Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'व्हॅलेण्टाईन डे'साठी यंगस्टर सज्ज

$
0
0
'प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं', असे जरी म्हटले जात असले तरी प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मात्र वेगळी असते. म्हणूनच व्हॅलेण्टाइन डे निमित्त आपल्या प्रिय व्यक्तीला खूष करण्यासाठी काही हटके करण्याची तयारी शहरामध्ये बुधवारी सुरू होती.

नाशिककरांना २८ चित्रपटांची मेजवानी

$
0
0
भारतीय चित्रपट निर्मितीचे शताब्दी वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने नाशिककरांना उद्यापासून तब्बल २८ चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. राज्य सांस्कृतिक विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी, जिल्हा प्रशासन व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी व हिंदी चित्रपट महोत्सव होत असून १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान रोज चार असे २८ हिंदी व मराठी चित्रपट नाशिककरांना दाखविण्यात येणार आहेत.

कॅम्प ते शालीमार महिला बस हवी

$
0
0
देवळाली कॅम्पहून नाशिकमध्ये शालिमार परिसरात येणा-या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या महिलांसाठी कॅम्प ते शालीमार स्व‌तंत्र बस सेवा सुरू करण्याची मागणी बहुजन स्वराज्य महासंघामार्फत करण्यात आली. याबाबत परिवहन अधिका-यांना निवेदनही देण्यात आले आहे.

'त्या' प्राध्यांपकांवर कारवाईची मागणी

$
0
0
विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला विद्यार्थ्यांचाही पाठींबा दाखविण्याचा प्रयत्न प्राध्यापकांच्या एका संघटनेने बुधवारी केला.

गाडीची काच फोडून २ लाख लंपास

$
0
0
उपनगर येथील रहिवासी निलेश रमेश पंचभाई (वय ३९) रा. कृपासागर सोसायटी, संकलेचा ले आऊट. यांनी बुधवारी दुपारी बॅक ऑफ बडोदातून दोन लाख रुपये काढले आणि आपल्या स्विफ्ट ठेवले.

वाहनांचे धडक सत्र सुरूच

$
0
0
वाहनांची धडक लागून जखमी होण्याचे प्रकार वाढत आहेत. मंगळवारी दिवसभरात शहरातील विविध ठिकाणी वाहनांची धडक लागून चार जण जखमी झाल्याचे तसेच वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

बागुल यांना राष्ट्रवादीतर्फे बर्थडे गिफ्ट ?

$
0
0
शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या सुनील बागुल व अर्जुन टिळे यांनी आज (१४ फेब्रुवारी) नाशिकमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

उद्योग भवनाची 'फायर एनओसी'च नाही

$
0
0
एमआयडीसीत नव्याने येणा-या किंवा विस्तारीकरण करणा-या कंपन्यांकडून फायर प्रोटेक्शन फंड आणि फायर सेसच्या रूपाने बख्खळ कमाई करणा-या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडेच (एमआयडीसी) उद्योग भवनाची फायर एनओसी नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

आ जैन यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

$
0
0
जळगाव घरकुल प्रकरणातील संशयित आरोपी आ. सुरेश जैन यांचा दुसरा जामीन अर्जही बुधवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. आ. जैन यांनी, कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल करताना पोलिस दोषारोपपत्रासोबत केस चालवण्याबाबत सरकारकडून परवानगी घेतलेली नाही.

ही आशिया खंडालाच धोबीपछाड

$
0
0
ऑलिम्पिक स्पर्धेतून सर्वात जुना खेळ असलेल्या कुस्तीलाच धोबीपछाड मिळाल्याच्या वृत्ताने स्थानिक कुस्तीप्रेमींनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा निर्णय असला तरीही त्याचा परिणाम थेट देशी खेळांवर होणार असून ऑलिम्पिकमधून आशिया खंडाला धोबीपछाड देण्याचे पाश्चिमात्य राष्ट्रांचे हे राजकारण असल्याची संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्याच्या कुस्ती वर्तुळात उमटत आहेत.

