Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गुरुवारपासून दोनदा पाणी

$
0
0
मागील आठवड्यात पाणीकपातीचा निर्णय मागे घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने गुरुवार, १५ ऑगस्टपासून दोनदा पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

सुरगाण्यातील सुविधांसाठी १४ कोटी मंजूर

$
0
0
कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील सुरगाणा या अतिदुर्गम तालुक्यातील आदिवासी बांधवांची कामे एकाच छताखाली व्हावी याकरिता प्रशासकीय इमारत बांधकाम कामासाठी सरकारने तीन कोटी २६ लाख रुपये मंजूर केले आहेत.

कॉलेजच्या बसला कराडमध्ये अपघात

$
0
0
धुळे शहरातील एसएसव्हीपीएस संस्थेच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला कराडजवळ अपघात झाल्याने ४२ विद्यार्थी जखमी झाले. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.

काँग्रेसचा जाहीरनामा मुख्यमंत्री जाहीर करणार

$
0
0
जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातले असून काँग्रेसचा जाहीरनामा ‘जळगाव व्हिजन’ तेच जळगावला येऊन जाहीर करतील, अशी माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. शरद रणपीसे यांनी सोमवारी सायंकाळी काँग्रेस भवनात पत्रकारांशी बोलताना दिली.

उमेदवारांची यादी आज जाहीर होणार

$
0
0
महापालिका निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी आज, मंगळवारी जाहीर करणार आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

देवळा तालुक्याच्या समावेशाबाबत अनिश्चितताच!

$
0
0
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर बागलाणचे पहिले प्रांताधिकारी ध्वजारोहण करून नवीन प्रांत कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. नगर येथे भूसंपादन अधिकारी असलेले संजय बागडे बागलाणचे पहिले प्रांताधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

नवे प्रांत कार्यालय गुरुवारपासून

$
0
0
येत्या १५ ऑगस्टपासून जिल्ह्यात पाच प्रांत कार्यालये सुरू होणार आहेत. त्यात चांदवड, सटाणा, दिंडोरी, येवला आणि नाशिक यांचा समावेश आहे.

अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार

$
0
0
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर २५ वर्षीय विवाहित व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे येथे घडली.

१५ जुगा-यांना न्यायालयीन कोठडी

$
0
0
इंदिरानगर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुगार अड्ड्यामधून पोलिसांनी अटक केलेल्या ४२ जुगा-यांपैकी १५ जणांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

मीटर बसवले पण, तपासलेच नाहीत

$
0
0
प्रवासी वाहतूक करणा-या ऑटो रिक्षा आणि टॅक्सींना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची सक्ती केल्यानंतर त्याच्या वार्षिक तपासणीचे कंत्राट सातपूरच्या शासकीय आयटीआयला देण्यात आले आहे.

म्हाडाचे मार्केटिंग सीमोल्लंघन!

$
0
0
पारंपरिक पद्धतीने घरांची निर्मिती करून त्याची विक्री करणाऱ्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) मार्केटिंगचे सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंगणवाडी सेविका आक्रमक

$
0
0
महापालिका हद्दीत सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

कांदा ४६२० रुपये!

$
0
0
गेले काही दिवस कांद्याच्या किंमती सतत वाढत असून चाळीस-पन्नास रुपयांची शिडी चढत सोमवारी मुंबई-ठाण्यात कांदा साठ रुपये किलोवर पोहोचला! किरकोळ बाजारात ग्राहकांना तो ६५ रुपये किलोनेच खरेदी करावा लागला.

अखेरच्या दिवशी उमेदवारांची अभुतपूर्व गर्दी

$
0
0
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांचे उमेदवार समर्थकांसह महापालिकेत आल्याने अभुतपूर्व गर्दी झाली होती.

‘खाविआ’ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

$
0
0
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एकच दिवस बाकी असताना सोमवारी रात्री महापालिकेच्या आयुक्तांनी १९९६ ते २००६ दरम्यानच्या काळातील ९९ नगरसेवकांविरोधात घरकुल योजना व मोफत बससेवा प्रकरणी वसुलीच्या नोटिसा बजावल्या.

सटाण्यातील ३२ गावे अद्यापही टंचाईग्रस्त

$
0
0
राज्य सरकारने जिल्ह्यातील टंचाई निवारण कार्यक्रमाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली असली तरी त्याबाबतचे अधिकृत आदेश स्थानिक प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

लाचखोर एसटी लिपिकाला अटक

$
0
0
एसटी महामंडळाच्या जळगाव विभागीय कार्यालयातील वरीष्ठ लिपिक निशिकांत प्रधान यांना मंगळवार दुपारी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

कांद्याचे भाव स्थिर

$
0
0
बागलाण तालुक्यातील सटाणा मार्केट तसेच नामपूर मार्केटमध्ये मंगळवारी कांद्याची दुप्पट आवक झाल्याने कांद्याचे भाव स्थिर झाले. कांद्याला सर्वाधिक ४७०० रुपये तर सरासरी ४००० ते ४२०० रुपये भाव होता.

माजी नगरसेवक तडीपार

$
0
0
दंगा, दरोडा, तसेच दहशत माजवणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या माजी नगरसेवक कमलेश बोडके यास शहर पोलिसांनी मंगळवारी एका वर्षासाठी तडीपार केले.

शिक्षकेतर संघटनेच्या वेबसाइटचे अनावरण

$
0
0
‘सर्वच क्षेत्रामध्ये आज तंत्रज्ञानाचा सर्रास वापर होत असल्याने तंत्रज्ञानामुळेच प्रगती शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकेतर संघटनेने तयार केलेली ही वेबसाइट निश्चितच प्रगती दशर्वित आहे’, असे मत शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहसंचालक राजेंद्रप्रसाद मारवाडी यांनी व्यक्त केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>