Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कांद्यासाठी मिळाली ४२ डब्यांची मालगाडी

0
0
परप्रांतात कांदा पाठविण्याकरिता रेल्वे प्रशासनाने मनमाडच्या कांदा व्यापा-यांसाठी ४२ डब्यांची रॅक उपलब्ध करुन दिली. या रॅकमधून १६ लाख टन कांदा शुक्रवारी परप्रांतात पाठविण्यात आला आहे.

सिडकोतील तरुणावर चाकूहल्ला

0
0
रस्त्याने पायी जाणा-या सिडको भागातील तरुणावर चाकूहल्ला करण्याची घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीपाठोपाठ सायकलींचीही चोरी

0
0
दोन ते तीन हजार रुपयांसाठी नको ती कटकट म्हणून सायकलचोरी झाल्यानंतर पोलिस स्टेशनकडे पाठ फिरवणा-यांची संख्या कमी नाही. हीच संधी साधत शहरातील सायकलींवर हात साफ करण्याचे काम चोरांकडून होत आहे.

अपघातात लष्करी जवानाचा मृत्यू

0
0
सटाणा शहरापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या सावकी फाटा येथे झालेल्या तिहेरी अपघातात लष्करी जवानाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. चौघा जखमींवर मालेगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ओळखीने तरुणीवर बलात्कार

0
0
एका तरुणीवर तिच्या सोबत काम करणा-या एका तरुणाने वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली​ आहे. याबाबत अंबड पोलिसांनी राजीव गांधी भवन शेजारी राहणा-या संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांचे लक्ष पुन्हा नंबरप्लेटकडे

0
0
वाहनाचे कागदपत्र न पाहता बोगस नंबरप्लेट बनवून देणा-या विक्रेत्यांवर यापुढे गुन्हेगारास मदत केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप दिवाण यांनी दिली.

गणेश रूपांनी भारलेली ३५६० कात्रणे

0
0
एक ध्यास... एक विचार... आणि एका ध्येयाने प्रेरित होत नाशिकच्या माधव देशपांडे या यंग सिनीयरने 'मटा'च्या मखरातील गणेशाची विविध रूपे एकाच छताखाली आणण्याचा मनाशी विचार केला. नुसताच विचार करून ते थांबले नाहीत; तर ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली.

सिंहस्थासाठी सात कोटींचा निधी

0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने सात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

उमेदवारालाच नाही मतपत्रिका

0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मतपत्रिकांचा घोळ सुरूच असून मतदारांबरोबरच उमेदवारांनाही मतपत्रिका मिळाल्या नसल्याची बाब समोर आली आहे. नाशिकमधून उभे असलेले स्वतंत्र उमेदवार सुरेश देवरे यांना अजूनही पत्रिका मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

जेलरोडवर स्नॅचिंग

0
0
दुचाकीवरून जाणा-या तरुणीच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली. ही घटना जेलरोडवरील मुरली पेट्रोलपंपासमोर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

'वसाका'च्या संचालकांचे राजीनामे

0
0
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याकडून (वसाका) आपले थकित देणे मिळावे यासाठी कामगारांनी आपले आंदोलन सुरू केले आहे. सत्ताधारी चेअरमन डॉ. जे. डी. पवार यांच्यासह अन्य १० संचालकांनी आपले राजीनामे साखर आयुक्तांकडे पाठविले.

बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती

0
0
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी १३ फेब्रुवारीला होणा-या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची चर्चा आहे. स्थगितीमुळे चर्चेत असलेली ही निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

बालमहोत्सव झाला, आम्हाला नाही कळला!

0
0
शासनातर्फे होणारा एक बालमहोत्सव शहरापासून दूरवर नेऊन उरकण्यात आला असून त्यात जिल्ह्यातील अनेक बालकांचे प्रचंड हाल झाले. बालमहोत्सवात अनेकांना जेवणाशिवाय तर काहींना अंघोळीशिवाय राहावे लागले, परंतु ही बालके आश्रमांमधील असल्याने याबाबत कुणीही आवाज उठवला नसल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिझास्टर मॅनेजमेंटचे तीन तेरा

0
0
दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा भाविकांसाठी जेवढा श्रध्देचा विषय असतो, तेवढाच तो प्रशासनाच्या दृष्टीने आव्हानात्मक विषय ठरतो. लाखो भाविक एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी येणं सर्वाधिक धोकायदायक बाब असते.

लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

0
0
बागलाण तालुक्यातील तिरमळपाडा येथील विवाहीत तरूणाने लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर सतत तीन वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयित आरोपीविरोधात अभोणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एक पथक बागलाण येथे तपासासाठी पाठवण्यात आले.

गीत रंग

0
0
थंड हवेचं ठिकाण असलेल्या नाशकात कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते. अशाच एका कार्यक्रमाला काही दर्दी रसिकांची हजेरी लाभली. हॉटेल ताजमध्ये झालेला हा कार्यक्रम सकाळपासूनच तसा जोरदार सुरू झाला. शहरातील काही प्रमुख व्यक्तींसह बाहेरील मान्यवरही त्यात सहभागी झाले होते.

नाशिकमधील चेंगराचेंगरी राजकीय नेत्यामुळे

0
0
गत सिंहस्थात झालेली चेंगराचेंगरीची घटना एका राजकीय नेत्याने चांदीचे शिक्के उधळल्याने झाल्याचा धक्कादायक दावा माजी महापौर दशरथ पाटील यांनी 'मटा'शी बोलताना केला. संबंधित नेत्याचे नाव आपण सिंहस्थकाळातच जाहीर करणार आहोत, असेही ते म्हणाले.

उपाययोजनांची 'चेंगराचेंगरी'

0
0
अलाहाबाद कुंभमेळ्यासाठी आलेल्या ३६ भाविकांचा रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. काहीशी अशीच घटना नाशिकमध्ये २००३मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात घडली होती.

आयटी पार्क उभारावा

0
0
महापालिकेच्या भूखंडावर व्यापारी संकुल तसेच भाजीबाजार उभारण्यात येतात. त्याच धर्तीवर उद्योगांसाठी आयटी पार्कची उभारणी केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, उत्पन्नाचे साधन मिळेल तसेच आयटी उद्योगांना जागा मिळून रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, अशी भूमिका नाशिक इंडस्ट्रीज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा)तर्फे महापौर यतीन वाघ यांच्याकडे मांडली आहे.

बिझनेस कंबाइनचा 'ले ऑफ'साठी अर्ज

0
0
काही महिन्यांपासून बंद असलेल्या बिझनेस कंबाइनच्या व्यवस्थापनाने कामगार उपायुक्तांकडे ले ऑफसाठी अर्ज केला आहे. यासंदर्भात कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्याशी चर्चा करून आठवड्याभराच्या आत कामगार उपायुक्त निर्णय घेणार आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images