Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जय देवी हरितालिके...

$
0
0
मंत्रोच्चाराचा स्वर, सुगंधी धूपाचा दर्वळणारा सुवास, ठिकठिकाणी वाळूने साकारलेली शिवलिंगे आणि हरितालिकेची मनोभावे पूजा करणाऱ्या महिलांचे समूह असा माहोल महात्मा नगर क्रिकेट ग्राऊंडजवळील गणपती मंदिर सभागृहामध्ये होता.

गोविंद सोनवणे यांचे निधन

$
0
0
येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद दौलत सोनवणे यांचे रविवारी हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते.

यावे गणराया!

$
0
0
संपूर्ण राज्यात लगबग सुरू आहे ती गणरायांच्या स्वागताच्या तयारीची. आज, सोमवारी घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपांत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा होईल आणि मग पुढील १० दिवस महाराष्ट्रभर गजर सुरू असेल...

व्यसनमुक्तीसाठी सरसावला अमिताभ

$
0
0
राज्यातील व्यसनाधिनता कमी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असून त्यास महानायक अमिताभ बच्चन यांचीही साथ मिळणार आहे.

महालक्ष्मीसाठी गोविंद विडा

$
0
0
समृध्दीच्या सोनपावलांनी घरोघरी येणाऱ्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठी नाशिकचा गोविंद पानविडा सजला आहे. महालक्ष्मीला विडा हा लागतोच तो पानविडा जर आयुर्वेदीक आणि आकर्षक स्वरुपात असला तर नक्कीच मन प्रसन्न करतो.

एअर फोर्स स्टेशनची रेकी ?

$
0
0
देवळाली कँम्प परिसरातील साऊथ एअर फोर्स स्टेशन या संवेदनशिल भागात विनापरवनगी येऊन तेथील फोटोग्राफ काढणाऱ्या एका संशयितास लष्करी जवानांनी पकडून देवळाली कँम्प पोलिसांच्या स्वाध‌‌‌ीन केले आहे.

बाप्पाला नैवेद्य हटके रेसिपीचा

$
0
0
गणेशोत्सवाची धूम गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू होती. बच्चे कंपनी आणि युवा वर्ग गणपती बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गुंतला होता तर गृहिणी नैवेद्य कसा करायचा यामध्ये. या हटके नैवेद्य बनविणाऱ्या महिलांना दाद देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘बाप्पासाठी नैवेद्य’ या रेसिपी स्पर्धा आयोजित केली आहे.

मंडळे शेकडो; CCTV मात्र तीनच

$
0
0
महागाई आणि कमी वर्गणीचे कारण पुढे करत अनेक मंडळांनी पहिल्याच दिवसांपासून सीसीटीव्ही बसव‌िण्याचा प्रस्ताव गुंडाळून ठेवला आहे. मंडळांच्या उदासीन धोरणामुळे शहरातील हजारो मंडळांपैकी फक्त तीन मंडळे सीसीटीव्हीच्या टप्प्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

गणराज रंगी रंगले !

$
0
0
ढोल ताशांच्या आवाजाने दुमदुमलेला परिसर, बच्चे कंपनीच्या चाहऱ्यावरचा आनंद आणि मंगलमूर्ती मोरयाच्या गजरामध्ये दंग झालेले नाशिककर अशा भारावलेल्या वातावरणात गणपती बाप्पांचे आगमन झाले. शहरातील घराघरात तसेच मंडळांमध्ये सोमवारी जल्लोषात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

ग्राऊंड वाचविण्यासाठी सर्व पक्ष एकत्र

$
0
0
शहरातील एकमेव खेळाचे मैदान असलेल्या सिन्नरच्या पोलिस परेड ग्राउंडवर होत असलेले प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तातडीने बंद करावे, अशी मागणी सर्व पक्षीयांनी केली आहे.

ध्वनिप्रदूषण थांबविण्यासाठी हेल्पलाइन हवी

$
0
0
दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण असले, तरी या काळात प्रदूषणाच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते.

तंटामुक्त गावांचा सन्मान

$
0
0
ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मोलाचे योगदान देणारी महात्मा गांधी तंटामुक्त योजना समाजस्वास्थ सदृढ व निकोप होण्यासाठीही उपयुक्त ठरू लागली आहे.

बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींचा राजीनामा

$
0
0
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व उपसभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी मंगळवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

गर्भलिंगनिदान करणा-या डॉक्टरांविरोधात फिर्याद दाखल

$
0
0
मालेगाव येथील सीताबाई हॉस्पिटलच्या माध्यमातून शिव- मंगल सोनोग्राफी केंद्रात बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान केले जात असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले असल्याने डॉ. अभिजीत शिवाजी देवरे व डॉ. सुमित शिवाजी देवरे या दोघांविरुद्ध येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. शिंदे यांनी फिर्याद दाखल करून घेतली असल्याची माहिती लेक लाडकी अभियानाच्या प्रणेत्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी दिली.

नाशकात पावसाचे दमदार पुनरागमन

$
0
0
मंगळवारी दिवसभर शहरासह जिल्हाभरात पावसाने दमदार पुनरागमन केले. शहरातील काही उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला तर मध्य भागात दिवसभर तुरळक पाऊस पडला.

नाशिकला हवेत नव्या शिल्पांचे पैलू

$
0
0
जगभरात नाशिकला वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी केवळ विकास व सुविधा नव्हे तर एखादा आयकॉन गरजेचा आहे हे लक्षात घेऊन आयडिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पाण्यामध्ये गोलाकार आयकॉन बनविण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

मविप्र फार्मसी कॉलेज ‘प्लेसमेंट’मध्ये अव्वल

$
0
0
मविप्र समाज संस्थेच्या फार्मसी कॉलेजने विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देण्यामध्ये महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकाविले आहे. ‘एमफार्म’चा अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच ८५ टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देणात कॉलेजला यश आले आहे.

नृत्य-गायनामधून नायिकांचे दर्शन

$
0
0
कुठे पार्वतीचा राग तर कुठे यशोदेची माया... कुठे राधेचे प्रेम तर सरस्वतीची विद्या... अशा विविध नायिकांच्या भावमुद्रांनी प्रेक्षक महिलांवर मोहिनी घातली. निमित्त होते स्त्री मंडळाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. शिल्पा देशमुख व प्र‌ीतम नाकिल यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला.

त्यांचाच ढोल वाजला!

$
0
0
गणेशोत्सव म्हणजे उत्साह, आनंदाचा उत्सव. अनेकदा या उत्साहाला भरात आपलंच हसू होण्याचा प्रकार घडतो. गणेश चतुर्थीला असाच एक किस्सा घडला. स्थापनेच्या दिवशी सार्वजनिक मंडळं आपला गणपती वाजत-गाजत नेतात.

होर्डींगची बजबजपुरी

$
0
0
पुर्वी आपल्या कामाच्या बळावर नेते मोठे होत असतं परंतु सध्याचे नेते होर्डींग या नागरिकांसाठी त्रासदायक घटकांवर मोठे होण्याची धडपड करत आहेत. याचे विदारक चित्र नाशिकरोड परिसरात दिसते आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images