Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

म्हाडाने कामगारांसाठी घरे द्यावीत

$
0
0
कामगारांना परवडणारी घरे उपलब्ध होत नाहीत, तसेच म्हाडाची नवी योजनाही गेल्या काही वर्षात आलेली नाही.

बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून लूट

$
0
0
तपोवन येथे फोटोग्राफीसाठी गेलेल्या तरुणांना पिस्तुलाचा धाक दाखवून , त्यांच्याजवळीत कॅमेऱ्यासह तेरा हजारांचा ऐवज चोरट्यांनी लुटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

लोकसभेसाठी किमान ३ जागा हव्याच

$
0
0
शिवसेना भाजप युतीत दाखल झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) आगामी लोकसभा निवडणुकीत किमान तीन जागा मिळाल्याच पाहिजे असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

मोदींवरून शिवसेनेची कोलांटउडी

$
0
0
‘मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पहात नाही’ या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून मोदी यांना आपल्या मुखपत्राद्वारे कानपिचक्या देणाऱ्या शिवसेनेने काही तासातच आपला पवित्रा बदलला आहे.

कसारा-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत

$
0
0
मध्य रेल्वेवरील आसनगाव ते आटगाव दरम्यानच्या रुळाला तडे गेल्याने कसारा ते मुंबई मार्गावरील लांब पल्ल्याची रेल्वे सेवा कोलमडली आहे.

नाशिकला चार महिन्यात २५ सिटी बस

$
0
0
केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या जवाहरलाल नेहरु पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयुआरएम) नाशिक शहरासाठी एकूण २०० बस उपलब्ध होणार असून त्यातील २५ बसेस येत्या चार महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.

वाळूमाफियाने बालकाला चिरडले

$
0
0
वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरखाली मोटर सायकल सापडून चार वर्षांचा चिमुकला जागीच ठार झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथे रविवारी सकाळी घडली. या घटनेत मुलाचे आजोबा गंभीर जखमी झाले असून, घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ट्रॅक्टरची तोडफोड करून वाळू माफियाला बेदम मारहाण केली.

‘सुपर’च्या स्पेशालिस्टांचा पुन्हा संपाचा झेंडा

$
0
0
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटला राज्य सरकार व आरोग्य खात्याकडून स्पेशल ट्रिटमेंटच मिळत नसल्याने आरोग्य सेवासुविधांना घरघर लागली आहे.

व्हर्टिकल स्टुडिओतून शहराचा भविष्यवेध

$
0
0
आपल्या शहराची ओळख अधोरेखित करण्यासाठी नाशिकच्या विद्यावर्धन संचलित आयडिया या आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्हर्टिकल स्टुडिओ या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील नियोजनावर अभ्यास केला आहे.

‘सुपर’ला हवी स्पेशल ट्रिटमेंट

$
0
0
नाशिक हा आकाराने राज्यात ४था जिल्हा. दोन मोठी शहरं आणि १५ तालुक्यांमधील ६१ लाख लोकसंख्या असलेला हा जिल्हा. नाशिकसह धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यातील गरजूंना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात याची जबाबदारी त्या-त्या जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलची आहे.

प्रदर्शनापुरते विज्ञान नको !

$
0
0
संशोधनामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून आज सरकारमार्फ‌त अनेक प्रयत्न केले जात आहेत. विविध प्रकारच्या फेलोशीप्स, प्युअर सायन्समध्ये कौशल्य दा‌खविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप्स तसेच संशोधनामध्ये योगदान देणाऱ्यांना स्टायपेंड अशा अनेक गोष्टी सरकारमार्फत केल्या जातात.

व्यसनमुक्ती संमेलन, अपंग साहित्य संमेलनाचे आयोजन

$
0
0
राज्यातील व्यसनाधिनता कमी करण्यासह अपंगांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक न्याय विभागासह अपंग वित्त विकास महामंडळातर्फे साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बैठक

$
0
0
आगामी गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी डीजे वाजवू नये, वादग्रस्त देखावे उभारू नयेत, असे आवाहन सिन्नरचे पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी केले आहे.

उत्सवासाठी महागणेश सज्ज

$
0
0
आज राज्यभरात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्याचे वैभव असलेल्या सिन्नरच्या महागणपतीच्या सुशोभिकरणाची तयारी पूर्ण झाली आहे.

‘प्रभावी अंमलबजावणी हवी’

$
0
0
जादूटोणा व अंधश्रद्धेची प्रथा नष्ट होण्यासाठीच जादूटोणाविरोधी कायदा तयार केला गेला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय, विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयांचे कल्याण व व्यसनमुक्ती कार्यमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.

कालवा फोडल्याने पाणीटंचाई

$
0
0
देवळा तालुक्यातील रामेश्वर एमआय टँक जवळ चणकापुर वाढीव उजवा कालवा शुक्रवारी अज्ञात समाजकंटकांनी फोडल्याने सुमारे १० ते १५ दशलक्ष घन फूट पाणी वाया गेले.

व्यवसाय कर भरा, अन्यथा वाहन जप्त

$
0
0
प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) परमीट प्राप्त करून वाहनाचा व्यवसायिक वापर करणाऱ्या वाहनमालकाकडून दरवर्षी व्यवसाय कर आकरला जातो.

भोंदूगिरीला आळा घालण्याची कायद्यात ताकद

$
0
0
‘लवकरच अस्तित्त्वात येणारा जादूटोणाविरोधी कायदा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. भोंदूगिरीला आळा घालण्याची ताकद या कायद्यामध्ये आहे’, असे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.

बाप्पासाठी चांदीची खरेदी

$
0
0
नाशिक शहर चांदीच्या भांड्यासाठी प्रसिद्ध असून, गणपतीसाठी विविध प्रकारच्या चांदीच्या भांड्याची आवक झाली आहे. पुजेच्या साहित्याची विक्रमी विक्री झाल्याने सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद पेटणार?

$
0
0
बागलाण तालुक्याचे राजकीय केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सटाणा मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाची मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपली असून, सत्ताधारी संचालक मंडळाने मुदत वाढीसाठी सुरू केलेल्या हालचालींचे तीव्र पडसाद शुक्रवारी सटाण्यात झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत उमटले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images