Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दादांकडून कांदा दरवाढीचे समर्थन

0
0
‘कांद्याची दरवाढ होताच सर्वच थरांतून ओरड होते. परंतु, दरांअभावी शेतकरी रस्त्यावर कांदा फेकतात, तेव्हा हा वर्ग कुठे जातो?’, असा खडा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले.

पोलिस चौक्या नव्हे; बुजगावणी

0
0
नाशिकरोडमधील पोलिस चौक्या म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी गत झाली आहे.

‘त्या’ सदस्यांनी फोटोत येऊ नये

0
0
‘जत्रा म्हटले क‌ि हौशे, नवशे आण‌ि गवशे असणारच.’ अशी एक म्हण आहे. त‌िच म्हण जत्रेप्रमाणे संघटनेलाही लागू पडते.

पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला

0
0
अभ्यासक्रमांची व्यापकता वाढवून सकस मनुष्यबळ शोधू पाहणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यंदा ‘सहायक’ पदाच्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत.

‘त्या’ विद्यार्थ्यांना शाळेत घ्या

0
0
पालकांच्या गैरवर्तनाचे व फी न भरल्याचे कारण देत दाखले दिलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत परत घेण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने अशोका इंटरनॅशनल स्कूलला शुक्रवारी सुनावणीदरम्यान दिली.

चिकचिक वाढली रस्त्यात!

0
0
गंगापूर रस्त्यानं ये-जा करताना तिच ती समस्या जर गेल्या तीन महिन्यांपासून नाशिककरांना हैराण करत असेल आणि याकडे महापालिका आणि ‘मान्यवर’ लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत असतील तर गप्प बसून किती हे सहन करायचं, असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे.

बळी मंदिर सप्ताहाला यंदा फाटा

0
0
मुंबई-आग्रा हायवेच्या रुंदीकरणांतर्गत मध्यभागी येत असलेल्या बळी मंदिराचे स्थलांतर अद्याप झाले नसल्याने दरवर्षी साजरा करण्यात येणारा सप्ताह यंदा अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.

बहिष्काराला संमिश्र प्रतिसाद

0
0
शालेय पोषण आहारावर माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी टाकलेल्या बहिष्काराला शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोषण आहाराच्या मुद्द्यावरुन मुख्याध्यापकांवर सातत्याने आरोप केले जात असल्याने राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या सूचनेनुसार जिल्हा मुख्याध्यापक संघटनेने हा बहिष्कार टाकला आहे.

नावात काय आहे हो...!

0
0
शेक्सपिअर नावाचा एक महान लेखक कधीकाळी लिहून गेलाय की ‘नावात काय आहे’ त्यानंतर या वाक्यावर न जाणे किती व्याख्याने झाली, कुणी म्हणाले की त्याखाली आपले नाव टाकायला बरे विसरला नाही वगैरे परंतु खरे सांगायचे तर नावातच सारे काही आहे हे ही तितकेच खरे.

चित्रकारांचे आजपासून मुंबईत रंग!

0
0
शहरातील प्रथितयश चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी चितारलेल्या ‘ड्रिम्स ऑफ होरॉयझन’ या मालिकेचे चित्रप्रदर्शन मुंबई येथील जहॉंगिर आर्ट गॅलरीत २० ऑगस्टपासून हे प्रदर्शन भरणार आहे. विशेष म्हणजे कलातपस्वी शिवाजी तुपे यांना श्रध्दांजली म्हणून ही चित्रांजली समर्पित करण्यात येणार आहे.

‘एलआयसी’च्या बंद पॉलिसी सुरु होणार

0
0
हप्ता वेळेवर न भरल्याने किंवा विविध कारणांमुळे बंद पडलेल्या विमा पॉलिसी सुरु करण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाने पाच ऑगस्टपासून विशेष मोहिम सुरु केली आहे.

‘एमपीएससी’चा पुन्हा घोळ

0
0
सर्व्हर क्रॅश झाल्याच्या घातक अनुभवातूनही धडा न घेतलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गोंधळाची परंपरा कायम असून अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या पीएसआय पदासाठीच्या परीक्षेचे हॉल‌‌तिकीट नाशिकच्या सुमारे चारशे विद्यार्थ्यांना अद्यापही मिळालेले नाही.

तपोवनात नाही ‘राम’

0
0
गोदावरी आणि कपिला नदीच्या संगमाचा उंचसखल भाग असलेल्या तपोवन परिसरात रामायणातील महत्त्वाच्या घटना घडल्याचा दाखला पुरातन ग्रंथांतून आढळतो. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक याच परिसरात कापले, अशी आख्यायिका असल्याने रामकुंडापाठोपाठ तपोवनाला अधिक महत्त्व आहे.

तर उजळणार तपोवन भूमी

0
0
केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून तपोवन अंधारात गुडूप असून बटण दाबण्याचा अवकाश की तपोवन उजळणार आहे. परंतु तितकीही तसदी प्रशासन घेत नसल्याने पर्यटक व भाविक एका मोठ्या धार्मिक स्थळापासून वंचित रहात आहे.

भाववाढ होऊनही सोन्याच्या मागणीत वाढच

0
0
बाजारात गेल्या काही दिवसांत सातत्याने होणा-या सोन्याच्या भाववाढीने मागणी कमी झाली नसून विक्रीत वाढच होत असल्याचे सराफांचे म्हणणे आहे.

प्रशासनाची अधीक्षकांना क्लीन चीट

0
0
महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. पाटील यांच्यावरील सर्व आरोप महापालिका प्रशासनाने रविवारी संध्याकाळी फेटाळून लावले.

‘त्या’ विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ कायम

0
0
सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथील कस्तुरबा छायाछत्र आश्रमशाळेतील १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. रविवारी पहाटे संशयास्पद पद्धतीने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.

टॅक्सी संघटनेचा उपोषणाचा इशारा

0
0
कसा-याहून विविध ठिकाणी देण्यात येणारी टॅक्सी सेवा गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने नाशिक-कसारा टॅक्सी संघटनेने बुधवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंदोलनांनी गजबजली महापालिका

0
0
अंगणवाडी सेविका आणि कंत्राटी कामगारांनी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या आठव्या दिवशीदेखील कोणताच तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

महसुली कामकाज खोळंबले

0
0
महसूल विभागातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचा-यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून संप पुकारल्याने या कार्यालयातील कामकाज खोळंबले. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वरिष्ठ अधिका-यांनाच विविध कामे करावी लागत आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images