Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'क्लस्टर कॉलेज'ने सुधारणार गुणवत्ता

0
0
'पुणे विद्यापीठामार्फत राबविल्या जाणा-या गुणवत्ता सुधार योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने यंदापासून क्लस्टर कॉलेजची संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेमुळे विस्कळीत झालेली ही योजना सुधारण्यास मदत होणार आहे,' असे मत पुणे विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी व्यक्त केले.

'जिल्हा नियोजन'साठी आज मतमोजणी

0
0
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी मतदान सोमवारी शांततेत पार पडले असून मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ३६६पैकी ३५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल घोषित होण्याची अपेक्षा असून या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

समस्यांसाठी शिक्षणमंत्र्यांकडे जाणार

0
0
राज्यभरातील इंग्लिश मिडिअमच्या शाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या समस्या सोडविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेण्याचा निर्णय सोमवारी महाराष्ट्र स्टेट इंग्लिश मीडिअम स्कूल असोसिएशनच्या मेळाव्यामध्ये घेण्यात आला.

अवकाळी पावसासह गारांचा तडाखा

0
0
सोमवारी दुपारच्या सुमारास काळ्या ढगांनी आकाश झाकोळून गेले आणि संध्यकाळी अचानक कोसळलेल्या पावसाने तसेच गारपीटीने शहर परिसराला झोडपून काढले. या पावासामुळे संपूर्ण जिल्ह्याचा नूरच पालटला आहे.

आता मंगळवार 'कोरडा'

0
0
नगरसेवकांच्या आग्रहामुळेच महापौरांनी अखेर पाणीकपातीचा निर्णय घेतला असून १५ फेब्रुवारीपासून १० टक्के पाणीकपात केली जाईल. तसेच, दर मंगळवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहील तर, बुधवारी काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

पाणी कपात गरजेची?

0
0
विरोधकांच्या आग्रही भूमिकेपुढे नमत महापौरांनी पाणी कपातीचा निर्णय घेतला असला तरीही गंगापूर धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे कपातीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भालेरावला तीन दिवसांची कोठडी

0
0
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना पदे रद्द करण्याची बजावलेली नोटीस रद्द करण्यासाठी ११ लाख रुपयांची लाच स्विकारणारे विभागीय सहनिबंधक गौतम भालेराव यांना सोमवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळला.

'महिंद्रा' करतेय 'मारुती'चा अभ्यास!

0
0
हरियाणातील मानेसरच्या प्रकल्पातील कामगारांना मारुती कंपनीने तब्बल ७० टक्के पगारवाढ दिल्याने नाशिकच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनालाही या पगारवाढीचा अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे महिंद्राच्या कामगारांना नक्की किती वेतनवाढ मिळणार याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.

सोसलं तेवढं नेटवर्किंग...

0
0
सार्वजनिक वाचनालयाचा कट्टा म्हणजे ज्ञानाचे भांडारचं. तिथे सांस्कृतिकच नाही; तर सर्व समावेशक ज्ञानही मिळतं. माणूस तिथे ख-या अर्थाने सर्वज्ञ होतो. कुणाला काही जुने संदर्भ हवे असल्यास तिथे हमखास मिळतात, तर नव्या विषयाच्या माहितीचाही खजिनाही सापडतो.

विकास वाटांच्या मार्गावर!

0
0
लक्षणीय वेगाने विस्तारणा-या नाशिकच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांचे जाळे येत्या काही महिन्यात विस्तृत होणार आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर, नाशिक ते सिन्नर आणि सिन्नर ते शिर्डी या तीन रस्त्यांचा त्यात समावेश आहे.

टवाळखोरांकडून PSI ला मारहाण

0
0
मद्य प्राशन करून वाहन चालवणा-या टवाळखोरांना थांबवल्याचा राग येऊन पोलिस उपनिरीक्षकास मारहाण करण्यात आल्याची घटना पाथर्डी गावाजवळील रोडवर घडली. हाणामारी करणा-या दोघांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून त्यांचे दोन साथीदार घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

पिकअपच्या धडकेत एक ठार

0
0
भरधाव जाणा-या पिकअपने​ दुचाकीस दिलेल्या धडकेत भगूर येथील एकाजणाचा मृत्यू झाला. ही घटना नाशिक-पुणे हायवेवरील उपनगर नाका येथे सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास झाली.

पेट्रोलपंपावर लागले हेल्पलाइनचे फलक

0
0
पेट्रोल भरण्यासाठी सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असताना नाशिकचे पेट्रोलपंपचालक मात्र जुन्याच पद्धतीचा अवलंब करीत असल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर शहरातील अनेक पेट्रोलपंप चालकांनी नव्या पद्धतीचा अवलंब सुरू केला असून याबाबत ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

मनमाड बाजार समितीची निवडणूक आजच

0
0
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या १३ फेब्रुवारीला होणा-या निवडणुकीला मुंबई हायकोर्टाने सोमवारी पंधरा दिवसांसाठी स्थगिती दिली होती. मात्र स्थगितीस एक दिवस उलटत नाही तोच कोर्टाने ही स्थगिती उठवल्यामुळे ही निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसारच म्हणजेच १३ फेब्रुवारीला होणार आहे.

दुस-या पत्नीस जाळणा-यास जन्मठेप

0
0
पहिल्या पत्नीस आत्महत्या करण्यास परावृत्त केल्यानंतर दुस-या पत्नीसही जिवंत जाळल्याप्रकरणी देवळा तालुक्यातील एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. देवळा तालुक्यातील वासोळ येथील भगवान दादाजी सूर्यवंशी याने २००२मध्ये पहिल्या पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले होते.

सकाळच्या वेळी चेन स्नॅचिंग

0
0
सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मुलाला शाळेत सोडण्यासाठी पायी जाणा-या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्याने हिसकावल्याची घटना सातपूर भागात सोमवारी घडली.

विभागातील ३५ शाळांवर टांगती तलवार

0
0
राज्य सरकारमार्फत दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेत अनेक शाळांची बनवाबनवी उघड झाल्याने या शाळांवर शिक्षण विभागाच्या कारवाईची टांगती तलवार होती.

नुकसानभरपाईसाठी पिकांचा आढावा

0
0
शहरासह तालुक्यातील बेमोसमी पावसामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारी याबाबत आमदार उमाजी बोरसे यांच्याकडे कैफियत मांडली.

ई-टेंडरिंगने फाडला ठेकेदारांचा 'काळा' बुरखा

0
0
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या वाळूच्या ई टेंडरिंगच्या निर्णयाने ठेकेदारांचा काळा बुरखा दूर केला आहे. या लिलावात सहभागी झाल्यास आपले सगळेच व्यवहार निदर्शनास येतील, या भीतीपोटी ठेकेदारांनी यास प्रतिसाद दिलेला नाही.

डीपीडीसीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

0
0
जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा पटकावल्या असून मंगळवारच्या मतमोजणीत मनसेच्या तीन उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, भाजपने शहरी भागातून एक जागा पटकावली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images