Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सरदवाडी धरण भरल्याचा वाहनांना फटका

$
0
0
सिन्नरजवळील शिवनदीला पूर आल्याने घोटी-सिन्नर हायवे रविवारी रात्री बंद होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळपर्यंत ठप्प होती.रविवारच्या जोरदार पावसाने सरदवाडी धरण भरल्यामुळे येथील शिवनदीला पूर आला.

शेरास सव्वाशेर

$
0
0
नाशिकरोडला विभागीय महसूल कार्यालय असल्याने अनेक लोक आपल्या कामासाठी पाच जिल्ह्यातून तेथे येत असतात. यात नाशिक बरोबरच, धुळे. जळगाव, नगर, नंदुरबार या जिल्ह्यातील नागरिकांचा प्रामुख्याने समावेश असतो.

गोदेला पुनर्वेभव प्राप्त होईल?

$
0
0
दक्षिणेची गंगा म्हणून प्रसिध्द असलेली गोदावरी ही नाशिककरांसाठी जीवनदायिनी‌ आहे. ती लोकांना जीवन देते; त्याबदल्यात लोक तिला काय देतात? चहुबाजुने प्रदुषण. कुणी धुणे धुते, कुणी भांडी घासते, कुणी गाड्या धुते तर कुणी अंघोळ करते.

सबलीकरण धोरण लांबणीवर

$
0
0
‘युजीसी’च्या सुचनेनुसार पुणे विद्यापीठाने पुणे, नाशिक व अहमदनगर या तिन्ही जिल्ह्यांमधील विद्यार्थीनींसाठी महिला सबलीकरण अभियानाचे आयोजन केले होते.

डीपी सादर

$
0
0
शहर विकास आराखड्यासंबंधी सोमवारी झालेल्या महासभेदरम्यान, प्रारूप विकास आराखडा सादर करण्यात आला. विकास आराखडा फुटीसंदर्भात चौकशी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

‘महिला कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या’

$
0
0
शहरातील एमआयडीसीत घडणाऱ्या गुन्हेगारी घटना पाहता महिला कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत कामगार आयुक्तालयाने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

कृत्रिम तलाव सज्ज

$
0
0
आठ दिवसांपासून भक्तगणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गणपतीबाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गोदेतील व इतर नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने यंदा २९ कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी हवी स्वतंत्र बँक

$
0
0
देशातील सर्वात मोठे सरकारी नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वंतत्र बँक सुरू करण्याची मागणी खा. प्रताप सोनवणे यांनी केली आहे.

... तारा मात्र लोंबकळत्याच

$
0
0
गणपतीच्या मिरवणूक मार्गावर असलेल्या ओव्हरहेड वायर्स काढून टाकाव्यात, अशी मागणी मंडळांनी महावितरणकडे केली होती. ही कामे पूर्ण झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.

मुलीने केला आईच्या हत्येचा प्रयत्न

$
0
0
घरगुती भांडणातून मुलीने आईला डास मारण्याची क्वाईल खाऊ घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी २७ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व अंजनाकडे

$
0
0
मलेशिया येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या पहिल्या आशियाई शालेय स्पर्धेच्या भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकची धावपटू अंजना ठमके हिच्याकडे सोपवण्यात आले आहे.

‘सुपर’ स्पेशालिस्ट संपावर

$
0
0
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या पगाराचा तसेच अपुऱ्या सोयीसुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ राज्य सरकारला दिला होता.

उन्हाळ कांद्याला सोन्याचा भाव!

$
0
0
शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा आता संपत आल्याने राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच सध्या देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याला मोठी मागणी असल्याने शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याला सोन्याचा भाव आला आहे.

गणेशभक्ताला असाही ‘आदेश’

$
0
0
दहा दिवसांपासून गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. घराघरात आणि चौकाचौकात बाप्पा विराजमान झाले आहेत. शहरातील काही सोसायटी, कॉलनी, वसाहतीतही छोटेखानी सार्वजनिक मंडळांनी विनायकाची स्थापना केली आहे.

'नामको'वर रिझर्व्ह बँकेचा वॉच?

$
0
0
नाशिकमध्ये आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्हा मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेची (नामको) येत्या शनिवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

अन्न सुरक्षा नो‘मोर’!

$
0
0
त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉलमध्ये असलेल्या मोर मेगा स्टोअरमध्ये अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

बॉशची उत्पादन प्रक्रिया बंद

$
0
0
ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीच्या छायेमुळे नाशकातील मोठी इंडस्ट्री असलेल्या बॉशलाही फटका बसत असल्याने गेल्या चार दिवसांपासून बॉशमधील उत्पादन प्रक्रिया बंद आहे.

अव्यक्त वेदना

$
0
0
महिलांच्या छेडछाडीच्या अनेक घटना राजरोसपणे घडत आहेत. त्यातील काही घटना पोलिसांपर्यंत पोहचतात तर काही पोलिस स्टेशनच्या पायरीवरून माघारी फिरतात.

विसर्जनावर CCTV ची नजर

$
0
0
गणेश विसर्जन मार्गासहीत शहरात २७ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. शहर पोलिस दलाने दिलेल्या प्रस्तावानुसार महापालिकेने सुमारे १३ लाख रूपये खर्च करून सीसीटीव्ही बसवल्याची माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी दिली.

हृद्‍रोगाच्या अचूक निदानासाठी

$
0
0
हार्ट पेशन्टच्या हृदयाच्या हलाचाली, त्याची क्रिया कशी आहे आणि त्यातील अडथळे किती आणि कुठे आहेत हे अचुकपणे विविध टेस्टमध्ये मिळाल्यास डॉक्टरांना हृदयरुग्णांवर योग्य आणि परिणामकारक उपचार करता येतो.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images