Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘त्या’ पंखांना मिळणार उडण्याचे बळ

0
0
खडतर परिस्थितीतही यशाचा मार्ग शोधणाऱ्या गुणवंतांच्या पंखांना बळ देण्यासाठी हजारो नाशिककरांनी हात पुढे केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हाकेसरशी या विद्यार्थ्यांसाठी जमा झालेल्या मदतीचा ठेवा त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची वेळ आली आहे.

खतप्रकल्पावरील वजनकाटा बंद

0
0
शहरातील संकलित झालेला कचरा विविध घंटागाड्यांद्वारे खतप्रकल्पावर नेण्यात येतो. त्याठिकाणी घंटागाडीतील कचऱ्याचे वजन करून त्यानुसार संबंधित ठेकेदाराला महापालिका मोठ्या प्रमाणावर पैसे अदा करते.

काश्मिरी युवकांची चौकशीनंतर सुटका

0
0
जिल्हा परिषदेसमोरील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन काश्मिरी युवकांची चौकशीनंतर सुटका करण्यात आली आहे. उल्फत हुसेन नजीर हुसेन व गुलजार हुसेन फैयाज हुसेन गुर्जर अशी त्यांची नावे आहेत.

एडीजीपी पांडे यांचा जामीन फेटाळला

0
0
इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने अतिरीक्त पोलिस महासंचालक पी. पी. पांडे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला. त्यांना अटक करण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

नांदुरनाकामार्गे बसेस वाढवा

0
0
नांदुरनाक्याहून नाशिकरोडकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून नाशिकरोडकडे येणाऱ्या बसेस अपुऱ्या पडत आहेत. नाशिकरोड ते नांदुरनाका या मार्गावर बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

समाजसुधारकांना अभिवादन

0
0
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरा‌त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील शाळा कॉलेजांमध्येही याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पोषण आहाराचा दर्जा सुधारा

0
0
राज्यामध्ये विविध ठिकाणी निकृष्ट पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येत असल्याने नाशिकच्या शाळांमधील पोषण आहाराचा दर्जा सुधारावा अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षामार्फत करण्यात आली आहे.

पावसातून फुफाट्यात

0
0
नाशिक-पुणे रोडवरील रस्ते उखडल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीमुळे या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहने चालवणे मुश्कील झाले असून महापालिकेने तातडीने हे रस्ते दुरूस्त करावेत; त्याआधी मार्गावरील कच ताबडतोब काढून घ्यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

विभागीय, महिला लोकशाही दिन सोमवारी

0
0
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी, (१२ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता विभागीय व महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाचे अर्ज नोंदणी करणे व टोकन देण्याबाबतचे कामकाज सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.

अडीच मह‌िन्यानंतरही विद्यार्थी गणवेशाव‌िनाच

0
0
शाळा सुरू होऊन अडीच मह‌िन्यांचा कालावधी लोटला तरीही जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले नाहीत. स्वातंत्र्यद‌िन आठवडाभरावर येऊन ठेपला असतानाही विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आंदोलनाचा इशारा द‌िला आहे.

अतिशहाणा...

0
0
ओव्हर कॉन्फिडन्समुळे चारचौघात होणारी पंचाईत जिव्हारी लागणारी असते. इंजिनीअरिंग करणाऱ्या एका कॉलेजकुमार नवनव्या कपड्यांची भारी हौस. सध्या शहरातील विविध मॉल, शॉपमध्ये मॉन्सून सेल सुरु आहे.

समस्यांचे आगार

0
0
शहरभरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची कसरत पार करून एकदाचे बसस्थानकावर पोहचणाऱ्या प्रवाशांना तेथेही अस्वच्छतेलाच सामोरे जावे लागत आहे. महामंडळाचे अधिकारी मात्र एकमेकांवर तोंडसुख घेण्यात मस्त असून प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

यंदाही दिग्गज लेखक नाशिककरांच्या भेटीला

0
0
सांस्कृतिकतेला नेहमीच शिरोमाथ्यावर ठेवणाऱ्या नाशिककरांसाठी व्याख्याने म्हणजे मेजवानीच. त्यामुळेच येथे वसंत व्याख्यानमाला यशस्वी झाली व त्याधर्तीवर इतर अनेक उपक्रम सुरू झाले; यशस्वीरित्या चालताहेत.

गोदापार्क गंगापूरपर्यंत

0
0
शहरातील बहुचर्चित गोदापार्क प्रकल्पाचे लवकरच विस्तारीकरण होणार असून सध्या रामवाडी ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंतचा हा गोदापार्क गंगापूर गावापर्यंत वाढविण्यात येणार आहे.

रेल्वे स्टेशनपासून आता प्रीपेड रिक्षा

0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर शहराच्या विविध भागात जाण्यासाठी पर्यटक, भाविक आणि भक्तांची रिक्षा चालकांकडून होणारी लूट थांबण्याची चिन्हे आहेत.

खड्डे बुजवा मात्र नियमाप्रमाणे

0
0
शहरातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सध्या महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम युध्द पातळीवर हाती घेतले आहे. मात्र खड्डे बुजवताना संबंधीत ठेकेदार राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करीत मलिदा लाटत असल्याचा आरोप निर्भय फाउंडेशनने केला आहे.

रेल्वे स्टेशनपासून आता प्रीपेड रिक्षा

0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर शहराच्या विविध भागात जाण्यासाठी पर्यटक, भाविक आणि भक्तांची रिक्षा चालकांकडून होणारी लूट थांबण्याची चिन्हे आहेत.

आता दोनदा

0
0
भर पावसाळ्यात पाणीपुरवठ्यावरून महापालिकेते सुरू झालेले ‘रामायण’ संपण्याची चिन्हे दिसत नाही. पाणीपुरवठा दोन वेळेस सुरू करण्यास ठाम नकार देणाऱ्या महापालिकेने अवघ्या २४ तासात घुमजाव करीत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘कॉर्नस्टार्स’ना घडणार वॉटर किंग्डमची सफर

0
0
पावसाळ्यातला सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे मका अर्थात कॉर्न. कॉर्नच्या हटके रेसिपीजना ‘महाराष्ट्र टाइम्स’ने आपल्या ‘कौन बनेगा कॉर्नस्टार’ या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले होते.

खासगी संस्थांचे उखळ पांढरे

0
0
इन्फर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या योजनेंतर्गत सुमारे दोन हजार ५०० शाळांमध्ये हे काम केले जाणार आहे. या कामासाठी राज्य सरकारला फारतर शंभर ते सव्वाशे कोटी रुपये खर्च आला असता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images