइन सीईटी परीक्षा अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच या परीक्षांची माहिती देण्यात येते, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. इयत्ता पहिलीपासून ते दहावीच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. यामध्ये विविध विषयांतील वस्तुनिष्ठ प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांना तांत्रिक युगात कौशल्याधिष्ठित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, संस्था सचिव ज्योती कोल्हे यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा घेण्यात आली. यामुळे संगणक हाताळणी व विषयाचा सखोल अभ्यास करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागते. तसेच स्पर्धा परीक्षांसह इतर तत्सम परीक्षांची तयारी शालेयवयापासूनच होते, असे मत कोल्हे यांनी मांडले.

प्रथम व द्वितीय सत्रात ही परीक्षा घेण्यात येत असून मागील वर्षी विज्ञान या विषयातील वस्तुनिष्ठ प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर यावेळी भूगोल या विषयातील वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. संस्था संचलित सर्व शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images