तिघे गिरणा धरणात बुडाले

$
0
0
कॅम्प परिसरातील एकाच घरातील तिघांचा गिरणा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये फारूक निसार पटेल (३0), हीना फारूक पटेल (२0), रोहिन गणी तांबोळी (३0) यांचा समावेश आहे.

मुलगी झाल्यास प्रसूती मोफत

$
0
0
मुलींचा घटता जन्मदर आणि स्त्रीभ्रूण हत्येची समस्या यावर उपाय शोधण्यासाठी केवळ चर्चा करून उपयोग नाही तर काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन खुटवडनगरमधील सिद्धिविनायक सामाजिक व शैक्षणिक संस्था आणि सुखकर्ता हॉस्पिटल यांच्यामार्फत 'मुलगी झाल्यास प्रसूती मोफत' हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

आ. छाजेडांनी केले पक्षविरोधी काम

$
0
0
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत आ. जयप्रकाश छाजेड यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ‌काँग्रेसचेच विजयी उमेदवार दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

'व्हॅलेन्टाइन डे'वर राजकीय सावट?

$
0
0
एरव्ही 'व्हॅलेन्टाइन डे'च्या गुलाबी वातावरणात विरोधाचा भगवा रंग मिसळण्यात अग्रेसर राहणारी मंडळी राष्ट्रवादीशी प्रणयाराधनात गुंग झालेली असली तरी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी 'काहीही खपवून घेणार नाही' असे म्हणत प्रेमवीरांना इशारा दिला आहे.

मुलींनो स्कार्फ वापरू नका

$
0
0
निवांतस्थळी बसल्यावर, बाइकवर मागे बसल्यास कृपया मुलींनी स्कार्प बांधू नये, हे अजब आवाहन केले आहे जळगाव पोलिसांनी. शहरातील छेडछाडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन केल्याचे पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी सांगितले.

सुरेश जैन यांना SCचा हादरा

$
0
0
बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी आमदार सुरेश जैन यांना सुप्रीम कोर्टाने हादरा दिला. सुप्रीम कोर्टाने जैन यांचा जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावला.

ट्रक-रिक्षाची धडक, एक विद्यार्थी ठार

$
0
0
नाशिक येथील नवीन ‘होरायझन स्कूल’कडून शांतीनिकेतन कॉलनीकडे जाणा-या रस्त्यावर एका शाळेच्या रिक्षाला ट्रकने धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर रिक्षाचालक आणि अन्य चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्रिफुली ठरतेय धोकादायक

$
0
0
त्र्यंबकरोडवरील समृद्धनगरची त्रिफुली अत्यंत धोकादायक बनली आहे. या त्रिफुलीच्या ठिकाणी कुठलेही मार्गदर्शक फलक नाही. त्र्यंबकरोडला लागून नासर्डी नदी असतानाही संरक्षक कठडे उभारले नसल्याने वाहने थेट नदीत कोसळण्याची भीती आहे. मात्र, याकडे महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागानेही दुर्लक्ष केले आहे.

वसतीगृहांची फरफट थांबणार कधी?

$
0
0
विद्यार्थ्यांच्या असंतोषामुळे समाज कल्याणच्या वसतीगृहाची दैना नुकतीच संतप्त विद्यार्थ्यांनी चव्हाट्यावर आणली. मात्र, शहरातील आदिवासी विकास भवन आणि समाजकल्याणच्या सर्वच वसतीगृहातील सुविधांच्या बाबतीत 'तोंड दाबून बुक्कयांचा मार' अशी अवस्था झाली आहे. यामुळे वसतीगृहांच्या डागडुजीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला आहे.

राज लहान भावासारखे वागले नाहीत!

$
0
0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक हात पुढे करून मनाचं औदार्य दाखवलं होतं, पण राज ठाकरे यांनी त्यांच्या आवाहनाची खिल्ली उडवली, ते लहान भावासारखे वागले नाहीत, अशी टिप्पणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केली आहे. मराठी माणूस एकत्र येत नाही, हे राज्याचं दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images