Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एलईडी निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा

$
0
0
हायकोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रशासनाने एलईडी संदर्भातील पुढील प्रक्रीया राबवावी, असा आदेश गुरुवारी ए. एम. खानविलकर व के. के. तातेड यांच्या खंडपीठाने दिला. त्यामुळे एलईडीच्या प्रक्रियेवरील स्थगितीचे सावट तुर्तास दूर झाले आहे.

जिल्हा बँकेची दुटप्पी भूमिका

$
0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी गटाने कोअर बँकींगच्या नाबार्डच्या आदेशाचा झेंडा फडकवत दुटप्पी भूमिका बजावण्याचे काम सुरू ठेवले आहे. एकीकडे विभागीय सहनिबंधकांना कम्प्युटर खरेदी करणार नसल्याचे सांगत मार्गदर्शन करण्याचे पत्र दिले आहे. तर, दुसरीकडे बँकेने कम्प्युटर खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे कम्प्युटर खरेदीचे हे प्रकरण चांगलेच गाजण्याची चिन्हे आहेत.

विद्यार्थी व संस्थाचालक आमनेसामने

$
0
0
मोफत सु​विधा देण्याचे आश्वासन देत प्रवेश दिलेल्या संस्थेने पैसे उकळल्याचा आरोप करत नाशिक नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी थेट पंचवटी पोलिस स्टेशन गाठत संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत शुक्रवारी सकाळी १० वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यात समोर येणाऱ्या निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे.

अशीही फजिती

$
0
0
चमकण्याची संधी मिळणार असेल, तर पुढारी मंडळी कार्यक्रम टाळत नाहीत. मग तो कार्यक्रम वाढदिवस, विवाहासारखा असेल तर त्यांच्यासाठी आयती संधीच. त्यात तो पुढारी नगराचा सेवक असेल, तर त्याला नगरात भारी मान असतो. अशाच एक नगरसेवक महाशयांना वॉर्डातील लग्नसोहळ्यांचे आमंत्रण होते. तिथ दाट असल्याने त्यांना आमंत्रणही तीन-चार होते.

महागड्या प्रस्तावांबाबत काँग्रेसमध्ये मतभेद

$
0
0
सत्तेत आल्यापासून ठराविक लोक विकास कामांना विरोध करीत आहे, असे सांगत स्थायी समिती सभापती तथा काँग्रेसचे नगरसेवक उध्दव निमसे यांनी कोट्यवधींची रोबोटीक मशिन तसेच हायड्रोलिक प्लॅटफॉर्म शिडी खरेदीच्या महापौर आणि आयुक्तांच्या भूमिकेचे समर्थन केले. विशेष म्हणजे त्यांच्याच पक्षाचे आमदार जयप्रकाश छाजेड यांनी मात्र या प्रस्तावांना विरोध दर्शविला असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आता धाकधुक प्रवेशाची

$
0
0
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून प्रवेश अर्जासाठी शाळांसमोर रांगा लावलेल्या पालकांना काहीशी उसंत मिळालेली असली तरी आता प्रवेशाची धाकधुक सुरू झाली आहे. प्रवेश अर्जाची धावपळ संपली असली तरी हव्या असलेल्या शाळेत मनाप्रमाणे आपल्या मुलांना अॅडमिशन मिळते की नाही याची चिंता पालकांच्या मना‌त आहेच.

नाट्य परिषदेच्या निवडणुकीत गोलमाल?

$
0
0
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत आता चांगलाच रंग भरला आहे. निवडणूक म्हटली की साम, दाम, दंड, भेद येतातच त्याचाच वापर यंदाच्या निवडणुकीत होत आहे. मतांचा गोलमाल करण्यासाठी डुप्लिकेट मतपत्रिका देणे, एकाच मतदाराला दोन मतपत्रिका देणे असे प्रकार काही विभागांमध्ये होत असल्याची मतदारांची तक्रार आहे.

पर्यटन विकासाला वन विभागाचा खोडा

$
0
0
वन विभागातील अधिका-यांच्या अनुत्सुकतेपोटी खुद्द पर्यटनमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची पर्यटन विकासाची कामे रखडली आहेत. जिल्ह्यातील इको टुरिझमच्या विकासालाही यामुळे खीळ बसला असून येत्या दीड-दोन महिन्यांत हा निधी खर्च झाला नाही तर तो परत जाण्याची दाट शक्यता आहे.

बलात्काराचा प्रयत्न करणारा गजाआड

$
0
0
मनमाड येथील गायकवाड चौकातील एका ५० वर्षीय व्यक्तीने परिसरातील सात अल्पवयीन मुली व एक अल्पवयीन मुलगा यांना मोबाइलवर अश्लिल क्लिप दाखवत बलात्काराचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याला गजाआड केले.

