Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वसुंधरा महोत्सव ८ ऑगस्टपासून

$
0
0
पुणे येथील उद्योजक श्रीकांत इंगळहळीकर यांना वसुंधरा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ८ ऑगस्टपासून वसुंधरा महोत्सव कुसुमाग्रज स्मारकामध्ये होत आहे. छायाचित्र प्रदर्शनाने या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

‘परफेक्ट सर्कल’च्या कामगारांची श्रावणातच दिवाळी!

$
0
0
सातपूर येथील ‘परफेक्ट सर्कल इंडिया लिमिटेड’ या कंपनीत कामगारांना सहा हजार रुपयांची घसघशीत वेतनवाढ जाहीर झाली आहे. या वेतनवाढीचा फायदा कंपनीतील २७८ कामगारांना तसेच करार संपल्यानंतर ‌निवृत्त होणाऱ्यांनाही मिळणार आहे. यामुळे कामगारांच्या घरात श्रावणातच दिवाळीचे वातावरण आहे.

किरकोळ वादातून एकाला भोसकले

$
0
0
टॉयलेटची चावी देण्यास टाळाटाळ केल्याचा राग येऊन वॉचमनने चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी सकाळी सार्वजनिक वाचनालयात घडली. जखमी व्यक्तीला राजेबहाद्दूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून वार करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुलांच्या भांडणात आईचा मृत्यू

$
0
0
घरात सुरू असलेल्या बहीण-भावाचा वाद सोडवताना आईचा जिन्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना गंगापूररोडवरील आनंदवली परिसरात सोमवारी रात्री घडली.

छोट्या गावांमध्येही विमा कार्यालय

$
0
0
विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक येण्यापूर्वीच भारतातील विमा कंपन्यांनी लहान गावांकडेही रोख वळविला आहे. त्यामुळेच देशातील अग्रगण्य विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने पश्चिम भारतात २२० तर महाराष्ट्रात शंभर कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कळवण बनले असुविधांचे आगार

$
0
0
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ही बिरुदावली मिरविणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या कळवण आगाराला विविध समस्यांनी ग्रासले असून प्रशासनाचे मात्र त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे.

सरकारी कामात येणार सुसूत्रता!

$
0
0
तालुका प्रशासनात सुसूत्रता यावी म्हणून राज्य सरकारने बीडीओंना (ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर)सहाय्य करण्यासाठी एबीडीओंचे (असिस्टण्ट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर) एक पद निर्माण केले आहे.

पालिका कामगारांचे बेमुदत ‘काम बंद’

$
0
0
दोन महिन्यांचे पगार देण्यात यावे, या मागणीसाठी मनमाड नगरपरिषदेच्या कामगारांनी मंगळवारी धरणे आंदोलन करून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

कुऱ्हाडीचा धाक दाखवून डाळिंबांची चोरी

$
0
0
बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर चोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा डाळिंब उत्पादकाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून डाळिंब चोरून नेल्याची घटना घडली आहे.

७५ जागांसाठी हजारों इच्छुक

$
0
0
जळगाव महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा मंगळवारचा दिवस अखेरचा असल्याने सर्व पक्षांच्या कार्यालयात गर्दी झाली होती. दोन दिवसांत विविध पक्ष कार्यालयात हजारांहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

मीटर टॅक्सीचे दर निश्चित

$
0
0
मुंबई, शिर्डी, पुणे, त्र्यंबकेश्वर यांसह विविध ठिकाणांना सेवा पुरविणाऱ्या मीटर टॅक्सीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दराची निश्चिती केली आहे. हे दरपत्रक लागू झाले असून यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट थांबण्यास मदत होणार आहे.

‘आयसीटी’साठी कोट्यवधींची उधळण

$
0
0
मराठी माध्यामाच्या खासगी अनुदानित शाळांसाठी आयसीटी म्हणजे इन्फ्रॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात झाली आहे. मात्र ही योजना राबवताना राज्य सरकारने खासगी संस्थांना प्राधान्य दिले असून यामुळे १०० कोटींची योजना सुमारे ३५० कोटीपर्यंत पोहचणार आहे.

स्वप्नांना मिळणार आधाराचा हात

$
0
0
प्रवाहाच्या विरोधात पोहत ध्येयवादी स्वप्न जपण्यासाठी धडपडणाऱ्या स्ट्रगलर्सना आज आधाराचा हात मिळणार आहे. प्रत‌िकूल परिस्थितीवर मात करत दहावीत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, यासाठी मदतीचे आवाहन ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हेल्पलाइन उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले होते.

नाशिकची कला कृषी मंत्रालयात

$
0
0
नाशिकचे युवा चित्रकार शिशिर शिंदे यांनी शहराच्या मानात आणखी एक तुरा रोवला आहे. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सभागृहात शिंदे यांनी रेखाटलेल्या महात्मा फुले यांच्या जीवनपट चित्राला स्थान देण्यात आले असून अशी कामगिरी करणारे ते नाशिकमधील एकमेव कलाकार आहेत.

१३ गावांत ७ कोटींचे नुकसान, भरपाईचे काय?

$
0
0
रावेर तालुक्यात हतनूरच्या बॅकवॉटरमुळे 13 गावांमध्ये 6 कोटी 90 लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. आतापर्यंत तालुक्यात तब्बल 28 वेळा ही आपत्ती आली.

नव्या पिढीला संस्कृतीचा विसर

$
0
0
काळाच्या ओघात दाराबाहेर असलेली पादत्राणे घरातील स्वयंपाक घरापर्यंत गेल्याने नव्या पिढीला संस्कृतीचा विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

१३ हजारांचे सागवान जप्त

$
0
0
गस्त घालणा-या वनविभागाच्या पथकाने सागवानाची तस्करी रोखल्याची घटना रविवारी मध्यरात्री मारुळ फाट्याजवळ घडली. कारवाईत पथकाने १३ सायकलींसह ३४ नग सागवानी लाकूड, १० नग सागवानी चौकटी, ४ नग सागवानी दांडे असा एकूण १३ हजार ६६० रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलिस पथक मध्य प्रदेशात तळ ठोकून

$
0
0
डिफेन्स कॉलनीमध्ये घरफोडीसह महिलेवर बलात्कार करणार्‍या आरोपीची लवकरच ओळख परेड होणार आहे.

डीवायएसपी' नी दाखविला इंगा

$
0
0
शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रवाशांना अडथळा निर्माण निर्माण करणा-या अवैध प्रवाशी वाहनधारकांसह दुकानदारांना शिस्त लावण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकरी प्रकाश गायकवाड मंगळवारी दुपारी दोन वाजेपासून स्वत: रस्त्यावर उतरले होते. काहींना नोटिसा देण्यात आल्या.

१९५ फेरफार नोंदी निकाली

$
0
0
कळवण तहसील कार्यालयात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत कळवण पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या महाफेरफार अदालतीत १९५ फेरफार नोंदी निकाली काढण्यात आल्या आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images