Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स‌ीमावर्ती भागात उभारणार शाळा

0
0
राज्यातील सीमावर्ती भागामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची अपुरी संख्या लक्षात घेऊन सरकारमार्फत या भागात नवीन माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

... यापुढे कुणीही एकलव्याचा अंगठा मागणार नाही

0
0
'तुमचं दु:ख केवळ तुमचे नसून ते माझे आहे, सरकारचे आहे आपल्या सगळ्यांचे आहे, ते दु:ख आम्ही दूर करूच पण यापुढे कुणीही एकलव्याचा अंगठा मागणार नाही', अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

९३ वर्षांच्या पेशंटवर यशस्वी अँजिओप्लास्टी

0
0
तीनवेळा हार्ट अॅटॅक येऊन गेलेल्या आणि जेमतेम २० ते २५ टक्के हृदयाचे पम्पिंग सुरू असलेल्या पेशंटवर अँजिओप्लास्टी सर्जरी करून पेशंटला केवळ ७२ तासांत डिस्चार्ज देण्यात आला.

वृध्दांना फसवणारा भामटा मोकाट

0
0
कमी पैशांत सेट टॉप बॉक्स बसवून देत असल्याचे सांगत वृध्दांकडून चेक घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याचे एकएक कारनामे उघडकीस येत आहे.

काँग्रेसजन फिरकलेच नाहीत

0
0
राज्य सरकारचा कार्यक्रम असूनही केवळ राष्ट्रवादीच्याच मंत्री व पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याच्या नाराजीमुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये आयोजित आदिवासी सांस्कृतिक परिषदेवर अघोषित बहिष्कार टाकला.

ब्रिटीशांपासून नद्यांना ग्रहण

0
0
भारतीय संस्कृतीवर आक्रमण करण्याचे एक छुपे षडयंत्र म्हणून ब्रिटीशांनी पवित्र नद्यांना लक्ष केले. १९३२ मध्ये हॉकीन्स नावाच्या ब्रिटीश अधिका-याने गंगेमध्ये नाले मिसळण्याचा घाट कायदेशीर तरतुदीतून पध्दतशीरपणे घातला.

शहरातील एटीएमला अवकळा!

0
0
ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पैसे तत्काळ मिळावेत यासाठी सर्व बँकांनी शहरामध्ये एटीएम सेंटर सुरू केली.

प्रशासन ढिम्म

0
0
विरोध, चर्चा, नियमांत बदल अशी कसरत पार पडल्यानंतर वादग्रस्त आणि पुर्वीच्याच कंत्राटदारांना महापालिकेने घंटागाडीचा ठेका दिला. पुर्वानुभव आ​णि विरोध लक्षात घेता प्रशासनाने ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात येईल अशी भूमिका ठेका देताना घेतली होती.

खटले निकाली मात्र माहितीच नाही

0
0
चार्टशिट दाखल झाल्यानंतर सुरू झालेल्या खटल्याचा यथासांग निकाल लागतो मात्र खटला निकाली निघाल्याची नोंदच वेळेवर पोलिस स्टेशनमध्ये होत नसल्याने शहर पोलिसांच्या पेंडिंग केसेसचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

आघाडीवरून अडले गाडे

0
0
जळगाव महापालिका निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस बाकी असले तरी उमेदवारांची नावे अद्याप राजकीय पक्षांकडून जाहीर न झाल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले नाही.

आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

0
0
देवळा तालुक्यातील चिंचवे लघु पाटबंधारे प्रकल्पाचा मुख्य भरावाचा ढिगारा कोसळून घडलेल्या दुर्घटनेत पाच अधिकाऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेला आरोपी रवींद्र कुमावत (चाळीसगाव) हा अद्यापही फरार आहे.

अखेर उत्तर महाराष्ट्राला लाभले सहसंचालक

0
0
नाशिकच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाला तब्बल दोन वर्षांनी सहसंचालक लाभले आहेत. कल्याण आणि मुंबई येथूनच या पदाचा पदभार सांभाळला जात होता.

रिक्षाचालकांची स्ट्रेस टेस्ट

0
0
शालेय विद्यार्थी वाहतुकीसारखी महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रिक्षाचालकांवर येणारा कामाचा ताण पाहता नाशिक जिल्हा महिला काँग्रेसने अशा रिक्षाचालकांसाठी आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे.

गोदास्वच्छतेसाठी इच्छाशक्तीच महत्त्वाची

0
0
नाशिक शहराच्या पुढील वाटचालीत गोदावरीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन विकास आणि धर्म या दृष्टीने महत्त्व असलेल्या गोदावरी नदी स्वच्छतेसाठी नाशिककरांचीच इच्छाशक्तीच गरजेची असल्याचा सूर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवात आयोजित चर्चासत्रातून व्यक्त झाला.

खुल्या वर्गाला आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे

0
0
‘मराठ्यांसह खुल्या वर्गात मोडणाऱ्या मुस्लिम, ब्राह्मण व अन्य समाजाला आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण द्यावे, अशी आमची इच्छा आहे', असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली.

आदिवासींचा कार्यक्रम हायजॅक

0
0
शुक्रवारी थाटामाटात साजरा झालेला ‘आदिवासी गौरव दिन’ भले सरकार आणि प्रशासनाची छाती फुगवणारा ठरलेला असेल. परंतु हा कार्यक्रमच आदिवासी विकास विभागाने हायजॅक करून आदिवासींवर अन्याय केल्याची बाब पुढे आली आहे.

साप बाळगणारे चौघे जेरबंद

0
0
नागपंचमीच्या पूर्वसंध्येलाच नाशिक वनविभागाने तथाकथित चार सर्पमित्रांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्यांच्याकडील ११ साप आणि दोन मोटारसायकलीही विभागाने हस्तगत केल्या आहेत.

गोदावरीचे ३५० कोटी पाण्यात

0
0
‘गोदावरी स्वच्छतेच्या नावाखाली प्रशासनाने जनतेच्या तोंडचे साडेतीनशे कोटी रुपये पाण्यात घातले आहेत.

कांद्याने गाठला पाच हजारांचा टप्पा

0
0
नाशिक जिल्ह्यातील नामपूर बाजार समितीत शनिवारी कांद्याला तब्बल पाच हजार ४८ रुपये तर अंदरसूल बाजार समितीत प्रती क्विंटल चार हजार ८०० रुपये असा विक्रमी भाव मिळाला.

कुंभमेळ्याचे आयोजन करू नका!

0
0
सरकारने कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीला गटारमुक्त करावे अन्यथा कुंभमेळ्याच्या आयोजनच करू नका, अशा शब्दांत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी सरकारला ठणकावले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images