राष्ट्रध्वजाच्या किमती उतरल्या

$
0
0
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळल्याचे चित्र असताना देशात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने कपड्यांचे भाव उतरले आहेत. याचा परिणाम राष्ट्रध्वजाच्या किमतीतही झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत ध्वजांच्या किमती साधारण १० ते १५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत.

भाजपमध्येही अंतर्गत वादावादी

$
0
0
महागड्या प्रस्तावांवरुन एकीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले असताना अशा वादाला भाजपही अपवाद ठरले नाही. माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे यांनी रोबोटिक मशिन्स आणि हायड्रोलिक प्लॅटफॉर्म शिडीला विरोध दर्शविला असताना गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन मशिनरी आणि शिडी खरेदीला पक्षाचे समर्थन असल्याचे स्पष्ट केले.

नाशिकचे दूध आटले!

$
0
0
नैसर्गिक समृद्धी तसेच धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिकला सध्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दुष्काळाचा परिणाम दूध उत्पादनावरही झाला असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील दररोजचे एक लाख लिटर दूध आटले आहे. त्यामुळे गरज भागविण्यासाठी अन्य जिल्ह्यांतून दररोज सुमारे सहा लाख लिटर दूध खरेदी करावे लागत आहे.

सुविधा नाही तरी 'ऑल इज वेल'

$
0
0
सातपूरला असलेल्या राज्य कर्मचारी विमा हॉस्पिटलमध्ये अनेक सोयी-सुविधांची वानवा असली तरी ऑल इज वेल असल्याची प्रतिक्रीया इएसआयसीचे राष्ट्रीय आयुक्त बी. के. साहू यांनी हॉस्पिटलला दिलेल्या भेटीत दिली. त्यामुळे मोठ्या अपेक्षा बाळगून असलेल्या कामगार आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची मोठीच निराशा झाली.

दमबाजी करत युवतीवर बलात्कार

$
0
0
एकट्या सापडलेल्या युवतीला दमबाजी करून तिच्यावर बळजबरी करणा-या​ तरूणाविरूध्द नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली​ आहे. ही घटना सुमारे एक वर्षभरापूर्वी एकलहरा परिसरातील गंगावाडी येथे घडली होती.

काँग्रेसशी लढताना स्वतःच भिडले

$
0
0
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या भाजपविरोधी वक्तव्याचा निषेध म्हणून गुरुवारी भाजपतर्फे धरणे आंदोलने करण्यात आली. मात्र या आंदोलनात सहभागी होण्यावरुन भाजप शहराध्यक्ष व माजी नगरसेवक आपापसात भिडल्याच्या चर्चेने भाजपच्या या काँग्रेसविरोधी आंदोलनाला पक्षांतर्गत वादाच स्वरुप आले.

नाशिकच्या दोघांना राष्ट्रपती पदक

$
0
0
२६ जानेवरीच्या पूर्वसंध्येला जाहीर होणारे मानाचे राष्ट्रपती पोलिस पदक यावेळेस पोलिस उपायुक्त सुनिल फुलारी तसेच नाशिक ग्रामीण मधील पी​एसआय माधव गोसावी यांना जाहीर झाले आहे.

अभयारण्यांना गाईडचे सुरक्षा कवच

$
0
0
उत्तर महाराष्ट्रातील कळसूबाई-हरिश्चंद्रगढ, नांदूरमध्यमेश्वर आणि पाल या तीन अभयारण्यांना गाईडचे सुरक्षा कवच लाभणार आहे.

‘केंब्रिज’ला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

$
0
0
विद्यार्थ्यांना ‘ईद’ची सुट्टी न दिल्यामुळे इंदिरानगर परिसरातील रॉयल एज्युकेशनल पब्लिक ट्रस्टच्या ‘नाशिक केंब्रिज स्कूल’ला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला

त्यांच्यासाठी खुला झाला पुस्तकांचा खजिना

$
0
0
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाबरोबरच जीवनातील अनेक चांगल्या अनुभवांपासून दूर राहिलेल्या मुलांना शिक्षण देण्याबरोबरच हे अनुभव देण्याचा प्रयत्नही ‘अक्कीज् पाठशाला’ या उपक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे.

विभागातील १७ मेडिकल दुकानांवर कारवाई

$
0
0
मेडिकल दुकानात फार्मासिस्ट नसल्याच्या कारणासह अनेक त्रुटी आढळल्याच्या कारणावरुन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विभागातील १७ मेडिकल दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images