Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बंद वीज संचाचा परिणाम नाही

$
0
0
परळी येथील वीज संच पाण्याआभावी व रत्नागिरी येथील संच गॅसअभावी बंद झाले आहे. या संचामधून वीज उत्पादन होत नसल्याने त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रावर पडणार नसल्याचे महावितरणने कळविले आहे.

पावणेनऊ कोटींचे नुकसान

$
0
0
सोमवारच्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने जिल्ह्यातील पिकांना तसेच फळबागांना मोठा फटका बसला. जिल्ह्यात एकूण पावणेनऊ कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक पावसाची नोंद देवळा तालुक्यात झाली असून सर्वाधिक हानीही देवळ्यातच झाली आहे.

सुंदोपसुंदीने ढवळली जिल्हा नियोजन समिती

$
0
0
महापालिकेच्या निवडणुकीतील राग-लोभ, विधानसभा तसेच लोकसभेची आगामी निवडणूक समोर ठेऊन करण्यात आलेली मोर्चेबांधणी, मनसे आणि भाजपची अखेरपर्यंत चाललेली तगमग, शिवसेना, रिपाइं, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेली गट्टी अशा राजकीय सुंदोपसुंदीत जिल्हा नियोजन समितीची निवडणूक गाजली.

बेमोसमी पावसाने शेतकरी हवालदिल

$
0
0
सोमवारी कळवणसह ग्रामीण भागाला तुफानी बेमोसमी पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा, कडाडणा-या विजा बरोबर टपो-या गारांसह झालेल्या पावसाने कळवण शहरासह तालुक्यातील पाळे, हिंगळवाडी, आसोली, हिंगवे, एकलहरे, गोपाळखडी, बार्डे, साकोरे, सावकी, आठंबे, दह्याने, कलमथे परिसरात शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.

महापालिका कर्मचा-यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

$
0
0
महाराष्ट्र नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटना व नाशिक जिल्हा ग्रामपंचायत ग्रामपालिका कामगार-कर्मचारी संघटनेतर्फे नगरपालिका व ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून विभागीय उपायुक्त सतीष देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

एक्साइज छाप्यात अवैध मद्यसाठा जप्त

$
0
0
दमण तसेच गोवा राज्यांतून विक्रीसाठी आणलेला सुमारे ६७ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साइज) छापा मारून जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ करण्यात आली.

प्राचार्य परिषद रद्द करा

$
0
0
अख्खा महाराष्ट्र दुष्काळी परिस्थितीमुळे होरपळून निघत असताना पुणे विद्यापीठाने मात्र महाबळेश्वरला प्राचार्य परिषद आयोजित केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) नाराजी व्यक्त केली आहे.

MSCIT तून सुट मिळवा

$
0
0
राज्य सरकारने आपल्या सेवेत असलेल्या कर्मचा-यांना कॉम्प्युटरचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे; परंतु माहिती 'तंत्रज्ञान' सारखे विषय घेऊन शालांत परीक्षा उत्तीर्ण असणा-या विद्यार्थ्यांना या अटीची शिथिलता मिळणार आहे.

मानमाडकरांची वणवण सुरू

$
0
0
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणा‍-या वागदर्डी धरणातील पाण्याने शनिवारी तळ गाठला. त्यामुळे पुढील रोटेशन पालखेड डाव्या कालव्यातून मिळेपर्यंत एक लाख लोकवस्तीच्या शहराला टँकर व ट्रॅक्टरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन नगर पालिका प्रशासनाने केले आहे.

मर्यादा पाळा नाही तर...

$
0
0
'व्हॅलेन्टाइन डे' साजरा करताना संस्कृती व मानमर्यादा राखली गेली पाहिजे. मात्र, ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर मग काय करायचं ते आम्ही बघू, असा सूचक इशारा देत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी यंदाच्या 'व्हॅलेन्टाइन डे'वर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

व्हॅलेन्टाइनला प्रदर्शित होणार 'जय महाराष्ट्र...'

$
0
0
अवधूत गुप्तेचा 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' हा चित्रपट आज व्हॅलेन्टाइनला (१४ फेब्रुवारी) रिलीज होत आहे. नाशिकचा कलाकार अभिजित खांडकेकर या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत असल्याने चित्रपटाबाबत नाशिककरांना उत्सुकता आहे.

भाऊंना बर्थडेचं असही गिफ्ट

$
0
0
राजकारणात आज एका पक्षात तर उद्या दुस-या पक्षात अशा उड्या सतत चालू असतात. त्यामुळे पक्षबदली काही नवीन नाही. एखाद्या राजकीय व्यक्तीने पक्ष बदलला तरी त्याने ज्या पक्षामध्ये वर्षानुवर्षे राजकारण केलं त्यांच्याशी त्याचं नाव अनेकदा जोडलं जातं.

मान्यतेविनाच शाळांच्या फीमध्ये वाढ

$
0
0
भरमाठ फी उकळणा-या शाळा हा शिरस्ता नाशिककरांना काही नवीन नाही. पालकांच्या खिशाला कात्री लावणा-या या फी वाढीला मान्यता घेणे तर दूरच; परंतु संबंधित शाळांनी गेल्या तीन वर्षात शिक्षण विभागाकडे फी वाढीसाठी फक्त तीन प्रस्तावच दाखल झालेआहेत.

रामाच्या नाशिकचा लखन ब्रँड!

$
0
0
प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यानं जगभरात ख्यात असलेल्या नाशिक नगरीचे ब्रँडिंग राम-लखन चित्रपटातील लखनची भूमिका करणारा फिल्मस्टार अनिल कपूरने करावे, असे साकडे त्यांना घालण्यात आले आहे.

'आमचे शिक्षक आम्हाला द्या'

$
0
0
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नाशिकरोड येथे बुधवारी विभागीय महसुल आयुक्तालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी आमचे शिक्षक आम्हाला द्या' अशा घोषणा दिल्या.

औद्योगिक प्रदर्शनासाठी जागा देणार

$
0
0
नाशिकमध्ये उद्योगांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. त्यामुळे औद्योगिक प्रदर्शनांचे वेळोवेळी आयोजन केले जाते. पण हक्काची जागा नसल्याने प्रदर्शन आयोजनात अडचणी येतात. त्यामुळे औद्योगिक प्रदर्शनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून उद्योजकांची समस्या सोडविली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली.

बांधकाम मजूर ठार

$
0
0
त्र्यंबकरोडवरील फ्रावशी अकॅडमीशेजारी सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी उंचावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. मारेचा अनुचितानंद आहुदवार (१९) असे या मजुराचे नाव आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी

$
0
0
मुंबई हायकोर्टाने मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा स्थगिती आदेश उठवल्याने ठरलेल्याप्रमाणे निवडणूक झाली. याचा अधिकृत निकाल शुक्रवार, १५ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

वाहनचोरीचे सत्र सुरूच

$
0
0
शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून मंगळवारी दिवसभरात शहराच्या विविध भागांतून चार वाहने चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

'व्हीआयपी'साठी उद्या मतदान

$
0
0
सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनी एम्प्लॉइज युनियनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी मतदान होणार आहे. ४९0 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून शुक्रवारी सायंकाळीच मतमोजणी होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images