Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

देशात हवा एकच शिक्षण बोर्ड

$
0
0
‘देशाचे श‌िक्षण राज्यांच्या विविधांगी धोरणांननुसार ‌वेगळ्या बोर्डमध्ये विभागले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या स्पर्धेवर याचा घातक परिणाम होताना दिसतो. यामुळे देशाच्या श‌िक्षणपध्दतीत एकच बोर्ड हवा.’

‘एफडीए’चा मंडळांना निर्देशांचा ‘प्रसाद’!

$
0
0
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात विषबाधेसारखे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सार्वजनिक मंडळांना कडक निर्देशांचा प्रसाद दिला आहे. महाप्रसाद किंवा भंडारा बनविणाऱ्यांचा संपर्क क्रमांकासह अन्न पदार्थांचा तपशील जवळ बाळगण्यासह प्रसादासाठी खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत.

५० निर्माल्य कलश, महापालिकेचा पुढाकार

$
0
0
अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेला गणेशोत्सव पर्यावरण पूरक करण्यासाठी महापालिकेने यंदा पुढाकार घेतला असून शहराच्या विविध भागात ५० ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत.

बेहाल सिग्नल असून अडचण नसून खोळंबा

$
0
0
बेभरवशाची वाहतूक यंत्रणा, बिघाड झालेली सिग्नलव्यवस्था, गरज असूनही अद्यापही सिग्नल न बसवलेले चौक अन् चौकातील वाहतूकीचा अंदाज न घेता ठरविलेले सिग्नलचे ड्युरेशन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याऐवजी कोंडीच अधिक ठरत आहेत.

बगडू गावातील २८५ एकर जमीन केली हडप

$
0
0
तालुक्यातील बगडू गावातील गायरान शिवारातील तब्बल २८५ एकर जमीन गावाचे उपसरपंच रमण अहेर यांच्यासह ग्रामस्थांनी करून हडप केल्याचे उघड झाले आहे.

आजोबा व नातीचा विहिरीत बुडून मृत्यू

$
0
0
देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे विहिरीत पडलेल्या नातीला वाचविण्यासाठी उडी मारणाऱ्या आजोबांसह दुसऱ्या नातीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत सर्वात प्रथम विहिरीत पडलेली नात मात्र बचावली.

सर्वशिक्षा अभियानामार्फत विद्यार्थ्यांना गणवेश

$
0
0
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या जबाबदारीचा काही भाग सर्व शिक्षा अभियानामार्फत उचलण्यात आला आहे. यंदा शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ‘सर्व शिक्षा’मार्फत १ कोटी २३ लाखांचा निधी वितरित करण्यात आला असल्याने किमान यावेळी विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही.

नाशिकच्या रेल्वेसमस्यांचे रेल्वेमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

$
0
0
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर करायच्या विविध सुविधांबाबत नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांनी रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

काळाराम मंदिराच्या विश्वस्तला अटक

$
0
0
काळाराम मंदिर ट्रस्टची कोणतीही परवनागी न घेता बनावट पावती पुस्तकाद्वारे भाविकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मंदिराच्या विश्वस्तासह संस्थानचे व्यवस्थापक आणि आणखी एकास अटक केली आहे. संशयितांना गुरुवारी कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

राज यांचा उद्घाटनांचा धडाका

$
0
0
महापालिका कारभाराचा आढावा व विविध कार्यक्रमांसाठी दोन दिवसाच्या शहर दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दुसरा दिवस विकासकामांच्या भूमिपूजनांचा ठरला.

अघोरी कृत्याच्या संशयावरून गुन्हा दाखल

$
0
0
वडिलांचा आजार बरा करण्यासाठी घरात खड्डा करून अघोरी कृत्य करीत असल्याच्या संशयावरून नाशिकरोड पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

‘ई-लोकशाही’ला प्रतिक्षा तक्रारीची

$
0
0
जिल्हा तसेच तहसिल प्रशासनाशी संबंधित कुठल्याही प्रकारची तक्रार ई - लोकशाहीच्या माध्यमातून करण्याची सुविधा उपलब्ध झाली असली, तरी त्याला अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.

‘बूंद से गई, वो हौद से नही आती’

$
0
0
आश्रमशाळांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सुमारे आठशे विद्यार्थ्यांचे मृत्यू ओढवल्याची धक्कादायक बाब राज्य सरकारने हायकोर्टापुढे मांडली. सरकारच्या या द‌िव्य कारभारावर हायकोर्टाने ताशेरेही ओढले.

सिडकोत २ महिलांवर जीवघेणा हल्ला

$
0
0
आर्थिक व्यवहारातून झालेल्या भांडणात चुलत भावाने बहिणीसह तिच्या जावेवर चाकूहल्ला करून गंभीर जखमी करण्याची घटना शुक्रवारी घडली.

मोबाइल लंपास, वोक्हार्टचे कानावर हात

$
0
0
सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये डायलेसिससाठी दाखल झालेल्या पेशंटचा मोबाइल लंपास झाल्याची घटना घडली आहे.

न्यायासाठी माध्यमिक शिक्षकांचे धरणे

$
0
0
राज्य सरकारने शिक्षकविरोधी धोरणे सोडून शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष पुरवावे, यासाठी नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

त्या संशयितांना ५ दिवसांची कोठडी

$
0
0
वडिलांच्या दुर्धर आजारपणावर उपचार करण्यासाठी अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या चौघा भावंडांना कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

भोजापूरच्या पाण्यासाठी रास्ता रोको

$
0
0
भोजापूर धरणातून कालव्यांना पाणी सोडावे, या मागणीसाठी सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक-पुणे हायवेवर नांदूर शिंगोटे येथे रास्ता रोको करण्यात आला.

आठ महिन्यांत ११ कैद्यांचा मृत्यू

$
0
0
नाशिकरोड येथील केंद्रीय कारागृहात गेल्या आठ महिन्यांत तब्बल ११ महिन्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. याप्रकरणी प्रांताधिकारी चौकशी करणार आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोलिसांत धाव

$
0
0
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्यासह शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पाठक यांच्याविषयी फेसबुकवर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी पाठक यांनी भद्रकाली पोलिसात तक्रार दिली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images