Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संशोधनाबाबत जागरुकता वाढवा

$
0
0
‘उच्च दर्जा आणि सखोल ज्ञान असेल तरच विद्यार्थी जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. हे ज्ञान केवळ सखोल अभ्यासातूनच विद्यार्थ्यांना मिळेल. म्हणूनच संशोधनावर भर देणे आवश्यक आहे’, असे मत पुणे विद्यापठाच्या मानस, निती व सामाजिक शास्त्र विभागाचे डीन डॉ. गौतम भोंगे यांनी व्यक्त केले.

मनसेचे मिशन इलेक्शन

$
0
0
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यात मनसेही मागे नसून आमदार वसंत गिते यांनी गंगापूर रोड परिसरात सुरु केलेले संपर्क कार्यालय त्याचाच भाग असल्याची चर्चा आहे. सोमवारी या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

जनुकीय आजारांसाठी योग्य निदान गरजेचे

$
0
0
‘जनुकीय आजारांबाबत अनेक गैरसमज आहेत. या आजारांचे वेळीच योग्य निदान झाले तर संबंधित व्यक्तिच्या आयुष्यावरील दुष्परिणाम टाळता येऊ शकतात’, असे मत जनुकीय तज्ज्ञ व अनुवंशिक सल्लागार डॉ. ज्ञानदेव चोपडे यांनी व्यक्त केले. जेनेटीक हेल्थ अँड ‌रिसर्च सेंटरमार्फत आयोजित दोन दिवसीय सुजनन परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

विभागीय लोकशाही दिन १० सप्टेंबरला

$
0
0
महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते परंतू या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी (९ सप्टेंबर) गणेश चतुर्थीमुळे सुटी असल्याने मंगळवारी (१० सप्टेंबर) लोकशाही ‌दिन नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे.

महावितरणचा अजब झटका !

$
0
0
नाशिक परिमंडळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ड्युटीवर काम करीत असताना मारहाण झाल्याचे प्रकार वाढले होते. हे प्रकार घडू नये आणि कर्मचाऱ्यांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी ज्या गावात मारहाण होईल त्याठिकाणचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय महावितरणच्या नाशिक परिमंडळाने घेतला आहे.

लांडगा आला रे !

$
0
0
रस्त्याच्या कडेला गाडी लावून मित्रांसमवेत गप्पा मारत असताना 'नो पार्किंग'मध्ये लावलेली वाहने उचलणारी गाडी (टोईंग व्हॅन) आली की आपली गाडी उचलण्याची भीतीने बहुतेकांची भंबेरी उडते.

अमुल्य ठेव्यांची वाताहत

$
0
0
शहराचा सर्वांगिण विकास करण्याची अंतिम जबाबदारी महापालिकेची असते. त्यात पायाभूत सुविधांबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेने साहित्य तसेच संस्कृतीला प्राधन्य द्यावे अशी सर्वसामान्य नागरिकांची रास्त अपेक्षा असते. त्यास नाशिक महापालिकासुध्दा अपवाद नाही.

तीन लाखांचा गुटखा जप्त

$
0
0
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी दिवसभरात दोन ठिकाणी छापे टाकून तीन लाख सात हजार रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधीत सुपारी व तंबाख जप्त केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संप केला वेतनही घेतले

$
0
0
विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपात सहभागी झालेल्या नाशिक जिल्ह्यातील तब्बल १९ हजार कर्मचाऱ्यांनी सरकारी आदेशालाच हरताळ फासल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होतानाच दोन दिवसाचे वेतनही घेतल्याचेही स्पष्ट होत आहे.

६५ वृक्षांचे पालकत्व

$
0
0
नाशिक-त्र्यंबकेश्वर या रस्त्याच्या चौपदरीकरणाअंतर्गत पुनर्रोपित होणाऱ्या वृक्षांची जबाबदारी घेण्यास बांधकाम व्यावसायिकांनी मान्यता दिली आहे. एकूण ६५ वृक्षांचे पालकत्व बांधकाम व्यावसायिक घेणार आहेत. त्यामुळे वृक्ष पुनर्रोपणाच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.

एस्कॉर्टमध्ये होतोय महाघपला

$
0
0
एस्कॉर्टद्वारे मालेगाव महापालिकेला मिळणारे उत्पन्न नाशिकपेक्षा अनेकपटीने अधिक असल्याचे समोर आल्याने नाशिक महापालिकेच्या एस्कॉर्ट उत्पन्नांत मोठ्या प्रमाणावर घपला होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

अखेर मुहूर्त सापडला!

$
0
0
महापालिकेची सत्ता मिळून दीड वर्ष झाली तरी विकासकामांना प्रारंभ न झालेल्या मनसेला अखेर मुहूर्त सापडला आहे.

सिन्नरमधील अतिक्रमणांना रोखण्याची मागणी

$
0
0
सिन्नर शहरात दिवसेदिवस अतिक्रमणे वाढत असून, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

मांजरपाड्याचा दुसरा टप्पाही मार्गी लागणार

$
0
0
बहुचर्चित मांजरपाडा वळण योजनेचा दुसरा टप्पा लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

बाप्पा मढणार दागिन्यांनी!

$
0
0
गणेशाचा उत्सव म्हणजे सजावटीचा उत्साह. पारंपरिक ते ट्रेण्डी सजावट करण्यासाठी हाच कालावधी असल्याने बच्चेकंपनी ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण बाप्पाच्या दिमतीला हजर राहतात.

कृषी पंपाचे बिल भरणे आवश्यक

$
0
0
कृषी पंपधारकांनी पाच त्रैमासिक बिलांपैकी दोन त्रैमासिक बिलांची रक्कम तातडीने भरावी. उर्वरित तीन त्रैमासिक बिलांची रक्कम ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात तीन समान हफ्त्यांत भरावी असा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रीय जलपरिषदेत गोदावरी बचावाचा ठराव

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारण्याचा ठराव करण्यात आला आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाचव्या राष्ट्रीय जलसंमेलनात गोदावरी बचावाचा निर्धार करण्यात आला.

सर्वशिक्षा अभियानामार्फत विद्यार्थ्यांना गणवेश

$
0
0
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या जबाबदारीचा काही भाग सर्व शिक्षा अभियानामार्फत उचलण्यात आला आहे.

समाज कल्याणच्या १४ व १५ ला परीक्षा

$
0
0
समाज कल्याण आयुक्तालय, पुणे आणि त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांतर्गत शिक्षण विभागातील पदांसाठी १४ व १५ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये विभागस्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

जादुटोणाविरोधी कायद्यावर रविवारी व्याख्यान

$
0
0
अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीमार्फत प्रा. शाम मानव यांच्या ‘जादुटोणा विरोधी कायदा : समज-गैरसमज’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ सप्टेंबरला (रविवार) दुपारी साडेबारा वाजता महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये हे व्याख्यान होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images